आयपीएल गेट..

IPL

भारतामधे कंपन्यांचं काम कसं चालतं? टेंडर्स म्हणजे काय ? त्याचे नियम काय असतात हे सगळं फक्त जे लोकं मार्केटींग मधे आहेत केवळ त्यांनाच ठाऊक असतं.

जवळपास ८० टक्के लोकांना या टेंडरींग बिझिनेस बद्दल फारशी काही माहिती नसते. नेमका ह्याच गोष्टीचा कालपासून शरद पवार आणि सुप्रिया सुळे  फायदा घेतांना दिसताहेत.

त्यांचं हे स्टेटमेंट की “त्यांनी कंपनीच्या एमडी ला म्हणजे देशपांडे यांना  पर्सनल लेव्हल वर टेंडर मधे भाग घेण्याची  परवानगी दिली होती” हे वाचून तर अक्षरशः हसून हसून पुरेवाट झाली. कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आपल्या कंपनीच्या एमडीला एका करोडॊ रुपयांच्या टेंडर मधे बिडींग करण्यास परवानगी देतात- पण “पर्सनल लेव्हल वर”  – ह्या पेक्षा मोठा जोक आजपर्यंत ऐकलेला नाही.

उंदराला मांजराची साक्ष! हे थोडं होतं का, तर तेवढ्यातच त्या ललीत मोदीने पण गरज नसतांना आपली टीवटीव सुरु केली , आणि ह्या गोष्टीचं प्रसिद्धी पत्रक दिलं की साहेब निर्दोष आहेत !!! एक माणूस ज्याच्यावर गैर जिम्मेदार वागणुकीचे / पदाचा दुरुपयोग केल्याचे आरोप आहेत   तो माणूस जेंव्हा एखाद्याला ’क्लिन चिट’ देतो, तेंव्हा मात्र खरंच गम्मत वाटते. टीव्ही वरच्या बातम्या मधे पण हेच सारखं घोळून घोळून दाखवत होते.

जे काही ऐकलंय ते खालील प्रमाणे:-

१) टेंडर डॉक्युमेंट हे सिटी कॉर्प च्या नावे घेतले गेले- देशपांडेच्या नावे नाही.

२) टेंडर डॉक्युमेंट हे अहस्तांतरणीय असते, म्हणजे हे टेंडर केवळ सिटी कॉर्पच भरू शकत होती, ते पण ज्या कंपनीच्या नावे टेंडर घेतले आहे त्या  कंपनीच्या तर्फे!

३)   टेंडर   आपल्या पर्सनल कॅपॅसीटी मधे देशपांडेनी भरले असे त्यांचे म्हणणे आहे. पण हे टेंडर सिटी कॉर्प च्याच ऒफिशिअल लेटरहेडवर आणि स्टेशनरीवर भरले गेले होते- देशपांडेंच्या पर्सनल स्टेशनरी वर नाही.

४)  जर देशपांडेंना पर्सनल कॅपॅसिटी वर टेंडर भरायचे होते, तर त्यांनी स्वतःच्या नावाने टेंडर डॉक्युमेंट्स घ्यायला हवे होते. ते केले गेले नाही- डॉक्युमेंट्स सिटी कॉर्प च्या नावेच घेतले गेले. याचे कारण काय असावे ??

५) जास्त   किंमत सहाराने भरली , म्हणून सहाराला टेंडर मिळाले- पण जर सिटी कॉर्प   ने जास्त कोट केलं  असत, तर हेच टॆंडर  ऑफिशिअली सिटी कॉर्प ला मिळाले असते – देशपांडेंना पर्सनल कॅपॅसिटी मधे नाही.  तेंव्हा मिळणारे प्रॉफिट हे सिटी  कॉर्प ला मिळालं असतं.

६) आत्तापर्यंत केवळ दोनच व्यवहार बाहेर आल्या आहेत, अजून तर बरेच व्यवहार बाहेर यायचे आहेत. इतर संघा मधे पण कोणाचे किती पैसे आहेत हे लवकर प्रसिद्ध केले गेले तर बरेच रथी महारथी जाळ्यात सापडतील.

पवारांच्या जावयाची सोनी मधे हिस्सेदारी तर जगजाहीर आहे. त्या वेळेस पण अगदी छाती ठोक पणे कोणत्याही पवारांचा यात हात नाही असे म्हंटले होते, शरदजी  आणि सुप्रियाने. इतर सगळ्याच  टीम मधे कोणाची किती हिस्सेदारी आहे हे ताबडतोब प्रसिद्ध केले गेले पाहिजे- हवं तर या साठी कोर्टाने हस्तक्षेप करायला हवा असे मला वाटते..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized and tagged , , , , , . Bookmark the permalink.

