सुवर्ण मंदीर

श्रीशैलम, shrishailam, srishailam, golden temple, सोनं, सोन्याचं मंदीर

श्रीशैलम मंदीर

सुवर्ण मंदीर म्हंटलं की मग आठवतं ते  अमृतसर. अमृतसर शिवाय इतर ठिकाणी सुवर्ण मंदीर असू शकतं हे आपण सहजा सहजी मान्य करूच शकत नाही.

ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेले श्रीशैलम ला जाउन आलो. या मंदीराबद्दल अजिबात काहीच माहिती नव्हती. टॅक्सी ड्रायव्हर अती उत्साही! त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याचा मार्ग पण नक्षलवादी भागातून. तिथे पोहोचे पर्यंत थोडी धाकधूक वाटत होती. तिथे पोहोचल्यावर  उतरून सरळ मंदीराकडे वळलो.

एका ठरावीक काळा मधेच या मंदीरात गर्दी असते, इतर वेळेस दर्शन सहज घेतलं जाऊ शकतं. श्रावण महिन्यात दक्षिण भारतीय लोकं तिरूपतीला न जाता या मंदीरात जातात, त्या काळात तिरूपतीला अजिबात गर्दी नसते.  मंदीरा भोवती  भक्तांना जाण्यासाठी कठडे बांधलेले होते. पण गर्दी अजिबात नव्हती. सरळ चालत आम्ही  गाभाऱ्या पर्यंत जाउन पोहोचलो आणि ५  मिनिटात  दर्शन घेतले.

्श्रीशैलम, shrishailam, srishailam golden temple
श्रीशैलम सुवर्णध्वज

मुख्य मंदीरा भोवती इतर मंदीर पण आहेत. तिकडे त्या लहान लहान मंदीराच्या समोरून जातांना उगाच शास्त्र म्हणून हात जोडले  आणि पुढे निघालो. मंदीर पुर्ण पणे सोन्याने मढवलेले आहे. ध्वज पताका पण पुर्णपणे सोन्याच्या पत्र्याने मढवलेली आहे. या देवस्थानांच्या कडे भक्तांनी दिलेले ( हुंडी मधे) सोनं नाणं भरपूर असतं, त्याचा उपयोग करून मंदीर सोन्याने मढवून काढले आहे. मंदीर प्राचीन काळचे आहे. हेमाडपंथी  ( हेमाडपंथी म्हणजे मला दक्षिण पद्धतीचे मंदीर अभिप्रेत आहे ) . बऱ्याच ठिकाणी काही भटजी लोकं ’तीर्थ’ घेउन बसलेले होते, तर काही कपाळाला लावायचे गंध घेउन. तुमच्या कपाळावर त्याने बोट टेकवले की लोकं समोरच्या ताटलीत काहीतरी टाकुन पुढे जायचे- तसंच आम्ही पण केलं.

या सोन्याने मंदीर मढवण्याच्या प्रकाराविषयी बराच उहापोह झालेला आठवला. पुर्वी एकदा अमिताभ बच्चन ने इथे आले असतांना मंदीराला सोन्याचे कवच चढवण्यासाठी म्हणून एक करोड रुपये देण्याचे कबूल केले  होते २००७ साली. हातोहात ११ लाखाचा चेक पण दिला होता. नंतर मात्र बाकीचे पैसे दिले की नाही ते माहिती नाही. पण  देवस्थान या बाबतीत बरेचदा पेपरमधे या बद्दल बातम्या छापून आणते.   देवस्थान वेळोवेळी अमिताभ बच्चनने दिलेल्या वचनाची आठवण करून देते पेपरमधे छापून  की अमिताभला आम्ही बरेचदा पत्र पाठवलं, पण पैसे मिळाले नाहीत म्हणून. असो. जर अमिताभला द्यायचे नसतील तर देवस्थान त्याला कम्पेल करूच शकत नाही. आणि देवस्थानाकडे इतका पैसा जो कुजत पडला आहे, तो वापरून मंदीराला सोन्याने मढवण्याचे काम केले जाऊ शकते- त्या साठी अमिताभने दिलेल्या पैशावर देवस्थान अवलंबून निश्चितच नाही. तरी पण इतका पाठपुरावा का करतंय देवस्थान हे काही समजत नाही. प्रसिद्धी साठी???

