जैन आणि हिंदू

हा लेख लिहिण्या पुर्वी मला हेरंब प्रमाणे आधी डिस्क्लेमर टाकावं का? हा विचार खरं तर मनात आला होता, पण शेवटी कुठल्याही डिस्क्लेमर  न लिहिता सरळ लेख सुरु करतोय.

मुंबई मधे सध्या फक्त शाकाहारी लोकांच्या साठी वेगळी  गृह संकुलं बांधायची  एक नवीनच पद्धत सुरु झालेली आहे.त्या संकुलात केवळ शाकाहारी लोकांनाच घरं दिली जातात.खरेदी करणारे  जर स्वतः रहाणार नसतील तर फक्त शाकाहारी लोकांनाच घर भाड्याने देईन असे प्रतिज्ञा पत्र  लिहून घेतले जाते. मराठी लोकं , मुळ कोळी समाज किंवा आंग्रे समाज हा मांसाहारी, म्हणून इथे मराठी लोकांना घरं नाकारली जातात.

जैन लोकांचे मांसाहारी लोकांच्या शेजारी नकोसे वाटणे  ह्या गोष्टीला राजकीय स्वरुप देणे कितपत योग्य आहे? जैन लोकांच्या सोसायटी खास वेगळ्या बनवलेल्या असतात, त्या मधे महाराष्ट्रीयन लोकांना फ्लॅट विकत न देणे हे योग्य की अयोग्य?  जैन धर्मियांची जी शाकाहारी जीवन पद्धती आहे, त्यांना जर केवळ शाकाहारी लोकांच्या शेजारी रहायला आवडणे, ह्या  विरुद्ध आवाज उठवणे हे योग्य आहे का? हे असे प्रश्न मला नेहेमीच छळत असतात.

ह्या विषयावर माझे विचार लिहीण्याचे बरेच दिवसांपासून मनात होते. पण  लिहिण्याचा योग आज आला.  जैन धर्मीय तसे ना कुणाच्याही कुठल्याही गोष्टी मधे पडत नाहीत. नेहेमीच स्वतःच्याच विश्वात मग्न असतात. त्यांची आपली  जिवन पध्दती आहे, तिच्या प्रमाणे ते जगत असतात. जसे कांदा लसून न खाणे, किंवा शुध्द शाकाहार, जमींकंद न खाणे वगैरे. मुंबईला जैन लोकांची संख्या भरपुर आहे.कुठल्याही हॉटेल मधे गेल्यावर तुम्हाला जैन डिशेशनी  मेनुकार्डचा  बराचसा भाग व्यापलेला  दिसेल, याचं कारण हे की ते कधीच कॉम्प्रोमाइझ करीत नाहीत. जर आपल्या जिवनपध्दती प्रमाणे खाण्याची वस्तू नसेल तर ते काहीही खात नाहीत, त्यामुळे हॉटेलचालकांना धंद्याच्या दृष्टीने त्यांना चालणारे जैन व्यंजनं मेनुकार्ड मधे इन्क्लुड करणे आवश्यकच ठरते- शेवटी धंदा आहे नां???

मी स्वतः अगदी हार्ड कोअर मांसाहारी आहे. मला मांसाहारी विशेषतः मासे आणि चिकन  खूप आवडतात. पण घरी मात्र सगळे लोकं शुध्द शाकाहारी आहेत. अगदी अंडं पण चालत नाही आमच्या घरी कोणालाच. मी स्वतः रहातो एका कॉस्मोपोलीटीयन सोसायटी मधे ७ व्या मजल्यावर.

काही वर्षापुर्वी  जेंव्हा खालच्या मजल्यावर एक बंगाली कुटुंब रहायलं आलं  आणि    त्यांच्या घरी सरसूच्या तेलामधे मासे तळणे सुरु झाले की जो  वास यायचा तो  आमच्या घरात खिडक्या बंद केल्या तरीही  इतका जास्त यायचा, की तो सहन न होऊन  सौ. आणि आईच्या उलट्या सुरु व्हायच्या.कदाचित मांसाहारी लोकांना जो सुगंध वाटतो तो इतरांना म्हणजे शाकाहारी लोकांना दुर्गंध वाटतो हेच कारण असावे. मध्यंतरी आमच्या इथे एक केरळी कुटूंब रहायला आलं. त्यांच्या घरी खोबरेल तेलामधे बिफ तळण्याचा जो वास येतो तो मी स्वतः मांसाहारी असूनही सहन करू शकत नव्हतो . पण केवळ नाइलाज म्हणून ऍडजस्ट करावे लागायचे . सौ. तर सारखी मागे लागली असायची की दुसरं घर पहा म्हणून.

