बार्बेक्युनेशन..

तुम्ही एखाद्या हॉटेलमधे  जाता. जर पंचतारांकित हॉटेल असेल तर,  त्या हॉटेलमधे लॉबी मधे शिरल्या बरोबरच आपल्या  पेक्षा वेटरचे कपडे जास्त चांगले दिसताहेत का? हा प्रश्न छळत असतो. सगळे टु पीस सुट मधले वेटर्स , आणि तुम्ही स्वतः कॅजुअल मधे.

सहज आजूबाजूला नजर जाते आणि इतर कस्टमर्स कुठल्या प्रकारचे कपडे घालुन आलेले आहेत तिकडे लक्ष जातं. जेंव्हा सगळे इतर कस्टमर्स पण फॉर्मल ट्राउझर शर्ट किंवा कॅज्युअल्स ऍपरल्स मधे दिसतात तेंव्हा जीव भांड्यात पडतो, आणि आपला गेलेला कॉन्फिडन्स परत येतो.. कुठल्याही पंचतारांकित हॉटेल मधे गेल्यावर येणारा हा फील मला नेहेमीच अस्वस्थ करतो. काही हॉटेल्स जरी ऑफिशियली पंचतारांकित  नसले, तरीही त्या हॉटेलमधे काम करणारे कर्मचारी अगदी त्याच पद्धतीने वागत असतात.

बार्बेक्यु म्हणजे कोल वर डायरेक्ट भाजून केलेले पदार्थ. हा प्रकार तसं खरं तर अमेरिकेत खूप पॉप्युलर आहे. पण आपल्या कडे पण हल्ली बराच पॉप्युलर झालेला आहे. तंदूर मधे डायरेक्ट निखाऱ्यावर धरुन भाजले जात नाही, एवढाच काय तो फरक तंदूर अन बार्बेक्यु मधे.

परवाच पुण्याला जाउन आलो. मिटींग नंतर पार्टी होती वाकड जवळच असलेल्या सयाजी हॉटेल मधे दहाव्या मजल्यावरच्या रुफ टॉप ओपन एअर रेस्टॉरंट  आहे नांव आहे – बार्बेक्युनेशन -नवीनच कन्सेप्ट आहे तसा हा ..

खरं तर भारतामधे सयाजी हॉटेलने ह्या चेन च्या अंतर्गत बरीच हॉटेल्स सुरु केलेली आहेत. मुंबईला , ठाणे, पुणे, बंगलोर, बडोदा, दिल्ली, अहमदाबाद  आणि अजून बऱ्याच ठिकाणी ह्या हॉटेल्सचे आउटलेट्स आहेत.

तुमच्या टेबलवर लाइव्ह बार्बेक्यु- हा कन्सेप्ट आहे. खरं तर ह्या हॉटेल मधे गेल्यावर आधी बिना टेबलक्लॉथ चे टेबल्स पाहिले की थोडं आश्चर्यच वाटतं. टेबलवर मध्यभागी एक कव्हर असतं, ते कव्हर काढून त्या ठिकाणी वेटर बार्बेक्यु ( लाकडी कोळसा (चार्कोल)  पेटलेला असतो आणि वर जाळी आणि सळ्या लावण्याची व्यवस्था केलेली असते)  आणून लावतो. त्या छोटेखानी बार्बेक्युच्या प्रतिकृती मधे पदार्थ तयार होणे शक्य नाही असे नाही- जरी पुर्ण पणे शिजवायचे म्हंटले तर  वेळ खूप लागणार, म्हणून तुमच्या टेबल वरच्या त्या बार्बेक्यु मधे  सगळेच पदार्थ ऑलमोस्ट शिजलेले अशा  अवस्थेत आणून लावतात. टेबलवरची बार्बेक्यु फक्त ते पदार्थ गरम ठेवायलाच उपयोगी पडते.कोळशावर वर शिजवलेल्या पदार्थांची एक वेगळीच चव असते. तंदूर अन बार्बेक्यु मधल्या पदार्थाच्या चवीत खूप  अंतर असते.

