बॉनी एम

बोनी एम, ऑटोग्राफ, boney M

बोनी एम स्वाक्षरी

काल रात्री जुनी बॅग उघडून काही कागदपत्र शोधत होतो. तर एक जुनी टेलिफोन डायरी सापडली. हल्ली तर टेलीफोन डायरी ठेवणं बंदच केलंय. सगळे नंबर्स सेल फोनच्या मेमरी मधेच असतात. सहज डायरी उघडली आणि जुने नंबर , नावं पहाणं सुरु केलं बरेचसे लोकं तर आता संपर्कात पण नाहीत. टेलिफोन नंबर्स पण पाच आकडी, किंवा काही ठिकाणचे तर चक्क चार आकडी पण होते.  पानं उलटणं सुरु ठेवलं, तर एका पानावर एक ऑटो ग्राफ दिसला. मला खरं तर स्वतःला तशी   ऑटो ग्राफ गोळा करण्याची काही सवय नाही, पण हा मात्र मी आवर्जून घेतलेला ऑटो ग्राफ  होता.. तो बघितला, आणि एकदम मस्त वाटलं. तो होता माझ्या फेवरे्ट—— !!!

आपले आवडीचे   बरेच लोकं असतात, कोणी लेखक ,  कोणी खेळाडू तर कोणी गायक तर कोणी अजून कोणीतरी. कधी ना कधी तरी त्यांना भेटायचं अशी मनामधे इच्छा असतेच, पण आयुष्यात चान्स काही येत नाही. एअरपोर्टवर बरीच सेलिब्रेटीज दिसतात, पण कधी कोणाची स्वाक्षरी घेण्याची इच्छा होत नाही . पण हे मात्र एक एक्सेप्शन होतं- कारण माझ्या फेवरेट बॅंडचा ऑटोग्राफ होता हा. ह्या ऑटोग्राफचा इतिहास एक क्षणात नजरेसमोरुन गेला. तो क्षण पुन्हा जगलो त्या पाच सेकंदा मधे आणि मन प्रसन्न झालं.

बॉनी एम स्वाक्षरी

ही घटना होती १९८६ ची! (कसं आठवलं म्हणता? त्या ऑटो ग्राफ खाली चक्क तारीख पण आहे.)  माझं वय तेंव्हा साधारण २६ असेल- ते वय म्हणजे मस्त पैकी जाझ, रॉक म्युझिक ऐकायचं. तशी मला क्लासिकल ऐकायची आवड तर लहान पणा पासूनच आहे, पण सोबतच नाटकिंग कोल, ऍबा किंवा बोनी एम तर हमखास ऐकायचो. बोनी एम चा मी डाय हार्ड फॅन.  डॅडीकुल पासुन सगळ्या रेकॉर्डस होत्या संग्रही. त्या काळात बॉनी एम आणि ऍबा म्हणजे तरुणांच्या गळ्यातले ताईत.बॉनीएम चं फिव्हर वगैरे तर तरुणां मधे खूपच फेमस होतं. आजकाल कदाचित कोणाला माहिती नसेल , पण यांची गाणी खूपच अप्रतिम आहेत.

गोव्याला कामासाठी आलो होतो. सेसा गोवाचं ऑफिस होतं वास्कोला, पण काम असायचं ते सोणशी माइन्स ला. वास्कोची मिटींग आटोपली आणि पाहिलं तर   दुपारची दिड ची वेळ झालेली. जेवण आवरून एअरपोर्टला  मुद्दाम थोडा लवकरच निघालो.  फार लहान  रस्ते होते तेंव्हा   गोव्याचे , त्यामूळे  प्रवासात नक्की किती वेळ लागेल ते सांगता येत नव्हते. रस्ता मोकळा होता, आणि  म्हणूनच  एअरपोर्टला अपेक्षेपेक्षा खूप  लवकरच  पोहोचलो.

