जनगणना

राष्ट्राच्या दृष्टीने अतिशय  महत्वाचा विषय आहे हा. हे पोस्ट मी इथे लिहितोय ते केवळ ही जनगणना किती कॅजुअली केली जाते हे लिहिण्यासाठी आहे- आणि ते पण मुंबई सारख्या महानगरात. लहान गावात तर काय होत असेल ते सांगताच येत नाही.

मागच्या शनिवारी आमच्या सोसायटी मधल्या सेक्रेटरीने एक पत्र पाठवले. त्या पत्रासोबत एक  मोठी शिट जोडलेली होती, आणि  एक नोट दिलेली होती की सध्या जनगणनेचे काम सुरु आहे, आणि कोणी   जनगणना अधिकारी आहे की जिला या भागाचा इंचार्ज नियुक्त केलेले आहे. त्यात असंही लिहिलं होतं की सगळ्या लोकांनी अटॅच केलेला फॉर्म भरुन तो सोसायटीच्या ऑफिसमधे जमा करावा, म्हणजे तो जनगणना अधिकाऱ्याकडे पाठवता येईल. ते सोसायटीच्या चेअरमनचे पत्र बघून मला तर हसावे की रडावे तेच समजत नव्हते.

मुंबई सारख्या ठिकाणी  टेररिस्ट घटना, बॉंब ब्लास्ट वगैरे सारख्या    सेन्सेटीव्ह  घटना होत असतांना  पण इतक्या निष्काळजी पणे केली जाणारी जनगणना  म्हणजे परदेशी लोकांना भारतीय नागरीकत्व मिळवण्याची एक संधीच. एकदा जनगणने मधे नांव आले की मग व्होटर कार्ड आणि रेशन कार्ड घेतलं की झालं.

अशा तर्हेने अशी  माहिती जी जमा होईल ती कितपत खरी असेल किंवा कितपत ग्राह्य धरावी हा पण एक मोठा प्रश्न आहेच.

जनगणनेच्या वेब साईटवर जाउन त्यांची  जनगणना घेण्याची पद्धत काय आहे ते पाहिले. त्या मधे असे दिलेले आहे की जनगणना अधिकारी स्वतः प्रत्येक घरात जाउन आवश्यक ती माहिती गोळा करेल. पण प्रत्यक्षात मात्र आमच्या विभागातील अधिकारी घरी बसून जनगणना करते आहे .

मी त्यांच्या वेब साईटवर जाउन एक इ मेल केलेला आहे त्या साईटवर आणि हा सगळा प्रकार निदर्शनास आणून दिलेला आहे. बघु या काही होतं का ते . राईट टु इनफर्मेशन च्या अंतर्गत पण माहिती विचारलेली आहे त्यांना.

राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या पण महत्वाचे काम अशा घिसाडघाईने कसे काय केले जाते? या अधिकाऱ्यांवर कोणाचा वचक आहे की नाही??

हा फॉर्म भरून द्यायला सांगितलाय त्या बाईने.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , , , . Bookmark the permalink.

78 Responses to जनगणना

 1. sahajach says:

  कठीण आहे सगळं महेंद्रजी… तुम्ही निदान प्रकाराला वाचा तरी फोडलीत पण अ्सेही अनेक सुशिक्षित लोक असतील जे मुकाट हे असले फॉर्म्स भरून देतील….. आणि एकूणातच ’जनगणने’चा फार्स उरकला जाईल…..

  • तन्वी
   मी जेंव्हा ते पत्र पाहिलं, तेंव्हाच मला संताप आला होता. बऱ्याच लोकांनी फॉर्म्स पण भरून दिले असतील. मी वाट पहातोय तीने घरी येण्याची.

 2. आई शप्पथ, काय हा दुर्लक्षपणा..सगळे साले माजलेत…कशाला मग जनगणना करता माणस नेमुन? कशाला त्याना पगार देता..आम्हीच पाठवतो यादी…तशीच यादी दशतवादीपण देती पाठवून. वेळ पण वाचेल, पैसापण…
  😦

  • सुहास
   हेच विचार माझ्या मनात पण आले. नुसती यादी हवी असेल तर आम्ही डायरेक्ट पाठवू शकतो पोस्टाने किंवा एखाद्या वेब साईटवर लोड करता येऊ शकते.
   बऱ्याच लोकांनी रोजंदारीवर कामं करायला कॉलेजची मुलं वगैरे ठेवली आहेत असेही समजले.

 3. आमच्या घरी मात्र स्वत: जग अधिकारी आली होती…सगळी माहिती तिनेच…मला विचारून भरली….शेवटी दोन ठिकाणी सह्या घेतल्या….आणि जनगणनेत माझा समावेश झाल्याबद्दल एक पावतीही दिली.

  • प्रमोदजी
   ती खरी पध्दत आहेत .. तसंच व्हायला हवं.

   पण इथे म्हणजे सगळं भरुन द्यायचं आम्ही, ती बाई नंतर घरी बसून सगळं लिहुन पुन्हा आमच्या घरी वॉचमनच्या हस्ते पाठवेल सह्या घ्यायला आणि त्याच्याच हातून पावती पण देईल अशी मोडस ऑपरेंडी दिसली.

  • Sonali Morkar says:

   original precodure hich aahe.

   • सोनाली
    तशी नाही. त्यांच्या वेब साईटवर दिलेली आहे बघा..
    “Census Process:
    The Census process involves visiting each and every household and gathering particulars by asking questions and filling up Census Forms. The information collected about individuals is kept absolutely confidential. In fact this information is not accessible even to Courts of law. After the field work is over the forms are transported to data processing centres located at 15 cities across the country. The data processing will be done using sophisticated software called Intelligent Character Recognition Software (ICR). This technology was pioneered by India in Census 2001 has become the benchmark for Censuses all around the globe. This involves the scanning of the Census Forms at high speed and extracting the data automatically using computer software. This revolutionary technology has enabled the processing of the voluminous data in a very short time and saving a huge amount of manual labour and cost. “

 4. MEHARSHA says:

  kharach bhayank aahe. amachya ghari sudhdha 2 college student aale hote. tyatalya ekala tyachya collage chya principalche nav suddha sangata aale nahi. tyani i.card mhanoon kahi tari dakhavale va adhikaryanich he kam sangitale aase mhanale
  pan mala kahi he sarva suchale nahi .
  kharach lokana terrarist aattack vaigare nantar fakt’ smashan viragya’ yeta pan pudhe sagalech udasin.

  • तुम्ही सांगता की कॉलेजची मुलं आली होती. तुम्हाला एक पत्ता आणि इ मेल देतो त्यावर लिहून कळवा.
   Registrar General & Census Commissioner, India
   2A, Mansingh Road, New Delhi – 110011.
   Tel no.. 011-23070629,23381623, 23381917, 23384816
   Fax No. 011 – 23383145
   Helpline No: 1800-110-111 [Toll Free]
   : 1800-345-0111 [Toll Free]
   E-mail: rgi.rgi@nic.i
   Website: http://www.censusindia.gov.in

   हेल्प लाइनला फोन केला तर कोणी उचलत नाही.

