२ लक्ष आभार…

(फोटो जालावरून) इंजिनिअर - लेखक?

१७ जानेवारी २००९ . आयुष्यातल्या एका नवीन अध्यायाला सुरुवात झाली. ब्लॉग सुरु केला होता मी याच दिवशी.   याच विषयावर एक विस्तृत पोस्ट जेंव्हा पहिले एक लक्ष वाचक झाले तेंव्हाच लिहिली होती, आता केवळ पुनरावृत्ती नको म्हणून टाळतोय. अगदी खरं खरं सांगायचं तर हे लिहितांना आपण स्वतः स्वतःचे कौतुक करुन घेतोय का? असाही एक विचार मनात आला होता, पण हा एक वाचकांचे आभार मानण्याची संधी आहे   – ती कशाला गमवायची? म्हणून हे पोस्ट लिहायला घेतले..

स्वतःला एक्स्प्रेस करण्यासाठी ब्लॉगींग सुरु केले होते. ( खरंच ब्लॉग लिहिणं का सुरु केलं ते इथे लिहिले होते फार पुर्वी पण.. ) एकच ठरवले होते की काहीही झाले तरीही स्वतःला जे वाटते तेच इथे लिहायचे. लोकांना काय आवडते ते लिहिणारी बरीच वृत्तपत्रे आहेत. स्वतःशी प्रामाणिक राहून लिहायचे! स्वतःशी प्रामाणिक राहून लिहिले म्हणजे लोकांच्या पण मनापर्यंत पोहोचते हे लक्षात आलं लवकरच! इथे सगळ्या प्रकारचे  लेखन केले , प्रायोगिक लेखन जसे कथा ( जो माझा प्रांत नाही) तो पण लिहिण्याचा प्रयत्न केला, विनोदी लेख , चित्रपट परीक्षण वगैरे पण करण्याचा प्रयत्न केला. परीक्षण म्हंटलं की कांचन कराई, आनंद, आणि गणेश मतकरी यांचा हातखंडा, पण तरीही प्रयत्न केलाच एकदा नव्हे तर तिनदा!!  आणि त्यामधे पण सगळ्यांनी उत्साहवर्धक प्रतिक्रियाच दिल्या.

बरेचदा लेख आवडला नाही , तरीही प्रतिक्रिया आवर्जून देणारे लोकं पण आहेतच. त्यांच्यामुळेच पाय जमिनीवर टिकुन आहे. अजय अतुल या पोस्टला सगळ्याचीच मते माझ्या मताच्या विरुद्ध आहेत. त्याच पोस्ट वर अजय अतुल मधल्या अजय ने स्वतः दिलेली  कॉ्मेंट पण आहे. तिला दिलेल्या उत्तरावर त्यांचे काहीच  भाष्य नाही. असो.

इथे सभ्य भाषेत आलेल्या माझ्या  लेखाच्या विरुद्ध असलेल्या कॉमेंट्स पण प्रसिद्ध करतो , पण फक्त शिव्या गाळ केलेल्या कॉमेंट्स इथे प्रसिद्ध करीत नाही. इथे कॉमेंट मॉडरेशन नाही,   कुठलीही कॉमेंट  ताबडतोब प्रसिद्ध होते इथे.

खादाडी हा माझा आवडीचा विषय . या विषयावर पण जवळपास ९ पोस्ट टाकल्या- आणि अजूनही टाकण्याचा विचार आहेच..राजकारणावर हल्ली थोडं कमी केलंय भाष्य करणे. पण तो विषय पण वर्ज नाही इथे . लवकरच पुन्हा, उध्दव, राज, शरदराव वगैरे नेहेमीच्या मंडळींना घेउन येतोच भेटीला. 🙂

विनाकारण – कदाचित विनाकारण म्हणणे  योग्य ठरणार नाही, पण मोठे मोठे शब्द, वृत्त, अलंकार मला येत नाहीत तरी पण आपल्या बोली  भाषेत काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करत असतो इथे.  प्रत्येकच गोष्टीवर स्वतःचे मत हे असतेच- मग ते लिहायला ब्लॉग हे एक उत्तम माध्यम मिळालेले आहे, आणि त्याचा पुरेपुर फायदा उचलतो मी. इथे आपल्याला ज्या विषयावर हव्या त्या विषयावर हवे ते लिहिता यायला लागले, लोकांचाही  प्रतिसाद बघुन  लिखाणाचा   उत्साह  दुपटीने वाढला  .

