काळजी घ्या..

This slideshow requires JavaScript.

काल दुपारी लंच टाइम मधे ऑफिसच्या बाहेर पडलो, तेंव्हाच काही स्मार्टली ड्रेस्ड मुलं , मुली येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या हातात कॅटलॉग देत होते. साधारणतः  असे कॅटलॉग – ’जे बहुतेक घरी राहुन पैसे कमवा ’ वगैरे   असतात म्हणून न वाचताच फेकून देतात सगळेच लोकं-पण…. हे काहीतरी वेगळंच दिसत होतं!

मोठ्या अक्षरांमध्ये थायरॉइड्स लिहिलेलं वाचलं- आणि आठवलं की आईचं पण ह्याचं ऑपरेशन झालं होतं .   त्यात   दिलेले होते की उद्या ( म्हणजे  २५ तारखेला) आमच्या ऑफिसच्या खालच्या मजल्यावर वर्ल्ड थायरॉईड डे च्या निमित्ताने फ्री थायरॉइड चेक अप कॅम्प आहे.तुम्ही सगळ्यांनी यायचं..

दुसऱ्या दिवशी म्हणजे आज दिसलं की खालच्या जागेचा पुर्ण कायापालट झालेला होता. खरं म्हणजे खालचा एक कोपरा कन्स्ट्रक्शन अजूनही झालेलं नाही. पण लाल गालिचा,  काजोल चा हसरा फोटो , या मुळे वातावरण एकदम बदललेले होते. या कॅम्पेनची काजोल ब्रॅंड ऍम्बॅसेडर आहे.  काही मुलं , मुली  आजच्या इव्हेंटची अरेंजमेंट्स करत होती – म्हणजे टेबल्स अरेंज करणं,पोस्टर्स लावणं वगैरे .

ऑफिसमधे गेलो – दुपारी लंच टाइम मधे इथे जायचे हे ठरवूनच.थायरॉइड च्या बद्दल फारशी माहिती नसते कोणालाच- फक्त शरीरामधे एक ग्लॅंड असते एवढंच माहिती असते.  जितक्या प्रमाणात डायबिटीस , हार्ट ,कोलेस्ट्रॉल बद्दल बऱ्यापैकी जागरुकता निर्माण झालेली आहे , तितका या  थायरॉइड बद्दल नाही. लोकं हल्ली कोलेस्ट्रॉलची काळजी करत त्तळलेले पदार्थ कमी खातात, खाण्यातले साखरेचे प्रमाण कमी केलेले आहे .पण थायरॉइड चा कोणी विचार करत नाही.

तिथेच संजय बायद हे ऍबॉट इंडीया चे प्रतिनिधी भेटले. त्यांनीच हे सगळं  ऑर्गनाइझ केलं होतं.थायरॉईड्चा त्रास आहे की नाही हे पहाण्यासाठी रक्त तपासावे लागते असेही त्यांनी सांगितले.या चेकिंग साठी २५० रुपये प्रती पेशंट खर्च असतो , पण आज वर्ल्ड थायरॉईड डे, म्हणून हा फ्री ब्लड चेक अप कॅंप  ऍबॉट इंडीया लिमिटेड ने  ऑर्गनाइझ केलाय असे ते म्हणाले.

आत शिरल्या बरोबर समोर एक काउंटर होते, तिथे तुमची सगळी माहिती रजिस्टर करून घेतली जात होती आणि लगेच   तुमच्या हातात एक रिकामी बाटली दिली जात होती. समोरच दुसरं काउंटर होतं. त्या दुसऱ्या एका काउंटरवर रक्त घेतले जात होते- पाच सहा लोकं रांगेत उभे होते. रक्त दिलं,  रक्त तपासणीचा रिपोर्ट दोन दिवसानंतर मिळेल असे सांगितले  गेले.

थायरॉईड हा कोणालाही होऊ शकतो, पण त्यातल्या त्यात स्त्रीया ज्यांचे वय ३० च्या वर आहे, प्रेग्नंट आहेत, किंवा नुकतीच -म्हणजे ६ महिन्यात डिलिव्हरी झालेली आहे  , डायबिटीस असलेले, ऍनेमिया, अर्थ्रायटीस ,  असेल तर तुम्हाला हा रोग होण्याचे जास्त चान्सेस आहेत.तसेच सारखे मिसकॅरेज होत असेल तरीही थायरॉइडची तपासणी करुन घेतली जाणे आवश्यक ठरते.

