बाइक, कार आणि बेस्ट

कालच एका मित्राबरोबर कारने येताना त्याच्या कारला एका साईडला एक बाईकवाल्याने बाईक घासून नेली. मोठा ओरखडा उमटला. कार पण नवीनच- म्हणजे नुकतीच तीन महीन्यापूर्वी घेतलेली. ओरखडा उमटल्यानंतर तो बाईक वाला सुसाट वेगाने, दोन कारच्या मधल्या जागेतून पुढे निघून गेला. मुंबईला असं काही झालं की बाईक वाल्यांना पकडणं कठीण होतं. सगळ्या बारीक बारीक जागांमधून सिग्नलच्या अगदी समोर ( म्हणजे आमच्या समोर १२-१५ कारच्या पुढे जाउन उभा राहिला तो. बाइक चालवणारे मुंबईला फारच रफ ड्राइव्ह करतात. जागा नसली तरी पण बाईक घुसवून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात- एखाद्या कारला जर धक्का लागला, किंवा डेंट लागला, तर सॉरी म्हणून पुढे जायचं हे नेहेमीचंच आहे.फुल स्पिडनी बाइक चालवून एकदम कारच्या मागे आणून ब्रेक दाबायचा, की बाईकचे समोरचे चाक कारच्या मागच्या भागावर जोरदार आपटलं – आणि मग पुन्हा सॉरी….. म्हंटलं, की झालं.

कार थांबवून पार्किंग लाइट लावून आम्ही खाली उतरलो, आणि  किती डॅमेज आहे ते चेक केलं. त्या ओरखड्याकडे पाहुन हळहळण्या पेक्षा जास्त काहीच करु शकलो नाही. तो बाईक वाला तर निघून गेला, पण जरी सापडला असता, तरीही हॉट अर्ग्युमेंट आणि बाचाबाची व्यतिरिक्त फारसं काही झालंच नसतं. मला आठवतं एकदा माझ्या कारला मागून एका बाईकवाल्याने येउन धडक मारली होती, मी उतरलो तर शांतपणे तो म्हणतो, ” माझं इन्शुरन्स आहे, क्लेम करुन घ्या डॅमेजेस- हवं तर मी पण पोलीस  स्टेशनला येतो”. एखाद्या लहानशा ओरखड्यासाठी इन्शुरन्स क्लेम करणं हे पण योग्य वाटत नाही, कारण नो क्लेम बोनसचा गाजर समोर दिसत असतो नेहेमीच, आणि शेवटी पोलिसांचा रिपोर्ट आणि तो वेळकाढू प्रकार नकोसा होतो आणि सरळ आपल्या पैशांनी रिपेअर करुन घेतो आपण. हे असे लहान सहान स्क्रॅचेस नेहेमीच अस्वस्थ करतात. आणि त्यातल्या त्यात नवीन कार असेल तर मग अजूनच वाईट वाटतं.

मुंबईला पुर्वी फक्त फियाट टॅक्सी होत्या. त्या डिझल इंजिन लावलेल्या अती जुन्या कार रस्त्यावर चालायच्या कशा ते एक आश्चर्यच आहे. समोरच्या दाराच्या हॅंडलला

टॅक्सी जाहिरातीच्या साठी वापर

एक लालसर रंगाचा गमछा बांधलेला, पानाच्या पिचकाऱ्या मारीत कार चालवणारा  ड्रायव्हर म्हणजे नेहेमीचेच दृष्य होते.   मधेच समोरच्या खिडकीतून हात बाहेर काढून आपल्या तीर्थ रूपांचा रस्ता असल्याप्रमाणे मनात येईल तेंव्हा  लेन बदलणे हा त्याचा जन्म सिद्ध हक्क असल्याप्रमाणे तो टॅक्सी ड्रायव्हर म्हणजे इतर नवीन कार चालकांना (* म्हणजे ज्यांची कार नवीन आहे त्यांना) अगदी यमदूता प्रमाणेच भासत असतो. हल्ली मारू वगैरेच्या टॅक्सी मुळे हे चित्र बऱ्यापैकी बदललेले आहे.

