मसाज जाहिराती..

जाहिराती, वेश्या, व्यवसाय, prostitution, mumbai, Sex in mumbai, Marathi,मराठी

अशा जाहिराती असतात पेपरमधे..

कुठलाही पेपर उघडा. क्लासिफाईड्स ( छोट्या जाहिराती) चे कॉलम म्हणजे एक करमणूक असते.   आज सहज एका मित्राला घर घ्यायचं म्हणून मराठी पेपरच्या क्लासिफाईड मधल्या जाहिराती पाहिल्या.तिकडे घराच्या जाहिराती पहातांनाच काही  रंगिबेरंगी  चौकटींकडे   लक्ष गेले  .

काही जाहिराती अगदी नेहेमीप्रमाणे, घर विकणे आहे,कार विकणे आहे,  किंवा ’सुंदर सुस्वभावी गोऱ्या इंजिनिअर मुलीसाठी मुलगा पाहिजे’, वगैरे प्रकारच्या होत्या – पण तेवढ्यात एका वेगळ्याच  जाहिरातीवर नजर पडली  आणि…. धक्काच बसला… इट वॉज अ शॉक ऑफ लाइफ!!

वर्तमान पत्र  घरातला प्रत्येक माणूस  वाचतोच. प्रत्येकाचं आवडीचं पान वेगळं असतं. मला पहिले पान आधी वाचायला आवडते तर मुलांना बॉंबे टाइम्स तर कोणी आधी स्पोर्ट्स चं पान उघडतो. प्रत्येकाची आवड वेगळी असतं. थोडक्यात,  वर्तमान पत्र हे घरातल्या चार वर्षाच्या नुकत्याच अ-आ इ शिकलेल्या  चिंगी पासून तर ८० वर्षांच्या अजोबांच्या वाचण्याच्या लायकीचे असावे असे माझे मत आहे.

युजवली, छोट्या जाहिरातींचे पान दुर्लक्षित केले जाते. पण जर काही काम असेल तरच त्या पानाकडे लक्षं जातं. आज  ते पान उघडलं.आणि लक्ष गेलं त्या रंगीत बॉक्स मधल्या  जाहिरातींकडे!–सुंदर कॉलेज गर्ल्स, एअर होस्टेस, हाउस वाइव्ह्ज  फुल बॉडी मसाज साठी  — होम व्हिजिट– २४ तास सर्व्हिस– आठवड्यातले ७ दिवस!! आणि फोन नंबर दिलेला होता . मसाज म्हणजे काय हे इथे जास्त लिहिण्याची गरज वाटत नाही.

फ्रेंडशिप क्लब च्या नावाने तर देह विक्रयाच्या  खूप जाहिराती दिलेल्या दिसल्या- त्या पैकी काही खूप सूचक, तर काही सरळ  सरळ  ’ काय’ उपलब्ध आहे ते सांगणाऱ्या.काही ठिकाणी इंडीकेटिव्ह नेचरच्या  जाहिराती होत्या , आडून सूचक पणे सांगणाऱ्या, पण  एके ठिकाणी तर  सुंदर मुलीशी/मुलांशी  मैत्री करा आणि शरीर सुख मिळवा- अशा स्पष्ट शब्दामधे दिलेली  जाहीरात पण  दिसली.   प्रत्येक जाहिराती खाली  एखादे मुलीचे नांव आणि  फोन नंबर दिलेला होता.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका जाहिराती मधे तर  तुम्ही   रजिस्टर करा, आणि मग  ’पैसे कमवा’ असंही म्हटलेले आढळले.  पैसे   कसे कमवायचे हे मात्र दिलेले नव्हते. याचे उत्तर – अर्थातच ’तो’ व्यवसाय करून–  पण असा संदेश बिटवीन द लाइन्स दिलेला दिसला. मला वाटतं  ’त्या’ व्यवसायाची इतक्या उघडपणे केलेली जाहिरात   थायलंड वगळता फक्त भारतातच चालत असावी.

हे असं मराठी पेपरमधे दिसलं म्हणून मुंबई मिरर पण पाहिला, तिथे पण अगदी असाच प्रकार दिसला. एरिया प्रमाणे जाहिराती दिलेल्या आहेत, वाशी , ऐरोली, मालाड, ठाणे,गोरेगाव ते अगदी दादर किंवा पेडर रोड- सगळी कडे यांचं जाळं पसरलेले आहे.

कुठल्याही भागात तुम्हाला घरपोच मुली/ मुलं पुरवठा केला जातो. एरिया प्रमाणे जाहिराती आहेत दिलेल्या, म्हणजे तुम्हाला फार दूर जायला नको, पुन्हा घरपोच सेवा… वगैरे वगैरे…..जाहिरातीमधे केवळ नावालाच मसाज लिहिलंय, पण वाचणारे मात्र  सुज्ञ  आहेत , त्यांना नक्की खरं काय आहे  ते  बरोबर कळतं .

सेक्स ऍडव्हाइस म्हणून एक कॉलम दररोज असतो मुंबई मिरर मधे त्या मधे चित्र विचित्र   प्रश्न विचारले असतात. काही प्रश्न तर खरोखरीच विचारलेले आहेत की ते पेपरवाले आपल्या मनाने ’बनवून’ टाकतात ह्याचा मला नेहेमीच संशय येतो. अर्ध्यापेक्षा जास्त वेळी तर अरे प्रश्न असतात  की  माझा संबंध कोणाशी तरी आला, आणि आता मला एड्स होईल का?  किंवा तत्सम पोस्ट असतात. शक्यतो आपण ह्या कॉलम कडे लक्ष पण देत नाही, पण पेपर चाळतांना हे पान पलटतांना या पेज वर थोडा वेळ तरी रेंगाळल्या जातंच.  अर्थात बरेचदा करमणूक म्हणून वाचला जातो हा कॉलम, पण म्हणून अशा कॉलम ची खरंच गरज आहे का?

