कॉस्ट ऑफ अपॉर्चुनिटी

एका कलिगचा फोन आला. एक हॅबि्च्युअल जॉब हॉपर. आमच्या कंपनीत त्याची ही तिसरी नौकरी- फार तर दोन वर्ष झाले असतील जॉइन करुन. म्हणाला, की त्याला हेड हंटर्स कडून एक नवीन जॉब ऑफर आलेली आहे – जावं का सोडून?  सांगत होता  की कंपनी पण चांगली आहे, सॅलरी हाईक (’जंप’ हा शब्द वापरला जातो नेहेमीच) पण जवळपास ३८ टक्के आहे- तेंव्हा मी आता पेपर टाकायचा विचार करतोय – तुमचे काय मत आहे?

काही कंपन्या पेपरला किंवा नेट वर जाहिराती न देता सरळ प्लेसमेंट एजन्सीज ला हे काम देतात. शक्यतो कॉंपिटीटर्स कडले लोकं फोडून आणायचे काम ह्यांना सांगितलं जाते. एखादा कॉंपिटीटर कडला माणुस घेतला म्हणजे दुसऱ्या दिवसापासून कामाला लागू शकतो. काही ट्रेनिंग  वगैरे देण्याची गरज भासत नाही किंवा त्याला नवीन कंपनीत  सॆट व्हायला वेळ पण  लागत नाही.

हेड हंटर्स  ना काम देतांना नेहेमीच बरेचदा  कॉंपिटीटरचा एखादा खास माणूस पण फोडून आणण्याची जबाबदारी दिली जाते.  मार्केटींग च्या क्षेत्रा मधे दुसऱ्या कंपनीच्या लोकांचा संबंध नेहेमीच आपल्या कॉंपिटीटर्स शी येत असतो. त्या मूळे  कॉंपिटीटर कडे   पण कोण  चांगले लोकं आहेत ह्याची  माहिती असते. ’हेड हंटर्स ’   अशा लोकांशी फोन वर संपर्क साधून त्यांना नवीन नोकरीच्या संधीची माहिती सांगून आपला रेझुम पाठवायला सांगतात .

तो एक चांगला मार्केटींग इंजिनिअर आहे. सोडून गेला, मॅनेजमेंटच्या भाषेत कंपनीसाठी ’असेट’ आहे तो, आणि पुर्वी दोन वेळा जॉब बदलण्याचा निर्णय घेतलेला. असे असतांनाही त्याला आज काय करावे हा प्रश्न का पडावा याचे आश्चर्य वाटले.

एक अपॉर्चुनिटी आहे, पण त्या संधीची   व्हॅल्युएशन करता येत नाही – की अपॉर्चुनिटी घ्यायची की नाही?कदाचित आज घेतली नाही तर उद्या पश्चाताप होईल , आणि जर घेतली आणि तो निर्णय चुकीचा निघाला तर?असे प्रश्न नेहेमीच डोक्यामधे भुंग्याप्रमाणे कुरतडत असतात.

मॅनेजमेंट आणि एकॉनॉमिक्स मधे ” कॉस्ट ऑफ अपॉर्चुनिटी” हा कन्सेप्ट आहे. तो कन्सेप्ट जर अशा प्रसंगात वापरला तर योग्य निर्णय घेण्यास मदत होऊ शकते. तुमच्या आयुष्यात बरेचदा संधी(अपॉर्चुनिटी) येते , पण तिची खरी किंमत किती हे समजत नाही. त्या मूळे बरेचदा तर योग्य संधी पण गमावली जाते. ’संधीची किंमत ’ (कॉस्ट ऑफ अपॉर्चुनिटी)म्हणजे काय ते समजले तर संधीचे इव्हॅल्युएशन व्यवस्थित करता येउ शकते . ते कसे ? थोडक्यात सांगतो..

