मॅक डी-पिझा हट वगैरे…

happy meal, shrek, kayvattelte, kay vattel te, kay vatel te

हॅपी मिल खेळणं. सध्या श्रेक सुरु आहे.

इंजिनिअरींगच्या परीक्षा संपल्या, आणि दुसऱ्याच दिवशी परवा मोठी मुलगी मैत्रिणींसोबत सिनेमा पाहून आली. घरी येतांना तिच्या जवळ श्रेक मधलं गाढव होतं. माझ्या प्रश्नार्थक नजरेकडे बघून ती म्हणाली, की हॅपी मिल्स घेतलं मॅक डी मधे तिथे मिळालं हे गाढव! या हॅपी मिलचा कन्सेप्ट खरोखरच मॅक डी ला खूप फायदेशीर ठरलाय.

कित्येक मुलं फक्त त्या खेळण्यासाठी हॅपी मिल्स घेतात. हॅपी मिल मधे काय येतं? एक चिज बर्गर, फ्राइज, कोक ! सगळ्या हाय कॅलरीज असलेल्या गोष्टी ज्या मुलांच्या आरोग्याला खूप चांगल्या नाहीत. पण पालकच मुलांना अशा सवयी लावतात असे माझे मत आहे आणि  मी स्वतः पण याचे उदाहरण आहे .

मॅक डी मधे गेल्यावर सॅलड सँडविच कोणीच ऑर्डर करत नाही, तर भरपूर कॅलरीज असलेले चिकन नगेट्स, किंवा बर्गरच घेतलं जातं. यात मिळणाऱ्या कॅलरीज तर शरीराला  घातक असतातच, पण सोबत एखादं मीडियम फ्रेंच फ्राइज पण मुलांना घ्यायला आवडतं- म्हणजे जास्ती अनावश्यक  कॅलरीज.

या जंक फुडला एस्टॅब्लिश करण्यात हॅपी मिलचा खूप मोठा हात आहे हे नक्की! मुलांना तिथे नेलं की मग घरचे सोबत जाणारे आपणही काहीतरी मागवतो- म्हणजे थोडक्यात मुलं त्यांच्यासाठी कस्टमर्स नेतात.मॅक डी मधे गेल्यावर ऑर्डर दिल्यावर त्या काउंटरवरच्या माणसाने एनी थिंग टू ड्रिंक सर?म्हणून विचारल्यावर तुम्ही जेंव्हा, नो थॅंक्स म्हणता- तेंव्हा त्या अस्स्खलित इंग्रजी बोलणाऱ्या २०-२२च्या मुलाच्या चेहेऱ्यावरचे तिरस्कारयुक्त भाव त्याला मुद्दाम शिकवून ठेवले आहेत का? असा संशय नेहेमीच मला येतो.

खाणं झाल्यानंतर शेवटच्या काउंटरवर जाउन पाणी मागता, तेंव्हा १५० मिली ला एक प्लास्टीक ग्लास घेऊन त्या मधे ७५ टक्के भरुन तुम्हाला देतो- अर्थात तेवढ्या पाण्याने (१०० मिली) समाधान होत नाही म्हणून त्या काउंटरवरच्या मुलाच्या काय घाटी माणूस आहे? अशा नजरेकडे सरळ दुर्लक्ष करून  मी तर त्याच्या समोरच न लाजता   चक्क ५-६ ग्लास पाणी पितो. अरे खाणं झाल्यावर पाणी हे लागणारच- मग त्यामधे पाणी मागायची लाज कसली? पण मुलांना मात्र कोक वगैरे सोबत असल्या शिवाय होत नाही. पाणी पिणं हे पण हल्ली बिलो डिग्निटी होत चाललंय. काय बोलणार आपण तरी?

मॅक डी मधे जाणारे, तिथली स्वच्छता आणि क्वॉलिटी वगैरे बाबत बोलतांना कधीच थकत नाहीत. मॅक डी आणि लोकल शेट्टीच्या हॉटेलची तुलना ही नेहेमीच करतात ते लोकं.

माझी दुसरी मुलगी लहान असतांना कुठे जायचं बाहेर खायला म्हंटलं, की मॅक डी म्हणणार हे नक्की-   कारण तिथे गेल्यावर मग हॅपी मिल घ्यायचं की मग खेळणं मिळतं म्हणून .सुरुवातीला आम्हीच कौतूक करायचो, पण लक्षात आलं की हे असं खाणं मुलांना नेह्येमी योग्य नाही म्हणून मग तिला  विचारणे पण सोडून दिले आणि सरळ एखाद्या व्यवस्थित शेट्टी कडे जायचो.. मॅक डी मधे त्या हॅपी मिलच्या बरोबर मिळणाऱ्या खेळण्यामुळे तिथे जाणं तिला आवडायचं. अतिशय हाय कॅलरीज असलेले हे जंक फुड आजकाल खूप कुल समजलं जातंय.