इतक्या उघडपणे मुला, मुलींना प्रोव्होक करणाऱ्या जाहिराती देणे कायद्याने गुन्हा आहे की नाही हे मला माहिती नाही -अशा जाहिरातींमुळे निम्न/ मध्यम वर्गीय मुलं मुली त्यांच्या जाळ्यात ओढल्या जाऊ शकतात हे मात्र नक्की. तसेच जरी कायद्याने गुन्हा नसला तरी  पण शरीर स्वास्थ्य आणि समाज   स्वास्थ्याच्या द्दष्टीने  अशा जाहिराती खूप वाईट आहेत  आणि त्यावर बंदी आणायला हवी एवढं   मात्र नक्की!!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , , , , , , , . Bookmark the permalink.

74 Responses to मसाज जाहिराती..

 1. नागेश देशपांडे म्हणतो आहे:

  खरं आहे, जाहिरातीसाठी काही आचारसंहिता हवी.

  पण “मागणी तसा पुरवठा” हा प्रकार आजकाल प्रसार माध्यम करीत आहेत.
  अनेक लोक या प्रलोभनास भुलतात आणि फसवणुक करवुन घेतात.

 2. सिद्धार्थ म्हणतो आहे:

  धक्कादायक आहे हे. असलं रोजच्या वर्तमानपत्रामध्ये छापून येतं हे मला खरच वाटत नाहीये.

 3. देवेंद्र चुरी म्हणतो आहे:

  इथ लक्षच गेल नव्हत कधी…धन्य धन्य…

 4. Sanjeev म्हणतो आहे:

  माझे मत बहुधा मध्यमवर्गीय मराठी लोकांना पटणार नाही, पण तरी सांगू इच्छितो. पूर्वी नाटकाचं नाव काढलं की लोक शिव्या घालत (धर्म बुडाला इ). जेव्हा सिनेमा सुरू झाला, तेव्हासुद्धा लोकांनी हेच म्हटलं. मग शिरोडकरबाईंनी बिकिनी घातली तेव्हा तर लोकांची खात्रीच पटली की कलियुग आलंय आणि प्रलय येणारे! मग टीव्ही आला. (पुढची पिढी फ़ुकट जाणार वगैरे). मग केबल आली (सांता बार्बरा आठवते?). मग करिश्मा कपूरची गाणी आली. मग राखी आणि मल्लिका आल्या.

  मी अजूनही प्रलयाची वाट बघतोय! (शिंची पाणीटंचाई तरी संपेल).

  या मसाज पार्लर आणि डान्स बारनी का sssssss ही होत नाही. समाज आपण समजतो त्याहून जास्त शहाणा असतो.

  By the way य़ा जाहिराती बोगस नसतात. वाटल्यास फ़ोन करून पहा ! 🙂

  • महेंद्र म्हणतो आहे:

   संजय
   हा धंदा जगातला फार जुना धंदा आहे हे तर मान्य आहे. पण पुर्वी एका ठरावीक भागात हा धंदा केला जायचा. पण आज जर तुमच्या दाराशी येऊन पोहोचला आहे हे बघुन आश्चर्य वाटले. एखाद्या गोष्टी साठी इन्स्टीगेट केल्या गेलं की मुलं काहीही करू शकतात. तुम्ही मॅच्युअर्ड असाल तर फरक पडत नाही, पण एखाद्या १६-१७ वर्षाच्या मुलीने उत्सुकते पोटी फोन केला तर , उगिच यात ओढल्या जाइल याची भिती वाटते.
   हा धंदा आहेच, फक्त जाहिराती इतक्या प्रक्षोमक असाव्या का? हा मुद्दा आहे लेखाचा.

 5. Kanchan Karai म्हणतो आहे:

  हे ओपन सिक्रेट आहे. पायरसीसारखं.

 6. sumedha म्हणतो आहे:

  mediawale nehamee naitik goshtee sangat asatat , specially newspaperwale, tv valyanchya navane bomb marat astat, ithe tyachi naitikata malyavar tangoon thevatat ki kay?
  ani dharm n sanskriti budat ahe mhanoon dhavanaryana ya jahirati disat nahit ka?
  aata vatsavitrichi pooja nahi keli ki sanskriti budel, pan ya ph. no. chya ughad ads. nee culture tarnar ahe vaatate?

  • महेंद्र म्हणतो आहे:

   सुमेधा
   मला पण नेमकं हेच म्हणायचंय. कोणाचा धंदा असेल तर असावा, पण अशा जाहिराती पेपर मधे अजीबात असू नयेत. भुक लागली म्हणून फ्रिझ मधला केक काढून खाल्ला जातो, पण मार्केटला जाउन केक आणून खाण फार कमी वेळा होत तसंच आहे हे पण.

 7. हेरंब म्हणतो आहे:

  छान चाललंय. या पेपरच्या विरुद्ध पोलिसात आणि जमल्यास (योग्य असल्यास) प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया कडे तक्रार करता येईल का?
  एक उत्सुकता : कुठला पेपर आहे हा? मटा असेल तर मला तीळमात्र आश्चर्य वाटणार नाही. कारण अशोक जैन भैसटला आहे. हे सगळं त्याच्या आशीर्वादानेच चालतं. स्त्रोत : टाईम्सग्रुप मधील मित्रगण

  • महेंद्र म्हणतो आहे:

   सगळ्याच पेपरला आहे. हा पेपर आहे प्रहार..! आणि मुंबई मीरर ला पण दिसतात अशा जाहिराती. लोकसत्ता मधे मी आजपर्यंत कधीच दिसत पाहिली नाही जाहिरात. मटा ऑन लाइन वाचतो मी.

 8. bhaanasa म्हणतो आहे:

  गुप्तरोग बरे करू, वगैरे आणि या अश्या मसाजवाल्या जाहिराती वर्षोनवर्षे ठसठशीत शब्दात व सगळ्या लहानमोठ्या पेपर्समध्ये छापून येत आहेतच. आणि अनेक लोकं याला बळी पडत आहेत. उघड उघड धंदा. तू म्हटलेस तशीच भीती वाटते. 😦 बाकी काही प्रमाणात संजीवशी सहमत.

