नेट सन्यास??

नाही मी नेट सन्यास घेतलेला नाही. कारण आता तिन -चार दिवस झाले तरीही  एकही पोस्ट नाही म्हणून  बरेच मेल आलेत  म्हणून हे पोस्ट लिहितोय .

मी सध्या व्हेकेशन वर आहे, त्या मुळे दिवसभर भटकणे सुरुच आहे बायको मुलीं सोबत, त्या मुळे ब्लॉग वर लॉग इन करूच शकत  नाही. अशीच परिस्थिती शनिवार पर्यंत असेल. नंतर पुन्हा रेग्युलरली इथे भेटत राहूच.

गेली तिन -चार वर्ष मुलीची ११ वी, १२ वी चा क्लास, नंतर सीईटीची  परीक्षा व नंतर इंजिनिअरींगची ऑन लाइन अ‍ॅडमिशन या गोंधळामधे कुटूंबासोबत बाहेर कुठे जाणे झालेच नाही. १०, ११, १२ वीच्या क्लासनी अगदी उच्छाद मांडला होता. क्लासेस बुडवायला मुली अजिबात तयार नव्हती. म्हणून कुठेच जाणं झालेलं नव्हतं. तसेच इंजिनिअरींग च्या सुट्या आणि शाळांच्या सुट्या कधीच ओव्हरलॅप होत नव्हत्या, ते आता जमलंय- मायबाप सरकार ने सुप्रीम कोर्टात केस केली म्हणून .

दहावीची परीक्षा झाली, आणि कोर्टाने सांगितले की आता १० पर्यंत काही निर्णय नाही अ‍ॅडमिशनचा- म्हणजे ’घोळ’  आहेच. म्हणून अगदी दोन तासात सुटी साठी बॉस बरोबर बोललो, रात्री अकरा वाजता तिकिटं बुक केली  आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६-२५च्या फ्लाईटने मुंबई बाहेर   निघालो. काल पासून बाहेरच आहे. आता पण लॅपटॉप घेउन बसलो, तर बायको ओरडते आहे, तेंव्हा मी बहुतेक पुढचा पुर्ण आठवडा ऑन लाइन नसेन- अगदी कॉमेंट्सला रिप्लाय करायला पण लॉग इन करणार नाही.तेंव्हा थोडे दिवसानंतर (शनीवारी ३ जुलैनंतर) भेटू इथेच..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , . Bookmark the permalink.

14 Responses to नेट सन्यास??

 1. ngadre says:

  Patni krodh jaast jhala tar bhasm vhaal. Take care and have a great family vacation..see you soon.

 2. ऋषिकेश says:

  थोडासा नेट संन्यास हवाच!! n ‘joy your trip !! पण आल्यावर ट्रीपवर एक तरी पोस्ट हवीच…म्हणजे मिळेलच अशी अपेक्षा आहे 😉 !!

 3. एवढे चालते हो. तो भुंगा बघा सगळे रुटीन असूनही नेटसंन्यासी झालाय.

 4. hemant says:

  most essential thing in life:- devote your time with your beloved people. keep up kaka, ‘am proud of you!

 5. Vidyadhar says:

  मजा आहे…
  अश्या वेळी नेट संन्यास हवाच!
  खादाडी (शाकाहारी फॉर अ चेंज) चे फोटू टाका परतल्यावर!

 6. तुमचा शॉर्ट ब्रेक आहे ते बरे आहे. मी एक महिना भूमिगत झालो होतो आणि आत्ता परतून २ आठवडे झाले तरी ना कामात लक्ष लागतय ना ब्लॉगवर.
  सुट्टी ही हवीच. कामाची आणि वेळेची बंधन झुगारून दिली की सगळं कसं हलकं हलकं वाटतं. पण काम असो वा आराम, कशाचाही अतिरेक होऊ नये इतकचं.

 7. Njoy vacations.. nashibani ashi ainveli sutti milate….

 8. यंज्वाय महेंद्रजी….

 9. vikram says:

  kaka nehami aktech maja karta yaveli kutumba barobar kara 😉

  baki enjoy kara ase sangaychi garaj nahi tumhala 🙂

 10. noname says:

  kay vatel te lihit ahat chan ahe sagal, pramanik
  sagale vishay hatalale ahet
  tas purushanchya infidelity var,staring nature var liha.
  timepasss,thodishi maza keli tar kaay bighadal as mhananare purush bayakoch sahan karatil kaay

 11. mau says:

  Njoy ur vacations !!!

 12. mahesh mohan shinde says:

  enjoy ur vacations………….

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s