इंटरनेट चे गुलाम

इंटरनेटचे गुलामलहान वयात मुलांना इंटरनेट हाताळू देणं हे हल्ली एक फॅड झालंय. आजच्या बदलत्या युगात मुलांना इंटरनेट आलंच पाहिजे ( त्यात काय यायचं आहे? )  पण हा पालकांचा एक अट्टाहास असतो. मग मुलांना सातवी आठवी मधेच नेट वापरण्यासाठी परवानगी दिली जाते. बरेचदा   जर मुलगा इंटरेस्टेड नसेल तरीही नेट  वापरण्यासाठी एनकरेज केले जाते.

१८ वर्ष वय असे पर्यंत मुलाचे गुगल मधे किंवा याहू मधे अकाउंट उघडता येत नाही. मग आई वडीलच स्वतः खोटं वय घालुन  मुलाचा इ मेल अकाउंट उघडुन देतात बरेचदा. या खोटे पणाची काही आवश्यकता आहे का?  मुलांना नेट वर जाउ द्यायचं, इ मेल अकाउंट उघडून द्यायचे – मग मुलाने सगळ्यांसमोर आपला इ मेल पत्ता दिला की कौतुकाने त्याची पाठ थोपटायची- आमचा ’बाळू’ किनाई खुपच फास्ट आहे, त्याला इंटरनेट सगळं कळतं.. असंही म्हणणारे पालक मला भेटले आहेत.

एकदा अकाउंट उघडला की मग  मेल मधे स्पॅम मधे कुठल्या गोष्टी येतात हे इथे जास्त इलॅबोरेट करून सांगत नाही- कारण सगळ्यांनाच ते माहिती आहे. आपण मॅच्युअर्ड लोकं ते डिलिट करतो, मुलं ते पहातात!!  अर्थात त्या साठी  मी मात्र मुलांना दोष कधीच देणार नाही, कारण त्यांचं ते वयच असतं अशा गोष्टींकडे अट्रॅक्ट होण्याचे .एकदा इ मेल अकाउंट उघडला की मुलं बाहेरच्या जगाला गरज नसतांना  एक्स्पोझ होतात. बरेच ईंटरनेट शार्क्स फिरत असतातच अशा मुलांना जाळ्यात पकडायला.

एवढ्या कोवळ्या वयात मुला मुलींना नेट वर एक्स्पोझ  करण्याचे काहीच कारण नाही. १३- १४ वय असतं मुलांचं. या वयात ’त्या’ गोष्टी पहाव्याशा वाटणं साहजीकच आहे, आणि चान्स मिळाला की ते पहाणारच. मग शाळेतला एखादा फ्रेंड त्या साईटची लिंक देतो आणि मुलगा एकदम  गरज नसतांना ’मोठा’ होतो. पालकांनी  एकदा नेट असेस दिला की संपलं सगळं. सुरुवातीला वडीलधारी माणसं समोर असतात, तेंव्हाच नेट लावायचं, हा दंडक असतो, पण लवकरच मग मुलं एकटॆ असतांना पण नेट लाउन टाइम पास (!) करीत बसतात.

१३- १४ वर्षांची मुलं ऑर्कुट ,फेस बुक वगैरे सोशल साईट्स वर रजिस्टर करतात . कितपत योग्य वाटतं हे? प्रत्येक लॅप टॉप ला कॅमेरा असतोच, थोडं स्पष्टच लिहितोय,   कॅमेरा सुरु करून स्ट्रिपिंग करणे  आणि सायबर सेक्स चे अट्रॅक्शन मुलांना ऍडीक्ट बनवते इंटरनेटचे . इंटरनेट जंकी! दुर्दैवाने ही गोष्ट घरच्या लोकांच्या लक्षात येत नाही- आणि जेंव्हा येते तेंव्हा वेळ गेलेली असते .ही काल्पनिक गोष्ट नाही, कृपया नोंद घ्या- माझ्या परिचितांच्या मुलाच्या बाबतीत झालंय हे, आणि म्हणूनच हे पोस्ट लिहायला घेतलंय .

बरेच पालक हे मुलांना इंटरनेटची सवय (?) व्हावी म्हणून ऑनलाइन खेळ खेळू देतात. त्याच सोबत कधी मुलगा खेळणं बंद करुन चॅटींग आणि सोशल साईट्सच्या आहारी जातो हे घरच्यांच्या लक्षात पण येत नाही.काही पालक मोठी इंटरेस्टींग कारणं सांगतात, मुलांना नेट वर जाऊ द्यायची, त्यातली काही खाली देतोय बघा :-

१)जसे होमवर्क दिलंय शाळेत ( ७ वीचं) त्यामधे खूप काही माहिती हवी आहे, त्या साठी नेट आवश्यक असतेच. हे इतके तकलादू कारण आहे की यावर काय बोलावे हे समजत नाही.  घरी एनसायक्लोपेडीयाची सिडी घेउन दिली, किंवा हार्ड कॉपी आणून दिली मुलांना तरीही काम होऊ शकतं, नेट वर जायची गरज नाही!

२)दुसरे कारण, की मुलाला आयटी द्यायचंय, तेंव्हा आतापासूनच कॉम्प्युटरची सवय असलेली बरी.

३)  अरे आम्हाला काही फारसं येत नाही कॉंप्युटरचं, पण आता पासून हातात दिलं, तर त्याची भीड चेपेल. अशी अनंत कारणे देता येतात. मी स्वतः मुलींना १२वी होई पर्यंत नेट वर जाऊ दिले नव्हते, आणि तिचे  काहीही अडले नाही.नेट न वापरल्यामुळे  इतर मुलांच्या तुलनेत ती कमी पडली नाही कधीच.   इथे फक्त तीनच कारणं देतोय पण अशी अनंत कारणॆ लोकं सांगतात.

मित्राशी गप्पा मारतांना तो म्हणाला की त्याच्या घरी  इंटरनेट एक्स्प्लोरर वर सेफ्टी ऑन केलेली आहे, त्यामुळे मुलाला इतर ( म्हणजे सेक्स रिलेटेड) काही पहाता येणार नाही. इंटरनेट एक्स्प्लोरर वर सेफ्टी लेव्हल सेट करता येते. मी त्याचं कॉंप्युटर चेक केलं, तर त्या मधे गुगल क्रोम पण दिसलं- त्याच्या १४ वर्षाच्या मुलाने डाउन लोड केलेले दिसले. आयई तर तो मुलगा वापरत नव्हता.क्रोमची हिस्टरी चेक केली तर नको ते सगळं सापडलं- अगदी पोर्न ट्युब डॉट कॉम साईट पण नेहेमी व्हिजीट करायचा तो. आता या मधे त्या १४ वर्षाच्या मुलाला दोष द्यायचा की त्याच्या आईवडिलांना?

या वयात लागलेली इंटरनेटची सवय ही नंतर सुटणे अवघड जाते. मी पाहिले आहे, बरेच लोकं तर ट्विटींग वगैरे मधे इतके गुंतलेले असतात की जर कॉम्प्युटर वर नसतील तर ते सेल फोन वरुन पण ट्विट करतात.  बरं ते असू द्या, इंटरनेट मुलांच्या रोगामधे कधी परावर्तीत  झालाय  हे पण पालकांच्या लक्षात येत नाही.

जसे मुलं रात्री टॉयलेटला जायला  चार वाजता उठले तरीही नेट वर जाउन आधी इ मेल्स चेक करतात पुन्हा झोपण्या पुर्वी .सकाळी उठल्याबरोबर आधी नेट वर जाउन मित्रांना स्टेटस अपडॆट करतात. सेल फोन वर मेसेंजर असतो आणि चोविस तास नेट वर ऑन लाइन असतात. नेट बंद झाले तर सायबर कॅफेत जाउन वेळ घालवतात. बरेचदा ही इंटरनेटवर खूप जास्त वेळ घालवायची सवय आईच्या लक्षात येते पण मुलांना काही म्हंटले तर  स्वतःच्या इंटरनेट  खऱ्या वापराबद्दल लपवाछपवी करतात मुलं . आणि ही अशी  टेंडन्सी दिसली की समजा मुलगा ऍडीक्ट झालाय नेटचा.

चायना मधे अठरा वर्षाखालील दहा टक्के मुलं इंटरनेट ऍडीक्ट झालेले आहेत. यावर उपाय म्हणजे इलेक्ट्रिक शॉक वगैरे दिले तरीही मुलांमधे काही सुधारणा नाही असेही वाचण्यात आलेले आहे.

इतकं घाबरायचं कारण नाही, पण जर टीनएजर मुलांचे तुम्ही पालक असाल, तर थोडं लक्ष अवश्य द्या मुलांच्या नेट च्या वापराकडे.  फेसबुक वरचे वर वर हार्मलेस दिसणारे खेळ जसे फार्म व्हिले, पोकर वगैरे खूप ऍडीक्टीव्ह आहेत- फार्म व्हिले वर तर मुलं तास अन तास आपलं शेत सजवत बसतात. तेंव्हा सांभाळा!!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कम्प्युटर रिलेटेड and tagged , , , , , , , . Bookmark the permalink.

