जनगणना- दुसरी बाजू

जनगणना

गेल्या साठ वर्षातली ही अकरावी जनगणना सुरु आहे सध्या.म्हणजे साधारण ३० वर्षाच्या नोकरी मधे सहा वेळा हे काम करावे लागले लोकांना.    काही दिवसा पुर्वी एक लेख लिहिला होता याच ब्लॉग वर. जनगणनेचे काम दर वेळी शासकीय कर्मचाऱ्यांच्या ( शक्यतो शिक्षिका, शिक्षक, प्राध्यापक) गळ्यात पडते . ह्या कामाकडे एक महत्त्वाचे काम म्हणून न पहाता एक डोकेदुखी म्हणून पाहिले जाते.शिक्षकांना उन्हाळ्याच्या सुट्या, ख्रिसमसच्या सुट्या वगैरे भरपूर असतात. शिक्षक हा जबाबदारीने काम करणारा ,म्हणूनच कदाचित ही अशी   कामं त्यांना दिली जात असावी.

जनगणनेचे काम म्हणजे नेमकं काय? थोडक्यात  भारताची लोकसंख्या फिजिकली मोजायची.   प्रत्येक जनगणना करणाऱ्या  अधिकाऱ्यास काही ठरावीक घरं दिली जातात. प्रत्येक घरी फिजिकली जाउन रहाणाऱ्या लोकांची माहिती त्यांनाच विचारून ठरवलेल्या तक्त्या मधे  गोळा करायची आणि शासनाकडे सुपूर्द करायची. जनगणना झाली की घरावर स्टॅंप मारून स्टीकर लावायचं.

आता दुर्दैवाने म्हणा हवं तर , आजकाल शिक्षकांपेक्षा शिक्षिका जास्त असतात . पुरुष शिक्षकाची नोकरी करण्यास बहुतेक नाखूषच असतो- कारण जे काही असेल ते असो- पण आज बहुतेक ९० टक्क्यांच्या वर शाळेमधे शिक्षिका काम करतात,हेच एक कारण आहे की ज्या  मुळे जनगणनेचे काम केवळ स्त्रियांच्या वाट्याला जास्त येते.

व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात नां. लोकांच्या घरी गेल्यावर या शिक्षिकांना बरेचदा चांगले तर कधी वाईट अनुभव पण येतात . एक चक्कर मारली की काम होईलच याची खात्री नसते.सकाळी घराला कुलुप असेल तर संध्याकाळी जाउन पहावे लागते. लोकांच्या वेळा बघून काम करावे लागते.

समजा एखाद्या मुस्लीम घरात जायच काम पडलं तर चाचा का बेटा, फुफा का समधी, वगैरे सगळे लोकं एकाच घरात /झोपडीत रहात असतात. बरं घरातल्या सगळ्यांची जन्म तारीख माहिती नसतेच. अरे वो अब्दुल कब पैदा हुवा था?? यावर एखादी बुवा म्हणते,” अरे वो याराना रिलिज हुई थी नां, उस साल. अपून गये थे देखनेकू, तेरा ८ वा चल रहा था.. “अशा आठवणींच्या जोरावर मग जन्म तारखा आठवून लिहिल्या जातात. जर एखाद्याची माहिती आठवत नसेल तर , इसका नाम मत लिखो, छोड दो ना इसकू असेही सांगितले जाते.

बऱ्याच स्त्रियांना जनगणनेसाठी गेल्यावर दारावर येणाऱ्या सेल्स गर्ल पेक्षा  पण खालच्या दर्जाची वागणूक दिली जाते.  (रविवारी   जनगणना करायला  लोकं घरी आले तर आले झोप खराब करायला म्हणून चिडणारे लोकंही आहेत )दूर कशाला, रविवारी जेंव्हा त्या पोलिओ ड्रॉप्स देणाऱ्या स्त्रिया जेंव्हा एखादे लहान मूल घरी आहे का हे विचारायला येतात तेंव्हा पण लोकं अशाच कोरडेपणाने उत्तरं देतात- अशी उत्तरं की जणू काही आमच्या घरामधे मूल नाही हे सांगून उपकार करताहेत !! काही लोकं तर घरात घ्यायला पण तयार नसतात. दारामधे उभे राहूनच जनगणनेचा फॉर्म भरा असेही म्हणतात बरेच लोकं.