हॉटेलचा ऍम्बिअन्स खूप छान आहे. उन्हाळ्याच्या दिवसात दहाव्या मजल्यावर ओपन एअर रेस्टॉरंट  हवेशीर बसायला खूप छान वाटत होतं. वेटरने येउन व्हेज की नॉनव्हेज विचारलं. समोरचा मेन्यू पाहिला, आणि नॉनव्हेज सांगितलं त्याला. थोड्याच वेळात ब्लॅक ऍंड व्हाईट आणि चिकन जैतूनी लेग पिस  आणि सीख कबाब समोर आला एका प्लेट मधे आणून ठेवला. समोर ग्लास आहे हे विसरुन गेलो आणि  पाचच मिनिटात चिकन लेग चा फडशा पाडला.

समोरच्या बार्बेक्यु वर वेटर लोखंडी सळी मधे चिकन, फिश, पनीर व्हेज  लावलेल्या समोरच्या बार्बेक्यु वर आणुन लावत होते. बार्बेक्युच्या शेजारीच एका साईडला बटर, बार्बेक्यु ऑइल, स्पाइसेस आणि सॉस ठेवले होते. समोरच्या पिसेसला फिरवायला म्हणून लाकडी मुठ होती त्या सळीला.  समोरच्या सळीवरच्या फिशचे पिसेस काही फारसे आवडले नाहीत, पण चिकन आणि मश्रुम विथ पायनॅपल आणि इतर व्हेज डिशेस पण छान होत्या. अधुनमधून   वेटर सीख कबाब, बार्बक्यु पोटॅटो आणुन सर्व्ह करत होता. कुठल्यातरी पांढऱ्या बार्बेक्यु  सॉस मधले ते बार्बेक्यु पोटॅटो चवीला एकदम मस्त लागत होते. व्हेज खायचं नाही असं ठरवलं तरीही बटाट्याला नाही म्हंटलं नाही शेवटपर्यंत. प्रत्येक सर्व्हिंग ला घेतले ते  पोटॅटो.

सोबत मित्र मंडळी, नुकतंच काम आटोपले- रिलॅक्स होण्यासाठी एकदम अप्रतीम जागा.  ड्रिंक्स चा ग्लास धरुन  गप्पा मारत टाइम पास करायला ही जागा एकदम उत्कृष्ट  ! इथे जायचं तर   दोन तीन तास हाताशी असलेच पाहिजे. घाई गडबडीत बिझिनेस डिनर साठी ही जागा नाही. जवळपास अडीच तास असंच बार्बेक्यु थंड होई पर्यंत खाण्यात घालवले. मस्त पैकी गप्पा आणि खाणं..

शेवटी  इतर काही खायची इच्छाच नव्हती, म्हणून सरळ डेझर्ट्स कडे मोर्चा वळवला.   आइस्क्रीम, पेस्ट्री, डार्क चॉकलेट पेस्ट्री घेतली. गुलाब जाम टाळले.  या जागेवर नॉनव्हेज अतिशय उत्कृष्ट मिळते, पण व्हेज साठी इतके पैसे म्हणजे ५५० रु. थोडे जास्तच वाटतात.

