प्रवास- नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात!

नकाशा

२ मार्च १९६७. एका शेतकऱ्याने कोर्टा कडून आदेश मिळवला, की एक जमिनीचा तुकडा त्याच्या मालकीचा आहे, आणि त्यावर तो शेती करू शकतो . त्या तुकड्यावर पुर्वी एका जमीनदारांचा ताबा होता.  तो शेतकरी  शेतावर गेला आणि काम करणे सुरू केले, तर गावच्या जमिनदाराच्या गुंडांनी त्याला खूप मारपीट केली आणि पळवून लावले.

त्या  गावचा जमीनदार  लोकांकडून वेठबिगारीवर कामं करून घ्यायचा.स्त्रियांवर अत्याचार करायचा. लोकांची जमीन बळकावून  बसलेला होता. ही एका  जमीन बळकावण्याची घटना ,   त्या जमिनदाराने  बाहूबलावर दाबून टाकली असती.. पण असे झाले नाही .. !!!आणि  एक संघर्ष सुरु झाला.

ही एखाद्या हिंदी सिनेमाची स्टॊरी नाही.दार्जिलिंग आणि सिलिगुडीच्या दरम्यान असलेल्या ’नक्षलबाडी’ नावाच्या गावची कहाणी आहे ही. ही चळवळ  या गावापासून सुरू झाली म्हणून त्याला ’नक्षलवाद’ नांव पडलेले आहे..

कानू सन्याल, चारू मुजुमदार नावाचे   व्हाईट कॉलर्ड कम्युनिस्ट नेते  (कम्युनिस्ट पक्षात्त पुरेसे महत्व न मिळाल्याने )तिथे पोहोचले, आणि तिथल्या आदिवासी लोकांना एकत्र करुन नक्षलवादी चळवळ सुरु करून  त्या जमिनदाराने बळकावलेल्या जागांवर पुन्हा ताबा मिळवला.केवळ धनुष्य बाण , भाले इत्यादींचा वापर करून तिथल्या जमीनदाराचा निःपात करण्यात आला. या मधे एक सब इन्स्पेक्टर आणि ९ आदिवासी मारले गेले- आणि सोबतच तो तिथला जमीनदार पण मारला गेला.

एकदा सशस्त्र क्रांतीला यश मिळाल्यावर, तिथल्या त्या गृप ला ( नक्षलबाडी गृप) काहीच काम शिल्लक राहिले नाही. आपल्याच ह्या  प्रुव्हन गेम प्लान वर खूश होऊन  सिपीआयएम ने हाच प्लान  बिहार, बंगाल, आणि आंध्रामधे पण ट्राय करायचा   ठरवले- आणि त्या भागात पण  नक्षलवाद रुजवला. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी कारणं होती, पण समानता एकच होती, ती म्हणजे  सशस्त्र चळवळ!  नक्षलवाद!!!

नक्षलबाडीच्या लोकांच्या  हातामधे आलेली शस्त्र  म्हणजे ’शक्ती’ आणि शक्तीचा त्याग करणं   कदाचित त्यांना कठीण झाले असावे , आणि मग त्यांनी बंगालच्या इतर भागात नक्षलवाद फोफावला.   नक्षलवादाने आजचा चेहेरा स्वीकारण्याचे हेच कारण असावे का? त्याच काळात “ऑल इंडीया कोऑर्डीनेशन  कमिटी फॉर रेव्होलेशन (सिपीआय – एम) “ने ह्या नक्षलवादाला भारताच्या नकाशावर आंध्र आणि दक्षिण भारता सोबतच बिहार मधे पण पोहोचवले.

नक्षलवाद हा कम्युनिस्ट आउटफिटचाच एक निराळा चेहेरा आहे. आता कम्युनिस्ट जरी आपले हात झाडत असले तरीही याचे निर्माते तेच आहेत हे विसरता येत नाही.  रेड बुक जेंव्हा त्यांच्या हातात दिले, तेंव्हाच ते लोकं कम्युनिस्ट पार्टीशी जोडले गेले होते. असो.