26 Responses to आयपीएल गेट..

 1. Hemant says:

  gunha karataanaa itkaa mothaa karayachaa ki tyawar bhartat shikshach asunaye, hech pawaranni (Baap-Lekine) sidha karun daakhavle aahe. Kasab pekshahi bhayankar lok ahet he.

  • हिमनगाचं टोक आहे हे.. पुढे बघा अजून काय निघते बाहेर ते. अर्थात हे माझं मत आहे .

 2. सागर says:

  ज्या देशात कसाबच्या फाशीची अंमलबजावणी होत नाही त्या देशात पवारच काय कुठल्याही राजकारण्याच्या केसाला धक्का लागू शकत नाही… 😦

  • तेलगी च्या केस मधे काही मोठ्या लोकांची नांवं होती, पण शेवटी काय झालं? तेलगी एकटाच गेला जेल मधे. राजकारणी नेहेमीच सेफ असतात – उदा. शिबू सोरेन..

 3. सगळे एकाच माळेचे मणी आहेत. कुणाकुणाला दोष देणार? स्वार्थाशिवाय राजकारणात शिरेल, तो राजकारणी कसला?

  • इतका पैसा घेऊन करणार तरी काय? मला नेहेमीच हा प्रश्न छळत असतो.

   • हा, हा. पैसा स्विस बॅंकेत सडतो, ते राजकारणात सडतात. राजकारणात गति व रस नसलेल्या त्यांच्या पोराबाळांना कदाचित उपयोग होत असेल त्या पैशाचा.

    • आजकाल दिवस बदललेत. वारसा हक्काने राज कुमार किंवा राजकुमारी पण राजकारणात उतरते 🙂

   • milind says:

    mazya manatale bollas bagh….aksharshaha shiwya ghalawyasha watatat

 4. mazejag says:

  जेथे हा मनुष्य क्रिकेट मध्ये घुसला तिथूनच खेळाच्या वाताहातीला सुरुवात झाली. खेळाच गांभीर्य कुणाच्याही लक्षात येत नाहीये.

  • अहो, आयपीएल ही गांभिऱ्याने घेण्याची गोष्टंच नाही. ती म्हणजे क्रिकेटवेड्या भारतियांच्या मानसिक जडणघडणीचा फायदा घेउन एक पैसा कमवायचे साधन आहे. आयपीएल मधे मला तरी खेळ कुठेच दिसत नाही.

 5. ईतके होउनही हा माणुस केसालाही धक्का न लागता बाहेर पडणार. माणसे मस्त मॅनेज करतात ते

  • निखिल,
   मला वाटतं इथे इतकं सोपं नसावं. इथे त्यांनी जर कोट केले असेल तर त्यात काय चुक आहे? फक्त सरळ मान्य करावे. राजकीय नेते जेंव्हा ” मी नाही त्यातली, अन कडी लावा आतली’ असे वागतात तेंव्हा मात्र चीड येते. लोकांना मुर्ख समजतात हे राजकारणी.

 6. शरद पवार चतुर आहेत. त्यांचा आयपीएलमध्ये हिस्सा आहे ही जगजाहीर गोष्ट आहे. मात्र नेहमीप्रमाणे आपण अडकू नयेत, याची तजवीज त्यांनी आधीच केली आहे. अनिरूद्ध देशपांडेंनी आता जाहीर केलंय, की पुणे संघाची फ्रॅँचायजी मिळाली असती, तर नवीन कंपनी काढली असती, अशा अटीवरच बोलीत भाग घेतला होता. पण त्या नव्या कंपनीत साहेबांचा हिस्सा नसता, हे आता कोण सांगणार?
  याच देशपांडे आणि पवार कंपनीने आधी लवासा नावाच्या एका स्वप्नाळू प्रकल्पाची पायाभरणी करून अनेक गावकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त केले. तिथे आता परिस्थिती अशी आहे, की गेल्या वर्षी लवासाच्या सुरक्षारक्षकांनी गावकऱ्यांवर गोळीबार केला होता.
  साहेबांना आता कॉंग्रेसने चांगलेच घेरले आहे. थोडक्यात काय, तर ‘काका बोले आणि दळ हाले’, ही स्थिती जाऊन आता ‘काका म्हणे उगे रहावे, जे जे होई ते ते पहावे,’ अशी स्थिती आली आहे.

  • देवीदास
   इथे अडकले ते ! आजचा टाइम्स ऑफ इंडीया पाहिलात का? त्यामधे मनोहरांनी सगळं क्लिअर केलंय की सिटी कॉर्प नेच कोटेशन सबमीट केलं म्हणून. दुसरं म्हणजे त्या कोटेशन बरोबर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स चं रिसोल्युशन पण अटॅच केलंय, देशपांडेंना ऑथोराईझ करण्याबाबत!!