थायरॉईडची लक्षणं म्हणजे  खूप जास्त घाम येणे, वजन कमी होणे- नेहेमी पेक्षा जास्त खाल्ले तरीही, वजन वाढणे, केस गळणे, मसल्स मधे थकवा वाटणे, नेहेमी पोटाचे विकार होणे, आणि स्त्रियांचे विकार य व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी आहेत, त्या सगळ्या इथे लिहिणे शक्य नाही. या बद्दल अजून काही जास्त टेक्निकल माहिती हवी असेल तर   वेब साईटची लिंक इथे दिलेली आहे. अवश्य भेट द्या.

रेडिओऍक्टिव्ह आयोडीन हा या रोगावरचा एक उपाय आहे. जर या प्रकाराला ऍलर्जी असेल तर ऑपरेट करुन उपचार करता येतो. संजय बैद चं असंही म्हणणं पडलं की प्रत्येकाने  हे चेकिंग   करुन घेतलेच पाहिजे.

दुसऱ्या एका काउंटरवर दोन मुली  बसल्या होत्या. त्यांनी एक फ्रुटी आणि बिस्कीटे   दिली. समोर एक मोठा पांढरा कपड्याचा पडदा  लावला होता. त्यावर तुम्ही हा थायरॉईड  बद्दल  जागरुकता वाढवाल अशी प्रतिज्ञा घेउन सही करायची . मी पण सही केली!! जागरुकता वाढवायचा मान्य केलेले आहेच, म्हणून हे पोस्ट!! जास्त माहिती हवी असेल तर संजय बैद यांच्याशी संपर्क साधू शकता.त्यांचा इ मेल इथे दिलेला आहे.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मेडिकल सायंस and tagged , , , , , . Bookmark the permalink.

70 Responses to काळजी घ्या..

 1. छान माहिती दिलीत. मध्यंतरी चेक अपचं डोक्यात आलं होतं पण विसरून गेले होते. आता डोक्यातून निघून जायच्या आता चेक अप करून घेते. धन्यवाद.

  • करुन घेतलेली बरी. आज जवळपास हजाराच्या वर लोकं आले होते तपासणीसाठी. ऍबोटने बराच खर्च केलाय या इव्हेंटवर. तपासणी करुन घ्या एकदा बरं असतं..

 2. दादा, वेबसाईटची लिंक चालत नाही.

 3. Vidyadhar says:

  मस्त काका. अश्या बर्‍याच आरोग्यविषयक गोष्टी असतात ज्यापासून आपण अनभिज्ञ असतो. मी कॉलेजात असताना आमच्या कॉलेजात एक थॅलेसेमिया अवेअरनेस सेमिनार आयोजित केला होता. ह्या सेमिनारपूर्वीपर्यंत बहुतेकांनी थॅलेसेमिया हा शब्दही ऐकला नव्हता!
  धन्यवाद ह्याची माहिती दिल्याबद्दल!

  • चाळीशी मधे पुरुषांनी आणि तिशी नंतर स्त्रियांनी याची तपासणी करुन घेतलीच पाहिजे

 4. नमस्कार महेन्द्रजी,
  थायरॉइड विषयी १ मुद्दा राहीला,ह्या आजाराचे शारिरीक दुष्परीणाम जसे आहेत तसे मानसीक सुध्दा आहेत.जसे की आळस वाढणे,चीडचीड वाढणे. बायको क्षुल्लक कारणावरुन कटकट करायला लागली.आणि अस वारंवार घडु लागल तर तपासणी करुन घेणे व आपण संयम राखणे योग्य. हे लक्षण
  खुप common असले तरी भारतीय स्त्रीयांमधील या रोगाचे प्रमाणही खुप आहे.हे स्वानुभवाने लिहीत आहे

  • हेमंत
   धन्यवाद. आजच वाचण्यात आलं की जवळपास साडे चार ते पाच कोटी सायलेंट ( अन आयडेंटीफाइड) केसेस आहेत भारता मधे. एकदा चेक करुन घ्यायला हरकत नाही.