नुकतीच एक गोष्ट वाचनात आली, की मॅक डी च्या हॅपी मिल वर कॅलीफोर्निया मधे  कायद्याने बंद करण्यात आले आहेत. मुलांना जंक फुड खाण्यासाठी ही खेळणी उद्युक्त करतात म्हणून ही स्टेप घेतली गेली आहे. अमेरिकेच्या इतरही भागात अशा केसेस सुरु आहेत. आपल्याकडे यावर कधीच बंदी येणार नाही, कारण उच्चभ्रू लोकं या गोष्टीला मान्यता देऊन चुकले आहेत.मध्यम वर्गीयांना पण हे असे जंक फुड खाण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी २० रुपये मेन्यु पण सुरु करण्यात आलेला आहे. एकदा गिर्हाइक २० रुपयांची वस्तु घ्यायला आत शिरला की मग तिथे इतरही गोष्टी असतातच अट्रॅक्ट करणाऱ्या. मुलांचे वाढदिवस , त्याच्या पार्टी साठी एक लहानसा हॉल पण असतो – बेस्ट मार्केटींग स्ट्रॅटेजी, हॉल जरी तासाभरा साठी फुकट दिला तरी होणारं बिल हे खूप जास्त असतं.

बरं दुसरी गोष्ट जी आहे ती किमती बद्दल! परवाच मी हैद्राबादला असतांना पिझा हट मधे गेलो होतो. तिथे गेल्यावर एक लार्ज पिझा व्हेज आणि एक पास्ता मागवला.एका पिझाची किम्मत किती असावी?मैदा साधारण १०० ग्राम = २ रुपये, कांदा, शिमला मिर्ची, टोमॅटो वगैरे- २ रुपये, चिझ= ५ रुपये. सगळे मिळून होतात जवळपास ९ रुपये- या मधे एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट आणि प्रॉफिट जरी मिळवलं, तरीही किम्मत ही ५० ते  ७५ रुपयांच्या दरम्यान असायला हवी पण प्रत्यक्षात  मात्र बिल मात्र सोबत जोडलंय तसं आलं.

२०  रुपयांची मटेरिअल कॉस्ट असलेला एक पि्झा किम्मत ३७० रुपये आणि टॅक्स जवळपास १०० रुपये!

वर दिलेल्या बिलात   मला प्रत्येकच गोष्ट ही आक्षेपार्ह वाटली. जर तुमचे रेट्स असे अव्वाच्या सव्वा असतील तर मग वर पुन्हा सर्व्हिस  चार्जेस कशाला? आणि अशी कुठली सर्व्हिस देता तुम्ही ? तुम्ही तयार केलेला पिझ्झा एका डिश मधे ठेऊन टेबलवर देणे बस्स! त्यासाठी इतके पैसे म्हणजे दहा टक्के लागतात का?

बिलावरून एक गोष्ट लक्षात येईल की मुळ किमतीच्या वर टॅक्स, सर्व्हिस चार्जेसच्या स्वरूपात २५ टक्के रक्कम तुमच्या कडून घेतली जाते.मला तरी ४६८ रू वर १२१ रू टॅक्स म्हणजे वेल प्लान्ड लूट वाटते आहे कस्टमर्सची.वाईट या गोष्टीचं वाटतं की इतकं असूनही गिऱ्हाइके मात्र स्वतःची फसवणूक करून घ्यायला तयार असतात.

खरं तर मेन्यु कार्डमधे दिले जाणारे भाव हे एम आर पी असावेत. म्हणजे इनक्लुझिव ऑफ ऑल टॅक्सेस.  तुम्ही  कस्टमर्स ला मेनु कार्ड  दिल्यावर त्याने रेट्स कॅल्क्युलेट करुन ऑर्डर द्यावी अशी  अपेक्षा असते का?

