हापूस

ऑफिशिअल वेब साईट.. इथे क्लिक करा साईट पहायला.

आजच्या सकाळमधे दुसऱ्या पानावर एक बातमी वाचली. हापुस नावाचा एक चित्रपट जो संजय छाबरीया ( शिवाजीराजे भोसले बोलतोय फेम) आणि अभिजीत साटम यांनी एव्हरेस्ट एंटरटेनमेंट तर्फे निर्मित केलेला हा चित्रपट २५ तारखेला प्रदर्शित केला जाणार आहे. प्रसिद्धीची चांगली जाण असलेला निर्माता म्हणून संजय छाबरीयाचे नाव घेतले जाउ शकेल. ’शिक्षणाच्या आयचा घो’ असो कींवा ’मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ हा चित्रपट असो, प्रसिद्धी तंत्र यशस्वीपणे राबवून चित्रपटाला हिट करायचे हे त्यांना चांगलेच साधले आहे- असे वाटत असतांनाच या हापूस चित्रपटाच्या प्रसिद्धी बद्दलची त्यांची  उदासिनता खटकली.

आजची सकाळ मधली बातमी वाचे पर्यंत हा असा चित्रपट तयार झालाय हे मुळातच माहिती नव्हतं मला.  बातमी वाचल्यावर, इंटरनेट वर मराठी मधे ’हापुस’, ’हापूस चित्रपट’ गुगल केलं तर कुठेही काहीच सापडलं नाही या सिनेमा बद्दल . मराठी चित्रपट बनवतात, आणि मराठी मधे नांव लिहिल्यावर त्याबद्दल काहीच सापडत नाही  ही  खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे.

जेंव्हा इंग्रजी मधे ’हापुस मुव्ही’ टाइप केल्यावर  मात्र दोन तीन साईट्स सापडल्या. त्या पैकी एकावर ’हापूस’चे विझेट दिसले. त्यावर क्लिक केले आणि युरेका……… चक्क या चित्रपटाची ऑफिशिअल साईट सापडली.    साईट अतिशय चांगली बनवलेली आहे. २५ तारखेला चित्रपट गृहात लागणार आहे हा चित्रपट.  त्याच साईटवर ६० टक्के कथा दिलेली आहे ( पुर्ण डीटेल्स सहीत) आणि सिनेमाचा शेवट काय आहे हे पण सांगून टाकलेले आहे. इतका  वेडे पणा मी आजपर्यंत पाहिला नव्हता.  सगळी माहिती,कथा सांगून टाकल्यावर सिनेमा पहायला कोण जाईल सिनेमा गृहात?”

सिनेमाची ही वेब साईट गुगल सर्च मधे मराठी मधे  ’हापूस’ टाइप केल्यावर दिसत का नाही? मराठी चित्रपटाचे नांव  मराठीत टाइप केल्यावर सापडू नये याचे वाईट वाटले. मराठी चित्रपट काढतात, आणि ….. असो..

हे सगळं लिहिण्याचा उद्देश हाच की मराठी चित्रपट निर्माते स्वतःच्या चित्रपटाच्या इंटरनेट वरच्या  प्रसिद्धी बाबत खूपच सहजपणे ( खरं तर निष्काळजी पणे) घेतात.   बराचसा प्रेक्षक वर्ग आजकाल “नेट सॅव्ही” झाला आहे, त्या मुळे इंटरनेट वरची प्रसिद्धी ही अपरिहार्य ठरते.  बरेचसे लोकं तर चित्रपट पहायचा की नाही हे तर नेट वर वाचूनच ठरवतात.   या ’ हापूस’  बद्दल   नेट वर फारच उदासिनता दिसली. फक्त एका सिनेमाला वाहिलेल्या ब्लॉग वर  एक लेख सापडला. बस्स ! तेवढंच!!

हल्ली अगदी विनामुल्य ब्लॉग निर्मिती केली जाउ शकते. किंवा फारतर हजार रुपये भरुन डॉट कॉम साईट तयार केली जाउ शकते. अशी साईट तयार केल्याने निर्मिती पासून  चित्रपटाच्या बद्दलची नियमित माहिती अपडेट केल्यास , आणि लहान सहा्न गमतीशीर प्रसंग अपडेट करत राहिले तर  जवळपास वर्ष दीड वर्ष सातत्याने  चित्रपटाची जाहिरात होऊ शकते. चित्रपटाबद्दल उत्सुकता  टिकुन राहिली की मग चित्रपट जेंव्हा सिनेमागृहात लागतो तेंव्हा बरेच लोक उत्सुक ते पोटी पहायला येतात.