कामानिमित्य नक्षलवादी भागामधे गेल्या २० वर्षात  अनेकदा   जावे लागले . हल्ली जरा जाणे  कमी झाले आहे, पण पुर्वी मात्र सारखे जावे लागायचे. इतका फिरलो पण कधीच भिती वगैरे वाटली नाही  या लोकांची. रायपूर ते जगदलपुर ,बेलाडिला या भागामधे तेंव्हा नक्षलवादी प्रभाव नुकताच सुरु झालेला होता. रायपूर ते जगदलपूर रस्ता खूप खराब होता. बसने  सकाळी बसल्यावर संध्याकाळ व्हायची तिथे पोहोचायचो. तिथे डिआरडीओ ची एक साईट होती, तसेच बैलाडीला माइन्स मधे पण बरेचदा काम असायचं.

आंध्रा पासुन जवळ असलेला न जगदलपूर हा भाग, फक्त नावालाच मध्य प्रदेश मधे होता. ( तेंव्हा छत्तिस गढ वेगळे राज्य नव्हते) . नक्षलवाद अगदी कमी प्रमाणात होता त्या भागात. पण आदीवासी लोकांचे होणारे शोषण  आणि एमपी शासनाचे पुर्ण  दुर्लक्ष ( एमपी शासन केवळ भोपाळ, इंदोरच्याच विकासाकडे लक्ष देत होते)  इथले सगळे रिसोअर्सेस वापरायचे, विज, कोळसा, अल्युमिनियम वगैरे, आणि त्यातून मिळणारा  पैसा भोपाळ, इंदौरच्या विकासाला वापरायचा- या भागाकडे झालेल्या दुर्लक्षाचा चा  फायदा   या भागात   नक्षलवादाचा प्रभाव वाढण्यात झाला.

छ.ग. मधे नेहेमीच कुठेतरी नक्षलवादी हल्ले आणि चकमक होत रहायची. पण त्यांनी सामान्य जनतेला कधी त्रास दिला नाही. पण एखादा जर पोलिसांचा इनफॉर्मर असला तर मग त्याला मात्र दयामाया न दाखवता मारुन टाकायचे.

बऱ्याच वर्षापुर्वी एकदा रायपूरहून जगदलपूर ला जायला निघालो होतो. सोबत माझा जुना बॉस पण होता,  म्हणुन एक ऍंबेसेडर टॅक्सी पण केली होती.तेंव्हा मी नागपूरला होतो, त्यामूळे मला नेहेमीच त्या भागात फिरण्याची सवय होती, पण बॉस मुंबई हून आला होता, आणि इतकं काही त्याने ऐकलं होतं की खूप टेन्शन मधे होता पुर्ण वेळ. एके ठिकाणी चहा प्यायला थांबलो तेंव्हा त्या चहावाल्याने खूप चौकशी केली, कोण, कुठले, कशाला आलात वगैरे.. या नक्षलवादी लोकांचं नेटवर्क फार स्प्रेड झालेलं असतं. हे असे चहा वाले, कींवा दुकानदार लोकं त्यांचे इन्फॉर्मर्स.

चहा वाला शेवटी म्हणाला, साहब, अगली बार सफेद ऍम्बेसेडर लेकर मत आना. सफेद कार मतलब, सरकारी कार ऐसा समझते है यहा नक्सलाइट लोग, और अननेसेसरी आपको तकलिफ होंगी. इकडल्या भागात अधुन मधुन लॅंडमाइन्सनी कार वगैरे उडवल्या अशा बातम्या येतच असायच्या. नशिब चांगलं की, तेंव्हा   काही झाले नाही, काम आटोपून सुखरुप रायपूरला परत आलो आम्ही, पण  नो व्हाईट ऍम्बी ही  गोष्ट लक्षात ठेवायची हे ठरवलं. ऍम्बी इज ऑलवेज कोरिलेटेड विथ द पॉवर, ऍग्रेशन …

राजनंदगांव मानपूर रोडचे काम सुरु आहे- जवळपास ११३ किमी चा हा रस्ता अगदी नक्षलवादी लोकांच्या बालेकिल्ल्यात जातो.  हा भाग बालाघाट जिल्ह्यात येतो म्हणजे राजनंदगाव पासून पुढे ३० किमी गेल्यावर डावीकडे वळून ५० किमी अंतरावर एक गांव आहे मोहला म्हणून. तिथेच मायटास इन्फ्रास्ट्रक्चर्स या कंपनीची साईट होती.  तिथे एक क्रशर प्लांट, एक हॉट मिक्स प्लांट लावलेले होते. इथे काम करणे फारच अवघड . नक्षलवादी लोकांनी काय कारण आहे ते माहिती नाही, पण काही मशिनरी आग लावुन जाळून टाकले , म्हणून मी तिथे बघायला गेलो  होतो.

