शब्दबंध – एक अनुभव

शब्दबंध’ म्हणजे काय हे सांगायची आता फारशी आवश्यकता असेल असे मला तरी वाटत नाही.  गेली तिन वर्ष झालीत , मराठी ब्लॉगर्सची ई सभा घेतली जाते शब्दबंध तर्फे !

एक जण कथा वगैरे वाचणार आणि कित्येक लोकं ते सभे प्रमाणे ऐकणार असे काहीसे स्वरुप होते या ई सभेचे. व्हॉइस चॅटींगची पुढची स्टेप म्हणा हवं तर.

एक वर्षापुर्वी मी जेंव्हा पहिल्यांदा या शब्दबंध बद्दल ऐकलं तेंव्हा मी तसा स्वतः तसा ब्लॉगिंग या क्षेत्रात नवीनच होतो !   मागच्या वर्षी जानेवारी १७ ला ब्लॉग सुरु केला, आणि मे   महिन्यात   या शब्दबंध बद्दल वाचल्याचं आठवतं. पण स्काईप, वगैरे जड शब्द ऐकले, आणि सरळ दुर्लक्ष केलं- म्हंटलं, धिस इज नॉट माय कप ऑफ टी!! तसाही मी थोडा स्लो आहे कॉम्प्युटर्सच्या बाबतीत.

या वर्षी जेंव्हा  जेंव्हा पुन्हा एकदा शब्दबंधच्या  इ सभेची घोषणा ऐकली ,  आणि त्यांच्या साईटवर पुन्हा या बद्दल वाचलं, तेंव्हा मात्र मला अजीबात रहावलं नाही, आणि त्या साईटवर जाऊन कॉमेंट टाकली, की मला यायला आवडेल, पण स्काईप वगैरे काही समजत नाही, मी डाउन लोड केलंय पण कसं वापरायचं हे सांगितलं तर नक्कीच येईन या सभे मधे एक श्रोता म्हणून.

श्रोता म्हणून भाग घ्यायचं ठरवलं होतं, कारण मला आहे सायनसचा त्रास, आणि सध्या तर अगदी पिक वर असल्याने स्पष्ट  उच्चार येत नाहीत. स्काइप येत नाही म्हंटलं, तर   प्रमोदजी म्हणाले, की मी शिकवतो सगळं, आणि तुम्ही सायनसची काळजी न करता  श्रोता म्हणून नव्हे तर वक्ता म्हणून पण भाग घ्या. बराच वेळ नाही, म्हंटलं, पण जेंव्हा प्रमोदजी म्हणाले, सगळे आपले मित्रंच आहेत, जरी चुकलं तरीही फारसा फरक पडत नाही- तेंव्हा मी पण वाचक म्हणून सहभागी व्हायचं ठरवलं.

प्रमोद देवांनी मग स्काईप कसं वापरायचं याचं ऑन लाइन ट्रेनिंग दिलं. मी, जयंत कुलकर्णी, रानडे साहेब आणि प्रमोदजी  , बराच वेळ गप्पा मारल्या आणि स्काईप कसे वापरायचे ( ते तितकंसं अवघड नाही बरं कां!!) ते शिकुन घेतले.

शेवटी तो शब्दबंधच्या इ सभेचा दिवस ५ जून उजाडला. सकाळी उठल्यावर सकाळपासुनच उत्सुकता होतीच या बद्दल – पण सौ. ने बॅंकेत जाउन एफडी मॅच्युअर झालेली आहे, ती रिन्यु करुन या , भाजी आणा, आंबे संपले आहेत – आणा असा हुकूम सोडला, आणि सगळी कामं आटॊपून ११-४५ ला घरी पोहोचलो.

स्काइपला लॉग इन केलं, आणि बरीच मित्र मंडळी दिसली ऑन लाइन. माझा हिरवा दिवा पेटलेला बहून बहुतेक प्रमोदजींनी बोलावले, आणि त्यांच्या गृप मधे दाखल झालो. जनरल गप्पा सुरु होत्या. तेवढ्यात दुसरे सत्र सुरु होणार होते. मी श्रोता म्हणुन नाव नोंदवले होतेच. आणि दुसरे सत्र सुरु झाले. कथा, गप्पा, लेख, कविता वगैरेंचे वाचन सुरु झाले. मस्त वेळ गेला.

माझं वाचक म्हणून नांव तिसऱ्या सत्रात नोंदवलेले होते ( सायंकाळी ५- ८) मी पण ( विथ सायनस इन फुल्ल स्विंग, जसे जमतील तसे) दोन लेख वाचले. बरेच नविन मित्र मिळाले, बरं वाटलं. बऱ्याच ऑन लाइन मित्रांना जे येऊ शकले नाहीत त्यांना मिस पण केले.