89 Responses to इंटरनेट चे गुलाम

 1. एकदम सही पोस्ट लिहीली आहे काका… खरी तर ही मला टार्गेट करते… ट्विटरला मी कितीही नाही म्हटलं तरी ऍडिक्ट झालोय… पालकांनी फॉलो करण्यासारख्या सर्व गोष्टी अगदी सगळ्यांना समजतील अशा भाषेत दिलंय!

  (खरे तर मी “या” पोस्टवर कमेंटच का देतोय, हेच मला कळत नाही…!) 😛
  (ह्म्म, मी इंजिनिअरिंग लागल्यानंतर सेकंड सेमिस्टर पासून, म्हणजे वर्षभरापूर्वीपासून रेग्युलर नेट वापरतोय, त्याअगोदर क्वचितच माझा संबंध येत होता!)

  • विशाल
   काळजी घेणं आवश्यक आहे. अरे इंटरनेटच्या आहारी न जाणं कधीही चांगलं. काहीच मिळत नाही यामुळे. अभ्यास सोडून याच्या मागे आपण कसे लागतो ते समजत पण नाही. थोडा वेळ कंट्रोल करत जा. अरे ट्विटर वर अपडेट दिले नाही तर काहीही होत नाही. कोणी तुला मिस करणार नाही, की का अपडेट दिले नाहीस म्हणून. आता एक प्रयत्न म्हणुन अपडेट करणं कमी कर.. बघ जमेल !! काही कठीण नाही.

   • काका,
    ट्विटरवर अपडेट केल्याने/न केल्याने तसं काहीच फलित प्राप्त होणार नाही, याची मला आपणहून जाणीव आहे… पण आता अशी मानसिकताच बनलिय की ट्विटरवर आपल्या अतिशय आवड असलेल्या गोष्टी/क्षेत्राबद्दल मी इतर कुठल्याही ठिकाणापेक्षा त्वरित अपडेट राहू शकतो! उदा. नासा, इएसए, क्लेटन, सोहिची, जस्टीन बीबर, व इतर अनेक टेक्निकल साइट्सचे बॉट क्लाएन्ट्स/व्यक्तींना मी फॉलो करतो… इन्स्टंटलि अपडेट राहता येतं, ऑर्कुट नाही म्हणून आहे, डिलीट करण्यापेक्षा चालू राहावं म्हणून ठेवलंय, फेसबुकच्या साईटचा तर मला अजुन लेआउटच कळलेला नाहिये, फक्त माझं ट्विटर जोडून दिलंय तिकडं, आपोआप अपडेट करून घेतं फेसबूक!

    बाकी निरर्थक* गोष्टींबद्दल सांगायचेच झाले, तर मी डायल-अप वरून नेट जोडतो, कसले युट्यूब अन कसले काय? (ह्म्म, ज्याची तुम्ही भिती वर्तवली आहे, त्यापासून क्वचितच कोणी अनुभव घेतला नसेल, मीही यातून मुळीच विलग नाही.)

    मला तर नेटचा बराचसा फायदाच झाला आहे आतापर्यंत तरी (पुढेही होईलच!)
    माझी स्ट्रीम आयटीची… वेब डिझायनिंग, सीएसएस (तुमच्या ब्लॉगचे टेम्प्लेट याद्वारेच बनवलेले आहे), ओपन सोर्स सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी व रिलेटेड इश्युज, बग्ज शोधणे/दुरूस्त करणे (ह्म्म, ओपन सोर्स असलेल्या सर्वच प्रोग्रॅम्समधले नव-नविन बग्ज शोधता/ दुरूस्त करता येतात, कोणालाही… मला जमते, त्यामुळे मी ट्विटरशिवाय तिकडेच पडलेलो असतो, लाँचपॅड वर अन IRC वर)

    उलट अशा कामांमुळे मला माझी लायकी तर कळतेच, पण बाहेरील तज्ञ लोकं नेमकं काय शिकतात, कशावर जास्त भर देतात, त्यांचे सल्ले, व त्यांच्याशी संवाद साधल्याने वाढणारे संवाद-कौशल्य मला कधीतरी नक्कीच फायदेशीर ठरेल.

    गुगल रीडरला मी तुम्हा निवडक लोकांचे ब्लॉग्ज जोडलेले आहेत, त्यामुळे कधी-मधी वाचतो, आवश्यक वाटल्यास प्रतिक्रिया नोंदवतो… यामुळे माझे नॉलेज वाढले नाही तर नवलच!

    मला इतर गोष्टींपेक्षा नेटवरूनच जास्त मिळालीय… जास्त करूनच चांगलीच… नेट म्हणजे प्रत्येक गोष्टीबद्दलचे ज्ञान मिळवण्यासाठी असलेली अफाट आकाशगंगाच आहे… ह्म्म, काही बेचव* गोष्टींचा विचार सोडला, तर सगळं काही लहान वयापासून सगळ्यांनी घेण्यासारखंच आहे नेटवर… जे जग टिव्हीवर/पेपरवर/पुस्तकांमध्ये कळत नाही ते इथे कळते… विकिपेडिया, परदेशी नावाजलेल्या युनिवर्सिटीज च्या अधिकृत साईट्स, झालेच तर मनोगत, उपक्रम इत्यादी बरीच मोठी लांबलचक यादी आहे… फक्त येथे ब्राउज करणार्‍याच्या हातात असतं, की कुठला मार्ग निवडायचा ते…!

    तुमच्या एका मताशी मी पक्का सहमत… “वय” ही एक अतिशय विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
    ~ तुमच्यासारख्या अनुभवी अडल्ट लोकांना (/पालकांना) नेटवर कसलिही बंधने असो/नसो, माझ्यामते तरी, काहीच हरकत नसते, व परिणाम/दुष्परिणाम यांबद्दल आधीच कल्पना असते, त्यामुळे अशा वयोवृद्ध कॅटेगरीच्या लोकांचा कल जास्त वैचारिक माहिती शोधण्याकडेच किंवा स्वतःकडील अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्याकडे जास्त असतो. (उदा. तुम्ही)
    ~ आता जरा माझ्या वयाचे मुलं/मुली, साधारणतः १७-२१ वर्षे वयाच्या मुलांची ही कॅटेगरी ऍडोलेसन्ट असते… ह्या काळातच मुलांना नाही त्या गोष्टींना झेलावे/पचवावे लागते. जर अलिप्त राहण्याचा अशा मुलाने प्रयत्न केलाच तर त्याचे सह-मित्र/मैत्रिणी ते हाणून पाडण्यात क्रियाशील व नेहमी सक्रिय असतात, किंवा ३र्ड पर्सन म्हणून डिवचण्याची अनेकांची खोड असते… एकदा का असे झाले, की मग जरा तो मुलगा/मुलगी तारूण्यात आल्यासारखे स्वत:ला वाटून घेतात.. पुढली स्वप्ने रंगवतात… ही झाली या कालमर्यादेतली वाईट बाजू.. नाण्याच्या कधीही दोन बाजू असतात, तुम्ही कितीही नकार दिलात तरी ते एक कठोर सत्य आहे… ही वाईट बाजू अनुभवणारे माझ्यामते ९९ टक्क्यांच्या वर असावेत, बाकीचे आध्यात्म वगैरे पवित्र गोष्टींनी बांधले गेल्यामुळे याचा उपभोग(चुकीच्या जागी चुकीचा शब्द*) घेण्यास असमर्थ असतात. असो… चांगली बाजू पाहिली तर, याच वेळेस अशा मुलांमध्ये एक नविन शक्ती संचारत असते, जी त्यांच्या इच्छा-आकांक्षा, स्वप्ने इत्यादींना पुर्ण करण्यासाठी त्याचे/तिचे मनोबल उंचावण्यास मदत करते. याच काळात (आवडत्या किंवा सर्वच क्षेत्रांशी निगडित) ज्ञान मिळवण्याची धडपड, दुसर्‍यांचे अनुभव जाणण्याची तिव्र उत्सुकता इत्यादी प्रकार (नॅचरल आहे शेवटी) तुम्हीही नक्कीच अनुभवले असणार? “जे नाही करायला सांगितलं ते पहिले करून पाहण्याची लालसा” हे सुद्धा एक कटू सत्य प्रत्येकाच्या (माणुस सोडून इतर जनावरांमध्ये असे कमीच दिसून येते म्हणा!!!) बाबतीत घडते, संयमी लोकं फारच विरळ आहेत, बोटांवर मोजण्याइतके असतील कदाचित? नेट हा ह्या बाबतीत, या मार्गातील एक पॉईंट आहे, ज्याचा दुष्परिणाम अशा मुला/मुलींच्या हाताळण्यावर अवलंबून असतो… याबद्दल तुम्ही, इतरांनी, मी आधीच भाष्य केलेले आहे… पण नेट नसले तरी समाज आपणहून अशा गोष्टी आपोआप (नॅचरलिच म्हणता येईल!) एक्पोज करत असतो या वयातील मुलांच्या नजरेसमोर… कसे, मुलगा/मुलगी मध्ये काही शारिरिक फरक आहेत ना, उघड डोळ्यांनी ते जाणवतात ना… आता ज्याने “समाजरचना” यावर केवढा विचार केला असेल, किती कॉम्प्लेक्स विषय आहे हा… शेवटी दोन सेक्सच्या बॉडीज मध्ये ऍट्रॅक्शन नसेल, तर त्याबद्दल बोलणंच नको! सगळं काही नॅचरल आहे (येथे इंटरनेटचा विचार डोक्यात आणू नका, मी अवांतर विषयाशी निगडित विषयाकडे वळलो आहे…), एखाद्या मानसशास्त्रातील तज्ञलाच याबद्दल अधिक खोलवर विचारणे योग्य ठरेल, जर तुम्ही कधी विचारलेच, तर इथे त्याबद्दल नक्की पोस्टा…!!! नाण्याच्या या दोन्ही बाजू हे मुलं/मुली (इन्क्ल्युडिंग मी टू..) अनुभवतात, त्यांच्यावरील बालपणीचे संस्कार त्यांना यावेळी निश्चितच मदत करू शकतात, पण रोखू मात्र निश्चित्च शकत नाही, तुम्ही कितीही जरी प्रयत्न केला तरी…
    ~ टीनएजर्स, ८-१५ वयोवर्गातील मुलं… अतिशय गोड व नाजुक, कोमल… अगदी देवाघरची फुलंच वाटतात… याच काळात पालकांची खरी कसोटी असते, असे मला वाटते… जे काय तुम्ही करू शकता, ते याच काळात! आपली संस्कृती, आपली परंपरा, निती-मुल्ये, मातृभाषा, मातृभूमी, स्वभावनिर्मिती असे अनेक संस्कार करणे पालकांनी याच काळात करणे अत्यावश्यक आहे… अपशब्द, द्वेष, मत्सर, घरगुती भांडणे, त्यांच्यासमोर नको ते करणे, दम, धाक आदी अशा गोष्टींवर पालकांचा संयम असणे अत्यावश्यक आहे… आपल्या याच पाल्याच्या हातात आपल्या पुढील पिढीची धुरा आपण देणार आहोत, त्यादृष्टीने योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे… समाज, निरनिराळे विषय, कला, विज्ञान, संगीत, खेळ इत्यादींमध्ये त्याला रस आणुन द्यावा, जेणेकरून या आणि अशांपैकीच एखाद्या चांगल्या गोष्टीमध्ये त्याला आपोआप आवड निर्माण होते, आपसूकच तुम्हाला कधी हात उगारावा लागेल… कॉम्प्युटर, नेट वगैरे मला १२वीत जाईपर्यंत तोडओळखीपुरते माहित होते, थेट संबंध येऊन फक्त १ वर्ष लोटलंय (सध्या मला १९ वं वर्ष चाली आहे, मार्चमध्ये मी १८ चा पुर्ण झालो होतो)…. आता या वयातील मुलांच्या बाबतीत नेटबद्दल कसे हाताळायचे, यासाठी निश्चितच तुम्ही अनुभवी पालक लोक समर्थ असाल!