 5. Kedar says:

  Avaghad aahe. Tumhi phar changla kela Mahendraji, email pathavun. Ya lokanna he kaam nemun dila aahe na. Navhata karaycha tar mag sarkari nokri patkaraychi kashala ya Gaur baine. Aho US madhe census ghetat to ghari postane ek form pathvun ani to postane magavun. Pan ya lokanchi system foolproof aahe gair prakar thambavnya sathi. Tyanna shakya aahe pratyekavar laksha thevna. Kasa te mahatvacha nahi. Mahatvacha he aahe ki aplya deshat ajun asli kahi system nahi. Ani chukichya nondi hou nahit mhanun sarkarne janaganana ghyayala loka thevli aahet na. Mala asa vatata ki tumhi bahuda sushikshit ani uchcha bhru vastit rahat asal ani ya Gaur baine asa vichar kela asel ki “ithe sagli changli loka rahatat. kaay gair prakar honar aahe tevha. Mag kasha ja”. Pan he chukicha tar aahech, kamchukar panacha pan aahe. Tumhi ji jagrukta dakhavli ti lakhmolachi aahe. Sagle ase jagruk jhale pahijet. Mi tumhala ek avahan karu shakto ka? Tumhi tumchya shejaryanchya pan ka nahi lakshat anun det ha prakar? Kuni ha form bharun pathavlach nahi ani tya ulat ya Gaur baila patra pathavla ki amhi tujhi complaint karu mhanun, tar ti jhak marat yeil. Tumhi bahuda he kela hi asel. Tumhi khup jagruk ahatach.

  • केदार
   आमच्या कॉम्प्लेक्स मधे शेजारी कोण हेच समजत नाही. सगळे उच्चाधिकारी आहेत ( सिनिअर मॅनेजर्स, जनरल मॅनेजर्स वगैरे)कुठल्या ना कुठल्या कार्यालयात, त्यामुळे सगळेच जण आपल्या विश्वात मग्न असतात. मला काय करायचंय अशी प्रवृत्ती.
   आपल्या कडुन काय शक्य होईल ते करायचे.
   ह्या बाईंना वाटलं तरी कसं की लोकं इतक्या सहजासहजी लिहून पाठवतील म्हणून? ह्याचं मला आश्चर्य वाटलं. मी सेक्रेटरीला फोन करुन सांगितलं की मी भरुन देणार नाही म्हणून. आणि कम्प्लेंट करतोय म्हणुन. बघु या काय होतं ते.

 6. mau says:

  काल माझ्याही घरी जनगणना वाली काही लोक आलेली..असलेच फ़ालतु प्रश्नांची यादी होती…माझ्या लेकाकडुन माहिती घेतली…आणि उद्या एक रीसिट देतो असे सांगुन गेले..आणि आज उगवले सोबत एक रेसिट दिली आहे..राष्ट्रीय वसती पत्रक[રાષ્ટ્રીય વસતી પત્રક] પાવતી પુસ્તીકા..જવાબ આપનારની નકલ……ह्याचा exact काय अर्थ..मला तरी कळला नाही..

  • उमा
   ते सगळे प्रश्न शासनानेच दिलेले आहेत. सगळीकडे तेच प्रश्न आहेत. वर इंग्लिश मधे दिले आहेत नां जेपीजी फाइल मधे – तेच प्रश्न असावेत गुजराथी मधे.

 7. Bharati says:

  पोलिस वेश पहिला, त्यांचा खाक्या पहिला की माणूस दचकूनच असतो. पोलिस पण माणसे ओळखत असणार.कारण ते सतत
  कार्यरत असतात.खर तर जनगणंना अधिकारी आपल्या कामात जेव्हा पोलिसी खाक्या आंतिल तेव्हाच आपले जनगण सुधारतील!
  त्यांच्या या असल्या कामचुकार धोरणाने जनता आळशी,आणि आपला काय संबंध? असा विचार करू लागली आहे.या अधिकारी लोकाणी या कामा आधी लोकाणा ह्या जनगणनेमुळे काय फायदे होतात ,लोकांची करतव्य काय आहेत,त्यानी कसे जागरूक रहायला हवे.याचा रिक्षा फिरवून प्रचार करायचा विचार करायला हवा होता तर लोकांचे त्याना सहकार्य मिळाले असते.आणि या कामाला गतीच मिळाली नसती तर कमालीची सुधारणा पाहायला मिळाली असती.आम्हाला पुण्यात ही पावती बिवती काय मिळाली नाही.अधिकार्यांचे अधिकार दिसतच नाहीत! खरतर हातात सत्ता आली तर… अधिकार आले तर …सगळ्याना सुतासारखी सरळ करायला पाहिजे !
  तुम्ही जे केले ते छान केले.पाउल पहिले टाकले…आता त्याना विचार करावाच लागेल.

 8. Vidyadhar says:

  काका,
  हे तुम्ही एकदम झ्याक केलंत…हे लोक अश्या निष्काळजीपणामुळे अतिरेक्यांची सोय करतात ह्याची त्यांना जाणीवच नसते. अश्या आळशीपणाचे भयंकर परिणाम होतात.

  • विद्याधर
   प्रत्येकानेच जागरूक रहायला हवे. तरच आपण सुरक्षित राहू शकतो. इतका निष्काळजी पणा डेंजरस आहे.

 9. ही तर हाईट आहे.आमच्या इथेही जनगणनावाले घरी आले होत.बाकी्ही बरयाच ठिकाणी असच होत असेल..बर झाल तुम्ही हयाला वाचा फ़ोडलीत ते…

  • देवेंद्र
   त्यांनी इमानेइतबारे काम करायलाच हवे. सौ. म्हणे तुम्हाला काय करायचंय? कशाला उगिच तिच्या नादी लागताय? पण अर्थात ऐकलं नाही मी आणि कम्प्लेंट दिलीच साईटवर.

 10. ही तर हाईट आहे.आमच्या इथे जनगणनावाले घरी आले होत.बाकी्ही बरयाच ठिकाणी असच होत असेल..बर झाल तुम्ही हयाला वाचा फ़ोडलीत ते…

 11. आयला …. !!! कमाल झाली ही तर… एवढ्या महत्वाच्या कामांमध्येही पाट्या टाकल्या जातात??

  मात्र आई म्हणाली की आमच्या घरी मात्र हे लोक स्वतः आले होते आणि सगळी माहिती लिहून घेतली.. नशीबच म्हणायचं.

  • हेरंब
   सबकॉंट्रॅक्टींग पण केलंय बऱ्याच लोकांनी. पण बरेच लोकं इमानेइतबारे कामंही करताहेत..

  • Sonali Morkar says:

   khup sare praganak pramanik pane kam kartat, karan shashnane karvai karnar asa GR kadhla aahe

   • मी पण त्याबद्दल ऐकलं आहे. 🙂
    कित्येक कोटी रुपये खर्च होतोय.. त्याचा नीट उपयोग व्हावा असे वाटते बस.

 12. ravindra says:

  आमच्या घरी येऊन माहिती घेतल्याचे सांगितले मला. रीतसर पावती दिली आहे.

  • रविंद्र
   राष्ट्रीय महत्वाचा प्रश्न आहे हा म्हणुन थोडं वाईट वाटलं मला. सरकार इतका खर्च करतंय.. त्याचं चीज झालं पाहिजे. खरे नागरीक फक्त मोजले गेले पाहिजे, बांगला देशी, पाकिस्तानी नको..
   ज्या लोकांना हे काम दिलेले आहे त्यांनी ते व्यवस्थित केले तरच हे शक्य आहे नाहीतर ….टेररिस्ट लोकं पण आपली नांव इथे नोंदवतील.