चित्रपटाचा ब्लॉग मब्लॉवी वर जोडला की झाले. एक ब्लॉग तयार केला, आणि त्या ब्लॉग वर चित्रपटात काम करणारे किंवा त्या चित्रपटाशी जोडलेले लोक नेहेमी येउन आपल्या आठवणी टाकत राहिले तर नक्कीच लोकं आवडीने वाचतील, आणि   वर्ष दिड वर्ष चित्रपटाची आपोआप प्रसिद्धी पण हो्त राहील.

उपक्रम, माबो, मिपा, मीम सारख्या संकेत स्थळांवर पण या विषयीचा मजकुराचे नेहेमी फिड केल्यास लोकांच्या नजरेत हे नाव राहील. सिनेमाची गाणी रिंग टॊन म्हणून फ्री डाउनलोडला उपलब्ध करुन दिलीत तरीही बरेच लोकं ती डाउनलोड करुन सिनेमाची विनामुल्य जाहिरात करु शकतात. सिनेमाच्या गाण्याच्या सिडी विकुन पैसे कमवायचे दिवस आता संपले आहेत असे वाटते. त्या ऐवजी जर  गाणी विनामुल्य डाउनलोड करु दिलीत तर सिनेमाची आपसूकच जाहिरात होण्यास मदत होईल. एकदा गाणी हीट झाली की चित्रपट पण गाण्यांसाठी चालतोच.

सिनेमाची कथा खूप सशक्त आहे, ( हे मी जे काही वाचलंय त्यावरून म्हणतोय)  काम करणारी मंडळी पण अतिशय नावाजलेली आहेत. मकरंद अनसापुरे आणि शिवाजी साटम हे दोघं महारथी एकाच सिनेमात आहेत, संगीत सलिल कुळकर्णी यांचे आहे. सगळीच गाणी    स्पेशली ते आंबा पिकतो … वगैरे त्याच साईटवर ऐकता येतील.     मधुरा वेलणकर डबल  रोल मधे आहे  ( जमेची बाजू?).

ज्या संकेत स्थळावर  ’हापूस’  (ऑफिशिअल साईट) सिनेमाची कथा दिलेली आहे त्याच ठिकाणी   एक प्रतियोगीता  पण आहे हापूस सिनेमावर. काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, आणि जर ती सगळी बरोबर असतील तर तुम्हाला गाण्यांची सिडी मिळू शकते बक्षिस म्हणून.

एक शेवटचा प्रश्न, मराठी चित्रपटाच्या मराठी लिपी मधल्या नावाने सर्च केल्यावर जर त्या बद्दल काहीच माहिती मिळत नसेल-तुम्ही एक फार सुंदर साईट बनवता, पण ती नेट वर सापडतच नसेल तर त्या साईटचा काय फायदा?? त्या पेक्षा साधा ब्लॉग बनवून मब्लॉवी वर जोडला असता तरीही जास्त प्रसिद्धी मिळाली असती. असो.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन and tagged , , , , , , , . Bookmark the permalink.

33 Responses to हापूस

 1. ngadre says:

  pahate pahate uthoon taaji taaji post? Wah.
  Ho yaach shabdaat malahee he janavale. Mee jevha ad paper madhe pahili tevha achanak janavale ki mee itar kuthech yachi prasiddhi pahili navhati. B grade kinva telefilm asavi tase ugeech vatale.

 2. mau says:

  he ek bare kelet..amchyaa sarkhya baher rahanarya lokan karata mahiti milali…thnx once again….[:)]

 3. “मी शिवाजीराजे भोसले बोलतोय” आणि “शिक्षणाच्या आयचा घो” यांच्यानंतर हा सिनेमा चांगलाच असावा अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

  जाहिरातीबद्दलः “हापुस” वाल्यांची जाहिरात “इरोस” वाले करताहेत.. काही साईट्सवर त्यांचे “प्रमोशन”ही सुरु आहे. विजेत्यांना सिनेमाच्या सी.डी. दिल्या जाणार आहेत. उदा. मराठी-माती. http://www.marathimati.com/karamnuk/Marathi-Films-Movies/haapus.asp

