सुला वाइन्स!

कसारा घाट, नाशिक

मुंबई ते नाशिक प्रवास आजकाल खूपच सोयीचा झालेला आहे. चारपदरी रस्ता, आणि नुकताच पाउस पडून गेल्याने तयार झालेली मस्त पैकी हिरवळ.   पावसाळ्यात मुंबई ते नाशिक प्रवास हा मस्त अनुभव असतो. घाटन देवीला म्हणजे घाटाच्या सर्वोच्च भागात पोहोचलो की धुक्यामुळे अगदी दोन फुट अंतरावरचं पण काही दिसत नाही. हवेतला दमटपणा अनुभवायला खिडकी खाली केली की बाहेरचे ढग कार मधे येतात, की एकदम त्यांना कवेत घेतलंय  असे वाटते. तो कुंद दमटपणा श्वासात भरून घेतला की मस्त वाटतं. एका जागेवर कार थांबवून थोडा ब्रेक घेतल्याशिवाय पायच निघत नाही तिथून. पावसाळ्यात कसारा घाटातला प्रवास मनापासून आवडतो मला.

सुला वाइन्स, नाशिक, महेंद्र कुलकर्णी, काय वाटेल ते , http://kayvatelte.com

सुला वाइन्स - टिपीकल फ्रेंच वायनरी सारखी अरेंजमेंट आहे

अंतर फार नव्हतंच, आम्ही दहापंधरा मिनिटातच त्या वायनरी मधे पोहोचलो.  आता मी वायनरी म्हंटलं आणि तुमच्या डोळ्यापुढे त्या   वाईन महोत्सवा मधे ओक कास्क मधे पायाखाली द्राक्ष तुडवणाऱ्या मुली आल्या असतील. खोटं कशाला सांगू मी पण जेंव्हा तिथे पोहोचलो, तेंव्हा पासूनच तो द्राक्ष पायाखाली तुडवायचा लाकडी घंघाळ(ओक कास्क) कुठे दिसते ते शोधत होतो 🙂 अर्थात सापडला नाही तो- किती भ्रम निरास 😦

द्राक्ष क्रश करायचं मशिन.. आणि ओक कास्क्स ( इम्पोर्ट केले जातात) ओक कासक मध्ये मॅचुअर केलेली वाइन खूप टेस्टी असते असे म्हणतात. जितकी जास्त मॅच्युअर तितकी जास्त महाग.

काय वाटेल ते, महेंद्र कुलकर्णी, मराठी, द्राक्षं

द्राक्षं स्वच्छ करुन इथे कन्व्हेअर द्वारे क्रशिंग मशिन मधे पाठवले जातात.

सुला वाइन्स, महेंद्र कुलकर्णी, मराठी, mahendra kulkarni

जुन्या काळी वापरण्यात येणारं व्हिंटॆज ग्रेप क्रशिंग मशिन ( फ्रान्स मधे पुर्वी अशी मशिन्स वापरली जायची )

सुला वाइन्स! भारतीय वाइन ला प्रतिष्ठा मिळवून देणारी माणसं – असं म्हंटलं की एका वाक्यात ओळख करुन देता येते. समोर आत शिरल्यावर एक युरोपीयन स्टाइलची इमारत  लक्ष वेधुन घेत होती. समोर लाकडी कास्क एका स्टॅंड वर रचून ठेवलेले होते. आज पर्यंत केवळ इंग्रजी सिनेमामधे वाइन मॅच्युअर करण्याचे कास्क पाहिले होते, ते प्रत्यक्ष पाहिले. वायनरीचे मेंटेननस इंजीनिअर विलास सोनावणे समोर दिसले. त्यांची ओळख करून दिली डीलरने. थोडा वेळ कामाचं बोलणं झालं, आणि नंतर त्यांनी म्हंटलं की चला, तुम्हाला वाइन तयार करण्याची प्रोसेस दाखवतो.