एकच आहे सरळ जर अशा आऊटलेट्स वर बहिष्कार घातला तर नक्कीच हे असे लोकांना लुबाडण्याचे प्रकार कमी होतील.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खाद्ययात्रा and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

78 Responses to मॅक डी-पिझा हट वगैरे…

 1. Manmaujee says:

  काका, जिथे मॅक डी हा स्टेटस सिंबल झाला आहे…तिथ बहिष्कार घालणार कोण???
  मॅक डी म्हणजे विकतच दुखण आहे तरी पण लोक जातातच…

  • स्टेटस सिंबॉल आपणच बनवलाय. पुर्वी स्वातंत्र्य पुर्व काळात जसे परकीय कपड्यांवर बहिष्कार घातला होता, तितकं सबळ कारण असायला हवं. ते नाही, म्हणुन प्रत्येकाने स्वतःवरच बंधनं घालुन घ्यायला हवी .

 2. thanthanpal says:

  बाबूजी जागतिक करणाचे एवढी किमत चुकवावीच लागेल ही फक्त पैशाची नाही तर अनाआरोग्या विकत घेण्याची किमत आहे..आता राहिला या हॉटेलना जाणाऱ्या चा वर्ग. हा वर्ग या वर बहिष्कार टाकु शकत नाही. हे याच्या मायावी जगण्याचे स्टेटस सिम्बॉल झाले आहे. एरवी मुलांच्या शिक्षणाची फी वाढली की हाच मध्यम वर्ग आंदोलन करतो पण या गोष्टीना मात्र उदार हस्ते खर्च करतो. आपण दाखवलेल्या बिलात ४ माणसाचे कुटुंब भरपेट रुचकर, शरीराला पोषक भारतीय जेवण करून वर आईस्क्रीम सुद्धा खावू शकेल. फास्ट फूड शरीराला अपायकारक असते तसे भारतीय जेवणाचे नाही पण जाहिरातीच्या मम्मी पप्पांच्या जमान्यात हे ऐकणार कोण.

  • मी स्वतः पण कधी जात नाही. पण मुली सारखं तिन चार दिवस दक्षिण भारतीय खाउन कंटाळल्या होत्या म्हणून सोबत गेलो. एकदा आत शिरल्यावर तिथल मेनु कार्ड पाहिलं आणि माझे तर डोळेच फिरले होते. पण दुपारचे तिन वाजलेले, भुका लागलेल्या होत्या, म्हणून मागवलं.
   जेंव्हा मागवलं, तेंव्हा यावर सर्विस चार्ज एक्स्ट्रॉ आहे हे माहिती नव्हतं, जर माहिती असतं तर सरळ उठुन बाहेर आलो असतो.

 3. Rohit Desai says:

  मस्त आहे लेख,
  “तिरस्कारयुक्त भाव त्याला मुद्दाम शिकवून ठेवले आहेत का” बर जर मराठी मधे बोलले तर कुठून आले हे लोक असक आविर्भाव करताता हे काउंटर वरचे लोक , लूट मांडली आहे या लोकणी. सर्विस चार्ज तर अनाकलनीय आहे पण टिप पण द्या नाहीतर वेटर लोक असे जळजळीत कटाक्षा टाकतात काय बोलणार ?

  • रोहित
   ब्लॉग वर स्वागत. टीप देणे यावर एक लेख पुर्वी लिहिला होता. प्रतिक्रिये करता आभार.

 4. Kiran says:

  If you have heard about a film named ‘Supersize me’. I guess it is almost a american version of views you have expressed over here. If you do not find it, I have it.

 5. mau says:

  मॅक डी हा महा hopeless प्रकार आहे..पण ते आपल्याला किती ही समजले तरी मुलांना समजणॆ किंवा पटणॆ म्हणजे…जरा….कठीण ..[:( ]…..
  आणि काहींना ते कळत पण वळत नाही….सगळा लोचा…मधल्या मधे आपली ओढाताण[:( ]

  • उमा
   आपला मानसिक छळ असतो हा-स्पेशली बिल भरतांना फारच जाणवलं. चारच दिवसात मुली साउथ इंडीयन खाऊन कंटाळल्या होत्या म्हणून तिथे गेलो. ही माझी पहिलीच वेळ होती पिझा हटला जाण्याची, आणि अनूभव फारच वाईट. इतकं असूनही लोकं तिथे जातात- याचंच मला नवल वाटतं. माझी ही शेवटली वेळ पिझ्झा हटला जाण्याची.

 6. vikram says:

  अशा ठिकाणी लुट केली जाते तरीही लोक जातातच एक प्रेस्टीज म्हणून
  बाकी आमच्या गावाकडे असले प्रकार नसल्याने आम्ही यापासून अनभिग्न आहोत

 7. आल्हाद alias Alhad says:

  मॅक डी मधे जाणारे, तिथली स्वच्छता आणि क्वॉलिटी वगैरे बाबत बोलतांना कधिच थकत नाहीत.