    काका, एक राहिलंच, माझा ब्लॉग, मराठी मंडळी, टेक मराठी इत्यादी ठिकाणांसाठी लिहिण्यातच माझा वेळ (लाँचपॅड व IRC सोडून) जातो… आता तुम्ही म्हणाल हे सुद्धा लिहिण्याचं काय कारण? बरोबर आहे, पण मला आतापर्यंत कधीच अभ्यासक्रमाशी संबंधित असलेले पुस्तके वाचण्यात रस आला नाही आणि निश्चितच येणारही नाही… उलट आम्हाला जे काही आता आहे, ते मी आधीच शिकून बसलोय, आता नुसतं कॉलेजला येणं-जाणं एवढंच… इतरांसारखं न समजणं सारख्या गोष्टी माझ्यासोबत काही वेळाच घडतात… शिवाय मला एकदा वाचलेले पुस्तक पुन्हा वाचण्याची सवय मुळीच नाही (परिक्षेच्या काळातच/PL मध्येच मी सगळी वाचून काढत असतो! 😛 ) त्यामुळे रिकामं बसण्यापेक्षा इकडे नेटवर काहीतरी काड्या-कुड्या करणं मला निश्चितच खूप आवडतं…

    (अरेरेऽऽ, कमेंट आहे का काय आहे हे? 😉 )

    • तू अगदी माझ्या म्हणण्याला दुजोरा दिलास बघ. एकदा १७-१८ झाले की मग काहीच हरकत नाही, फक्त उपयोगी कामासाठीच नेट चा वापर केला जातो या वयानंतर , कारण थोडी जाणीव आलेली असते .
     आयटी स्ट्रिम असल्याने अर्थातच नेटची उपयोगीता असतेच. पण हा लेख जो लिहिलाय तो एका मित्राच्या मुलाच्या अनूभवामुळे. तसंही झालेलं मी स्वतः पाहिलेलं आहेच. याच वयात थोडं काळजी घ्यावी लागते इतकंच मला म्हणायचं होतं. एकदा १७-१८ झाले की बराच चांगल्या वाईटात्ला फरक समजलेला असतो.

    • sumedha says:

     vishal,
     at the age of 19 tu kiti susambadhapane vichar kartos ani the muddesoodpane mandtoshi, mala he khoop aavadal. khar mahnsheel tar mothe lokhi internetcha tasantas ani gairvapar karnyat mage nastat. tu asach lihata raha.

 2. सचिन says:

  नमस्कार काका,
  मी तुमच्या पोस्ट्स सबस्क्राइब केल्या आहेत, त्यामुळे नवीन पोस्ट लगेचच वाचतो, आत्तापर्यंत comment टाकण्याचा योग आला नव्हता. ह्या post मधली माहिती अगदी योग्य आणि छान दिलीये. इंटरनेट चा दुरुपयोग टाळण्यासाठी अधिक चांगले उपाय हवेत.

 3. mau says:

  Atishay vichar karanyajoga lekh aahe…kharach khup sambhalave lagate…..he hi khare aahe ki schools madhun je projects dile jatat tyachi sagli mahiti encyclopedia chya cd tun milate …..kadhi kadhi khup bhiti sudhha watate..aapalyaa aproksh mule kaay karatat hyache..24 hrs apan tyanchya barobar rahu shakat nahi…ani tyana friends kade jau dene pan talu shakat nahi…net che jitake changle upyog ahet tevdhech wait hi…mothha prashn ahech ha…..jamel tase pratyekane apalya palya karata karave….

  • उमा
   मी माझ्या मुलींना अजूनही नेट पासून दूरच ठेवले आहे. मोठ्या मुलीला इंजिनिअरींगला ऍडमिशन मिळे पर्यंत इ मेल ऍड्रेसपण उघडून दिला नव्हता.. तिने पण कधी हट्ट धरला नाही ही गोष्ट पण खरी. दुसरी मुलगी दहावीत आहे, तिला पण नेट पासून अजूनही दूरच ठेवले आहे. म्हंटलं १२वी नंतर नेट.. टच वुड , आता नेट अलाउ केलं तरीही मोठी मुलगी नेट वर नसतेच कधी. फक्त मेल चेक करते दोन तिन दिवसातुन एकदा.
   ब्रिटानिका एन्साय्क्लोपिडीया २४०० रुपयांचा आणला होता. खूप सुंदर आहे तो. पुर्ण पैसे वसुल झाले चार वर्षात. 🙂
   प्रत्येकाने जमेल तेवढे आणि तसे कंट्रोल करावे बस्स.. पालकांनी डॊळे बंद करुन विश्वास ठेउ नये मुलांच्यावर इतकंच!

 4. Nachiket says:

  Mala vatate ki mule kahihi karun hee mahiti milavanaarach.

  Net lapavale tar cyber cafe, nahitar books..that is basic instinct. Jevadhe daboon takal tevadhe usalel.

  Mala vatate Mahendraji,mee ani bahutek tumhi suddha hey sarv knowledge lahan vayatach purepoor milavale hote. Tya veli tar internet navatech. Tumha amhala je vachoo naka ase sangitale te apan adhi milavoon vachale.aso.

  Poranni sarv pahoon tyapalikade jave ani pudhe vaatchaal karavi ashi ichchha hote..restriction ne kahi honaar nahi.

  • नचिकेत
   मी थोडा विचार करुन उत्तर लिहितो नंतर

   • Nachiket says:

    tumachya vicharanna majhe vichaar virodh karat nasoon te thode vegale ahet itakech.

    hey sarv pahane hitkarak nahi hey nakkich.

    pan apan restriction karoon prohibitor bananya peksha mitr banoon regulator banave ani mulanna guide karave

    shivaay thodya pramanaat hey sarv pahile jaail hee utsukata accept hee karaavee..

    aapalyakadoon sahee knowledge ani saath milali ki net varache bhampak prakar tyana vichalit karu shakanaar nahit.

    kaay baghaayache te baghoo de. de-sensitization karane mahatvhache ahe..taboo karane chukiche.

