हार्ड कोअर भटक्यांचा ब्लॉग

कधी तरी ( खरं सांगायचं तर नेहेमीच) असं वाटतं की नाही की सगळं  काही सोडून मस्त पैकी खांद्यावर एक हॅवरसॅक घेउन फिरायला जावं कुठेतरी. प्रत्येकामध्ये एक साहसाचा कीडा असतो. काहीतरी साहसी करावं असं वाटत असतं,  पण बहुतेकाचं साहस हे  जवळपासच्या गडावर ट्रेक ( जा्स्तीत जास्त लिंगाणा ) करून किंवा काही ’लक्की’ लोकांचं कुलु मनाली ट्रेक ला जाउन संपतं. हे काही तरी हटके असायला हवं असं नेहेमीच वाटत असतं….अगदी एमलेस भटकत रहावं- कुठे जायचं हे नक्की नाही,काय करायचं हे पण नक्की नाही- फक्त फिरायचं.

माझा एक मित्र आहे कौस्तुभ नाबर म्हणून – खास कोल्हापुरचा! आम्ही आमची वय १८-१९ असतांना याच विषयावर गप्पा मारत बसायचॊ. एकदा  खिश्यामध्ये फक्त १०  रुपये घेउन  देशाचा एखादा भाग पालथा घालायचा असाही विचार केला होता. घरुन फक्त १०  रुपये न्यायचे ( ते पण केवळ या साठी की कधी  कुठे अडकलॊ तर घरी टेलीग्राम करता यावा  म्हणून 🙂 ),  रस्त्यांमध्ये नंतर जे मिळेल ते काम करुन पैसे कमवायचे आणि कमीत कमी महिनाभर तरी देशाच्या एखाद्या भागात महिनाभर सर्व्हाइव्ह  होऊन दाखवायचं, असा कन्सेप्ट होता, बरेचदा तर आम्ही गप्पा मारतांना टूर प्लान पण केला होता. पण —– नेमका हा ’ -पण’- सगळ्या गोष्टींच्या आडवा येतो. दोघांनाही नोकऱ्या लागल्या आणि हे सगळे हवेतले इमले हवेतच राहून गेले.

हे आज आठवायचं कारण? कुठलं तरी कारण असल्याशिवाय जुन्या गोष्टी उगाच आठवत नाहीत. काल दिवसभर नेट वर जाता आलं नाही, म्हणून आज सकाळीच मेल चेक केली, तर त्या मधे  एक मेसेज सापडला, इंडीब्लॉगर वर एका हिचहायकर ने मला अ‍ॅड केल्याचा तो इ मेल होता. हिचहायकरची ती साईट उत्सुकतेपोटी पाहिली,  आणि वरची जुनी घटना आणि कौस्तुभ नाबर आठवला.

बरेच फार फार जवळचे मित्र असतात. नेहेमी बोलणे , पत्र वगैरे संबंध जरी राहिले नाहीत तरीही ते नेहेमीच जवळचेच असतात. कितीही गॅप पडली,तरीही कधिच संबंध तुटत नाहीत.

ईंदर सेन! एक सॉफ्ट वेअर इंजिनिअर, दोन महिन्या पुर्वीच युरोप मधले असानमेंट संपवून भारतात परत आला. भटकायची आवड,  इथे आल्यावर ठरवलेले की भटकायला जायचं म्हणून. दूसरा अजय हा इलेक्ट्रिकल इंजिनिअर , पण अ‍ॅडव्हेंचर ट्रॅव्हल्स च्या धंद्यामधे.त्याला पण भटकायची आवड.

एकच आवड असलेले हे दोन तरूण  ( त्यांची मैत्री कधी कशी झाली ते माहिती नाही) पुर्वांचलाच्या प्रवासाला निघाले. नियम एकच… हिचहायकींग करत जायचे, शक्य तेवढं पायी फिरायचं. जवळपास महिनाभर त्या भागात फिरायचं , सगळ्यात महत्वाचे म्हणजे दिवसाचा सगळा खर्च – खाणे, पिणे, रहाणे हा फक्त १५० रुपयात बसवायचा. म्हणजे ४५०० रुपयात एक महिनाभर बाहेर काढायचा.

कसली भन्नाट आयडीया आहे नां? मी तर एकदम फिदा झालो. आपला रोहन आणि पंक्या नक्कीच प्रेमात पडतील या कन्सेप्टच्या. एखाद्या शहरा पर्यंत हे लोकं नेहेमी बस किंवा ट्रेन किंवा हिचहायकींग  करीत प्रवास करायचे , पण त्या गावात गेल्यावर जवळपास सगळाच भाग, प्रेक्षणीय ठिकाणं  हे दोघंही पायी पायी  भटकायचे. . अशा पायी फिरण्या मुळे इतकी जास्त त्या भागाबद्दल माहिती व्हायची की नविन लोकांना पण ते दोघंही त्या गावातले रस्ते ,प्रेक्षणीय ठिकाणं इत्यादींची माहिती द्यायचे. 🙂  पुर्वांचलातले सातही राज्य पालथे घालायचे ठरवले होते दोघांनी .