  Mac ppl use stale tasteless cheese n mayo n you say they have quality! Just look under the table where you eat or near water filter, it has to be dirty there… Any udipi/ shetty has better cleaners than mac!

  When talking abt hygiene, just chk mac outside andheri west stn or goregaon hub mall!

 8. ngadre says:

  Taste tar astech.Uniformity in taste astech.

  Standard of quality astat.

  Prices vishayi kaaay bolnaar? Prices McDonald kinva Pizza hut chya ichhene tharat nastaat.

  Te simple demand-supply chya rule ne thartaat.

  Ahe ya kimteet pizza kinva burgar vikala jaato, tufaan khap hoto tar kon kami la vikeani ka?

  Tumhi tumchya company chi product 10,000 la vikale jaat asatana 3000 la vikaal ka?

  Jevha tyachi cost jaast mhanoon customer nakarel ani khap kami yeil tevha tee kimmat apoap kami yeil..

  Tyamule demand kami karane ha tumcha upaay perfect aahe.

  Nakaach khau kahi divas.

  Jhak marat vikteel pizza 100 Rs na..

  • नचिकेत
   डिमांड सप्लाय चा नियम इथे पण लागू होऊ शकतोच. २० रुपयांची वस्तू ५०० रुपयांना म्हणजे खूपच झालं. लोकं जातात हेच कारण आहे.
   नवश्रीमंत वर्ग पण स्टेटस सिंबॉल म्हणून जातात पिझझा खायला आणि न कुरकुरता खिशातून पैसे काढून देतात.
   मला असं वाटायचं की मॅक डी आणि पिझ्झा हट चे ’तिकडली ’ पॅरंट कंपनी सगळं ठरवते. इथे आहेत ते सगळॆ फ्रेंचाइझी! त्यांना काय अधिकार असणार?

 9. ठणठणपाळ +१…
  बाप रे काय अमृत वैगेरे टाकुन दिल होत कि काय तुम्हाला त्या पिझ्झात… 🙂

  • अमृत ?? छॆ- छे.. क्विनाइइनची गोळी टाकून दिलं असावं.. आणि खातांना पण नेमका हाच प्रश्न पडला होता मला पण.

 10. Vidyadhar says:

  काका,
  अगदी परवाची गोष्ट आहे. आम्ही चार मित्र एकाच्या घरी जमलो होतो. पिझ्झा मागवायचं ठरलं. एकजण आयटी वाला आहे, त्यामुळे हपिसात मागवणं नेहमीचं, म्हणून त्यालाच फोन करायला लावला. त्याने तीन मिडसाईझ पिझ्झा दोन गार्लिक ब्रेड आणि एक छोटासा केक एव्हढं मागवलं…बिल ७०० म्हणाले फोनवर…
  हा लगेच म्हणाला..एव्हढी ऑर्डर आहे तर मला डिस्काऊंट हवा..(हे ते लोक नेहमीच हपिसात करतात)..लगेच त्यांनी १०० रू कमी केले…
  आता मला सांगा..१०० रू असेच कमी केले??
  ह्याचा अर्थ ह्यांचं प्रॉफिट केव्हढं असेल…
  लुटालूट आहे ही चक्क…

  • विद्याधर
   मटेरिअल कॉस्ट फार तर २०-२५ रुपये असेल. प्रॉफिट मार्जिन खूपच जास्त आहे यांचं.मी माझ्या पासून सुरुवात करणार- बंद करणार अशा ठिकाणी जाणं. अगदीच अनव्व्हायडेबल असेल तरच जायचं अशा ठिकाणी.

 11. सचिन says:

  काका, बहिष्काराची सुरवात आपल्यापासूनच सुरु करायला हवी.
  नचिकेत म्हणतो ते अगदी बरोबर आहे. भरमसाठ किमती असूनदेखील आपण जातोच मग का म्हणून ते किमती कमी ठेवातील.

  टॅक्स तर एक लुटीचाच प्रकार आहे. मोबाईल कंपनी / मक्-डी /होटेल असे बरेचसे जे टॅक्स घेऊनच लुटतात लोकांना.

  • सचिन
   मी स्वतः तर पैसे देतांना इतका हळहळलो, की मी तिथे पुन्हा जाणं शक्यच नाही 🙂
   पण जस्ट इतरांनाही या टॅक्सेसची/ भावाची माहिती व्हावी हा उद्देश होता म्हणून हे पोस्ट लिहिलं.