बरेच अशिक्षित लोकं  तर काही लोकं या घरी येणाऱ्या स्त्रियांच्या कडे वेगळ्याच नजरेने पहातात. ज्यांची या स्त्रियांच्या  पायाशी पण उभे रहाण्याची लायकी नाही, त्यांच्याकडे गलिच्छ नजरेने पहातात. बरेचदा शिफ्ट मधे काम करणारे पुरुष , दुपारच्या वेळेस एकटेच घरी असतात. ते सगळॆ वाईट चालीचे आहे असे म्हणत नाही, पण तरीही जेंव्हा जनगणनेसाठी स्त्रिया जातात तेंव्हा  त्यांच्या मनात एक प्रकारची भिती  असतेच.अर्थात शिफ्ट ड्युटी वगैरे  कारणे जी आहेत ती केवळ महानगरांच्या पुरतीच मर्यादित आहेत ,तरी पण   तरीही लहान शहरातही तितकेसे सेफ नाही, हे पण तेवढेच खरे !

काही भाग ( जसे रेड लाईट एरिया, खरं तर आजकाल असा भाग डिफाइन करणे मुश्किल आहे, कारण शहराचा सगळा भाग ’त्या’ लोकांनी व्यापलेला आहे) बराच भाग तर स्त्रियांनी जाण्याच्या लायकीचा पण नसतो. तरीही त्यांना तिथे जावे लागतेच.

जनगणना हे अतिशय महत्त्वाचे काम आहे.  याच जनगणनेनुसार हे पण ठरणार आहे की कोण अल्पसंख्यांक आहे, आणि कोण नाही! सगळे रिझर्वेशन्स, कॉलेज च्या ऍडमिशन्स, नौकरी या मधले आरक्षण , इथे कलेक्ट केलेल्या डेटा वरुनच ठरणार आहे.  क्रिमी लेअर मधला असेल तरी पण इथेच ते लक्षात येणार आहे. यात जे प्रश्न दिलेले आहेत ते जरी निरर्थक वाटत असले तरीही त्यामधे बराच अर्थ दडलेला आहे. एक्सपर्ट्स तर या डेटा वरून   बरीच स्टॅटॅस्टीकल  माहिती काढू शकतील  ज्याचा उपयोग शासनाची निर्णय  क्षमता वाढण्यास   होऊ शकेल.

जसे लोकं दारिद्र्य रेषेच्या खाली किती आहेत, आणि वर किती आहेत ! रेशनचे धान्य किती विकले जायला पाहिजे आणि खरोखर किती विकले गेलेले दाखवले जाते? आरक्षण किती द्यायला हवे, कुणाला द्यायला हवे ? अशा  ह्जारो गोष्टींबाबत निर्णय घेतांना या जनगणनेचा उपयोग होऊ शकतो.

इतके प्रॉब्लेम्स आहेत मग अशा परिस्थिती मधे स्त्रियांनी काय करायचं? काम करणं टाळायचं का? यावर माझे उत्तर आहे नाही, कारण तसे केल्याने जनगणनेचा मूळ उद्देशच रसातळाला जाईल, शासनाचे  लोकांच्या संदर्भात, जातीच्या संदर्भात, धर्माच्या संदर्भात जे काही निर्णय घेतले जाणार आहेत त्यांच्यावर परिणाम होईल.

आजपर्यंत इतक्या वेळेस जनगणना झालेली आहे. स्त्रियांवर काही अत्याचार वगैरे झाल्याची एकही केस रेकॉर्ड झालेली नाही ( याचा अर्थ हा नाही की पुढे होणार पण नाही )  आजच्या लेखाचा मुद्दा हा  जनगणने मधे स्त्रियांचा किती सहभाग असावा ?? हा आहे.

वर दिल्याप्रमाणे शिक्षण विभागात स्त्रियांची संख्या जास्त असल्या मुळे स्त्रियांना हे काम दिले जाईल ,आणि शासकीय नोकरी असल्याने  हे काम  करावे लागेलच. जर एखाद्या भागात जातांना सेफ्टीचा इश्यू वाटत असेल तर घरच्या कोणाला तरी, किंवा मित्र मैत्रिणीला सोबत घेउन जावे हाच एक उपाय मला तरी दिसतो .