  • महेंद्र म्हणतो आहे:

   पेपरमधे किंवा लोकल मधे तर जाहिराती नेहेमीच असतात. वेश्यांचा तुमच्या घरपोच पुरवठा ही कल्पनाच मला भयानक वाटली. आणि त्या मुलांना पैसे कमवा म्हणून सांगणाऱ्या जाहिराती नसाव्या असे मला वाटते.
   हा धंदा कित्येक वर्ष सुरु आहेच- पण इतक्या ओपनली? आपण भारतामधे आहोत की थायलंड मधे हा प्रश्न पडतो मला तरी.

 9. सुहास म्हणतो आहे:

  हे ओपन सिक्रेट आहे. पायरसीसारखं. + 1

  खरच वर्तमानपत्र म्हटला की ह्या जाहिराती कॉमन झाल्यात…

 10. Nachiket म्हणतो आहे:

  पहिल्यांदाच बघितल्यात हे आश्चर्य आहे..
  या जाहिराती खूप काळापासून बघत होतोच. काय आहे हे माहीतही होतं. म्हणूनच विषय एकदम इंटरेस्टिंग वाटला.
  मग हाच धागा पकडून आणखी शोध घेतला असता कळलं कि आपल्या अगदी आसपास हे पार्लर्स आहेत. हॉटेल वगैरेचे रिव्ह्यू असतात तसे नेटवर त्यांचे रिव्ह्यूज आहेत. अमुक जागी नऊशे रुपयांचं पॅकेज आहे. त्यात टॉपलेस विथ अमुक एक क्रिया समाविष्ट आहेत. इतक्या तासांचे इतके प्लस रूम. वगैरे वगैरे. आणि अमुक पार्लर फालतू आहे. मुली सुंदर नाहीत. अमुक ठिकाणी हात लावू दिला नाही. वगैरे तक्रारी आणि हे पार्लर टाळावेत असा सल्ला ही आहे. काही पार्लर्स अतिशय उत्तम असून रेकमेंड केलेले आहेत. अगदी अमुक प्लाझा. अमुक बँकच्यावर असे पत्ते आहेत.

  असो..पैशांनी सर्व गोष्टी घेता येत नाहीत. पण लोक तरीही घ्यायचा प्रयत्न करतात आणि एन्जॉय ही करताना दिसतात.

  आपली जातकुळी वेगळी आहे म्हणून गप्प बसायचं. दुसरं काय ? एच आय व्ही पासून मुक्तता हा फायदा समजायचा..

  • महेंद्र म्हणतो आहे:

   नचिकेत
   मुंबई मिररची दहा बारा पानं छॊट्या जाहिराती असतात. त्यातलं पहिलं पान आलं, की सरळ शेवटचं पान पाहिलं जातं ,मधली जाहिरातींची पानं कधीच पाहिली जात नाहीत. घरी रोज लोकसत्ता , डीएनए आणि हा मिरर विथ टाइम्स येतो. इतर पेपरमधे पण ती पानं काही गरज नसल्या मूळे पाहिली जात नाहीत.
   काल सहज तो प्रहार बघितला, आणि ही गोष्ट नजरेला पडली. आता शोधून काढतो रिव्ह्यू .

 11. bharati म्हणतो आहे:

  स्त्रिया पतीव्रता आणि पुरूष धार्मिक अशी आमची मराठी संस्कृती होती…जिथे पुरुषाना चांगले वळण होते…कुलदीपक नावाप्रमाणे चमकायचे…काय ही अधोगती,शी..मराठी माणूस म्हटला की एक प्रतिमा होती.ती साफ पुसून टाकली आहे.मराठी माणसाला नावे का ठेवतात ? कारण त्याच्या कडून ह्या गोष्टी अपेक्षितच नसतात. बोलायला हक्क आहेच. ज्यांचा आदर्श सगळे घेत होते तेच बिघडले आहेत,आता पुन्हा कधी अयोध्या नागरी कुठे दिसेल की नाही देव जाणे !!

  • Nachiket म्हणतो आहे:

   मराठी लोक असे नव्हते आणि आता झाले ही मोठी गैरसमजूत. पेशव्यांपासून सर्वांची अंगवस्त्रे होतीच.
   आणि अयोध्या ? श्रीरामाचीच ना? श्रीरामाच्या अयोध्येत हे नव्हते का? नसेल तर ते यामुळे की घरीच हव्या तेवढ्या स्त्रिया असायच्या. श्रीराम हा एकपत्नी होता हे एक अद्वितीय उदाहरण होतं त्या काळात. म्हणजे बाकीचे कसे होते ते कळले असेलच.

   हे सर्व चालूच आहे हो. पण तुमची कळकळ चांगली आणि समजण्यासारखी आहे.

   • bharati म्हणतो आहे:

    आभारी आहे नचीकेतजी,
    एकाच ब्लॉग वर तुम्ही सगळे भेटता.तुम्हा सर्व्हान्चे पाण्याच्या थेंबासारखे पारदर्शी विचार वाचायला एथे
    यावे वाटते.मीसगळ्यांच्या ब्लॉगला भेट देणार आहे आणि प्रतिक्रिया सुधा..
    तांदलात खडे असतातच.वाईट प्रवृत्ती तेव्हाही होती.पण आज हजारो वर्षे टिकून काय राहीले? श्री राम आणि त्याचे विचारच ना?
    (अनेक बायकांच्या प्रथा होत्या त्याला कारण पुरुषांचे वर्चस्व ! नियम काढणारा पुरूषच असणार हे सांगायची गरज नाही..)वाईट
    प्रवृत्तीला आळा घालायला कुणी मार्गदर्शक असतो.आपण पेशवे काळातील चांगले घ्यावे.कारण तो काळ त्यानी घडवला त्यात चांगले
    मार्गदर्शक , आजला उपयुक्त,असे बरेच काही जास्त आहे. हे मराठी माणसाने नव्हे जगाने मान्य केले आहे.ईतर काही प्रथाच होती…जी वाईट आहे ह्यावर कुठे चर्चा zआल्याचे ऐकिवात नाही… त्यामुळे जागृतीच zआलि नसावी.एथे तसे नाही आज चांगले वाईट चर्चा होते.व्यक्ती स्वातंत्र्य आहे.मिळालेल्या सवलतीचा योग्य वापर कुठे होत आहे? अनेक लागणे करून कुटुंब व्यवस्था टिकून होती…काही भरकटत नव्हती.आज अधिकार मिळाले.तरी स्त्री सुखी नाही.कुटुंब टिकून राहात नाही..आणि छोटे कुटुंब
    असूनही लोक सुखी दिसत नाहीत

    • महेंद्र म्हणतो आहे:

     भारती,
     आभार. पण इथे तुमच्या लक्षात न आलेले बरेच कन्सेप्ट्स आहेत. पुरुषांसाठी पण अशा ऑफर्स आहेत बरं कां.. असो, काही गोष्टी न लक्षात आलेल्या बऱ्या.