    • नचिकेत
     मी विचार हाच करीत होतो की पुर्ण बंद केल्याने काय नुकसान झाले? मला काही नुकसान झाल्यासारखे वाटत नाही. मुलगी बिई आयटी मधे आहे, पण इंटरनेटचा अनुभव नसल्याने काही फारसे परीणाम झालेले नाहीत. फर्स्ट क्लास मिळालाच.
     राहिली उत्सुकतेची गोष्ट, ती तर योग्य वेळी पुर्ण होईलच!! त्याच्या साठी आता पासुन इतक्या इझिली ते सगळं कशाला उपलब्ध करुन द्यायचं? मला वाटतं की जी गोष्ट ज्य वयात करायची त्याच वयात केलेली योग्य. इतक्य लवकर काही आवश्यकता नाही त्या गोष्टीची. मी जी गोष्ट लिहिली आहे मित्राच्या मुलाची ती सत्य घटना आहे, आणि म्हणूनच हा लेख लिहायला घेतला. पण अशा गोष्टी पाहिल्यावर त्या गोष्टींच्या बद्दल आकर्षण जास्त वाढलं तर?? त्यावर समजा मुलांचा ताबा राहू शकला नाही तर? शेवटी ते कोवळं वय असतं. बरं इतर नेट वर असणारे शार्क्स.. त्यांचं काय??

  • नचिकेत
   त्या वयात या गोष्टींचे आकर्षण हे सगळ्यांनाच असते, पण ते तसेच राहिले बरेच वर्ष. फक्त कधी तरी एखादं पुस्तक हाती पडायचं मित्राकडुन तेवढंच. माझ्या लहानपणी टीव्ही पण नव्हता 😦
   एखादं प्ले बॉय कोणीतरी मित्र आणायचा, तेवढंच! त्या पेक्षा जास्त माहिती काही मिळाली नव्हती. बंदी जी घातली आहे, ती पण सांगुन , की हे वय फक्त अभ्यासाचं, एकदा डॉक्टर झाली, इंजिनिअर झाली की हवे तेवढा वेळ घालव नेट वर. आणि एकदा समज आली , की मग सेफ असतं तसं.. फक्त योग्य वयात फ्री सोडावं मुलांना- एवढंच म्हणणं आहे माझं!!

   • pravin says:

    नचिकेतच्या मताशी थोडासा सहमत. मुलांना ज्या गोष्टीची माहिती लपून मिळवायची ते ती मिळवतीलच, पण आपणहून ते दरवाजे सताड उघडे करून देणे नक्कीच योग्य नाही. आपल्या वयात आपण जे केले ते आपल्या आणि आपल्या मित्रान्पर्यन्त मर्यादित होते, त्याचे जास्त वाईट परिणाम शक्य नव्हते, पण इंटरनेट च्या युगात त्याचे परिणाम फार भयंकर आहेत. कोणी पाहणार नाही म्हणून वेब कॅम वर केलेले स्ट्रिपटीज़ इंटरनेट वर पूर्ण जगाला पाहण्यासाठी उपलब्ध होऊ शकते. माझ्या मते मुलांचा कंप्यूटरशी संबध येऊ द्यावा (प्रोग्रँमिंग, डाउनलोड केलेले गेम्स, हार्डवेर एक्स्पोजर इ.) पण जोपर्यंत ते मेच्यूर होत नाहीत तोवर शक्यतो इंटरनेट पासून दूरच ठेवावे.

    बाकी तुमचे २००००० चा टप्पा गाठल्याबद्दल अभिनंदन 🙂

  • तुमची पोस्ट वाचली. नेटवरचे शार्क्स घातक आहेत, शंकाच नाही पण नचिकेतच्या मुद्द्याला मीही सहमत आहे. मुलांना इंटरनेटपासून दूर ठेवणं घराच्या हद्दीत शक्य असेल पण त्या भिंतींबाहेरही आता सर्वत्र नेट पसरलं आहे.

   नेटपासून मुलांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केल्यानं फॉर्बिडन फ्रूट इफेक्ट मुळे ती इंटरनेटकडे अधिकच आकर्शित होण्याची किंवा कुतूहल अवास्तव वाढण्याचीही शक्यता वाढते.
   सगळ्यात जवळचं म्हणदे माझं स्वतःचंच उदाहरण, थोडं वाईट आहे तरीही सांगतो. नववीत असल्यापासून मी इंटरनेटवर वावरतोय. कॉलेजची जवळजवळ सर्व वर्षं सायबर कॅफेत गेम्स खेळत काढली आहेत. धक्कादायक गोष्ट अशी की मी कॅफेत असतो याचा नव्वद टक्के वेळा घरच्यांना पत्ताही नसायचा. अन् ही फक्त माझीच गोष्ट नाही तर त्या कॅफेत खेळणाऱ्यांपैकी जवळजवळ सगळ्यां मुलांची तीच गत. (अर्थात, सगळे दहावी पास… त्या कॅफेत शाळकरी मुलांना परवानगी नव्हती) पण असे कॅफेज कमीच असतात. चांगल्या कॅफेत फिरकू न दिल्यावर मुलंही नाईलाजानं नको त्या कॅफेत जातात. त्या कॅफेजचा उद्देशही “तसलाच” असल्यानं तिथं काय चाललं असेल याचा नेम नाही.

   ईमेल, सोशल नेटवर्किंग मुलांवर “लादणं” केव्हाही अयोग्यच. (पण झपाट्यानं वाढणाऱ्या या आभासी सत्याच्या दुनियेची किमान जाणीव तरी नव्या पिढीला लवकर झालेली बरी असं माझं वैयक्तिक मत आहे) हल्ली घरच्या संगणकावर, इंटरनेटवर नियंत्रण ठेवणं सहजशक्य असतं. कोणकोणत्या साईट्स बघितल्या गेल्यात , कोणती अॅप्लिकेशन्स वापरून इंटरनेटशी संपर्क साधला गेलाय हे सहज कळू शकतं. थोडक्यात, नियंत्रित वातावरणात मुलांना नेट वापरू देणं शक्य आहे.

   पालकांना धोक्यांची जाणीव असणं मात्र अत्यावश्यक आहे.

   आजूनही बरंच काही सांगावसं वाटतंय पण शब्दात नीट मांडता येत नाहीये. जमलंच तर परत प्रतिसाद नक्कीच देईन.

   • हा एक वेगळा अ‍ॅंगल आहे.
    मुला-मुलींच्या मधे तेवढा फरक पडतोच.. 🙂 मुलं जात्याच थोडी जास्त चंचल असतात .

 5. सागर says:

  “प्रत्येक लॅप टॉप ला कॅमेरा असतोच, थोडं स्पष्टच लिहितोय, कॅमेरा सुरु करून स्ट्रिपिंग करणे आणि सायबर सेक्स चे अट्रॅक्शन मुलांना ऍडीक्ट बनवते इंटरनेटचे”
  माझ्या होस्टेल मध्ये माझ्या रूम शेजारी राहणार्‍या मुलीच्या बाबतीत ही गोष्ट घडली…आख्या कॉलेज ने पहिल…. समजदार लोंकाच्या बाबतीत असे घडते तर लहान मुलांच्या बाबतीत बोलायला नकोच…
  एक अतिशय सुंदर विडिओ आहे यावर पण आत्ता लिंक सापडत नाहीये…. मिळाल्यवर नक्की देईन
  उत्तम पोस्ट (नेहमीप्रमाणेच)

 6. आपल्याला न मिळालेली साधने(त्यामुळे आपल्या प्रगतीच्या संधी हुकल्या असे वाटणारे पालक)आपल्या मुलांना मीळवून देण्याच्या हट्टाग्रहापाई मुलांच नुकसान करतात.साधन आणि साध्य यातला फरकच कळत नाही.

 7. Pallavi says:

  नमस्कार,
  अतिशय उत्तम लेख आहे. मी देखील अशी अनेक मुलं पाहिली आहेत. फार गंभीर बाब आहे ही. मुळात पालक जागृत होणे गरजेचे आहे.

  • पल्लवी,
   नमस्कार आणि ब्लॉग वर स्वागत, आणि प्रतिक्रियेकरता आभार. मी पण एकदम घाबरलो होतो त्या गुगल क्रोमची हिस्ट्री बघुन. सगळीकडे तो मुलगा जायचा, फेसबुक, ऑर्कुट , वगैरे आणि सगळ्या पोर्न साईट्स.. पालकांचे लक्ष हवे हेच महत्वाचे.

   • pravin says:

    BTW, nowadays browsers (chrome, firefox) offer a facility of not recording the history at all that is further dangerous as the parents will never understand what sites their child is visiting.

 8. काका, केवळ इंटरनेटच नव्हे, तर टी. व्ही. चा पण लहान वयात नाद लागणे म्हणजे सुद्धा धोकादायक आहे. हल्ली अनेक चॅनेल्स वर कसल्या प्रकारची गाणी लागतात हे तुम्हाला माहितच आहे. आणि तसले अंग विक्षेप तरुण मुलांच्या मनात नाही त्या इच्छा आणि लालसा जागृत करतात आणि त्याचे परिणाम आपण पेपर मधे वाचतच आहोत. तरुण मुलांनी मुलींची अब्रु लुटणे, हे प्रकार हल्ली वाचायला मिळतात. ह्याला कारण म्हणजे नको त्या वयात आधुनिकतेच्या नावा खाली मुलांना नको तेवढी मोकळीक देणे.