राजनंदगांव पर्यंत नॅशनल हायवे  असल्याने प्रवास चांगला झाला. पण एकदा हायवे सोडून त्या नक्षलवादी भागात शिरलो. पहिले दोन तीन लहान गावं दहा पंधरा किमी च्या दरम्यानच पार केले.  तो पर्यंत  कुठेही नक्षलवादाचा प्रभाव दिसला नाही.  पण  संपूर्णपणे रिकामे रस्ते बघून आश्चर्य वाटले. रस्त्यावर कोणी चिटपाखरूही  दिसत नव्हतं.

या आदिवासी भागात अजूनही बेसिक सुविधा म्हणजे दळणवळणाची साधने नाहीत. रस्ते पण अतिशय खराब आहेत. नवीनच रस्त्यांची कामं कॉंट्रॅक्ट वर देण्यात आलेली आहेत. असेही समजले की इथे कॉंट्रॅक्टर्स लोकांना नक्षलवाद्यांना पैसे  द्यावे लागतात. नाहीतर मशिनरी पेटवून, कामगारांना मारहाण करणे वगैरे केले जाते.

रस्त्यावर एके जागी  बिसलेरीच्या बाटल्या मांडून ठेवलेल्या दिसल्या म्हणून कार थांबवली आणि बाटल्या विकत घेतल्या. विचारलं की आज ट्राफिक क्युं नही? तर तो  दुकानदार म्हणाला, की” आज  नक्सल लोगोंका बंद है, इसलीये  ट्राफिक बिलकूल नही . युजवली इधर प्रायवेट शेअर जीप चलता है.”

नक्षलवादी लोकं आपला बंद पुकारतात. त्या बद्दल कुठल्याही  पेपरमधे वगैरे काही जाहिरात नसते, पण त्या भागात रहाणाऱ्या सगळ्याच लोकांना या बद्दल माहिती कळते.शंभर टक्के दुकानं, शेअर जीप वगैरे  बंद होत्या. दुकान दाराशी बोललो तर  तो थोडा घाबरतच बोलत होता. म्हणाला, “आपकी गाडी यहांसे क्रॉस करेगी , अब आपके गाडीका नंबर भी आगे तक पहूंच गया होगा. नक्सवादीयोंका बहुते कंट्रोल है इस वि्भाग मे. जो भी कुछ होता है, सब कुछ उ्नको पता होता है”.

काम आटोपलं आणि मी परत निघालो, तर ज्या रस्त्यावरुन इथे साईटला पोहोचलो होतो त्याच रस्त्यावर एक झाड पडलेले दिसले. ड्रायव्हरने कार थांबवली. शेजारच्या जंगलातून पाच सहा माणसं  ( कुपोषित दिसणारी )हातामघे कु्ऱ्हाडि वगैरे घेउन समोर आले. दोघा – तिघांच्या हातात तर चक्क बंदुका पण दिसत होत्या.    मी उ्तरणार, तर ड्रायव्हर म्हणाला आप रुको, मै बात करता हूं.

ड्रायव्हरने सांगितले की मायटास जाके आये म्हणुन . मी तसा घाबरलो होतोच- पण चेहेऱ्यावर तसे दिसू नये याची काळजी घेत होतो.क्षणात बायको मुलींचा चेहेरा डोळ्या समोरुन सरकला. सिरियसनेस चांगलाच लक्षात आला होता.  एकदम हेल्पलेस फिलिंग होतं – आपण स्वतः, आपलं आयुष्य दुसऱ्या कोणाच्या तरी हातात आहे ही गोष्ट विचार करुन पहा – मग समजेल. चिकनच्या दुकानात त्या पिंजऱ्यात असलेल्या कोंबडीला कसे वाटत असेल ते लक्षात आलं एका क्षणात!!