     • Nachiket म्हणतो आहे:

      तुम्ही म्हणता ते निर्विवाद. फक्त तुमच्या

      “जिथे पुरुषाना चांगले वळण होते…कुलदीपक नावाप्रमाणे चमकायचे…काय ही अधोगती,शी..मराठी माणूस म्हटला की एक प्रतिमा होती.ती साफ पुसून टाकली आहे.”

      आणि

      “आता पुन्हा कधी अयोध्या नागरी कुठे दिसेल की नाही देव जाणे !!”

      यावर ती टिप्पणी होती. परत “श्रीराम” कधी येतील असे असते तर मग प्रश्नच नव्हता. आणि मराठीपणाचा इथे खरंच काही संबंध नाही. आपल्या तीन पिढ्यांमागे लोक सर्व काही “ठेवून” असायचे.

      अप्सरांपासून तमाशातल्या बायकांपर्यंत हे चालू आहे. भाबडेपणाने आणि डोळे मिटल्याने काही बदलतही नाही आणि प्रश्न सुटतही नाही. असो.. ब्लोग जरूर वाचा.

     • bharati म्हणतो आहे:

      महेंद्रजी,
      तुम्ही बरोबर ओळखले येथे तुमची प्रतिक्रिया माज़या डोक्यावरून गेली आहे…..काहीच बोध ज़ाला नाही.

     • bharati म्हणतो आहे:

      महेंद्रजी,
      तुम्ही बरोबर ओळखले येथे तुमची प्रतिक्रिया माज़या डोक्यावरून गेली आहे…..काहीच बोध ज़ाला नाही.

  • Nachiket म्हणतो आहे:

   तुम्ही म्हणता ते निर्विवाद. फक्त तुमच्या

   “जिथे पुरुषाना चांगले वळण होते…कुलदीपक नावाप्रमाणे चमकायचे…काय ही अधोगती,शी..मराठी माणूस म्हटला की एक प्रतिमा होती.ती साफ पुसून टाकली आहे.”

   आणि

   “आता पुन्हा कधी अयोध्या नागरी कुठे दिसेल की नाही देव जाणे !!”

   यावर ती टिप्पणी होती. परत “श्रीराम” कधी येतील असे असते तर मग प्रश्नच नव्हता. आणि मराठीपणाचा इथे खरंच काही संबंध नाही. आपल्या तीन पिढ्यांमागे लोक सर्व काही “ठेवून” असायचे.

   अप्सरांपासून तमाशातल्या बायकांपर्यंत हे चालू आहे. भाबडेपणाने आणि डोळे मिटल्याने काही बदलतही नाही आणि प्रश्न सुटतही नाही. असो.. ब्लोग जरूर वाचा http://gnachiket.wordpress.com

   • bharati म्हणतो आहे:

    द्न्यानी लोकात अद्न्यान पाजळले… माफ करा एथे मला बरेच काही कळाले नाही..त्याचा प्रथम शोध घ्यावा लागेल.त्यामुळे जास्त प्रतिक्रिया देत नाही.तुमचे विचार बाकी 100% मान्य!!

    • Nachiket म्हणतो आहे:

     भारतीजी माफ़ करा. आपले अज्ञान दाखवण्याचा हेतू नसून स्वत:चे पाजळण्याचाच होता.

     वाचले की मन आवरत नाही. काय करणार..

 12. meharsha म्हणतो आहे:

  sir,
  he serva jahirati me pan wachale hote tymule tumacha lekh wachatana ekdam manatal koni lihilya sarkhe watale.
  direct advt. mule ekhadwel mule sawadh tari hotil pan je kharach garju aahet te ya indirect jahirati mule kuthalya dushtchakrat adaku shakatat.
  khar tar patra mhanje mitra ha mitra nasun shatru aahe.

  • महेंद्र म्हणतो आहे:

   हर्षा
   मुलं मुली पैशासाठी त्या दुष्ट चक्रात अडकू शकतात हे लक्षात आलं म्हणूनच ह्या विषयावर लिहायला घेतलं . सुरुवातीला जेंव्हा पेपर घरी यायचा तेंव्हा त्यातलं ते सेक्स ऍडव्हाइसचं पान मी काढून रद्दी मधे फेकायचो. पण नंतर मात्र बंद केलं, किती दिवस कोंबडं झाकून ठेवायचं?

 13. rajeev म्हणतो आहे:

  एक विनोद आठवला

  मुलाचा बाप – आमचा मुलगा बसल्या बसल्या रोज २००० कमावतो
  मुलीचा मामा – त्यात काय आहे ? आमची भाची झोपल्या झोपल्या १० मिनिटात
  १० हजार कमावते !!!!!!!!

 14. rajeev म्हणतो आहे:

  सजीवांच्या मूळ स्वभावात , लैंगिक आकर्षण हे नर (पुरुषात) जरा जास्तच आहे
  ( आहार ,निद्रा ,भय , मैथून पैकी )
  स्वामी राज रात्नानंद विचारतात की, किती जोडपी मानसिक लैंगिक व्यभिचार करत नाहीत ?
  समाजाला नैतीकतेची ईतकी वस्त्र पाघ्रली आहेत की, समाज त्यात उबून निघत आहे
  , त्यात कष्ट ( शारीरिक ) न करता आले ला बक्कल पैसा ………
  स्वत: ला प्रामाणिक पणे विचार कि सडाफटिंग प्रवास करतांना स्त्री किंवा पुरुषाला विश्वासू
  ( किंवा थोडक्यात लफडे वाढणार नाही अश्या ) जोडीदारा बरोबर एकांत मिळाला तर ते काय करतील ?
  शेवटी ९० टक्के समाज हा कपडे आणी नैतिकता पांघरलेली जनावरेच नाही का ?