स्वतःशीच हासलो,  म्हंटलं की टाइमपास तरी बरा होईल. तो काळ होता हिप्पी मुव्हमेंटचा. त्या मूळे बरेच हिप्पी लोकं   गोव्यात रहायचे 🙂  त्यांना ना जगाची चिंता ना स्वतःची. ड्रग्ज च्या नशेत  असायचे, आणि मग इतर पब्लिक साठी फ्री शो!! 🙂  ह्या हिप्पी लोकांना पहात वेळ घालवणे हा  एक जनरल टाइम पास असायचा गोव्याला गेलो की.तुमच्या नजरेतले भाव दिसले बरं का मला. पण तेंव्हा माझं वय फक्त २५-२६ होते हे वर मुद्दाम आधीच लिहिलंय!!! 🙂

तर एअरपोर्टला पोहोचल्यावर चेक इन  रांगेत उभा राहिलो . समोर एक निग्रो  गृप उभा होता. एकाच्या हातात गिटारचा बॉक्स होता. मला डॅडीकुलच्या रेकॉर्डवरचा चेहेरा आठवला, आणि लक्षात आलं की हा तोच!!!! आणि आश्चर्याने एकदम आवाकच झालो. त्याचं नांव तर माहिती नव्हतं, सगळे त्या बॅंडमधले लोकं म्हणजे बॉनी एम! काय करावं हेच सुचत नव्हतं.   हातातल्या बॅग मधे असलेली टेलिफोनची डायरी काढली , आणि एक पान उघडून ’स्क्युज मी – ऑटोग्राफ प्लिज’ म्हणुन समोर केली. त्यावर केविन ने  मला विचारलं – यु रेकग्नाइझ्ड मी? म्हंटलं ’ ऑफ कोर्स- यु आर वन ऑफ द  बॉ्नी एम’, त्याला पण बहुतेक  बरं वाटलं असावं- मस्त पैकी गिटारचं चित्र काढलं  आणि ऑटोग्राफ दिला. त्याच्या व्यतिरिक्त इतर दोघांचेही ऑटोग्राफ्स घेतले.  तेच ते दोन ऑटोग्राफ्स मला समोर दिसत होते त्या डायरी मधे.. एका मस्त दिवसाची आठवण!! हे ऑटोग्राफ्स दाखवून खूप मित्रांना जळवलं होतं हे पण आठ्वलं.

या ऑटोग्राफ्स व्यतिरिक्त फक्त सचिन तेंडुलकरचा आणि राहुल द्रविडचा ऑटोग्राफ घेतला होता बोर्डींग पास वर-  तो पण  आता शोधावा लागेल कुठे आहे तो. आयुष्यातल्या काही  खूप खास आठवणी असतात , त्यांच्याबद्दल नुसतं आठवलं तरीही दिवस कसा मस्त जातो अगदी!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात... and tagged , , , , , . Bookmark the permalink.

31 Responses to बॉनी एम

 1. सागर says:

  सहीच काका सचिनचा ऑटोग्राफ…मस्तच…
  माझीही अशीच आठवण आहे…प्रमोद महाजन यांचा ऑटोग्राफ घेतला होता मी…
  अन तुम्ही रॉक वगैरे ऐकत होता आश्चर्य वाटल…

  • सागर
   रॉक ऐकायचॊ. बॉनी एम तर फेवरेट होता .वर लिंक दिलेली आहे यु ट्य़ुबची तिथे बघ बरीच गाणी आहेत. 🙂

   • आज रात्री डॅडी कुल ऐकल्या़शिवाय काय मी झोपत नाही. 😉

    • इथेच दिलंय वर.. यु ट्युब वर सगळी आहेत , उद्या करतोय ऑडीओ डाउनलोड –

     • माझ्याकडे बॉनी एमचं कलेक्शन आहे. काल डॅडी कूल ऐकूनच झोपले. नव-याला तुमची पोस्ट दाखवली, खास स्वाक्षरीसाठी.