मला कोणाचेही आभार वगैरे मानणे म्हणजे खूपच फॉर्मल वाटते- आभार मानणं म्हणजे तुम्ही जे केलं त्याबद्दल आभार , म्हणजे संबंध संपले असं डिक्लीअर करणं असं वाटतं. म्हणुन प्रशांत उदय मनोहर, संग्राम भोसले, प्रमोदजी  मी तुमचे आभार मानणार  नाही, पण हक्काने सांगतो, की पुढल्या वर्षी पण पुन्हा एकदा शब्दबंध कार्यक्रम याच उत्साहाने प्लान करा. आम्ही सगळे पुन्हा सहभागी होऊच, आणि एकेकटेच नाही तर बऱ्याच मित्र- मैत्रीणींच्या बरोबर.

जेंव्हा माझे गुगल स्टेटस मी ’शब्दबंध २०१०’ केले तेंव्हा बऱ्याच ब्लॉगर्सनी पण हे काय? म्हणून विचारणा केली. इथे समालोचन करणार नाही मी, कारण त्यावरची ऑफिशिअल पोस्ट ही शब्द बंध वर येईलच. ह्या पोस्टचा उद्देश केवळ या कार्यक्रमाबद्दल लोकांना माहिती व्हावी म्हणून आहे. तेंव्हा स्काइप डाउनलोड केले नसेल तर आता करून ठेवा, आणि पुढल्या शब्दबंध मधे सहभागी होण्याची तयारी आता पासूनच सुरु करा.

(शब्दबंधाच्या साईटीवर माझं नांव नाही वाचक म्हणून पण मी पण वाचन केलं बरं कां!! 🙂 )

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मराठी and tagged , , , . Bookmark the permalink.

23 Responses to शब्दबंध – एक अनुभव

 1. MEHARSHA says:

  sir,
  me wa mazi maitrini bloggers nahi pan tumache blog awarjun wachato tyawar kadhi kadhi charcha pan karato shabdbandh badal aasech kuthetari wachle hote aamhala pan tumachya e- sabhet ek shrota mhanun join hota yeil ka? mala skype baddal farshi mahiti nahi pan me ti milwun nakki praytn karin
  aamhi computer aamachya mulanchya kade shikat aahot.

  • हर्षा
   अवश्य!! दर वर्षी जुन महिन्यात ही “इ सभा” होते. जगातल्या सगळ्या भागातले लोकं या सभेमधे भाग घेतात. तुम्ही पण अवश्य घेउ शकता. श्रोता म्हणूनच येऊ शकता, पण कशाला? सरळ ब्लॉग सुरु करा, आणि पुढल्या वर्षी आपले लेख वाचा ना या इ सभेत.
   आणि स्काईप काही फारसं कठीण नाही. एखाद्या चॅटींग मेसेंजर सारखंच आहे, फक्त इथे बरेच लोकं एकदम चॅट करु शकतात, इतकाच काय तो फरक. डाउनलोड केलं की झालं!!

 2. Pingback: Tweets that mention शब्दबंध – एक अनुभव | काय वाटेल ते…….. -- Topsy.com

 3. छान वाटलं वाचून. गेली दोन वर्षं काही ना काही कारणाने मला शब्दबंधमधे सामिल होणं जमलं नाही. वेळेचं नि कामाचं गणित याही वेळी जुळलं नाही. शिवाय मधेच इंटरनेटचा गोंधळ, पीसी रिफॉरमॅटींग असे बरेच छोटे गोंधळ सुद्धा झाले. असो. शब्दबंधमधे सामिल होण्याचा अनुभव एकदा तरी घेऊन पहायचा आहेच. पुढच्या वर्षी जमेल अशी अपेक्षा आहे. प्र.उ.म. ने ही खूप चांगली संकल्पना रूजवली आहे. खरंतर पहिलं ब्लॉगर संमेलन (अर्थात ऑनलाईन) हे प्रशांतनेच भरवलं असं म्हणायला हवं.

  >> स्काईपच्या कॉन्फरन्स रेकॉर्ड करता येतील अशी सुविधा मिळाली आहे. ती टेस्ट करायची आहे. त्यासाठी किमान पंधरा मिनिटं तरी स्काईपवर येता यायला हवं, तेही जमत नाहीये.

  • तुम्ही पण यायला हवं होतं. मजा आली. जवळपास पुर्ण दिवस भर स्काईपवर होतो काल. पुढ्ल्या वेळेस नक्की या.

 4. mau says:

  महेंद्रजी
  तुमच्या लेखनाची मी एक मोठ्ठी पंखा आहे हे अद्याप तुम्हाला कळलच असेल…तुमचा, श्री आणि हेरंबचा ब्लोग मी नियमित वाचते..आणि मनसोक्त आनंद लुटते…सकाळी हातात चहाचा कप आणि तुमचे लेख हे आता अंगवळणी पडले आहे…….तुमच्या तिघांची लेखन शैली अप्रतिम ह्यात शंकाच नाही….[:)]समोर बसुन बोलत अहात असे नेहमी वाटते…पण..शब्दबंधात सामिल व्हायचा chance हुकला…anyways…पुढल्या वर्षी नक्कीच….धन्यवाद !!असेच लिहीत रहा….म्हणजे आम्हाला आनंद मिळेल..आमची सकाळ एकदम फ़्रेश…….[:)]

