क्रिप्टोग्राफी..

’दा विन्सी कोड’ सगळ्यांनीच वाचलं असेल- नाही तर   सिनेमा तरी नक्कीच पाहिला असेल. त्यातल्या सारखे   क्रिप्टीक कोड   तयार करणे, आणि नंतर त्याचा अर्थ समजून घेणे खूपच कठीण काम आहे असे वाटते ना? कधी तरी असंही  वाटतं की ,  आपली पण एक कोड लॅंग्वेज असती की जी फक्त स्वतःलाच वाचता आली असती तर ? कितीतरी पर्सनल गोष्टी लिखित स्वरुपात ठेवता आल्या असत्या.

आपल्या खास गोष्टी- म्हणजे अगदी शेजारची सुबक ठेंगणी माझ्या कडे पाहून हासली, किंवा जिच्यावर तुम्ही जीव टाकता, तिनेच  जाता जाता खूप शिव्या दिल्या अशा गोष्टी कुठे तरी लिहून ठेवाव्या ,  आणि अशा भाषेत की जी इतर कुणालाही वाचता येणार नाही – असे वाटते ना बरेचदा?.

एक अशी डायरी लिहिता येईल की ज्या मधे आपण आपलं मन शंभर टक्के मोकळं करू शकू- कोणाला काही समजेल याची भिती न बाळगता.

हो .. असे करता येणे शक्य आहे. कसे ते सांगतो. यावर पण एक उपाय आहे.  तुम्ही अगदी काय वाटेल ते लिहू शकता आणि ते तुमच्या शिवाय कोणालाच वाचता येणार नाही. आमच्या वेळी  गर्ल फ्रेंडला चिठ्ठी लिहायला ही भाषा वापरली जायची. तिला   एकदा  कशी वाचायची हे शिकवले की झाले.

अहो त्या काळी सेल फोन वगैरे नव्हते , कम्युनिकेशन म्हणजे चिठ्ठी चपाटी.. आणि पोहोचवणार कोण तर तिची सख्खी मैत्रीण. मग मैत्रिणीला   पण समजायला नको अशी भाषा असायला हवी की नाही??  म्हणुन ह्या भाषेचा शोध लागला असावा.

खाली दोन चित्र लावलेली आहेत. एका मधे ए बी सी डी अशी अक्षरे वेगवेगळ्या भागात आर पर्यंत लिहिलेली आहेत. दुसऱ्या चित्रामधे एस पासून तर झेड पर्यंत अक्षरं लिहिलेली आहेत. तुम्ही हे दोन चार्ट्स तुमच्या पध्दतीने पण बनवू शकता – म्हणजे कुठलेही अक्षरांची पोझिशन्स बदलून   .   आता या दोन चार्टस ला लक्षात ठेवा. हे दोन्ही चार्ट्स म्हणजे तुमच्या सिक्रेट डायरीचे कोड ब्रेकर्स असतील.

आमच्या वेळी सगळ्या अफेअरकरांमधे (प्रेमळ लोकांमधे) खूप फेमस होती ही भाषा. काही लोकं आपापला कोड ठरवायचे. मग त्या मधे ए पासुन तर झेड पर्यंत अक्षरांच्या जागा वेगवेगळ्या केल्या की झाला नविन कोड तयार. प्रत्येकाचा  कोड वेगळा!

आता समजा मला माझे नांव लिहायचे आहे तर ते मी कसे लिहीन? सोपं आहे. खाली दिलेले चित्र पहा. एम हे अक्षर  डावीकडच्या खालच्या  को्पऱ्यात आहे, म्हणून त्या  कोपऱ्याचा आकार लिहायचा.  एच  म्हणजे  डावीकडच्या  मधल्या भागात   दुसरे अक्षर आहे म्हणून तो  कोपरा + डॉट. ( दुसरे अक्षर असेल तर डॉट द्यायचा)