माझी खिडकी खाली केली. आणि बाहेर बघु लागलो. तो बंदुक घेतलेला माणुस समोर आला, म्हणाला , इन्शुरन्स कंपनीसे हो क्या? मायटास मे क्युं गये  थे?  सगळं एक्स्प्लेन केलं की मशिनरीच्या सामानाच्या ऑर्डर साठी आलो होतो म्हणुन. बऱ्याच वेळाने त्याची खात्री पटली  असावी,   त्यांच्यातच आपापसात बोलणं झालं आणि ते झाड बाजूला सरकवून    आम्हाला जाउ देण्यात आलं.

साधा धनुष्य बाण , भाले घेउन सुरु झालेली चळवळ, नंतर पाइप गन्स, ( घरी बनवलेली गन) , देशी हॅंड्ग्रेनेड्स वगैरे करता करता आता मात्र एके ५६ , रॉकेट लॉंचर्स पर्यंत पोहोचली आहे, अजूनही या लोकांचे जे पोलिसांना गोळ्या घालून मारण्याचे आणि सामान्य जनतेला वेठीला धरण्याचे , शासकिय संपत्ती जसे रेल्वे वगैरे उडवून द्यायचे जे   सत्र सुरु आहे त्याला चळवळच म्हणायचं कां- की देशद्रोह?? हा प्रश्न मला नेहेमीच छळत असतो.

अजूनही छ.ग. मधे झाले्ली चकमक या बद्दल वाचतो ,तेंव्हा तो प्रसंग डोळ्यापुढे उभा रहातो. आणि वाटतं की – जर आम्हाला सोडलं नसतं तर??

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , , , , , , , . Bookmark the permalink.

42 Responses to प्रवास- नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात!

 1. Pingback: Tweets that mention प्रवास | काय वाटेल ते…….. -- Topsy.com

 2. sahajach says:

  महेंद्रजी पुन्हा एकदा एक वेगळा अनुभव मांडलात….

  असे अनुभव जीवनाकडॆ बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकतात आपला……
  गेल्या वर्षी तुम्ही असेच अनुभव सांगणाऱ्या काही पोस्ट टाकल्या होत्या त्यांची आठवण आली हे पोस्ट वाचताना…

  • तन्वी,
   ही गोष्ट इतक्यातलीच म्हणजे साधारण दिड वर्षा पुर्वीची आहे. ही घटना विसरून जायची इच्छा होती, म्हणून असेल की कधी लिहावंसं वाटलंच नाही यावर. पण हा लेख लिहितांना आपोआप ही आठवण लिहिल्या गेली.

 3. Pingback: वल्लीगळ » GuruVision

 4. ngadre says:

  thararak. Kaay jhale asel tumache tya veli. Baap re.

  Mee tar ase aikale ahe ki ashi machine vagaire related kame karanaryanahee poorvee target kele jayache. Shivay machines petvoon dyayche. Ka tar area madhe pragati vikas jhala tar yana adchaniche hoil mhanoon..

  • हो, असेही होते बरेचदा. पण ते पुर्वांचलात- छ. ग. मधे अजून तरी अशासकीय लोकांना मारल्या गेलेले नाही . तिकडे एका कंपनीच्या सर्व्हिस इंजिनिअरला पळवून नेले होते, आणि नंतर कंपनीने पैसे दिले नाहीत म्हणून मारून टाकण्यात आले. कंपनीचे नांव मुद्दाम लिहित नाही, पण या घटने नंतर त्या कंपनीने आणि इतर बऱ्याच कंपन्यांनी पुर्वांचलात ( मिझोराम, नागालॅंड भागात) वॉरंटी देणे बंद केलेले आहे. 😦

 5. मनोहर says:

  कम्युनिस्टानी बंगालचा सुभा मिळविण्यासाठी खाणमालकानी आपल्या बेकायदा धंद्यांना संरक्षण देण्यासाठी उभारलेल्या या बेकायदा फौजेची मदत घेतली. नक्षलबाडी त्यानंतरची घटना आहे.