 13. bhaanasa says:

  महेंद्र, अतिशय योग्य केलेस. किती हा कामचुकारपणा व बेजाबदारी. तीन महिने उन्हातान्हाचे फिरून प्रत्यक्ष घरोघरी – मग ती धारावीची झोपडपट्टी असो की कुठली उच्चभ्रू वस्ती असो, स्वत: जाऊन आम्ही माहिती गोळा करत असू. शक्य तितकी खरी माहिती गोळा करण्यासाठी प्रयत्न करताना अनेकदा लोकांचा राग-धुसफूस सहन करावी लागे. जनगणनेवर अनेक मुलभूत गोष्टी अवलंबून आहेत. अगदी आपल्या शहराच्या नागरी सुविधांसाठी राज्याकडून मिळणा~या पैशापासून ते पोलिस-फायर सारखी अंत्यत गरजेची सुरक्षा यंत्रणाही. केवळ आळशीपणा-दुर्लक्षाची किती मोठी किंमत मोजावी लागते याचा रोजचा अनुभव घेऊनही लोकांची वृत्ती बदलतच नाही…… अतिशय खेद -दु:ख होते पाहून.

  • माझ्या कडुन जितक शक्य तितकं करणार आहेच मी. माझ्या मेल ला जर उत्तर दिले गेले नाही, तर पुढे कम्प्लेंट करीन मी… बघु या आजच्या दिवस वाट काय होतं ते.

 14. खेड्यात उलट संपर्क कठिण असुन कर्मचारी जबाबदारीने माहिती नोंदवुन घेताना दिसत आहेत.शहरात चलता है मानसीकता फारच वाढीस लागली आहे.

  • हेमंत
   ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेकरता आभार. इथे अशी बेजबाबदार लोकं, आणि निष्काळजी नागरीक .. विचित्र कॉम्बो झालं आहे. .काय करणार?

 15. गुरुजी नेमताहेत डमी प्रगणक!

  Monday, May 24, 2010 AT 12:00 AM (IST)
  Tags: teachers, census, dummy counting, pune

  पुणे – जनगणनेचे काम सोपविलेल्यांपैकी काही प्रगणक चतुरपणे आपल्या कामाचे “आउटसोर्सिंग’ करीत असल्याचे दिसत आहे. अनेक महिला प्रगणक नातेवाइकांच्या मदतीने काम करीत आहेत, तर अन्य काहींनी आपल्या विद्यार्थ्यांकडे किंवा कनिष्ठ सहकाऱ्यांकडे पैसे देऊन हे काम सोपविले आहे.

  राज्यात अनेक प्रगणक दुसऱ्यांकडून जनगणनेचे काम करवून घेत असल्याची कुजबूज आहे. याबाबतची खातरजमा “सकाळ’ने राज्यात केली. काही प्रगणक जनगणनेचे “आउटसोर्सिंग’ करीत असल्याच्या चर्चेत तथ्य असल्याचे आढळले; मात्र अशा सर्व प्रगणकांना शोधून काढणे अवघड आहे. कारण एखाद-दुसरा अपवाद वगळता याबाबतच्या तक्रारी स्थानिक जनगणना अधिकाऱ्यांकडे गेलेल्या नाहीत. त्यामुळे डमी प्रगणक नेमणाऱ्यांची नेमकी संख्या सांगता येणार नाही. मात्र, कामासाठी इतरांची मदत घेणाऱ्यांची किंवा आपल्याऐवजी दुसऱ्याकडून काम करवून घेणाऱ्यांचे राज्यातील एकत्रित प्रमाण वीस टक्‍क्‍यांपर्यंत असावे, असे बोलले जात आहे.

  अकराव्या जनगणनेचे काम देशभर जोमात सुरू आहे. शिक्षक, शासकीय कर्मचारी यांच्याकडून हे काम करून घेतले जात आहे. त्याकरिता त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. या कामाबाबत काही शिक्षकांनी तक्रारीचा सूर आवळला आहे, तर त्यांपैकी एक-दोघांनी न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले. मात्र, हे काम करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. कामासाठी नाइलाजाने सज्ज झालेले शिक्षक प्रगणकांनी हे काम टाळण्यासाठी नवनव्या मार्गांचा वापर केल्याचे दिसते आहे. पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, जळगाव आदी भागांत अशा प्रकारचे नवनव्या मार्गांचा अवलंब करणारे प्रगणक असल्याची चर्चा आहे.

  जनगणनेच्या “आउटसोर्सिंग’चे विविध प्रकार दिसताहेत. एक म्हणजे चक्क “डमी’ प्रगणक उभा करणे. या कामासाठी शासनाकडून मिळणाऱ्या मानधनाची रक्कम हाताखालच्या सहकाऱ्याला वा शिक्षणसेवकाला वा बेरोजगार युवकाला देऊन काम करवून घेतले जात आहे. दुसरा प्रकार म्हणजे आपल्याबरोबरच अन्य तीन-चार सहकाऱ्यांना घेऊन काम पटकन उरकणे. तिसरा प्रकार प्रामुख्याने महिला प्रगणकांच्या बाबतीतील आहे. पती किंवा भाऊ किंवा मुलगा यांच्या साह्याने काही महिला काम करीत असल्याचे आढळले आहे. काही महिला तर चक्क घरी राहताहेत आणि त्यांची कामे त्यांचे नातेवाईक करीत आहेत.

  “जनगणनेचे काम संबंधित प्रगणकांनीच करणे अपेक्षित आहे. ज्या प्रगणकांना अडचण आहे, त्यांनी योग्य ती प्रमाणपत्रे सादर करून इतरांची मदत घ्यायला हवी. डमी प्रगणकांना पाठविणाऱ्यांवर कारवाई केली जाईल,” असे ठिकठिकाणच्या जनगणना अधिकाऱ्यांनी “सकाळ’ला सांगितले.

  तक्रार आल्यास कारवाई
  “नेमून दिलेल्या शिक्षकांनीच जनगणनेचे काम करावयाचे आहे. आपले काम टाळून ते दुसऱ्यांकडून काम करवून घेत असतील, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल,” असे राज्याचे जनगणना सहसंचालक एस. एच. हिरेमठ यांनी सांगितले. “डमी’ प्रगणक आढळल्यास नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. काही स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसेवक उत्स्फूर्तपणे शिक्षकांना मदत करत असतील किंवा शिक्षिकांना त्यांचे पती मदत करत असतील, तर त्याबाबत हरकत नाही. मात्र, अशा वेळी संबंधित प्रगणक सोबत असणे आवश्‍यक आहे, असेही हिरेमठ यांनी स्पष्ट केले.