मला वाटतं की जैन लोकांच्या मनात महाराष्ट्रियन लोकांच्या बद्दल किंवा मराठी भाषिक लोकां बद्दल काही तेढ नाही. माझे स्वतःचे बरेच जैन मित्र आहेत.  हे मराठी शेजार नको म्हणणे म्हणजे केवळ  खाण्यापिण्याच्या सवयीच्या मुळेच आहे , दुसरे राजकीय कारण त्यात काहीच नाही. मराठी लोकांच्या जेवणात गेला बाजार सुकी मासळी तरी नक्कीच असते. तिचा वास, किंवा फिश शिजवताना सुटणारा वास हा शाकाहारी लोकांना अजिबात आवडत नाही .

तसेही जैन  लोकं मुळतः कांदा लसूण पण जेवणात वापरत नाहीत, त्या मुळे साध्या मसाल्याच्या भाज्यांचा वास पण त्यांना नकोसा होत असावा. ऑस्ट्रेलियन लोकांना आपल्या भारतीय लोकांच्या अंगाचा करीचा वास येतो असे ते म्हणतात. आपल्या जेवणात जे हिंग किंवा जे मसाले वगैरे वापरले जाते, त्याचा वास जरी आपल्याला सुगंध वाटत असला तरीही त्यांना नकोसा वाटत असेल तर त्यांना दोष देता येइल का?

सध्या जैन लोकांच्या सोसायटी मधे मराठी लोकांना घरं दिली जात नाहीत, म्हणजे हे एक मराठी माणसाला मुंबई बाहेर काढण्याचे  षडयंत्र आहे, इथला मराठी टक्का कमी करण्याची एक चाल आहे असे म्हंटले जाते.

माझा एक मुस्लीम मित्र एका सोसायटी मधे रहातो. त्या सोसायटी मधे दर इद ला बकरे, आणि इतर बळी दिले जातात. जर तिथे इतर धर्मीय लोक असते तर ते शक्य झाले नसते. ती केवळ बोहरा लोकांची सोसायटी आहे. जैन लोकांच्या प्रमाणे मुस्लीम लोकांच्या पण सोसायटी आहेत की जिथे फक्त मुस्लीम, आणि ते पण ठराविक जमातीच्याच लोकांना घरं विकली जातात.

मला एकच विचारायचंय, किती मराठी लोकं त्या टाउन साईडला करोडॊ रुपयांचे फ्लॅट्स विकत घेउ शकतात? आणि जरी घेऊ शकत असतील तर त्या जैन लोकांच्याच सोसायटी मधेच घेण्याचा अट्टाहास का? त्याच भागात इतरही स्किम्स असतातच फ्लॅटच्या. तिकडे पण फ्लॅट घेतल्या जाउ शकतो?

या गोष्टी विरुद्ध  बरेच लोक  (राजकीय नेते) मराठी व्हर्सेस जैन असा वाद निर्माण करत आहेत.  मला     संशय असाही येतो की  खरंच हा मुद्दा मराठी विरुद्ध जैन असा आहे का? की हा एक  मराठी मतांसाठी तयार केलेला (अर्थात ओढून ताणून) राजकीय  मुद्दा आहे? असंही वाटतं की  एका ठराविक जीवन शैली असलेल्या लोकांची एकत्र रहाण्याची इच्छा म्हणजे अशा सोसायटी!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , , , , , , , , . Bookmark the permalink.

59 Responses to जैन आणि हिंदू

 1. Pingback: Tweets that mention जैन आणि हिंदू | काय वाटेल ते…….. -- Topsy.com

 2. kiran says:

  Really good view. Especially concluding line. It summarizes very well.
  I guess some tricky situation occurs when in a society which, for example 10 residents who want to practice same lifestyle and 3 other residents with lifestyle which is different than those 10, live. many times majority group behave in a manner which will create situation of disincentives for other 3 residents.
  Anyway, I like the article..

  • किरण
   धन्यवाद. ज्या लोकांची जीवन पद्धती एक सारखी असते ते एकत्र राहिले तर ऍडजस्टमेंटला कमी त्रास होतो.

 3. उत्तम मुद्यावर लेख लिहिलात काका.

  क्षमस्व, पण >>> “त्याच भागात इतरही स्किम्स असतातच फ्लॅटच्या. तिकडे पण फ्लॅट घेतल्या जाउ शकतो?” या वाक्याशी मी सहमत नाही.