आता समजा, तुम्ही हॉटेल मधे गेलात.   चिकन , आणि फिश   दोन्ही तुम्हाला आवडतात, आणि जी  हवी ती डीश खायची संधी आहे -पण तुम्ही एकच डीश ऑर्डर करु शकता!!”अशा प्रसंगी जर तुम्ही समजा फिश ऑर्डर केली ,   तर याचा अर्थ फिश साठी तुम्ही चिकनची संधी नाकारली.   थोडक्यात   चिकन म्हणजे  फिश खाण्यासाठी तुम्ही दिलेली कॉस्ट ऑफ अपॉर्चुनिटी”. थोडं कन्फ्युजिंग वाटतंय?

बरं दुसरं साधं उदाहरण, समजा तुम्ही दहा रुपयांचं लॉटरी तिकिट घेतलं विकत . आणि तुम्हाला त्या तिकिटाचे १० लाख जिंकण्याची संधी दिली- म्हणजेच त्या संधीची किंमत आहे दहा रुपये..

अजून एक उदाहरण, रविवारचा दिवस आहे. तुम्हाला पुलं च नवीनच पुस्तक वाचत घरी पडून ’आळशाचा रविवार” ( लेझी संडॆ) एंजॉय करायचा आहे. तुमचा दहा वर्षाचा मुलगा/मुलगी तुम्हाला बाहेर सिनेमाला चल म्हणून मागे लागतात. तेंव्हा या केस मधे सिनेमा पहाण्यासाठी तुम्ही आवडीचे पुस्तक वाचनाच्या संधीचा बळी देताय.खेळण्याच्या ऑपॉर्चुनिटी कॉस्ट म्हणजे तुमचे पुस्तकाचे वाचन.

तुमच्या दृष्टीने कुठल्या गोष्टीला प्राथमिकता द्यायची त्या वर सगळे निर्णय अवलंबून आहेत. बरेचदा लहानशा संधीची किंमत खूप जास्त असते, किंवा खूप मोठी संधी पण फार कमी किमतीत उपलब्ध होऊ शकते. इथे जे लिहिलंय ते  इकोनॉमिक्सच्या संदर्भात, पण तीच गोष्ट आपल्या आयुष्याच्या संदर्भात पण खूप उपयोगी ठरते.

जसे नोकरी बदलायची आहे, तेंव्हा नवीन  नोकरी मधे जरी जास्त पैसे मिळत असतील तरीही तुम्ही तुम्ही मिळवलेली सध्याच्या नोकरी मधली  गुडविल ही तर  त्या नवीन  नोकरीची  ऑपॉर्चुनिटीची कॉस्ट झाली.

ही तर तुम्हाला कुठल्याही परिस्थिती मधे भरुन येत नाही. तसेच  नवीन नोकरी मधे जर जास्त बेनिफिट्स असतील, पण जर नवीन कंपनी कमी टर्न ओव्हर असणारी असेल, तर मग त्या केस मधे तुम्ही नवीन नोकरी करता मोठ्या एस्टॅब्लिश्ड कंपनीची नोकरी सोडणे ही किंमत देता.

बरेचदा लोकं  डेसिग्नेशन साठी पण नोकरी बदलतांना पाहिलेले आहेत. लहान कंपनी मधे थोडेसेच जास्त पैसे पण खूप मोठी पोस्ट मिळाली तरी पण लोकं नोकरी बदलतात. “एक तर मोठ्या कंपनीत लहान पोस्ट वर काम करा, किंवा लहान कंपनीत मोठ्या पोस्ट वर”  चॉइस तुमचा. त्या कलीगला पण हा कन्सेप्ट   सांगितला, आणि म्हंटलं  तूच आपला काय तो निर्णय घे.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , , . Bookmark the permalink.

35 Responses to कॉस्ट ऑफ अपॉर्चुनिटी

 1. रोहन says:

  छान विषय आहे… मला स्वतःला काही महिन्यापूर्वी एका कंपनीकडून (प्लेसमेंट एजन्सीकडून) अशी विचारणा झाली होती.. ‘जंप’ मोठा होता… पण मी नाकारली… अजून किमान ३ वर्षे तरी इकडून पेपर टाकायचा विचार नाही माझा… 🙂 मोठ्या एस्टॅब्लिश्ड कंपनीची नोकरी सोडणे नक्कीच चुकीचे ठरेल…

  • रोहन
   असे काही कन्सेप्टस एखाद्या ट्रेनिंग प्रोग्राम मधे शिकवले जातात, पण नंतर विसरतो आपण.

