वात्रट मुलाची कथा..

एक तरूण आणि एक तरूणी.

दोघंही एकाच कॉलेजची.तो फायनल इयर ला तर ती दुसऱ्या वर्षाला. तो साधारण परिस्थिती मधला, बॅंक लोन वर शिकणारा,   दिसायला पण ठीक ठाक- म्हणजे सलमान सारखी बॉडी नाही, किंवा शाहरुख सारखा प्रेझेन्स नाही, तरी पण सगळ्या गृप मधे सगळ्यांच्याच  जवळचा जीवभावाचा सखा .

इतकं जरी असलं, तरीही ’ती’ म्हणजे एका चांगल्या कंपनीत उच्च पदावर काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याची मुलगी, पैसा वगैरे खूप  नाही, पण अगदी कमी पण नाही.जे मागितलं ते बाबा आणून देतात, पैशाची कमतरता म्हणजे काय ते माहिती नाही त्याच्या पासून फटकूनच वागते.

त्याची आणि तिची नेहेमीच एकमेकांची टांग खेचणं सुरु असतं. त्याला ती आवडते, तिला पण तो (बहुतेक) आवडतो, पण ती मात्र ही गोष्ट  मान्य करत नाही कधीच.कदाचित त्याची लेडी किलर म्हणून प्रसिद्धी असेल की ती नेहेमी दूर रहायचा प्रयत्न करते त्याच्या पासून.ट्रेकिंग  गृप मधे बरेचदा बरोबर ट्रेक केलेला. तेंव्हा तिच्या लक्षात आलं की तो तिच्यावर फिदा आहे, पण तिने मात्र त्याला स्वतःच्या मनात काय आहे याचा ताकास तूर लागु दिलेला नाही.

दोघेही नेहेमीच एकत्र भेटत असतात, कोणी समोर नसलं ,की त्या दोघांची नोंक झोंक सुरु असते.  .दोघांनाही माहिती आहे  का- हो कदाचित असावं,  की दे लव्ह इच अदर .. बट डोन्ट वॉंट टू ऍग्री.

प्रसंग -१

ती एकटीच बसलेली आहे कॅफेटेरियात, मित्र मैत्रिणींची वाट पहात. ऑफ पिरियड मधे आज इतर मुलं सुटलेले प्रॅक्टीकल करायला गेले होते, पण तिला काहीच काम नव्हतं. तो समोरून येतो. समोरासमोर आल्यावर एकमेकांना विश करणे आलेच. ती च्या चेहेऱ्यावर हसू आलं- पण क्षणभरच!! त्याने एकदम काळजीयुक्त चेहेरा केला होता आणि एकदम आश्चर्याने तिच्या कडे पाहिले.

आता मात्र ती थोडी गोंधळली. काय झालं असेल? का म्हणून असा पहातोय विचित्र नजरेने?  ती स्वतः बद्दल उगाच कॉन्शस झाली. नजरेनेच विचारले?

तो म्हणाला, तुझ्या केसात काही तरी अडकलय.. थांब जरा… आणि त्याने हाताने तिच्या केसावरून हात फिरवला- तिच्या लक्षात आला त्याचा वात्रटपणा. तिला हसू आलं आणि त्याचा कावा लक्षात  आला, पण   तेवढ्यात त्याने आपला ’कार्यभाग ’ साधला होता.

त्याने पटकन हात समोर केला, आणि म्हणाला, दे शंभर रुपये?

कसले?

तुझे केस स्वच्छ करण्याचे. तुला काय वाटले ही  अशी लोकांना स्वच्छ करण्याची  सगळी घाणेरडी कामं मी  काय फुकट करतो की काय? चांगला इंजिनिअर आहे, सगळ्यांकडून तर पाचशे रुपये घेतो स्वच्छ करण्याचे, तू मैत्रीण म्हणून शंभरच मागितले..

तिचा चेहेरा रागाने लालबुंद झाला,

ती आता रिऍक्ट करणार तेवढ्यातच त्याने तिला म्हंटले, बरं ते जाऊ दे, तु इतकी सुंदर आहेस म्हणुन , आणि एक स्टूडंट आहेस म्हणून,  चल तुला   सूट देतो, फक्त एक वडा पाव -पेप्सी  मागव.. सोडले शंभर रुपये तुझे . इतका इंजिनिअर झाडूवाला मिळतो का इतक्या कमी किमतीत?

ती लाजली, आणि त्याला मारायला धावली, समोरच्या टेबलवरचा ग्लास पडला पाणी सांडलं पण तिकडे लक्ष नव्हतं दोघांचंही.  पुस्तकं  भिजताहेत. नशीब, तेवढ्यात इतर मित्र मंडळी पण आली, आणि दोघेही हसत सुटले.