  सद्ध्या तरी या जाहिरातीही गुगलद्वारे दिल्या जाताहेत. बहुतांशी मराठी साईट्स किंवा ब्लॉगवर याचे बॅनर/ जाहिरात बघायला मिळेल. तसे गुगलद्वारे मराठी शब्द वापरुन जाहिरात दिसणंही सोपं नाही. मला वाटतं जाहिरात वाल्यांनी दिलेले शब्दही [गुगलद्वारे जाहिरात देताना – संबधित शब्द द्यावे लागतात. त्यानुसार त्या त्या साईटवर तशी जाहिरात दिसते.] इंग्रजीमध्येच दिले असावेत – अंदाज. हां, मात्र आपण म्हटल्याप्रमाणे “मब्लॉवि” वरुनही त्यांना चांगलीच जाहिरात करता आली असती!

  • दिपक
   इरोस म्हणजे बहुतेक जाहिरात एजन्सी असावी. पण काहीतरी चुकतंय हे नक्कीच खरं. सिनेमाची कथा वाचली आणि आवडली. बहुतेक चांगला असावा सिनेमा. पण पुर्ण कथानक सिनेमा प्रसिद्ध होण्यापूर्वीच सांगून टाकल्याने काय मिळवलं वितरकांनी हे समजलं नाही.
   प्रत्येक लेखाच्या शेवटी टॅग मधे मराठी “हापूस” टाकले असते तरीही गुगल ला हा ब्ल~ऒग सापडला असता.

 4. Pushpraj says:

  मी सुद्धा शनिवारीच ह्या चित्रपटाची site बघितली होती…कथा वगैरे वाचल्यावर office मधल्या मंडळीना तयार केल आहे चित्रपट बघायला….
  त्याच्याआधी हा चित्रपट येतोय हे मला सुद्धा माहित नव्हत cooltoad वर पंडित भीमसेन जोशींची गाणी शोधात असताना दोन्ही बाजूला हापूस ची जाहिरात बघितली आणि लगेच site visit केली…आश्चर्य ह्याच गोष्टीच वाटल कि एवढी सुंदर site बनवून सुद्धा मराठी प्रेक्षक वर्गाकडे पोहोचण्यास वेळ लागला………तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे काका ब्लॉग सारखे पर्याय उपलब्ध असताना त्याचा पुरेपूर वापर मराठी निर्मात्यांनी करायला हवा…

  • इंटरनेटची शक्ती अजून ओळखलेली नाही त्यांनी.. फेस बुक, ऑर्कुट वर कम्युनिटी, तयार केली तरीही बरंच काम होऊ शकतं.

 5. मी बरेच दिवसापासून फेसबुक वर ह्याची जाहिरात पाहतोय. मराठी शब्द टांईप करून link मिळत नाही कारण कदाचित त्याना वाटत असेल की किती लोक मराठीत सर्च करत असतील. अर्थात, असा त्यांचा अंदाज असेल तर तो आता चूक आहे. काल स्टार माझा वर पण शिवाजी साटम ह्यांची मुलाखत घेऊन त्याद्वारे प्रसिद्धी चालू होती.

  • निरंजन
   मराठी चित्रपटाचे नांव मराठीत टाइप केल्यावर पण त्या बद्दल सापडत नाही, याचा अर्थ त्यांनी टॅग मधे मराठी नांव टाकलेले नाही. साधी चूक आहे- सहज दुरुस्त करता येण्यासारखी.

 6. pradnya says:

  मध्यंतरी एका मराठी reality show मध्ये मधुरा वेलणकर व पुष्कर श्रोत्री आले होते… तेव्हा समजले होते की ‘हापूस’ पिकून release साठी तयार आहे… आता ‘हापूस’ ची website पण पहावी म्हणते…. मराठी लोकं online publicity मध्ये कमी पडतात हे मात्र खरय्‌…..

  • माझा आणि दूरदर्शनचा ३६ चा आकडा. मी सिनेमे मात्र खूप पहातो (इंग्रजी). मराठी अगदी खूप नावाजलेले असले तर. कालच एका मित्राने मुंबई ते पुणे असा काहीतरी सिनेमा पाहिला, तो पण छान आहे म्हणतोय. तो पाहीन बहुतेक लवकरच.