   एक आहे, गेंड्य़ाच्या कातडीची माणसं आहेत ही, इतक्या सहजा सहजी मान्य करणार नाहीत. थरुरला ज्या त्वरेने राजिनामा द्यायला सोनियाने भाग पाडले, त्याच कार्यतत्परतेने शरद पवार आणि सुप्रीयाचा राजीनामा मागितला जातो का ? हे पहाणे करमणुकीचे ठरेल

 7. Vidyadhar says:

  हे आता काकांच्या अवघड जागेचं दुखणं झालंय….टाईम्स कोणाच्या इशार्‍यावर एव्हढं रणकंदन माजवतोय हे ही पुरेसं स्पष्ट होतंय. एकंदर काकांच्या मुत्सद्देगिरीची(!) अजून एक कसोटी पाहणारा काळ आहे!

 8. Pingback: आयपीएल गेट.. | indiarrs.net Featured blogs from INDIA.

 9. thanthanpal says:

  नेहरू पासून ते राहुल आणि आपले आबा पाटील हे सर्व लोक भ्रष्ट्रचारा विरुद्ध गप्पा मारतात , पण या एकाही राजकारण्याची या विरुद्ध अजामीनपात्र कायदा करण्याची हिम्मत झाली नाही. भ्रष्ट्र राजकारणी नेत्या कडून भ्रष्ट्र नेत्याच्या भ्रष्ट्राचारा करता जनते कडून निवडलेली
  राज्य शासन प्रणाली म्हणजे भारतातील लोकशाही. भ्रष्ट्राचारा ने कोटीच्या कोटी उड्डाणे ओलांडली तरी महात्म्या ने केलेल्या अहिंसेच्या नसबंदी ने जनता षंढ झालेली आहे , ती कांही आपल्या विरुद्ध आवाज करू शकत नाही हे या भ्रष्ट्र नेत्यांना आणि त्यांच्या पिल्लावलीळा चांगलेच माहित झालेले आहे. वर्तमानपत्रे देखील यांचीच भाट झालेली आहे .( टाईम्स कोणाच्या इशार्‍यावर एव्हढं रणकंदन माजवतोय हे ही पुरेसं स्पष्ट होतंय ) याकरता आता ब्लोगेर्स यांनीच अजामीनपात्र कायदा करण्या करता जनमत जागृत करण्याची चळवळ उभी करावी.आज आपली संख्या कमी आहे पण भविष्यात नक्कीच आपण या कामात यश मिळवू .त्याच बरोबर आपल्या लिखाणावर विचारावर कोण्या भांडवलदार मालकाची, भ्रष्ट्र नेत्याची सत्ता , अंकुश नसल्याने हे काम आपण चांगले करू शकतो. संगणकाच्या प्रभावी वापरणे शासन प्रणाली सुद्धा सुधारू शकते हे e governance च्या साईट वर भेट दिल्यास दिसून येते. साध्यासाध्या कामात जनतेची अडवणूक जी नोकरशाही करत आहे तीला आळा लगाम बसला आहे. http://india.gov.in/govt/national_egov_plan.php आपली मते thanthanpal@gmail.com वर आवश्य कळवा. thanthanpal.blogspot.com

  • अजामिनपात्र गुन्हा – पण कुठला म्हणताय तुम्ही? शरद पवारांनी आयपीएल मधे पैसे गुंतवले हा गुन्हा होत नसावा. स्वतंत्र भारतामधे कोणीही कुठेही पैसे गुंतवु शकतो. राजकीय कारणा मूळॆ कदाचित असेल, की ते मान्य करित नाहीत पैसे गुंतवल्याचे.

   आयपीएल एक शिवी झालेली आहे आजकाल.

   तुम्ही दिलेली इ गव्हर्नेंस ची साईट खूप छान आहे. फार काळ लागणार नाही, लवकरच ते इ गव्हर्नेंस लागु होईलच असे वाटते. त्या दिशेने वाटचाल सुरु आहेच.

 10. bhaanasa says:

  इतके पैसे कमवून शेवटी ते सगळे इथेच ठेवून जायचेयं ना….. या गोष्टीचा विसर कसा पडतो?? शिवाय पाहिलेस नं आता त्यांना असे खाली खेचू शकतात, एकटे पाडू शकतात तर बाकीच्यांची काय कथा…. फार फार गलिच्छ प्रकार आहेत.

  • एका गोष्टीचं बरं वाटलं, ह्या पोस्ट मधे नेमकं जे लिहिलंय, तेच बाहेर निघालं. माझं गेसिंग बरोबर होतं. कुठल्याही पेपरमधे येण्या आधी लिहिलेले पोस्ट आहे हे.
   स्वतःची पाठ थोपटून घ्यायला उगिच बरं वाटतं.

 11. आयपीएल ही क्रिकेटला लागलेली कीड आहे आणि हा पवर्‍या म्हणजे देशाला लागलेली. !!!!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s