  “काम किचकट आहे’
  जनगणनेच्या कामासाठी शिक्षिका आपला पती किंवा अन्य नातेवाईक यांची मदत घेत असल्याचे चित्र राज्याच्या सर्व भागांत आहे. “”या कामाचे प्रशिक्षण दिले असले, तरी ते किचकट आहे आणि त्यासाठीच जवळच्या नातेवाइकांची मदत घेत आहोत,” असे काही शिक्षिकांनी सांगितले. एकाच प्रगणकाचे तीन-चार नातेवाईक वा सहकारी त्यांना नेमून दिलेल्या भागांत फिरून माहिती गोळा करीत असल्याचा प्रकार घडत आहे. काम लवकर पूर्ण करण्यासाठी हे करत असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत शिक्षकांची बाजू समजून घ्यायला हवी, असे त्यांनी सांगितले. इतरांकडे काम सोपवून काही प्रगणक सहलीवर गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

 16. Sonali Morkar says:

  mahila praganakana sobat sahakari dyayla hava hota, duparchyaveli apartment madhe mahiti ghyayla gelyas baryachada flat madhe fakta tarun mula asatat, ani te sudha sigaretcha dhur sodat, bakichya flatche darvaje band astat, sri sobat gairprakar honyache chances astat, ani punyat tar most of mula flat gheun rahtat, asha thikani ektya lady la jana avghad vatala tar naval nahi. lokani sudha sahakarya karyla hava, barech lok nit bolat nahit, literally haklun detat. ani eka gharach mahiti ghyala 1/2 hour lagto, sutya aslyamule barech lok ghari nastat, tithe roj jaun baghyla lagta, alae ahet ki nahi te.
  ithe barech praganak imane itbare kam karat aahe. ani janagana praganakana office sambhalun kam karyla lagta, jevnachya suttinantar census chi duty karyla lagte, asa na karta purna vel cesus chich duty dili pahije.

  • महिलांच्या सोबत सहकारी द्यायला हवा ही गोष्ट तत्त्वतः पुर्णपणे मान्य! त्या साठी वेगळ्या फोरमवर जाउन कम्प्लेंट करायला हवी. लोकांना या जनगणनेचे महत्त्वच समजत नाही आपल्याकडे हे बघून वाईट वाटते.

   बरेचसे लोकं अगदी इमानेइतबारे काम करतात या गोष्टीला कोणीच आक्षेप घेणार नाही. पण हे थोडे नियम मोडणारे लोकं देशाच्या सुरक्षिततेला किती कॅज्यूअली घेतात हे बघून वाईट वाटते.

 17. महेश says:

  सकाळने आपल्या ब्लॉगची दखल घेतली त्याबद्दल आपलेअभिनंदन जनगणना बद्दल आपण जागृत आहात बरे वाटले ,कोणाला पण कामाबद्दल आस्था नाही हे खरे केवळ पैसे मिळतात म्हणून लोक काम करतात,

  • महेश
   माझा त्या बाईंशी व्यक्तिशः काहीच दुश्मनी नाही.

   फक्त ह्या कामात दुर्लक्ष झाले की मग ज्यांची नावं रजिस्टर होतील ते भारतियच असतील का? माझ्या वडीलांना पण मी हे काम तसेच इलेक्शन ड्युटी करतांना पाहिलेले आहे. त्रासदायक आहे यात शंकाच नाही, पण देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचे आहे, तेंव्हा हे काम व्यवस्थित झालेच पाहिजे हा आग्रह प्रत्येकच भारतियाने धरायला हवा. .

 18. इथे स्वतःचे नांव लपवून खोट्या नावाने दिलेल्या प्रतिक्रिया प्रसिध्द केल्या जात नाहीत.

 19. सीताराम वाळके says:

  तुमची बातमी ईसकाळ मध्ये – http://72.78.249.124/esakal/20100524/4725965322278916292.htm

  तुमचे बरोबर आहे. लोकांनी नीट न वाचता आचरट प्रतिक्रिया दिल्या आहेत असे वाटते. मुर्ख लोक!

  • सीतारामजी
   प्रतिक्रियेकरता आभार. अशा प्रतिक्रिया अपेक्षित होत्याच. काही लोकांना हा सगळा खेळ वाटतो. मी स्वतः वडिलांना भर उन्हाळ्यात फिरतांना पाहिले आहे लहान असतांना. मला पुर्ण कल्पना आहे की हे काम किती अवघड आहे.
   जर असेच काम करायचे असेल तर सरळ सरकारने पत्राने तुमची माहीती मागवली असती. तसे नाही, याचे कारण एकच की परदेशी नागरीक , टेररिस्ट मुख्य प्रवाहात समावले जाऊ नये म्हणुन.

   • सीताराम वाळके says:

    मी त्याच प्रतिक्रियांसंदर्भात ‘सकाळ’वर माझी प्रतिक्रिया टाकली होती. पण यावेळी सकाळने ती छापली नाही. लोकांना स्व:त करायला नको आणि दुसऱ्याने केले तर मागे ओढायला मोकळे. मुख्य म्हणजे नागरिक म्हणून आपली कर्तव्ये करायची नाहीत. फक्त राजकारण्यांना शिव्या घातले आणि बाकीच्यांना कमी लेखले म्हणजे आपले ‘नागरिक’ असण्याचे कर्त्यव्य संपले असेच या लोकांना वाटत असते.
    – सीताराम
    (माझ्या नावापुढे ‘जी’ लावून मला वयस्कर करू नये 😉 मी अजूनतरी अरे तुरे करण्याएव्हढाच आहे 🙂 )

    • सीताराम
     😀 धन्यवाद. इथे नेट वर कोणाचे वय किती आहे ते समजत नाही. शक्यतो सगळ्यांनाच मान देण्याचे संस्कार आहेत , म्हणुन जो पर्यंत पुढला माणुस कोण आहे हे समजे पर्यंत अहो जाहो च लिहितो. 🙂

     ज्या मुलाने सकाळवर प्रतिक्रिया लिहिली, त्याची आई, बहीण कोणीतरी शिक्षिका असेल, आणि त्याला त्यांचा त्रास पहावत नसेल्, म्हणुन त्याने लिहिले असावे तसे. माझा अजिबात राग नाही त्या प्रतिक्रियेवर. प्रत्येकालाच आपल्या घरातल्या लोकांच्या बद्दल प्रेम , आदर असतोच,, तेंव्हा अशा प्रतिक्रिया अपेक्षित होत्याच..

     मी त्याला मेल पाठवलाय, बहुतेक त्याचा इ मेल पत्ता पण चुकिचा दिलेला असावा असे वाटते.. असो.

     • सीताराम वाळके says:

      यापुढे मी पूर्वीच सर्वाना सांगत जाईन की मी अजून ‘जी’ लावण्याएव्हढा मोठा नाही 😉

      फक्त ‘ती’च नाही पण एकंदर प्रतिक्रिया बघता लोक किती निष्काळजी होत चालले आहेत ते कळते. आपण आपल्या परीने होते तेव्हढे नक्कीच करत राहावे हे खरे!

      ता. क. – आता सकाळने ‘ती’ प्रतिक्रिया पण काढून टाकली आहे.

 20. मकरंद राजाध्यक्ष , तुमचा रिप्लाय इ मेल वर दिलेला आहे. इ मेल जर बरोबर असेल तर नक्की मिळेल.

 21. सागर says:

  माझी आत्या प्राथमिक शिक्षिका आहे…ती पण वैतागते हे सर्व करताना पण घरी जावूनच सर्व माहिती घेते…अन गावात मध्ये हे असले प्रकार मला तर अजून दिसले नाहीत..इकडे शहरी भागात हे होत असाव..
  गावात सर्व जन एकमेंकांना ओळखत असूनही घरी जावून माहिती भारतात..इथे तर उलट आहे….

 22. Ek Puneri says:

  या निमित्ताने काही प्रश्न मनात येतात. लेखकाने उत्तरे द्यावीत.