दुसरी गोष्ट म्हणजे ही कामं बेरोजगार युवकांना द्यावी असेही मत काही लोकं व्यक्त करतात. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या जनगणनेचे महत्त्व खूप  जास्त आहे, तेंव्हा कुठलीच कमिटमेंट नसलेल्या बेरोजगार युवकांवर विश्वास ठेवणे पण योग्य रहाणार नाही असे माझे मत आहे

( कारण जर त्यांच्या चूक झाल्या/ मुद्दाम केल्या – तरीही काही कार्यवाही होऊ शकणार नाही, मग काम बरोबर व्हावं म्हणून कमिटमेट कशी राहिल?) .

जर स्त्रियांचा सहभाग कमी करायचा असेल तर हे काम  विभागून  इतर शासकीय कर्मचाऱ्यांनाच दिले  जाउ शकते ,  जसे जिल्हा परीषद, कलेक्टर ऑफिस, रेव्हिन्यु डीपार्टमेंट वगैरे किंवा पब्लिक अंडर टेकिंग मधे काम करणाऱ्या लोकांना पण दिले जाउ शकते , म्हणजे जबाबदारीने केले जाईल अशी अपेक्षा ठेवता येईल!!

कामचुकारपणा करणारे लोकं तर आहेतच, पण त्याच बरोबर स्वतःच्या कामात स्वतःला झोकून देऊन   काम करणारे लोकं पण आहेत. त्या बद्दल नंतर कधीतरी. सध्य स्थिती मधे काम स्त्रियांना दिल्या गेले आहेच तेंव्हा आता ते करणे तर भाग आहेच.

स्त्रिया जेंव्हा नोकरी करतात तेंव्हा त्यांना मिळणारा पैसा उपभोगायला घरातले सगळे लोकं तयार असतात. तेंव्हा आता जर त्याच स्त्रियांना   जर घरच्या लोकांच्या सोबतीची , मदतीची कामासाठी गरज पडली तर  मग  घरच्या लोकांनी मदत करायला मागेपुढे पाहू नये असे वाटते.

माझ्या पहाण्यात पण आलंय की  बहुतेक वेळेस घरचे लोकं मदत करतातच. ’वाल्या कोळ्या’ प्रमाणे स्थिती झालेली नाही  स्त्रियांची  अजूनतरी. हे जे काम आहे ते स्त्रियांनी शासकीय नोकरी मधले ’प्रोफेशनल हॅझार्ड्स’ समजून काम करायचं झालं.

सध्या अस्तित्वात असलेल्या जनगणनेच्या प्रोसिजर ऐवजी दुसरी कुठली प्रोसिजर वापरली जाऊ शकते हा मु्द्दा चर्चीला जावा अशी अपेक्षा आहे.


About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

33 Responses to जनगणना- दुसरी बाजू

 1. ngadre says:

  agadi utrusht bajoo mandalit. Dhanyavaad.

  Ek bareekshi shankaa ali. Mala vatate jan ganana dar 10 varshanich hote. Freedom nantar initially kahi jast frequent jan ganana jhalya hotya.pan ata baryach kalapasoon 10 varshaat ekadach hote.mhanoon 30 varshanchya service madhe max 3 vela karavi lagel.

  • नचिकेत
   मी पण कुठेतरी वाचलंय की आजपर्यंत ११ वेळा जनगणना झाली म्हणून – आता कुठे वाचले होते ते आठवत नाही, पण पुन्हा एकदा चेक करतो नेटवर…

 2. ngadre says:

  ekoon 11 times jhali ahe.
  Suruvatila jaast frequnt hoti. ata baraach kal jhala one in 10 yrs ahe.

  11 che distribution uneven ahe. I just mean ki 30 yrs madhe 6 vela karave lagat nahiye.

  • बरोबर.. थोडी चुक झाली .. पण ठिक आहे , गेल्या ३० वर्षात किती वेळा झाली हे पहावे लागेल. पण मूळ मुद्दा – वेगळाच आहे.

 3. काका, दुसरी बाजूही पहिल्या बाजूइतकीच सशक्तपणे मांडली आहेत. जनगणनेला जाणार्‍या लोकांना अशा भयानक प्रसंगांना दुर्दैवाने तोंड द्यावं लागतं. पण मला वाटतं घरच्यांना बरोबर नेण्याऐवजी सरकारने या जणगणना करणा-या सरकारी लोकांबरोबर प्रत्येकी एक कंत्राटी माणूस नेमला आणि तो/ती सोबत म्हणून जाऊ शकला तरी बराच फरक पडेल..

  बाकी, लेख मस्तच..

