गुळाचा गणपती

लहानपणी खेळतांना व्यवस्थित खेळता येत नसेल तर हॅंडीकॅप द्यायचे. स्पेशली क्रिकेट मधे तर मी   हमखास पहिल्या एक दोन ओव्हर मधेच आऊट व्हायचो , त्या मूळे मी क्रिकेट खेळणं टाळायचो.  बरं   फिल्डींग करायला पण मुलं पाहिजेच, मग मी नाही खेळत म्हंटलं की  एक फिल्डर कमी  होणार ना? म्हणून मग माझी मनधरणी करुन   मला हँडीकॅप द्यायचे,  म्हणजे -की ठीक आहे रे बाबा, तू दोनदा बॅटींग कर.. 🙂  आणि मग मी खेळायला तयार व्हायचो . हे फार कमी दिवस चाललं, आणि लवकरच व्यवस्थित  ( थोडं बऱ्या पैकी म्हणा हवं तर, मी कायम १२वा गडीच असायचो )खेळता यायला लागलं, आणि हॅंडीकॅप मिळणे बंद झाले.  तेंव्हा पासून म्हणजे लहानपणापासून हॅंडीकॅप म्हणजे काही कमीपणाचे आहे असे कधीच वाटले नाही. उलट एंजॉय करायचो हॅंडीकॅप प्रिव्हिलेज.

जगामधे प्रत्येक पुरुष हा हॅंडीकॅप असतोच. कदाचित काही लोकं मान्य करणार नाहीत पण ही फॅक्ट ऑफ द लाइफ आहे. आता हेच बघा ना, आज सकाळचीच गोष्ट आहे. सकाळी नुकताच उठलो होतो.

बेड टी शिवाय दिवस सुरु होतच नाही माझा. चहाचा कप सौ. ने हातात आणून दिला. अर्धवट उघडलेले डोळे , हातात कप , समोर आजचा टाइम्स ऑफ इंडीया , अक्षरं पण धूसर दिसत होती. उगाच हेडलाइन्स वरुन नजर फिरवली आणि चहा संपवला. सवयी प्रमाणे चहाचा कप सोफ्याच्या खाली सरकवला.

तेवढ्यात  सौ. चा आतून आवाज ऐकु आला, ’ तो चहाचा कप सोफ्याच्या खाली  सरकवु नका , इकडे बेसीनवर आणून ठेवा’- हे नेहेमीचंच. !!  इतकी वर्ष झाली लग्नाला की आता मी काय करणार हे तिला आतल्या खोलीत असली तरीही समजते. मुली म्हणतात, आईला ’मॅजिक आईज’ आहेत , ती भिंती पलीकडले पण पाहू शकते.   जवळपास दररोज चा  रिवाज आहे, पण   सोफ्या खाली कप सरकवला जातोच – काही सवयी अगदी हाडा पर्यंत मुरलेल्या असतात, त्या  का जात नाहीत हे समजत नाही.

थोडं विषयांतर करतो, मी चहाबाज आहे. सकाळी ऑफिसला जाई पर्यंत चार एक कप चहा होतो. मग चहा पिऊन झाला की कप एक तर  सोफ्या खाली सरकवला जातो. बरेचदा सौ. त्या कपाला अक्षय कप योजने अंतर्गत ठेवलेला कप आहे असे म्हणते  – (कारण नेहेमीच एखादा कप तिथे पडलेला असतो). ती आली कप उचलायला, की अजून एका चहाची मागणी ठरलेली आहेच.

खूप  वर्षांपुरती एक लेख वाचनात आला होता कुठेतरी – आता नक्की आठवत नाही. त्या मधे  म्हंटलं होतं की सगळे नवरे   हॅंडीकॅप असतात , आणि त्यांना हॅंडीकॅप करण्यात   स्त्रियांचा खूप मोठा हात असतो .