“टॅक्सी डार्यव्हर्स स्वतःला पायलट आणि टॅक्सीला हेलिकॉप्टर समजतात ”

नसलेल्या जागेतून जागा निर्माण करणे यांचा छंद असतो. कशीही चालवली, तरी आपली कार खराब होणार नाही याची खात्री त्यांना असते. फियाटचा जाड पत्रा असल्याने नुकसान नेहेमी नवीन कार्स चे  होते हे माहिती असल्याने कसेही चालवण्याचे ह्यांचे कौशल्य अधिकाधिक वृद्धिंगत होत गेलेले आहे..

आजकाल नवीन कार्स कम्प्लसरी केल्यामुळे सगळे सॅंट्रो किंवा वॅगन आर टॅक्सी वाले थोडे सांभाळून चालवतात. सगळ्या फियाट टॅक्सींना लवकरात लवकर बंदी आणावी सरकारने. :)तुमच्या कारचे नुकसान होऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही स्वतःची कार सांभाळा आणि या यमदूतांच्या मार्गात येऊ नका.

हे टॅक्सी वाले घाबरतात ते फक्त बेस्ट च्या ड्रायव्हर्सना. हे बेस्ट चे ड्रायव्हर्स तर लेन कटींग आणि हवी तशी बस चालवण्याच्या बाबतीत तर या टॅक्सीवाल्यांचे बाप ! बस स्टॉप जर डाव्या बाजूला असेल, तर एक लेन सोडून बस रस्त्याच्या मध्यभागी उभी करुन मागच्या ट्रॅफीकचा खोळंबा करणे यांचा पास टाइम! मला तर वाटतं की,बेस्ट च्या वाहनचालकांसाठी स्पेशल ट्रेनिंग दिले जात असावे , आणि त्यांच्या मनावर हे ठसवण्यात आले असावे की रस्त्याचे नियम हे केवळ इतर वाहनचालकांसाठी आहेत- बेस्ट साठी नाहीत. हे बेस्ट वाले म्हणजे अनभिषिक्त राजे  आहेत रस्त्याचे. रोल्स किंवा मर्क जरी असली, तरीही यांना बघून आधी आदराने जागा देऊन पुढे जाऊ देतात.

बस मधे जर आत बसलेले पॅसेंजर्स   तर  सडन ब्रेकिंग ( दर दोन मिनिटाला करकचून मारलेल्या ब्रेकला सडन ब्रेक म्हणायचं का?) मुळे लवकरच स्पॉंडीलायटीस चे पेशंट बनतात.

फियाट टॅक्सीची एक स्पेशॅलिटी म्हणजे, तिचे दार फुल्ल टू ताकत लाऊन आपटल्या शिवाय बंद होत नसे. बरीच मंडळी जी नेहेमीच टॅक्सी मधे फिरायची, त्यांना अशी दार आपटून बंद करायची सवय झालेली असते.  तुमच्या नवीन कार मधे पण कारचा दरवाजा धाडकन आपटून बंद केल्याशिवाय या लोकांचे समाधानच होत नाही. तुम्ही तो बसल्यावर जरी दरवाजा स्वतः हलकेच बंद केला, तरी तो तुमचा मित्र,नीट लागलेलं नसावं असे समजून पुन्हा उघडून आपटून लावणार हे नक्की. हे माझ्या बाबतील तर नेहेमीच घडते., नवीन कारचे दरवाजे कोणी असे आपटून बंद केले की जीव कासावीस होतो हे त्या कारच्या मालकाला व्यवस्थित समजेल. माझ्या कारच्या दरवाजा मधे बसवलेले स्पिकर्स खिळखिळे होऊन महिन्याभरातच दाराचा आवाज सुरु झाला होता- पण काहीच बोलता येत नाही- तोंड दाबून बुक्क्याचा मार .

नेट वरुन घेतलेला

केवळ बस, टॅक्सी किंवा बाइकवाल्यां पासूनच कार चालकांना सांभाळून रहावे लागते असे नाही, तर अगदी सायकलला मागे दुधाच्या बरण्या लावून जाणाऱ्या भैय्या पासून पण सांभाळून रहावे लागते. हे भैय्ये लोकं आपल्या सायकलला मोठे कॅरिअर लाउन घेतात आणि मग साईडला बरण्या अडकवल्या की ही साधी सायकल एकदम कार डॅमेजर बनते.