 6. ऋषिकेश says:

  हे वाचून असे वाटते कि तेथील लोक रोजच जीव मुठीत घेऊन जगात असतील…
  ह्या naxalite लोकांचा त्रास कमी किवां बंद व्हावा म्हणून सरकार काही करत नाही का…? लष्कर तैनात करून हा त्रास कायमचाच का नाही बंद करत… ?
  राजकीय फायद्यासाठी naxalite लोकांना पोसणे चालू आहे बाकी काही नाही…

  • सर्व सामान्य लोकांना फारसा त्रास नसतो. फक्त कधी तरी निरोप येतो रात्री १३ लोक जेवायला येतील, चिकन बनवून ठेवा वगैरे.. बस्स इतकंच..
   या शिवाय जास्त त्रास काही देत नाहीत ते . कारण त्यांना कल्पना आहे की जर सामान्यांपासून दुरावले तर ताबडतोब पकडले जातील.
   लष्कर तैनात करणॆ.. मला पण हाच मुद्दा कोणीतरी उचलेल म्हणून अपेक्षित होते . यावरच तर सध्या गदारोळ सुरु आहे सगळीकडे. अरे एका विरप्पनला पकडता पकडता कर्नाटक, तामिलनाडूची वाट लागली होती.. आठवतं कां- राजकुमारचे अपहरण??

 7. madhuri says:

  MAharashtrat rahanaryana kalpana yet nahi aslya jeevanachi….apan wachto batmya ani sodun deto

  Suruwat barbar karnasathi zali ase mhanave lagel…nantar kay roop zale te bhayanak ahe

  • सुरुवातीचे कारण सुद्धा योग्य म्हणता येत नाही. इथे राज्य शासनाची नाकर्तेपणा हा मुद्दा दिसून येतो. एखादे राज्य शासन बरोबर काम करीत नाही म्हणून कायदे हातात घेणे कधीच मान्य केले जाऊ शकत नाही.
   राज्य शासनाने जर जमीनदार लोकांच्या विरुद्ध काही ऍक्शन घेतली असती तर इतक्या विकोपाला हे प्रकरण गेलेच नसते.

   केवळ त्या कानू आणि चारूला पोलिटीकल मायलेज मिळत नव्हते म्हणून त्यांनी ही खेळी खेळली.

  • मला आठवतं, आमच्या इकडे रहाणारे एक पोलिस अधिकारी बदली होऊन चंद्रपूरला गेले होते, ते तिकडून परत आलेच नाहीत. सर्वांना माहित होतं की त्यांना आलेला मृत्यू हा अपघाती मृत्यू नाही पण त्यापलिकडे जाऊन कुणाला त्यांच्या मृत्यूचा छडा लावावासा वाटला नाही. त्यांचा मृत्यू झाला, तेव्हा त्यांचा मोठा मुलगाच सहावीत होता. आज नक्षलवाद वगैरे विषयाची चर्चा करताना त्यांच्या मृत्यूची बातमी आठवल्यावाचून रहावत नाही.

 8. वा अनुभव आणि लिखाणाची शैली फारच आवडली. खरंच.
  कम्युनिस्ट चष्मा घालून ’काम’ करताना लोक कधीकधी खरी गरज कशाची आहे हे विसरतात, आपलं नक्की ध्येय काय होतं काम सुरू करताना हे विसरतात… या काही गोष्टी थोड्या जवळून बघायला मिळाल्या होत्या. त्याचंच बरोबर विरूद्ध टोक हे असेल का? कुठल्याही बाजूला कार्यकर्ता झुकला तरी चाल विनाशाचीच ना!

  आणि हो चळवळ की देशद्रोह हा तर वेगळाच आणि फार मोठा प्रश्न समोर आणलात तुम्ही. इंग्रजांविरूद्ध बंड पुकारताना पूल उडवून देणे, विजेचा खांब कापणे, रेल्वेचा अपघात घडवणे, पगाराची कॆश लुटणे, संसदेत बॊम्ब फोडणे हे सगळे उद्योग आपण देशासाठी क्रांति या खाली गणतो मग आता काय आणि कसं वेगळं झालं? असं तर्काने आपण मांडू शकत असलो तरी मनाला पटत नाहीच…

  • कम्युनिस्टांच्या बद्दल लिहितांना थोडा मनाला आवर घालतो मी- उगिच जास्त हार्श लिहिले जाऊ नये म्हणून.१९६२ मधे जेंव्हा चायना ने आक्रमण केले होते तेंव्हा आमचे मुक्तीदाता आले त्यांचे स्वागत करा -असं म्हणणारे जोती बसू आणि भाई डांगे वगैरे मंडळीं बद्दल मला अजिबात आदर नाही. असो, विषयांतर होतंय. कदाचित मी एक्स्ट्रीम राइटीस्ट असल्याने लेफ्टीस्ट विचारधारा मला कधीच पटलेली नाही .