इथे कोड वापरुन माझे स्पेलिंग लिहिले आहे. चित्रावर क्लिक करुन मोठे करुन बघा

बरं, अजून एक आयडिया आहे. दोन सर्कल दिलेले आहेत खाली. एक सर्कल दुसऱ्या पेक्षा कमीत कमी एक इंच लहान आहे . दोन्ही सर्कल  प्रिंट आऊट काढून कापून घ्या. लहान सर्कल मोठ्या सर्कल वर बसवा. तुमचा कोड आधी निश्चित करा. समजा ए तुम्ही के च्या समोर ठेवला तर  ए च्या ऐवजी के लिहायचा. त्याच प्रमाणे इतरही अक्षरांसमोर दुसरी अक्षरं येतील ती लिहित जायची

बरं हा कोड लॉजिकली ब्रेक केला जाऊ शकतो. थोडा कठीण करायचा असेल तर त्या सर्कल वर जी अक्षरं ए पासून तर झेड पर्यंत एका सिव्केन्समधे लिहीले आहेत  तो सगळी कापून घ्या आणि मग हाताला येइल तशी त्या सर्कल वर  पुन्हा चिकटवा. म्हणजे ए नंतर बी च्या ऐवजी अगदी जे किंवा एम  पण येऊ शकेल!एवढं केलं की झाला एक नविन कोणीही न तोडू शकणारा कॊड  तयार.

काही  शंका असतील तर  कॉमेंट  मधे विचारू शकता.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in गम्मत जम्मत and tagged , , , , , . Bookmark the permalink.

45 Responses to क्रिप्टोग्राफी..

 1. sahajach says:

  मस्तच आहे हे प्रकरण….. 🙂

  • तन्वी
   माझी डायरी याच भाषेत लिहिलेली असायची . घरचे लोकं खूप कन्फ्युज व्हायचे हे काय लिहित बसतो म्हणुन. बऱ्याच जुन्या आठवणी आहेत या भाषेत लिहिलेल्या. 🙂

 2. महेंद्रजी,
  नमस्कार.
  तुमच्या नावाच स्पेलींग व आकृती दिसत नाही.तुमचे आतापर्यंत लीहिलेले सर्व पोस्ट वाचुन झाले.पायाला अपघात झाल्याने गेल दिड वर्ष अंथरूणातच आहे.या सर्व काळात तुमच्या, रोहन,पंकज,कांचनताई,भुंगा, भानस,वटवट सत्यवान, पु.ल.प्रेम व इतर ब्लॉगर्सच्या पोस्टनी मन ताज ठेवल.विशेषतः खादाडी पोस्ट वाचुन हे सर्व खाण्यासाठी तरी बर व्हायला हव हि ईच्छा जीवंत ठेवली.इतके दिवस आजारी असुन तु प्रसन्न कसा राहु शकतोस?असे सर्व नातेवाईक मला विचारतात.मी याचे सर्व श्रेय तुम्हा सर्व न बघीतलेल्या मीत्राना देतो.हल्ली कार्यव्यापामुळे मीत्रांनाही वारंवार भेटायला येण जमत नाही.ते एकटेपण तुम्हा सगळ्यांमुळे सुसह्य झाले.तुम्हा सगळ्यांचे आभार.इतर सर्व मंडळी इथे भेटतीलच,म्हणून इथेच सर्वांचे आभार मानतो.बरय, अभीप्रायाची पोस्ट झाली, आता पुरे करतो.

  • हेमंतजी
   प्रतिक्रियेकरता मनःपुर्वक आभार.

   त्या चित्रावर क्लिक करुन मोठं करुन बघा म्हणजे लक्षात येईल. जसे ए हे अक्षर चौकटीच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात आहे. म्हणुन त्या कोपऱ्याचा आकार काढलाय ए साठी. जर बी लिहायचे असेल तर त्याच आकारामधे एक डॉट द्यायचा. चित्रं मोठी करुन पहा म्हणजे लक्षात येईल.

   इथे ब्लॉगिंग सुरु केल्यापासुन एक वेगळेच विश्व निर्माण झाले आहे. सगळे अगदी जवळचे परीचयाचे वाटतात नेहेमीच्या. 🙂

   लवकर बरे व्हा, हीच सदिच्छा..