मुंबईला गर्दीच्या रस्त्यावर लोकं हाताने कार वर टक टक वाजवत निघून पुढे जातात. मालाडला स्पेशली दफ्तरी रोडला संध्याकाळच्या वेळेस एखादा पायी जाणारा माणूस तुम्ही ओव्हर टेक केला की तोच पुन्हा पाच मिनिटात तुम्हाला चालत येउन ओव्हरटेक करतो.

मुंबईला माझे दिल्लीकर मित्र मायानगरी म्हणतात – कार पेक्षा पण फास्ट चालणारे माणसं इथे आहेत म्हणून तर नाही??? हे सगळं तर इतर वाहनांच्या बद्दल झालं, कार चालक पण काही अगदी धुतल्या तांदुळा सारखे नाहीत, पण त्यांच्या बद्दल पुन्हा कधी तरी….

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात.... Bookmark the permalink.

31 Responses to बाइक, कार आणि बेस्ट

 1. ngadre says:

  naveen car var orkhada mhanaje heart var scratch..heart attack.

  mast vishayala vacha fodlit.

  Truck suddha scratch maartaat. Majhya car la front to back line padli ahe.

  Ajubajuchya lokani Vichitr parking kelyane tumchi car adakali ahe ka kadhi?

  • आमचं कॉम्ल्पेक्स खूप जुन्ं असल्याने पार्किंग स्पेस भरपूर आहे- आणि प्रत्येकाचं असाइन्ड पार्किंग असल्याने तशी वेळ येत नाही. तसेच ऑफिसला पण रिझर्व्ड पार्किंग असल्याने नेहेमी व्यवस्थित रित्या पार्क करता येते. वॉचमन आहेच लक्ष द्यायला.
   पण पार्किंग हा विषय खूप नाजुक आहे , एकदा जुहू ला अडकली होती कार, माझ्या कारच्या मागे एक कार आणून लावलेली होती. तो येईपर्यंत मला काहीच करता आलं नव्हतं. नशिब फक्त अर्धा तास वाट बघावी लागली .

 2. अनिकेत वैद्य says:

  मुंबईत वाहतूकीचे नियम जरातरी पाळतात. पुण्यात सगळेच पेशवे आहेत.

  PMT (आता PMPML) म्हणजे जणू म्रुत्यूदूत आहेत. बस स्टॉप वर बस कधीच थांबवत नाहीत. कायम १०-२० फूट पुढे थांबवतात. ते ही रस्त्याच्या मधेच. म्हणजे चढणारे बस कडे धावत सुटतात, तो अजून १ धोका.
  पुण्यात दुचाकी जास्त. त्यामुळे कारवाले कायम समोर बघण्याबरोबर चारी दिशांना लक्ष ठेऊन असतात.
  पुण्यात गाडी चालवणारा जगात कोठेही गाडी चालवेल.

  • अनिकेत
   पुण्याबद्दल न बोललेलंच बरं. तसंही आजकाल पुणे आणि मुंबई फारसा फरक राहिलेला नाही. एक जोक माहिती असेलच, एकदा एका माकडाने खूप तपश्चर्या केली, इंद्र प्रसन्न झाला, वर माग म्हणाला, तर त्या माकडाने एक वर मागितला, तो म्हणजे मला कशीही बाइक चालवायची वर दे..
   इंद्र म्हणाला, “तथास्तू”.. पुण्याला जा आणि चालव हवी तितकी बाईक. सगळे तुझ्याच सारखे आहेत तिथे.:)

 3. गाडीवरचे ओरखडे ह्याचं काही वाटेनासं झालं आहे आता. माझ्या नवीन गाडीला सुद्धा पहिला ओरखडा २-३ महिन्यातच आला. आत्ता पर्यंत ही गाडी मी ५ वेळा मुंबईत आणली आणि त्यातल्या ३ वेळा बाईकने आणि एकदा एस्टीम च्या आरशाने घासून ओरखडे आणले आहेत. त्यामानाने पुण्यात कमी ओरखडे आले. बाकी बेस्टच्या ड्रायव्हरला लाजवतील असे पुण्याच्या बस चे ड्रायव्हर. आजच बातमी आहे, थेट थांब्यावरच बस घुसवून एका वयस्कर स्त्रीचा बळी घेतला एकाबसने.