  काहीही झाले तरी शेवटी हे आपले राज्य आहे. आपली स्वत:ची संस्कृती आहे. तडजोड ही बाहेरून आलेल्यांनी करायची असते. ते शुद्ध शाकाहारी आहेत या बाबीचा जसा आपण आदर करतो त्याप्रमाणेच आपल्यातील काही लोक मांसाहारी आहेत या बाबीचा त्यांनीही विचार करायला हवा. मी स्वत: शाकाहारी आहे, पण त्यामुळे माझ्या आसपासचे सगळे शाकाहारी असले पाहिजे असा माझा अट्टाहस नाही. सहिष्णुता आणि सहन करणे यात फ़रक करता यायलाच हवा. माझ्या प्रतिक्रियेचा तुम्हाला न आवडल्यास क्षमस्व.

  • अभिलाष,
   अर्थातच मत मतांतरे असणारच. अहो दोन सख्ख्या भावांची मत जर जुळत नाहीत – इथे तर अर्थातच थोडी मत मतांतरे असणारच.

   मी फक्त एका वेगळ्या ऍंगलने त्या प्रॉब्लेमकडे पहात होतो. कदाचित स्वतःच्या अनुभवातून. एक सांगतो, बिल्डींग मधे मासेवाला भैय्या जेंव्हा मासे विकायला येतो, आणि जेंव्हा तो तुकडे करतो ते पहाणे पण अशक्य होते शाकाहारी लोकांना.

   इथे जैन व्हर्सेस मराठी, किंवा परप्रांतीय व्हर्सेस मराठी हा मुद्दा नाही. जैन लोकं जे इथे मुंबईत रहातात ते इथेच तीन चार पिढ्या झालेले आहेत. मराठी स्वच्छ बोलतात, तेंव्हा त्यांना बाहेरचे म्हणून या वादाला वेगळा रंग दिला जातोय असे वाटते.

   इथे शाकाहारी -मांसाहारी हा मुद्दा जस्त महत्त्वाचा आहे असे वाटते. ऍडजस्टमेंट जरुर करायला हवी, पण जर तशी वेळच त्यांनी येऊ देऊ नये म्हणून जर त्यांनी प्रयत्न केला , आणि वेगळी सोसायटी स्थापन केली तर त्यात काही वावगे नाही असे वाटते.

  • Arun Joshi says:

   बाहेरून आलेले हा अलिकडे फ़ार प्रिय झालेला वाक्प्रचार दिसतो. आर्य बाहेरून आले. उच्चवर्णिय बाहेरून आले. जैन बाहेरून आले. सर्व मनुष्य पॄथ्विवर बाहेरून आले. मूळ इथे कुणी होते की नाही? जैन लोक भारतात प्रत्येक प्रान्तात आहेत आणि ते लोकल आहेत. मुळात “जैन आणि हिन्दू” , ” जैन आणि मराठी” हे वर्गीकरणच चूक आहे. ” जैन आणि मराठी” हा तर निरर्थक शब्दप्रयोग आहे. मराठी जैन गुज्जु जैनान्पेक्षा सन्ख्येने फार जास्त आहेत. ते सर्व गुज्जु जैनान्सारखेच कदक आहेत. आणि “जैन आणि हिन्दू” हे क्लासिफ़िकेशन अध्यात्माच्या फार वरच्या प्रतलावर चालू होते.

   • अरूण
    प्रतिक्रियेकरता आभार. तुमची प्रतिक्रिया पण विचार करायला लावणारी आहे.

 4. ngadre says:

  Examples ekdam fit ahet. Marathi Vs Jain asa prashn naheech aahe. Faar tar shakahari Vs Maansahari mhanata yeil. Just another dirty ‘marathi card’ raised for Political leverage. Agreed.

  • नचिकेत
   अगदी बरोबर.. मला पण हेच म्हणायचंय.. शाकाहारी -मांसाहारी हा मुद्दा आहे. विनाकारण त्याला जातीय रंग दिला जातोय असे मला पण वाटते.

 5. thanthanpal says:

  जैन लोक डास मरत नाही पण आख्खा जिवंत माणूस गिळून टाकतात असे या जैन समजा बद्दल बोलले जाते. आज मटणाचे हॉटेल मध्ये जा तेथे बहुसंख्य खाणारे हे जैन मारवाडी आणि हो ब्राम्हण दिसतील. लोका सांगे तत्वज्ञान आपण राही कोरडे पाषाण हेचे खरे आहे

  • काही लोकं जरूर खात असतील, पण तो मुद्दा पुर्ण पणे वेगळा आहे. दुसरा मुख्य मुद्दा म्हणजे जैन लोकं हे नेहेमीच हिंदूच्याच बाजूने राहिले आहेत. तेंव्हा विनाकारण तेढ निर्माण करणे या साठी हा मुद्दा तर नाही?