पटत नाही का??ठीक आहे पुढे वाचा..नवीन लग्न झालं की मुलींना नवऱ्याचं किती कौतुक करु आणि किती नाही असं होतं. हा बहुतेक त्या ’क’ च्या सिरियलचे परिणाम असेल असे मला वाटायचे, पण नाही- तसे नाही!!फार फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे ही पद्धत .जुन्या    हिंदी सिनेमा मधे पहा, स्लिव्हलेस घातलेली हिरोईन , सूट घालुन ऑफिसला निघालेल्या नवऱ्याच्या हातात एक ब्रिफकेस देते – ( का बर? त्याला स्वतःला घेता येत नाही का उचलून?) जर समजा त्याने सुट घातलेला नसेल तर त्याच्या शर्टचं बटन तरी नक्कीच तुटलेले असायचे, आणि मग हिरोइन अंगावरचा शर्ट न काढता ते बटन शिवायची, आणि मग दाताने तो दोरा तोडायचा अशी रोमॅंटिक आयडीया पहातच सगळ्या मुली  मोठ्या झाल्या/ आणि होत असतात, त्या मुळे  आयुष्य हे असंच असतं हे पक्कं डोक्यात बसलेले असते स्त्रियांच्या.

आमच्या घरी अंगावर कपडे शिवलेले चालत नाहीत,   कधी बटन तुटलं आहे असं  झालं तर शर्ट काढून द्यावा लागतो बटन शिवायला , त्या मुळे  हा रोमॅंटीक अनुभव  बाकी अनुभवायचं राहूनच गेला . 😦   माझ्या मनात नेहेमी  यायचं की  आपलं लग्नं झालं की बायको असे बटन लावून देईल, आणि मग दोरा दाताने तोडेल  म्हणून.. (पण  पुन्हा कंस.. चालायचंच) )

आपल्या कडे  स्त्रिया या सती सावित्री वगैरे स्त्रियांचा आदर्श समोर ठेवतात . त्या मुळे नवऱ्याची सेवा केली की खूप पुण्य मिळते, अशी   कल्पना युगानुयुगे आहे . नवऱ्याची सेवा करायची ती जर तो स्वयंपूर्ण असेल तर कशी करणार?? नवऱ्याची खूप सेवा करायची म्हणजे पुण्य लाभते, ही गोष्ट मनावर बिंबवली असते लहानपणापासून. म्हणून लग्नानंतर ताबडतोब नवऱ्याला  हॅंडीकॅप बनवण्याची प्रक्रिया सुरु होते. जर तो हॅडीकॅप नसेल तर मग त्याची सेवा कशी करता येईल? 🙂

लग्न होण्यापूर्वी नवरा बहुतेक कुठेतरी नोकरी निमित्त एकटा रहात असतोच, त्या मुळे त्याला कपडे धुणे, थोडा फार स्वयंपाक वगैरे येत असतोच.चहा बनवणे, घरकाम वगैरे पण करायची सवय असतेच. पण एकदा लग्न झालं , आणि लक्षात आलं की हे काम आता बायको (सुरुवातीला) आनंदाने आणि कौतुकाने आणि काही वर्षांनी   वैतागाने करते आहे, की मग त्या कामातून काढता पाय घेतला जातो.

बऱ्याच स्त्रिया  तर ’आमच्या ह्यांना किनई  चहा पण करता येत नाही’ म्हणून फुशारक्या मारतात. त्यांना हे समजत नाही ’त्यांच्या ह्यांनी त्यांना चांगलं उल्लू बनवलेले आहे . पुरुषांना स्त्रीला   मोठेपणा देऊन  आपलं काम काढून घेणं चांगलं जमतं, त्याचं हे एक उदाहरण.

नवीनच लग्न झालं की पुरुषांना हॅंडीकॅप बनवण्यामागे  नव परिणीता स्त्री चा  खूप मोठा हातभार असतो. नवरा म्हणजे त्यांना एक नवीनच खेळणं वाटत असतं. ज्या प्रमाणे एखादी नवीन बाहुली खेळावे तसंच वाटत असतं काहीतरी ….लग्नं म्हणजे काय हे नीटसं कळलंही नसतं. मग अशा परिस्थितीत , आणि पूर्वापार चालत आलेल्या संस्कारांमुळे नवऱ्याकडे   अती  लक्ष देणे , त्याचे प्रत्येक काम करणे, त्याच्या पुढे पुढे करणे – हे स्त्री चे कर्तव्य आहे वगैरे भावनेमुळे त्याला एकही काम करु देत नाही.अगदी चहाचा कप पण हातातून घेते काढून.