दुसरा एक महत्वाचा  मुद्दा, मंदीराला सोन्याने मढवायचं म्हणजे त्याला स्क्रू लावण्यासाठी ड्रीलिंग करून छिद्र करावे लागतात. इतक्या जुन्या अर्वाचीन ( की प्राचीन? मला नेहेमीच गोंधळल्या सारखं होतं या दोन शब्दांच्या बाबतीत- योग्य शब्द कुठला असेल बर? 🙂 ) काळच्या वास्तू मधे अशा प्रकारे छिद्र केल्यास त्या वास्तूचे अस्तित्व धोक्यात येऊ शकतं, असंही काही लोकांचं म्हणणं आहे. लवकरच पुर्ण मंदीर सोन्याने मढवले जाणार आहे असे तिथला भटजी म्हणाला.

सुवर्ण मंदीर, काय वाटेल ते, महेंद्र कुलकर्णी,

श्री शैलम सुवर्ण मंदीर

पण एक सांगतो, मला मात्र खूप मस्त वाटलं ते सोन्याचं मंदीर आणि सोन्याचा ध्वजस्तंभ पहायला. उगीच कॉलर ताठ झाली 🙂

मंदीराच्या रस्त्यावर शंकराचार्यांचे एक शक्ती पीठ पण दिसले.  शंकराचार्य आपले ( किंवा आपल्यातले ) वाटतंच नाही. एक धर्मगुरु म्हणुन त्यांनी काय केलं म्हणून त्यांना मान द्यायचा हेच कळत नाही. पुर्वी एकदा द्वारकेला गेलो असता शंकराचार्यांच्या पीठात गेलो होतो, पण इथे मात्र  इच्छाच झाली नाही.  शंकराचार्यांनी खरं तर लोकांच्या मनामधे धर्माबद्दल आस्था वाढवण्याचे काम करायला हवे, पण ते तर  कधीच करतांना दिसत नाहीत. शंकराचार्यांचे नांव काय आहे हे पण  आज मला एकट्यालाच नाही तर  बऱ्याच लोकांना माहिती  नसावे, पण इतर धर्माच्या बाबतीत असे नाही-त्यांचे धर्मगुरु नेहेमीच समाजाशी जोडलेले असतात.असो..

सहज म्हणून एक जुनी गोष्ट  आठवली , पुर्वी एकदा नेपाळला   असताना नेपाळ नरेश (राजा्ला ) रस्त्यावरून जातांना पाहिले, आणि जगातला एकुलता एक हिंदू राजा म्हणुन त्याच्या पुढे आपोआपच नतमस्तक झालो  होतो. त्या वेळी त्या राजाने हिंदूंसाठी काय केलं हा प्रश्न का मनात आला नाही हे समजत नाही आज मला.

जुन्या मंदीरांना सोन्याचे कवच चढवणे ,सोन्याचं सिंहासन बनवणे वगैरे प्रकारचा शो करणं खरंच आवश्यक आहे का? देवस्थानाकडे कुजत असलेला करोडॊ रुपयांचा  काय उपयोग केला जाऊ शकतो? ते पैसे समाजोपयोगी कामासाठी वापरला जाऊ शकतो  का?  ह्या प्रश्नावरच हा लेख संपवतो.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात... and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

35 Responses to सुवर्ण मंदीर

 1. हैद्राबादला असताना श्रीशैलमला दोन वेळा जाणं झालं आहे. शाळेत असताना ‘श्रीमान योगी’ वाचलं होतं तेव्हापासून या मंदिराबद्दल आकर्षण होतं. दक्षिण दौऱ्यावर जात असताना याच स्थळी शिवाजी महाराज आपलं शीर तलवारीने कापून शिवाच्या चरणी वाहायला तयार झाले होते. तो प्रसंग आणि पर्यायाने ते मंदिर आणि परिसर, ते वर्णन डोक्यात पक्कं बसलं होतं. प्रत्यक्षात सुद्धा अतिशय आवडलं… श्रीशैलमचं मंदिर आणि तो निसर्ग, परिसर सगळंच..