 12. महेश says:

  सर्वानीच (निदान भारतात) बहिष्कार घातला तर नक्कीच ह्या गोष्टीवर नक्कीच यश येऊ शकेल .सुरवात जरी एकटाने केली तरी माणसे आपल्यापुरते बघतात ,त्याच्यावर सामुदिक बहिष्कार सर्वांनी घातला तर ते शक्य आहे, त्याच्यवर सरकाने बंदी आणावी,

  • महेश
   सरकार काहीच करणार नाही. पण एक गोष्ट लक्षात आली का? सर्व्हिस चार्जेस वर सर्व्हिस टॅक्स भरावा लागतो . हल्ली प्रत्येक सर्व्हिस ही टॅक्सेबल झालेली आहे. इथे त्या सर्व्हिस चार्जेसवर टॅक्स न भरता पैसे बुड्वले जातात सरकारचे. एकदा सरकारी वेब साईटवर जाउन कम्प्लेंट करायला हवी. बघु..

 13. मी स्वत: सगळा बंद केलय हे… नाही तर आधी आठवड्यातून हा विनाकारण फटका होता खिशाला 😦

  • सुहास
   बरं केलंस. माझी ही पहिलीच वेळ होती पिझाहटला जायची. या पुर्वी मुली फक्त आपल्या मैत्रिणींच्या बरोबरच जायच्या. पहिल्या वेळेस बसलेला बांबू कायम लक्षात रहाणार हे नक्की.

 14. Kedar says:

  Masta mudda mandalay tumhi Mahendraji. Tumchya blog chi ya kartach vat pahat asto mi. Yogya mudda yogya veli baher yeto. Agdi kal parvach bayko barobar discuss karat hoto ha prakar. Aho hya saglya US madhlya companya. Te kaay kartat tar ithlya rates cha dharmantar (PuLa vangmay) karun te tase chya tase lavtat aplya kade. Ata he bagha US madhe large (14 inches) pizza sadharan $12 (Dominos) kinwa $10 (Papa John’s) la pan asto. Mhanje sadharan Rs. 500 hotat, jo rate aplya kade pan thoda phar kami jasta pramanat aahe. Mi gelya 5-6 varshat agdi $2 che Large pizza khalle aahet, pan amchya kanjushi chi gatha ithe nako :). Aso. Tar samja $10 la US madhe pizza milto tar to ajchya conversion rate pramane Rs. 460 la jhala. Ata he karna kitpat yogya aahe. US madhe kande $1.2/lb aahe mhanje bagha sadharan Rs. 100/kg hotil. Aplya kade ha rate aahe ka? Tich goshta pizza madhe janarya itar samagri chi. Shivay ithe labour mahag aahe. $8/hr mhanje sadharan Rs.400/hr aplya kade dyave lagle tar ya hotel chalakanchya naki nau nahi ka yenar. Mag evdhi tafavat astana final product same kimti madhe kase kaay viku shaktat he? Tumhala tumchya marketing chya experience mule nakki lakshat ala asel Mahendraji ki mala kaay mhanaychay. Pan tumhi mhanta te khara aahe yala apanach javabdar aahe. Kitihi mahag asla tari 31 dec aaj pizza shivay sajra jhalya sarkha vatat nahi. Amchya lahan pani masta oli bhel ani batate vada vagaire asaycha ho. Status symbol vagaire sagla khup door gela aahe ani ata tyacha vichar pa hot nahi pizza ghetana. Mhanjech mala asa vatata ki hya savayi (vyadhi?) aplyala jadlya aahet, Pizza hut vagaire madhe khana ani mag jhalela kharchachi athavan tya pizza box barobar dusrya divshi kerat takna.