  • हेरंब
   मला असे समजले की या कामासाठी साधारण साडेपाच हजार रुपये दिले जातात. बाहेरचा कंत्राटी माणूस तरी विश्वास ठेवण्या लायक आहे का? हा पण एक प्रश्नच आहे. तेंव्हा घरच्यांनी सोबत केली तर कधीही चांगले.
   काही ठिकाणी दोन लोकं एकत्र फिरतात- आणि एकमेकांना सोबत करतात. चांगला एरीआ असेल तर एकटी स्त्री पण जाउ शकते. प्रश्न फक्त इतर एरीयाचाच आहे.

 4. vijaysinh holam says:

  महेंद्र्जी, खरेच आपण म्हणता तशी यासाठी काही तरी वेगळी पद्धत शोधली पाहिजे. मतदानाची जशी मतपेट्या जाऊन ईव्हीएम आले. तसे यासाठी सुद्धा काही तरी वेगळा आणि अचूक मार्ग शोधला पाहिजे. आतापासूनच शोध सुरु केला तर पुढील वेळ होईल काही तरी.

  • विजयजी
   ह्या गोष्टीचे मह्त्व लोकांच्या लक्षात यावं म्हणून हे इतकं लिहिलं आहे. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. जर मतदानाशी ही गोष्ट निगडित केली तर सगळे राजकीय पक्ष पण अती उत्साहाने भाग घेतील या मधे.
   आतापासूनच पुढल्या वेळेस काय करता येईल याबद्दल डिस्कशन्स व्हायला हवीत. तरच काहीतरी बदल होऊ शकतील.

 5. Girish says:

  MBK, two days ago a couple came in at 9 pm to my place. The man was working in Engineering college as admin officer and his wife was teacher in munciple school. However, the job of census was given to man and his wife was just going around with him to help him out. ACtually she being in teaching profession she should have been given the job of census, which was not the case here. But these pepal are doing commendable job for sure. Work whole day and then again do the census. They write so much info from every household, its tiring and rewards are not worth the pain. Also these pepal are so cautious before hitting the door bell fearing worst response..pity

  • गिरिश
   हे काम अतिशय महत्वाचे आहे. तेंव्हा लोकांनी पण समजून मदत करायला हवी. लोकांमध्ये जागृती नसल्या मूळे असा त्रास होतो. हे जे जनगणनेसाठी येणारे लोकं असतात ते सगळॆ सुशिक्षित असतात, त्या मूळे कोणाच्या घराची बेल वाजवतांना सदसदविवेक बुध्दी आड येत असेल, की आपण कोणाला डीस्टर्ब तर करीत नाही??

 6. Kiran says:

  Alternative procedure is to hire completely different set of people, train them and then collect data through them. If after 15 years from today, India has working UID system, then need of putting so many people to do household survey will be less.
  I want to point out few opinions expressed by you.
  1. About ‘Red Light’ area. There are many NGO working in these areas. These NGO has women staff and prostitutes behave really well with them. Those women are not something different than us. They can understand what census is. NGOs are mostly willing to mediate in such government activities and they can be used.
  2. ‘Unemployed youth’. Well not every unemployed youth is someone who can not be believed. Large part of unemployed youth is unemployed because there are not jobs, not because they are not willing to work. The disincentive they will have in working for census survey will be short-term nature of work. But terming them ‘people with no commitment’ is quite outrageous. what is the basis to say government employees are more reliable than unemployed youth? Many times government employees are those who pay bribes to get those seats, while unemployed are those who can’t pay. So how we determine their reliability?

  Average working hours for any employment are about 8 hours. Privately employed has to work more than these 8 hours. Government employees have less stringent work schedule. School teachers are never really loaded in terms of work hours. Quality of work given to them is different that their work hours. So if they are stretched for few days at the time of elections or census, they should not make so much fuss. Do they think so much about what they teach in school?

  With blogs, we can write anything and it is making writing shallow. When we write about matters which are bigger than individual decisions, one should be cautious in expressing anything. there are multiple dimensions and we always have limited view.

  • किरण
   ब्लॉग वर स्वागत. आणि प्रतिक्रिये करता आभार.
   पहिली गोष्ट म्हणजे ब्लॉग हा केवळ मनातले विचार लिहीण्यासाठीच असतो. इतर लेखन हे वृत्तपत्रांमधे वाचले जाऊ शकते. ( अर्थात वृत्तपत्रं पण कुठल्या ना कुठल्या पक्षाला बांधलेली असतातच, तेंव्हा तिथे पण पुर्वग्रहदुषित लिखाण प्रसिध्द होतं) असो..