  • हेमंतजी, आपली प्रतिक्रिया बघितली आत्ताच. आम्ही फक्त निमित्त आहोत. तुमची इच्छाशक्ती अतिशय दुर्दम्य असणार नक्कीच.. तुम्हाला लवकरात लवकर बरं वाटो हीच प्रार्थना… !!!

  • सागर says:

   लवकर बरे व्हा….जुलै मध्ये ब्लोगर ट्रेक आहे…. 🙂

  • रोहन says:

   हेमंतजी…

   आपली कमेंट वाचली. खरेतर महेंद्रदादाने कळवली. वाचून खूप आनंद झाला. आपण नकळत कोणाच्या तरी आयुष्यात किमान चांगले काम करून जातोय हे वाचून खरच भरून पावलो. आपला स्नेह असाच राहुद्या… आम्हाला लिखाणाची प्रेरणा द्यायला… 🙂 अनेक अनेक आभार… आपली भेट कधीतरी होइलच अशी आशा आहे… 🙂

   • आपली भेट नक्की होईल. मी सध्या उपचारासाठी ठाण्यात आहे. मी दुरध्वनी क्रमांक तुला मेल करतो. मलाही तुम्हाला कधी प्रत्यक्ष भेटतो असे झालेय.

    • रोहन says:

     मेल आला.. मी १ जुलै रोजी ठाण्यात आलो की तुम्हाला संपर्क करीन… 🙂

  • आईच्चा घो (ही शिवी नाही बरं, उद्गारवाचक शब्द आहेत),

   अप्पुन क्या एवढा मोठा काम कररेला? अगदी सामाजिक वगैरे नाही. पण कुणीतरी आपला ब्लॉग वाचतंय ही भावनाच किती सुखदायी आहे! त्यातही आपण गेले दीड वर्ष आमच्या ’कायच्या काय’ लेखनामधून आनंदी राहता आहात म्हणजे एकदम सॉल्लेट राव. आज एखादी पोळी जरा जास्तच जाणार मला. आणि पुढे लिहायला प्रेरणा म्हणजे किती मिळावी? आमच्या गावाला खंडीभर म्हणतात. पण ती एक नाही असंख्य खंडीभर प्रेरणा मिळाली. आपल्य इच्छासक्तीला आम्हां टुकार नेटकट्ट्यावरच्या टवाळक्यांचा सलाम!!

   आणि आपलाही ब्लॉग सुप्पर आहे..

  • नमस्कार हेमंतभाऊ,

   आपली प्रतिक्रिया वाचली. पु.ल. प्रेम ब्लॉगने आपले मन ताजे ठेवले हे वाचले आणि भरुन पावलो. परत एकदा वर बघुन पु.लंना दंडवत घातला आणि परत जोमाने नविन नविन पोस्ट टाकायची ताकद मिळाली. तुम्ही ज्या त्रासातुन जात आहात त्यातुन लवकरात लवकर बरे व्हाल ह्याची खात्री आहेच. आमच्या शुभेच्छा आणि प्रार्थना आहेतच.

   असे प्रसन्न रहा.. 🙂

   दिपक
   पु.ल. प्रेम
   http://cooldeepak.blogspot.com

 3. आयडीया मस्तच आहे. स्वत:पुरताच असा कोड मर्यादित ठेवायचा असेल, तर ठिक आहे. दुस-या कुणाला कोड लॅंग्वेज मधून संदेश पाठवायचा असेल, तर त्यालाही हे माहित असायला हवं. अशाच प्रकारचं क्रिप्टिक कोड मुंबई मिरर मधेही येतं. तिथे आपण व्यंजनांच्या आधारे शब्द ओळखायचा असतो.

  • मुख्य उद्देश तर स्वतः ची डायरी लिहून ठेवायलाच ह्याचा उपयोग करायचा असा कन्सेप्ट आहे.