प्रसंग २:-
तो बसलाय मित्रांसोबत गप्पा मारत. ती अजून आलेली नाही. विषय आहे, की मुली लॉजिकली विचार करतात की इमोशनली. त्याचं म्हणणं होतं की त्या लॉजिकली विचार करुच शकत नाहीत. त्यांच्या मेंदूमधला इमोशनल कोष कोणी  हळूवार पणे  स्पर्श केला तर त्यांचं लॉजिक पुर्ण पणे वाहून जातं . अगदी साधारण दिसणाऱ्या मुलाच्या प्रेमात एखादी सुंदर मुलगी पडलेली पाहिली की हा प्रश्न नेहेमीच पडतो – की तिने काय पाहिलं असेल ह्या माणसात?  ही कॉमेंट तर बरेचदा ऐकू येते अशा परिस्थितीत-” बंदर के हाथ मे अद्रक”!! 🙂

त्याचं हे नक्की प्रिन्सिपल होतं की मुली प्रेमात पडतात ते आपोआप, त्यांच्या इच्छे विरुद्ध! सगळं काही आपोआप होत असतं . ठरवून काही प्रेम होत नसतं हे मात्र नक्की. एखाद्या मुलीने लॉजिकली विचार करुन कितीही टाळलं तरीही इमोशनल माईंड चा कॉर्ड जर स्पर्शला गेला असेल तर … नो वन कॅन स्टॉप इट!!

गृप मधल्या मुलींचं म्हणणं होतं की आजकाल सगळ्या सुशिक्षित आहेत, म्हणून अर्थातच लॉजिकली विचार करतात.  बराच वेळ अशीच चर्चा सुरु होती आणि लवकरच सगळे निघून गेले पिरियडला.

प्रसंग -३

पुन्हा कॅंटीन. ती एकटीच बसलेली आहे. तो समोरून येतो. परवाची त्याच्यामुळे झालेली एम्ब्रॅसमेंट ती विसरलेली नव्हती. तिने त्याच्याकडे अगदी अनोळखी नजरेने पाहिले.

हाय!  कसली क्युट दिसते आहेस गं तू? पण जाम भिती वाटते बरं का मला अशा सुंदर मुलींची.

तिला खूप बरं वाटलं, कोणी सौंदर्याची  तारीफ केली की बरं वाटतंच ना.तिच्या चेहेऱ्यावर पुन्हा एक मोठं प्रश्न चिन्ह!! हातातल्या सेल फोनशी चाळा करत बसली होती ती.

बोलायचं नाही हे ठरवलं होतं, पण रहावलं नाही.. शेवटी ती म्हणालीच- कां बर? कसली भिती वाटते?

त्याचं उत्तर अनपेक्षित होतं, सगळ्या सुंदर मुली बिनडॊक असतात, आणि ते त्यांना पक्कं माहिती असतं, म्हणून तो ’मेंदूचा रिकामापणा’   त्या आपल्या सौंदर्याने झा्कून टाकण्याचा प्रयत्न करतात.

आता मात्र ती खूप चिडली होती. स्वतःला समजतो तरी काय हा? इतकी स्वतःबद्दलची घमेंड आहे तर कशाला येतो नेहेमी बोलायला, म्हणे सुंदर मुली बिनडोक असतात. मूर्ख कुठला. याला काही समजतं का? नेहेमी निळ्या जिन्सवर हिरवा शर्ट घालणारा बावळट माणूस !! बस्स इतक्याच शिव्या येत असतात तिला.. स्वतःचाच संताप येतो. धड शिव्या पण देता येत नाहीत आपल्याला ?? काय आयुष्य आहे आपलं?

’ती म्हणाली गेट लॉस्ट .. मला अजिबात बोलायचे नाही तुझ्याशी’.

’तू नेहेमीच अशी रुड बोलत असते का लोकांशी? लहानपणापासून तुला कोणी शिकवलेलं नाही वाटतं की लोकांशी कसं बोलावं ते”

’एक्सक्युज मी… काय म्हणालास??’

’सॉरी ..तू यु आर नॉट ऑफ माय टाइप’.

’गेट लॉस्ट.. आय डॊन्ट लाइक यु, ओव्हरस्मार्ट रॅट.’.

’मला माहिती आहे मुली नेहेमीच जर त्यांच्या मनात नाही असेल तर  हो  आणि हो असेल तर नाही  म्हणतात.’ हे असं नेहेमीच होतं मला माहिती आहे,तुला माझ्यामधे इंट्रेस्ट आहे म्हणून.

तिचा संताप शिगेला पोहोचला होता. काय करावे सुचत नव्हते. रागाने लाल झाली होती ती. स्वतःचेच केस उपटून घ्यायचे बाकी ठेवले होते.

तू माझ्या मागे का लागला आहेस. मला माहीत  आहे की तू काय ट्राय  करतो आहेस ते- माझ्यावर चालणार नाही.

ओह..खरंच?? इज दॅट सो?? यु आर सो अट्रॅक्टेड टुवर्ड्स मी, दॅट यु आर ट्राइंग टु फिगर आउट माय माइंड.. ग्रेट!!