कमीत कमी दहा  लोकं असतील तर बारमन्स पॅकेज  देतात ते लोकं. पण त्या साठी आधी पासुन बुकींग करावे लागते. त्या पॅकेज मधे अनलिमिटेड सिलेक्टेड ड्रिंक्स आणि बार्बेक्यु असतो. स्कॉच मधे ब्लॅक ऍंड व्हाइट , टीचर्स, चा चॉइस होता तसेच बिअर वगैरे पण होते. आता एक गोष्ट तेवढीच खरी की अशा ठिकाणी गेल्यावर खाण्यावर जास्त भर दिलेला असतो पिण्या  पेक्षा. या पॅकेजची किम्मत साधारण १०००- ते १२००  रुपयां पर्यंत असते. मेनू मधे फक्त आज काय आहे अव्हेलेबल तेवढंच दिलेलं असते. पॅकेज मधे सगळ्या प्रकारचे नॉनव्हेज, व्हेज इन्क्लुडेड आहे.    ऑर्डर करायची तर साधारण ५५० रुपये प्रती  व्यक्ती चार्जेस आहेत. जर नॉन व्हेजचे शौकीन असाल तर एकदा अवश्य भेट द्या या जागेला. पुणे, दिल्ली , बंगलोर, बडोदा, कुठेही असाल तरी..

बार्बेक्युनेशन चे तुमच्या शहरातले आउटलेट कुठे आहे? इथे त्यांच्या वेब साईटवर चेक करा...

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खाद्ययात्रा and tagged , , . Bookmark the permalink.

55 Responses to बार्बेक्युनेशन..

 1. मस्तच आहे बार्बेक्यु नेशन. सयाजी हॉटेल मधली हि त्यांची नवीन शाखा आहे. गावात पण एक शाखा आहे त्यांची. तिथले डेझर्ट्स पण अप्रतिम असतात.

  • अभिजीत
   बरेच दिवसापासून जायचं मनात होतं. बडोद्याला पण एकदा ऑलमोस्ट जाणं नक्की केलं होतं, तर नेमकं मित्राला गुज्जू थाली खायची इच्छा झाली म्हणुन सुटलं.

   बार्बेक्यु ओपन एअर मधेच बरी वाटते. त्याची मजा एसी रेस्टॉरंट मधे नाही 🙂

 2. मजा चालली आहे बुवा तुमची….माझ्यासाठी हे बार्बेक्यु वैगेरे सर्व नविनच…बाकी आम्ही कोंबडीच लिवर वैगेरे डायरेक्ट निखारयावर भाजुन खातो गावी…

  • देवेंद्र
   वाह!! क्या बात है.. लिव्हर नुसतं भाजून मस्त लागत असेल !! असा घरी भाजून बनवलेल्या लिव्हरपुढे बार्बेक्यु काहीच नाही!!!
   सही. लहान असतांना बटाटे आणि कांदे भाजून खायचो चुलीत भाजून.

 3. किंमत थोडी जास्त असली तरी नॉन व्हेजसाठी वर्थ आहे. आम्ही तर तिकडे जायला एक दिवस आधीपासून प्लॅनिंग करतो. दुपारी खूप कमी जेवतो. आणि वेटर थकेपर्यंत टेबलावरचा फ्लॅग खाली करायचा नाही. स्टार्टर्सच एवढे होतात की पुढचा मेनकोर्स काय आहे हे पाहतही नाही. स्टार्टर्सनंतर डायरेक्ट डेझर्ट्स 🙂

  त्यांची इकडे माझ्या घराजवळही कल्याणीनगरला ब्रॅंच आहे. पण सयाजी रुफटॉपची जागा एकदम बेश्ट!!!

  • पंकज
   जर दिलेले पैसे वसूल करायचे असतील तर मग नक्कीच दुपारी कमी जेउन जायचं तरच शक्य आहे. मी पण स्टार्टर्स नंतर डायरेक्ट डेझर्ट्सकडेच गेलो होतो. स्टार्टर्र्सच इतके जास्त होतात की त्या नंतर जेवायची इच्छाच रहात नाही. आम्ही अडीच तास स्टार्टर्स खात होतो. 🙂 नंतर काय जेवणार?

 4. Maithili says:

  Thanyachya B N madhye gele hote….chaan aahe… 🙂

  • माझा आणि रोहनचा प्लॅन होता तिकडे जायचा .. पण राहून गेलं.