  • विनय
   खरंय, योग्य वयात मोकळीक द्यावी, म्हणजे थोडं समजायला लागल्यावर, तो पर्यंत लक्ष हवंच!!

  • विनय, हे अगदी बरोबर. इंटरनेटच्या सोबतीने केबल टी.व्ही. मुळे नको ती दृश्य लहान मुलांना पहावी लागतात. एखाद दुसरं चॅनेल बंद करता येईल पण हल्ली सर्वच चॅनल्सवर हे प्रकार सुरू आहेत.

 9. किती सुक्ष्म निरीक्षण आहे महेंद्रजी तुमचं. या गोष्टीकडे आजकाल आपण सर्रास दुर्लक्ष करतो. मग नंतर पश्चाताप करायची सुद्धा संधी मिळत नाही. सुरेख लेख. आवडला.

  • विशाल, तुमच्या सगळ्या पोस्ट मेल मधे येतातच, आणि वाचतो पण. प्रतिक्रियेकरता आभार.. 🙂 तुम्ही स्वतः लिहिणे सुरु केलेत हे फार छान!!

 10. samir deshpande says:

  Dear Mahendraji,

  Lekh nakkich vichar karayala lavnara aahe,Pan Internet la Purn BAN karane ha upay
  thoda tokacha vatato.

  Net varati Khup sari Parental Controller Softwares uplabhda aahet. thee ekdam Katekor pramane internet traffick block karu shakatat. Net nanny he software javal pas 10 varsha pasun he kaam karte aahe. ya varati tumhi Surfing Time pan set karu shakata.
  Mulani thodya TIME PASS sathi net access kela tar vait kay aahe? ani kharach khup informative ani tarihi manoranjak ashya pan kiti tari sites aahet.
  Pan Palakanche Lakshya nakkich pahije Internet vapara varati.

  regards

  Samir

  • समीर
   मला असं वाट्तं की १३-१५ हे वय अभ्यासाचं आहे, करियरच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे. दहावी पासूनच जर अभ्यासाची सवय लागली तर १२वीत चांगले मार्क पडतात. टाइम पास करायला मुलांना टिव्ही आहे , थोडा वेळ टिव्ही जरी पाहिला, तरीही फ्रेश होतो मुड. नेट चाच आग्रह कशाला हवा? नेट जर चांगल्या कामासाठी वापरला, मुलांचे लक्ष डायव्हर्ट होणार नाही चॅट, पोर्न साईट्स मधे इन्वहाल होणार नाही याची खात्री असेल तर मग नेट वर टाइम पास करु द्यायला काहीच हरकत नाही असे वाटते.
   शेवटी मुलांची मानसिक सेफ्टी महत्वाची- त्यांनी ऍडीक्ट होऊ नये हे पण महत्वाचे नाहीतर अभ्यास सोडून सगळं करत बसतिल.. .

 11. Pingback: संस्कृती,प्रकृती आणि विकृती | कळविण्यास कारण कि……

 12. mau says:

  mahendraji,tumache mhanane agdi khare aahe…pan kaay ahe mahitey kaa ajjkal shala collages madhun compulsory laptops kelet..tyatun pratyek rooms madhun wifi facilities..kuthe puranar aapan…kiti laksh thevanar….amchya itehch asha majhya mahitit ek -don shala ahet jyanni 9th pasun compulsory laptops kelet..no books at all..ata sangaa kaay karal tumhi…..tumachya mulinche kharach kautuk watate….

  • खरं आहे तुमचं. जग बदलतंय!! हे खरं.
   जर शाळांमधेच जर कम्प्लसरी केलं तर मग काय करु शकतो आपण तरी? फक्त एकदमच मोकळं सोडून द्यायचं असं केलं नाही की झालं.

 13. काका ,

  उत्तम पोस्ट

  मी स्वत : नुकताच बारावी झालो.

  मी नेट ऍडिक्ट नसलो तरी नेट सेव्ही आहे..

  माझा बराचसा वेळ नेट आणि संगणकावर जातो,

  मात्र आजही माझे ऑर्कुट वर अकाऊंट नाही वा पी सी वर एकही गेम नाही..

  रंगकर्मी .कॉम चालवणे एवढे एकच काम मी करत असतो( आणि लिखाण)
  ही आत्मस्तुती नाही ,स्वतःवर आपण कंट्रोल ठेवु शकतो नाही ठेवला पाहिजे याचे उदाहरण आहे

  पण मीही थोडासा ऍडिक्ट नेस कडे झुकत आहे असे वाटत आहे ,सध्या स्वतः वर बंधने घातली आहेत,फायदा होईल असे वाटते.

  दुर्दैवाने माझे अनेक मित्र यात फसलेले आहेत ,काही जण तर क्लास चुकवुन नेट वर असतात ….

  पोर्न हा एक भाग आहेच ,पण मुलींशी चॅट करण हा दुसरा महत्त्वाचा पॉइंट त्याना आकर्षित करतो…

  या सगळ्यात मुलगा आणि पालक दोघानीही योग्य भुमिका आणि काळजी घेतली पाहिजे.

  हे सेफ्टी गार्डस वैगैरे सगळे झुट असते आणि ते कोणालाही तोडता येते..

  आपण हे लिहिलेत ते बरे झाले,

  आभार

  असे एकदा काउंटर स्ट्राईक बद्दलही लिहा

  • विनायक
   तुझ्या वयाची मुलं थोडी मॅच्युअर असतात. पण अगदीच ८ वी ते १०वी म्हणजे अजिबात मॅचुरिटी नसते. आणि नेमकी तिथेच भिती असते सगळी. काउंटर स्ट्राइक बद्दल काय लिहावं? प्रत्येकाचा इंडीव्हिज्युअल प्रश्न आहे हा. जसे समजेल तसे प्रत्येकाने आपापल्या आप्तांना सांभाळावे बस्स एवढंच.

 14. Pingback: Tweets that mention इंटरनेट चे गुलाम | काय वाटेल ते…….. -- Topsy.com

 15. महेंद्रजी,
  आपल्या मतांशी मी सहमत आहे.
  शेखर

 16. काका, एक न एक मत पटलं.
  चॅटींग आणि तत्सम गोष्टींमुळे बोलण्याची लय आणि शिष्टाचार हरवुन गेलेले बरेच जण आहेत.
  इंटरनेटचा चांगला वापर करणारे सुद्धा आहेत, पण खुप थोडे…

  पालकांची जवाबदारी चांगलीच वाढली आहे, इंटरनेटचा ऍक्सेस मुलांना देणं तर आवश्यकच आहे, पण त्यावर नियंत्रण ठेवणं अवघड आहे….

  • आनंद
   मी पण इंटरनेट वर असेस नसावा हे म्हणत नाही. फक्त पालकांनीच ठरवावे की आपल्या मुलांना कधी पासुन त्या विश्वात जाउ द्यायचे..

 17. bhaanasa says:

  महेंद्र, खूप काही लिहिता येईल पण माझी टिपणी तुझ्या पोस्टपेक्षा मोठी होईल…. 🙂 आपणा सगळ्यांचे हेच मत असणार परंतु ते सगळेच व्यवहारात आणणे शक्य नाही.

  शाळांमध्येच ज्या गोष्टी कंपलसरी /रेकमेंड केल्या जातात तिथे पर्याय नसतो. इंटरनेटचा वापर करायला द्यायला लागणार. निदान १५ च्या पुढे तर इलाजच नाहीये आणि त्या आधीही कदाचित द्यावे लागेल. तेव्हां पालकांनी अतिशय जागरूक राहायला हवे. सतत मुलांशी संवाद साधायला हवा. काय वाईट काय चांगले, या वयात हे का करू नये, अमूक एक गोष्ट आयुष्यात होणारच आहे तेव्हां त्याची आज घाई का नको, अभ्यास किती व कसा महत्वाचा आहे…. एक ना दोन…. अनेकविध अंगानी चर्चा सतत घडायला हवी. जितकी मुले ओपन होतील, मनातले सांगतील तितका जास्त उपयोग होईल आणि त्यांना पालकांची भीती हिटलरशाही न वाटता विश्वास-आधार वाटला पाहिजे. नाहितर जग खुलेच आहे नं… कोंबडे झाकून ठेवले म्हणून उगवायचे थोडेच न राहते. आणि मग परिणाम भयावहही होऊ शकतात.

  एखादी गोष्ट नको करू म्हटले की ती करायचा मोह होणे यातून कोणी तरी सुटलेय का? अगदी तू आणि मीही नाहिच तेव्हां मुलांकडून भलत्याच अपेक्षा ठेवल्या तर उद्या काही भलतेच अघटित समोर यायचे.

