इस्ट इंडीया कंपनीकी जय..

संजीव मेहेता (फोटो जालावरून)

इस्ट इंडीया कंपनी की जय!आज अगदी मनापासून इस्ट इंडीया कंपनीचा जयजयकार असो अशी घोषणा द्याविशी वाटते आहे.  🙂   आपण भारतीय या नावाशी खूप  भावनिक रीत्या  जोडल्या गेलेलो  आहोत, त्यांनी आपल्यावर राज्य केलं म्हणूनही  असेल कदाचित! किंवा अगदी प्राथमिक शाळेपासून वाचत आलोय की इस्ट इंडीया कंपनी भारतात आली ते मसाल्याचे पदार्थ आणि चहाचा व्यापार करायला म्हणूनही एक वेगळी जवळीक असेल कदाचित!

बरेच लोकं तर असेही म्हणणारे आहेत की  ब्रिटिश आले म्हणून भारताचे आजचे जे स्वरुप आहे ते दिसते आहे, नाहीतर आज  पण आपल्याकडल्या राजे लोकांच्या मधे   अंतर्गत मारामाऱ्या सुरु राहिल्या असत्या, आणि आपली परिस्थिती पण आफ्रिके पेक्षा काही फार वेगळी राहिली नसती. असो, जे काही असेल ते असो- पण भारतीयांची  लव्ह हेट रिलेशनशिप आहे ’इस्ट इंडिया कंपनी’ या  नावाबरोबर.आपण हे नांव इग्नोअर करुच शकत नाही.

इस्ट इंडिया  कंपनी म्हणजे आजच्या एमबीए च्या भाषेत ब्रिटन ची एसयुव्ही.  जगातल्या कुठल्याही देशात व्यापाराच्या निमित्याने जायचे आणि मग तिथे गेल्यावर राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन हळू हळू आपले हात पाय पसरायचे अशी स्ट्रॅटेजी असायची त्यांची. इस्ट इंडिया कंपनीने भारतावर पण जवळपास २०० वर्ष राज्य केले, तरी पण इस्ट इंडिया कंपनी चा विजय असो असे का म्हणावेसे वाटावे? सांगतो.. 🙂

ही ’एसयुव्ही’ ची स्ट्रॅटेजी वापरून  टाटांनी ’टेटली ऑफ युके’ हा ब्रिटनचा एक एस्टॅब्लिश्ड  ब्रॅंड ’रिव्हर्स बाय आउट’ पध्दतीने विकत ( टेक ओव्हर )घेतला  होता.  एखाद्या भारतियाने परदेशी ( त्यातल्या त्यात ब्रिटीश) कंपनी टेकओव्हर करण्याची ही पहिलीच    घटना होती.एमबीए मार्केटींगच्या अभ्यासक्रमात ह्या केसची केस स्टडी तर हमखास डिस्कस केली जाते. ही घटना जेंव्हा पेपरला वाचली,  त्या दिवशी तर   प्रत्येकच भारतीयाची मान अभिमानाने उंचावली गेली असावी .  स्विट रिव्हेंज घेतल्या मूळे !!असो. विषयांतर झालंय.

इस्ट इंडिया कंपनी इथे आली ते   राज्य करण्यासाठीच!  म्हणूनच त्यांचे स्वतःचे सैन्य पण त्यांनी  बरोबर बाळगले होते. १७५७ साली ह्या कंपनीकडे  आपले स्वतःचे  सैन्य, करन्सी, नेव्ही, शिपिंग बिझिनेस, तर होताच, पण त्याच बरोबर भारतातल्या मोठ्या बाजारात ( की ट्रेडींग पोस्ट्स ) वर पण यांचाच कंट्रोल होता. १८७४ मधे इस्ट इंडिया कंपनी नॅशनलाइझ्ड झाली, आणि   ब्रिटीश क्राउन च्या अधिपत्याखाली गेली. त्यांचे सैन्य पण राणीच्या क्राउनच्या अधिपत्या खाली गेले.  एकदा राणीचा सपोर्ट मिळाल्यानंतर मात्र या कंपनीने कधीच मागे वळून पाहिले नाही.