   हे पोस्ट लिहिण्याचा उद्देश केवळ ऑपॉर्च्युनिटीज चं व्हॅल्युएशन केल्याशिवाय भावनेच्या भरात निर्णय घेउ नये एवढेच सांगण्यासाठी!

 2. हम्म.. रोजच्या जीवनातला पण महत्वाचा विषय. पण अनेकदा प्रत्येक संधी ही संधी असेलच असं होत नाही. अशा वेळी ती उगाच स्वीकारली असं होतं. त्यामुळे पूर्ण विचार करूनच निर्णय घेणं केव्हाही योग्य आणि अर्थात तितकंच अवघडही.

  • हेरंब
   हा प्रश्न नेहेमीच असतो ” लहान कंपनीत मोठं होऊन रहायचं, की मोठ्या कंपनीत लहान म्हणून”
   मला पण बरेचदा हा प्रश्न पडतोच.. 🙂

   • हा प्रश्न मला वाटतं जवळपास सर्व नोकरदारांना सतावत असेल. एकीकडे पगाराचं आकर्षण आणि एकीकडे हुद्याचं. काळ वेळ पाहून निवड करावी हेच खरं. पैसा महत्त्वाचा खराच पण कधी कधी अधिकाराची खुर्चिही कामी येऊ शकते.

    • ते ही खरंच ! आणि काही वर्ष झाली की मग कंपनी बरोबर भावनिक जवळीक निर्माण होते-आणि मग जास्त पैसे मिळाले तरीही सोडवत नाही जॉब.

 3. Nachiket says:

  Jumping every two years does not create a good career graph. But progress is both designation and salary is seen best in these jumping people.
  I had worked in top corporate company,one of the top sensex brand for 6 years steadily with the same thoughts. I felt loyal to company. But the real designation and salary rise came only when I changed.I feel jump after 6 yrs is ok right?

  • नचिकेत
   तुमचे अगदी बरोबर आहे. काही वर्षानंतर नोकरी बदलणे गरजेचे असते- पुढल्या करिअर ग्रोथ साठी. बरेचदा रेसिग्नेशन दिलं की वरची पोस्ट आणि पगार वाढीचे अमिष पण मिळते. निर्णय घ्यायचा असतो तो आपण स्वतः. माझा अनुभव सांगतो, एक ऑफर होती, सॅलरी हाइक बरी होती पण घर देत नव्हते. सध्या रहातो ते १२०० स्क्वेअर फुटाच्या घराचे भाडे जरी ३० हजार धरले, तरीही ती कॉस्ट ऑफ अपॉर्च्युनिटी होत होती- आणि सग्ळं एकोनॉमिक्स डिस्टर्ब होत होतं… तुमचा निर्णय मला तरी योग्यच वाटतो.

 4. mazejag says:

  आईशप्पथ, सोमवारी सक्काळी सक्काळी हि पोस्ट, माझ्या साठी जबरदस्त मोठा डोस आहे हा. सध्या कामाच frustration आल आहे. ऑफिस डोक्यातून घरी यायला लागला कि ब्रेक हवा असतो पण ४५ दिवसांची सुट्टी असून सुद्धा सुट्टी मिळत नाही. चाटुगिरी करणारे वाढता आहेत. scores आमचे स्क्रू होता आहेत. मॅनेजमेंट ची घाण खोड असते प्रत्येक वेळी आपण त्याच्यापर्यंत जाऊन सांगा आपल्या achievements आणि challenges . and that sucks

  • मान्य करा अथवा नाही, पण हेच खरं आयुष्य आहे. ह्याच क्षणी मानसिक बळ लागतं फेस करायला..

 5. आल्हाद alias Alhad says:

  “मॅनेजमेंट ची घाण खोड असते प्रत्येक वेळी आपण त्याच्यापर्यंत जाऊन सांगा आपल्या achievements आणि challenges . and that sucks

  very correct

  • आल्हाद
   खरं असलं तरी याला मॅनेजमेंटच्या भाषेत केआरए ( की रिझल्ट एरिया) म्हणतात. आणि ते टाळता येत नाहीच.