  • Rohan says:

   घराच्या जवळ आहे इकडे तरी जाणे होत नाही आहे 😦 अपर्णाला सुद्धा बोललो होतो एक दिवस जाउया डिनर ला… आता लवकरच हल्लाबोल करावा लागणार

   • घराजवळ असलं की दुर्लक्ष होतं. थोडं दूरच असायला हवं.. 🙂

   • Aparna says:

    अरे रोहन, राहिलं बघ आपलं…मला वाटलं होतं शेवटच्या आठवड्यात एकदा जाता येईल पण …..आता पुढच्या वेळेस नक्की बघ…

 5. श्रीमंत, निषेध बर 🙂
  बाकी काही बोलायला जागाच ठेवली नाही, मस्त मेन्यु आणि बार्बेक्यु 🙂

 6. हैद्राबादला असताना खाल्लं आहे इथे २-३ दा.. मजा आली. आणि तुम्ही म्हणालात तसं इथे तर खूपच कॉमन आहे हे. 🙂

  • इथे व्हेज म्हणजे ब्रोकोली, पनिर, शिमला मिर्ची , पायनॅपल होतं. माझं सुटलं होतं बऱ्याच दिवसापासून – शुक्रवारी योग आला 🙂

 7. vikram says:

  बार्बेक्यु मस्तच आहे वाटत
  एकदा ट्राय मारायला हवाच 🙂

 8. हे लिटील इटली आणि बार्बेक्यु नेशन राहीले आहेत… येणार्‍या दोन आठवड्यात कसेही करुन जाणार आता

 9. काय योगायोग आहे काका मी पण आजच दुपारी बार्बेक्युमधे गेलेलो. नेहमीप्रमाणे खाण्याकडे लक्ष असल्याने फोटो काढायचे राहून गेले. मला चिकन बरोबर स्टार्टरमधले प्रॉन्स खूप आवडतात आणि मेन मेनुमध्ये फक्त मटण बिर्याणी आणि मटण ग्रेव्ही अप्रतिम. डेझर्ट्समध्ये मी आइस्क्रीम, कलिंगड आणि हो तुमच्या वाटणीचे गुलाबजाम हाणले. काळजी नसावी.
  बाकी व्हेज आणि नॉनव्हेजच्या बिलामध्ये केवळ ५० रुपयाचा फरक असल्याने शाकाहारी माणसांनी BBQ च्या दिशेला फिरकू देखील नये.

  • व्हेज लोकांसाठी नाहीच हे रेस्टॉरंट.. माझं नुसतं स्टार्टर खाउन पिउनच पोट भरलं. नंतरचं उगिच काहीतरी खायचं म्हणून खाल्लं. पण डेझर्टस मस्त आहेत इथले. पुन्हा एकदा जायलाच हवं !! पुढल्या आठवड्यात अहमदाबादला गेलो की जाइन पुन्हा.

 10. सागर says:

  किमत मला सद्य जास्त वाटत आहे…पण लवकरच जाईन तिकडे…. 🙂

  • सध्या तुझ्या साठी ऍज अ स्टुडंट नक्कीच जास्त आहेत. मी पुण्याला आलो की तुला फोन करतो मग जाउ या आपण एकदा! 🙂

 11. Sarika says:

  लवकरच जायला हवं…

  • सारिका
   बरेचसे हटके असलेले हॉटेल्स उगिच सुटतात आपल्या व्हिजिट्स मधुन. म्हणुन हे पोस्ट टाकलंय. नक्की जाउन ये एकदा.

 12. neetagadre says:

  Very nice post.
  Thanyaatlya outlet madhe jaaylach pahije.

 13. काय साहेब, आमच्या एरियात आलात आणि आम्हाला पत्ता पण नाही? २ महिन्यापूर्वी गेलो होतो इकडे ग्रुप मध्ये. दर जास्त आहेत पण वसुली आहे. पुढच्यावेळी पुण्याचा बेत असेल तर ईमेल टाका. भेटायला आणि एकत्र खादाडी करायला आवडेल.