एका बाबतीत ब्रिटनचे कौतुक वाटते, त्यांनी भारतीयांना गुलाम म्हणून विकले नाही . अर्थात मलेशिया , सिलोनला भारतीय मजूर पाठवले, पण ते गुलाम म्हणून नाही. ( कदाचित हा वादाचा मुद्दा पण असू शकतो, पण लिहिण्याच्या ओघात लिहिले आहे ही गोष्ट)

कोणे एके काळी एक ब्रिटीश व्यापारी कंपनी म्हणून प्रसिद्ध असलेली ही कंपनी   एका संजीव मेहेता नावाच्या एका मुंबईकर भारतीयाने विकत घेतली आहे ही बातमी जेंव्हा समजले तेंव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, की ही बातमी पुर्णपणे डीस्काउंट केल्या गेली आहे वृत्तपत्रांमधे किंवा टीव्ही वरच्या बातम्यांमधे पण .

या कंपनीचे मुळ ४० भागीदार होते, आणि त्या चाळीस शेअरधारकांशी निगोशिएट करून सगळ्यांकडचे शेअर्स विकत घेणे काही सोपी गोष्ट नव्हती, पण या सगळ्या अडचणींवर संजीव मेहेता यांनी  मात करून ह्या   कंपनीचे मालकी हक्क  विकत घेतले आहेत. जवळपास २००५ पासून शेअर्स विकत घेण्याची प्रोसेस सुरु झाली होती, आणि आता एवढ्यातच कंपनी टेक ओव्हर करण्याची प्रोसेस पुर्ण झालेली आहे.

ही कंपनी टेक ओव्हर तर केली- पण पुढे काय? पुर्वी चहा आणि मसाल्याचे पदार्थ यांचा व्यापार करणारी ही कंपनी आता काय करणार आहे?   इस्ट इंडीया कंपनीचा आता जगभर रिटेल स्टोअर्स उघडण्याचा प्लान आहे . या स्टॊअर्स च्या श्रुंखलेतिल पहिले स्टोअर ’मे फेअर’ या इंग्लंड मधल्या उच्चवर्गीय भागात   उघडले आहे.  अशीच स्टोअर्सची चेन संपुर्ण जगभर उघडण्याचा त्यांचा मानस   आहे. याच कंपनीची बरीचशी आउटलेट्स लवकरच भारतामधे पण उघडण्यात येणार आहेत   .या स्टोअर्सच्या चेन व्यतिरिक्त ते रीअल इस्टेट, प्रोसेस्ड फुड, फर्निचर, हेल्थ- म्हणजे दवाखाने , हॉटेल्स वगैरे   व्यवसायात पदार्पण करणार आहेत.

इस्ट इंडीया कंपनी विकत घेतल्या बद्दल संजीव मेहेता यांचे मनःपुर्वक अभिनंदन. एकेकाळी भारतावर  मालकी हक्क गाजवणारी   कंपनी   आता एका भारतीयाच्या मालकीची झालेले आहे, त्या बद्दल त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करुच थांबतो इथेच

हे पोस्ट लिहून झा्ल्यावर मनात एक विचार आला, सगळे जण  आपल्याला ( भारतियांना) इमोशनल फुल्स म्हणतात , तसे  आपण खरंच आहोत का?


About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , . Bookmark the permalink.

29 Responses to इस्ट इंडीया कंपनीकी जय..

 1. Kiran says:

  Really good article. How did you track the news?
  It seems we wre emotional fools, but then I think it adds flavor!!

  • किरण
   एक मित्र आहे रवी गोखले म्हणुन त्याने सांगितले,त्याने सांगितले , आणि वाटलं की यावर काहीतरी लिहावं म्हणून हे पोस्ट लिहिलं.