   जस्ट फॉर डिस्कशन असं समजलं की त्या नक्षलवादी लोकांचे बरोबर होते, पण त्या सावकाराचा पाडाव केल्यावर शस्त्र खाली न ठेवता हे नवीनच नक्षलवादी कम्युनिस्टांच्या छत्रछायेखाली बंगालभर पसरले. नेमकं इथेच आणि हेच चुकलं.

   समाजाने हातात शस्त्र घेतले की लोकशाहीचा अंत निश्चितच जवळ आलाय असे समजावे. पोलिस, अर्ध सशस्त्र बल, यांचे काम आहे लोकांचे रक्षण करणे, जेंव्हा लोकं हातात शस्त्र घेतात, तेंव्हा शासकिय यंत्रणा बरोबर काम करीत नाही हा अर्थ असतो. लोकांनी केलेला तो उठाव किंवा क्रांती नसते नसते- तर देशद्रोहच असतो. अशा परिस्थिती मधे गेली कित्येक वर्ष बंगाल मधे निवडुन दिल्या जाणारा पक्ष हा कम्युनिस्ट कसा असतो ?? हा प्रश्न पण पडतो.
   आपण लोकशाही साठी अजून पुर्ण तयार झालेलो नाही का?की लोकशाही मधल्या आपल्या अधिकाराचा म्हणजे मतदानाचा वापर योग्य रीत्या कसा करायचा हे आपल्याला अजूनही समजलेले नाही का ?हा प्रश्न तर नेहेमीच पडतो.

   इग्रजांच्या काळात संसदेवर बॉंब हल्ला झाला, तेंव्हा शासक हे परकीय होते- आज आपलेच आपणच निवडुन दिलेले शासक आहेत – आणि हाच एक मोठा फरक आहे नक्षलवाद्यांच्या आणि त्या काळच्या स्वातंत्र्य सैनिकांच्यामधे

   • मी पण राइटीस्टच आहे. कदाचित प्रखर राइटीस्ट नसेन पण उजव्याबाजूकडेच कल आहे आणि नक्षलवादाचं समर्थन कधीच करू शकणार नाही.
    माझ्या पहिल्या पॆरामधे मी लिहिलंय ते खूप खूप प्रयत्नाने अनेक काही प्रत्यक्ष बघितलेल्या गोष्टी लपवत लिहिलंय.

    बाकी माझा दुसरा पॆरा हे केवळ ’लाउड थिंकिंग’ आहे माझं. विचारांती बनलेलं मत नव्हे.

    शासक परकीय आणि स्वकीय एवढ्याच फरकावर आपण एका प्रकारच्या हिंसेचं समर्थन आणि एका प्रकारच्या हिंसेला दहशतवाद समजणे हे बरोबर आहे की नाही हा माझा मलाच बरेच दिवस सतावणारा प्रश्न आहे. उत्तर कधी या बाजूला कधी त्या बाजूला.

    असो..
    खूप लिहिलं. आता बास.

 9. bhaanasa says:

  बापरे! तुझी काय अवस्था झाली असेल……देवाचे आभार. कुठे एका छोट्याश्या घटनेने सुरू झालेली ही क्रान्ति आज किती भयंकर रुप धारण करून नासूर झाली आहे.

  • त्या अर्ध्या तासा मधे मी तर सगळ्या आठवतील तितक्या देवांना आठवून घेतलं होतं. दुसरं काहीच करू शकत नव्हतो.

 10. justtypeamruta says:

  किती भयानक… अश्या वेळी आपण किती हेल्पलेस होतो, देवावर विश्वास ठेवायचा न पुढे जात राहायचं.

  • आपण किती ’लहान’ आहोत हे प्रकर्षाने जाणवते. समोर हातामधे कुऱ्हाड धरुन उभा असलेला माणूस यमदूता पेक्षा कमी वाटत नाही.

  • आपण किती ’लहान’ आहोत हे प्रकर्षाने जाणवते. समोर हातामधे कुऱ्हाड धरुन उभा असलेला माणूस यमदूता पेक्षा कमी दर्जाचा वाटत नाही.