  फार फार फार पूर्वीच्या काळी म्हणजे साधारण जेव्हा वैदिक (हिंदू) धर्म मरणासन्न होण्याच्या तयारीत होता आणि बौद्ध धर्माचा प्रभाव प्रचंड वाढत होता त्यावेळी शंकराचार्यांनी प्रचंड कार्य करून, अभ्यास करून बौद्ध विद्वानांना चर्चा/वादविवादात हरवून वैदिक धर्माला पुन्हा मानाचं स्थान मिळवून दिलं होतं. त्यामुळे तेव्हा आणि त्यानंतरच्या काही शंकराचार्यांना समाजात खूप आदर होता, मान होता. त्यांच्यापुढे आताचे शंकराचार्य म्हणजे अगदी काहीच नाहीत आणि त्यात पुन्हा काँग्रेसकडून त्यांची पद्धतशीरपणे बदनामी करण्याचे प्रयत्न चालू असतातच. (काही वर्षांपूर्वी शंकराचार्यांना मुद्दाम दिवाळीच्या दिवशी अटक करण्यात आली होती हे आठवत असेल तुम्हाला.) .. असो शंकराचार्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न नाही किंवा मी त्यांना फार मानतो आणि ते हिंदू धर्माचे सर्वेसर्वा आहेत असं वगैरे मुळीच नाही. निदान मला तरी असं वाटत नाही.. असो.. फक्त वस्तुस्थिती सांगितली.

  आणि हो.. प्राचीन म्हणजे जुनं, अर्वाचीन म्हणजे अलिकडचं. 🙂

  • हेरंब
   जयेंद्र सरस्वतींना खरं तर कॉंग्रेस घाबरत असेल असे मला तरी वाटत नाही. त्यांचा राजकीय प्रभाव किंवा सामाजिक प्रभाव फारच नगण्य आहे. म्हणूनच कॉंग्रेसने जेंव्हा जयेंद्र सरस्वतींना अटक केली तेंव्हा मला तरी जयेंद्र सरस्वती यांनी काही तरी केलं असावं अशीच शंका आली होती.
   जर आज रामदेव बाबाला अटक केली, तर ती राजकीय हेतूने असे म्हणता येईल, पण कुणाच्याच खिजगणतीततही नसलेल्या जयेंद्र सरस्वतींना अटक करुन त्यांना विनाकारण प्रसिध्दी देण्याचे काम कॉंग्रेसने मुद्दाम केले नसावे असे वाटते.

   • नाही. कोंग्रेस त्यांना घाबरते म्हणून असं केलं किंवा त्यांचा प्रभाव आहे म्हणून केलं असं मी म्हणतच नाहीये. किंबहुना प्रभाव नाहीच आहे. मी म्हंटलंही आहे तसं. पण हिंदु धर्मातल्या सर्वोच्च (आपण मानो अथवा न मानो. विकीबाबाही तेच म्हणतात) व्यक्तीला मुद्दाम दिवाळीच्या दिवशी अटक केलं गेलेलं बघून अशी शंका आली होती. अनेक वर्तमानपत्रांमध्ये (अर्थातच लोकसत्ता सोडून) अशा आशयाच्या बातम्या/अग्रलेख आले होते तेव्हा.

    • वर्तमान पत्रांमधे पण वाचलं होतं, ती केस मी बातम्यांमधे पण फॉलो केली होती.
     आपण समाजापासून काहीतरी वेगळे आहोत, ही भूमिका बदलायला हवी शंकराचार्यांनी असे वाटते.

 2. Pingback: Tweets that mention सुवर्ण मंदीर | काय वाटेल ते…….. -- Topsy.com

 3. mau says:

  महेंद्रजी,
  फ़ार सुरेख माहिती दिलीत.धन्यवाद !!
  नक्की जाउन येउ…

  देवस्थानाकडे कुजत असलेला करोडॊ रुपयांचा काय उपयोग केला जाउ शकतो? ते पैसे समाजोपयोगी कामासाठी वापरला जाऊ शकतो का????हा प्रश्न विचार करण्य़ाजोगा खरोखरीच आहे…..
  एक प्राचीन मंदिर म्हणून बघायला नक्कीच आवडॆल…पुन्हा एकदा धन्यवाद !