   दोन माणसांचे विचार नक्कीच वेगळे असू शकतात. तेंव्हा जर तुम्हाला माझे विचार पटले नाहीत तर त्यात काहीच आश्चर्य नाही. तुमच्या विचारांचे पण स्वागतच आहे.

   १) एन जी ओ. तुम्ही जे या एनजीओ बद्दल लिहिले आहे, त्याबद्दल मी पण बराच अभ्यास केला आहे. यावर एक पुर्वी लेख पण लिहिला होता. http://wp.me/pq3x8-1yy इथे वाचू शकता.
   त्या भागात गेल्यावर त्या भागातले दलाल, किंवा कोणी पकडुन ठेवले तर काय करता येईल तिथे गेलेल्या स्त्रीला? मुंबई सारख्या शहरात तर मागमुस पण लागणार नाही. असो.
   २) एक सांगा. शासकीय नोकरी असते लोकांना, आणि ह्याची भिती पण असते, की जर काम केलं नाही तर नोकरीवर गदा येऊ शकते, तरी पण कामचुकार पणा करणारे लोकं आहेतच- तेंव्हा केवळ ह्याच पार्श्वभुमीवर मी ती कॉमेंट केली होती. इतकी भिती असूनही जर लोकं कामचूकार पणा करतात, तेंव्हा कॅज्युअल लोकं कसे काम करतिल?
   एक अनूभव सांगतो. आमच्याच कंपनीत एसएपी डेटा एंट्रीसाठी काही कॅज्युअल मुलं ठेवली होती सहा महिन्या साठी. शेवटच्या महिन्यात जेवढं काम केलं, त्यापेक्षा जास्त चुका करुन ठेवल्या होत्या. शेवटी सगळा डेटा डिलिट करुन पुन्हा फिड करावा लागला होता. असो.
   ३) तुमचा मुद्दा, की जर त्यांना थोडं जास्त काम करावं लागलं तर त्यासाठी त्यांनी अजिबात कुरकुर करता कामा नये. या गोष्टीशी मी पण सहमत आहे. माझ्या लेखामधे कुठेच असे म्हंटलेले नाही की ह्या लोकांना काम देऊ नये. केवळ सुरक्षिततेचा मुद्दा उचलला होता.

   प्रदिर्घ अभ्यासपूर्ण प्रतिक्रियेकरता आभार. कृपया वैय्यक्तीक टिपण्या टाळल्यास आनंद होईल.

   • Kiran says:

    Mahendra,
    I like to clear that I liked the aspect you kept. If I would have been in disagreement with your thoughts, I would not have commented. I read your writing and it seems you have diverse experience. Hence, I dared to comment that you must differentiate your writing from expression of opinion to construction of alternatives for particular problem. It is always easy to highlight what is going wrong, easier when we live in huge country like India.
    Every job carries its insecurities and moral hazards. People tend to work better even in unfavorable situation when a call to their esteem is made to work at their best. I guess we don’t provide such boost to teachers, never really appreciate what they can do.
    About NGOs, they can malpractice, but now auditing and other reporting requirements are stringent now. And underlying problem is of mentality, of taking benefit of non-enforceability of rules. It can occur anywhere. As you have pointed out in your earlier article regarding NGO, it is always useful to help by yourself.
    My own experience regarding unemployed youth is different than yours. We cannot generalize one side.
    Problem with large social problem is it is difficult to separate good from bad. And hence their solutions are always compromising. We need to prepare mentality of people that to get something better for society, some sufferings are essential.

    • किरण
     ब्लॉग सुरु केला तो मुळात स्वतःचे विचार लिहायला. मग ते कदाचित बरेचदा एकांगी पण असू शकतात. आणि त्याचंच नांव ब्लॉगिंग. इथे ही फक्त एक दैनंदिनी इतक्याच महत्वाचे डॉक्य़ुमेंटेशन असते.
     व्य्वसायाने मी मेकॅनिकल इंजिनिअर, म्हणजे माझे साहित्य, राजकारण वगैरे विषयांवरची माहिती जितकी आहे, त्यावरच आधारीत लिखाण असते. काय असावं? हा प्रश्न फार मोठा आहे, आणि मला तरी त्याचं उत्तर देणं सहजासह्जी शक्य होईल असे वाटत नाही.