  आपण सगळे घरात सिनेमा पाहात बसलो असलो तर अगदी लहान मुलेही लव्हसिन्स/बेडसिन्स येण्याआधी डोळ्यावर हात ठेवतात….. कधी कधी तर यापुढे असा कुठला शॉट येणार आहे हे आपल्यालाही माहित नसते. मग त्यांना कसे बरे कळलेय? ती तर इतकी लहान आहेत की इंटरनेट स्वत:हून वापरतच नाहीत. कॉम्पुटरवर फक्त कार्टून्स किंवा त्यांच्या छोट्या गेम्सच्या सीडीज फक्त लावतात.

  खरे तर इंटरनेटचा नुसता एवढाच धोका नाहीये…. वाचन संपूर्ण बंद पडलेयं, खाली जाऊन खेळणे, मैदानी खेळ जवळपास संपलेत. सतत उठून अतिशय व्हायोलंट व हाणामारीचे गेम्स खेळत राहायचे. फार मोठ्या प्रमाणावर फसवाफसवी…. मुलगा असून मुलगी/मुलगी असून मुलगा असल्याचे भासवणे, वर तू लिहिलेस ते सारे काही आलेच पाठोपाठ….. पण तरिही इंटरनेट बंदी घालण्यापेक्षा उपलब्ध असलेली अनेक अतिशय उपयुक्त सॉफ्टवेअर्स मुलाला/मुलीला सांगून लोड करावीत. अगदी मेलमध्ये येणा~या आक्षेपार्ह चित्रांपासून ते साईट्सपर्यंत सारे काही कंट्रोल करता येते. टाईप केलेली एक न एक की शोधता येते. बाकी मटासारख्या पेपराच्या डाव्या व उजव्या कोप~यात रोजच्यारोज येणारे मटेरियल पाहता हसावे का रडावे हेच समजत नाही.

  • श्री
   तू खरंच एक पोस्ट लिही या विषयावर. विषय घे , कितव्या वर्षी मुलांना इंटरनेट वर जाउ द्यावे या विषयावर. मला वाटतं की कमीत कमी १७-१८ योग्य वय आहे. त्या आधी जर काही गरज नसेल तर कशाला उगिच त्या विश्वाला एक्स्पोझ करायचं मुलांना? अर्थात प्रत्येकाचा व्ह्यु वेगळा असेल या बाबत, पण एक मात्र आहे की मुलांवर लक्ष ठेवावेच लागेल त्या पासून काही सुटका नाही.
   मला वाटतं, की जर आपण त्यांना अशा लोकांपासून प्रोटेक्ट करु शकत असू तर करण्यात काय हरकत आहे?

 18. Manatun says:

  अतिशय योग्य लिहील आहे तुम्ही काका. आजकाल इंटरनेट, तव, videos हि सगळी आकर्षण इतक्या सहजासहजी उपलब्ध असतात कि वयात येणाऱ्या मुलांना आयती संधी मिळते. त्यांना पण दोष देऊ नाही शकत. पालकांनी जागरूक राहून लक्ष दिल नाही तर ह्या मुलांच्या भविष्याकडे कोण पाहील? सगळ्यात आधी सुरुवात होते ती gaming zone वरून, आज काल चौकाचौकात असे zone असतात, अन एका तासाला १० १५ रुपये लागतात फक्त, अश्या ठिकाणी उधारी पण चालू असते. पालकांनी फक्त घरीच नाही तर अश्या गोष्टींकडेहि लक्ष द्याव.

  – अमृता

  • अमृता
   जे माझ्या मित्राच्या मुलाच्या बाबतीत १४ व्या वर्षी घडलं, ते बघुन थोडी कॉशन नोट म्हणून हे पोस्ट लिहिलं. उद्देश , केवळ या प्रॉब्लेम च्या सिव्हिअरीटी कडे दुर्लक्ष न करणे..

 19. mazejag says:

  महेंद्रजी आपल्या ह्या पोस्त मुळे माझ्यातल्या आईला नक्कीच अंतर्मुख केले आहे. पण काही शाळा मात्र अश्या आहेत कि मुलांना अभ्यास ऑन लाईन देतात, फार दूर नाही आमच्या ठाण्यातली एक प्रसिद्ध वस्त्र कंपनीच्या मालकाच्या नावे असलेली शाळा तर शिशु वर्गाच्या वर्कशिट्स पालकांना डाउनलोड करावयास सांगते ज्यांना नाही जमत त्यांनी विकत घ्यावात वाट्टेल त्या किमतीला. आता बोला. एवढ करून जरा मोठ्या मुलांना प्रोजेक्ट्स, क्लासवर्क इ. देखील नेटचाच वापर करून कराव्या लागतात.

  • जागरुकता!!! पालकांची जागरुकता, आपला पाल्य काय करतोय नेट वर , त्याच्या फुटप्रिंट्स कडे लक्ष ठेवणे महत्वाचे.
   ते प्रोजेक्ट्स वगैरे नुसता खेळ असतो !!

 20. Aparna says:

  महेंद्रकाका, इथे अमेरिकेत शाळांपासुन मुलांना इंटरनेट वापरताना पाहातेय..त्यांचा अभ्यासक्रम इ. माहिती मला नाही आहे पण सारखं नेटवर जात असतात आणि मग टीनएज मध्ये जे व्हायचं ते होतंच..अर्थात त्यांच्या संस्कृतीत बसण्यासारख्या गोष्टी आपल्याला झेपणारही नाहीत…असो…विषय काय आणि मी कुठे भरकटलेय..
  पण मुलांवर फ़क्त नेट नाही तर कंप्युटर गेम्स, एक्स-बॉक्स आणि सध्या इथे फ़ॉर्मात असलेले वी(Wii) सारखे गेम्स यासगळ्यावर नियंत्रण ठेवायची गरज निर्माण झाली आहे..त्याला येतं कळतं यात पालक कसे काय फ़ुशारकी दाखवु शकतात हेच माझ्या डोक्याच्या पलीकडचं आहे…मग पालकच मुलांना चढवतात…..
  यामुळे मुल-पालक संवाद कमी होतोय हे कुणीच लक्षात घेत नाहीत…बघावं तेव्हा पोरं आपली गॅजेट्स मध्ये…थोडं बाहेर खेळणं इ.पण हवं ना??

  • मला पण तेच म्हणायचं होतं. इंटरनेट म्हणजेच सगळं जग नाही. नेट वर नाही म्हणजे मागासलेला अशी प्रतिमा तयार केली जाते.
   मैदानी खेळ तर बंदच झाले आहेत. संध्याकाळी मुलं फक्त पीएस २ च्या सिडीज एक्स्चेंज करतांना दिसतात. खेळणे म्हणजे पीएस २.
   पालक मुलांमधला संवाद कमी होतोय , दुर्दैवाने ते खरे आहे..

 21. खरोखर अतिशय सुंदर आणि विचार करायला लावणारा लेख. नेट हा प्रकार किती addictive आहे हे दिसतंच. नेटची आवड असणं वेगळं आणि त्याचं व्यसन लागणं वेगळं. मला वाटतं वयात आलेल्या मुलामुलींच्या पालकांची परीक्षा घेणारा काळ. !!

  • हेरंब
   या गोष्टीकडे इतक्या कॅज्युअली पाहू नये इतकंच. परिक्षेचा काळ आहे हे नक्कीच, परीक्षा पण पास होणे गरजेच!!

 22. महेंद्र,

  मुलांचे नेट वापरणे हि समस्या खरीच आहे, आणि बिकटही आहे. मात्र माझे विचार तुमच्यापेक्षा थोडे भिन्न आहेत. मनुष्यस्वभाव असा आहे की ज्या गोष्टींची बंदी घातली जाते त्या गोष्टींचे आकर्षण जास्त वाटू लागते. आपण लाख नेट बंद करू. पण मित्र, नेट काफे इत्यादी मार्ग आहेतच की. कुठे कुठे निर्बंध घालणार? माझे असे मत आहे की कुठल्याही गोष्टींचे निर्बंध घालण्यापेक्षा ज्या गोष्टी वाईट त्यांची खुल्या दिलाने मुलांशी चर्चा करून त्यांच्या वाईट परिणामांची जाणीव करून देणे जास्त परिणामकारक आहे. आमच्या मुलांना आम्ही मुक्तपणे नेट वापरू देतो, पण आमच्या अपरोक्ष नाही. माझी मुलं आपणहून म्हणतात की आम्हाला ओर्कुट फेसबुक पहायचे पण नाही. कारण आम्ही त्यांना ओर्कुटचे दुष्परिणाम (लहान मुलांवर होणारे) सांगितले होते. अगदी मागच्या आठवड्यातली गोष्ट, मावशीकडे गेले फोटे तिकडे मावशीने त्यांना फार्मविले दाखवले. आणि त्यांना खेळता यावे म्हणून त्यांचा फेसबुक आयडी उघडला. पण लगेच मुलांनी मला सांगितले की असे असे झाले आहे आणि आम्हाला तो आयडी नको. तुमच्या आयडी वर फक्त फार्म विले खेळतो. मुलाला एकदा ह्युटूब बद्दल कळले. तेव्हा त्याने आपणहून विचारले की हे सेफ आहे का.