 4. काका,
  काल सिक्रेट मेसेज, आज क्रिप्टोग्राफी … काय चाललंय काय? 🙂 .. तुम्ही तर एकदम सीआयए चे एजंट झालात 😉

  • हेरंब
   काही ’सिक्रेट’ लिहून ठेवायचं ( कोणापासून ते सांगायची गरज नाही) तर चांगली आयडिया आहे. मी आठवीत शिकलो होतो ही लॅंग्वेज. अजूनही आपले काही महत्वाचे मुद्दे लिहून ठेवायला वापरतो. 🙂

 5. काका, तुम्ही तर एकदम सीआयए चे एजंट झालात 🙂 +1
  …मस्त आहे ही आइडिया एकदम सेक्यूर्ड आणि पर्सनल..

 6. Maithili says:

  Bhaarrii…. Idea changali aahe. 😀 Pan Diary lihayacha mala kantala yeto aani patr konala pathavayachi ha prashnach aahe…. 🙂

  • मैथिली
   डायरी लिहिण्याचा कंटाळा येतो, कारण कोणी वाचेल ही भिती असते कायम मनात म्हणून. त्याच मुळे सगळं खरं खरं लिहित नाही आपण. पण एकदा कोणी वाचु शकणार नाही ह्याची खात्री असली की मग मात्र अगदी मनातली प्रत्येक गोष्ट लिहून ठेवता येते. ही डायरी मग काही दिवसांनी / वर्षांनी वाचतांना खूप मजा येते . दररोज नाही पण कधी कधी लिहायचं महत्वाची काही घटना घडली की.

 7. jyoti says:

  kaka………navin idea from kakancha batava (ideacha)……mastach………

  • ’काकांचा बटवा” ! मस्त आयडीया आहे. आज जुनी पुस्तकं लाऊन ठेवली तेंव्हा ते दा विन्सी कोड हे पुस्तक समोर दिसलं म्हणून हे पोस्ट लिहायला सुचलं .

 8. mazejag says:

  धन्यवाद महेंद्र, ह्या कोडचा वापर करून कॉलेज मध्ये बरेच किडे केले होते. अगदी इकोच्या पेपर मध्ये कॉपी पण….सगळ आठवलं…..

  • मी तर बरंच काही लिहून ठेवलंय . ती वही आता रद्दी मधे विकल्या गेली असेल, पण मला सवय होती लिहून ठेवायची प्रत्येक महत्वाची गोष्टं.
   चिठ्ठी देवाण घेवाण तर नेहेमीच सुरु असायची ~! 🙂
   प्रतिक्रिये करता आभार.

 9. laxmi says:

  mast article….

 10. Meenal says:

  \./ |_ |.– /\
  > –| _| |.– .>

  (|.– R, –| M हे सिम्बॉल टाइपच करता आले नाहीत)

  ’दा विन्सी आठवलाच, पण शेरलॉक होम्सचा ’डान्सिंग मेन कोड ’ पण आठवला.
  मस्त मजा आली.. मला क्रिप्टोग्राफी लिहायला, सोडवायला खूप आवडते.
  मस्त आणि वेगळी आहे पोस्ट..

 11. justtypeamruta says:

  भारी idea आहे, अश्याच बोलण्यात पण सांकेतिक भाषा असतात, आमच्या लहानपणी आई बाबांना काही बोलायचं असाल आम्हाला कळू न देता कि ते “च” ची भाषा वापरायचे,
  म्हणजे प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर “च” नि replace करायचं, जर म्हणायचं असेल “तिला हे खायला देऊ नका” तर म्हणायचे “चिलाते चायलाख चेऊ नकाद” …
  मग मोठे झाल्यावर मी न माझा भाऊ “नफ” , “दब” अश्या बऱ्याच भाषा वापरायचो………..
  खूप मस्त आठवणी आहेत या सगळ्या…

  चन्यावादध……………..

  • samir deshpande says:

   Mahendraji,
   Hee bhasha mee shalet astana vaparali hoti,Aata itkyda varshani tumhi Aathvan karun dilit. Mast vatala…..