 6. अगदी मनातला बोललात काका, आमच्या इंडस्ट्रीमध्ये अश्या बंजी जंपिंग चालूच असतात..
  मग ती कधी बरोबर असते तर कधी साफ चुकते 😦

 7. वा! अगदी वेळेवर वाचायला मिळाला हा लेख.
  सध्या माझीही अशीच अवस्था आहे फक्त नोकरी बदलण्याच्या बाबतीत नव्हे तर घर घेण्याच्या बाबतीत. पण ” कॉस्ट ऑफ अपॉर्चुनिटी” आवडले, खूप उपयोगी आहे.

  • सोनाली
   बऱ्याच ठिकाणी हा कन्सेप्ट उपयोगी पडू शकतो. एक चांगली टर्म आहे ही, योग्य जागी वापरल्यास.

 8. RAVINDRA JADHAV says:

  फ़ार चान्गल्या रितीने कोस्ट ओफ़ ओपर्ट्चुनिटी समजावुन सान्गितली. छान लिहीले आहे.

 9. एकदम छान विषय निवडलात काका…
  ” कॉस्ट ऑफ अपॉर्चुनिटी ” हि कन्सेप्ट आयुष्यातील बरेच महत्वाचे निर्णय घेण्यास उपयुक्त ठरू शकते……

 10. छान समजावून सांगितले आहे. कुठलाही निर्णय घेताना ही आवश्यक गोष्ट आहे. cost of opportunity ही relative term आहे. योग्य पर्याय निवडायची अजून एक पद्धत अशी:
  आपल्याला करीअर मध्ये काय पाहिजे ते त्याच्या महत्त्वानुसार लिहा: उदा: पैसा, लौकिक, स्थिरता. प्रत्येक गोष्टी पुढे त्याचे % weightage अशा प्रकारे लिहा की weightage ची बेरीज १००% येईल उदा:
  पैसा – ८०%
  स्थिरता – १०%
  लौकिक – १०%
  मग सद्य नोकरीचे फायदे १ ते ५ मध्ये मोजा (१ म्हणजे कमी फायदा, ५ म्हणजे जास्त फायदा) उदा:
  पैसा – २
  स्थिरता – ४
  लौकिक – ३
  आता फायदा आणि weightage चा गुणाकार करा. आणि येणाऱ्या संख्यांची बेरीज करा. हीच पद्धत नवीन नोकरी साठी वापरा. ज्या पर्यायाची संख्या जास्त, तो पर्याय योग्य.

  • निरंजन
   अतिशय सुंदर आहे कन्सेप्ट तुम्ही सांगितलेला. 🙂
   हा प्रश्न बऱ्याच लोकांना छळत असतो.

  • निरंजन
   अतिशय सुंदर आहे कन्सेप्ट तुम्ही सांगितलेला. 🙂
   हा प्रश्न बऱ्याच लोकांना छळत असतो.
   इथे वाचुन फायदा होईल

 11. ravindra says:

  आहे ती नौकरी सोडून दुसरी पकडतांना खूप विचार करायला हवा. इतरांच्या सांगण्यावरून नव्हे स्वतःच विचार करून निर्णय घ्यावा. असे केल्याने चुकीचा निर्णय घेतला गेला तरी जास्त दुखः होत नाही. मी १९८४ मध्ये प्रथम खाजगी कंपनीत कामाला होतो. माझा पर्फोर्मेंस बघून कंपनीतील मेनेजर आणि एम डी. खुश होते. फक्त ३ महिने नौकरी केली आणि सरकारी नौकरी चालून आली ती पकडली. ती माझ्या आयुष्यातील खूप मोठी चूक होती असे मला आज ही वाटते. पण घरची परिस्थिती विकट असल्याने मला स्टेबल जॉब हवा होता. म्हणून प्रत्येकाने पूर्ण विचारांती नौकरी बदलावी असे मला तरी वाटते.