 11. Vidyadhar says:

  एकदम थरारक काका. असे अनुभव आयुष्यभर साथ करतात!
  आणि चळवळ की देशद्रोह हा प्रश्न तेव्हाच निकालात निघाला जेव्हा फ़क्त ल वेधून घेण्यासाठी कुठलेही तारतम्य न ठेवता, सरसकट १००हून अधिक पोलिस, सीआरपीएफ़वाले मारणे चालू ज़ाले.

  • अगदी खरं आहे तुझं. आणि जेंव्हा त्यांच्यावर कारवाई करण्याची वेळ आली, तेंव्हा आपले राजकीय नेते त्यांच्यावर अटॅक करायचा की नाही?आणि केला तर कसा करायचा? हेच मिडीया समोर (?? कित्ती शहाणे आहेत नां हे सगळे आपेल नेते ??)उगाळत बसले होते.
   संताप होतो जीवाचा. ( वांझोटा संताप)

 12. mazejag says:

  जबरदस्त….वाचताना अंगावर काटा आला.

 13. बापरे. भयंकर प्रसंग …

  आणि ही कसली चळवळ? ही चळवळ नाहीच हा तर शुद्ध देशद्रोह !!

  • भारतात राहून भारतीय शासकीय यंत्रणा जसे पोलिस वगैरे विरुद्ध लढण्यासाठी ट्रेनिंग कॅंप्स चालवणारे हे भारतीय (!!) बघितले की हे जे काही सुरू आहे ते योग्य नाही.. एवढे मात्र नक्कीच जाणवते. च

 14. भयंकर..कल्पनाच करवत नाही तुम्ही तो प्रसंग कसा निभावला असेल…
  पण ह्या नक्षलवादी ग्रूप्सना खूप राजकारणी लोक आतून पैसा पुरवढा करतात त्यामुळेच तर ह्याना बंदी आणन कोणालाच जमला नाही…

  • वर लिहिलंय बघ, साधा धनुष्यबाण घेउन सुरु झालेला हा लढा आता एके ५६ , आणि रॉकेट लॉंचर्स पर्यंत पोहोचला आहे.. यांना पैसा कुठुन मिळतो हे पण एक ओपन सिक्रेट आहे. नेपाळाच्या धुलाबाडी बॉर्डरवरून भारतामधे चीनी हत्यारं आणली जातात.
   या सगळ्यामागे कोणाचा हात आहे हे अगदी उघड सिक्रेट आहे !!

   • मघाशीच बझ्झवर लिहिलं की ड्रॅगन आता सुधारलाय. आक ओकत उडण्यापेक्षा जमिनिखाली सरपटत दुस-याच्या घरात शिरणं जास्त सोपं आहे, हे त्याला समजलंय.

 15. सागर says:

  खूप माहितीपूर्ण लेख आहे..अन तो प्रसंग तर खरच भयानक..

 16. Aparna says:

  काका, अगदी मुद्देसुद लेख झालाय..ही माहिती (म्हणजे नक्षलवादाची सुरुवात इ.) मला तरी नवीच होती..
  तुमच्यावरचा प्रसंग जीवघेणाच म्हणायचा…
  आपल्या देशातल्या प्रत्येक कोपर्‍यात काहीना काही वाद सुरु आहेत कधीकधी वाटतं अनेकता में एकता बिकता काही खरंच असतं की सगळ्या वेगळ्या चुलीच बर्‍या?? या सगळ्या व्यापात आपली प्रगती खुंटतेय आणि राजकारणी आपलं मुसळ पांढरं करताहेत बास….

 17. Santosh says:

  Boss….

  Hat nahi ahe ata dokya war… asti na tar fakta “Hats Off” nasta kela, tar ti swatachya payane tudawli pan asti.

  Kasla danger experience ahe ha…

  Maza ek snehi Kolkata IIT madhe ahe… Hi ata recently ji Train chi ghatana zaliy… Tya train ne Mumbai la yenaar hota.

  Ain weli ticket confirm zala nahi mhanun, wimanae alai… Sukharooop.

  Really it’s horrible… Aplya swatachya SWATANTRA deshat apan kiti SWATANTRA ahot asa wichar yeto…

  Konihi pakadawa ani Gun-point war gyawa, itke swasta prani ahot ka apan sare???