मला माहिती आहे, तुला मी आवडते, म्हणुन तू असे नेहेमीच मला छळत असतोस.

“कसला  गोड गैरसमज आहे तुझा!”

तिच्या मनात त्याच्या बद्दल इतका राग आला होता पण काहीच करता येत नव्हतं. कसा आहे हा ? इतका आढ्यताखोर माणुस पाहिला नाही कधी., इतके मित्र आहेत, पण असं बोलणारा एकही नाही. सगळे कसे गोंडा घोळत असतात समोर समोर. हाच एक वेगळा आहे जरा. लॉजिकली आवडायला नको हा आपल्याला, पण इतकी भांडणं, हॉट डिस्कशन्स होऊन पण याच्यासोबत का बरं वाटत असेल आपल्याला? ती विचार करत बसली.

तिच्या चेहेऱ्यावरचे रागीट भाव अचानक स्मित हास्यात बदलले, तो म्हणाला , तुझ्या बद्दल मला एक मस्त गोष्ट समजली आहे.
तिने ठरवले असते की ह्याच्या ट्रॅप मधे अडकायचे नाही. तरी पण तिला विचारल्या शिवाय रहावत नाही.. ती  म्हणाली काय?
तो म्हणाला- ही योग्य वेळ नाही, नंतर सांगीन कधीतरी ..

तेवढ्यात समोरून दोन मित्र येऊन टेबलवर जॉइन झाले, आणि अर्थातच ह्यांच्या गप्पा बंद पडल्या.

प्रसंग ४

ती तिच्या मैत्रिणी बरोबर बसलेली आहे. कॅन्टीन मधे समोर कोल्डड्रिंक ची बाटली आहे. दोघी अगदी जिवश्च कंठश्च मैत्रिणी. मैत्रिणीला त्याच्या बद्दल सांगते ती. कसा सारखा त्रास देत असतो ते.

मग त्याच्याशी बोलणं का बंद करत नाहीस. अव्हॉइड कर ना त्याला.

अगं पण त्याची कंपनी बरी वाटते ग.. नाही कसं म्हणू त्याला?

ओह.. म्हणजे तू प्रेमात पडली आहेस तर..

मी?? छेः, अशक्य!! प्रेमात पडणं तर अशक्यच! अगदी जगातला शेवटला पुरुष जरी असला, तरी पण ह्याच्याशी लग्न? इम्पॉसिबल!!

मैत्रीण म्हणाली, अगं बहुतेक असंच असावं. विचार कर. पण मी त्याला कसं विचारू? प्रत्येकच गोष्ट अगदी कॅज्युअली घेतो तो.

साधी गोष्ट – जस्ट क्रिएट जेलसी.. ऍंड ही विल कम आउट ऑफ द क्लोझेट

***
प्रसंग – ५
कॅंटीन , सगळे मित्र मैत्रिणी बसलेले आहेत. समोर एक पेढ्यांचा डबा उघडा ठेवलाय. तेवढ्यात तो येतो, आणि समोर पेढे बघून एक पेढा उचलतो. कोणाचे पेढे रे?
लग्न ठरलंय.. एक मित्र म्हणाला.

कोणाचं?

’ति’चं..

काय?? कोण आहे तो तिच्याशी लग्न करतोय? पण चेहेरा पडला होता खर्रकन.

तिच्याकडे पाहिले. चेहेऱ्यावरचा खट्याळपणा लक्षात आला. त्याला काहीच कळले नाही. हातातला पेढा हाताच राहिला.

तेवढ्यात तिची मैत्रीण उठली, आणि म्हणाली, अरे ’ती’चे नाही, माझ्या ताईचे ठरले आहे लग्नं, खा पेढा.. आणि त्याचा जीव भांड्यात पडला एकदम.

त्याला आता मात्र रहावलं नाही. लक्षात आलं की आता वेळ केला तर वेळ निघून जाईल. सगळ्यांसमोर तिला विचारले, बघ, माझं पीजी पुर्ण झालंय. कॅंपस मधे सिलेक्शन पण झालंय एका कंपनीत. पॅकेज पण बरं आहे. तू माझ्याशी लग्न करशिल??

ती काहीच बोलली नाही, फक्त हसली, विथ द अशुरन्स टु सपोर्ट हिम  लाइफलॉंग.लग्नानंतर त्याने पुर्वी दिलेल्या त्रासाचा बदला तिने घेतला की —- हे त्या दोघांनाच  माहिती!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in साहित्य... and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

238 Responses to वात्रट मुलाची कथा..

 1. ग्रेटच. एक छोटीशी लव स्टोरी मस्त होती.. आवडेश.