  • रविंद्र
   अहो काल दिवसभर नव्हतो नेट वर म्हणून उत्तर द्यायला वेळ होतोय. पुर्वी एक जाहिरात होती, महाराष्ट्र राज्य लॉटरीची ” तुमच्या दारावर संधी ठोठावते आहे ” अशी काही तरी..

   जे होऊन गेलं त्यावर विचार करुनये असं वाटलं, तरीही मनात विचार येतच रहातात. पुर्ण विचारांती निर्णय घ्यायचा असतो , कुठल्याही दडपणाखाली न येता.
   प्रतिक्रियेकरता आभार.

 12. Pingback: कॉस्ट ऑफ अपॉर्चुनिटी | indiarrs.net Featured blogs from INDIA.

 13. Vidyadhar says:

  खूपच महत्वाचा आहे हा विषय!
  आमच्या फील्डमध्येही असे खूप जॉब हॉपर्स असतात आणि खूप सार्‍या अप्पॉर्च्युनिटीज..
  हा विषय मस्त मांडलाय काका तुम्ही!
  धन्यवाद!

  • विद्याधर
   ह्या हेड हंटर्सनी तर अगदी वैताग आणलाय . सारखे कुठुन ना कुठुन तरी फोन येत असतात. निर्णय विचारांती घ्यायचा असतो. एकदा लग्न झालं , जबाबदारी वाढली की मग निर्णय घेण कठीण होतं.नौकरी बदलायची ती शक्यतो लग्नापुर्वीच.. 🙂

 14. Gaurav says:

  खुप चांगली पोस्ट आहे, सध्या विचारात आहे जॉब चेंज करायच्या पण हे वाचल्यावर आता अजुन थोडा विचार करु म्हणतोय…

  • गौरव
   ब्लॉग वर स्वागत. हे एका ट्रेनिंग मधे फॅकल्टीनी शिकवलं होतं. पुर्ण विचारांती घेतलेला निर्णय कधीही योग्य! प्रतिक्रियेकरता आभार.

 15. bhaanasa says:

  खूप महत्वाचा मुद्दा मांडलास महेंद्र. कशासाठी कशाची किंमत मोजतोय हे गणित ज्याने त्याने जुळवायचे असते. नेहमीच छळणारा प्रकार आहे हा.

 16. ऋषिकेश says:

  एकदम छान विश्लेषण आहे. माझा पण सध्या हाच विचार चालू आहे(जंप) … पण आता जरा जास्त विचार करेल ह्या angle ने.
  मी शिकत असताना वाचले होते कि job satisfaction महत्वाचे कि पैसा… पण माझ्या मते ह्या गोष्टीची priority जसा अनुभव(किंवा वय) वाढेल तशी बदलते… सद्या माझ्यासाठी अजून तरी ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच level ला आहेत.

  • ऋषीकेश
   घाई गडबडीत निर्णय घेउ नका. पुर्ण विचारांतीच जो काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा म्हणून हे पोस्ट!

 17. Geetanjali says:

  Mahendra, that was very important and relevant discussion. The ‘cost of opportunity’ choice decision itself is difficult because there is basic problem in identifying what is more dear in life..money/stabilty/position etc. The priorities change at different times in the stages of life and also vary from person to person and there is no one answer that suits all!… a lot of it depends on individual and family circumstances. When we weigh things from other’s ( including your husband/ wife/children/parents) perspectives we are likely to be unhappy because the decision is made by emotions. It gives dis- satisfaction at personal level with the feeling of compromise/adjustment/favors to others. I feel you should tap you OWN MIND when making difficult choices and ask ‘it’ what would make ‘it’ HAPPY or what ‘it’ is longing for? You got to be 100% honest to yourself though! I suppose HAPPINESS is what we are craving for at the end of the day. This is self awareness?

  • गीतांजली
   खरं आहे !!
   निर्णय घेतांना बहुतेक वेळी इमोशनल होऊनच घेतला जातो.
   प्रायोरीटीज नेहेमीच बदलत असतात. करीअर ग्रोथ पैसा हेच सगळं काही वाटत असतं, पण नंतर मात्र सगळं बदललेलं असतं.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s