  माझे एक पूर्वीचे बॉस आहेत त्यांचा मंत्र आहे की “Trust but verify” हा मंत्र ऑफिस बरोबर घरी पण लागू पडतो असा आमचा तरी अनुभव आहे. तेव्हा सरसकट बंदी ह्यावर मी तरी सहमत नाही. 🙂

  • निरंजन
   अर्थात व्यक्ती परत्वे आपल्या मुलांचे संरक्षण करण्याच्या प्रत्येकाच्या पध्दती वेगळ्या असतात.

   कदाचित मी अतीशय एक्स्ट्रीम स्टेप घेतली असेल हे पण शक्य आहे. पण त्या मूळे काही बिघडले नाही ,हे पण तितकेच खरे.

   मुलांचं मन खूप स्वच्छ असतं, त्याला आपण तसंच निर्मळ ठेवण्यास थोडी मदत केली तर त्यांचं स्वप्निल आयुष्य थोड्ं जास्त जगतील ते असे वाटते..

   मुलींना नेहेमी सांगतो, आपल्याला कुठलेच आरक्षण नाही, तेंव्हा मार्क्स मिळवाल तरच पुढे काही स्कोप आहे, चांगल्या कॉलेज मधे ऍडमिशन वगैरे मिळेल, नाहीतर कुठली तरी फालतूकोर्सला ऍडमिशन घ्यावी लागेल.

   आणि १३-१५ हे वय अभ्यासाचे असते असे माझे मत आहे. जर मुलांना अगदी फारच अट्रॅक्शन असेल नेट चे तर ठिक आहे, पण त्यांना पालकांनीच तो मार्ग दाखवणे काही योग्य वाटत नाही. मुलांना पण शाळेत थोड्ंफार समजतही असेल , पण …

   मी पण नेट वर बंदी घालावी असे म्हंटले नाही, फक्त कुठल्या वयात त्यांना नेट ऍसेस द्यायचा यावर माझे मत आहे १७-१८ च्या पुढे, थोडी मॅच्युरिटी , चांगल्या- वाईटाची जाण आल्यावर !!

 23. Smit Gade says:

  काका, आपला उपाय जरा कठिन वाटतो. माझ्या मते मुळ प्रश्न हा आई वडील मुलाला अश्या गोष्टी कश्या वापरायला शिकवतात ते आहे.मुलाना जर पालाकानी नीट संस्कार , पुरेसा वेळ आणि योग्य माहिती दिली तर अश्या सर्व गोष्टींचा मुले योग्य पद्धतीने सामना करू शकतील, आणि हा उपाय कायमस्वरूपी असेल .
  (आणि हो, gmail मधे अकाउंट उघडन्यासाठी आता १८ वर्षांची अट नाही )

  • स्मित
   १८ वर्ष वय लागत नाही? मला वाटतं ही नविन डेव्हलपमेंट आहे.
   असो. प्रतिक्रियेकरता आभार.

 24. महेश says:

  आपले निरीक्षण चांगले आहे, आपली मताशी सहमत आहे, ,,,,,,,,

 25. Himanshu says:

  u r absolutely right…..aani je bhavishyat upayogi padel laukar shikana changala asa karan detata tyanna ekach sangaicha aahe
  once u start using these things like internet and all it hardly takes a day or two for you to get used to it but if u start using it early it takes a hell lot of time out of your child’s day. because we never look at the time wasted in tweeting or chatting or things like that.
  mhanunach children should be exposed to internet at proper age……

  • हिमांशू
   ब्लॉग वर स्वागत. माझ्या लेखाचा अर्थ इंटरनेट पासून मुलांना दूर ठेवावा असा नव्हता, फक्त पालकांनी स्वतःच योग्य वय काय असावे ते ठरवून मग मुलांना परमिशन द्यावी एवढंच म्हणणं होतं माझं.

 26. laxmi says:

  tumache mat 100% patale.
  internet ,mobile ,gaming addiction ya sarv goshti vaitach.

 27. Pingback: इंटरनेट चे गुलाम | indiarrs.net Featured blogs from INDIA.

 28. bharati says:

  महेंद्र्जी,
  तुमच्या मताशी 100% सहमत आहे.नेट मूलाना लहान वयात देणे धोक्याचे आहे ते फक्त बिघडतील म्हणून नाही.तर अनेक कारणे आहेत.बालपण करपणे,खेळ खेळण्यापेक्षा बघण्याकडे कल वाढणे,गेम खेळताना ऐकाग्रता वाढते पण अतिरेक म्हणजे व्यसन …मूलाना घडवणे आपल्या मोठ्यांच्या हातात आहे.
  त्याना जे देतो तेच त्याना आवडू लागते ..त्याना सवय कसली लावायची ते त्यांच्या लहानपणीच ठरवून त्याच वस्तू देणे उदा…
  आपल्याला वाटते त्याने वाचण करावे मग वाचायला लागायच्या आधीच पुस्तके त्याच्या पुढयात टाकून ठेवायची.गाड्या घेऊन दिल्यात तर ते नव्या गाडीचा हट्ट करतील..चांगलेकाय वाईएत काय याची जाणीव त्या गोष्टी माहीत होण्याआधीच कल्पना दिलेली असली पाहिजे म्हणजे उद्या मोठी ज़ल्यावर आपला विश्वास असतो आपले मूळ जगाच्या पाठीवर कुठेही जाओ ते चुकणार नाही.
  आपल्या कृतीतूनच आपला विश्वास निर्माण होतो.आणि त्याची जाणीव पाल्याला वाईएत मारगा पासून रोखातेच असे माज़े मत आहे

  • भारती
   मला केवळ इतकीच इच्छा होती की या विषयावर प्रत्येकाने थोडा तरी विचार करावा. हा लेख अजुन जास्त लोकांपर्यंत पोहोचावा अशी इच्छा होती. पण असो..

   प्रतिक्रियेकरता आभार.

 29. महेंद्रजी तुमच्या मतांशी सहमत…स्वातंत्र्य द्याव पण ते ठराविक वयानंतर..खरच काही फ़ार बिघडत नाही असल्या समन्वयाने घातलेल्या बंधनाने…मी तर वयाची विशी ओलांडल्यावरच आलो हया आंतरजालात…बाकी अतिशिस्तपण काही ठिकाणी मारक ठरते हे ही तेवढच सत्य…माझा एक जवळचा मित्र आहे.त्याला शाळा-कॉलेजात असतांना आमच्या बरोबर सिनेमाला ही कधी पाठवले नाही त्याच्या आईवडिलांनी, पण पुढे जाउन त्यांनी काय काय दिवे लावले ते काय सांगु तुम्हाला…माझ्या आईवडिलांनी आम्हाला कधीच हे करुन नको ते करु नको सांगीतल नाही पण त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वासच मला बर्याच वाईट गोष्टींपासुन दुर ठेवण्यासाठी कारणीभुत ठरला…बाकी हया इंटरनेटच्या युगात त्या ’शार्क्स ’ पासुन मुलांना वाचवण्यासाठी थोडीफ़ार बंधने हवीतच…

  • देवेंद्र
   कमांडींग मोड मधे सांगितलं तर कदचित ऐकणार नाहीत. पण मला असं वाटतं की तू १२वी पास होइ पर्यंत नेट पासून दूर रहावं. या पुढे तुझी इच्छा.. असं म्हंटलं तर मुलं दूर रहातात हा माझा अनूभव आहे.
   नेहेमीच हे सांगत असतो की अभ्यासात मागे पडु नका, नेट वर जाल तर अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ शकेल.. 🙂 बस्स . तेवढंच पुरेसं आहे.

 30. Ramesh says:

  Namskar Kaka,

  Nehmi pramane lekh avdala. Ani tumchya matashi sahmat ahhe.
  Pan kadhi-kadhi sabhovtalcha parisar sudhha jababdar asto.
  ani Mul nehami changlya goshti peksha vait goshti lavkar atmsad kartat.

  • रमेश
   प्रतिक्रियेकरता आभार. सभोवतालचा प्रभाव जास्त भितीदायक असतो. त्यापासूनच सांभाळायचं असते. त्या साठी घरचे संस्कार दृढ असले की पुरेसे असते.

 31. दादा, तुम्ही दोन मुलींचे वडील आहात त्यामुळे एक वडील म्हणुन तुम्ही योग्य काळजी घेतलीत. शिवाय तुम्ही स्वत: रोजच्या रोज इंटरनेट वापरता त्यामुळे मुलांनी इंटरनेट वापरण्याचा योग्य काळ तुम्हाला चटकन लक्षात आला. खरंच नसतं हो काही लहान मुलांनी नेटवर जावं असं. मी ब-याच साईट्स चेक करते. लहान मुलांसाठी व्हिडीओ असलेली kideos.com सुद्धा पाहिली पण त्यात काही विशेष सापडलं नाही. उलट वेबसाईटवर नको ती जाहिरात लावलेली होती. मुलांनी १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत नेट न पाहिलेलंच बरं, त्याने काहीच फरक पडत नाही.