  • महेंद्र म्हणतो आहे:

   राजीव
   मानसीक व्याभिचार परपुरुषाचा विचार केला म्हणून रेणूकेचे डोके पण परशुरामाला उडवावे लागले. अनादीकाळापासून चालत आलेला आहे. कपड्या आड सगळेच नग्न असतात म्हणुन काय कोणी बिना कपड्यांचं रहात नाही.
   तू ज्याला मानसिक व्याभिचार म्हणतोस, ते फ्लर्टींग… त्यावर पण एक लेख लिहिलाय पुर्वी. इथे वाच. http://wp.me/pq3x8-WS

 15. thanthanpal म्हणतो आहे:

  जगातील सर्वात जुना असा हा व्यवसाय होता, आहे आणि भविष्यात राहणार आहे.पण मध्यम वर्गीयांचा प्रोब्लेम म्हणजे ताकाला जायचे आणि भांडे लपवायचे किंवा मी नाही त्यातली कडी लावा आतली असा आहे. आज हा व्यवसाय आहे म्हणूनच आपल्या आई बहिणी सुरक्षित आहेत हे आपण विसरतो. हा व्यवसाय या स्त्रिया कांही मजेखातर करत नाही.त्यांचीही मजबुरी असते. समाजाच्या गरजे प्रमाणे व्यवसाय निर्माण होत असतात.यामुळे इतर व्यवसाय कडे आपण ज्या स्वच्छ नजरेने बघतो तसे या व्यवसाया कडे पाहीले तर यातील धोके,फसवणुकीचे प्रकार थांबतील पण असे झाले तर यातील दलालांचे नुकसान होईल यात समाजातील अनेकांचे हितसंबंध नोकरशाही, पोलीसवर्ग, राजकारणी वर्ग यांचे गुंतलेले आहे. त्याच प्रमाणे अनेक पांढरपेशी मध्यमवर्गाची घरे यावर अवलंबून आहेत . भावांचे शिक्षण, बहिणींचे विवाह , म्हाताऱ्या आईवडिलांचे आजारपण सर्व यांच्या कमाई वर होते. पण दुर्देव्य ते लोक सुद्धा यांचा तिरस्कार करतात. जर ह्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता देवून, या स्त्रियांना अधिकार दिले तर पिळवणूक करणाऱ्यांचे हितसंबंध धोक्यात येतील.म्हणूनच या व्यवसायासा संबंधी अनेक गैरसमज पसरवले जातात. अखेरीस एकच प्रश्न yaar hamaari baat suno aisaa ik insaan chuno jisane paap naa kiyaa ho jo paapi naa ho.
  Thanks & regard,
  Thanthanpal,
  Always visit:-
  http://www.thanthanpal.blogspot.com

  • महेंद्र म्हणतो आहे:

   माझा आक्षेप हा जाहिरातींवर आहे. एखाद्या वृत्तपत्रा मधे सर्व सामान्य ( त्या धंद्यामध्ये लिप्त नसलेल्या )मुलींना पैशाचे आमिष दाखवून आकर्षित करणाऱ्या त्या जाहिरातींच्या विरोधात मी लिहिले आहे. तरूण तरूणींना एका दिवसात दहा हजार रुपये कमवा म्हणूण ज्या तर्हेने जाहिरात दिली जाते, ते अजिबात योग्य नाही असे वाटते.

   हा धंदा तर अगदी अनादी काळा पासून चालत आलेला आहे. ज्या स्त्रिया हा व्यवसाय स्वखुषीने करतात त्यांच्याबद्दल काही आक्षेप असण्याचे कारणच नाही.

 16. रमेश म्हात्रे म्हणतो आहे:

  पेपरमधे अश्या जाहिराती नेहेमीच असतात आणि कामाच्या शोधात असलेले मुलं call सुद्धा करतात. माझ्या मित्राने सुद्धा अशीच एक जाहिरात ( कमवा !!!! एका दिवसात हजार रुपये ) वाचून त्या नंबर वर call केला आणि त्याला काय काम करायचं आहे ते स्पष्ट भाषेत सांगितलं. आणि हे सर्व एक मुलगी समजावते. आपल्याला ऐकताना लाज वाटेल पण हे लोक निर्लज्जा सारखे सविस्तर माहिती देतात.

  जर हा कायद्याने गुन्हा असेल तर मग आपले पोलीस हे सर्व धंदे बंद का नाही करत.

  • महेंद्र म्हणतो आहे:

   एक्झॅक्टली मला हीच भिती वाटली होती. एखादा गरजू तरूण किंवा तरुणी नक्कीच या जाहिरातींकडे बघून वाममार्गाला लागू शकते. चांगल्या घरातल्या मुली सुद्धा या मार्गाला लागू शकतात.

 17. vijaysinh holam म्हणतो आहे:

  महेंद्र्जी,
  चांगला मांडला विषय. मी पोलीसनामासाठी पुढील पोस्ट याच विषयावर देणार होतो. असो. पण यात समाजाची पण चूक आहेच. ग्राहक मिळतात म्हणून असे धंदे चालतात. पोलीसनामा ताजी पोस्ट त्याच विषयावर आहे. `बाई आणि बाटलीचे वेड`
  http://policenama.blogspot.com

  • महेंद्र म्हणतो आहे:

   विजयजी
   तुम्ही नक्कीच जास्त व्यवस्थित लिहू शकता. पुर्णपणे मुळापर्यंत जाऊन.. नक्की लिहा या विषयावर, पोस्टची वाट पहातोय.

 18. भुंगा म्हणतो आहे:

  हो… काही दिवसांपुर्वी एका मराठी न्युज चॅनलवरही हा प्रकार दाखवला होता… अशा जाहिराती “पुणे मिरर” ला रोजच असतात. हे पहा उदाहरण!

  तोच प्रकार “सेक्स ऍडव्हाइस” या कॉलमचा…. मलाही तेच म्हणायचंय.. यातील प्रश्न पेपरवालेच आपल्या मनाने ’बनवून’ टाकतात! शिवाय – पुणे – मुंबई – बेंगलुरु या शहरातील कॉपीजमध्ये तेच सेम प्रश्न असतात – हे पहा उदाहरण!