 2. आईशपथ!! सही. मी सुद्धा पूर्वी ऑटोग्राफ्स घेत असे कलाकारांच्या. ते वेड कधी मंदावलं कळलंच नाही. जुनं ऑटोग्राफ बुक पहाताना जुन्या आठवणीही जाग्या होतात. रमेश देवप आणि वर्षा उसगांवकर यांचा ऑटोग्राफ माझ्या जास्त लक्षात आहे कारण इतर कलाकारांसारखं नुसतं ऑटोग्राफ न देता त्यांनी माझी चौकशी केली होती. वर्षाने तर माझं नाव लिहून With Love असा ऑटोग्राफ दिला होता, त्यामुळे एकदम ग्रेट वाटायचं तेव्हा. त्या वयात ज्या उत्कंठतेने स्वाक्ष-या घेतल्या तशा आता घेता येतील की नाही कुणास ठाऊक? पण हे जग सोडण्याआधी काही लोकांना भेटण्याची अनिवार इच्छा आहे (त्यात बच्च्न तर आहेच). पाहू या कसं जमतं ते.

  • कांचन
   काही लोकं खूप डाउन टु अर्थ असतात. एकदा बप्पी लहरी सोबत दिड तास गप्पा मारत बसलो होतो कलकत्त्याला लाउंज मधे. मस्त वेळ गेला. रॉयल माणूस एकदम. त्याला म्हंटलं की मी गायक नाही, तेंव्हा तुझ्याकडे चान्स वगैरे मागणार नाही- मग बप्पीदा एकदम खुलला आणि मस्त गप्पा मारल्या.
   मला फारशी आवड नाही ऑटोग्राफ जमवायची, हा म्हणजे त्या क्षणी वाटलं म्हणून घेतला.

   • आज सकाळी मिथुनच्या चित्रपटांची आठवण येत होती. बप्पी लाहिरीमुळे त्यालासुद्धा एकसे एक गाणी मिळाली होती.

 3. मस्तंच, आजतागायत माझ्याकडे कुणाही प्रसिद्ध व्यक्तीचा ऑटोग्राफ नाहीये… 😦

  • आनंद
   पण आवड आहे का गोळा करायची? काही लोकांना जात्याच आवड असते. मला पण फारशी आवड नाही ऑटोग्राफ गोळा करायची. बॉनी एम म्हणजे एक एक्सेप्शन..

 4. Pingback: Tweets that mention बॉनी एम | काय वाटेल ते…….. -- Topsy.com

 5. ngadre says:

  BoneyM ani ABBA are treasures. Simply treasures.

  Mast athavani jagya kelyaat.

  Still I am sad gaane aikalet ka? BoneyM che? Brown girl in the ring..rivers of Babylon

  Ani ABBA che S.O.S.,Nina,Honey Honey

  Kaay bands hote..kya baat kya baat.

  • बॉनी एम संपुर्ण ऐकलाय. नो वुमन नो क्राय पण छान आहे. मला सगळ्यात जास्त ब्राउन गर्ल आवडायचं.

 6. एका काळात बॉनी एम खुप एकलाय…
  डॅडी कुल तर आवडतच पण त्यासोबत “बाय द रिवर्स ऑफ बॅबिलॉन”, “रास्पुटीन”, “हॉली हॉली डे” असे गाणे आज आठवत गेले.
  आता एक एक शोधुन एकतोच.
  बाकी सही जमा करण्याचा छंदाबद्दल काय बोलणार..

  • निखिल,
   ब्लॉग वर स्वागत, आणि प्रतिक्रियेकरता आभार.
   बॉनी एम एकेकाळी देवाइतका प्रिय होता. अजूनही गाणी खूप आवडतात बॉनी एमची. आता डाउनलोड करुन सिडी बनवतो कार मधे ऐकायला.
   हॉली हॉलीडे माउथ ऑर्गन वर मस्त वाजतं.. 🙂

 7. Pingback: बॉनी एम | indiarrs.net Featured blogs from INDIA.

 8. बॉनी एम हे नाव ऐकलं होतं फक्त. गाणी नव्हती ऐकली !! पॉप-रॉक पेक्षा मला मेटल आवडायचं. तेही डेथ मेटल. सेप्युल्च्युरा (Sepeltura) जाम फेव्ह होते माझे.. !! आता स्प्लिट झाला तो ग्रुप..