  • निरंजन
   दोन दिवस पुर्ण वेळ मिटींग मधेच बिझी होतो. दिवसभर मिटींग हॉल मधेच जायचा. फक्त एक रात्र मिळाली थोडं रिलॅक्स व्हायला. पुढल्या वेळेस नक्की भेटू या. 🙂

 14. Rajeev says:

  ” बार ” बे.. क्यू ?
  खादाड खाउ, लांडग्याचा भाउ……
  तू कायम बीहाईंड द ” बार ” जायला तयार…
  नरकात गेलास की तीथेही आगीवर कोंबडी भाजून खाशील..

  ” कोंबडी आणी बार, सोबत दोन यार…
  कायम आम्ही तयार.
  थंड गार बीअर, करू आम्ही शेअर , ..

  बाकी फ़ोनवर बोलीन……का र ण
  मागे एक कोमेंट टाकली होती , ती वाचून एका वीदूषी ने मा झा मोर्या के ला हो ता…

  • का रे हा लांडगा कोण?? तूच का?
   माझ्या पेक्षा तू जास्त शौकीन आहेस.. तुझी आठवण केली होती खाताना.

 15. Vidyadhar says:

  नेहेमीप्रमाणेच खमंग पोस्ट. पण अफसोस मी नॉनव्हेज खात नाही. एकदा बार्बेक्यू वरचे व्हेज पदार्थ ट्राय करायचेत पण. बघू केव्हा योग येतो ते.

 16. तोंडाला पाणी सुटलं ना राव! आता पुण्याची एक ट्रिप मारायलाच हवी. 😉

  • विशाल, लवकर ट्रिप मारा एकदा. एखादी चांगली जागा उगिच सुटते म्हणुन पोस्ट टाकलं इथे. 🙂

 17. बा. ने. आमच्या घराच्या खूप जवळ आहे पण मी नाव नाही काढत या हॉटेलचे कारण व्हेज मध्ये जास्त ऑप्शन नसणार माहिती आहे.

  • तू अजिबात जाऊ नकोस.. उगीच पैसे वाया घालवणे आहे व्हेज साठी तिथे जाणं म्हणजे!

 18. Bharati says:

  निषेध ! नॉनवेज निषेध ! मुकया प्राण्याना मारताना त्यांचे रकताचे अश्रू मानवाला दिसत नाही नि म्हणे माणुसकी फक्त माणसात
  आढळते ! ते खाणे किती योग्य , ईतरांची उदा….खाणारे देत बसतात.माणूस मावसाहाराशिवाय राहू शकत का नाही ? या पृथ्वी तळावर सर्वाना जगायचा अधिकार आहे.बकरी मारताना कोकराचा विचार नाही, खर्वस खाताना वासराचा विचार नाही.कोंबडी होलीला टांगताना पिलाचा आक्रोश ऐकू येत नाही,आणि शर्यतीत धावताना बैईलाचा फूटनारा उर दिसत नाही…टाळ्या वाज्वतात.
  आणि हो…कुप नलिका खनताना ज्या माणुसकीला स्वाताच्या बाळानचा विचार डोक्यात नाही,ते एतरांच्या मुकया प्राण्यांच्या(?)जीवाची परवा कशाला बरे करतील ?
  महेंद्र्जी माफ करा… बहुतेक एथे माज़ा आता खिमा बनणार….खाणारे जास्त आहेत ..खर तर लिहिणार नवते नाहीतर मला ब्लॉगवर बंदिबिंडी घालाल! बाकी पोस्ट वाचूनच पोट भरले !

  • भारती
   पुर्ण पणे व्हेज लोकं पण असतात, ज्यांना नॉनव्हेज खाणं क्रूर वाटतं. चालायचंच!! प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं, आणि प्रत्येकाच्या मताचा आदर हा केला गेला पाहिजे या मताचा मी आहे.