  • उमा
   तुमची प्रतिक्रिया वाचून खूप बरं वाटलं.
   काल हेरंब आणि श्री पण होती शब्दबंध मधे पण रात्रीच्या सेशनला . पण तेंव्हा नेमका थोडा गोंधळच झाला स्काईपचा, त्यामूळे तिचे ऐकता आले नाही.नउ ते साडे दहाच्या पर्यंत प्रयत्न केला, पण नंतर मात्र पेशन्स संपला- ( कारण तसाही दिवसभर होतोच स्काईपवर)

 5. ह्या वर्षी नाही जमला, पुढल्यावेळी पक्का 🙂

 6. Pingback: शब्दबंध – एक अनुभव | indiarrs.net Featured blogs from INDIA.

 7. bhaanasa says:

  महेंद्र, काल तू गेलास आणि थोड्या वेळात गाडे बरेचसे रूळावर आले. तुला सेलवर मेसेज देणार होते पण कदाचित झोपला असशील म्हणून… मजा आली. मला प्रत्यक्ष ब्लॉगर्स सभेला हजर राहता न आल्याचा सल किंचितसा तरी हलका झाला. 🙂 तू ऐकायला असावास अशी मनापासून इच्छा होती पण…. असो. पुढच्या वर्षी. अरे, तू कुठल्या सत्रात वाचन केलेस? तुझे नाव तर मी आधी अभिवाचकांमध्ये पाहिले नव्हते… अचानक ठरवलेस का? मला कळवले असतेस तर मी हजर राहिले असते नं… शब्दबंधचे आभार.

  • श्री,
   माझ्या लक्षात आलं होतं की सभासद जास्त झाल्या मूळे बॅंड विड्थ पुरत नसावी म्हणून. जवळपास दिड तास आत शिरायचा प्रयत्न केल्यावर , सोडून दिलं.
   मी प्रमोदजीं च्या सत्रामधे वाचन केले. (तिसरे सत्र) संध्याकाळी ५ ते ८ पर्यंत. माझी इच्छा होती रात्रीचा कार्यक्रम पण ऐकायची- नेक्स्ट टाइम!!

 8. काका, दुपारच्या सत्राला मजा आली, रात्री स्काईप मला वारंवार बाहेर काढत होतं, त्यामुळे ते सत्र हुकले.
  शब्दबंधच्या आयोजकांचे आभार!

  • दुपारी मी एकदा पण बाहेर फेकलो गेलो नव्हतो. मला वाटतं की भारतामधुन मॉनिटर केलं गेलं आणि आपणही भारतामधेच , त्या मूळे कदाचित नीट जमलं असेल.

 9. खरंच काका, शब्दबंध हा एक वेगळा अनुभव होता. श्रीताई म्हणत्ये तसं ब्लॉगर्स मेळाव्याला हजर राहता आलं नाही तरी निदान त्याच्या थोडंसं का होईना जवळ जाणारं असं काहीतरी..

  चौथ्या सत्राला स्काईपने जाम गोंधळ घातला होता (आणि सभासदांनीही 😛 ) .. मला तुमच्या/देवकाकांच्या सत्राला हजर रहायचं होतं खरं तर पण पाहिलं सत्र संपवून झोपायला जाईपर्यंत २ वाजले होते त्यामुळे काही चमत्कार झाला असता तरच मी तिस-या सत्रासाठी ७:३० ला उठणं शक्य होतं. (पण तो झाला नाहीच आणि माझं तुमचं सत्र हुकलं 😦 )

  • चौथ्या सत्रामधे बरेच जास्त लोकं आले होते, त्यामूळे त्रास झाला. एकदा लोकं कमी झल्यावर सगळं व्यवस्थित जमलं. मी दिड तास प्रयत्न केला आत शिरायचा, पण काही जमत नव्हतं, म्हणुन लॉग ऑफ केलं शेवटी. पण मस्त अनूभव होता हा.

 10. मी सुरुवातीलाच श्रोता म्हणुन नाव नोंदवल होत पण पुढे बराच व्यस्त असल्याने काही जमल नाही ते स्काइप प्रकरण ही अजुन आजमावल नाही कधी..पुढच्या वेळी येउ हा अनुभव घ्यायला….

 11. रोहन says:

  गेली २ वर्षे ६ जून रोजी मी बरोबर बोटीवर होतो. बोटीवर असल्याने स्काएप वापरता येत नाही आणि मग भाग घेणे दुराच राहिले… बघुया पुढच्या वर्षी जमतय का ते…

  • रोहन
   पुढल्यावेळी प्रयत्न कर, किंवा एक् वेगळं हाय स्पिड डेटा कार्ड घेउन ठेव!

 12. Vidyadhar says:

  मी एकाच सत्राला हजर राहू शकलो…:(
  पण खूप मजा आली….
  सगळया शब्दबंधींचे आभार!

 13. DAGA DILIP R. says:

  आजच वाचलं…..फार फार छान वाटला …मला सुद्धा आपल्या सोबत सामील व्हायला आवडेल ….

  • दिलीप
   स्वागत ब्लॉग वर. माफ करा उत्तर द्यायला वेळ होतोय.
   कदाचित या वर्षी करू या शब्दबंध.. ठरलं की एक पोस्ट टाकतोच.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s