     सामाजिक जिवनात कुठे चुकतंय ते समजल्या शिवाय दुरुस्ती कशी करता येणार? आणि इथे मी राजकीय विषय फक्त लिहित नाही. कुठल्याही विषयावर लिहितो. इथे काय असायला हवं हे मी मुद्दाम लिहिले नाही, तर त्या साठी लोकांचे कॉंट्रोब्युशन मागितले आहे. कारण हा प्रॉब्लेम जो आहे त्याचे उत्तर इतक्या सहजा सहजी मिळणारे नाही. असो..
     प्रतिक्रियेकरता आभार..

 7. अगदी बरोबर बोललात काका..माझ्या ऐकण्यात आलाय की ह्या जनगणनेवाल्या अधिकार्‍यासोबत एक पोलीस असावा लागतो माहीत नाही पण ती खरच गरज आहे कारण ह्या अधिकार्‍यांना (विशेषत: स्त्रियांना) अश्या अश्या ठिकाणी जाव लागत की……असो
  दुसरी बाजू तेवढीच भक्कम मांडलीत आपण..अभिनंदन

  • सुहास
   या जनगणनेला महत्व प्राप्त करुन द्यायचं असेल तर याचं कोरिलेशन रेशन कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा व्होटर्स कार्ड शी केल्यास देशातले सगळे लोकं यात समावले जातील. प्रतिक्रियेकरता आभार.

 8. सीताराम वाळके says:

  नेहमी सारखाच छान लेख! जनगणनेच काम सोप्प व्हायला युनिक आय डी प्रोजेक्ट (आधार) चा फारच उपयोग होईल असे वाटते. प्रत्येक नागरिकाला युनिक आय डी दिला गेला तर कदाचित वेगळी जनगणना करायचीही गरज राहू नये. पण या प्रोजेक्टला किती वर्ष लागतील ते सांगता येत नाही.

 9. thanthanpal says:

  वाल्या कोळ्या’ प्रमाणे स्थिती झालेली नाही स्त्रियांची अजून तरी. हाच मुलभुत फरक स्त्री आणि पुरुषात आहे. स्त्री ही पुरुषाच्या पापात किंवा अपयशात कधीच वाटेकरी होत नाही आणि हें रामायणा पासून चालत आलेले आहे.नवर्याच्या संपत्तीचा, सासरच्या संपत्तीचा उपयोग बिनधास्त पणे करणारी पत्नी त्याच्या संकट काळात मात्र साथ देत नाही. याला अपवाद असतील, मात्र बहुसंख्य स्त्रिया संकट काळात कमजोर पडतात . आणि काम करावयाचे असेल तर, बरोबरीचा हक्क मागावायाचा असेल तर स्त्रीत्वाच्या नावाखाली रडगाणे गाण्यात अर्थ नाही. अजुन एक गैरसमज स्त्रिया जेंव्हा नोकरी करतात तेंव्हा त्यांना मिळणारा पैसा उपभोगायला घरातले सगळे लोकं तयार असतात. आज नवरा बायको शिवाय तीसरा नातेवाइक संसारात नसतो. आणि स्वातंत्र्य, समानता याच्या गोष्टी करताना स्त्री म्हणून सवलती मागने चुक आहे. आणि त्या अबला आहेत असे म्हणत पुरुषाने त्यांची पाठराखणं करण तर अजून चूक आहे.

  • सगळे म्हणजे घरातले सगळे, या मधे पती, मुलगा आणि इतर कोणी असेल तर ते अध्यारुत आहेत. स्त्रियांना पाठिशी घालायला म्हणून नाही तर त्यांना येणारे प्रॉब्लेम्स इथे लिहिले आहेत. आता सरकारी नौकरी करायची, तर हे काम पण करावे लागेलच.

   आणि जर प्रॉब्लेम्स असतिल तर कामचुकारपणा न करता, घरच्या लोकांची मदत घेउन ते काम व्यवस्थित पुर्ण करावे असे मला म्हणायचे होते वरच्या लेखात. मला वाटतं माझा मुद्दा व्यवस्थित लिहिला गेला नाही .. त्यांना कामात सवलत द्या असे म्हणणे नाही माझे.

 10. Vidyadhar says:

  हा अगदीच महत्त्वाचा मुद्दा आहे काका. आणि तुम्ही ही दुसरी बाजूही एकदम छान मांडली आहे. खरंच ह्यावर विचार होणे गरजेचे आहे, देशाच्या आणि ह्या काम करणार्‍या दोघांच्याही भल्यासाठी!