 6. mau says:

  Mahendraji,
  lekh As usual Uttam….pan tarihi ek saangavaese waatate…aapanch marathi hya saglyaalaa karanibhut aahot ase watate… Abhilash hyaaNni mhatale aahe ki he aapale rajya aahe,aapli sanskruti aahe….tadjod hi baherchyanne karayachi..etc etc…he sagl vachyala,lihayla bare aste..pratykshat kahi wegalech swaroop aahe..basically aapanch marathi aapalyach marathi manasala mumbait thevu ichhit nasato….he sagle me avdhya sathi lihite karan don diwasapurvichich ek ghatana majhya atishay javalachya natyat ghadali aahe..mala aikun hi ashcharay watale..ase kase keval swatachya wasted interest sathi manas vagu shakatat…jain kivha baniya or any bihari..swata mumbait yeto,pathopath ajun ek tyachach natalag yeto ani mag tyancha sulsulat mumbait hoto…pan aapalyakade kitise madaticha haath detat..???????Madattttt????ani ti hi marathi manus????shakyach nahi..khup wait watate lihayala pan saty hech aahe…ani tyacha purepur fayada he political leadres ghetat…so jase peral tasech milel………….

  • उमा
   प्रतिक्रिया एकदम बोलकी आहे. स्वतः अनुभवल्यामुळे त्यात जिवंतपणा आला आहे. मी लेख लिहितांना मनात’ बाहेरचे – इथले’ हा मुद्दा नव्हता मनात. केवळ शाकाहारी- मांसाहारी हा मुद्दा होता.
   मराठी माणसं महाराष्ट्राबाहेर गेल्यावर मात्र दुसऱ्या मराठी माणसाला हात देतात. मी स्वतः महाराष्ट्र मंडळ कलकत्याचा अनूभव घेतला आहे- त्यावरून लिहितोय हे. 🙂 पण इथे महाराष्ट्रात असले की तो अनुभव येत नाही.

 7. काय योगायोग आहे! कालच मी शतपावलीवर शाकाहार या विषयावर दोन लेख टाकले आहेत. त्याची लिंक खाली देत आहे.

  Part 1: http://shatapavali.blogspot.com/2010/06/blog-post_19.html

  Part 2: http://shatapavali.blogspot.com/2010/06/blog-post_5823.html

  जैन शाकाहारी फक्त मुंबईतच वाढत आहेत असं नाही तर अगदी आंतरराष्ट्रीय विमान सेवां मध्ये सुध्दा शाकाहाराचे वेगवेगळे प्रकार आहेत. जैन व्हेज, हिंदू व्हेज, व्हीगन. जैन व्हेज मध्ये कांदा-लसूण सुध्दा नसतो. व्हीगन व्हेज मध्ये दुधाचे पदार्थ, अंडं वर्ज्य असतात. तर हिंदू व्हेज मध्ये अंडं आणि इतर मांसाहारी पदार्थ वर्ज्य असतात. आता काही जण अंडं हे व्हेज मानतात. बंगाली लोक मासे आणि पाण्यात सापडणारे इतर जलचर यांना पाण्यातील भाज्या म्हणजेच शाकाहार समजतात. प्रत्येकाच्या शाकाहाराच्या संकल्पना वेगवेगळ्या. आहार हा आयुष्यावर प्रभाव टाकणारा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे काही लोक आजूबाजूच्या वातावरणात आपल्या आहाराशी साधर्म्य असलेलं वातावरण शोधतात. त्यात चूक काहीच वाटत नाही.

  माझा नवरा सुध्दा म्हणायचा की मी केम्ब्रीज मध्ये असताना खोलीत जरी आले तरी भारतीय मसाल्यांचा वास येत असे. तसाच इतर लोकांच्या बाबतीतही होतं.

 8. MEHARSHA says:

  mudda ekdam interesting aahe , pan tyawar marathi mansani flat ghevu naye he solution houshakat nahi ase mala watate. jar jain lokana purna shakhari imarat havi aasel tar jya prmane tyani mansahari na flat bhadyane devu naye ase prtigyapatra banavatat tyat aankhi ek mudda takava ki flat madhe banvalelya n.v cha itarana trass zalyas yogya ti karwai keli jail ha mudda takayala kay harkat aahe?
  tasech jain comprmise karat nahit mhanun itarani tadjod karat rahave ka?
  aaj mazya aajubajula khoop surek buildings aahet aagdi buildingla lagoon dusari building tayar hot aahe pan aatasudha me rahat aaslelich building mala soyichi watate.(me 3 mahinya purvich ekade shift zale.)