  १. लेखकाने स्वत:च उल्लेख केल्याप्रमाणे अतिरेकी अथवा बॉम्ब ब्लास्ट सारख्या घटना ज्या शहरात घडत असतील तिथे एखाद्या महिला कर्मचार्‍याने एकटे फिरणे किती सुरक्षित आहे?

  २. ही महिला लेखकाची कोणी जवळची नातेवाईक असती तर लेखकाने हीच भूमिका घेतली असती काय?

  ३. ज्या देशातील सरकार हेमंत करकरें सारख्या पोलीस अधिकार्‍याला संरक्षण देऊ शकत नाही, ज्या शहरात महीलांचे खून बलात्कार ही नेहेमीचीच गोष्ट झाली आहे त्या शहरात एका
  महिलेने जनगणनेसाठी घरोघरी एकटे फिरण्यास टाळाटाळ केली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे?

  ४. असा लेख लिहिण्यापूर्वी लेखकाने त्या महिलेची बाजू समजून घेतली आहे काय? नसेल तर असे लिखाण एकतर्फी होत नाही काय?

  ५. या महीलेकडून काम चुकारपणा झालाच असेल तर त्याची माहीती योग्य त्या ठिकाणी कळवून लेखक आपले कर्तव्य पार पाडू शकला असता. पण वाघ मारल्यासारखा आव आणून
  अबलेच्या नावानिशी असे लेख लिहून व प्रसिद्ध करवून लेखकाने काय मर्दुमकी दाखविली आहे? एखाद्या गुंडाच्या किंवा अतिरेक्याच्या बाबत सदरहू लेखक असे धैर्य दाखवू शकला असता काय?

  • १. नौकरी निमित्त्य एकटे फिरावे लागतच असते. आणि दररोज कित्येक स्त्रिया एकट्याच ऑफिसला जाणे वगैरे कामं करतात.
   – मला वाटतं की तुम्हाला एकट्या स्त्री ने जनगणनेसाठी फिरणे योग्य आहे का? असा प्रश्न विचारायचा होता. जनगणना ही गेल्या साठ वर्षात अनेकदा केली गेली आहे आणि एकही अशी घटना झालेली नाही की ज्या मधे एखाद्या स्त्री ला त्रास दिला गेला आहे. पण हा प्रश्न शासनासोबत वेगळ्या तर्हेने उचलुन धरला पाहिजे.
   २ . होय. अर्थात.माझी बहिण पण जनगणनेचे काम करते आहेच.
   ३. तुम्ही जेंव्हा सरकारी नौकरी करता तेंव्हा कामामधे टाळाटाळ कशी काय करु शकता? जर टाळाटाळच करायची तर शासकीय नौकरी सोडुन देणे हा एकच उपाय दिसतो.
   ४. जर कोणी घरी आले असते तर विचारता आले असते.
   ५. मर्दुमकी प्रश्न नाही. योग्य ठिकाणी कळवलेच आहे. ब्लॉग हा आपले अनूभव शेअर करायलाच लिहिलेला असतो .या पुर्वी पण बरेच ब्लॉग स्वानुभवावर लिहिलेले आहेत.
   खरं तर या ब्लॉग ला इतकी प्रसिध्दी मिळेल असे वाटले पण नव्हते.

 23. खरं तर माझ्या एक मावस जाऊबाई, वय वर्ष ५५, अनेक व्याधींनी जर्जर, सांधेदुखी चा त्रास अश्या हे काम करत आहेत. घरी अंथरूणाला खिळलेली सासू आणि आजरी नवरा यांना घरी सोडून ही बाई काम का करत आहे तर तिच्याबरोबर एक सहा महिन्याची बाळंतीण ; लहानगं बाळ घरी ठेऊन काम करत आहे म्हणून. आमदार कपिल पाटलांनी वर्तमान पत्रातून कितीही लिहिलं, की आजारी-वयस्कर कर्मचार्‍यांना हे काम न देण्याचा आदेश दिलाय तरी वस्तुस्थिती तशी नाहिये.
  माझ्या मते अनेक तरूण , होतकरू मुलं बेरोजगार म्हणून आहेत. त्यांना हे काम शासनाने सोपवले असते तर जास्त चांगले झाले असते. त्यांनाही काही अनुभव मिळाला असता, काही उत्पन्न मिळाले असते.

 24. Jay says:

  एक सांगायचा राहून गेल. लेखन ब्लोग च्या heading प्रमाणेच करता… कोणतेही तारतम्य न बाळगता ….संस्काराची भाषा तुम्ही करू नये…नाहीतर एका स्त्री चे नाव प्रसिद्ध करण्या पूर्वी विचार केला आसता.

  • इथे स्त्री- पुरुष हा प्रश्न नाही. कशाच्या संदर्भात लिहिले आहे ते महत्वाचे.जर एखादा पुरुष असता तर काय फरक पडला असत? काहीच नाही…
   काम ज्या तर्हेने व्हायला हवे ते झाले नाही हे महत्वाचे.
   काल दिवसभर ब्लॉग वर ते नांव आणि पत्ता पण होता .अजूनही ब्लॉग वरच्या इतर लिखाणात तुम्हाला सापडेल तो.

   एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की “तुम्ही असे काही लिहिले आहे की जसे जे काही नियमबाह्य वर्तन केले आहे ते मी!! एकाही शब्दाने तुम्हाला त्या जनगणनेच्या प्रोसिजर बद्दल काही लिहावेसे का वाटले नाही?

 25. Jay says:

  माझ्या दोन पोस्ट होत्या ..एकच प्रसिद्ध झाली ..मला माहित आहे माझी हि पोस्त सुधा तुम्ही पोस्ट करणार नाही….परखड विचार असेच दाबले जातात……स्त्री, पुरुष प्रश्न नाही आसे म्हणू शकत नाही ….आज गुन्हेगारीच प्रमाण किती वाढलाय हे सर्वांनाच माहित …आमच्या पुण्यात याच प्रमाण ठार खूपच वाढलय. मग या स्त्रियांच्या सौराक्ष्णाची जबाबदारी घेणार कोण…माझ्या नातेवैकाने सांगितलेला अनुभव एक ” ज्यांच्य घरी ती जनागानेला गेली होती तो दारू पिऊन धुंद होता त्यला नित बोलता येत नव्हत…त्याची बघण्याची नजर आसे बरच अनुभव” आसे बरच अनुभव, त्याची बघण्याची नजर… त्या स्त्रीला हि आसे अनुभव आले आसतील सुजन नागरिक म्हणून जाणून घेण्याचा प्रयत्न कला …ब्लोग मात्र लगेच लिहिला .

 26. कालच पुणे सकाळमध्ये याबाबत माहिती आहे. तुम्ही जो प्रकार वर्णन केला त्याचबद्दल ती बातमी आहे. याला दुसरीही बाजू आहे. पुण्यात जनगणनेच्या प्रशिअक्षाणाला उपस्थित न रहिल्याबद्दल एका फटक्यात ७०० लोकांवर कारवाई केली. त्यानंतर अनेक लोकांनी एप्रिलमध्येच निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे मेमधील जनगणनेच्या कामासाठी पाठविली. तोच गोंधळ अजून चालू आहे. या कागदी घोडे नाचविणाऱ्यांमुळे अनेक समस्या येत आहेत.
  तुम्ही ज्या महिलेचे उदाहरण दिले आहेत, त्यात दोन गोष्टी ठळक आहेत. एक, कामचुकारपणा आणि दुसरे, पैशांनी आपण काहीही विकत घेऊ शकतो, हा गंड. मला मुंबईची माहिती नाही, मात्र प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि पालिकेने नेमलेला कक्ष आधिकारी तक्रार आल्यानंतर अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करू शकतो-त्याला/तिला तशी ईच्छा असेल तर!