 5. thanthanpal says:

  महेंद्रजी आपण दिलेली माहिती चांगली आहे. पण….. महेंद्रजी राग मानु नका, मेडिकल कंपन्यांनी प्रचंड गुंतवणूक करून परदेशी यंत्र सामुग्री बसवली आहे. आणि ही यंत्रे चालावी या करता आपल्या आरोग्याची आम्ही किती काळजी घेतो . याचा आभास निर्माण करून आपणास वेगवेगळ्या मेडिकल तपासण्या करण्यास भाग पाडले जाते आपला खिसा कापला जातो आणि कंपन्यांचा , डॉक्टरचा खिसा भर भरून जातो. आणि आपण उगीच भारावून जातो. हे समाजसेवक पगारी नोकरच असतात फक्त त्याला मानधन म्हणतात. आणि कंपन्या या कामा साठी आपली मानसिकता ओळखून लोकप्रिय नट नट्या , खेळाडू निवडत असतात
  अमेरिके प्रमाणे भारताचा मेडिकल धंदा हा कंपन्या,विमा कंपन्या,आणि डॉक्टर्स यांच्या फायद्या करताच चालवला जात आहे. आजारी माणसाशी याचा काडीचा ही संबंध नाही. थायरॉइड्स तपासणाऱ्या लाब्ज मोठ्या शहरात आहेत. त्यांची केंद्रे प्रत्येक लहान गावात आहेत . आणि 80% रिपोर्ट हे NORMAL येतात. हा माझा व्यवसाय असल्या मुळे छातीठोक पणे मी सांगत आहे. 80% आजारपणात तपासण्यांची आवशकता नसते हे कटू सत्य लपवले जात आहे. आणि आजारपणाचा मुळे दवाखाने,कंपन्या यांची जि वाढ होत आहे.ती वापरून GDP दर वाढला म्हणून राजकारणी आपली पाठ थोपटून घेत आहे.

  • Raj says:

   वरील माताशी पूर्ण सहमत आहे.
   मी मिड्ल ईस्ट आहे. मला फक्त असिडिटी च्या गोळ्या पाहिजे होत्या
   हान्नी माइ EGC व एतर टेस्ट केल्या
   कारण कंपनी चा पैसा पण मी मतले की बॉडी माझी आहे ते लषात ठेवा

   • ‘कट प्रॅक्टीस’ हा वेगळा विषय होईल लिहायला. माझा एक मित्र गायनॅक आहे पुण्याला , तो बरेचदा बोलतो या विषयावर. प्रतिक्रियेकरता आभार.

  • जवळपास हजाराच्या वर लोकांची टेस्ट विनामुल्य केली गेली. जरी २० टक्के रोग असतो असे समजले तरीही बऱ्याच रोग्यांना पुर्वकल्पना मिळेल आणि औषधं घेउन लवकर बरे होता येइल. पैसे पण फक्त २५० रुपये लागतात तेंव्हा नुसतं चेकिंग करुन घ्यायला काही हरकत नसावी असे वाटते.

  • Rajeev says:

   you are very very correct, but most of the females do not pay self attention..
   they also spoil their family health by vertue of the eating habits……
   its because of new food culture.
   ( we are getting lot of money to spend on food , which has no +ve value)
   rajeev

 6. मनोहर says:

  Redioactive आयोडिन हा थायराइडवरचा उपचार नाही अशी माझी माहिती आहे. थायराइड ही ग्रंथी रक्तपुरवठ्याशी नलिकेद्वारे जोडलेली नसून त्यात निर्माण होणारे थायरा्क्झिन रक्तप्रवाहात रसाकर्षण प्रक्रियेद्वारा मिसळते. याचा अर्थ थायराइडसंबंधी विकाराचे एकच कारण आहे असे ठामपणे म्हणता येत नाही.
  थायराक्झिन हे संदेशवाहक प्रथिन असून ते अनेक शारिरिक क्रियाना चालना देते.

  • मनोहर
   दुरुस्ती करता आभार. अहो मी नेटवर वाचलं कुठे तरी, आणि इथे लिहिलं, तिथे असंही लिहिलं होतं की या उपचाराची ऍलर्जी असेल तर ऑपरेशन करावे लागते. लिंक शोधतो पुन्हा एकदा.
   प्रतिक्रियेकरता आभार.