  • निरंजन
   ओरखडा पहिला पडे पर्यंत खूप वाईट वाटतं, पण एकदा झालं, की त्याची सवय होते. नंतर एखाद्याने विचारले की हे कसे झाले, तर मात्र खूप वैताग येतो सांगायला.
   मुंबईला हल्ली खूप कॉमन झालंय हे.
   पुण्याला खूप त्रास दायक आहे ड्रायव्हिंग. ह्या सिटी बसेसच्या ड्रायव्हरला काही म्हंटलं, तर सरळ माझा नंबर लिहून घ्या आणि कम्प्लेंट करा म्हणतात. काय करणार?

 4. Vidyadhar says:

  मी गाडी चालवली नाहीय कधी…पण शेजारी नेहमी बसतो बाबांच्या…गाडीवाल्याचं फ्रस्ट्रेशन फर्स्ट हॅंड अनुभवलंय…त्यामुळे जेव्हा पादचारी किंवा सायकलस्वार ह्या भूमिकेत असतो, तेव्हा नेहेमी गाडीवाल्याचा विचार मनात असतो..बाकी सगळेच तुम्ही लिहिलेले प्रसंग अगदी तंतोतंत अनुभवलेत मी!

  • विद्याधर
   आता सवय झालेली आहे या सगळ्या प्रकारांची. 🙂
   तरी पण आपली पै- पै जमवून घेतलेली वस्तू खराब झाली की संताप येतो.

 5. thanthanpal says:

  रस्त्याचा एक साधा नियम आहे. रस्त्यावर चालण्याचा वापरकरण्याचा पहिला हक्क पायी, चालणाऱ्या चा असतो. नंतर सायकल , स्कूटर कार ट्रक या क्रमाने हक्क असतो.पण आज उलटे झाले आहे.त्यात गाड़ी चालवण्या साठी जो परवाना लागतो त्याचे जे कायदे कानून ते न पाळता कोणतीही परीक्षा न देता दलाला मार्फत कांही गांधी छाप फेकल्या की घर पोहोंच मिळतो या मुळे कायदे माहित असण आणि ते पाळण बंधनकारक राहत नाही. आणि पकडले घेले तर आणणा , दादा,आबा काका हे राजकारणी आहेतच सोडवण्यास या मुळे पोलीस ही या भानगडीत पडत नाही.पण चोकात उभे राहून अनधिकृत वसुली मात्र जोरात चालू असते. हा वसुलीचा प्रकार जगात फक्त भारतातच आहे. फक्त वर पर्यंत हप्ता गेला पाहिजे. असो आपणाला सोडविण्यास कोणी आणणा दादा येणार नाही.म्हणून आपण गाडी जपून चालवावी.

  • पायी चालणाऱ्यांना तर जागाच नाही हल्ली. सगळे फुटपाथ व्यापलेले आहेत भाजी, कपडे इत्यादींच्या फेरीवाल्यांनी. राहिलेली कसर इतर जुस वाले वगैरे पुर्ण करतात.
   पायी चालणं पण हल्ली कठीण झालंय मुंबईला. लहान रस्त्यांवर तर फुटपाथ वर चालायला जागा नसल्याने रस्त्यावरूनच चालत जावं लागतं. स्टेशन जवळच्या ( कुठल्याही) रस्त्याचे अगदी हेच चित्र दिसते.
   दलाला मार्फत घरपोच मिळणारे लायसन्स हा तर एक वेगळा विषय आहे . यावरचा पण एक अनूभव आहे गाठीशी. त्याबद्दल लिहिन कधीतरी.

 6. mau says:

  मधेच समोरच्या खिडकीतून हात बाहेर काढून आपल्या तीर्थरूपांचा रस्ता असल्याप्रमाणे मनात येईल तेंव्हा लेन बदलणे हा त्याचा जन्म सिध्द हक्क असल्याप्रमाणे…[:P]हे मात्र अगदी पटले….