  • देविदास
   माझ्या कडुन हा विषय संपला आता. खूप झालं, जे होईल ते होईल. असो
   प्रतिक्रियेकरता आभार.

 27. महेंद्रजी, तुमच्या मताशी आम्ही १००% सहमत आहोत. आमच्या कडे जनगणने साठी कोणीतरी येऊन गेले पण फॉर्म वर सही नाही घेतली. त्यांनी सांगितलं कि परत येऊन फॉर्म वर सह्या घेणार. त्यांनी माहिती कच्च्या पेपर वर नेली, बघू आता परत कधी उगवतात ते. आजच सकाळ वर बऱ्याच प्रतिक्रिया बघितल्या … माझ्या मते काही ठराविक लोकं नाव बदलून तीच तीच प्रतिक्रिया लिहीत आहेत …. तुमचा मुद्दा योग्य आहे आणि तुम्ही तो मांडल्या बद्दल तुमचे धन्यवाद.

  • विनोदजी
   खरं सांगतो, मला तर चक्क इरिटेशन/डिप्रेशन आलं होत सगळ्या हेट मेसेजेस नी.़
   प्रतिक्रिया पण अशा की जसे काही मीच चुक केली आहे . म्हणुनच आज जरा हलकी फुलकी पोस्ट टाकली प्रेमावर.

 28. महेंद्र,
  तुमचा हा लेख ई सकाळ वर आला आहे. अभिनंदन! येथे पहा:

  http://72.78.249.124/esakal/20100524/4657226615496941832.htm

  ब्लॉगसच्या दर्ज्यावर सध्या टीका होत असताना, तुमचा लेख सकाळने प्रदर्शित करणे जास्त उल्लेखनीय होते. कितीही टीका झाली तरी ब्लॉगचे महत्त्व हे वाढणारच आहे.
  लगे रहो!

 29. Sujit says:

  http://censusindia.gov.in/2011-Documents/Houselisting%20English.pdf
  As per Indian Evidence Act, १८७२ section १० हा
  डेटा इतर कारणासाठी वापरला जाणार नाही. त्यामुले परदेशी लोकांना भारतीय नागरीकत्व मिळवण्याचा प्रश्न येत नाही.

  http://2010.census.gov/2010census/how/index.php
  US लाही आशी माहिती पत्र व्यवहार करून घेतली जात आहे. कोणी reply केला नाही तर ऑफिसर प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतो.
  महेंद्र तू अकारणच ओरडत आहे.

  • सुजीत
   भारतामधे अशी पध्दत नाही . भारतीय कायद्या प्रमाणे स्वतः जाउन माहिती घेणे आवश्यक आहे, म्हणुन हे पोस्ट लिहिले.
   प्रतिक्रियेकरता आभार.

 30. सचिन जाधव says:

  महेन्द्रजी,

  आपला ब्लॉग बरेच जण वाचतात असं दिसतं. चांगला विषय घेतलात लिहायला. छान. पण आक्रमकता जरा जास्त वाटली. दुसरी बाजू सांगावीशी वाटते.

  प्रगणकांना जो फ़ॉर्म दिलेला असतो, तो एक काळजीपूर्वक हाताळावा लागणारा कागद असतो. बराच मोठा असतो. A3 की A2 size चा. त्यावर बॉलपेननं एका ठरावीक प्रकारे अंक भरायचे असतात. तसे अंक लिहायची साधारणत: कुणाला सवय नसते. त्यात चूक झाली की तो कागद बाद होतो, कारण, Intelligent Character Reader तो कागद वाचू शकत नाही. उन्हातान्हात फिरताना धूळ, घाम लागून कागद खराब होऊ शकतो. सेन्सस कमिशनर धोरण बनवतात. प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे त्यात थोडेफार फेरफार करतात, आवश्यकतेनुसार. letter पाळले जात नसले, तरीही spirit पाळले जाते की नाही, हे मात्र अधिकारी बघत असतातच. खात्री बाळगावी. घरोघर जाऊन हे असले कागद भरणे अवघड आहे. कागद खराब होतात. नवीन वेळेवर मिळत नाहीत. त्यापेक्षा कच्ची माहिती वेगळ्या कागदावर घेऊन सावकाश घरी बसून फॉर्म भरणे योग्य. अजून म्हणजे, शहरी भागात बऱ्याच वेळा पती पत्नी दोघेही नोकरी करतात. घरी कुणी सापडत नाही. सकाळी घाईत असतात, संध्याकाळी उशीरा घरी परततात. एका प्रगणकाला दीडशे घरे कमीत कमी फिरायची असतात. कधी कधी चारशे. त्या बाई तुमच्या सेक्रेटरींना भेटल्या, म्हणजेच, त्या आल्या होत्या. त्यांनी, सेक्रेटरी तुमचा प्रतिनिधी म्हणूनच त्यांच्याकडे तो कच्चा फॉर्म दिला. त्यांना टाळाटाळ करायची असती तर मस्त घरी बसून काल्पनिक नावे भरता आली असती. पावत्यांवर खोट्या सह्या करता आल्या असत्या. एक एक फॉर्म भरणे हे वेळखाऊ काम आहे. प्रत्येक घरी माणसे भेटेपर्यंत, त्यांनी वेळ देईपर्यंत संयमाने खेटे घालणे अवघड आहे. सगळेच लोक ते शंभर टक्के सिन्सिअरली करतील अशी अपेक्षा करणे व्यवहार्य आहे काय?

  जनगणना म्हणजे रेशन कार्ड किंवा नागरीकत्व नव्हे. हां, यासोबतच, काम सोपे व्हावे म्हणून National Population Register चे काम जोडून दिलेले आहे. पण त्यासाठी वेगळे लोक तुमच्याकडे येतील. त्यात तुमचा डोळा स्कॅन करतील, तुमच्या अंगठ्याचा ठसा घेतील. लॅपटॉप सोबत घेऊन माणसे फिरतील. ती वेगळी गोष्ट आहे. सरकारी अधिकारी तुम्हाला वाटतो तेवढा हलगर्जीपणा करत नाहीत. टेररिस्ट किंवा पाकिस्तान्यांना बांगलादेशींना आयकार्डे मिळणे इतके सोपे नाही. नंदन निलेकाणी आणि बरेच उत्तमोत्तम मेंदू या कामात लागलेले आहेत.

  अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की हे काम बघणारी यंत्रणा महसूल यंत्रणा असते. त्यांच्या अनेक कामांपैकी हे एक काम आहे. सगळा वेळ ते या कामाला देऊ शकत नाहीत. (सरकारी लोक काही काम करत नाहीत हे एक मिथ आहे. तो विषय अर्थातच वेगळा आहे.)

  असो. त्या प्रगणक बाईंविषयीचा तुमचा राग थोडा शांत व्हायला हरकत नाही! तुमची तक्रार तुम्ही कलेक्टरना प्रत्यक्ष भेटून दिलीत तर नक्की फरक पडेल. त्यांच्या review मध्ये ते दखल घेतील.

  टीप – मी प्रगणक नाही!