 7. bhaanasa says:

  महेंद्र, बरेचदा आपण पाहतो नं की एखाद्याचा गळा- हनुवटीपासून ते कंठमण्य़ापर्यंतचा भाग अगदी कबुतरासारखा फुगलेला असतो. तसेच अचानक वजन बरेच वाढू लागते किंवा अतिशय झपाट्याने खूप वजन कमी होते. डोळे बाहेर आल्यासारखे वाटतात. धाप लागते, चीडचीड होते. कितीही कमी खाल्ले तरी वजन वाढावयाचे थांबतच नाही…. ही सारी याचीच लक्षणे. अजूनही याबाबत लोक खरेच फारसे जागरूक नाहीत. शिवाय काहितरी वयाशी संबंध जोडून असे होणारच म्हणत चक्क दुर्लक्ष करीत राहतात. परंतु पुढे याचे परिणाम जास्त दिसून येतात. वेळोवेळी तपासणी करून घ्यावी हे उत्तम. अर्थात कधीकधी उगाचच डॉक्टर्स केवळ कटसाठीही ही तपासणी करून घ्या असे म्हणताना दिसतात खरे. त्यामुळे खरे पेशंटसही वेळ काढत राहतात. 😦

  • आईचं पण ऑपरेशन झाल्ंय थायरॉईड्सचं. तिचा पण गळा खूप सुजल्या सारखा दिसायचा. यावर खरं तर उपाय आहे, औषधं घेतली की कंट्रोल मधे रहातो रोग. नाहीतर किडनीचा त्रास पण होऊ शकतो असे म्हणतात.

 8. महेंद्र….. बरं झालं तू हे लिहिलंस…त्या निमित्ताने टेस्ट करुन घ्यायची आठवण झाली 🙂

  By the way, तू शब्दबंध मधे भाग घेणार आहेस ना……. मग तुझा बरोबर स्काइप आय डी दे. कारण तू जो दिला आहेस तो चुकीचा आहे. सध्या आम्ही स्काइप वर टेस्टिंग करतो आहोत. एक-दोनदा येऊन डोकावून जा….म्हणजे काही तांत्रिक अडचणी असतील तर सोडवता येतील.

  • केवळ् त्या कॅंपेन मुळे समजलं मला . स्काईपचं आज भाग्यश्री, देवकाका, जयंत कुलकर्णी, वगैरे सोबत कॉन्फरन्स कॉल ट्राय केला होता सकाळी. व्यवस्थित जमलं आता. शब्दबंधला अडचण येऊ नये आता . 🙂

 9. Rajeev says:

  म्ह्यया वाल्ल्या बाईले भी थायराईड नीघाल वो की बाबू,
  गया वर दून रेषा दीसून राहील्याकी सम जायच…
  जून्या कायचे बूढे, बूढ्या बायांना पायीच्या दीसात आयाम कयाला सांगायच्या,
  आज काय च्या लोकाय ला साण्गूनभी कयत नाही ,
  अंगा वरून जातायले शक्ती भी जाते…नीट नेतके खात भी नायीत…

  • अरे बापरे.. खरं की काय? मग काय औषधं सुरु केली असतील नां? वजन वाढले की सरळ डायटींग सुरु करतात , पण डॉक्टरला दाखवायला हवं..

 10. ngadre says:

  the decision for such tests should be done by our Doctor based on symptoms.Who knows that it’s thyroid? There are so many glands.pitutary,adrenal etc that may go wrong and produce similar or mixed symptoms. self assessment kinva promotional activities ni kiti screening karnaar? Better rely on your family physician to suggest tests.

  • नचिकेत
   डॉक्टर ला दाखवणे कधीही चांगलं. नुसते चेक करायला काही हरकत नाही असे वाटते.

   • ngadre says:

    Aho, right order of events should be
    1.kahitari tras hone.
    2.symptoms disane
    3.Dr. Kade jaane.
    4.Tyane detailed history and symptoms pahane
    5.Avashyak tar ek kinva anek ‘yogy ani ekmekana poorak’ ashach test karayala sangane.
    6.dr.ne result interpret karane.

    Sadhya ase chaloo ahe.

    1.Free camp kinva discounted camp vale marketing people yene
    2.’awareness’ mhanoon microevel chi bhiti pasaravane
    3.apan ugich svast kinva free ahe mhanoon svatha ani bayko,aai babaanchi test karoon ghene.
    4.result normal mhanoon khush hone.

    Chukicha nahi vatat kram tumhala?

    Tya company la havya tya test karnyapeksha tumhala garjechya test ka karu nayet? Only when you are unwell..aso..

    • नचिकेत
     मुद्दा अगदी योग्य आहे. सिक्वेन्स तुम्ही दिला तो एकदम बरोबर आहे. पण इथे चक्क फुकट तपासणी होते म्हणुन सगळ्यांनी करुन घेतली.