  • हर्षा
   जैन लोकं पण कॉम्प्रोमाइझ करतातच. जसे सध्या आम्ही करतोय. तो बिफचा वास घेत नाकाला रुमाल लाउन दिवस काढतोय. सध्या ज्या ठिकाणी ते रहातत ( कॉस्मोपॉलिटीयन सोसायटी मधे) तिकडे ते राहतातच. तो मुद्दा नाही.
   पण स्वतःचे घर घ्यायचे तर तिथे असा नॉनव्हेजचा वासाचा त्रास नसावा असे त्यांना वाटत असेल तर त्या मधे काही चुक आहे असे वाटत नाही.
   आपणही घर घेतांना बऱ्याच गोष्टी पहातो, स्टेशन जवळ आहे की नाही वगैरे, त्यांच्या दृष्टीने जर हा मुद्दा जास्त महत्वाचा असेल तर ठीक आहे!!

 9. meharsha says:

  sir;
  pahili prtkriya me tya weli je manat aale tashi lihili
  kkhare tar aamhi pure veg aahot me ajun sudha nonveg hottelat khat nahi falahar pasand karate.

  • meharsha says:

   sir,
   me shuddh shakahari asunhi mazya pahilya pratikriyetil bhavana kharyach aahet

   • हर्षा
    ते लक्षात आलं होतंच.. 🙂 पण जर चान्स मिळाला, तर तुम्ही पण शाकाहारी शेजारच पसंत कराल – आणि त्यात मला काही वावग दिसत नाही.

 10. mau says:

  mahendraji,
  majhya pratikriyecha muddaa ha ithale va baherche ha nakkich naahi..pan ji ghatana ghadali aahe ti hya shakahaar aani mansaahar yaa vadavarunch..me post takinch….pratikriya nasel patali tar kshamsv !!!!

  • उमा
   अहो त्यात काय विशेष? एका गोष्टीवर निरनिराळी मत असू शकतात. तुमच्या मताचा पण आदरच आहे.
   मला मांसाहार आवडतो. ब्राह्मण असुनही- पण घरी कोणालाच चालत नाही, म्हणून घरी काहीच आणत नाही. स्वतःच्या खाण्याच्या सवयी मी कधीच लपवून ठेवलेल्या नाहीत. असो.

 11. लेख एकदम छान जमलाय ! पण मला या लोकांच्या असल्या वागण्याला विरोध आहे. सर्व मान्य आहे कि आपण जे घर घेतो ते बहुतेक बाबतीत (सर्वच नव्हे) सोयीस्कर हव. पण यांचा मराठी माणसांना घर विकण्याला विरोध का आहे. सर्वच मराठी माणसे मांसाहारी नाहीत. आपल्यातले ब्राह्मण घरात मांसाहार करित नाहीत (बाहेर खात असल्यास मला माहित नाही). असल्या यांच्या वागण्यामुळेच राजकीय पक्षांना आयते कोलित मिळते. माझे बरेच जैन मित्र हॉटेलात जावून मांसाहारावर चांगला ताव मारतात. माझा एक बॉस जैन होता म्हणायचा मी कांदा लसून खात नाही, पण कँटीन मध्ये गेल्यावर कधी मिसळ चांगली वाटली तर झाकून मस्त पैकी कांदा घालून याच्या कॅबिन मध्ये जायची !!! त्या वेळेत इतरांना प्रवेश वर्ज्य असायचा !!! असल्या लोकांना विरोध करायलाच हवा. महाराष्ट्रात राहून मराठी माणसांना घर न घेवू देण आपणच खपवून घ्यायला नको.

  • दिनेश
   मला पण हेच म्हणायचंय की हे राजकीय लोकांनी मधे पडण्याची गोष्ट नाही. सगळेच जैन कट्टर नसतात. बरेच लोकं कांदा वगैरे खातात. पण नॉन व्हेज खाणारा मी फक्त दोन जैन मित्र पाहिले आहेत. असो. प्रतिक्रियेसाठी आभार.

 12. महेश says:

  खाण्याची पिण्याची आवड निवड प्रत्येकाची वेगळी असू शकते ,त्यात राजकारण नाही, गैर तर अजिबात नाही,

 13. Pingback: जैन आणि हिंदू | indiarrs.net Featured blogs from INDIA.

 14. Shubham says:

  society आपल्या खाण्या पिण्यामध्ये कसं काय लक्ष घालू शकते? मला तर अजिबात पटणार नाही.
  लेख आवडला 🙂

 15. Pushpraj says:

  वेगळ्या दृष्टीकोनातून विचार मांडले आहेत…आवडला लेख …..
  पण तरीसुद्धा माझ्या मते मुंबईसारख्या ठिकाणी असा अट्टहास धरन चुकीच आहे मग तो मुसुलमान असो वा जैन असो प्रत्येकाने थोडीफार तरी तडजोड करायलाच हवी…..माझ्या office मध्ये आम्ही ३ जन काम करतो त्यापैकी २ जन मुसुलमान आहेत…त्यांचा जेव्हा रोजा चालू आसतो तेव्हा मी सरळ Canteen मध्ये जावून जेवतो कारण जेवणाच्या वासाचा त्यांना त्रास होतो पण ह्याचा अर्थ असा नक्कीच नाही कि office मध्ये फक्त मुसुलमान व्यक्तीलाच घ्यावे…..