 7. रोहन says:

  आयला… माहितच नव्हते बघ… आत्ता कळतय…. आलो की बघतो आता… सोबत थोड़े अजून खायला मिळाले तरी चालतील … 🙂

 8. मला खूप दिवसापासून माहीत आहे ह्याच्या बदद्ल..यांच्या कम्यूनिटीचा मी मेंबर पण आहे गेले दोन महिने..बघुया हापूस कसा आहे चवीला २५ जूनला… 🙂

  • सुहास
   मला आजच समजलं, आणि जेंव्हा साईट शोधली तेंव्हा आधी का नाही समजले असे वाटले, म्हणुन हा लेख लिहिलाय.

 9. Pingback: हापूस | indiarrs.net Featured blogs from INDIA.

 10. मला माहितच नव्हते हया हापुसबद्दल…चवीला चांगला असेल अशी आशा ठेवुया..बाकी मराठी चित्रपट वितरकांना चांगली ’ आयडिया ’ दिलीत…

 11. Manmaujee says:

  गाणी मस्त आहेत….या चित्रपटाविषयी सकाळ मध्ये लेख आला होता!!

  • तो सकाळमधला लेख पाहूनच मला समजलं या चित्रपटाबद्दल. गाणी चांगली वाटली मला पण.

 12. bharati says:

  Marathi pasun…te Haapus paryant vaachale.Vaa!! chaan vishay nivadle aahet…Ya Post madhla Shevatcha mudda lihila aahe toch khara !!

 13. bhaanasa says:

  दोन तीनदा हापूसचा उल्लेख ऐकला होता पण फारसे काही पुन्हा पुन्हा नजरेस न पडल्याने उत्सुकता वाढलीच नाही. शिवाय तू म्हणतोस तसे मराठीत टायपून काही समोर पण येतच नाही. 😦 आता तुझ्यामुळे पुन्हा धुंडाळते. बाकी सिनेमा लगेच पाहायला मिळणे मुश्किलच आहे.

  • मला पण माहिती नव्हतंच. ते सकाळमधे आलं म्हणून समजलं. नाहितर सिनेमा येऊन लागुनही गेला असता आणि समजलंही नसतं.

 14. मराठी चित्रपट निर्माते आपल्या चित्रपटांच्या हक्कांच्या बाबतीतही किती ढिसाळपणा दाखवतात, याचं उदाहरण मला अलिकडेच मिळालं. काही महिन्यांपूर्वी मी ’नटरंग’ चित्रपटातील ’अप्सरा आली’ या गाण्याची झी अवॉर्ड सोहळ्यात झालेल्या सादरीकरणाची चित्रफित यूट्यूबवर लावली होती. त्यानंतर मला यूट्यूबवरच त्याच गाण्याची मूळ प्रत मिळाली. मला ती आवडली म्हणून मी कसलाही विचार न करता माझ्याही यूट्यूब चॅनलमधे ती डकवून दिली. या गोष्टीला किमान तीन महीने तरी झाले असतील. सदर चित्रफित संदर्भातील कॉपीराईटची नोटीस मला गेल्या आठवड्यात मिळाली. (म्हणजे मागं सांगितलं होतं तेच – व्हिडीओ काढा नाहीतर तुमचं चॅनल बंद करू.) मी अर्थातच व्हिडीओ काढला. पण हाच व्हिडीओ जर एखाद्या आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा असता, तर मला चोवीस तासाच्या आत ही नोटीस मिळाली असती. हाच फरक आहे. मराठी चित्रपटांना आत्ता कुठे चांगले दिवस येऊ लागले आहेत, तेव्हा चित्रपट निर्माते, दिग्दर्शकच नव्हेत तर त्या चित्रपटाशी संबंधित प्रत्येक जबाबदार व्यक्तीने जागरूकता दाखवली पाहिजे. तुमच्या लेखामधे हापूस चित्रपटाच्या गुगल सर्च बद्दल लिहिलं आहे. त्याबद्दल मी इतकंच म्हणेन की प्रसिद्धी करायला चित्रपट निर्माते कमी पडले असावेत. नाहीतर (स्वत:चं उदाहरण मुद्दाम देतेय कारण ते जास्त प्रभावी वाटलं) मोगरा फुलला असं मराठीत टाईप केलं तर माझ्या ब्लॉगचं नाव सर्वात वर येतं, तर हापूस असं टाईप केल्यावर तो मराठी चित्रपट पहिल्या दहा सर्चमधेतरी दिसायला हवाच होता.