मला नेहेमी वाटायचं की शेतकऱ्यांची मज्जाच मज्जा असते. द्राक्षं चांगली निघाली पिकली की विकायची, आणि आपली नेहेमी   द्राक्षं सडली की त्याची वाइन बनवयला विकायची- पण तसे नाही. द्राक्षं सडली की सरळ फेकुनच द्यावी लागतात. वाइन ही नेहेमी कच्च्या द्राक्षांचीच बनवली जाते. इतकी कच्ची असतात ती द्राक्ष, की  तुम्ही तोंडात पण धरू शकणार नाही इतकी आंबट असतात.  वाईनच्या  द्राक्षांची वेगळीच लागवड केली जाते.  द्राक्ष कच्चे असतांना   पिकण्यापूर्वीच तोडून वाइन साठी आणले जातात.

वाइन   साठी लागणारी वेगळ्याच जातीची द्राक्षं  आणि त्याचं बियाणं    फ्रान्स हून आणण्यात आलेलं असतं. हे बियाणं आजूबाजूच्या शेतकऱ्यांना ( म्हणजे वायनरीशी जोडलेल्या) शेतकऱ्यांना दिलं जातं.शेतकऱ्यांकडून  सगळं उत्पादन हे वायनरी विकत घेते -म्हणजे शंभर टक्के कॅश क्रॉप झालं की हे!

विलास सोनवणे यांनी पुर्ण प्लॅंट दाखवला. सुरुवात केली ती क्रशिंग युनिट पासून. एकदा द्राक्षं आली की ती इथे कन्व्हेअर वरुन क्रशिंग करता पाठवली जातात.समोर मोठ मोठे विस हजार लिटरचे बॅरल्स – त्या मधे क्रश केलेल हे द्राक्ष साठवले जातात. थोड्या थोड्या वेळाने सेल्फ जनरेटेड अल्कोहल आणि इतर बऱ्याच गोष्टी चेक केल्या जातात. थोडी जरी चूक झाली की सगळं म्हणजे ते विस हजार लिटर वाइनचं व्हिनेगर होऊ शकतं. खूपच क्रुशिअल काम आहे हे. ह्या प्रोसेसचे फोटो वर दिलेले  आहेत.

वाइन
वाइन साठवण्याचे बॅरलस.वाइन अशा बॅरल्स मधे साठवून ठेवली जाते.
वाइन, महेंद्र कुलकर्णी

सगळ्या वाइनचं तापमान सारखं रहावं म्ह्णून मुद्दाम एका पंपाने सगळी वाइन त्या सिलेंडर मधे फिरवली फिरवली जाते ज्यामुळे वाइन खराब होत नाही.

रेड वाइन तयार करतांना सालं ठेवली असतात काही दिवस, नंतर मग या फिल्टर मशिन द्वारे ती सालं काढून टाकली जातात.

थंडपणा सगळीकडे सारखा रहावा म्हणून सिलेंडर्स मधली वाइन ही पंपाद्वारा रिसर्क्युलेट केली जाते. बरं एक गोष्ट सांगायची राहूनच गेली , द्राक्षांचा फक्त रस इथे ठेवला जातो, ज्या पासून व्हाईट वाइन, आणि स्पार्कल तयार केली जाते. स्पार्कल म्हणजे शॅंपेन. पण शॅंपेन हे ब्रॅंड नेम असल्यामूळे स्पार्कल हे नांव वापरले जाते. इथे तयार होणारी शॅंपेन खूप उच्च दर्जाची असते, म्हणूनच इंटरनॅशनल मार्केट मधे पण ही वाइन विकली जाते. रेड वाइन तयार करतांना काळ्या द्राक्षांचा रस हा साला सहित ठेवला जातो. नंतर ठराविक वेळाने तो रस फिल्टर करुन त्यातली सालं काढून टाकली जातात. पण व्हाईट वाइन साठी सालं अजिबात चालत नाहीत.