  • पुष्पराज
   इथे विकणारे तयार आहेत, घेणारे पण तयार आहेत- म्हणजे मिया बिबी राजी तो क्या करेगा काझी सारखी स्थिती आहे.

 16. archana says:

  as per law “any citizen of india is allowed to buy property anywhere in India, kashmir is exception” please do not support “Illegal” things under rapper of “sahishnuta”. it is nothing but financial bullying by that commuity, as they are the major stake holders in real estate.

  • अर्चना
   अहो, विकत कोणीही घेऊ शकतो, पण विकणारा तयार असायला हवा नां? इथे तोच तर मुख्य प्रश्न आहे. विकणाराच तयार नसतो मांसाहारी लोकांना.

   • archana says:

    हो पण ही बेकायदेशीर दडपशाही आहे. उद्या म्हणतील आम्हाला तुमच्या कुरडया-पापड्या तळणीचा वास आवडत नाहीत,परवा म्हणतील वरणाची फोडणी आवदत नाही.योग्य वेलीच ही दडपशाही मोडुन काढली पाहिजे.पैसेवाले आहेत ,जमीनमालक आहेत, म्हणुन काहीही सहन करायचे का आम्ही?

    • अर्चना
     म्हणजे नेमकं काय करायचं?
     जर एखाद्याला माशांचा वास आवडत नसेल, आणि त्याने असा शेजार पाहिला की जिथे मासे कोणी खात नाही, तर त्या मधे त्याला दोष कसा देता येईल? ही साधी मानवी प्रवृत्ती आहे.

     वरणाचा वास, किंवा इतर वास न आवडणं शक्य नाही. कारण व्हेज लोकं ते सगळं खातातच. जर तुमचा शेजारी दररोज बिफ आणि ते पण खोबरेल तेलात तळून बनवेल तर तुम्हाला तरी तो वास सहन होईल कां? ( कदाचित तुम्ही तो वास घेतलेला नसल्याने हो म्हणाल, पण माझ्या सारखा पट्टीचा खाणारा पण तो वास सहन करू शकत नाही , इतका वाईट वास असतो तो)

     दुसरी गोष्ट म्हणजे या वर काहीही केले जाउ शकत नाही. विकणारा फक्त शाकाहारी लोकांनाच विकायला तयार असेल तर इतर लोकं काय करु शकतात?

     फक्त राजकीय नेते मात्र याचं भांडवल करुन भाषणामधे याचा वापर जरूर करू शकतात- लोकांच्या भावनांशी खेळायला.

     • archana says:

      तर इतर लोकं काय करु शकतात?
      >> THIS IS THE POINT WHICH IS PINCHING ME BADLY, THERE ARE GOONS ON ROAD GENARALLY COMMOMN MAN CAN NOT DO ANYTHING AGAINST THEM BECAUSE THEY ARE POWERFUL PEOPLE,BUT STILL WE CAN NOT SUPPORT THAT .ACCORDING DO TO ME IT IS FINACIAL ,SOPHISTICATED GOONDANDAGIREE.JUST SOME ONE EATS NONVEG AND YOU DO NOT LIKE IT , U(NOT PERSONALLY YOU) ARE NOT ENTITLED (AT LEAST I DONT KNOW ANY SUCH LEGAL PROVISION IN MUNICIPALTY ACT)TO DENY THEM BASIC ,FUNDAMENTAL RIGHT OF BUYING A PROPERTY.

      • ngadre says:

       एक म्हणजे इथे महेंद्रजींचा मुद्दा जास्त रॅशनल वाटतोय. उगीच भांडून कायद्यात कशाला शिरायचे ?
       कोणीच कायद्याने असे करू शकत नाही. आणि अजूनही तुम्ही कोर्टात जाऊन अशा शाकाहारी सोसायटीत जागा विकत घेऊ शकता. पण तुम्ही घ्याल का आणि रहाल का इतक्या वेगळ्या विचारांच्या लोकांसोबत?