पहिले एक लाख व्हिजिटर्स हे एक वर्षात झाले, तर हे दुसरे एक लाख चार महिन्यात!! म्हणजे जवळपास चौपट वाचक वाढले. वाचक वाढले आणि ते पण डायरेक्ट वेब पेज वर देणाऱ्यांची संख्या वाढली. वाचक वर्ग वाढला ,पण कॉमेंट्स मात्र कम्पॅरिटीव्हली  कमी झाल्या  – अर्थात  ही कम्प्लेंट नाही- फक्त एक ऑबझर्वेशन आहे !

इतक्या वाचक संख्ये पर्यंत पोहोचण्यासाठी कारणीभूत   -अर्थात या मधे माझ्या ब्लॉग ची लिंक आपल्या ब्लॉग वर देणारे सुऱ्हद तर आहेतच, पण सोबतच मराठी ब्लॉग विश्व यांचा सिंहाचा वाटा आहे. त्या बद्दल मब्लॉवी चे आणि तुम्हा सगळ्या   ब्लॉगर्स  आणि   वाचकांचे आभार.

६७ लोकांनी काय वाटेल ते इ मेल मधे सबस्क्राइब केलेले आहे.  गुगल रिडर मधे पण किती लोकांनी घेतलाय फिड हे मला पहाता येत नाही. आज पर्यंत इ मेल सबस्क्रिप्शन मधे केवळ एकदाच  एकाने संख्या कमी झाली होती- आणि मान्य करतो की तेंव्हा खरंच वाईट वाटलं होतं – की आपल्याला लिहिणं जमत नाही का आता म्हणून?  मानवी स्वभाव आहे हा. याला इंटरनेट इगो म्हणा हवं तर..

आजपर्यंतचे स्टॅट असे आहे..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in साहित्य.... Bookmark the permalink.

76 Responses to २ लक्ष आभार…

 1. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन !!!!!!

  मगाशी थेट केलंच आता पुन्हा ब्लॉगवर. ऑफिशियल 🙂

  >> पण कॉमेंट्स मात्र कम्पॅरिटीव्हली कमी झाल्या<<
  अहो लोकांना कमेंट्स टाकायला संधी तर द्यायला हवी ना तुम्ही. एका मागोमाग एक लेख येत असतात. परवा शब्दबंध नंतर मी २ दिवस नव्हतो. परत आल्यावर बघतो तर एकदम तीन नव्या पोस्ट्स.
  आता कळलं कमी कमेंट्स चं कारण.. 😛 (अर्थात मी त्या तिन्ही पोस्ट्सवर कमेंट्स टाकल्याच होत्या 🙂 )

 2. हेरंब
  धन्यवाद. दररोज नसतात पोस्ट, बहुतेक एक दिवसा आड असते नविन पोस्ट. पण आता मात्र थोडं कमी होणार काही दिवस. ऍव्हरेज महिन्याला १५ ते २० पोस्ट्स आहेत .

 3. ngadre says:

  congratulations..

  Majhe email subscription kayamchech ahe tumchya blog var.

 4. अभिनंदन महेंद्रकाका.
  तुम्ही आम्हा सगळ्यांचे आवडते ब्लॉग लेखक आहात. आम्हाला असेच छान छान वाचन करायला मिळू दे. वाचक संख्या अशीच वाढत रहाणार, हे नक्की.

  • सोनाली
   मनःपुर्वक आभार! पण आता थोडं सिरियस लिखाण करायचा विचार आहे. तेंव्हा उचला लॅपटॉप आणि बडवला की बोर्ड हे कमी करायचा विचार आहे .

 5. गौरी says:

  अभिनंदन! तुमच्या लेखनातलं सातत्य, विषयांची विविधता आणि प्रतिक्रियांना आवर्जून मिळणारी उत्तरं यामुळे एकदा इथे आलेले वाचक पुन्हा पुन्हा येतच राहणार. तेंव्हा आता पुढचे एक लाख २ महिन्यात 🙂

  • गौरी
   पुढले लाख आता उशिरा होतील. कारण थोडं लिखाण पण कमीच होणार आहे, कामाचा व्याप वाढलाय थोडा. 🙂

 6. अभिनंदन श्रीमंत ! लवकरच तीन लाखाचा आकडा पार होवो ही सदिच्छा !