एखाद्या दिवशी कामवाली आली नाही आणि त्याने हातात कुंचा घेतला घर झाडायला, तरीही बायको हातातून कुंचा काढून घेणार, आणि जाउ द्या, ’तुम्हाला येत नाही’ असं म्हणून स्वतःच ते काम करणार, हे प्रत्येकानेच कधी ना कधी तरी अनुभवलेले असेल.

एखाद्या दिवशी बायकोला  बरं नसेल आणि तुम्ही काही बनवायला म्हणून किचन मधे प्रवेश केला, तरी पण अंगात एक- दिड ताप असतांना पण स्वतः भाजी करण्याचा अट्टाहास स्त्रिया करतांना दिसतात.  सकाळी आंघोळीला तो गेला की त्याचा टॉवेल, वगैरे हातात देणे , घालायचे कपडे कपाटातून काढून ठेवणे, सॉक्स, रुमाल नीट धुतलेले हातात देणं ,  ही सगळी कामं स्त्रियांची  म्हणून इअरमार्क झालेली आहेत- असं म्हणण्यापेक्षा स्त्रियांनीच करुन घेतलेली आहेत.सुरुवातीला अंगावर घेतलेली कामं नंतर त्रासदायक ठरतात. पण पर्फेक्ट  हॅंडीकॅप बनवण्याची दुसरी स्टेप  ही.

जेवायला बसल्यावर ताटं घेणं हे काम पण स्त्रियांचे. आजकाल जरा हे प्रस्थ कमी झाले आहे,पुरुष मंडळी पण मदत करतात हल्ली.  पण पूर्वी जो पर्यंत स्त्री पानं मांडून जेवायला वाढत नाही, आणि कमीतकमी चारदा हाका मारीत नाही तो पर्यंत पुरुषाने जेवायला यायचे नाही , असा अलिखित दंडकच होता ( माझ्या आजोबांचा , वडलांचा काळ म्हणतोय मी). आजकाल दोघंही नोकरी करु लागल्याने पुरुष पण थोडी फार मदत करु लागले आहेत- जसे भाजी चिरणे, निवडणे वगैरे बाबींमधे..

टीव्ही वरची ती टुकार सिरियल्स  पण स्त्रीच्या या   मानसिकतेला हातभार लावतातच. त्या सिरियल मधे घरच्या स्त्रियांनी केवळ नवऱ्याच्या पुढे पुढे करायचे, आणि उरलेला वेळ चांगल्या साड्या नेसून एकमेकीच्या उखाळ्यापाखाळ्या काढायच्या – आणि ही म्हणजेच आपली संस्कृती असा आव आणायचा, अशा प्रकारच्या सिरियल खूप   सुरु झालेला आहेत- म्हणण्यापेक्षा प्रत्येकच सिरियल अशीच आहे हल्ली..

पर्फेक्ट हॅंडीकॅप कसा असतो हे पहायचे असेल तर मला भेटा.. 🙂 हल्ली थोडी फार मदत पण करतो, भाजी चिरून देणे वगैरे वगैरे कामामधे..

तर, अशा तऱ्हेने  एकही काम न करू देता, घरा मधे नुसता गुळाचा गणपती करुन बसवून ठेवलेला तो नवरा, थोड्याच काळात पुर्ण पणे हॅंडीकॅप होतो. काही वर्ष गेले  की स्त्रियांना आपली चूक समजते, पण तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते, आणि चिडचीड करण्यापेक्षा दुसरं हातात काहीच शिल्लक रहात नाही.. !!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , , , . Bookmark the permalink.