  • एक ज्योतिर्लिंग म्हणून अवश्य जायला हवे. खूप जुनं आणि सुंदर मंदीर आहे हे. आम्ही फार वेळ थांबलो नाही फक्त दर्शन घेउन लगेच नागार्जुन सागरला जायला निघालो. पण इथे एक पुर्ण दिवस नक्कीच दिला जाउ शकतो. वेळेअभावी बरंच पहायचं राहून गेलं. मुख्य म्हणजे शिवाजी महाराजांचे मंदीर..

 4. madhuri mate says:

  chan mahiti ahe. ya thikani security aste ka? evdhe sone ahe mhanun?

  Paris madhye khup thikani buikdingsna tokana gold plting kel e ahe tyachi athwn zali

  • माधुरी
   प्रतिक्रियेकरता आभार. तिथे सुरक्षा अजिबात काही नाही. नॉर्मल सुरक्षा रक्षक आहेत बस्स..

 5. sumedha says:

  lekh chhanch ahe.
  yavaroon shirdiche saimadir n balajeechi aathavan zali.
  sone pahayala kharech aakarshk vatate.
  pan sonyachya mulamypeksha gorgaribana anna, paani, nivara milane adhik garjeche ahech.
  kityek lok shirdila darvarshee aavrjoon jatat, aata tar kityek thikani ‘pratishirdi’ navane lok mandire bandhatahet.
  tyna he kalat nahi ka jyanchyasati saibaba aayushybhar zatale, tynchyasathi kahi karave.
  sai-babansathi kahi karane, sinhasan, mukut yanchee garaj ahe ka? balajee sonyane itaka madhala ahe ki tyatun tyala jagatale dukh: disat nasave ase vatate.
  aaj gallogalli saibabanchi mandirehi ahet n garibihi ahe, aswachhata aahe, bhrshtachhar ahe.
  lok keval dekhava mhanoon he devbhakti karatat ase vatate.

  • सुमेधा
   मला पण अगदी हेच म्हणायचं होतं, फक्त माझ्यापेक्षा तुम्ही जास्त योग्य मांडलंय शब्दांमधे.साई बाबाला पण सोन्याचा मुकुट, बालाजीला हिऱ्याचा मुकुट दिल्याची घटना ताजी आहे अगदी..

 6. thanthanpal says:

  देवस्थान ही व्यापारी दुकाने झाली आहे. जनतेच्या भावनांचा बाजार मांडून त्यांच्या खिशातील पैसा आपल्या दानपेटीत कसा जमा होईल या बाबत देवस्थानाची मार्केटिंग साखळी कार्यरत असते. ती भाविकांना देवा कडे तुझे मागणे मग तुझे काम होईल.अमक्याला तमक्याला फायदा झाला सांगत त्याने एव्हढे दान दिले सांगितले जाते.आपोआपच भाविकाचा खिसा खाली अन दानपेटी काठोकाठ भरून वाहते. आणि …..

  • ठणठणपाळ
   तुमचे विश्लेषण सुयोग्य आहे. देवाला काही देणं हेच मला मुळात पसंत नाही. साइबाबाच्या मंदिराच्या ट्रस्टींनी अपहार केला म्हणून बातम्या वाचल्या होत्या मध्यंतरी.. बालाजी च्या मंदीरातल्याही पुजाऱ्या बद्दल एक बातमी होतीच!

 7. याआधी हया सुवर्णमंदीराबाबत काहीच माहीती नव्हती.तुमचा प्रश्न खरच विचार करण्यासारखा आहे पण आपल्याला योग्य पर्याय जरी सुचला तरीही हया असल्या ट्रस्टचे चालक-मालक ,सदस्य तसे होवु देणार नाहीत,का ते सर्वांना माहीत आहेच…

  • देवेंद्र
   कित्त्येक करोड रुपये बंद पडून आहेत. त्यांचं काय करायचं हेच देवस्थानाला समजत नाही. इतके पैसे असतांना पण असलेल्या धर्मशाळात रहाण्याचे पैसे द्यावे लागतात तिरूपतीला… काय बोलणार? पैशाचा खेळ आहे सगळा.