या सगळ्या प्रयत्नांची यशोगाथा म्हणजे हा ब्लॉग. मी अजून पुर्ण वाचलेला नाही, पण जेवढा वाचला, तेवढा नक्कीच आवडला. मी स्वतः पण त्या भागात नोकरी निमित्य राहिलेलो असल्याने एक वेगळीच अटॅचमेंट आहे त्या भागाबद्दल!   हार्ड कोअर भटक्यांचा ब्लॉग.अवश्य भेट द्या, आर्चिव्ह वर क्लिक कराल तर जुने पोस्ट पहाता येतील.

ज्या लोकांना असं वाटतं की खूप पैसे असल्याशिवाय काही साहसी प्रकार करता येत नाही, त्यांच्या साठी हे पोस्ट आय ओपनर ठरेल.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात... and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

38 Responses to हार्ड कोअर भटक्यांचा ब्लॉग

 1. अमृता says:

  कसलं मस्त एक्सायटिंग आहे.आणि ते हि व्यवस्थित planning करून. असे लोक खूप कमी सापडतात, त्यांना काहीतरी वेगळ करायचं असत, आपले छंद जोपासायला आणि आपली उद्दिष्ट गाठायला जी जिगर लागते ती ह्यांच्यात असते. खूप प्रेरणा मिळते असा काही बघून. खूप आभार काका.
  अस काही इन्स्पायरिंग सागितलं म्हणून

  • अमृता
   माझी पण राहिलेली इच्छा आहे ती. आता कोल्हापुरला गेलो की कौत्स्तुभला पुन्हा एकदा नक्कीच भेटतो. जुने दिवस नुसते आठवले तरीही बरं वाटतं. 🙂

 2. भारी संकल्पना आहे…मी गेल्यावर्षीच त्या भागात फ़िरुन आलो पण पॅकेज टुर मधुन…हया असल्या ऍडवेंचरची मजाच वेगळी…

 3. त्याने गुवाहाटीमधल्या ज्या कामाख्या मंदिराबद्दल लिहल आहे तिथे आम्ही गेलो तेव्हा तीन वेगवेगळ्या रांगा…एक लांब.. फ़्री…एक दोनशे रुपये डोनेशन वाली फ़्री रांगेच्या मध्यात जुडणारी..आणि एक पाचशे रुपये डोनेशन वाली डायरेक्ट आत प्रवेश मिळवुन देणारी…

  • त्यांनी नक्कीच आमच्यासारख फ़्री वाल्या रांगेतुन दर्शन घेतल असेल…त्यांच्या १५० च्या बजेटमध्ये बसत नाहि ना दुसरया रांगा… 🙂

   • आमचा डिलर खूप इन्फ्लुएंशिअल आहे, त्याच्या सोबत गेलं की पैसे न देता पाच मिनिटात दर्शन व्हायचं. त्या मंदीराचे नांव कामाक्षी देवी मंदीर आहे, पण त्या लोकांना क्ष म्हणता येत नाही, म्हणून ख्य म्हणतात. ब्लॉग पुर्ण वाचायचाय. सगळा भाग परीचयाचा असल्याने वाचायला मजा येते आहे. सध्या नाशिकला आहे, रात्री सगळा वाचून काढीन.

  • त्या मंदीराच्या रस्त्यावर बाहेर एक वेदी आहे, तिथे बकरे कापतात.मी एकदा पाहिलंय तिथे तो समारंभ.

 4. Manmaujee says:

  जबर्‍या….संकल्पना एकदम सही आहे!!! ब्लॉग आता वाचायला घेतोय!!

 5. आपण बरोबर ताडले, पंक्या आणि रोहन प्रेमात पडतील म्हणून.
  आयला, लई भारी. आजच सगळा वाचून काढतो. आमचाही गियर कुणी sponsor करेल का? 🙂
  आम्ही एक प्लान केला होता, साधारण पंधरा दिवसांचा उत्तर भारत. पण येत्या डिसेंबरात पडत होऊ घातलेल्या माझ्या विकेटसाठी सुट्ट्या लागणार या हिशोबाने त्याचा बट्ट्याबोळ झाला.