57 Responses to गुळाचा गणपती

 1. सागर says:

  जुनाच विषय पण उत्तम लेख…बाबांच्या अनुभवातून शिकून आईने आम्हाला मात्र सर्व कामे स्वत: करायला शिकवले…
  अन चहा बाबतीत तर आई म्हणते आपल घर म्हणजे चहाच हॉटेल आहे…सकाळी अकरा वाजेपर्यंत घरात चहाच चालू असतो….आम्ही ५ जन घरी असलो तरीही साडे तीन लिटर दुध घ्यायचो आम्ही…
  अन काही काही वर्षापूर्वी पर्यंत तर म्हैस होती…चांगल्या दुधाच्या चहा साठी आता बोला…. 🙂
  (आता गडी माणस मिळत नाहीत कामाला… 😦 )

  • सागर
   लग्नानंतर बायको तुला हॅंडीकॅप करण्याचा पुरेपुर प्रयन्त करेलच.. अरे मी पण आईला मदत करायचो स्वयंपाकात. पुरण वाटून देणं, चटणी वाटून देणं वगैरे, मी पुर्ण स्वयंपाक करु शकतो स्वतः.. 🙂 पण हल्ली झालोय हॅंडिकॅप… 😀

 2. मी सध्या खरच हॅंडीकॅप असल्याने याचा फार अनुभव येतो.पण या बायकांची सेवा करण्याची क्षमताही प्रचंड असते.माझ्या ऐवजी बायको आजारी असती तर आपण एवढी सेवा इतका काळ न कंटाळता करु शकलो असतो का?हा विचार नेहमी सतावतो.

  • तुमचं म्हणणं पटतं मला, इतकं सोपं नाही ते. स्त्रियांमधे तो उपजत असलेलाच गुण असतो.

 3. mazejag says:

  महेंद्र, मान्य करता ना हे….चांगल वाटल….खरतर दोघांनी थोड थोड केल तर आजकालच्या बिझी शेडूलमधून काही निवांत क्षण मिळू शकतात….फक्त दोघांसाठीचे….

  • आजकाल सगळ्या सामाजिक परिवर्तनामुळे ( म्हणजे टिव्हीवरच्या सिरियल्स मुळे )घरकामात मदत करणारा नवरा तो ’बायल्या’ अशी प्रतिमा स्त्रीच्या मनात असते . घरामधे आरडाओरडा करणारा , शिवीगाळ करणारा पुरुष म्हणजे ’मर्द गडी’ हा कन्सेप्ट अजूनही आहेच..म्हणुनच कदाचित लग्न झाल्याबरोबर ती नवऱ्याला हॅंडीकॅप बनवणे सुरु करते.
   नवरा जर कधी कामात मदत करत असेल आणि तेवढ्यात बाहेरचं कुणी आलं, तर त्याच्या हातातून काम काढुन नंतरच दार उघडायची पध्दत पण काही ठिकाणी दिसली ( खरं सांगायचं तर आमच्याही घरात आहेच). घरकामात मदत करणे म्हणजे कमीपणा असे नाही हे कधी समजणार स्त्रियांना??

 4. Mk मजाक मजाक मे बहुत गेहरा बोल दिया आपने. कोणताही विषय हाताळण्याची ही सचोटी तुम्हाला मिळालेली देणगी आहे असे मला नेहमीच वाटते. फार छान लिहिलंय.

  मी पण पक्का चहाबाज आहे. आठ-दहा चहा दिवसभरातुन होतातच 🙂

  • सलील
   एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतला असला, की ते लिहिणं सोपं जातं, काल्पनिक लिखाणापेक्षा. धन्यवाद..

 5. mau says:

  nehami pramanech aprtim !!!!!!!….Anubhavaache bol aahet..mhanunch lekh Chhan jamalaa aahe……[:)]

  • उमा
   खरंय.. झाले जवळपास २१ वर्ष आता लग्नाला. जर अजूनही हे समजलं नाही तर कधी समजाऊन घायचं?

 6. महेंद्र काका, अगदी समर्पक लेख! तंतोतंत जुळतो माझ्या परिस्थितीशी 🙂

  • धन्यवाद.. घरॊघरी मातीच्या चुली!! कोणी सांगतं ओपनली, तर कुणी सांगत नाही एवढाच काय तो फरक!

 7. Maithili says:

  Tumacha lekh vachtana , “Arechya aapalya ghari pan he asech aste…” ase watale…khoop ch mast lihileyat…!!! 🙂
  Baba kadhi kahi karayala gele kitchen madhye tar aai atyantik demotivate karate tyana….!!! Aani varun mag aikvun dakhavate…” Sadha chaha sudha karun ghenar nahi kadhi hatane…” He chukiche nahiye ka…..???