 2. हे हे शॉर्ट अँड स्वीट..मस्त

 3. सागर says:

  काका
  खूप खूप आवडेश….
  “एखाद्या मुलीने लॉजिकली विचार करुन कितीही टाळलं तरीही इमोशनल माईंड चा कॉर्ड जर स्पर्शला गेला असेल तर … नो वन कॅन स्टॉप इट!”

  हे मात्र १००% खर….

  • सागर
   का रे बाबा, अनुभव वगैरे घेतलास की काय?
   इतका काँन्फिडंटली बोलतो आहेस ते.. 🙂

 4. वात्रट मुलाची प्रेमाची गोष्ट क्युट आहे.
  एक मात्र खरं, प्रेमविवाह केलेली काही जोडपी पाहिली की वाटते, ह्याने हिच्यात किंवा हिने ह्याच्यात एव्हढे काय पाहिले?

 5. रुपकाच्या माध्यमातून मांडलेलं आत्मचरित्र आवडलं.

 6. सहज, सहज म्हणून चांगलं लिहिता की!

 7. Vidyadhar says:

  जबरदस्त काका.
  होमपीचवर तुमच्यासारखी फटकेबाजी कोणीच करू शकत नाही..;)

 8. सीताराम वाळके says:

  भारी!! पण असला वात्रटपणा करण्याचा चान्स गेला की आमचा. 😦

 9. mahesh mohan shinde says:

  agadi sundar aahe . khar manje muli evadha vichar karat nahit mulanbaddal…………. taripan vachata vachata kadhi sampli te lakshatach aale nahi……………….

  • महेश
   तीच तर खरी गोम आहे या सगळ्यातली. म्हणुन तर अगदी ऑर्डीनरी मुलांसोबत चागल्या मुली दिसतात फिरतांना. थोडा स्मार्टनेस हवा बस!

 10. सचिन says:

  काका, बहुमोल मार्गदर्शन.

  कथा अगदी फर्मास जमली आहे.

  • सचीन
   उपयोग करुन घे मार्गदर्शनाचा. आजच्या देकां बझ मधे एक लिंक दिलेली आहे मुली कशा पटवाव्या या पोस्टची. ती पण वाच एकदा.

 11. सागर says:

  काका “वात्रट मुलाची कथा” झक्कास जमली…
  “बंदर के हाथ मे अद्रक” खूप वेळेस येतो हा अनुभव……

  • सागर

   अरे नेहेमीच येतो. म्हणुनच आपल्याला्ही अद्रकचा तुकडा मिळेल याची आशा वाटते.

 12. mau says:

  अरे व्वा !! सहीच की…”जाने तु जाने ना “सारखीच छोटीच पण सुंदर कथा !!!!मस्तच !!!!!!

 13. महेंद्रजी… ’त्या’च्यात आम्ही तुम्हालाच बघतो आहे… 🙂
  एकदम आवडली…. खुपच मस्त….!!!

 14. शार्दूल says:

  कसली मजा !
  जेव्हा कसोटीचे प्रसंग येतात तेव्हा
  हेच तर दिवस आयुष्यभराच्या वाटचालीसाठी सगळं बळ देत असतील..

 15. Rajeev says:

  अरे, तूला मी सांगीतल होत ना ?
  पण एकदा तरी डोक्टरला दाखव !!
  आज काल तू गुडघ्यांची काळजी घेत नाहीस….

 16. ‘राजाभाऊं’ ची ते ‘एक वात्रट मुलगा’ असतानाची गोष्ट आवडली !!! 😉

 17. jyoti says:

  “बंदर के हाथ मे अद्रक”…………college madhye baryach veles group madhye yavarun vaad hi hoyache……..ki kharach kay pahil asel ekmekat……..mastach kaka

  • ज्योत्ती
   तशी वेळ हमखास येते बघ.. 🙂 आणि ज्याच्यावर येते त्याला बंदर म्हंटलं तरीही राग येत नसतो, तर उलट बरं वाटतं. ही एकच अशी शिवी असावी, की जी दिल्यावर पण लोक रागावत नाहीत.

 18. mazejag says:

  एक दम झकास, सहा वर्षांपूर्वीचा इतिहास झरकन डोळ्यासमोरून गेला……

 19. bhaanasa says:

  मस्तच. छान जमलीये ’वात्रट मुलाची गोष्ट’ ( तो तूच की काय…. 😀 )

 20. Pingback: वात्रट मुलाची कथा.. | indiarrs.net Featured blogs from INDIA.

 21. ngadre says:

  hee nakkich tumchi svatha chi true story ahe. Hoy na?

  Tumhich te ladykiller asanaar college madhale.

  Aho kiti all rounder lekhak ahat tumhi. Sagalya chords touch jhalya amchya.

  Agadi college madhe neun ubhe kelet.

  Thanks..halke fulke ani ekdum sweet..