  • सचिनजी
   ब्लॉग वर स्वागत!
   तुमची वेळ काढून लिहिलेली प्रदीर्घ प्रतिक्रिये साठी आभार. ब्लॉग वर लिहितांना त्या क्षणी जे काही मनात असेल ते सरळ टाइप करतो, त्यामुळे कदाचित आक्रमक वाटले असेल. आधी कागदावर लिहून नंतर मग पुन्हा टाइप केले तर कदाचित थोडे माइल्ड होऊ शकले असते.

   बरेच मुद्दे तुम्ही क्लिअर केले आहेत. अहो मला राग वगैरे काही आलेला नाही, मला फक्त थोडं विचित्र वाटलं अशा तर्हेने कागद पाठवून डाटा गोळा करणे, म्हणुन हे पोस्ट लिहिले. कदाचित त्यांनी स्वतः एक दिवस सकाळी येउन घरी कागद दिला असता, तर कदाचित इतकं विचित्र वाटलं नव्हतं . माझे वडील पुर्वी शासकीय कॉलेजचे प्राध्यापक व नंतरच्या काळात प्राचार्य होते, आता रिटायर झालेले आहेत २२ वर्षापुर्वी, त्यांना पण लहानपणी हे काम आणि इलेक्शन चे काम करतांना पाहिले आहे. ते स्वतः लोकांच्या घरी जाउन हा डाटा गोळा करतांना पाहिलेले आहे.

   तुम्ही म्हंटल्या प्रमाणे , की लोकांच्याकडे जाउन प्रत्येक वेळी नांवं लिहून घेणे कठीण आहे. मग अशा परिस्थिती मधे सरकारने फॉर्म आणि माहिती सरळ पोस्टाने मागवली तर बराच त्रास कमी होऊ शकेल. वर कुणीतरी लिहिलंय की अमेरिकेत पण अशीच पद्धत आहे म्हणुन.

   घरी बसून माहिती लिहिणे आणि सह्या करणे शक्य झाले असते.पण जर बरेच लोकं आमची नांवं जनगणने मधे घेतली नाहीत तर शांत बसणार नाहीत हे मात्र नक्कीच खरे. कदाचित प्रेसिडॆंटला इमेल, विरोधी पक्षांना असे मुद्दे हवेच असतात तेंव्हा विरोधी पक्ष नेते, आणि इतर सगळ्या ठिकाणी कम्प्लेंट करतीलच.

   खरं सांगायचं तर, हे ब्लॉग लिहिणे वगैरे मी एक छंद म्हणून करतो. त्या मुळे या गोष्टीचा पाठ पुरावा करणे मला शक्य नाही. एक नागरीक म्हणुन जेवढं करण्यासारखं होतं तेवढं केलं. खरं सांगायचं तर ह्या ब्लॉग ला इतकी प्रसिध्दी मिळेल असे वाटले नव्हते.

   कालच एका इंग्रजी दैनिकाचा फोन आला होता, त्यांना हा ब्लॉग छापायचा आहे म्हणुन, मी नकार दिला सरळ.. झालं तेवढंच पुरे आहे बस्स!!
   प्रतिक्रियेसाठी आभार.

 31. आज पुन्हा त्याच इंग्रजी दैनिकाचा पुन्हा फोन आला, काय कराव हेच सुचत नाही. त्यांना परवानगी द्यावी का? जस्ट कन्फ्युज्ड…

 32. Umesh says:

  तुम्ही त्या त्या वेळी मनात येईल ते लिहिता हे ठीक आहे. पण बरेचदा असे विचार balanced नसतात कारण भावनेच्या भरात आपण फार कमी वेळा संयमित विचार करतो. त्यामुळे कागदावर उतरवून, परत परत वाचून, थोडा विचार करून मग छापणे योग्य. त्यामुळे थोडा उशीर जरूर होईल पण लेखन balanced असेल. असो. सचिन जाधव यांनी खूप छान प्रतिक्रिया दिली आहे.

  अमेरिकेप्रमाणे पोस्टाद्वारे माहितीचा मार्ग आपल्याकडे कितपत काम करेल माहिती नाही. कारण या माहितीबद्दल लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत. जणू काय आपण माहिती दिली तर Income Tax Dept ची लोकं raid टाकतील का काय असे वाटत असते खूप जणांना. त्यामुळे postal system चा लोकं गैरफायदा घेतील आणि माहितीच देणार नाहीत. त्यात स्वतः होऊन असे काही करणे म्हणजे आपल्या लोकांना शक्य नाही. जी लोकं मतदान करायला जात नाहीत ती लोकं सगळा एवढा फॉर्म भरून पाठवतील ही शक्यता कमीच. शिवाय यामधून तो माणूस तिथे रहातोच आहे हे कळायचा मार्ग काय ? ( अतिरेक्यांसाठी मात्र अतिशय उत्तम मार्ग ) म्हणजे ते verify करायला एक समांतर योजना राबवावी लागणारच. एकूण प्रकरण अवघड आहे.

  इंग्रजी वर्तमानपत्राला blog छापायचा असेल तर eसकाळ मधील काही प्रतिक्रिया छापणे पण योग्य ठरणार नाही का? कारण त्या प्रतिक्रिया पण तुमच्या लेखावरच आहेत. खरे तर (sincere) प्रगणकांनी आणि अधिकाऱ्यांनी देखील या विषयावर लिहिले पाहिजे त्यामुळे या विषयातील problems अधिक उजेडात येतील.

  • माझे व्यक्तीशः त्या व्यक्तीशी काहीच वैर नाही. मी जे काही लिहिले आहे ते त्या क्षणी मला बरोबर वाटत होते, आणि अजूनही बरोबरच वाटते आहे. मी जे काही लिहिले आहे ते त्या व्यक्तीने केले आहे, तेंव्हा माझे काहीच चुक नाही. जर काही चुक असेल तर ती त्या व्यक्तीची आहे.

   सकाळवरच्या प्रतिक्रिया या मूळ मुदा बाजूला ठेउन, मी हा लेख का लिहिला? माझी बहीण आई वगैरे कोणी असते या कामत, तर मी असे लिहिले असते कां? स्त्रीयांना अशा कामाचा त्रास होऊ शकतो वगैरे गोष्टीं भोवतीच रेंगाळत आहेत. इथे पण या ब्लॉग वर व्यक्तीशः शिव्या देणाऱ्याच प्रतिक्रिया जास्त होत्या ( ज्या अर्थात मी डीलीट केल्या) . अशा प्रकारच्या टॅंजंट प्रतिक्रिया दिलेल्या पाहिल्या आणि लोकांच्या मानसिकतेची कमाल वाटली …. असो.

   मूळ मुद्दा की अशा तर्हेने आउटसोअर्सिंग करणे योग्य आहे का? शासनाने जे काही नियम केले आहेत ते ज्याला जसे वाटेल तसे त्याने मोडायचे का? कदाचित मी या नियम मोडण्या मूळे जे काही होऊ शकते असे मला वाटले, तसे नसेलही, पण तरीही असे नियम मोडणारे लोकं आहेत, आणि त्यांच्या बद्दल नियम मोडले म्हणून लिहिलं तर लोकांचा संताप होतो. ही मानसिकता मला अद्यापही समजलेली नाही.