  • मैथिली
   घरॊघरी हे असंच असतं, इथे फक्त मी शब्दांत माडलंय बस.. कितीही जरी टाळू म्हंटलं तरीही हे असंच सुरु रहाणार.. 🙂

  • मैथिली
   घरोघरी सारखंच असतं. कदाचित पुढल्या पिढीत थोडा बदल होईल या मधे ( दोघंही नोकरी करतात म्हणुन) अशी रास्त अपेक्षा ठेवतो, आणि ज्यांची लग्नं झाली नाहीत, त्यांनी या चुका करु नये हिच इच्छा व्यक्त करतो.

 8. तीनतीनदा लिहिलंयंत “पुरूष पण हल्ली मदत करू लागलेत” 😉 मजा वाटली वाचताना. पुरूषांना हॅन्डीकॅप बनवण्यात बायकांचा(च जास्त) हातभार असतो खरा. सगळीकडे थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती असते.

  • खरंय ते.. स्वतःवरुनच लिहिलंय !! आधी अजिबात काही करत नव्हतो, आजकाल थोडाफार हातभार लावतो 🙂

 9. महेश says:

  सर्वांची परिस्तिथी असीच असते ,काळ बदला आहे नवराबायको (दोघेही ) नोकरी करत असल्य्ल्यामुळे ,,,सुंदर ,अप्रतिम, कदाचित माणसात आळस नसावा हा एक उदेश असावा असे वाटते

  • महेश
   बदलत्या काळाप्रमाणे आपणही बदलणे गरजेचे आहे. एकट्या स्त्रीनेच काम करायचे म्हंटले तर कठीण होतं. म्हणूनच दोघांचाही सहभाग असणे गरजेचे आहे. संध्याकाळी नवरा टीव्ही पुढे, बायको किचन मधे असे दृष्य असण्यापेक्षा दोघंही किचनमधे गप्पा मारत काम करू शकतात. तेवढाच तर एकत्र वेळ मिळतो दोघांनाही, तो सत्कारणी लावावा…

 10. ajit says:

  आपला लेख खूपच आवडला. माझा खरं तर हा पहिलाच अनुभव आहे ब्लोगचा. छान वाटलं. तुमच्या लिखाणात एक सच्चेपणा आहे अन त्यामुळेच तो पट्कन मनात भरतो. असेच लिहित रहा आणि आम्हाला आमच्या मनातले अनेक विचार तुमच्या सोप्या भाशेत वाचता येउ देत.all the best for all your future blogs.

 11. गौरी says:

  काका, हॅन्डीकॅप करायला फरसा हातभार लावावा लागत नाही बायकांना … अगदी सहज, नकळात घडत जातं हे … सुरुवातीला उत्साहाने बरोबरीने काम करणार्‍या नवर्‍याने हळूच घरकामातून कधी अंग काढून घेतलं, ते जाणवतही नाही 🙂

  • गौरी
   हात भार लावाला लागत नाही, हे मान्य, पण मऊ दिसलं म्हणून कोपराने खणायचे ही पुरूषी वृत्ती आहेच . सुरुवातीला बायको काही करु देत नाही , मग तो स्वतःच काही करत नाही.

 12. एकदम पटेश… त्या चहाच्या कपाचं तर एकदमच पटलं 🙂

  बाकी तो बटन शिवायचा रोमॅंटीक अनूभव आम्हालाही मिळाला नाही 😉

  • हेरंब
   चहाचा कप चहा संपल्यावर स्वतः उचलून आत नेऊन ठेवण्यापेक्षा सोफ्याखाली सरकवण्यात आणि बाजूचा पेपर घेउन वाचत बसण्यात जी मजा आहे ती अनूभवावीच लागते, तरच समजेल त्यातला आनंद.