       सगळ्या गोष्टी कायद्यानेच सुटत नाहीत. मी अट्टल मांसाहारी आहे. तथाकथित ब्राम्हण असून. आणि माशांचा किंवा इतर वास फार येतात आणि मला ते आवडत असले तरी कोणालातरी ते आवडू शकत नाहीत हे समजण्याएवढी जाणीव माझ्याकडे आहे. सर्वांकडे असावी असे वाटते.

       मराठी माणूस म्हणजे इतर समाजापेक्षा जास्त मांसाहारी असा काही नाही.

       दुसरं म्हणजे याला जागा विकतो आणि त्याला नाही वगैरे हे ओपन मार्केट मध्ये रूल म्हणून फार काळ चालूच शकत नाही. ते अपवाद म्हणून काही उच्चभ्रू सोसायट्यातच राहणार. शेवटी बाजाराचे आणि धंद्याचे नियम जास्त ताकदवान असतात. आणि ते असल्या शाकाहारी मांसाहारी प्रश्नापेक्षा खूप प्रभावी असतात.

 17. rajeev says:

  मी अनेकदा विचार केला की, जैन लोक आर्मी मधे का नाहीत ?
  जैन धर्म भारता बाहेर का पसरला नाही ?
  दिगम्बर जैन साधू थंड प्रदेशात जाऊन धर्म प्रचार का करत नाहीत (?????)
  मानवाला राहण्यास प्रतिकूल परीस्थिती आहे अश्या ठिकाणी हा धर्म का वाढला नाही ?
  वर्षातील एक दिवस ( पर्युषण काला नंतर ) सर्वांची माफी मागितली कि सर्व पापे धुतली जातात का ?
  दुसर्याच्या मनाला दुख पोहचवणे हे देखील हिंसाच न ?
  मग हे लोक पैश्याच्या व्यावाहाराला ईतके कठोर कसे ?
  हे लोक ईराक, ईराण, पाकीस्थान मोगादिशु,सोमालिया ह्या ठिकाणी शांती प्रचाराला का जात नाहीत?
  जिथे व्यापारी संपन्नताआणी दूस्त्यानी दिलेली सामाजिक सुरक्षा असते तिथेच ही जमात जास्त का सापडते ?
  (कोणाची मने ह्या प्रश्न मुले दुखावली गेले असतील तर त्या सर्वांची माफी मागतो )

  • Arun Joshi says:

   All these questions are valid for Hindus and all religions also.
   Do you have statistics of Jain people in army? They are as many as there generally would be. Please read the Jain matrimonials and you will how many of them are from defense.
   Hinduism has not spread outside India in 4000 yrs, how can you expect Jainism? Spreading religion is philosophy of neither.
   I did not understand this cold region criteria, but it has ample presence in Himalayas.
   Rajasthan ani western Gujarat, where Jainism is maximum by percentage, is the worst place to survive in India.
   Paap and paapprakshalan he donhi bhavnik ahe. But at any point of time, it is always more civilized to feel guilty and to entrity pardon. Every religion gives one an inspiration to reform through some of such customs.
   Konachyahi manala waait watane he changle nahi. Pan, ata hinsechi vyakhya pan tumhich tharvanar ka?
   Kathor is the opposite party’s angle. They are just as per the contract.
   How many times Pope, Shankaracharya, etc had gone these countries?
   Jithe hi jamat asate tithe subatta jast asate. Tumcha pahanyacha angle vikrut ahe.

  • राजीव
   अरे विषय आहे शाकाहारी व्हर्सेस मांसाहारी. जैन- हिंदू विषय नाही !

 18. काका, लेख एकदम आवडला. विचार करायला भाग झालो. पण तरीही तरीही हा एक प्रकारचा भेदभावच झाला. रिझर्व्हेशन झालं. त्यामुळे वैयक्तिकरित्या मला पटला नाही.

  • हेरंब
   प्रत्येकाला आपल्या आवडीच्या एन्व्हॉयरमेंट मधे रहाण्याची मोकळीक आहेच. मी स्वतः पण केरळी ख्रिश्चन परिवाराच्या शेजारी रहाणे टाळेनच.

 19. bhaanasa says:

  मी पक्की शाकाहारी आहे परंतु माझ्या दोन्ही बाजूचे शेजारी रोज मासे हवेच असे. काही नाही तरी सुकट तरी हवेच. 🙂 वर्षोनवर्षे पहाटे पहाटे याच वासाने जाग येतेयं. सवयीचे झालेयं खरे तरीही कधीकधी मनात येतेच जरा या दोघांच्या किचनची जागा बदलता आली तर…
  लेखातला शेवटचा मुद्दा पटला. सगळ्याचेच राजकारण करायचे आणि मते खेचायची. पण जनता इतकी खुळी राहीलेली नाही, नेमके हेच ते विसरून जातात.