  • नचिकेत
   अरे मी नाही. असंच काहीतरी लिहिलं बघ.. थोडे फार स्वतःचे पण अनुभव असतातच प्रत्येकाचे लिहितांना .. पण बरंच काल्पनिक पण असतं

 22. Sarika says:

  काका,

  मस्त आहे कथा. अजुन लिहीत रहा…

  • सारिका
   वरची माझ्या मावसभावाची कॉमेंट ( राजीवची) वाचली असेलच.. मला म्हणतोय की गुडघे तपासून घे 🙂

 23. महेश says:

  प्रेमाची गोष्ट सुंदर व छान आहे, प्रेम असच असत

 24. sahajach says:

  ‘राजाभाऊं’ ची ते ‘एक वात्रट मुलगा’ असतानाची गोष्ट आवडली !!! 😉
  +१…..

 25. sonalw says:

  surprising. Wegla prakar chaan jamlay.

  • सोनल,
   खरं सांगायचं तर हे एका तिन चार भागाच्या कथेचं मटेरिअल आहे. लिहायचा कंटाळा आला इतकी मोठी कथा, म्हणुन हा प्रकार करुन बघितला. 🙂

 26. ऋषिकेश says:

  तुमचा एक नवीन चाहता:
  छान, सुंदर आणि सहज कथा(कि सत्यकथा ?) आहे.
  एकूणच कहाणी स्वतः वर आधारलेली असावी असे वाचताना जाणवते…
  अजून नवीन कथा/किस्से वाचायला आवडतील.
  ~ ऋषिकेश

  • ऋषिकेश
   ब्लॉग वर स्वागत.. आणि प्रतिक्रियेसाठी आभार. जरी एखादी गोष्ट काल्पनिक लिहिली तरीही लिहितांना बरेचदा कळत-नकळत स्वतःशी निगडीत गोष्टी लिहिल्या जातात. असो.. येत रहा.

 27. मी इथे प्रतिक्रिया दिली होती, ती इथे दिसत नाही. असो. कथा छान आहे.

 28. justtypeamruta says:

  एक छोटीशी love स्टोरी, Short न sweet .. मस्त आहे, आयुष्यभर अशीच स्वीट राहिली म्हणजे मिळवलं….

  • अमृता
   ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेकरता आभार. 🙂 बहुतेक सुरुवात तर छानच असते, म्हणुन तर सिनेमामधे पण त्यांचं लग्नं होई पर्यंतच दाखवतात पुढचं नाही.

   • म्हणुन तर सिनेमामधे पण त्यांचं लग्नं होई पर्यंतच दाखवतात पुढचं नाही.>>>> 😉
    अगदी अगदी.. एक विनोद आठवला..
    लग्नानंतर पहिले सहा महिने तो बोलतो ती मन लावून ऐकते (इथे सहा महिने हा कालावधी कमी होवू शकतो), पुढची दोन-तीन वर्षे… ती बोलते आणि त्याला ऐकावे लागते….., नंतर ते दोघे मिळून बोलतात आणि शेजारी पाजारी ऐकतात… अगदी मन लावून 😉

    बाकी महेंद्रदादा, हे खरेच किमान चार भागाच्या कथेचे मटेरियल आहे.
    धमाल लिहीलय, आवडलं. 🙂

    • विशाल
     🙂 खरंय अगदी!!
     मला खरं तर जास्त लिहायचा कंटाळा आला होता, म्हणुन हा असा प्रकार ट्राय केला. पुर्वी पण एकदा कथा लिहायला घेतली होती, पण नंतर शेवटी चक्क गुंडाळली , कंटाळा आला म्हणून. 🙂

   • ayachit vishwambhar shankar says:

    the best

 29. Santosh says:

  Hmmmmmmmmmmmm…..

  Kaaaassssssssshhhhhhhhhh isa watrat pana hum bhi kar sakte…. Kaaash 🙂

  Amazing ahe he…. Sir!!! Maja ali wachun 🙂

  • जरूर.. अगदी ह्यात दिलेली ट्रिक वापरून पहा. शंभरटक्के यश मिळेल याची खात्री ( प्रुव्हन ट्रिक्स आहेत या)

 30. Mahadeo divate says:

  good story

 31. Chintamani says:

  Shaj lihile pan khup chan ahe he !!! mast yar!!!

 32. आल्हाद alias Alhad says:

  वा वा… छान छान!

 33. हेत्तीच्या… शिर्षकावरून काही वेगळंच… अंदर निराळंच!!

  (गोष्ट चांगली वाटली! शेवटी, नशीबाच्या गोष्टी म्हणा!!! 🙂 )

 34. vind says:

  grt short n sweet katha tashi vatratach aahe grt mi tumcha shupa vachak aahe aaj lihavs vatal tumcha purn blog kadhla vachun aaj grt aahe

  • मनःपुर्वक आभार. तुमच्या सारख्यांच्या प्रतिक्रियांमुळेच लिहिण्याचा उत्साह टिकुन आहे अजून. आभार.