  मी काही गाडी चालवत नाही..म्हणजे हिम्मतच नाही झाली….माझी २ wheeler च बरी !!पण नव~याच्या बाजुला बसुन त्याचे त्यावेळेचेfrustration अनुभवले [अनुभवते] आहे..तुमच्या पुण्या-मुंबई सारखेच हाल आमच्या अहमदाबादचे…भैयांच्या त्या साईकली परवड्ल्या..पण त्या शोले मुवीतली ती अमिताभ आणि धर्मेंद्रची स्कुटर इथे सर्रास बघायला मिळेल..बायकोसह सगळा पसारा[shopping]हे लोक एकाच वेळेस त्यात कोंबतात..बाजुने जायला सुद्धा भिती वाटते..कुठे पाठ्चे पुढचे tyre मधे आपण न अडको….कठीण आहे सगळी अवस्था !!

  • उमा

   अहमदाबादचे ते पाय दाखवून साईड देणारे रिक्षावाले पण डेंजरस आहेत .
   सौ. सोबत बसलेली असली की गर्दीच्या रस्त्यावर जरी ड्रायव्हिंग मी करीत असलो तरीही तिलाच टेन्शन येतं.
   इथे तर टु व्हिलर पण स्त्रियांना चालवणं अवघड आहे. जागाच नसते हो अगदी. त्या तीन चाकी साईडकार लावलेल्या स्कुटर्स इथे दिसत नाहीत , तेवढं तरी बरं…

 7. MEHARSHA says:

  kharach gaadi navin astana khoop waait watat. Jashi gAadi juni whayala lagate tashi aapala bhandanacha utsah sampato va halu halu aapan sant banato. karan vaya barobar anubhav yeto ki ata he prakar kami na hota divasen divas vadhatach janar.

  • नविन कार आपण जी घेतो ती इन्स्टॉलमेंट्स वर लोन वगैरे काढून. लोनचा हप्ता पण संपलेला नाही, आणि तो स्क्रॅच लागला की खूप वाईट वाटतं.
   तुमचं म्हणणं अगदी खरं आहे, हल्ली वयापरत्वे भांडणाचा उत्साहच रहात नाही . मी तर अजिबात भांडत वगैरे नाही म्हणुन असं वाटतं की लवकरच संतांच्या श्रेणीत जाउन बसणार आहे मी.. 🙂

 8. Bharati says:

  महेंद्र्जी, छान विषय निवडलात मी चारचाकी चालावत असले तरी पुण्यात चालवायचे धाडस नाही.या बाबतीत मला युकेचे नियम
  आवडतात, ते आपल्या पुढे पन्नास वर्षे आहेत.दोन गाड्यात ठराविक अंतर ठेवावेच लागते. ओवर्टटेक नाही, होर्न नाही. पाद्चार्यान मान विचारू नका ! एकटा माणूस असला तरी रर्सत्यावर त्याच्यासाठी सहज हात पोचेल अश्या उंचीवरचे सिग्नल बटन दाबून सिग्नल पाडू शकतो.नि रस्ता ओलांडताना गाड्यांची भलिथोरली लाईन त्याच्यासाठी थांबते.
  बस ड्रायवरची भीती बाळगायचे कारण नाही असे माज़े मत,कारण त्यांच्या सारखे अनुभवी शोधुन सापडणार नाहीत.
  1) 24 तास नियमीत वाहतुक करणारे,
  2) अनेकांचे प्राण आपण वाहून नेतो तेव्हा मानसिकता प्रगल्भ होते.जबाबदारी असते.
  3) आपण कसेही गेलो तरी बस चालक पूर्ण ओळखून असतो.आपण पुढे काय करणार ते ..पण त्याना ठाऊक असते.त्यांचे चुकते असे की ईतरही आपल्यासारखेच अनुभवी समजतात, त्यांचे चालवणे सामान्याना घाबरवून टाकते.
  4)त्यांचे प्रशिक्षण,नियम काटेकोर पाहूनच नोकरी मिळते.म्हणून आजही बसमधे ज़ोपा काढताना भीती वाटत नाही.
  आपल्याकडे बेशिस्त कारभार चालतो.त्यावर प्रथम उपाय निघत नाही.तो पर्यंत कवळ्या सारखी नजर ठेवावी…म्हातरी माणसे
  ल्हान्मुले यांचाच विचार करून चालत नाही.गुरांचा,कुत्र्यांचा विचार पण काही ठिकाणी करावा लागतो…त्या पेक्षा माणसांचा रस्ता बरा !
  आजकाल गाडी आहे ना तोपर्यंत आयुष्यात एकदा तरी छोटा मोठा प्रसंग येतोच त्यातूनच शिकायला मिळते…जिवावर निभावण्या पेक्षा अनुभवावरून माणूस खूप शहाना होतो आहे..