     वर्ल्ड थायरॉईड डेचं निमित्य होतं म्हणून थायरॉइड साठी चेक केलं असावं. हे असे कॅंप्स असावे की नाही हा प्रश्न वेगळा. पण या कॅंप साठी जवळपास नुसत्या ब्लॅड टॆस्टींग साठीच तिन लाख रुपये खर्च केलेत त्यांनी.

     कालच माझा रिपोर्ट आला. अर्थात नॉर्मल आहे. पण आमच्या ऑफिसमधल्या एकीचा रिपोर्ट लिमिटपेक्षा तिप्पट जास्त होता. अजूनही बऱ्याच लोकांचे पॉझिटीव्ह आलंय थायरॉइड्स.

     ही पण माहिती मिळाली की त्या कंपनीचे एक प्रॉडक्ट आहेच थायरॉइड वर. एकदा गोळी घेणं सुरु केलं की थायरॉइड कंट्रोल मधे येतो 🙂

     • ngadre says:

      sorry to stretch the point so far. You know what I mean to say. Not really against what you have said.It’s just that jagaat kahihi ‘fukat’ asata ka? Except for god’s given good health..

      Aso.

 11. Pingback: काळजी घ्या.. | indiarrs.net Featured blogs from INDIA.

 12. ngadre says:

  ‘kaalji ghya’ ani ‘kalji kara’ madhe thin line ahe. Ti ya tests ni cross hote..

 13. harshal says:

  hi ,

  my wife has done her thyroid test , it is ok , doctor report is it is positive,
  pl give a reference of thyroid doctor in nasik

  regards

  harshal
  nsk

 14. Give in Detail,,,,,,,,,,Information of thyroid

  • भारती
   ब्लॉग वर स्वागत, मी मेडीकल साईडचा नाही, त्यामुळे जास्त काही सांगू शकणार नाही.

 15. mahiti changali aahe. thyroid vishayi ajun mahiti haviy. karan, mala thyroid aahe. to ka hoto? tyache karan, upay sanga.Please………….

 16. sachin says:

  sir sorry but want say somethings,
  Thyroid is one of organs in our body,
  When it’s functions lower or becomes higher is presented as disease.

 17. Varsha says:

  khup chan mahiti dilit apan mahendra.

  mala pan थायरॉईड ahe, pan baryach goshati aaj navyane kalye.

  Really
  Thanks

 18. MAYA says:

  mala pan थायरॉईड ahe, pan baryach goshati aaj navyane kalye.mala aaee vhaychai kai karu

  • यावर औषधं आहेत. काळजी करू नका. पण डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
   ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार.

 19. PRIYANKA GALA says:

  thx mahendra kup changli informatiom milali. mala pan thyroid ahe pan upay suchat nahi mazi kes kup complicated ahe. mala tuzi help havi ahe regarding thyroid treatment mazi thyroid level 1000 vrun ata kuthe levela yete mi homeopathy pan treatment chalu keli ahe but is it fine my age 24 i m married so pls tell me wht can do
  REALLY THANKS FOR GIVING INFORMATION

  • प्रियंका
   ब्लॉग वर स्वागत,
   मी स्वतः इंजिनिअर आहे, डॉक्टर नाही- त्यामुळे एखाद्या चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेतलेला जास्त योग्य. थायरॉइड कंट्रोल मधे येऊ शकते, आणि नंतर तसे पुर्ण पणे नाहीसे पण होऊ शकते हे नक्की. होमिओ पॅथी वगैरे प्रकारांशी दुरान्वये पण संबंध नाही, म्हणून काही सांगू शकणार नाही. पण तू एखाद्या चांगल्या डॉक्टरला भेटून विचार आणि मगच काय तो निर्णय घे. औषधं कुठलीही असली तरी ती नियमीत घेणे महत्त्वाचे. असा एक विनाकारण गैरसमज आहे की ऍलोपथी फार वाईट – पण मला वाटतं तसं नाही.
   पुन्हा सांगतो, चांगला स्पेशॅलिस्ट डॉकटरला भेटून औषधं घे.

 20. geetapawar says:

  chan mahiti aahe sir. thanku so much……………

 21. Vilas Nichit says:

  Yachi Pathee sanga na plz reply me……

 22. Vilas Nichit says:

  Yachi Pathee sanga na dr

  • विलास,
   मी इंजिनिअर आहे, डॉक्टर नाही, या साठी पथ्य वगैरे कुठली आहेत ते एखादा डॉक्टरच सांगू शकेल.