 2. yasha says:

  HI baatami kalalyane khoop anand zala….pan companyche naav tech thevle asel tar ti bharatat kitpat chalel he baghayla pahije…(tithehi ekhada revenge gheta yeil ka???)

  • यश
   कंपनीचे नांव तेच ठेवले आहे. कारण ब्रॅंड व्हॅल्यु खूपच जास्त आहे त्या नावाची. केवळ १५ मिलियन डॉलर्स मधे घेतली आहे ही कंपनी संजीवने. एके काळची इतकी बलाढ्य कंपनी केवळ १५ मिलियन्स मधे??
   मार्केटींग कंपनी आहे, चालेलच!!

 3. बातमी ऐकली होती, थोड्यावेळ कौतूक देखिल वाटले.. पण लागलीच विसरल्या गेली. आहे खरी महत्वाची मात्र.

  • आनंद
   सेंटीमेंट्स खूप गुंतले आहेत आपले या नावासोबत !! मी पण ऐकलं होतं, पण डॉक्युमेंट काल पाठवलं एका मित्राने मेल मधे, मग लिहायला घेतलं.

 4. सचिन जाधव says:

  महत्त्वाची नाही, पण गंमतीची वाटते खरी बातमी.

  “एका बाबतीत ब्रिटनचे कौतुक वाटते, त्यांनी भारतीयांना गुलाम म्हणुन विकले नाही . अर्थात मलेशिया , सिलोनला भारतीय मजूर पाठवले, पण ते गुलाम म्हणून नाही. ( कदाचित हा वादाचा मुद्दा पण असू शकतो, पण लिहिण्याच्या ओघात लिहिले आहे ही गोष्ट)”

  हे वाचून मात्र लेख फारच भावनेच्या भरात लिहिला आहे असं वाटलं. कौतुक वाटण्याचं कारण नाही. शक्य असतं तर केलं असतं त्यांनी. भारतीय काही त्यांचे लाडके जावई नव्हते. अवघड होतं भारतावर राज्य करणं. भारत त्यांनी कसा काय हातात ठेवला, आणि ‘सांभाळला’ हा एक अभ्यासाचा विषय आहे खरा. असो.

  लेखनात खूपच विविधता आहे. आवर्जून वाचतो.

  • सचिन
   अहो, एकाहात्ती लिहिलाय लेख . म्हणजे टाइप करण्ं सुरु केलं आणि संपेपर्यंत जे काही मनात येत गेलं ते इथे टाइप करत सुटलो.
   तुमचं म्हणणं अगदी खरं आहे, थोडा भावनाविवश झालो होतो लिहितांन म्हणुन तसं लिहिलं गेलं असावं. एकदा टाइप केलं की मग मी शक्यतो ते डिलिट करीत नाही, म्हणून ते वाक्य तसंच राहिलं. 🙂
   प्रतिक्रियेकरता आभार.

 5. रोहन says:

  बातमी ऐकीव होती तेंव्हा खरी वाटली नाही… आनंद झाला खरे आहे ते वाचून… 🙂

 6. मागे वाचली होती बातमी… लेख मस्तच नेहमीप्रमाणे. पण मला शेवटचं वाक्य जास्त पटलं. कारण तेव्हाची आणि आताची ‘ईस्ट इंडिया कंपनी’ यामध्ये नावं सोडलं तर रूढार्थाने सामाईक असं काहीच नाही.

  • हेरंब
   लेख पुर्ण लिहिला आणि मला ते जाणवलं.. एकदा असंही वाटलं की डीलिट करुन टाकावा म्हणून, पण तसाच पब्लिश केला. 🙂 तेंव्हाची आणि आताची ईस्टईंडीया कंपनी यात काहीच समाईक नाही !!! मान्य!!