 7. rajeev says:

  एकंदरीत लोकांनी ” लाखोल्या ” वाहील्या
  अश्याच अनेक वाहील्या जाव्यात………..

 8. सागर says:

  अभिनंदन काका
  आता 3 लाखाचा टप्पा 2 महिन्यात?
  “इथे सभ्य भाषेत आलेल्या माझ्या लेखाच्या विरुद्ध असलेल्या कॉमेंट्स पण प्रसिद्ध करतो , पण फक्त शिव्या गाळ केलेल्या कॉमेंट्स इथे प्रसिद्ध करीत नाही.”
  सध्याचा हा सर्वात गरम गरम विषय आहे हा…..

  • सागर
   मग लिही त्यावर एक पोस्ट. असे विचार मनात आले की सरळ लिहून मोकळं व्हायचं.. 🙂

 9. अभिनंदन !!! अभिनंदन !!! अभिनंदन !!! अभिनंदन !!!
  आता लक्षाधीश आहात लवकरच कोट्याधीश, अब्जाधीश व्हाल ह्याच शुभेच्छा. असेच लिहत रहा…
  🙂

 10. tejas says:

  अभिनंदन !!! तुमचे लेख वाचनीय आणि विचार करणारे असतात.
  An error in blog, when click on अजय अतुल then related blog page not open. ( हे मला मराठीत नीट लिहिता आले नसते, म्हणून English चा आधार)

 11. अभिनंदन !!! अभिनंदन !!! अभिनंदन !!! अभिनंदन !!!

  राजकारणावर कमी झाले आहे नक्की… परत सगळ्यांना कमोड वर बसवा आणि लिहायला सुरुवात करा 😉

 12. रोहन says:

  २ लाख… मस्त रे… 🙂 अभिनंदन… 🙂

 13. महेंद्रजी
  नमस्कार
  आपल्या ब्लॉगचे आणि आपलेही मनापासून अभिनंदन.
  शेखर

 14. dinesh says:

  Abhinandan! Tumchya blog lekhana baddal shankach naahi! faqt ekda pratikriya dili hoti ti herambchya blog varati. (Marathi bloging aani itar) ti khatakali. Vishesh mhanaje tya sarv pratikriya ekangi hotya v kaahi personal level var jaun tika karnarya hoty. Tya madhye tumachi balanced pratikriya apekshit hoti (mhanaje personal comments la virodh karnari).
  Sadar blog kalach vachla v tumhala tya baddal lihayache hotech. Hya nimityane lihit aahe. (chukichya veles; sorry!).

  Tumache punascha ekvar abhinandan .. Ithun pudhehi ashech vachak vadhtil hyabaddal shanka naahi.
  Dinesh

  • दिनेशजी
   अहो असं होतं कधी कधी. त्यातल्या काही कॉमेंट्स मला पण पर्सनल वाटल्या होत्या, म्हणुन ………… जाउ द्या… मला पण असे पर्सनल कॉमेंट्स वगैरे आवडत नाही. म्हणून तर मी शेवटी सरळ माघार घेतली. केवळ याच कारणासाठी मी कुठल्याही सोशल साईटवर जात नसतो.
   शुभेच्छां करीता मनःपुर्वक आभार.. 🙂 येत रहा.

 15. दिपक says:

  त्रिवार हाबीणंदन महेंद्रभाऊ !!! 🙂

  • दिपक
   धन्यवाद मित्रा.. अरे तुझ्यामुळेच तर ब्लॉग सुरु केला हे विसरलास की काय? सुरुवातीला तूच तर मदत केली होतीस ब्लॉग सुरु करतांना- पाडगांवकरांचा 🙂

 16. Pushpraj says:

  तुम्हाला मानाचा मुजरा..काका…
  तुमची तोफ अशीच धडाडत राहो हीच सदिच्छा…..
  पुन्हा एकदा अभिनंदन…!

 17. अभिनंदन, तुमचा ब्लॉग नियमीत वाचतो.

  • निखिल
   धन्यवाद मित्रा. तुमच्या सारख्या सऱ्हदांमुळेच लिहिण्याचा उत्साह टीकुन आहे अजून.

 18. jyoti says:

  अभिनंदन महेंद्रकाका……

  2 लाख -3 लाख -4 लाख -5 लाख -6 लाख -………. वाचक संख्या अशीच वाढत राहो……. तुम्ही असेच लिहत रहा …….