 13. pravin says:

  एकदम सही 🙂 मला तर आजपर्यंत चहा सोडला तर काही करता येत नाही, त्यामुळे घरात आमचा घास रे रामा झालेला आहे 🙂 आणि लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत एकदाही शर्टाचे बटन तुटलेले नाही त्यामुळे सौ त्या केस मध्ये कशा बिहेव करतील हे सांगता यायचे नाही. माझा हल्ली चहा दिवसाला ४ कप वर आला आहे नाहीतर अगोदर दिवसाचे १५-१६ कप व्हायचा 🙂

  • प्रवीण
   सोप्पं आहे, एकदा स्वतः बटनं तोडून पहा मग समजेल.
   चहा माझा अजूनही १५ एक कप तरी होतोच. घरी चार ते पाच कप, ऑफिसमधे ७-८ वेळ तरी होतोच. आणि संध्याकाळी घरी आल्यावर पुन्हा….

 14. Bharati says:

  Khup chaan lekh aahe…shevti aaple Panjoba, Aajoba, Baba, yanchya jamaana aani aapala jamaana yaat pharak hvaach naa?

  • Bharati says:

   Mahendraji ,..H.M.Maraathe yanche “Baalkand”vachale aahe ka? nasel tar ekada jarur vacha.

  • अर्थात, म्हणुन तर मी लिहिलंय की घरी मदत करतो भाजी चिरणे वगैरे वगैरे साठी… फरक ही काळाची गरज आहे , दोघंही नोकरी करतात तेंव्हा मदत ही करावी लागतेच. जसे मटर सोलणे, मेथी खुडणे वगैरे.. 🙂

  • बालकांड?? कशावर आहे हे? बघतो लायब्ररीत मिळेल तर..

 15. Vidyadhar says:

  काका,
  चांगलं तयार करता आहात आम्हाला. बॆचलर्स प्रशिक्षण अभ्यासक्रम. फक्त परीक्षा तेव्हढी घेऊ नका कधी….;)

 16. sahajach says:

  महेंद्रजी मस्त आहे पोस्ट… 🙂

  मलाही अमित नेहेमी म्हणतो आजकाल कायम ’हे कुठे ते कुठे’ वगैरे प्रश्न तुला विचारावे लागतात मला म्हणुन….. पुर्वी असे नव्हते असे त्याचे मत 😉 …

  तो ही त्याच्या आईला कायम स्वयंपाकात मदत करायचा….. आता मात्र ’मला पटत नाही तू केलेले काम’ या सबबीवर मी त्याची मदत बंद केलेली आहे…

  @विद्याधर….
  अरे परिक्षा तर तुला तशीही द्यायचीये लग्नानंतर आणि पेपर मात्र सोपा नसतो बरं…. म्हणुन ’सावधान’ म्हटले जाते 😉

  • तन्वी
   अगदी असच होतं.. एखादं काम घेतलं करायला की सरळ हातातून काढून घेतले जाते – मग ते कुठल्याही सबबीवर असो..
   मला पण सगळा स्वयंपाक करता येतो, पण हल्ली कधीतरी रविवारी एखादी भाजी करणे, इथपर्यंतच इन्व्हॉल्व्हमेंट असते. फार तर कोशिंबिरी साठी कांदे वगैरे चिरुन देणे इथपर्यंतच.

 17. bhaanasa says:

  हा हा…. आमच्या सासुबाई नेहमी म्हणतात, ” मी मुलांना चांगल्या सवयी लावल्या होत्या. तुम्ही दोघींनी येऊन त्यांना बिघडवले. ( लाडावले ) आता वैतागून काय उपयोग. ” खरेच आहे ते त्यामुळे आता काही बोलताही येत नाही. आजकाल थोडी फार परिस्थिती बदलतेयं हे ही नसे थोडके. बाकी मी ही पक्की चहाबाज. 🙂

 18. MEHARSHA says:

  mazya navaryala tumhi mhanata tya pramane lagna zale teva sagal yet hote parantu tyala swatachya padhatine wa upadesha karat kame karayachi saway hoti karan tyache kam mazya peksha perfact hote.updeshala kantalun me madat nakarali wa aata pashchatap hot aahe.
  nehami pramanech lekh khoop chan aahe.

  • हर्षा
   बहूतेक सगळ्यांचंच असं होतं. 🙂 अजूनही वेळ गेलेली नाही. कांदे टोमॅटो हातात द्यायचे कोशिंबिरीसाठी चिरुन द्या म्हणून. ही सुरुवात असते बस्स. एवढं झालं की पुढचं आपोआप होईल

 19. Kiran Birajdar says:

  Very good

 20. साधना कर्वे says:

  खरे आहे तुमचे. विशेषतः १९४०,५०,६० च्या दशकात स्त्रियांना अशा पद्धतीने दाखवण्यात आले आहे.