 8. लीना चौहान says:

  माहिती खूप छान आहे. आज अनेक देवस्थाने असेच वायफळ खर्च करित आहेत. उदा. शिर्डी, पुण्याचे दगडुशेठ हलवाई गणपती मन्दिर. ज्या साईबाबांने उभे आयुष्य फकिरीत घालवले, त्यांच्या नावाचे देवस्थान आता अब्जाधीश आहे. मध्यंतरी वाचले की संपूर्ण गाभारा चांदिने मढवणार आहेत. सोने चांदी इतके महागले असताना कोण हे इतके दानशूर आले. ही देवस्थाने सुद्धा काही लोकोपयोगी कामे करायची सोडुन सोन्या चान्दिवर कशाला खर्च करतात?

  • गावभर अयोग्य मार्गाने पैसा कमवायचा, आणि मग गिल्टीकॉन्शस मुळे देवापुढे त्या अवैध मार्गाने कमावलेल्या पैशाचा एक लहानसा भाग ठेवायचा. आपल्या कृष्णकृत्यामधे देवाला पण भागीदार करुन घ्यायचं म्हणून.

 9. महेश says:

  दक्षिण भारतात हिदूची देवळे बरीच आहे, पण सरकारचे तिकडे आजीबात लक्ष नाही,तिकडच्या देवळांना काही प्रमाणात इतिहास आहे, तसा महाराष्ट्रात पण आहे, आपल्याला काही गोष्टी माहित नसल्यामुळे दक्षिण भारतातील देवळे माहित नाही अर्थात वेळ काढावा लागेल किंवा माहिती करून घ्यावी लागेल ,सुंदर आपण माहिती दिली ,लोकांनी आर्वजून भेट द्यावी , निसर्गाचा व धार्मिक स्थळाचा स्वाद घ्यावा

  • महेश
   हे मंदीर खूप प्रसिध्द आहे. आपल्याकडे पण अष्टविनायक, अंबाबाई वगैरे मंदीरं आहेतच. 🙂

 10. mi ajun shri shailyam pahilele nahi. shrishailyam baddhal evadhech mahit aahe ki Ravan shrishailya parvtavar barech thikani kahi na kahi karnane pindi thevat hota(lankela ghevun jatana)tyamule tethe baryach pindi nirman jhalelya aahet . shivay shlok pan aahech. etke lok (olakhiche)jaoon aale pan konihi te suvarna mandira sarkhe aahe he sangitle nahi. tumhi chhan mahiti dilit!manamadhe dhumsat aasalelya DANN oorfa LOOT la dujora milala. tya peksha sarva dann SHEGAON la dyave. !! shivarpanamastu!!

  • श्रीशैलम हे मंदीर तर सुंदर आहेच. एकदा तरी अवश्य भेट द्यायला हवी – एक ज्योतिर्लिंग आहे म्हणून तरी जायलाच हवं तिथे शक्य होईल तेंव्हा. तुम्ही दिलेली माहिती मला पण नव्हती- धन्यवाद.

   देवाला पैसे द्यावे का? आणि द्यायचे तर कशाला?
   आपल्या संस्कृती मधे मोठ्या माणसाने लहानांना द्यायची पद्धत आहे. इथे आपण देवाला पैसे देऊन त्याच्या पेक्षा मोठं आहोत हे दाखवू इच्छितो का? साइबाबाच्या शिर्डीला रांगेमध्ये हजारांच्या नोटांचे हार घेतलेले लोकं उभे असतात, त्यांच्या चेहेऱ्यावरचे भाव पाहिले की मजा वाटते. गर्व, स्वतःबद्दलचा ’अहं’ – की मी बाबाला २१ हजाराचा हार घालतो म्हणुन- बघितला की त्या लोकांची कीव पण येते.
   मंदीराला दिलेल्या पैशांची शेवटी तिथले ट्रस्टीच वाट लावतात. आजकाल तर मी पैसे घालणंच बंद केलंय. फक्त मनोभावे हात जोडतो मंदीरात गेलो की.!

   जर दान द्यायचंच, तर ते गरजूंना, गरीबांना दिलेलं बरं असंही वाटतं!

   • सुरेख लेख, महेंद्रदादा 🙂

    <>>>>

    अगदी १००% सहमत. मी ही कुठल्याच मंदीरात पैसे वगैरे टाकत नाही. त्या जगन्नियंत्याला आपण पामर काय देणार? खरेतर ते मला देवासमोर स्वत:च्या सुखासाठी चार दोन रुपडे टाकून लाच दिल्यासारखे वाटते. हे साईबाबाला मुकुट अर्पण करणारे, तिरुपतीच्या हंडीत कोट्यावधी रुपयांचे दागिने, रुपये टाकणारे लोक म्हणजे दांभिलतेचा मुर्तीमंत नमुनाच वाटतात मलातर.