  • भारती
   आपल्या कडे इन्फ्रास्ट्रक्चर कमी आहे आणि लोकसंख्या जास्त. त्यामुळे खूप गर्दी होते रस्त्यांवर . मग लहान मुलं, वृद्ध यांना तर रस्ता क्रॉस करणे पण कठीण होते. त्यातल्या त्यात जड वाहनांचे चालक ज्या पद्धतीने गाडी चालवतात त्या पद्धतीने पादचाऱ्यांना स्वतःचा जीव सांभाळून चालावे लागते.

   जर लोकसंख्येचा प्रश्न निकालात निघाला तर किंवा सगळी शासकीय ऑफिसेस, कंपन्यांची मॅन्युफॅक्चरिंग युनिटची जी मुंबईला किंवा एकवटलेली आहेत त्यांचं विकेंद्रीकरण झालं तरच मुंबईची /मोठ्या शहरातील गर्दी कमी होईल.

  • Nachiket says:

   UK ani Bharat visheshtha Mumbai yanchi tulana kartana mi anekana pahile ahe. Majhi aai Europe hoon ali ani ashich bhaktibhavaane muddesood stuti karat hoti.

   Hee tulana barichshi chook aahe.
   Ekeka deshapeksha ithe ekeka city madhe adhik loksankhya ahe.

   We are different.everyone cant reach US UK to get rid of crowd. Most have to live here.

   Our challenges are different.

   • नचिकेत
    आपले प्रॉब्लेम्स निराळे.. त्यांचे निराळे. दोन्हींची कम्पॅरिझन होऊच शकत नाही.

 9. हे प्रकार सगळीकडे सारखेच काका. मी हैद्राबादला जाईपर्यंत मुंबईच्या ट्राफिकला नावं ठेवायचो. हैद्राबादची परिस्थिती बघून मुंबईचे ड्रायव्हर्स यमदूतांच्या ऐवजी देवदूत वाटायला लागले इतका भयंकर ड्रायव्हिंग सेन्स आहे त्या लोकांचा 🙂

  • हेरंब
   माझा आतेभाउ सि.व्हॅ. ला आहे. एकदा एका स्त्रीला थोडा धक्का लागला त्याच्या कारचा, तर तिने इन्शुरन्स क्लेम करु नये किंवा डॅमेजेस ची केस करु नये म्हणुन पाच हजार डॉलर्स तिला दिले. नाहीतर नेहेमीसाठी कारचे इन्शुरन्स वाढेल याची भिती..

   केवळ हैद्राबाद नाही तर ट्रॅफिकची थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती सगळ्याच मोठ्या शहरात आहे.

 10. पुण्यात या खरंच बस ड्रायव्हर डेंजर आहेत. रस्त्याच्या एकदम मध्ये बस उभी करणार. म्हणजे मागल्या सगळ्या वाहतुकीचा भो@#$%. मी तर बाईकला स्टिकर लावून घेतले आहे “I am proud to follow traffic rule”. निदान त्यामुळे तरी सिग्नलला लाल दिवा असताना मागून कुणी हॉर्न वाजवत नाही. पुण्यात वाहतुकीबद्दल जनजागृतीचे काम “Pedestrians First” आणि या दोन बिगरसरकारी संस्था करतात. तेवढाच आशेचा एक किरण.