  • ज्योती
   शुभेच्छांची तर अतिशय आवश्यकता होतीच. त्याबद्दल सर्वप्रथम आभार. आणि तू ब्लॉगिंग कधी सुरु करणार आहेस? इतकं दांडगं वाचन आहे, लिहित जा काहीतरी.. पुस्तक परिक्षणाचा ब्लॉग सुरु कर लवकर.

 19. bhaanasa says:

  अभिनंदन! 🙂 दोन लक्ष….. मस्तच. आणि दुसरे तर फक्त चार महिन्यात. विविधता व काय वाटेल ते आणि मनापासून लिखाण हे तुझी बलस्थाने. लगे रहो महाराजा….. अनेक शुभेच्छा!

  • भाग्यश्री
   मला पण खरं तर आश्चर्यच वाटलं कारण लिखाण मागच्या वर्षीपेक्षा कमीच आहे. धन्यवाद.. काल मी दिवसभर साईटवर होतो. म्हणून फोन बंद होता. रात्री एक तासाची फ्लाईट साडे तिन तासांनी पोहोचली इथे 🙂 ट्राफिक कंजशन. 😦

 20. महेंद्र

  अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. नुसत्या वाचकांनीच नाही पण वृत्तपत्रे, सेलिब्रिटी ह्यांनी सुद्धा तुमच्या ब्लॉगची दखल घेतली आहे. तुमचा ब्लॉग असाच वृद्धिंगत होवो हीच ईच्छा!

  निरंजन

  • निरंजन
   अहो, इथे ब्लॉग वर लिहायला लागल्यापासून खूप नविन लोकांशी ओळखी झाल्या. काहीही स्वार्थ नसलेले मित्र मिळाले. बरं वाटतं आता इथे 🙂 सगळ्यात मोठी ही अचिव्हमेंट!! 🙂 शुभेच्छांसाठी मनःपुर्वक आभार.

 21. अभिनंदन …अभिनंदन …अभिनंदन …..!
  असच काय वाटेल ते लिहत रहा..आम्ही आहोतच वाचायला…ब्लॉगच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा….

  • देवेंद्र
   धन्यवाद. सुरुवातीच्या काळात जेंव्हा कोणी वाचत नव्हतं तेंव्हा तुझ्या कॉमेंट्सनीच हुरुप टिकुन राहिला. 🙂 धन्यवाद..

 22. Prasad says:

  अभिनंन्दन महेन्द्र काका,
  तुमच्या आणी तुमच्यासारख्याच सगळ्यांच्या ब्लाग वाचुनच मला हुरूप येतोय.

 23. Pingback: २ लक्ष आभार… | indiarrs.net Featured blogs from INDIA.

 24. salilchaudhary says:

  MK
  अभिनंदन अभिनंदन अभिनंदन !!!!!
  Henceforth instead of MK I will call u “MBK”
  Marathi Bloggingcha King !
  🙂

 25. Bharati says:

  अभिनंदन !!!
  महेंद्र्जी , तुम्ही सगळ्या विषयावर लिहिता. इंजिनीयर असून तुम्ही अनीकेतजीनी कमालच केली आहे…प्रतिक्रिया तुमचा उत्साह वाढवतात हे खरे असले तरी आपला देश कसा, माणसे कशी हे ठाऊक आहेच.कार्यक्रम ज़ाला की टाळ्या वाजवा सांगावे लागते.तुमचा ब्लॉग वाचणारे खूप आहेत.रोज वाचायला मिळाले नाही तरी मनात संधी वाट पहात असते.
  मी वेळ मिळाला की ऐका बैठकीत सगळे वाचून काढते.रोज भेट देते.प्रतिक्रिया तेव्हा असतेच..
  बाकी तुम्ही लिखाण कमी करणार ऐकून वाईट वाटले.रोज नवीन काय ही उत्सुकता असते तेव्हा आहे असेच लिखाण चालू ठेवा.
  अधेमधे असा काळ असणारच..त्याचे विशेष काय? आता बघा नियमीत 90%च्या वर मार्क मिळवणारा 1,2 वर्षे 85,88%वर आला म्हणून निराश होत नाही.पुन्हा 3र्‍या वर्षी त्याला/तिला 95%मार्क पडतात.मुळे जसे मार्क मिळवायचे मशीन नाही .तसेच एथे आहे.तुम्ही लिहिता त्याला कधीतरी प्रतिक्रिया नाही आली तरी माज़या फ्रीएंडसनी मला मेलवर तुमच्या कवटुकाचे मेल पाठवले आहेत…..त्यातलीच 1 का इंजिनियर्चीच ही पहा…………