 19. विशाल कुलकर्णी म्हणतो आहे:

  खुप धक्कादायक आहे हा प्रकार. मागे एकदा या संदर्भात मी मिड डे ला एक पत्रही लिहीले होते, अर्थात त्याची कुठेही दखल घेतली गेली नाही. 😦

  • महेंद्र म्हणतो आहे:

   विशाल
   मिडडे ला पत्र लिहून काही होणार नाही. त्यांचा इनकम चा स्त्रोत आहे तो. ते सगळे लोकं थिक स्किन्ड आहेत.
   आपण फक्त कॉशस रहायचं बस्स!

 20. रविन्द्र जाधव म्हणतो आहे:

  महेन्द्रजी,
  आपली काळ्जी योग्य आहे. परन्तु आपण अशा जहिरतिकडे लक्ष न देणेच योग्य. या जाहिराती बन्द होणे अशक्य आहे. त्या साठी वर्तमानपत्राच्या व्यवस्थापनाने ठरविले पहिजे. आपण या विषयाला तोन्ड फोडले त्यासाठी धन्यवाद

  • महेंद्र म्हणतो आहे:

   रविंद्रजी
   ब्लॉग वर स्वागत. अहो अशा जाहिरातींकडे आपण लक्ष देत नाहीच. म्हणूनच तर काल मला समजलं या बद्दल, जेंव्हा ही गोष्ट गेल्या कित्त्येक वर्ष पासून सुरु असावी.
   वृत्तपत्राने स्वतःच स्वतःवर बंधन घालुन घ्यायला हवी. लोकसत्ता मधे अशा जाहिराती दिसल्या नाहीत.

 21. Sanjeev म्हणतो आहे:

  ठणठणपाळ, मानलं तुम्हाला ! १००% सत्य!

  बाकीच्या प्रतिक्रिया वाचल्या. मला काही कळलं नाही. सिगारेट्च्या जाहिराती चालतात ना? कोकाकोला सुद्धा अपायकारकच आहे. त्याची जाहिरात सगळे स्टार करतात ती चालते ना? फ़ेअरनेस क्रीमवाले सरळ सरळ काळ्या रंगाचा संबंध अपयशाशी जोडतात, त्याचं काय? कित्येक बाबा आणि साधू रेल्वे स्टेशनपासून फ़्लायओव्हरपर्यंत आपली पोस्टर लावतात, ती आपण “विश्वासाचा भाग आहे” म्हणत ignore करतो ना? शेवटी free informed choice हा महत्वाचा पहिला मुद्दा आहे आणि कायदा पालन हा दुसरा. ज्याला/जिला मसाज करवून घ्यायचा आहे, त्याला/तिला जाऊ दे ना तिकडे! ज्याला नाच पहायचा आहे आणि नोटा फ़ेकायच्यात, त्याला करु दे ना!

  आपण नैतिकतेचे ढोल फ़ार वाजवतो, पण कायदा आणि व्यक्तिस्वातंत्र्य यावर मौन बाळगतो. Constitution प्रमाणे जातपात पाळणे हा गुन्हा आहे. पण ९५% हिंदू जातीतच लग्न करतात, वर त्याला compatibility वगैरे बकवास नावं देतात. लग्न सोडा, खोली भाड्याने देताना सुद्धा जात बघतात. याचं justification मात्र “व्यक्तिस्वातंत्र्य” या नावाखाली केलं जातं. यू पी बिहार हरियाणा मद्ध्ये तर जातीबाहेर लग्न केलं तर गावातले सगळे हिंदूच त्या (हिंदू) जोडप्याचा जाहीर खून करतात. (हे इथेही होतं, पण थोडं कमी, इतकंच)

  हे सगळं बाजूला ठेवून आपण (आणि आपले सन्माननीय नेते) डान्स बार आणि मसाज पार्लर हे सर्वात गंभीर प्रश्न मानतो!

  यालाच समाजस्वास्थ्य म्हणतात काय?

  By the way, महेंद्रराव, तुम्ही दाखवलेल्या जाहिराती मला तरी प्रक्षोमक वाटल्या नाहीत. उलट फ़ारच सोबर वाटल्या. कल्पना करा तिथे playboy type फ़ोटो असते तर? (USA, Europe मध्ये असतातच!)

  • महेंद्र म्हणतो आहे:

   संजीव
   अहो प्रक्षोमक हे मानण्यावर आहे. अगदी न्युड फोटो म्हणजेच प्रक्षोमक असे नाही. एखादी गोष्ट करण्यासाठी इन्स्टीगेट करणारी जाहिरात पण प्रक्षोमकच म्हणावी लागेल. एखाद्या १६-१७ वर्षाच्या मुलीला पैशाचे अमिष दाखवुन अशा धंद्यामधे ओढणे ह्याला माझा आक्षेप आहे. जे कोणी करतंय त्यांना अवश्य करु द्यावा हा धंदा, पण इतर तरूणांना इन्स्टीगेट करणे आणि पैशासाठी या धंद्यात ओढणे हे अयोग्य =- एवढाच माझा मुद्दा आहे.

   सामाजिक प्रश्न इतरही आहेतच, त्यावर पुन्हा कधीतरी लिहिन. तसाही त्या हॉनर किलिंगवर लिहिण्याचा विचार आहेच..

   • Nachiket म्हणतो आहे:

    सर्वात महत्वाचा मुद्दा हाच की पैशाच्या गरजेतून यात ओढले जाणे आणि मग चटक लागणे. कारण श्रम कमी. इझी मनी.
    आणि रोगांचा प्रसार..