   Samir

  • ही भाषा शाळेतच शिकलो, कोणी शिकवली ते समजले नाही. खूप इनिशिएटिव्ह घेउन नविन काहीतरी शोधायची पद्धत होती. 🙂
   प्रतिक्रियेकरता आभार.

  • अमृता
   च ची भाषा पण आम्ही खूपदा वापरायचो. लहान भावंडा पासुन काही लपवायचे असेल तर . लहानपणी तर ठीक,पण मोठं झाल्यावर डायरी लिहायला ती कोड लॅंग्वेज वापरली आहे मी बरेच वर्ष. 🙂

 12. Pingback: क्रिप्टोग्राफी.. | indiarrs.net Featured blogs from INDIA.

 13. bhaanasa says:

  महेंद्र, सहीच आहे. 🙂 आपल्यावेळी मेले सेल फोनही नव्हते की ईमेल्स….. मग हे असे डोके चालवणे भागच होते नं… आता तू दिलेल्या युक्तींचा प्रयोग करून पाहते.

  हेमंतजी, आम्ही सगळे जे काही बरेवाईट लिहीतो हे वाचून आपल्या मनास आनंद मिळतो हे वाचून खूप छान वाटले. हेरंबने म्हटलेयं तसेच म्हणते. आपली जगण्यावरची आसक्ती, आनंदी राहण्याची वृत्तीच आपले बळ वाढवते आहे. इतके दिवस दुखणे काढणे-एका जागेवर राहणे किती कष्टप्रद असू शकते याची जाण आहे मला. माझे बाबा असेच काही महिने आजारी होते…. केवळ त्यांच्या इच्छाशक्तीनेच आजही आमच्यात आहेत. आपल्याला लवकर बरे वाटावे हीच प्रार्थना. आणि मग आपण मस्त पार्टी करू. खादाडीच खादाडी….. 🙂

  • अगं हो ना, तिला काही कळवायचं, तर एक स्पेशल भाषा लागायचीच, की जी जो कुणी चिठ्ठी पोहोचवेल त्याला पण कळणार नाही अशी.
   गरज ही शोधाची जननी आहे म्हणतात .. आजकाल सेल फोन्स मुळे या भाषांची गरज राहिलेली नाही .

 14. Somesh says:

  1. Mapmast aapmaahe popmost hipmi ! Mapmala mammajhya lapmahanpanchi bhapmasha aamaathapvali.

  2. Another way to write nice diary is to write lines in normal language but on alternate lines. if someone would read those straight, those are meaning less but reading alternate line makes sense. 🙂

  • सोमेश
   पहिली ओळ पहिले, दुसरी ओळ शेवटी, तिसरी ओळ शेवटून दुसरी, चौथी ओळ दुसऱ्या नंबरवर.. हा सिक्वेन्स पण कन्फ्युजिंग असतो. लवकर समजत नाही .

   या कोड चे महत्व जे आम्हाला होते, ते पुढल्या पिढीला कदाचित रहाणार नाही. 🙂 काळाच्या ओघात नष्ट होणार ही भाषा.

 15. Rajeev says:

  xxx## !!!…& ^ XXX , XXX * ^ 1111
  GOT IT ?

 16. ऋषिकेश says:

  महेंद्रजी पोस्ट वाचून आनंद झाला. जुन्या आठवणीना उजाळा मिळाला.
  मी पण दिवाना आहे क्रिप्टिक कोड चा ….
  मी कॉलेज मध्ये गणित शिकत असताना क्रिप्टिक कोडची बरीच गणिते सोडवली होती…
  धन्यवाद पोस्ट बद्दल !!!

 17. Vidyadhar says:

  काका,
  लय भारी! शिकून तर घेतली, आता उपयोग कधी करता येतो पाहूया!…;)

  • विद्याधर
   उपयोग तर कुठेही केला जाउ शकतो. फक्त कुणाला पत्र पाठवायचं तेवढंच पहा… 🙂

 18. Gurunath says:

  laich bhari!!!!!, aap to pahunche hue hai dada!!!! tussi tof ho

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s