  • चांगला बॅंड होता. अजूनही गाणी ऐकाविशी वाटतात त्यांची.. आणि दुसरा म्हणजे बिटल्स.. अप्रतीम गाणी आहेत. बघ एकदा ऐकून.

 9. जबरी ..मला पण आवडतात बॉनी एमची गाणी 🙂

 10. mau says:

  heyy….really good!!

  माझेआणि नव~याचे ही खुप आवडते होते बोनी एम…मी अता जेंव्हा सासरी गेलेली नां तेंव्हा बोनी एम ची LP [record] पाहिली. तीथे ती नुसती केविलवाणी पडलेली….पुन्हा एकदा ऐकण्याचा योग आला…काय मस्त वाटले…daddy cooll[\:d/\:d/\:d//……[:)]

  • उमा
   माझ्याकडे पण बऱ्याच रेकॉर्ड्स होत्या. नंतर मग कॅसेट्स पण आणल्या होत्या. आता ऑन लाइन शोधायला हवीत , तरच ऐकता येतील.

 11. Hemant says:

  priy Mahendra,
  Kup khup divsan pasun tumche blog var che topics vachtoy. Boney-M baddal vachun khupach aanand zala. Mazi mulgi , KETAKI, 10 yrs, Rasputin- Ma Baker- dararoj aaiklya shivay baher khelaly la jaat naahi. You are simpli great

  • हेमंत
   बॉनी एम अजूनही ग्रेट आहेच. पुढच्या पिढीला पण गाणी ऐकावी वाटतात यातच त्याचं यश आहे. मध्यंतरी ह्याची गाणी ऐकणं बंद झालं होतं, आता पुन्हा ऐकाविशी वाटताहेत.
   ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेकरता आभार.

 12. Vidyadhar says:

  मस्त वाटलं वाचून. मी राहुल द्रवीडशी हात मिळवला होता, तो प्रसंग आठवला, तो क्षण पुन्हा जगलो.

  • अरे माझ्या शेजारीच बसला होता. मला व्हॉलेंटरी अपग्रेड दिलं होतं जेट एअरवेजने, तेंव्हा ची गोष्ट आहे ही. नागपूर ते मुंबई फ्लाइट मधे .तेंव्हाच त्याची सही घेतली होती. खूपच शांत माणूस आहे.एका पुस्तकात जे डॊकं घातलं, ते पुर्ण वेळ वाचतच होता तो.

 13. bhaanasa says:

  महेंद्र, अरे नचिकेतचा एकदम फेव रे हा…. त्याला दाखवली स्वाक्षरी व व्हिडिओही….. खुश झाला. 🙂

  • माझा पण खूप आवडता आहे.सगळी गाणी डाउनलोड केली कालच.. आता एक सिडी बनवतो कारमधे ऐकायला.
   जुने दिवस आठवले की मस्त वाट्तं एकदम! आता मात्र सांभाळून ठेवली आहे ती स्वाक्षरी. 🙂

 14. mahesh mohan shinde says:

  dear mahendra kaka……….
  tumi bharpur lucky aahata boney m chya swakshari baddal………………..

 15. रोहन says:

  काय बोलतोस… अरे इकडे बोटीवर अजून त्याची गाणी ऐकतो आम्ही अध्ये मध्ये… आपले आवडते लोक भेटणे म्हणजे एक पर्वणीच.. मला लडाख ट्रिपच्या वेळेला श्रीनगरला जाताना नसरुद्दीन शाह भेटले होते… नुसते भेटलेच नाहीत तर २-३ मिनिटे बोलायला सुद्धा मिळाले… 🙂

 16. Krantikishor says:

  खूपच छान अनुभव!!! मीही आधी Boney M चा खूप चाहता होतो… अनेक गाणी आजही तोंडपाठ आहेत, पण मध्येच कामाच्या वाढलेल्या व्यापात गाणी ऐकणे बंद झाले… तुमचा पोस्त पहिला आणि आधी गाणी डाउनलोड करून ऐकली! खूप छान वाटले…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s