एकदा वाइन व्यवस्थित तयार झाली (म्हणजे अल्कोहल पर्सेंटेज जितकं हवं तितकं आलं ) की तिचे टेम्प्रेचर हे मायनस ४ डिग्री पर्यंत मेंटेन केले जाते. हे जे मोठ मोठे सिलेंडर्स दिसताहेत ते टेम्परेचर मेंटेन्ड रहावे म्हणून संपुर्ण पणे इन्सुलेट केलेले आहेत.खूप मोठा रेफ्रिजरेशन प्लांट लागतो या कामासठी.

महेंद्र कुलकर्णी, काय वाटेल ते,

वाइन बाटली बंद केली जाते , मार्केटला पाठवण्यासाठी. चित्रं सौजन्य सुला वाइन्स.

वाइन बॉटल्स रेडी फॉर मार्केट..

तयार झालेली वाईन मग बाटलीबंद करुन लेबलींग करुन मार्केटला पाठवली जाते. मार्केटला पाठवण्यापुर्वी बाटली मधली वाइन खराब होऊ नये म्हणून त्या मधे काही अ‍ॅडीटीव्ह्ज मिसळले जातात. स्पार्कल मधे गॅस ( कार्बन डाय ऑक्साईड) पण मिसळला जातो.   ते बुच उंच उडायला हवे नां, बाटली उघडली की – म्हणून.:)  पण इतकं सोपं काम पण नाही ते. थोडा जास्त गॅस, आणि बाटली फुटू पण शकते.

विलासने सांगितले की हा प्लॅंट अगदी फ्रान्स मधल्या एखाद्या प्लॅंट सारखाच बनवलेला  आहे. वाइन फर्मंटेशन  करण्याची जागा, ते अगदी वाइन टेस्टींग एरीया पण अगदी एखाद्या आंतराष्ट्रीय प्लांट सारखा बनवलेला आहे.

वाइन, चिझ, ऑलिव्ह.. ग्रेट कॉम्बो... चिझ दोन प्रकारचं होतं बहुतेक डॅनिश चिझ असावं.

वाइन, वाइन चॉकलेट्स..

सगळ्यात जास्त एंजॉयेबल पार्ट... धुंद हवा, वाइन चा ग्लास, आणि मागे द्राक्षाच्या बागा.. हमीयस्तू..

सगळा प्लॅंट बघुन झाल्यावर आम्ही वाइन टेस्टींग एरीयामधे गेलो. वाइन तयार झाली की ती बरोबर आहे की नाही हे टेस्ट करण्यासाठी टेस्टर्स असतात. ते ठरवतात की वाइन ची क्वॉलिटी स्टॅंडर्ड प्रमाणे आहे की नाही ते. वाइन पिणं म्हणजे  नुसती ग्लासात ओतली आणि घशाखाली उतरवली असे नसते.  वाइन पिण्याची पण पध्दत असते. आधी अगदी करेक्ट  टेम्प्रेचरची  वाइन सुंदरशा ग्लासात ओतायची, नंतर नाकाजवळ ग्लास नेउन त्याचा सुगंध अनुभवायचा, एक लहानसा घोट घ्यायचा, त्याला मस्त पैकी तोंडामधे घोळवायचं, आणि नंतर  मग  दुसरा घोट….  अधुन मधुन चांगल्या प्रतीचं चीझ , आणि ऑलिव्ह तोंडात टाकायला असले तर मग अजून  काय हवं?

लिटिल इटली. इथलं एक मस्त रेस्टॉरंट. पण इथे मात्र जाउ शकलो नाही. नेक्स्ट टाइम...