  हा महेंद्र कुलकर्णी अजब रसायन आहे . अगदी जनगणना- दुसरी बाजू पासून सेक्स आणि संस्कृती कुठला हि विषय बाकी नाही. सुंदर लिहितो ..आगदी जुन्या पासून नवीन पर्यंत बहुतेक ब्लोग वाचून झाले.. ( engineer आहे म्हणे )
  Thanks for links.. Its quite a refreshing reading ..

  • भारती
   कुठल्या शब्दात आभार मानावे हेच समजत नाही. बरेचदा भावनेच्या पुढे शब्द थिटे पडतात. कमी म्हणजे महिन्याला १२-१५ पोस्ट्स तर नक्कीच असतिल!

   अभिप्राया करता मनःपुर्वक आभार!! 🙂

  • भारती
   कुठल्या शब्दात आभार मानावे हेच समजत नाही. बरेचदा भावनेच्या पुढे शब्द थिटे पडतात. कमी म्हणजे महिन्याला १२-१५ पोस्ट्स तर नक्कीच असतील!

   अभिप्राया करता मनःपुर्वक आभार!! 🙂

 26. Rahul Patki says:

  नमस्कार महेंद्रजी,
  अभिनंदन !
  बरेच दिवसा पासुन आपला ब्लॉग वाचतो आहे.
  आपण नावाप्रमाणे (काय वाटॆल ते ) सगळ्या विषयावर लिहिता. हे आवडले ,
  आणी प्रत्येक कमेटस ला आपले उत्तर असतेच…

  अनेक शुभेच्छा ! असेच लिहीत रहा …….

  राहुल पत्की

  • राहूल
   वाचक हाच सगळ्यात महत्वाचा असतो लेखकाच्या दृष्टीने. जर वाचक नसेल , आणि लेख लोकांना आवडला की नाही हे जर समजणार नसेल तर कसा काय इंटरेस्ट राहिल लिहिण्यातला? शुबेच्छांसाठी आभार.

 27. Girish says:

  Heartiest congratulations MBK!! Retirement nanter income sathi changla option ahay tumhala, be a writer.. hehehe

  • गिरिष
   अरे नक्कीच. पण हे असं लेखन कोण घेणार आहे पैसे देऊन? जस्ट टीपी आहे हा. एक मनातली सगळी मळमळ बाहेर टाकायचा.

 28. काका, प्रथम तर तुम्हाला २+ लक्ष शुभेच्छा!
  लवकरच २* होतील, यात शंका असू नये… 😛

  बाय द वे, ती “ajay” ची तुमच्या “अजय-अतुल शो” वरची कॉमेन्ट खटकली… तुम्ही मुळीच मनाला लावून घेऊ नका, मला तर तीळमात्र सुद्धा शंका नाही की ती खरंच अजय ने दिलेली प्रतिक्रिया असेल म्हणून… आपण सगळे मराठी रसिक त्यांचे चाहते आहोत, व मला वाटते, त्यांनाही आपला आदर असावा… कोणत्या-तरी जळक्या तोंडाच्या व्यक्तीने ती कॉमेन्ट नोंदविली असणार! असो… तुम्ही तेथे एक गोष्ट बरोबर म्हटलीय, काळा पैसा पांढरा करण्यासाठीच असे शोज होत असावेत (असतात)….

  पुढील लेखांसाठी हार्दिक शुभेच्छा!

  (ता.क. : तुमच्या लेखांतील भाव, संदेश इत्यादी अजुनही जसाच्या तसा दिसतो, तुमचे काही लेख लोकांना त्यांच्या आवडत्या विषयावरील वाटले की आपणहून प्रतिक्रिया देतात, तर काही वेळा जास्त माहिती नसल्यामुळे वाचून प्रतिक्रिया देण्याचा कंटाळा येतो… तरीही तुमचे वाचक दिवसेंदिवस वाढताहेत, याचा अर्थ सर्वांना सहज कळण्यासारखा आहे! लेखन अविरत चालू ठेवा, एवढीच सदिच्छा!)