 35. gauri says:

  sahii..chan chotishi khupach precise katha….ani main tar happy ending asnari love story.. 🙂

 36. gauri says:

  chan aahe katha….short and sweet… main tar happy ending asnari love story…te mala jasta avadla 🙂

 37. suraj says:

  wa kya goshta hai !

 38. sushma says:

  chotisi love story……short but sweet……….apratim

 39. rajshree says:

  wow khup avadli mala story……..i dnt knw tumi kon ahat bt me fan jale tumchya writing chi….ajun ekdi lov story publish kara…..gr8…..

 40. मस्त. आज खास तुमच्या ब्लॉग वरच्या राहिलेल्या पोस्ट वाचतोय. शीर्षक पाहून इथूनच सुरूवात केली.
  प्रतिक्रियेबद्दल म्हणाल तर – ‘राजाभाऊं’ ची ते ‘एक वात्रट मुलगा’ असतानाची गोष्ट आवडली !!! 😉 + +

 41. mohan gurav says:

  I like your story. you write other love story,good story, no sex story you understand. BEST OF LUK

  • मोहन
   प्रतीक्रियेसाठी आभार. अहो जे काही मनात येईल ते लिहितो. मुद्दाम ठरवून काहीच लिहित नाही..

 42. suryakant says:

  i have realy like your story

 43. revansidhu says:

  very good , i like it
  keep continue

 44. jyotsna salunke says:

  chhan aahe pan nehmi mulgach pudhe asto nahi ka

  • ज्योत्स्ना..
   माझा अनूभव तर तोच आहे .. 🙂 मुली स्वभावतःच लाजाळू असतात, आणि जो पर्यंत एखादा मुलगा समोर येऊन प्रपोज करत नाही तो पर्यंत त्या स्वतः काही आपणहॊऊन प्रपोज करणार नाहीत.

 45. joshu says:

  aani mulgila nehmich tyachi tingal aawdat ast

 46. sandip says:

  sundar katha ahe. jyane collegemadhe gela nahi tyala sudha kalel ashi ahe

 47. abhijeet sl says:

  a sweet love story, khupach chan ahe.
  story vachun manatalya athvani jagya jhalya. thanks

 48. I like !!!!! story was very short & sweet. your imagination is so nice.

 49. SURESH TALEKAR says:

  kahani khup chan mandli mala kadhi bhetalach nahi pan majhi colege life kashi tumhala samajli. ek phakta shevat asa jhala nahi khant rudhayachya kopryat athavn mhanun rahili.

  • सुरेश
   ब्लॉग वर स्वागत.. आणि प्रतिक्रियेसाठी आभार.
   सगळ्यांचच कॉलेजलाइफ जवळपास सारखंच असतं.:)

   • SURESH TALEKAR says:

    sahaj suchal mhanun tumhi lihal nasel karan ase lihanyasathi anubhavch asava lagato. pan khare sanga ha tumch kitva anubhav ahe.

    • थोडा फार अनुभव, थोडं काल्पनिक .. असं काहीतरी असते लिखाणात. जे काही लिहिलं आहे, त्यातलं काही प्रमाणात तरी अनुभवलं असतेच!

 50. GURUNATH says:

  hmmmm………….. nilya jeans var popti shirt!!!!!, this wannabe IPS has sniffed out something!!!!, some link between fashion and vatrat mulachi gosht!!!!…. 😀

  • 🙂 या पुढे लिहीतांना थोडी जास्त काळजी घ्यायला हवी.. 🙂 जवळपास ५३७ लेख लिहून झाले आहेत, त्यामुळे आधी काय लिहिलंय ते कुठे लक्षात रहातं?? मग असा गोंधळ होतो.. 😀

 51. GURUNATH says:

  ek nishkarsh matr mi kadhu shakato………… nilya jeans var popti shirt he tumache college kalin vastr tumhi ajunahi happy go lucky aslyache sign manata, kinva te ek fashion blunder aahe he tumhi kabool kele ahet!!!

 52. Kanchan says:

  Ase vatate hi story tumchich asavi………….. chorala pakdale ki to boltoch me to navhee….

 53. Shashi says:

  its lai bhari

 54. jori swapnil dinkar says:

  sundar…….
  agdi javalcha vatle story…..?????

 55. sachinjadhav says:

  waha Saheb 2 ghosti avadley
  Adrak & pedhe vry nice bt not 4r stoneheart

 56. गणेश सपकाळ says:

  गोष्ट खूपच छान आहे पण शीर्षक ठीक नाही वाटले.

  • गणेशजी
   ब्लॉग वर स्वागत. अहो जेंव्हा ही कथा लिहिली , तेंव्हा काहीच सुचत नव्हतं शिर्षक, म्हणून मग जे मनात आलं ते लिहिलं.. प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार.

 57. sagar says:

  college madhye baryach veles group madhye yavarun vaad hi hoyache……..ki kharach kay pahil asel ekmekat……..