 11. Tushar Kulkarni says:

  माझा अनुभव ,

  माझ्या आईने (प्राथमिक शिक्षिका , ठाणे म. न. पा. ) १९८१, १९९१, २००१ अशा ३ जनगणने मध्ये काम केले . मी व माझ्या वडिलांनी सर्व Back-end ची कामे सांभाळली. (जसे कि, फॉर्म भरणे , नकाशे तयार करणे ). माझ्या वडिलांनी सर्व procedure समजावून घेतली आणी आम्ही सर्वांनी team मध्ये कामं केली .

 12. शहरी भागातील लोक तंत्रज्ञानाच्या बाबतीत पूर्णत: माहितगार नसले तरी जुजबी ज्ञान असतेच. तेव्हा शहरी भागांमधे इलेक्ट्रॉनिक मतदानासारखंच इलेक्ट्रॉनिक जनगणना करायला काय हरकत आहे? अर्थात हा खूप मोठा सेट अप होईल, इलेक्ट्रॉनिक मतदानालाच इतकी वर्षं लागली. पण असं काही झालं तर निदान शहरातील जनगणनेचा व्याप कमी होईल. खेड्यापाड्यांमधे प्रत्यक्ष जाऊन जनगणना करण्यासाठी कमी मनुष्यबळ लागेल मग. सुहास म्हणतो तसा जनगणना अधिका-यांसोबत एक पोलिस मी सुद्धा कधीच पाहिला नाही.

  उन्हातान्हातून फॉर्मचं ओझं सांभाळत वणवण भटकणं खरंच सोपी गोष्ट नाही. शिक्षकांचं काम खरंतर वर्गात शिकवणं पण त्यांच्याही नशीबी ही वणवण येते आणि कुणाच्या घरी गेलं की शिक्षक म्हणजे गुरू हे संस्कार विसरून आपल्यापैकी काही लोक त्यांना खूप वाईट वागणूक देतात. खरं तर हे त्यांचं काम नाही, ते आपलं काम करत असतात.

  आजपर्यंत इतक्या वेळेस जनगणना झालेली आहे. स्त्रियांवर काही अत्याचार वगैरे झाल्याची एकही केस रेकॉर्ड झालेली नाही – कदाचित स्त्रीयासुद्धा जनगणनेला जोडीजोडीने जातात म्हणून असेल, नाहीतर हल्ली चार वर्षांच्या बच्चूला तरी कुठे सोडतात? असो.

  >> माझ्या ब-यापैकी लक्षात राहिलेली ही पहिलीच जनगणना. पण आमच्या घराच्या दारावर स्टीकर लावलेला नाही! त्यासाठी कुणाला संपर्क करावा लागेल का? काही माहिती असल्यास प्लिज लिहा.

  • कांचन
   सहज शक्य आहे. पण त्या साठी जनजागरण होणे जरूरीचे आहे. नाहीतर या वर्षी पुर्ण झाली जनगणना, काम झालं, की सगळे लोकं विसरणार या गोष्टीला. स्टिकर लावणे म्हणजे कोणीतरी येऊन गेल्याचे प्रुफ आहे ते, नाही लावलं तरीही काही बिघडत नाही फारसं.

 13. MEHARSHA says:

  sir,
  dusari baju pan chan aahe.
  unemployed lokankadun he kam karun gheta yeu shakel ka? jase ki tynchi sarva mahiti mukhya adhikari waraga kade jama karane nantar tyna yogya te training dene.kinva kahi swayamsevi lokanchi madat gheta yeu shakel ka?
  karan koni mule ekhadya gharat janganechy navane ghusun kahi wiparit ghadanyachi shakyata watate.

  • खूप मोठा प्रश्न आहे हा… उत्तर इतकं सहजासहजी सापडण्यासारखं नाही असे वाटते. एका क्षणी वाटतं की हे सहज शक्य आहे, दुसऱ्याच क्षणी वाटतं की नाही…. !!

  • MEHARSHA ,
   तुम्ही मांडलेला पर्याय छान वाटतो. एम्प्लॉयमेंट कार्ड काढून किती जणांना नोकरी मिळते, ते कुणास ठाऊक. तेव्हा तिकडे तर तयार डेटा मिळू शकतो. त्याचा वापर करायला हरकत नसावी. ज्यांना गरज असेल, ते स्वत:हून येतील म्हणजे काम ’लादल्यासारखं’सुद्धा वाटायला नको.