 11. विजय देशमुख says:

  एका ठीकाणी वाचलेला किस्सा :- नविन दिसणारी कार –
  १ वर्ष जुनी :- आमचं खेडं
  ६ महिने जुनी – नागपुर सारखं शहर
  ३ महिने जुनी – पुणे, मुंबई..तत्सम
  १ महिना जुनी – उ.प्र. मधील बरेली मेरठ, वा गाझियाबाद….
  शोरुममधुन बाहेर – कलकत्ता … हा हा हा ….

  जुनीच गाडी घ्यावी का ? भरपुर ओरखडे आधिच पाडुन नविन डीझाईन बनवावं ? काय म्हणता दादा ?

  • विजय
   अगदी बरोबर आहे. 🙂 जुन्या ओरखड्यांवर स्टीकर्स लावावे, म्हणजे ती पण एक फॅशनच होईल बघा.

 12. Santosh says:

  Sir;

  Chaan post ahe tumcha… Wachtana pratikriya samishra hotya.

  Sadhya swa malakichi fakta ek Bike ahe mhanun raag yet hota… ki kai Bikers baddal lihit ahet hey.

  Pan thoda patience thwun wachla ani wichar badalala(Mhanun hi comment bara ka… Khaas)
  Me Cars ani Bikes donhi war far prem karto; so tumchi ya post magchi talmal sudhha samju shakto 🙂

  Mazya park keleya Bike la koni tekun ubha aslela sudhha mala awdat nahi… really (Possession asta he Gadi prem mhanje… ani tichya war “SCRATCH” to pan dusryachya chuki mule… No excuse at all!!! )

  Chaan lihila ahet tumhi… Awadla agdi manapasun.

  Dhanyawad 🙂

  • संतोष
   ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार.
   मी स्वतः पण बाइकर आहेच. माझ्या कडे गेली कित्येक वर्ष बुलेट आहे. हल्ली वयामुळे चालवणे टाळतो. नुसती पडूनच आहे. तरूणपणी बाईक वर मी बराच फिरलो आहे. दिवसात ४८० किमी पण कव्हर केले आहेत एकदा. ( नागपूर ते मलाजखंड आणि परत )
   या नंतर पुन्हा एकदा कार वाल्यांच्या वर पण पोस्ट लिहायचंय. ते ही काही कमी नसतात- 🙂 खरं तर याच पोस्ट मधे लिहिणार होतो, पण खूप मोठं झालं म्हणून लिहिले नाही.
   पुन्हा एकदा आभार.

   • Santosh says:

    Namaskar;

    Ratriche 1:32 zalet… zop yet navati ani achanak athawla ki arey apan kahi blogs wachun comments post kelya hotya tya pahu.

    Donhi post war comments na apan uttar dilay… chaan watala.

    Bullet cha ullekh karun tumhi parat mala reply karaila protsahan dilay…

    Tumhi Bullet waprat nasal ani kona yogya wyaktila dyaichi asel tar please mala contact kara 🙂

    Dhanyawad!!!

    • संतोष
     तुम्ही लोकं इतका त्रास घेउन प्रेमाने कॉमेंट्स टाकता, तेंव्हा उत्तर तर द्यायलाच हवे नाही? मी स्वतः प्रत्येक कॉमेंटला उत्तर देतोच.

 13. mahesh mohan shinde says:

  aho ekda ek bas driver ne maza gadivar signal la mastpaiki ( ashach arthane) pan-suparichi jordar pichkari marli…………………. pan kay bolnar jiv agadi kasavis zala kacha baghun ani main manje khacha kalya aslyakaranane kahi kalale nahi vatale pani vaigare padle asel………… nanter bghato tar he pan he tya bus driver ne kele he nakki………………….. karan tyana janu te trainingach dile asave……………….. gadichi avastha bagun kilas vatala…………………….

  • महेश
   खूप किळस येते असं काही झालं की..
   अतिशय वाईट ड्रायव्हिंग असतं त्या लोकांचं.. स्पेशली बेस्ट /पिएमटी

 14. Pingback: बाइक, कार आणि बेस्ट | indiarrs.net Featured blogs from INDIA.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s