  • हेरंब म्हणतो आहे:

   >>ज्याला/जिला मसाज करवून घ्यायचा आहे, त्याला/तिला जाऊ दे ना तिकडे! ज्याला नाच पहायचा आहे आणि नोटा फ़ेकायच्यात, त्याला करु दे ना!<<

   संजीव, हाच तर लेखाचा आणि इतर सगळ्या प्रतिक्रियांचा प्रमुख मुद्दा आहे हे येतंय का तुमच्या लक्षात? ज्यांना करायचंय त्यांना करूदे असं तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा दहावी/बारावीच्या सुट्टीत एकटी घरी असणारी मुलं/मुलीही उत्सुकतेपायी किंवा चुकीच्या संगतीने अशा ठिकाणी फोन करू शकतात. त्याची परिणती काय होईल याचा विचार केलायत का? ज्यांना हवं त्यांनी जे हवं ते करावंच पण तसं करणा-यांचं वय, बौद्धिक पातळी आणि त्यातून उत्पन्न झालेलं आकर्षण या सगळ्यातून भलतंच काहीतरी घडून बसायचं हा मुख्य आक्षेप आहे. इति.

 22. महेश म्हणतो आहे:

  सगळ्याच पेपरमध्ये अशा जाहिराती असतात,( काही पेपरमध्ये नसतात याला कारण त्याचे धोरण असेल )शेवटी जाहिरातीचे धोरण प्रेस कोन्सिलाने ठरावाचे असते ,पेपरच्या खपासाठी वाटेल ती जाहिरात पेपरवाले छ्यापातात ,पेपर काढताना त्यांना धोरण ठरून ध्यावे ,अशा जाहिराती घेऊ नये हि तंबी किंवा समज त्यांना द्यावी नाहीतर प्रकाशन बंद करावे,कोर्टाने तसे आदेश प्रेस कोन्सिला द्यावे ,किंवा आशा जाहिरातीवर बंदी आणावी ,पण सर्व पेपर राजय्क्रत्याचेअसस्तात हे विशेष .

 23. अमृता म्हणतो आहे:

  कसला वाईट प्रकार आहे हा, मला तर आजपर्यंत कधी लक्षातच आल नाही कि अश्या हि जाहिराती पेपर मध्ये येत असतील.
  हे सगळ लोकल आणि ट्रेन च्या भिंतीवर बघितलं होत, पण पेपर मध्ये म्हणजे अतीच झाल. आणि पेपर वाले तरी कसे परवागनी देतात?

  • महेंद्र म्हणतो आहे:

   अमृता
   आपल्याला काहीच काम नसतं म्हणून आपण त्या छोट्या जाहिराती पहात नाही. पण काही पेपर मधे रोज असतात . पैशाचा खेळ आहे हा सगळा.

 24. pushpraj म्हणतो आहे:

  ह्या वृत्तपत्र आणि मिडीयावाल्यांनी उच्छाद मांडलाय……..राजकारणी आणि मिडिया यात सगळ्यात जास्त धोका मिडीया पासून आहे कारण मिडिया अगदी घरात पोहोचलीय…ह्यांच्यावर काही बोलाल तर लगेच लिखाण स्वातंत्र्य चे धडे देऊ लागतात जसे काही हे तत्वानुसारच चालतात…..

  • महेंद्र म्हणतो आहे:

   पुष्पराज
   लिखाण स्वातंत्र्य आणि अशा जाहिराती दोन्ही गोष्टींच्या मघे खूप फरक आहे. जाहिराती थेट अपरीपक्व मुला- मुलींपर्यंत पोहोचतात.

 25. Vidyadhar म्हणतो आहे:

  आपल्याकडे काहीही चाललेलं असतं…
  थेट जाहिरातींपेक्षा असल्या छुप्या, सूचक जाहिरातीच जास्त परिणामकारक असतात. ‘मॅक्डॉवेल’स क्लब सोडा’ सारखं!

 26. आल्हाद alias Alhad म्हणतो आहे:

  इतक्या उघडपणे मुला, मुलींना प्रोव्होक करणाऱ्या जाहिराती देणे कायद्याने गुन्हा आहे की नाही हे मला माहिती नाही -अशा जाहिरातींमुळे निम्न/ मध्यम वर्गीय मुलं मुली त्यांच्या जाळ्यात ओढल्या जाऊ शकतात हे मात्र नक्की. तसेच जरी कायद्याने गुन्हा नसला तरी पण शरीर स्वास्थ्य आणि समाज स्वास्थ्याच्या द्दष्टीने अशा जाहिराती खूप वाईट आहेत आणि त्यावर बंदी आणायला हवी एवढं मात्र नक्की!!

  who cares?

  तुम्ही ह्या जाहिराती आधी वाचल्या नव्हत्या म्हणजे ग्रेट आहे!
  आणि पेपरवाले जाहिरातींसाठी जागा विकतात. त्यात त्यांनी काय भरावं यावर त्यांचा कंट्रोल नसतो.

 27. निरंजन म्हणतो आहे:

  आपल्याकडून अजाणपणेसुद्धा बेकायदेशीर / अनैतिक गोष्टींचा प्रसार होणार नाही ह्याची मिडीयाने जबाबदारी घ्यायला हवी. नुसते पैसे मिळतात म्हणून वाटेल त्या जाहिराती छापायच्या आणि मग “संपादक सहमत असेलच असे नाही” असे लिहायचे ह्या सारखी चेष्टा नाही!

  • महेंद्र म्हणतो आहे:

   बरेच मिडियावाले ह्याची काळजी घेतात, पण काही मात्र पैशासाठी अशा जाहिराती देतात. ती फुटनोट म्हणजे जखमेवर चोळलेले मीठ… 😦

 28. आल्हाद alias Alhad म्हणतो आहे:

  “आल्हाद
  अरे कधीच बघत नाही लहान जाहिराती. काम असेल तरच पहाणार नां?”

  त्यामुळेच काका, तुम्ही म्हणता तसं १०/१२ वीतली निरागस वगैरे मुलं मुली ह्यात अडकतील अशी “फारशी” शक्यता नाही.