  • शाकाहारी लोकांना माशांचा वास तर नकोसा होतो . राजकारण होऊ नये एवढंच माझं मत होतं.

 20. Smit Gade says:

  Apalyshi 100% sahamat

 21. Aparna says:

  hmm….almost sagalach uhapoh jhala aahe…But I would still agree with Heramb and if you have that kind of money or not is second question, nobody realised that Marathis suffered a lot because of this…..Parel and griangaon that was mainly a marathi locality would slowly loose that identity with all these new towers coming in there….and this area is next to where the so called big marathi supporters are..I remembered reading it in one of Alchemist column in Lokprabha ki kahi lokanchya ghari khoke gele tyani hyaala wirodh karu naye mhanun….asso…ha majhya jaast jivala lagalela topic aahe mhanun lihite….

  • मराठी माणसांचे स्थलांतर हा तर एक महत्वाचा मुद्दा आहेच. परळ , गिरगावातले सगळे लोकं डॊबीवली, बोरीवलीला शिफ्ट झाले आहेत. इव्हन माटूंग्याचे मद्रासी पण गेले आहेत बाहेर. सगळीकडे गुजराथी लोकं आले आहेत रहायला.मला वाटतं या परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत. 🙂

 22. Prathamesh says:

  khupach chhan lihilay tumhi. mudde patlet.

 23. i am a vegetarian person by birth, karma and choice. and i am not jain.

  i wont like to be in proximity of non veggies dosent matter who they are – marathi, non marathi, hindu, non hindu etc.

  its a personal choice. even non veggies can say the same of me 😉

 24. Nilesh says:

  Well,
  I just found your this article while reading other ones…
  I am Jain, and I wan to clarify that I am Jain and Marathi too…
  I have seen the misconception that, Jain are not MARATHI people…
  Well, I want to clarify the religions related to Jain.
  first there are three main religions related to Jain
  1. Marwari
  2. Gujrati
  3. Jain

  we often consider all three religions are same, but its not the fact…
  Jain’s (Who have god Mahaveer) lives across india. including North and south and middle.
  If we see the both people together, you will not believe that they are Jains, they have adapted there lifestyle from where they live.
  for example me, I not even know since how many generation we live in Kolhapur(Maharashtra).
  we talk in marathi(Kolhapuri Marathi), think in Marathi and behave also in Marathi… 🙂

  If you talk about Marawari people who has origins in merwad(Rajshtan) , Yes they are Non Marathi, beacuse they never talk in Marathi same for Gujrati.

  Well, I will request you to write some article related to “Marathi Manus”
  to define what exactly do you mean by “Marathi Manus”
  because Bramhin are also vegetarian still you called them as marathi but why are you not consider us as Marathi ?

  • जैन मराठी असतात .. माझा जवळचा मित्र राज जैन मराठी आहे. मी मराठी डॉट नेट ही साईट चालवतो. मुंबईचे बहूतेक जैन लोकं गुजराथी असल्याने इथे तसा गैरसमज आहे हे नक्की!! प्रतिक्रियेकरता मनःपूर्वक आभार.

 25. shashank says:

  माझ्या मते हे सर्व जात धर्म जे आहेत ते सर्व आपल्या सोई प्रमाणे हे तयार केलेल आहे.त्यामुळे जैन हिदू याच्या मध्ये काही नाही असे मला वाटते.शेवटी या सर्व प्रकारच्या मनुष्य प्राण्यावर नियत्रण ठेवण्यासाठी तो आहेच…

  • शशांक
   ब्लॉग वर स्वागत . जात धर्म हे पूर्वापार चालत आले आहेत, त्याचा उपयोग लोकं आपल्या सोई प्रमाणे करतात. वेगवेगळ्या जातींचं राजकारण हल्ली डोक्यात जातं माझ्या. प्रतिक्रियेसाठी आभार.

 26. sandeep says:

  Maharashtrat Marathi lok pan Jain aaher hech bahutek lokana maahit naahi.
  Sangli Kolhapur Jalgaon ya jilhyanmadhe bharpur Jain Samaj aahe..
  He faqt ya saathich sangtoy ki Jain mhanaje Non-Maharashtrian ha gair samaj dur whawa.

  Dhanywad

  • ्संदीप
   होय, आमच्या बिल्डींग मधे पण काही जैन लोकं रहातात. आडनावं सुद्धा एकदम मराठी आहेत.. 🙂 प्रतिक्रियेसाठी आभार.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s