  • विशाल
   कॉमेंट्स जरी माझ्या मताच्या विरुध्द असल्या तरीही मला काही वाटत नाही. फक्त भाषा जर शिवराळ असेल तर मात्र संताप येतो. बरेचदा लोकं तर मी काय लिहावं आणि काय नाही हे पण सांगत असतात, त्याचा राग येतो.
   आणि ती कॉमेंट अजयची.. हो, त्याचीच आहे , मी खात्री करुन घेतली आहे. असो.

 29. jeevantarang says:

  अभिनंदन. तुमच्या पोस्ट्स वाचून नवनवीन व वेगवेगळी माहीती मिळत असते. ह्या ब्लॉग statistics मध्ये एक statistic असंही असायला हवं >>”या ब्लॉग पासून प्रेरणा घेऊन नवीन ब्लॉग चालू केलेल्यांची संख्या”!!! थोड्क्यात तुमचा ब्लॉग वाचून लिखाण करण्यासाठीही स्फूर्ती मिळते.

  • जेवढं काही जमेल तेवढं लिहित असतो.. प्रेरणा वगैरे मिळत असेल तर बरंच आहे, मराठी ब्लॉगर्सची संख्या वाढेल 🙂
   धन्यवाद.. प्रतिक्रियेकरता आभार.

 30. ऋषिकेश says:

  मनपूर्वक अभिनंदन आणि आगामी पोस्टसाठी हार्दिक शुभेच्छा!!
  २ लाख चे २ करोड लवकरच होवोत आणि हा ब्लॉग व ह्यावरच्या पोस्ट वरचे वर वाढत राहोत हीच शुभकामना.

 31. Meenal says:

  अभिनंदन महेंद्रकाका..

 32. meharsha says:

  CONGRATULATION,
  apale wachak aasech wadhat rahot karan apale lekh wiwidhata purna tasech manala bhavanare aasatat tymule lavkrach 2 lakhche 4lakh honar he nakki
  punha ekada sshubhecha. 🙂

  • हर्षा
   इतक्या लोकांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत की आता तर जबाबदारी पण वाटायला लागली आहे. प्रतिक्रियेकरता आणि शुभेच्छांसाठी आभार.

 33. Aparna says:

  महेंद्रकाका, लक्ष लक्ष शुभेच्छा आणि अभिनंदन…..ही पोस्ट पण एकदम काय वाटलं ते श्टाईल झालीय……
  कमेन्ट्सबाबत तर तुम्हाला कधी कमी नाही पडलं असं मला तरी वाटतं आणि वाचकांची तर कधीच कमी नाही पडायची…

  • अपर्णा
   धन्स.. तुमच्या शुभेच्छा आहेतच.. आज सहज आठवलं मानबींदू वर गेलेलो नाही बरेच दिवसात. 🙂

   • Aparna says:

    mi Maanbindu warun baher pan padale kadhich…..tyamule jaast nahi aajkal…Yogesh bloggers meet la hota Mumbaiichya asa watata…kadachit tumhi bhetalahi asal….

 34. Ravindra Jadhav says:

  हार्दिक अभिनंदन,
  मी आपले काय वाट्टेल ते नियमित वाचत असतो ,खूप आवडते , असेच लिहित रहा .

 35. Smit Gade says:

  Abhinandan…Apalya anubhavancha amhala asach fayada hou dya….
  🙂

 36. laxmi says:

  khoop ushira comment detey …pan kharach agadi manapasun abhinandan aani khoop khoop shubhechya…tumhi asech lihit raha .

  • लक्ष्मी
   बरेच दिवसानंतर दिसलीस.. असो, इतक्या शुभेच्छा आहेत तुमच्या सगळ्यांच्या म्हणूनच तर अजूनही टीकुन आहे ब्लॉग वर.. आभार.

 37. laxmi says:

  ajay-atul post varachi ajay yanchi comment khatakali..tyani tumachi post neet vachleli
  nasavi bahutek!!

  • लक्ष्मी
   कदाचित वर वर वाचलं असेल , पण नंतर त्याला मेल पण पाठवला, अर्थात उत्तर नाही! असो.. शेवटी त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचला हे महत्वाचे. 🙂

 38. Vidyadhar says:

  जबर्‍या काका…
  लवकरच वीस लक्ष आभार माना!…;)

 39. त्रिवार अभिनंदन काका.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s