  मी स्वत:चा इंटरनेटचा पहिल्या दिवसाचा अनुभव तर लिहिलाच आहे पण त्यानंतर मी इंटरनेट वापरायला लागले आणि फार चटकन गोष्टी कळू लागल्या. भिड चेपावी म्हणुन सुरूवातीपासून सवय असायला हवी होती वगैरे असं कधीच काही वाटलं नाही. नेटवर मिळणारं साहित्य बाजारात विकतदेखील उपलब्ध असतं. मुलाला चांगलं वळण लागावं आणि त्याने लहान वयात नको त्या गोष्टींच्या आहारी जाऊ नये म्हणून पालकांनी अभ्यासाच्या सी.डी. विकत आणाव्या असंच मी म्हणेन. ब-याच पालकांना वाटतं की आपल्याला जे कळत नाही, ते आपल्याला मुलाला तरी कळावं म्हणून ते कॉम्प्युटर आणुन देतात. पण मुलगा/मुलगी त्याचा काय वापर करतात हे त्यांना माहित नसतं, चेक करणं तर खूप लांबची गोष्ट झाली. तुमचा हा लेख खूप चांगला आहे. प्रत्येक आईवडीलांनी वाचावा असा. मी सुद्धा हे सर्व लक्षात ठेवेन.

  • कांचन
   ही बाब फारच नाजूक आहे. आणि या बाबतचे आपले धोरण प्रत्येक आई वडिलांनीच आपल्या मुलासाठी ठरवायचे आहे.
   इन्सायक्लोपेडीयाची सिडी घेतली की सगळं काम होतं. 🙂

 32. Vidyadhar says:

  अनुमोदन काका,
  मी स्वतः अकरावीत असताना नेट वापरायला सुरूवात केली, पण डायल-अप असल्याकारणे मेल बघण्यापलीकडे काही करता यायचं नाही तेव्हा…टेलीफोनची बिलं(!)
  आता नेट अगदी स्वस्तात उपलब्ध असल्याकारणे मुलांच्या हाती सहज पडतं आणि हल्ली कशाच्याही आहारी जाण्यासाठी अनेक गोष्टी उपलब्ध आहेत! काळजी घेणं गरजेचं वाटतं…
  पण वरती एकाने उत्तम शब्द वापरलाय…नेट सॅव्ही असावंच…ऍडीक्ट नव्हे!
  निरंजन म्हणतात तोच मार्ग!

  • त्या काळात डायल अप होतं आणि प्रोसेसर ची स्पिड पण कमी होती, पण आता तसं नाही. ब्रॉड बॅंड आणि हायस्पिड प्रोसेसर मुळे खूप काही करता येतं.
   नेट सॅव्ही असावं, या गोष्टीशी मी पण सहमत आहेच. फक्त नेट कुठल्या वयात मुलांना फ्री असेस द्यायचा ते पालकांनी निर्णय घ्यायचा.

 33. prasad Rokade says:

  प्रिय महेंद्र,
  आपण लिहिलेला शब्द न शब्द खरा आहे. मी सुद्धा असाच एक अपराधी पालक आहे. mail ID बनवून देणं किंवा internet ची ओळख करून देणं या गोष्टी मी मुलाला सातवी आठवीतच करून दिल्या. कारणं अशीच तू वर सांगितलेली. पण मी एक शहाणपणा केला कि broadband internet connection कधीच घेतलं नाही. नेहमी mobile वरून नेट access केलं. त्याचा फायदा असा झाला कि मी घरी असल्या शिवाय नेट access बंद झाला. जे काही करायचं ते मी किंवा बायको समोर असताना. त्यामुळे माझा मुलगा ‘तश्या’ sites पासून लांब राहिला. arkut वगैरे जरी पाहिलं तरी त्याचा फारसा त्रास झाला नाही.
  आता मुलगा दहावीत गेला म्हणून broadband internet connection घेण्याचा विचार चालला होता (मुलाने मागितले नसताना). तुझा ब्लोग वरील हा लेख वाचला आणि डोळे उघडले. धन्यवाद.
  प्रसाद रोकडे, पनवेल. नवी मुंबई.

 34. विनायक सोमण says:

  मी विनायक सोमण, तुमच्या ब्लॉगचा प्रचंड मोठ फॅन आहे. काय सही लिहिता बॉस्स ! लिखते रहो

 35. swati ghare says:

  Priya kaka..
  vatat hota marathitun lihava pan jamala nahi..
  mi ek BE computer student ahe…tumcha lekh vachun rahavala nahi ani lihayla ghetla..
  kaka tumhi je bolta te right ahe..mala alela anubhav hi asch ahe…3 varshapurvi pappani mala computer gheun dila ani mi internet jagtat paay thevla…vichar karat hote ki hai orkut,facebook ahe tari kay..ani gammat manun mi orkut joinhhi kela..tyanantar mi maze lahilech nahi..divas ratra fakt chat ani chat baki kahi nahi…study chi tar far vaat lagli..
  pan velevar mala jaag ali ani mi yatun baher ale…aaj mi internet use karte pan fakt abhyasathi..ek orkut account ahe pan fakt mazya collage friends ani natevaikansathi..kadhitari open karte…pan aapla mat sangava konala manun aajpasun blog lihaycha tharavlay…pan tumhala sangu ka kaka…tumhi je upay dile ahet na te fakt shiklelya palkansathi pan khedyatlya lokana kay kalnar hai….amchya gavat javal javal sagle 16-17 age vali mule internet,orkut,facebook se kartat,,,saglyankade mobile phons ahet…pan tyanchya palkana inglish yet nahi ki internet manje kay he sudha mahit nahi..mag kasa kalnar tyana hai…think karyasarkhi gosht ahe hi…baki tumhi khup chan lihita….

  • स्वाती
   हा बाकी एक मोठा अवघड प्रश्न आहे. जर गावाकडे पालकांना इंग्रजी येत नसेल् तेंव्हा तर ते थोडे जास्तच कठीण आहे मुलांना कंट्रोल करणे.मुलांना आपल्याला जे येत नाही ते यावं म्हणून बरेच पालक खूप पैसे वगैरे खर्च करण्यासाठी तयार असतात, पण मुळात फारसे काही समजत नसेल कॉम्प्युटर बद्दल तर कठीण होतं.
   तू त्या सगळ्या दुष्टचक्रातून बाहेर पडलीस ते फार बरे झाले. नाहीतर खूप कठीण झालं असतं. माझं स्पष्ट मत आहे की १८+ हे इंटरनेट साठी योग्य वय आहे.. 🙂
   मराठी मधे लिहायचे असेल तर http://baraha.com वर जाऊन सॉफ्टवेअर डाऊन लोड करून घे. अगदी सोपं आहे लिहिणं.

 36. bhushan says:

  kaka ha lekh far chhan aahe ha lekh purnpane sadhya chya jivnavar aadharit aahe

  • भुषण
   त्यात जी घटना लिहिलेली आहे, ती माझ्या मित्राच्या मुलाच्या बाबतीत घडलेली आहे, आणि म्हणूनच हा लेख लिहायल उद्युकत झालो होतो.

 37. प्र. के. फडणीस says:

  आज अचानक हा ब्लॉग समोर आला. माझे वय ७८ आहे व माझी नातवंडे अमेरिकेत त्यामुळे हे प्रष्न मला कधी जाणवलेच नव्हते! नवतरुणांपासून प्रौढांपर्यंत सर्व वयाच्या वाचकांच्या प्रतिक्रिया वाचनीय आहेत. अशा प्रष्नांना एकचएक असे उत्तर नसतेच. प्रष्न आहे याची जाणीव झाली कीं ज्यालात्याला स्वत:चे उत्तर शोधावे लागते.
  सर्व तरुण मंडळीना माझी नम्र विनंति आहे कीं तुम्ही रोमन लिपीचा वापर सोडून द्या! एक काळ होता जेव्हां मला फार दु:ख होई कीं संगणकावर मराठीचा वापर सुलभ नाही. तेव्हांहि Loksatta Font Freedom चा उपयोग मी मुक्तपणे करत होतो.युनिकोडचा जमाना आला. आता नागरी लिपीचा वापर सुलभ आहे मग आम्ही मराठी माणसे रोमन लिपीचा वापर कां करतों? तेव्हढ्याच keystrokes लागतात ना? आपण नागरी लिपी वापरणार नाही तर कोण वापरणार? पाकिस्तानी, चिनी कीं युरोपिअन?
  हे विषयाला सोडून झाले! तेव्हा क्षमस्व.

  • काका,
   आवर्जुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार.
   गुगल ट्रान्सलेट वर मराठी टाईप करणं पण फार सोपं आहे. एक विंडॊ उघडली की सहज टाइप करता येतं.

 38. Pingback: छंद, विरंगुळा की व्यसन? | काय वाटेल ते……..

 39. Pam says:

  khupach chan v4 aahet tumche…..

 40. Ganesh sande says:

  khup chan vichar ahet tumha sagalyanchye……….

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s