    त्यापेक्षा मंदीराच्या बाहेर बसलेल्या भिकारी लोकांना काही दिलेले चांगले. खरेतर मी त्यांनाही पैसे कधीच देत नाही. वाटलेच तर काही खायच्या वस्तु वाटतो.

    • विशाल
     प्रतिक्रियेकरता आभार.अगदी बरोबर, भरपूर पापं करायची, आणि मग देवाला त्या मधे लाच देऊन भागीदार करून घ्यायची पध्दत सुरु करण्यात आलेली आहे. तेवढीच मानसिक शांती.
     गरजवंतांना काही देणं जास्त योग्य! शाळांची पुस्तकं, अनाथाश्रमात वाढदिवसाला स्विट्स वगैरे..

 11. मनोहर says:

  श्री शांकरदिग्विजय या मूळ संस्कृत ग्रंथाचे रामचंद्र मराठे यानी केलेले मराठी भाषांतर उपलब्ध आहे. शंकराचार्यांच्या कार्याची साधारण कल्पना त्यावरून येते.

  • मनोहर
   शंकराचार्य काळानुरुप बदलले नाहीत, आणि समाजापासून तोडल्याप्रमाणे दूर झाले आहेत असे म्हणायचे होते मला. त्यांनी केलेल्या कार्याविषयी काहीच म्हणणे नाही माझे. ते पुस्तक- शंकर दिग्विजय शोधतो आता..

 12. Rajan Mahajan says:

  उत्तम माहिती. या स्थानाबद्दल ऐकले होते. माहिती प्रथमच मिळाली आणि फोटोही प्रथमच पाहिले. धन्यवाद.

  – राजन महाजन

 13. रोहन says:

  शिवरायांच्या वास्तव्याने पावन झालेल्या ह्याठिकाणी जाण्याची अनेक वर्षे झाली इच्छा आहे.. बघुया कधी जमते…

  • नक्कीच जमेल.. तिथे एक शिवाजी महाराजांचे मंदीर पण आहे. एक दिवस मुक्कामाने जा म्हणजे सगळं पहाता येईल. आम्हाला परत जायचं होतं अंधाराच्या पुर्वी म्हणून राहून गेलं.

 14. PDK says:

  Thanathanpal mhanatat tyat barech tathya aahe.
  Shankaracharyani sarvasaamanyaabhimukh Hone phar garajeche Aahe .
  Yaa mandiras Mi 3 varshapurvi bhet dili. darshanalaa phar vel lagala naahi. Pan nemake Aamhi Pindisamor pochalo aani magachya daraane ek shrimant kutumb Darashanas hajar jhaale. Aamhala kshanabharcha darshan gheta aale aani mag Pujaryani nehamipramaane sagalyanaa Pudhe dhakalale. Ekun Aamacha viras jhaalaa. Devdarshanaachi hi gat aataa sagalyach mandirat aahe. yavishayavar 25 feb 2010 la Devadarshan haa lekh mi lihilay to savad asel tar pudhil duvyavar avshy vachun paha.
  http://savadhan.wordpress.com/
  NY-USA
  20-7-10

 15. Srinivas says:

  Not sure if you would read my comments to this old blog.

  I guess you are doubtful about the contribution of existing Shankaracharyas not AADI SHANKARACHARYA..

  One should not doubt the contribution of AADI-Shankaracharya towards Hinduism.
  Our religion could have ended by now if he wasn’t there.

  http://en.wikipedia.org/wiki/Adi_shankara

  • आदी शंकराचार्यांनी बौद्ध धर्मापासून हिंदू धर्माला वाचवले असे काहीसे वाचण्यात आले होते. पण फारशी माहिती नाही.लिंक बद्दल आभार. नक्की वाचतो… धन्यवाद.

 16. Srinivas says:

  Hi,

  Needless to say Wikipedia has become source of any information. You’d definitely know 🙂
  still…. http://en.wikipedia.org/wiki/Adi_shankaracharya

 17. p.a.adhyapak says:

  kharokhar sunder mahiti pan chan aahe

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s