  • आता स्पॉन्सर करूनही काही फायदा नाही, कारण जाणे शक्यच होणार नाही. या पुढे आधी रिझर्वेशन्स, नंतर सगळं काही.. 🙂

   • ता बाकी खरा पण पंक्याचो काय भरोसा नसा. ता जाय्ल पन.
    आत्ता एकटा जळवतो नंतर जोड्यान जळवतील… 😉

 6. ऋषिकेश says:

  पोस्टबद्दल आभार…!!
  मी पण एक भटक्या आहे, छान वाटले पोस्टवाचून…
  मी सध्या तीच पोस्टवाचत आहे, छान अनुभव वर्णन आहेत…
  अश्याप्रकारचे थरार करायला मला आवडतील आणि मी नक्कीच एकदा तरी प्रयत्नकरेन यासाठी…

  मी फक्त एकदाच एक थरार अनुभवला आहे तो पण night trek मध्ये ते हि अमावसेला, मजा आली फार…

  • ऋषिकेश
   मस्त! शक्य होत असेल तर एखादी अशी टूर मारायला हरकत नाही. फार तर जवळचा भाग पहा एखादा.. 🙂 शुभेच्छा.

 7. Prathamesh says:

  महेन्द्रजी, मी तुमच्या blog वर बऱ्याच दिवसांनी आलो. आजचा लेख खूप छान झालेला आहे.
  इतर सुद्धा बरेच लेख वाचलेत. अप्रतिम…!! तुमचे लेख आवडले. जसा वेळ मिळेल तसे आता नियमित वाचत जाईन.

 8. कल्पना मस्तच आहे. ४५०० मध्ये महिना काढणे आणि भटकंतीपण. एकदम चॅलेंजिंग तेवढीच हटके.

  • अजूनही वेळ गेलेली नाही. लग्नापुर्वी कमीत कमी आठवडा भर तरी राहून पहा असं. मजा येईल. लाइफ टाइम एक्स्पिरिअन्स.

 9. Sanjeev says:

  हा पण बघा वाचून
  http://chalatmusafir.wordpress.com/

 10. महेश says:

  सुंदर ,अपतिम ,छान आहे ,

 11. रोहन says:

  प्रेमात पडलोय रे… कधीपासून विचार आहे.. पण हा ‘पण’ साला आडवा येतोय अजून सुद्धा… ‘उदंड देशाटन करावे’ हे अगदी मनात बसलाय.. पण किमान सह्याद्री तरी भटकुया…. जुलै पासून सुरु होतेय ह्या मान्सूनची भटकंती…. 🙂

  • मस्त आहे आयडीया. कमीत कमी एक आठवडा तरी भणंग माणसासारखं रहावं अशी इच्छा आहे . बघु कधी जमतं ते. 🙂

 12. Aparna says:

  मस्त माहिती आहे…इथे मागच्या की त्या आधीच्या वर्षी एका माणसाने अशा प्रकारचं काही केलं होतं म्हणजे भटकंती नाही पण प्रत्येक पे चेकला वेगळी नोकरी वेगळं राज्य असं करत त्यानं बहुतांशी अमेरिका पालथी घातली होती आणि नंतर खरं तर कंपन्यांना तो आपल्याइथे पण येऊन जावा असं वाटायचं (कारण कदाचित त्याची न्युज नेहमी असायची म्हणून)

  • भन्नाट आयडीया आहे. त्याबद्दल काही माहिती असेल तर त्यावर मस्त पोस्ट होईल एखादं.

 13. Vidyadhar says:

  हे अल्टिमेट आहे!
  माझीपण खूप इच्छा आहे असं काही करायची…बघू कसं जमतं ते!

 14. “पण बहुतेकांचं साहस हे जवळपासच्या गडावर ट्रेक ( जास्तित जास्त लिंगाणा ).”

  हा संदर्भ चुकलाय. लिंगाणा सोपा नाही. त्यात प्रस्तरारोहण आहे. कोणीही जाउन करण्याचा किल्ला नाही. तुम्हाला लोहगड म्हणायचे होते का ? तो किरकोळ आहे. मी थोडेसे अधिकारवाणीने सांगतोय. १५० किल्ले पाहून झालेत माझे.

  – राजन महाजन

  • राजन
   लिंगाणा माची फार अवघड आहे, ह्याची मला जाणीव आहे. मी स्वतः अर्ध्यातून दोनदा परत आलोय. खुप माती ढासळते. म्हणूनच लिंगाणा म्हंटलंय. 🙂

 15. vikram says:

  aayala akdum hatake aahe hi jodi aaplyala jam aavdali hi style try marayla harakat pan boltoy tevdhe nakkich sope nahi 😉

  baki var Rajan sahebani laych tenshan ghetlay as vatatay 😉

 16. Leena says:

  Chanach ! he mhanaje agadi “Narmade har har ” sarakhach vatatay . Itarahi gudh anubhav yetil.

Leave a Reply to महेंद्र Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s