 58. rajashree says:

  khoop chan apratim

 59. shru says:

  very good story,collegeche divas aatavale.

 60. ajitdada says:

  Ekdam mst….

 61. Geet Rao says:

  Really Nice

 62. zmanoj says:

  लालित्य आवडत नसताना ‘लाइक’ बटन हिट का होत नेहमी कुणास ठाऊक??? 😛

 63. Shweta says:

  “मुली स्वभावतःच लाजाळू असतात, आणि जो पर्यंत एखादा मुलगा समोर येऊन प्रपोज करत नाही तो पर्यंत त्या स्वतः काही आपणहॊऊन प्रपोज करणार नाहीत.”
  🙂 😀
  मुली कितीही smart , dashing असल्या न, तरीही हे मात्र खर आहे कि आपणहॊऊन प्रपोज करणार नाहीत… 🙂 🙂
  अगदी खर आहे काका… 🙂 🙂
  हे पण खर आहे कि ज्या व्यक्तीशी त्या जास्त argue किंवा भांडण करतात न..?? त्या जास्तच आवडतात त्यांना…logically म्हणा किवा emotionally … आम्ही मुली आहोतच तश्या… 😉

 64. NILESH NISKUL says:

  SHORT BUT SWEET STORY

 65. BHAGAPPA says:

  UTKRISHTA PREM KAHANI.

 66. swacchand says:

  अतिशय उत्तम व हृदयस्पर्शी कथा ! सहज म्हणून वाचायसला सुरुवात केली अन मग मात्र संपूर्ण वाचल्याखेरीज उठलोच नाही इतका गुंतून गेलो कथेत.

 67. yogesh says:

  really nice it is good and nice your story …

 68. हेमंत पुराणिक says:

  आजच्या मुलामुलींना प्रेम कस असाव हेच तुम्ही हलक्या फुलक्या शब्दात सांगितलत. त्याची मागणी घालायची पद्धत फारच आवडली. दुसर म्हणजे बहुसंख्य मुली विचारपूर्वक प्रेम करत नाहीत आणि मग पडतात तोंडघशी. बाकी काहीही असो झकास झाली आहे कथा

 69. vikas says:

  i think it is a swiet story i like it. very much

 70. anuvina says:

  मस्तच … प्रत्येक प्रसंग एक वेगळीच छटा निर्माण करतो. बहुतेक जणांनी हे सगळे आपल्या कॉलेज जीवनात अनुभवलेले असतेच.

 71. Jayesh Salunkhe says:

  Kharach khup chhan! Mi tar ata tumcha fan zaloy.Mala ya site baddal kahich mahit navhat.Mitra ne sangital.Jivanatll dukh visaranyasaathi tumache blog khupach madat kartat.

 72. pratibha says:

  zakhas story!!!!! ………..” aanubhav mansacha guru aasto hech khare nahi ka”?????

 73. अभिषेक (श्री) says:

  एक नंबर,नाद खुळाच
  फारच छान
  खूप आवडली.

 74. mahesh rasane says:

  kharatar premat pahile emotions kam kartat pan eka tharavik welenantar jar tyat logic nasel tar mag te prem rahat nahi ani mhanun premat kadhikadhi fasgat hote ani he tumhi tyala changlya companit chiktawoon tumhi siddha kelat

 75. अतशय उत्कृष्ट

 76. अतीशय उत्कृष्ट

 77. Suhas Adhav says:

  mast vatli katha ……specially prasanga masta rekhatle aahet …..pan kharch aashi chapter mula aastattach ….samor kahi namune pahile aahet tyamule vachtana ek veglich maja aali…chan 🙂

 78. sagar kangutakar says:

  kaka
  mala katha phar phar avadali ti vachatan tya kathetil eak chitra ubhe rahile hote.
  manpasun thanks!

 79. pratiksha says:

  kharch kaka kiti sundar…… asha ajun katha vachayla amhala nakkich avadtil…. even daily soap chya faltu stories peksha he khupch chan…..

 80. pranita says:

  kaka khupch sundar…… ajun asha katha vachayla amhala nakkich avadatil….. even tya daily soap chya faltu stories peksha he vachan khup changal…..

 81. ni3more says:

  ho pan me khup erritate hoto te daily soap pahun jasta karun to pravaha channel aahe na tya warache serioul majya ghari pahile jatat majya tar dokyachi taarach tutate

 82. ni3more says:

  me hi blog lihito tumhi watcnar ka maja blog aani tya war comment dya http://www.saibaba123.wordpress.com

 83. ni3more says:

  maja blog marathiblogspot war pan ahe pan marathi madhunach aai wordpress war pan ahe pan mala sang marathiblogspot war register kasa karu maja blog mala sangu shakal tumi aani me gmail war online asto diwas bhar tumhi jar gmail war online asal tar mala majya hya id war request send karnar ka tumachi harkat nasel tar This is my gmail id nitinmore543@gmail.com

  • जस्ट रजिस्टर केलं की झालं. तिथे एक ऑ्प्शन आहे, जोडलेले ब्लॉग, त्यावर क्लिक कर की समजेल पुढचं.