 23. Anand Marewar says:

  Dear all frnds…Mala jar hi mahiti agodar bhetli asti tar yacha nakki fayda zala asta karan mala aaj Thyroid cancer aahe..so frnds jar tumha konalahi thyroid chi shanka asel tar lavkar check up karun ghyave…aaj majhi treatment TATA MEMORIAL HOSPT. MUMBAI yethe chalu aahe aani mi agdi bara aahe.. and ask me whtever u have question abt it-
  anandmarewar@rediffmail.com
  and thnx mahendra for this information

  • आनंद,
   ब्लॉग वर स्वागत. लवकर बरे व्हा. कुठल्याही प्रकारच्या रोगातून बरे होण्यासाठी मनःशक्ती जास्त महत्वाची असते. मी एक पोस्ट लिहिली आहे लिसा रे वर . ” तिचा ब्लॉग नावाची .ती पण वाचा.

 24. balaji kene says:

  thoyroidcha napusankteshi sambandha ahae ka

  • मला नक्की माहिती नाही, कारण मी स्वतः काही डॉक्टर नाही. मला वाटतं की एखद्या डॉक्टरला विचारणे जास्त योग्य ठरेल.

 25. SANTOSH WADEKAR says:

  Dear sir
  Mala geli 10 Varsha pasun thairod aahe goli roj gheto pan goli nahe ghetli ke khup trass hoto ya var kaymcha upay nahe ka.
  khup susti aalya sarkhi vate. mala ya var upay kiva changle doctor sanga sir pls

  • संतोष
   मी या विषयातला तज्ञ नाही, पण हा आजार रिकव्हरेबल आहे असे ऐकले आहे. यावर कायमचा उपाय आहे की नाही ते माहिती नाही. पण माझ्या माहिती प्रमाणे नियमीत औषध घेतल्यावर हा आजार आटॊक्यात येतो.

   • santoshg Wadekar says:

    Pan Mala Khup Allass yeto kahe kam hot nahe vajan khup vadtay me roj goli gheto pan Dr Mhantat ke life time sathi goli ghyvi lagel.
    thairod Made khanya var kahe pathhe aahe ka mala thambaku khychi savay aahe.

 26. lande sandeep says:

  Thanks……..::-
  :

 27. Prachiti says:

  maz hemmi thyroid cha operation zal ahe 2009 madhe ani maz lagna 2012 madhe zal ahe ,tar mi pregnant rahu shakte ka ? karan throid patient pregnant rahu shakat nahi ashi bhiti nirman zali ahe ,mi gyn kade pan geli hoti tevha tyani blood check karayala sangital hota pan blood madhla report normal hota ,tar hya var kay upay ahe ka ? I am waiting for your answer please

  • प्राची, प्रेग्नन्सी शक्य आहे. फक्त डॉक्टरच्या नजरेखाली रहावे लागेल . तुमच्या गायनॅकला संपर्कात ठेवा. प्रतिक्रियेसाठी आभार आणि शुभेच्छा.

  • Anand says:

   Jar Radiation Therapy Chalu asel tar pregnency chya agodar dr. cha salla ghene aavshyak aahe..

 28. sneha says:

  mla pn thyroid ahe maja age ata 23 ahe gelya 9 varsha pasun mla thyroid ahe pn ani ayurvedic homeopathy alopathy sagli treatment chalu ahe pn kahi farak vatat nahi yamadhe mla kahi tras hot nahi fkt dole khup mothe distat ani tyacha tras mhnje lgn tharat nahi maje mumy papa khup tenshion ghetat mg mla hi tenshion yet yavar ky upay ahe plz. rply

 29. against hypothairoid information required ag snacks lunch dinner etc

 30. aslam says:

  I m suffering in thyroid standard limit is 2.6 to 4.5 but my limit is 12.7 kindly provide me reason for that, symptoms, how can nill this.plz send or give infrmn.

  • अस्लम
   मला खरोखरच काही माहिती नाही, तुम्ही योग्य तज्ञ डॉक्टरचे मार्गदर्शन घ्यावे ही विनंती.

 31. Priyanka patil says:

  Hi mi priyanka
  2mahimyan purvi kalal Mala thairoid ahe te Yat goli chalu kelyaver vasan niyntranat rahat ka vadhat jat

 32. aarti says:

  hi, I am Aarti. affected by hypothoroid from last 2 years. but daily one tablet at morning help me to make it maintain. You all should get check up twice in year. Its my own experience

 33. Sanjay Patil says:

  Appreciable work…well done

 34. Visual Maindargikar says:

  Thyroid kashamule hoto te sanga

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s