 19. mau says:

  wahh wahh..kyaa baat he…[=d>][=d>]

 20. Girish says:

  Barbeque nation is one of rarest place in pune which serves Jack Daniels…

  • गिरिष
   काय सांगतोस? आमच्या पॅकेजमधे ब्लॅक ऍंड व्हाईट होतं. गोव्याला जातोय परवा, तेंव्हा जे. डी. नक्की!!

 21. महेश says:

  खवायेगिरी हैदराबाद येथे चांगलीच आहे पुण्यामुळे हैदराबादची आठवण झाली ,

  • हैद्राबाद काही ठराविक गोष्टींसाठीच जसे (नॉनव्हेज साठी) चांगले आहे. तसेच लखनऊ पण अप्रतीम आहे. एवढ्यात गेलो नाही लखनऊला. 🙂

 22. bhaanasa says:

  आले की जायला हवे एकदा. नचिकेतला नक्कीच आवडेल. 🙂 व्हेजमध्ये काही नाही तर बटाटे झिंदाबाद आहेतच. इथे स्प्रिंगची चाहुल लागल्यापासून अगदी झाडांच्या काड्या होईतो व काही अती उत्साही लोक तर चक्क स्नोमध्येही बारबेक्यु करतात.

  • अमेरिकेतून तू येणार नां? हिरवा फ्लॉवर ( ब्रोकोली ) पण मिळेल .. इथे आजकाल फार फॅड निघालंय त्याचं. 🙂
   आणि पनीर तर आहेच.. 🙂 बार्बेक्यु म्हणजे फॅमिली गेट टुगेदरचा एक कार्यक्रम 🙂

 23. Aparna says:

  इथे सॉलिड कॉमन आहे पण मजा येते..माझ्या आधीच्या घरी बाहेर होतं गॅस कनेक्शन सकट..एकदा सुरु झालं की माझा नवरा कोंबडीपासुन, बटाटा, चीज घालुन मिरच्या असं काय काय करत राहायचा आणि आम्ही तृप्त खात राहायचो…आता अपार्टमेन्टला घ्यावं लागेल या उन्हाळ्यासाठी….

 24. mahesh mohan shinde says:

  tondala lekh vachatana pani sutle agadi …………………………….
  ani open air place manjer agadi majjach ……………………..
  ek family trip org karayala pahije lavakarach…………..

 25. swapna says:

  mazya honarya navryala surprise mhanun ithe nyayacha tharvtey.. pan parvadel ka mala? nahi tar “tuch bill de ata…” hech surprise vhayacha…! 550/ per person mhanje unlimited ka? mala hyacha costingcha concept kalal nahi.. karan menu madhye khup veg variety pahili me. pan mag nakki rate ha per plate aahe ki saglach thoda thoda??

  • ५५० मधे अनलिमिटॆड असतं.. सगळं काही इन्क्लुडेड.. अवश्य घेउन जा. जर नॉन व्हेज खाणारा असेल तर नक्कीच जागा आवडेल ही. पण व्हेज साठी एक सामान्य जागा आहे ही.. इथे जायचं तर नॉन व्हेजच खायला हवं..

 26. ngadre says:

  ठाण्याच्या बारबेक्यूनेशन मध्ये गेलोच शेवटी. झकास एम्बीअन्स..झकास स्टार्टर्स..त्या मानाने सामान्य मेन कोर्स..उत्तम डेझर्टस..

  ते बेक्ड पोटाटो विथ व्हाईट सॉस..वाह वा..

  तुमची आठवण काढत तुडुंब खाल्ले..मेन इश्यू …स्टार्टर्सनी पोट इतके दणकून भरते की मेन कोर्स ला न्याय देताच येत नाही. आणि म्हणून तो अजूनच बेचव वाटतो.

  • इथे मेन कोर्स ला हातच लावायचा नाही. स्टार्टर्सनीच पोट भरुन जातं. डेझर्ट्स पण अगदी बळजबरीने खाल्ले जातात. मस्त जागा आहे …

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s