 84. Chinmay says:

  he ashakkya bhaari ahe!!! mala college madhle diwas athavale. me pan asach vagloy.. fakta nantar to pedha khaun takla hota! 😦

 85. james says:

  nice stori ilike it

 86. hema says:

  chan ahe ho tumchi (tumhi lihleli) chotishi love story.jam avadali ………

 87. ANIL THITE says:

  khupch sundar kathanak aahe..
  survatipasun jo suspense dila aahe tyamule jhuoch interest yeto n mulat prem katha mhantal ki
  thoda interest wadhtoch.. 😛 😛 😛 😛

 88. rfid says:

  nice one sir,

  Umesh Dande

 89. Pingback: मराठी गोष्टी | Marathi Search Results

 90. harish says:

  mast mast mast…………………………………

 91. aakash adsul says:

  khup chhan……….
  maji story pan kahi ashich ahe……..
  pan complete nahi zali ajun………..

 92. bansidha says:

  khup khup chan ahe katha……mala tari maje college che divas athavle…….itki chan love story me khadi vachli navthi…….pan nakki khup avadla ha tumhi lihilela chansa ani lahansa love story……. from bansidha handrol

 93. poonam arun ahire says:

  khupach chhaan …..ek niragas katha aahe hi………..

 94. Rohini Chawan says:

  chaan!!!! majja aali!!!

 95. prakash n. says:

  Hi maths mazya love story ship milti julti aahe. Thanks.

 96. Ramesh says:

  khup khup chan…mla avadali♥♥..♡♡

 97. akshaya says:

  Wow!!!!!!!!!! very nice story………….khup mst hoti……….

 98. Ankit says:

  nice story

 99. Ganesh zagade says:

  Khup chan
  Mast stori ahe

 100. Sandy says:

  Hey dude chan hote

 101. akshay says:

  मस्त खरच अशा प्रेमात पण एक वेगळीच मज्जा असते.

 102. Hasrat says:

  Lovely story……………

 103. for cutest marathi charolya visit marathiquotes.com

 104. anjali says:

  a kharach khupch chan lovestory aahe…kas kay suchat asel re tumha lekhakanna he sagal……kharach chaan

 105. Dayanand Sunil Sonavane says:

  Nice, very interesting. Keep it up………..

 106. omkar pawar says:

  Mazya ata paryant vachlelya pustakanmadhil tumhich ashe pratham writer ahat ki jyanni apali atmkatha itkya ..
  Thodya faar pramanaat emotionally ani logically vaparali ahe

 107. kamal more says:

  Khupach chan katha aahe

 108. yogesh gare says:

  खुप छान कथा आहे मला आवडली ….

 109. Santosh says:

  very nice

 110. NITIN says:

  KHUP SUNDAR AAHE TUMCHI KATHA
  ZARKAN DOLYAPUDHE BHUTKAAL
  ATHAVLA ATISHYA SUNDR TUMCHI
  LEKHNI ASECH DUMDAR PANE
  LIHIT RAHO ANI AMMHA SARVANNA
  AAMCHE JUNE DIVAS ATHVANIT YET
  RAHO.

  DHANYAWAAD…………SAHEB

 111. Satish Alone says:

  Nice Very Nice…

 112. Satish Alone says:

  अप्रतिम….

 113. Satish Alone says:

  अप्रतिम…..

 114. Tanaji Patil says:

  realy very sweet love story…… majya aali wachun

 115. siddhesh says:

  मस्त अाहे ही गोष्ट…

 116. Vaibhav says:

  short and sweet, avdali mala 🙂
  maz hi tasach kahi tari ahe… 🙂

 117. Amit shinde says:

  9766667537

 118. nilesh says:

  mi pan 2 muli firvlya……pan lagn dusrikade kele…aani pastavlo..

 119. Ram says:

  So sweet.chhan lihily story.khup khup awadli.asch liha ajun.

 120. Ramesh Ghuli says:

  Nice story

 121. Shoaib says:

  खुप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्चा छाननननननननननननन

 122. Rakesh Dhuri says:

  Very Nice

 123. अमोल says:

  अगदि बरोबर आहे नंतर नको बोलायला कीं
  “गेले ते दिवस आणि राहील्या त्या आठवणी”

 124. amit says:

  kadhi kunavar prem keley

 125. gorakh says:

  Kahitari vegla aani khup chan

 126. Snehal says:

  Wah…!!
  Awadli katha… Short n sweet story 🙂

 127. hemlata says:

  khup chan

 128. निलेश भिसे says:

  मस्त आहे कथा आवडली
  अशा आणखी कथा वाचयला मिळाल्या तर उत्तम

 129. Santosh says:

  Khup chan…

 130. Anil says:

  Very nice

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s