एक हॉस्पिटॅलिटी एरीया पण आहे. मस्त पैकी बार आहे, त्याच्या काउंटरवर वाइन चॉकलेट्स पण दिसली. आम्ही बाहेरचा कोपऱ्यावरचा टेबल पकडला. वेटरला एका वाइनची ऑर्डर दिली. सोबतच दोन प्रकारची इम्पोर्टेड चिझ ( नांवं विसरलॊ सगळी विचित्र नावं असतात )क्रॅकर्स आणि ब्राइन वॉटरमधली ग्रिन ऑलिव्ह्ज होती.सगळी  बॉटल संपवायला चांगला तास लागला. हातामधे वाइनचा ग्लास, हिरवा गार निसर्ग, थंड गार वाऱ्याची झुळूक, आता पाउस पडतो की काय याची आठवण करून देणारे, दोन चार चुकार पावसाचे थेंब- थांब आता लवकरच तुझी भंबेरी उडवतो म्हणणारे.. सगळंच कसं धुंद करणारं वातावरण होतं. बऱ्याच गोष्टी शब्दात सांगता येत नाहीत, त्यातली ही एक…

पुढल्या वेळी नाशिकला आलो की इथे हमखास चक्कर होणार हे नक्की- कामासाठी जरी नाही तरी वाइन टेस्टींग आणि लिटल इटली साठी 🙂

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खाद्ययात्रा and tagged , , , , , , , . Bookmark the permalink.

39 Responses to सुला वाइन्स!

 1. sumedha says:

  bapare he itak moth prakaran ahe he mahit navhat?

  • ek punekar says:

   वाईनच्या जाहिराती आत्ता नेट वर

   • एके काळी भारतामधे तयार होणारी वाइन म्हणजे द्राक्षासव म्हणून हिणवलं जायचं, त्या पार्श्वभूमीवर या कंपनीने जी भारतीय वाइन ला आंतरराष्ट्रीय बाजारात प्रतिष्ठा मिळवून दिली ती दुर्लक्षून चालणार नाही. आणि म्हणूनच हे पोस्ट लिहिलंय.

  • प्रक्रिया खूप मोठी आहे. पण थोडी चूक झाली की संपलं. वाइनचं व्हिनेगर होऊ शकतं. तसं म्हंटलं तर इथे वाइन प्रिझर्व करुन ठेवायलाच जास्त खर्च येतो. तापमान जर वाढलं तरी पण वाइन खराब होऊ शकते.

 2. sagar says:

  माझी बहिण आताच काहीदिवसपूर्वी जावून आली होती इथे.मस्त जागा आहे ती.न्जोय

  • सागर
   इथे एक रेस्टॉरंट पण आहे लिटील इटली नावाचे , ते पण चांगले आहे असे ऐकले आहे, पण या वेळी जाणं झालं नाही. ते पण पहा एखाद्यावेळेस.

 3. mau says:

  बापरे…किती SOLID प्रक्रीया आहे..पहायला हवे!!

  • उमा
   खूप इंट्रीकेट प्रोसिजर आहे. खूप सोपी- पण तेवढीच कठीण.. थोडी चूक झाली तर खूप नुकसान होतं.

 4. mazejag says:

  वेलकम, महेंद्र्जी, वाईन पिताना ह्याची कल्पनाही आली नव्हती कधी, पण सोलिड intresting आहे सगळ.

  • धन्यवाद.. मस्त वेळ गेला तिकडे. कधी तरी पुन्हा जाइन एकदा हे ठरवुनच बाहेर पडलो.

 5. vikram says:

  लिटिल इटली akda ethe bhet dyayla havich 🙂
  baki टेस्टर्स che kam khup mahtvache aani avghad hi aahe manal pahije tya mansala

  • अल्कोहल हे सेल्फ जनरेटेड असते. त्यात काही मुद्दाम मिसळले जात नाही, म्हणूनच वाइन हेल्थ साठी चांगली असे म्हणतात. टेस्टर्स चे काम खूपच महत्वाचे. त्यांना तर वाइन पिऊन पण पहावी लागते , टेस्ट जमली की नाही ते बघायला 🙂

 6. हो मी गेलो होतो, नाशकात जेव्हा होतो तेव्हा…. पण तिथल्या वाईन सारखीच सुंदर मांडणी आणि वर्णन दिलेत… खरच मना पासून धन्यवाद…
  आपला,
  (वाईनरी) विशुभाऊ…

  • विशुभाउ
   जागा खूपच सुंदर आहे. समोर द्राक्षाचे मळे, स्वच्छ हवा… मस्ट गो.. लिटील इटली कसं वाटलं?