 7. नवीन माहिती मिळाली. स्वीट रिव्हेंज! येस… या कंपनीच्या नावाशी किती मोठा इतिहास निगडीत आहे. आता पुन्हा याच नावाशी एक नवा इतिहास जोडला गेला आहे. ब्रिटिशांनी भारतीयांना गुलाम म्हणून का विकलं नाही? खरंच, एक कोडं आहे. त्यांना अशक्य नव्हतं असं म्हणावं तर इतकी वर्षं त्यांनी भारतावर राज्य केलं म्हटल्यावर त्यांना ते सहज शक्य होतं असं वाटतं.

  • कांचन
   मला पण तोच प्रश्न पडलाय. असो.. बघु या शोध घेउन ! सध्या टुर वर असल्याने पहाता आले नाही, पण एकदा मुंबईला परत गेलो की नक्की पाहिन.

 8. हया कंपनीने आता मोठ होवुन ईग्लंडवर राज्य करायला हव…तेव्हा आमचा बदला पुर्ण होइल… 🙂
  काहीही असो चांगल वाटल ही बातमी वाचुन…

  • देवेंद्र
   तेंव्हाची इस्ट ईंडिया कंपनी सध्या इतक्या विपन्नावस्थेत होती की केवळ १५ मिलिन्स मधे विकल्या गेली. यावरून तिच्या परिस्थितीची कल्पना यावी.

 9. Nilesh says:

  Batmi aikli hoti pan details mahit navhate. Details puravlya baddal dhanyawaad.
  Lekh chaan aahe.

  Cheers
  Nilesh Joglekar

 10. Amol says:

  Coolies- How Britain Re-invented Slavery PT6


  • अमोल
   लिंक्स बद्दल आभार. मी अजून दोन दिवस टुर वर असल्याने यु ट्य़ुब पहाता येणार नाहीत ( डेटा कार्ड वर बॅन केलंय यु ट्य़ुब) पण मुंबईला परत गेल्यावर शुक्रवारी नक्की पाहिन.

 11. jeevantarang says:

  बातमी ऎकली होती पण इतके details माहीत नव्हते. धन्यवाद . इमोशनली फुल्ल(full) भारतियांचा विजय असो.

 12. काहीही असो मला पण आनंद झाला ही बातमी वाचुन.

 13. शरिरावरच्या जखमा आनुवंशिकतेने येत नाहीत, पण अस्मितेला झालेल्या जखमा मात्र प्रत्येक पिढीत उमटत असते. “इस्ट इंडिया कंपनी” ही अशीच एक प्रत्येक भारतीयाची भळभळणारी जखम. संजिव मेहतांच्या कर्तुत्वाने ही जखम भरुन निघेल, परंतू व्रण कायमच राहिल.

  • सहमत आहे. जेंव्हा बातमी वाचली तेंव्हा माझ्या मनात पण नेमके हेच भाव आले होते. 🙂 प्रतिक्रियेकरता आभार.

 14. bhaanasa says:

  सोनालीशी सहमत. 🙂 बाकी इंग्रजांनी इतकी वर्षे भारत सांभाळला तो दुफळीचे राजकारण खेळूनच ( आणि ती कीड जातानाही ते इथेच पक्की रुजवून गेल्याने आज इतकी वर्षे होऊनही कमी होणे सोडाच जबरी फोफावलीये ) आणि आपल्याला गुलाम म्हणून विकणे त्यांना शक्यच नव्हते. ते चतुर व पक्के धोरणी होते. भारतीयांमध्ये असलेली धमक व प्रचंड हुशारी त्यांनी ओळखली होती व त्याचबरोबर भावनिक नसही हेरली होती. केवळ तीलाच हत्यार बनवून त्यांनी राज्य केले.

  • श्री
   मला वाटतं त्यांना गुलाम बनवून विकता आलं असतं. अमेरिकन लोकांनी आफ्रिकेतून गुलाम नेले काम करायला, तसेच इथुन इंग्रजांना पण नेता आले असते..
   दुफळीचं राजकारण< त्यांनीच शिकवलं .

 15. Vidyadhar says:

  आपण इमोशनल फूल्स आहोत हे खरं…पण त्यातच तर मजा येते!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s