   नियम हे मोडण्यासाठीच असतात, जरी मोडले तरीही काही होत नाही, अशा प्रकारच्या प्रतिक्रियांना मी तरी काहीच महत्व देत नाही. थोडं फार वैचारीक प्रतीक्रिया ( एक तुमची पण त्यातच आहे) दिल्या तर त्याला उत्तर लिहायला पण बरं वाटतं. थोडी मेंदूला चालना मिळते. पण नुसत्या एकांगी टॅंजंट प्रतिक्रिया मात्र दुर्लक्षित कराव्याशा वाटतात.

   एखाद्या पोलिसाने समजा गडचिरोली येथे नक्षलवादी आहेत म्हणुन नौकरी साठी जायला नकार दिला तर ते योग्य आहे असे म्हणणारे लोकंही सापडतील यात मला अजिबात शंका वाटत नाही. मी जे लिहितो ते सरळ लॅप्टॉपवरच टाइप करतो. आधी लिहून नंतर पुन्हा वाचून वगैरे पोस्ट करीत नाही. ब्लॉग हा आपले विचार मांडायला वापरायचा असतो. लोकांना काय आवडतं ते लिहिण्यापेक्षा मला काय वाटतं ते लिहायला मला जास्त आवडतं- म्हणूनच हा ब्लॉग सुरु केला.

   लोकांना नियम बाह्य वर्तन करायला काही वाटत नसेल,आणि त्यांनी जे काही केलंय तेच इथे लिहिलं तर इतका गदारोळ कशाला? हेच मला समजत नाही. स्त्रियांना ही कामं देणं योग्य की नाही हा प्रश्नच नव्हता. पण प्रतिक्रिया मात्र सगळ्या त्याच अनुषंगाने आहेत. असो.

   कालच आमच्या कडे येऊन जनगणना केली गेली, तेंव्हा हा विषय आता माझ्या दृष्टीने संपला आहे.

 33. Pingback: जनगणना | indiarrs.net Featured blogs from INDIA.

 34. माझे वडील शिधावाटप अधिकारी म्हणून सरकारी नोकरीत होते, त्यांच्याकडून जनगणनेचं काम हे खूप गंभीर, महत्त्वाचं आणि जबाबदारीचं आहे असं ऐकलं होतं. त्यांना प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सुद्धा एखाद्या मतदान केंद्रामधे ड्युटी असायचीच. आमच्या घरी आलेले जनगणना अधिकारी कुठल्या तरी शाळेत शिक्षक आहेत, असं त्यांची चौकशी केल्यावर कळलं. ते फॉर्ममधे खूप काळजीपूर्वक माहिती भरत होते, त्यावरून कळलं की जनगणनेचं काम हे निश्चितच किचकट व त्रासदायक आहे. मात्र केवळ गैरसोय टाळावी म्हणून माहिती ’मागवून’ घेण्याच्या प्रकारात बरेच गैरप्रकार होऊ शकतात, त्यामुळे त्या बाईंनी असं करण्यापूर्वी विचार केलेला दिसत नाही हे समजून येतंय. माहिती भरताना चुका होणे वगैरे प्रकार टाळण्यासाठी पेन्सिल, खोडरबर वापरता येतं. त्यासाठी अशा प्रकारे माहिती मागवून घेण्याची गरज नाही.

  त्या बाईंनी घरी मस्त बसून माहिती भरली जरी असती, तरी प्रत्येकाच्या घरी जनगणना अधिकारी आल्या नाहीत व त्यांनी कुणालाही पावती दिलेली नाही, हे सिद्ध झालंच असतं, त्यामुळे अशा प्रकारचे अंदाज वर्तवण्यात काहीच हशील नाही. त्यांना कच्चीच माहिती लिहून घ्यायची असती, तर त्या प्रत्येकाच्या घरी जाऊ शकल्या असत्या. त्यांनी ज्या प्रकारे प्रश्नपत्रिका बनवून पाठवली आहे, त्यावरून कळतंय की त्यांना तो फॉर्म अगदी व्यवस्थित समजलेला आहे.

  इंग्रजी वर्तमानपत्रवाले लेख मागत असतील, तर द्या. सकाळमधे लेखावर ज्या प्रतिक्रिया मिळाल्यात त्यावर जाऊ नका. सकाळ चालण्यासाठी अशाच प्रतिक्रियांची गरज आहे.

  • मला वाटतं त्यांना पण आता लक्षात आलं असावं की आपण काय चूक केली ते. उगाच जास्त ताणत नाही. हा इशु बंद करतो माझ्या कडून. पण या नंतर एक पोस्ट लिहीण्याची इच्छा आहे ती अशा कामात स्त्रीयांचा सहभाग असावा का? या विषयावर!!

 35. Supriya says:

  जनगणना करणाऱ्यांनी जनगणना कोणत्या पद्धतीने केली हे बसून बोलणाऱ्या लोकांना कधीच कळणार नाही. ते करणार्यांनाच त्याच गांभीर्य माहित आहे. आम्ही मे महिन्याच्या कडक उन्हात वनवन फिरून जनगणना केली ते काय ” माजलेले ” , ” साले” हे शब्द ऐकून घेण्यासाठीच का ? या लोकांसाठी आम्ही रात्री ३ वाजेपर्यंत तहान भूक विसरून काम केल याची तर कुणीच दखल घेतली नाही पुन्हा लोकांच्या घरी गेल्यावर जे वाईट अनुभव आले ते तर वेगळेच ……. तरीही लोकांनी पाचही बोटे सारखी असे समजून ज्या काही comments दिल्या आहेत त्या खूप लज्जास्पद आहेत .

  एक प्रगणक

 36. adv.kshiteej nagorao anokar says:

  मित्रांनो खरे तर तुम्ही सर्वांनी छान विषय चर्चेला घेतला काही असंबद्ध प्रतिक्रिया सोडल्यास छान प्रतिक्रिया मिळाल्या. परंतु मी थोडासा वेगळा विषय मांडू इच्छितो, तुंम्हा सर्वांना माहिती आहेच कि, जनगणनेचे काम सरकारी शाळांमधून नोकरीवर असलेल्या शिक्षकांकडून करून घेण्यात येते. इतकेच नव्हे तर इतरही अशैक्षणिक कामे शिक्षकांकडून करून घेतली जातात वर वर पहिले तर या कामांना सामाजिक जबाबदारी म्हटल्या जाते. परंतु आतली गोष्ट अशी आहे, कि संविधानांने जनसामान्यांना, दलितांना, गोरगरीबांना शिक्षणाचा हक्क दिला. आता खरेच हे लोक शिकू लागले तर ! उद्या सरकारी नोकऱ्या मागतील , निवडणुका लढवतील, सरकारे चालवतील. मग आज राजकारण करणाऱ्यांनी काय करावे, म्हणून शिक्षणाचा अधिकार कागदावर राहावा तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचू नये या करिता प्रस्थापितांनी शिक्षकांना ह्या कामात गुंतवले आहे हे झाले कि, खिचडी, शाळा खोल्या बांधकाम, वेग्वेले प्रशिक्षण ह्यात शिक्षकांना गुंतवून ठेवावे म्हणजे खाजगी शाळांमधील विद्यार्थी शिकत असताना सरकारी शाळांमधील विद्यार्थी उघड्यावर बसून खिचडी खाण्याची व भीक मागण्याची प्रक्टीसं करतील. हा डाव एकदा का गोरगरिबांच्या शेतमजुरांच्या लक्षात अल्ला कि, पाळता भुई थोडी होईल कारस्थानी लोकांना !

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s