  • कॉपी राइटची नोटीस मिळाली? आश्चर्यच आहे. मला वाटलं आपल्याकडे लोकं चक्क झोपलेले आहेत की काय. तिन महिन्यानंतर का होईना जाग आली हेच खूप झालं. मराठी सिनेमा तर कधी येतो आणि कधी जातो हे समजत पण नाही. शिवाजी राजे पण चालला, कारण त्या काळात हिंदी सिनेमा आणि मल्टीप्लेक्स मधे युध्द सुरु होतं. ( अर्थात हे माझे मत आहे) जर हा तिढा नसता, तर सिनेमा कधीच मल्टीप्लेक्स मधून काढला गेला असता.
   निर्मात्यापेक्षा त्यांची जाहिरात एजन्सी ही पुरेशी अ‍ॅक्टिव्ह नसली की असे होते. त्यांना पहिले आपला मुख्य प्रेक्षक वर्ग कोण हेच जर समजलं नसेल तर जाहिरात कशी होणार व्यवस्थित?

   • कॉपीराईटची सर्वसाधारण नोटीस जी यूट्यूबकडून येते – तुम्ही दुस-याच्या मालकीचा व्हिडीओ स्वत:च्या चॅनलवर टाकला आहे. तो काढला नाहीत तर तुमचं चॅनल बंद करण्यात येईल अशी ती नोटीस होती. आंतरराष्ट्रीय चित्रपटाची नोटीस येते तेव्हा पुढीलप्रमाणे आश्य असतो – “तुम्ही जो व्हिडीओ स्वत:च्या चॅनलवर टाकला आहे, तो दुस-याच्या मालकीचा आहे. सध्या त्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाहीये पण जर व्हीडीओ मालकाची हरकत असली तर तुम्हाला हा व्हिडीओ चॅनलवरून काढून टाकावा लागेल.” जर या व्हिडीओमधे मी काही बदल केला (मागे मी इटालीयन जॉबमधील एका दृश्याचे मराठी सबटायटल्स बनवले होते) तेव्हा यूट्यूबवाले स्वत:च व्हिडीओ डिलीट करतात आणि आधी सांगितली तशी कॉपीराईटची नोटीस पाठवतात. मला ही नोटीस दुस-यांदा आली म्हणजे लाल दिवा! आता मी दुस-याचे व्हिडीओ अपलोड करणंच सोडून दिलंय. उगाच कशाला नसत्या भानगडीत पडा.

    • इटालियन जॉब चा पाहिला होता मी. त्याला पण नोटीस आली होती? असं असेल तर न केलेलंच बरं .

 15. mahesh mohan shinde says:

  ho mi kalach visit keli tya site var design atishay surekh pan tyatale songs download karayacha suvidhemule atishay heva vatla …………….. manje alikadalya ”Rock On” ya hindi cinema chya shevti spasta internet varun songs download karu nayet ase lihile hote pan he tyacha agadi ulte………… hatsss offffff to marathi producers n directors cd dvd vikun paise kamavanyache divas gele he tyanich aapalyala sangitale aahe yavarun…………

  • महेश
   साईट सुंदरच आहे. पण गाणी डाउनलोड करता येत नाहित. फक्त ऑन लाइन ऐकता येतात.

 16. मला तर या चित्रपटाबद्दल माहितच नव्हतं. पण एकूण सगळं वाचून चांगला वाटतोय. आणि मराठीत ‘हापूस’ मराठीत टाईप करून शोधता यायलाच हवं हा मुद्दा पूर्ण पटला. एक म्हणजे या लोकांना इंटरनेट या माध्यमाची शक्ती माहित नाही आणि दुसरं म्हणजे इंटरनेटवर मराठी किती उदंड आहे त्याचीही कल्पना नाही. त्यामुळे असं होत असावं.

  • सिनेमा चांगला असेलच असे मलाही वाटते. पण सिनेमाची पुर्ण कथा सांगून टाकण्यात काय मिळवलं हेच समजत नाही. अजूनही मराठी ब्लॉग, मराठी साईट्सची नोंद घेतली जात नाही हे यावरून समजते.

   • सिद्धार्थ
    मी पण पहिल्यांदाच पाहिलं हे; आजपर्यंत कधी लक्षंच गेलं नव्हत. अगदी नियमीत पणे छापुन येते हे

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s