  • साधना
   ब्लॉग वर स्वागत, आणि प्रतिक्रियेसाठी आ्भार. अहो , दूर कशाला, आजही संध्याकाळच्या टीव्ही वरच्या सिरियल्स पहा, त्याच प्रकारच्या स्त्रिया दाखवल्या जातात. स्त्री चे आयडीयल रुप समजले जाते हे.. 🙂 असो. प्रतिक्रियेसाठी आभार.

 21. Guru says:

  नवरा म्हणजे त्यांना एक नवीनच खेळणं वाटत असतं

  \(“o”)/……….. …. मज्जा आली काका, अजुन असे काही जुने असतील तर मला लिंक्स मेल कराना प्लिज, ह्या वर्षा अखेर “एंगेजमेंट” तरी करायचीच असे मातोश्रींचे फ़रमान आहे, बोधामृत मोस्ट वेल्कम…..!!!!

  • अरे बऱ्याच आहेत, तू सगळ्या जून्या पोस्ट्स वाचलेल्या नाहीत वाटतं? थांब अजून एक आहे देतो तुला. 🙂 मुलगी पाहिली की पहायची आहे अजून?

 22. Santosh Kudtarkar says:

  Swatachi ashihi baju mandanycha tumcha no Nirbhid approach ahe na Kaka… Walllah!!!

  Jiyo Jiyo!!! Mastach lihilay apan.

  Maza lagna zalela nahiye ajun… Pan ase Ganpati amchya ghari pan ahet… Dozon bhar ahet!!! 🙂

  Mi tasa na honyacha pramanik prayatna jaroor kareen… 😀 😉

  • संतो्ष
   खरं काय ते लिहिलं आहे. एक परफेक्ट गणपती तयार झालोय २५ वर्षात.. 🙂
   आणि तु तसा न होण्याचा प्रयत्न कर.. काय हरकत आहे प्रयत्न करायला? लग्नानंतर एक वर्षाने पुन्हा कॉमेंट टाक याच पोस्ट वर.

 23. अरे वा ! सर लग्नाचा आधीच माझा ज्ञानात भर पडलीत बर झालं 😉 , मी अजिबात नवीन गुळाचा गणपती तयार होऊ देणार नाही 😛 😛 😛 😛

 24. deopramod says:

  गुळाचा गणपती बनायचं की नाही ते आपल्यावर असतं…तरीही कुणी सेवा करतोय(इथे लाड म्हणायचंय खरं तर) म्हटलं की आपल्यालाही जरा बरं वाटतं.
  मी हे सर्व अनुभवलंय…बायकोकडून ही अशी सगळी कौतुकं करून घेतलेत…आणि ते अंगावर बटण शिवणं वगैरे…तेही किती तरी वेळा झालंय. 🙂
  लहानपणापासून आम्हा भावंडांना आईनेच जेवण बनवायला शिकवले होते..माझे वडिलही, तांदूळ निवडून देणे,गहू साफ करणे,भाज्या साफ करून निवडून देणे, चटण्या-कोशिंबिरी करणे…इत्यादि कामे करत..त्यामुळे आम्हा मुलांनाही ती सवय लागली….तरीही बायको आल्यावर तिने मुद्दामहून मला काही करू दिले नाही..मात्र तिच्या बाळंतपणात आणि नंतर आजारपणात मीच सगळं करत होतो…हे सांगण्याचा उद्देश असा की…आपण गुग व्हायचे की नाही…किती व्हायचे हे आपल्यावरच आहे.
  लेखन बाकी वास्तववादी आहे…नव्या पीढीने हे लक्षात ठेवायला हवंय.

  • प्रमोदजी
   अहो, कोणी इतके लाड करते आहे म्हंटलयावर कोण नको म्हणेल? लग्नानंतर काही वर्षांनी ह्या गोष्टीची जाणीव होते, आणि मग थोड्या फार प्रमाणात घरामधे मद्त करणे सुरु होते. 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s