 7. वाह काका! झकास झाली तुमची ट्रिप! नेहमी प्रमाणे छान वर्णन केलं आहे तुम्ही. तुमचा वाईन पितानाचा फोटोतर मस्तच! ऑलिव्हस बरोबरचं चीज हे cheddar cheese असावं असं वाटतं. अरे हो, वेलकम बॅक!

  • अभिलाष
   धन्यवाद. फक्त एक आठवडा दूर होतो नेट पासून, पण एक अख्खं युग लोटल्यासारखं वाटतंय. चिज हे बहुतेक इम्पोर्टेड असावं. एका ला पायनॅपल सारखा स्वाद होता तर दुसरं हे आटवलेल्या दुधाच्या चिज सारखं लागत होतं. दोन्ही प्रकार टेस्टी होते 🙂 वाइन बरोबर तर अप्रतीम.

 8. मस्तच महेंद्र, मजा आहे बुवा तुमची
  वाईन एक परंपरा हा उपक्रमावरील लेख आठवला
  http://mr.upakram.org/node/561
  तसेच मिसळपाव वरील रेड आणि व्हाईट वाईन्स आठवल
  http://www.misalpav.com/node/426
  निळू दामल्यांनी आमच्या मनातील वाईन महोत्सवाची कल्पना मांडली ती पाहा
  http://www.misalpav.com/node/10830

  • प्रकाशजी
   सगळे लेख वाचलेत. धन्यवाद. मला तो निळू दामल्यांची आयडीया मात्र आवडली- एकदम झकास… 🙂

 9. मी दिलीय भेट इथे, खूप छान जागा आहे.
  वाईन टेस्ट नाही केली पण मित्राला आणली होती त्याला जाम आवडली. खूप दिवसांच्या विश्रांतीनंतर स्वागत..कशी गेली सुट्टी ते पण कळू देत लवकर..वाट बघतोय 🙂

  • सुहास ,
   सुटी म्हणजे फक्त हिस्टॉरिकल साइट सिइंग. लवकरच टिट्स -बिट्स मधे लिहीन. मुद्दाम प्रवास वर्णन लिहायचं टाळतोय.

 10. RAVINDRA JADHAV says:

  छान माहिती आहे. छायाचित्रामुळे मजा आली.

 11. आल्हाद alias Alhad says:

  I envy you!

 12. मस्त आणि चवदार माहिती. धन्यवाद 😉

 13. Rajeev says:

  तीथून वापस आलास ???????????????????

 14. laxmi says:

  internet addiction is……… wrong
  eating junk food is ………….wrong……u hav written
  and drinking is healthy…………..why u r writing such post which encouraging drinking? 😦

  i don have any rights to give comments on such things…but u r writing blog which is so many peoples r reading ….so many of them r youngsters……i think u don write such post on smoking n drinking publicaly……….u hav written post on smoking dat how much it is dangerous……….so drinking is not??

  =>this should b added on blog etticates……..post on smoking n drinking should b avoided.

  if u have seen years back award shows in that shahrukh khan was doing smoking….but now he never do…he tries to avoid immencely…..becaz so many people follow them.

  so many of them thinks that its a style n status symbol….so pls try to avoid such post publicaly.

  sorry….. 😦

  • लक्ष्मी
   ह्या कंपनीने भारतीय वाइनला आंतराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून दिली. दुसरे म्हणजे ही कंपनीपुर्वी एका सहकारी संस्थेची होती. त्यांनी जवळपास ८ वर्षात बराच तोटा झाल्यावर यांना विकली. ही एक सक्सेस स्टॊरी आहे एका भारतीय कंपनीची.
   दुसरी गोष्ट म्हणजे इथे शक्यतो स्वतःचे अनूभवच लिहितो. काहीही लपवून न ठेवतांना. जे मनात येईल ते प्रामाणीकपणे लिहितो. वाइन मधे फक्त सेल्फ जनरेटेड अक्लोहल असते६ ते ८ %. त्यामुळे त्याने नशा वगैरे काही येत नाही.