  😦

  • खूप घाबरलो होतो मी स्वतः पण.. काहीच करता येत नव्हते!
   आणि तुमच्या मित्राचे नशिब चांगले म्हणुन वाचला. नशिब सगळ्यात महत्वाचे!

   • Santosh says:

    Ho Nashib ahech ki…. Pan tumcha nahi

    Te amchya sarkhya fukatya wachakancha…. nai tar ase saras blogs wachaila kase milale aste 😀

    Dhanyawad devache ani tumche sudhha!!!

    • संतोष,
     तसे नाही हो.. तुमच्यासारखे वाचक आहेत, म्हणुन तर लिहिण्याचा उत्साह शिल्लक आहे अजून तरी.. 🙂

 18. विलक्षण अनुभव! तुमची काय स्थिती झाली असेल, त्यावेळेस याची कल्पना नाही करता येणार. नक्षलवादाचा उगम आज कळला. हे लोक तत्वनिष्ठ असतात, स्त्रीयांवर अत्याचार करत नाहीत असं ऐकलं आहे, ते खरं आहे का?

  पॉवर कुठल्याही माणसाला नशा आणतेच मग ती हत्याराची पॉवर असो नाहीतर सत्तेची. नक्षलवादाची सुरूवात पहाता स्वत:च्या अस्तिवासाठी दिलेली ही लढत होती. पण एकदा हा पॅटर्नच यशस्वी ठरतोय म्हटल्यावर त्यात अनेक रंग भरले गेले आहेत. आजचा नक्षलवाद पहिल्या वेळेइतकाच प्युअर आहे का, हेही माहित नाही.

  • ही गोष्ट घडल्यावर घरी आल्यावर मी काही दिवस खूप अपसेट होतो. घरी पण काहीच सांगितलं नाही, पण एक दिवस जेंव्हा फोन आला साईटवरून तेंव्हा प्फोनवरच्या बोलण्यावरून घरी समजले. खरंच अतीशय कठीण दिवस आहेत सध्या. आपल्याला मुंबई पुण्याला बसून कळत नाही तिथली परिस्थिती.

 19. prasaad says:

  प्रिय महेन्द्र,
  बरेच दिवस मला हा प्रश्न पडला होता कि नक्शलवाद हा शब्द कोठुन आला असेल. मला माझ्या प्रश्नाचे उत्तर आज सापडले तसेच इतर उपयुक्त माहिती मिळाली.
  हिंसाचार कसलाही, तो कधीच समर्थनीय नाही, अपवाद परकिय इंग्रजी सत्तेविरुद्ध स्वातंत्र्यासाठी केलेली चळवळ.
  धन्यवाद.
  प्रसाद१७०८

 20. cd deshpande says:

  15/20 varshapurvicha dilipkumarcha ‘sageena mahato’ ……
  tyananatar3/4 varshpurvicha aamirkhancha “sarfarosh”……..
  ya donhi chtrapatala masala vaja karoon bagha ……-naxalvad kalel
  ………ani naxalvadi kasa tayyar hoto he pahayche asel tar om pur ani smita patilcha “aakrosh” bagha.
  aaplya cinemavalyanni hee smasya aadhich olakhali aahe. aapan surakshit madhyamvargeey yavar fakt blogging karnar.

  • चंद्रकांत
   ब्लॉग वर स्वागत! आणि प्रतिक्रियेकरता आभार.
   मी स्वतः सिलिगुडी, बागडॊगरा , फुन्शिलिंग , या भागात नक्षलवाद अगदी जोरावर असतांना ( १९८४ मधे) नौकरी केलेली आहे. चक्क दिड वर्ष काढलं तिथे. तसेच या छत्तीसगढ भागातही दहा वर्ष फिरलोय. तेंव्हा यांचे आयुष्य अगदी जवळून पाहिलेले आहे.सिनेमामधे जे दाखवलंय ते आणि प्रत्यक्षातलं जिवन यात खूप अंतर आहे. सिनेमावाल्यांनी समस्या ओळखली पण आपल्या राजकीय नेत्यांनी नाही हे दुर्दैव.. आपलाच एक राजकिय पक्ष याचं समर्थन करतो हे दुसरं दुर्दैव!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s