 14. cddeshpande says:

  I read all the reactions. I have thought one solution.
  As on today, there are many private institutions , ad agencies and departments of multinationals like HUL carrying on jobs of market research for their products
  They have expertise, equipments, manforce , software and other requisite infrastructure
  can the Govt. outsource this job of census to these companies ?
  Otherwise in the new era of KHA.JA.U.(Khajgikaran- Jagtikikaran.-Udarikaran), day by day, every govt, job is being either outsourced or carried out in PPP (Public Pvt,Partnership)
  JUst think of it and let me know reactions on my suggestion

  • कॉंट्रक्ट बेसीस वर द्यायला काही हरकत नसावी, फक्त पेनल्र्टी क्लॉज हेवी असावा, म्हणजे काम व्यवस्थित ( १०० टक्के कव्हरेज) केले जाईल.
   आउट सोअर्सिंग केले जाऊ शकेल.. पण….. एक मोठं प्रश्न चिन्ह आहेच.. आपले नेते गण या डेटालाच चॅलेंज करतील ही एक भिती आहेच.
   जर तुम्ही रेशन कार्डशी कोरिलेट केले की मग गरीब लोकं यात येतीलच. पासपोर्ट कोरिलेट केला की मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय यात येतील. असाही नियम केला जाउ शकेल की जर तुमचे नांव युआयडी मधे नसेल तर पासप्ओर्ट , रेशन कार्ड , पॅन कार्ड रद्द होईल.. सगळे अगदी आपणहून पुढे येतिल रजिस्ट्रेशन साठी!

 15. bhaanasa says:

  महेंद्र, मी दोन वेळा ही ड्युटी केलेली आहे. ट्रेनिंग ते शेवटचा फॉर्म भरून घेणे व नंतर त्या सगळ्या फॉर्म्सचे संकलन व निरनिराळे चार्ट तयार करणे व अजूनही बरेच काही यात एकंदरीत तीन महिने जातात. हा कालावधी बहुतेक वेळा रणरणत्या उन्हाचाच असतो. तुम्ही जिथे राहता त्याच्या जवळच तुम्हाला नेमून दिलेला भाग कधीही नसतोच. अशावेळी तुम्ही सकाळी कितीही लवकर निघालात तरीही घरात तुम्हाला हवी ती किंवा योग्य ती माहिती देणारे कोणी भेटू शकणे दुरापास्तच. कारण त्यांनाही नोक~या आहेत. अनेकदा एकाच घरी चार चार वेळा जाऊनही अचूक माहिती मिळतच नाही. शिवाय लोक वसकन अंगावर येतात, कधी दारच उघडत नाहीत तर कधी सरकारी नोकर म्हणून आजवर साठून राहिलेली भडास काढून घेतात. स्त्रियांना समान हक्क हवेत तर हे करताना कशाला रडायचे….. मुद्दा म्हणून मान्य. पण जसे तू लिहिले आहेसच व अनेकांनी अनुभवलेही आहे त्याप्रमाणे व्यवहारात फार अडचणींचा सामना करावा लागतो. सुरक्षा तर थोडा पुढचा भाग साधे बाथरूमला जाणेही जिकिरीचे होऊन बसते. बाकी, हे मात्र अगदी सत्य आहे. घरचे लोक व मित्र-मैत्रिणीही खूप मदत करतात या सगळ्या प्रोसेसमध्ये. 🙂

 16. swapna joshi says:

  मी या जनगणनेत आई ला मदत केली. त्यावर एक लेख लिहून आम्ही सकाळ ला सुद्धा पाठवलाय. तुम्ही म्हणताय त्याही पेक्षा जास्त वाईट परिस्थिती आहे. आणि सुरक्षा, मेहनत , पैसे, हे सगळे मुद्दे आहेतच. पण जर एक माणूस काम करून आपला वेळ देणार आहे तर तो जास्तीत जास्त वापरला जावा हे सरकार ने पाहायला हवे. man hour हि संकल्पना फक्त कंपनी मध्येच असावी असा नाही. नियोजन नसल्याने सोपे काम सुद्धा किती अवघड करता येते हे आम्ही पहिले. त्या मुळे स्त्रियांची क्षमता असतानाही त्यांना शेवटी हे काम नको असाच वाटायला लागला.
  जर नियोजन असता तर स्त्री सुद्धा हे काम उत्तम करू शकते.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s