   मी गेलॊ होतो तेंव्हा बरीच कुटूंब इथे आलेली दिसली. लिटल इटली रेस्टॉरंट ्खूप प्रसिध्द आहे. बऱ्याच गोष्टी ज्या लिहितो त्या कदाचित माझ्या वयाच्या दृष्टीने साध्या असतिल, पण मी इथे वाइन पिणं चांगलं हे कुठेच लिहिलेलं, नाही, पण जर चालत असेल तर भेट द्या एवढंच लिहिलंय.

   मला असं वाटतं, की मी लिहिलें वाचून कोणी ठरवणार नाही की तिथे जाउन आपण वाइन प्यावी वगैरे.. ज्याला चालत असेल तोच जाइल. या पुर्वी पण बऱ्याच पोस्ट मधे बिअरचा वगैरे उल्लेख आलेला आहेच.
   असो!प्रतिक्रियेकरता आभार.

 15. laxmi says:

  ya may b its success story…u hav not written go n drink…….but i feel somewhere this post encouraging drinking………

  6 to 8% self generated alcohol…..so what do u think eating ‘Guthka’ is not dangerous to health??…………..some newspapers try to avoid ads on guthkha? why?

  i think peoples feel drinking wine is status symbol. 😦

  • स्टेट्स सिंबॉल म्हणून पिणाऱ्यांपेक्षा सोशल ड्रिंकिंग जास्त वाढलं आहे. 🙂 त्यावर पुन्हा कधी तरी लिहिन म्हणतोय. 🙂 मी स्वतः मार्केटींगला असल्याने आणि बह्तेक वेळा कंपनी अकाउंट्स ला असल्याने सवय लागणे सहज शक्य होते, पण ते होऊ दिले नाही.
   दुसरं म्हणजे, स्वतःला काय वाटतं हे लिहिणं बंद करून लोकांना काय आवडेल ते लिहायला घेतलं , तर कदाचित लिहिणं जमेल का याचीच शंका येते. 🙂

 16. रोहन says:

  वा.. उत्तम लेख… तो सुद्धा फोटोंसकट… 🙂 जायचे म्हणतोय एकदा…. कसे जायचे ते कलव ज़रा..

  • नाशिकला गेलस की कोणीही सांगेल. माझ्या बरोबर लोकल मित्र होता. फार तर दहा पंधरा किमी असेल नाशिकपासून.

 17. Smita says:

  Hi Mahendraji,

  Mi tumcha blog aaj pahilyanda vachla. Tyat sula wines he prakaran vachle. Amhi hi jaun aloy Sula wines la. Pan tya veli Little Italy chalu navhate. Ekandarit tithla parisar, drakshanche male, and wine plant khupach chaan..Apan je lihilay te pan khup Abhyasakpurna ahe. Mahnje mala as vattay ki are he apan pahilach nahi…Photo pan chaan ahet. Vachakanchya pratikriya pan sunder ahet..vishesh mhanje tumhi tya pratikriyela, changli aso kinva vait..dad jaroor deta. Shubhechaa…..

  • स्मिता
   ब्लॉग वर स्वागत!
   अहो, सगळ्याच प्रकारच्या प्रतिक्रिया असतात. एक लेख लिहिला होता अजय अतूल वर त्यावरच्या शंभर टक्के प्रतिक्रिया माझ्या विचारांच्या विरुध्द होत्या. पण एक आहे, जर वेगवेगळे विचार आहेत म्हणूनच आपण सगळे वेगवेगळे आहोत नां? नाहीतर काय फरक राहिला असता मानवप्राणी आणि इतर प्राण्यात?

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s