 29. prabhakar म्हणतो आहे:

  ह्या गोष्टीवर ईथे चर्चा करताहेत. हा देश तुमचा, हे राज्य तुमचे. तुम्हाला ही गोष्ट आवडत नाही तर ह्या ब्लॉगवर प्रतिक्रिया देवुन काही उपयोग नाही. एकी करा. घराबाहेर या. मेडियाला, वकिलाला बोलवा. सरळ जे हे छापत आहेत त्यांचे ऑफ़िसेस जाळा. एखाद्या आक्रमक राजकिय पक्षाला सांगा. ते ठिक करतील. तुम्ही तक्रार करताय कि हा प्रकार येन्जॉय करताय? मी सांगतो ” हा प्रकार ईथे प्रतीक्रिया देनारे सगळे येन्जॉय करत आहेत .” उलत पक्षी “त्या” जाहेरातींची ईथे ही फुकट जाहीरातच झाली .असे मला वाटते. हळु हळु समाजाची प्रतीकार शक्‍ती वाढत चालली आहे. एक दिवस असा येइल की अमेरीके सारखा नन्गा नाच सुरु होईल. तेही बरोबरच आहे म्हनावे लागेल. तीथे समुद्राकाठी मानसं फक्‍त चड्डीवर असतात. छाती उघडीच असते. तर तीथल्या काही बायका ज्या पुरुष व बाया समानच आहेत असे समजतात, त्या कोर्टात गेल्या. असा भेदभाव का? कोर्ट म्हने कोर्टाला काहीही ऑब्जेक्षन नाही. लो !! ज्या बायकाना वरचा भाग पुरुषा सारखा उघडा ठेवायचा आहे त्या आता कायद्याने उघडा ठेवत आहेत. तीथे नुडीस्ट कम्य्नीटी आहे कायद्याने.तुम्ही तुमचा कायदा काय म्हनतो ते तरी तपासून पहा. जे कायद्यात आहे ते अमंल होते की नाही ते बघा. आणी जे लोक तसं होउ देतील त्यालाच निवडुन द्या. लोकशाही आहे ना?

 30. factualspeaker म्हणतो आहे:

  this is true that many such advertisements are seen. but what is the role and responsibility of newspapers in it ? they have a role to play. why to publish such ads and make money ? the most ridiculous thing is that news paper will carry such ads and in adjacent column will be a caption ” prostitution flourishing and police is sleeping .” and also ” lot of matka is flourishing under the very nose of police” who are accused of neglecting it but the same paper will print all kalyan and other gambling figures. what a hippocracy, double standard and saying holier than thou ?

  • महेंद्र म्हणतो आहे:

   वर्तमान पत्रांनी स्वतःच स्वतःवर कंट्रोल ठेवला पाहिजे. पैशासाठी अशा जाहिराती देऊ नये. बरेच पेपर्स अशा जाहिराती स्विकारत नाहीत.
   कायद्याने अशा जाहिराती देणे गुन्हा नाही असे माझा मित्र म्हणतो ..
   पोलिसांचा रोल फक्त … जाऊ द्या, कोळसा उगाळावा तितका काळाच.

 31. Nachiket म्हणतो आहे:

  can I say newspapers themselves are prostitutes?

 32. Gurunath म्हणतो आहे:

  मुंबई मिरर मधे एक दिवस आगोदरचे “आस्क द सेक्स्पर्ट” जसे च्या तसे दुसरे दिवशी पुणे मिरर मधे असते!!!

  जोक्स कॉलम वाचल्याप्रमाणे वाचायचे असते ते!!!……

  पर्सनली माझे शरीरसंबंधांवर स्पष्ट मत आहे… की इट्स अ मीन टू कन्सोलोडॆशन ऑफ़ ह्युमन क्युपिडस बिहेवियर

  प्रेम भावना ह्या माणसाला गिफ़्ट म्हणुन मिळालेल्या युनिक भावनेचे नैसर्गिक मॅनिफ़ेस्टेशन म्हणजे सेक्स

  वेश्या व्यवसाय इज ऑल लुज थिंग…. फ़ॉर दोज हू स्टील चेरिश द अ‍ॅनिमल इन देम….

  प्रेम आणि सेक्स कॉम्बो पर्फ़ेक्ट असणे मे बी की टू अ सक्सेसफ़ुल कॉ-लाइफ़… (अनुभव नाही… विचार आहेत)

  लग्न नाही झालेलं माझं… अन कोणी पार्ट्नर ही नाही (hppy to b single phase…. one of the best in life….really :D)

  थोडक्यात जरा ग्राम्य भाषेत बोलल्यास मला वाटते

  “माणुस अन कुत्रा थोडा फ़रक असला पाहिजेच!!”

  a little legal cognisance of above mentioned problem, tells us tht in india prostitution is not illegal but organisation of sex with advertising, carteling,pimping and indecence in public sphere are under legal scrutiny…. most of the prostitutes are arrested for charges of “arranging” business along with pimps…… may b this provision is to respect the fact tht prostitution is worlds oldest business….

  थोडक्यात सरकार म्हणते की वेश्येने व्यव्साय करावयास अटकाव नाही पण जाहीरात करणे, हायरार्की तयार करणे, जबरदस्ती ने व्यवसायास भाग पाडणे…. हे गुन्हे होत…. वेश्येने स्वतः चे कस्टमर स्वतः शोधावे…. असे काहीसे अ‍ॅंबिग्युअस नेचर आहे… प्रॉस्टीट्युशन लॉ इन इंडीयाचे

  मला वेश्याव्यसाया बद्दल मनस्वी चीड आहे, पण वेश्यांबद्दल भरपुर आदर आहे….. सेफ़्टी व्हॉल्व्स आहेत त्या आपल्या तथाकथित सभ्य समाजाच्या….. त्या आहेत म्हणुन सभ्य स्त्रीया हिंडु फ़िरु शकतात असे ही म्हणता येइल एका परीने.

  its like all the beasts remain tightly under chains of their desire due to these women who face their attrocities some time by choice many a times by force……

  • महेंद्र म्हणतो आहे:

   या जाहीराती माझ्या मात्र एकदम डोक्यात जातात.
   भारतीय कायदे म्हणजे काय? सगळ्या जगातल्या कायद्यांचं कडबोळं! इतक्या जास्त अमेंडमेंट्स झाल्या आहेत आजपर्यंत… की मूळ कायदा, घटना- काय होता हे तरी लक्षात आहे की नाही हे समजत नाही.

 33. Gurunath म्हणतो आहे:

  hmmmm…..

  human trafficking aahe khare jamalgota prakaran….

  Fundamental Rights… an women related issues khup coherrent aahet

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s