  • केदार
   अगदी बरोबर आहे. मला पण वाटतं की ते आपले तिथले रेट्स इथे रुपयात कन्व्हर्ट करुन आपल्या माथी मारतात. इथले लेबर रेट्स, किंवा इतर वस्तूंचे भाव कमी असल्याने इथले भाव कमी असायल हवेतच.
   ३१ डिसेंबरला पिझा मागवायची पध्दत इथे तरी अजून सुरु झालेली नाही- पण फार वेळ लागणार नाही सुरू व्हायला. आपण अमेरिकेचे (अंध)अनुकरणप्रीय आहोतच..
   आम्ही अजूनही भेळ, वडा वगैरे प्रकार करून ३१ डिसेंबर साजरा करतो ( शेवटी थोडी मिसळ पाव पण असते पोट भरायला म्हणून) 🙂 आणि सोबतच बायकोने बनवलेला एगलेस केक ( ज्याला शिरा म्हंटलं की सौ. करवादते तो… 🙂

 15. savadhan says:

  asaa vichar nehamich mazya manaat gholat ase. ashi tulana karun kaahi upayog pan naahi. piza khannare kon aahet. jyanchya khisaa khulkhultoy asech lok aahet. Apalya ghari kaam karanaari, ker kachara kadhannari Mandali piza khayala jau shakatat kaay ?
  khara mhanaje ha prashna kray shaktishi nigadit ahe. Tumachi kray shakti kami keli ki aapoaap he sagal thambel.
  Aho mi Punyat asato tenvha piza khayala kadhicha jaat naahi. Tya aivaji ghari Uttappa, idali, thalipith karun khana cha jaast pasand karato.
  35 varshapurvi mi shrigonda-Ahmednagar yethe hoto. Kashtila varanvar jayacho.
  Tyaveli kokakolacha phar prastha hota. 200 ml koka kola tyaveli tin rupayala milayacha tar uttam dudha ek rupaya ltr. tenvha Babanrav Pachapute he college madye hote. tyana sahaj mhantal- Aho kokakolacha bhav dudhala milala tar kiti chan hoil ? Jara ase kaahi karata yetey kaa pahaanaa ?
  Pudhe kaahi varshani te sakriy rajkaranaat Aale.
  Aaj kaay paristhiti aahe Dudha Aani kuthalyahi cold drink chi?
  Tenvha Pizaa kaay, Kokakola kaay he sarv jyaancha khisaa garam tyanchyasaathi aahe he dhyanat ghyave.
  aso.
  http://savadhan.wordpress.com

  • कोकाकोला आणि दूध – हा पण एक चांगला मुद्दा आहे. आपण जे अंकल चिप्स चे पाकिट घेतो त्या मधल्या चिप्सचा प्रती किलो भाव किती पडतो ते पण एकदा कृपया बघा. डोळे पांढरे होतात दोन- अडीच हजार रुपये किलोचे वेफर्स खातो आपण!
   खोटं वाटतं? कृपया चेक करा….

 16. Nikhil Sheth says:

  एक साधा प्रश्न, MacD स्टेटस सिम्बॉल खरंच झाला आहे का? मी भारतात असताना कधीही गेलो नव्हतो. आणि इथे आल्यावर वेगळीच गोष्ट निदर्शनास आली आहे. सगळ्यात स्वस्त आणि कचरा अन्न मिळणारी जागा म्हणजे MacD. बाकी सर्व ठिकाणी ज्या किमतीत गोष्टी मिळतात त्याच्यापेक्षा बऱ्याच कमी किमतीत इथे अन्न उपलब्ध होते आणि म्हणून त्यांचा दर्जा कमी असणे हे गृहीत धरले गेले आहे. आणि जर सर्वसाधारण परसेप्शन पहिले, तर असे लक्षात येईल की आपल्याकडे जशी १ रुपयात झुणका-भाकर केंद्रे होती तसे इथे MacD आहे. प्रत्येक गल्लीबोळात स्वस्त अन्न. स्टेटसचा वगैरे काडीमात्र संबंध दुरान्वयेही येत नाही. खरे कारण म्हणजे ‘जे जे उत्तम उदात्त उन्नत’ ऐवजी ‘जे जे विदेशी, महन्मधुर ते ते’ असलेली पाली मानसिक गुलामगिरीच याला कारणीभूत असावी.

  • निखिल
   मॅक् डी मधे बर्थडे पार्टी करणं वगैरे स्टेटस सिंबॉल झालाय हल्ली मध्यमवर्गीयांच्या मधे. इतर कुठल्याही हॉटेलमधे गेलो हे सांगण्यापेक्षा मॅक डी मधे गेलो होतो हे सांगणे प्रतिष्ठेचे समजले जाते मुलांच्या वर्तुळात. मी नेहेमी पहातो, मुली कॉलेजच्या मैत्रीणींच्या सोबत फक्त मॅकडी किंवा डोमिनोजलाच जाते.. एक स्टाइल स्टेटमेंट आहे ते हल्ली.

   “खरे कारण म्हणजे ‘जे जे उत्तम उदात्त उन्नत’ ऐवजी ‘जे जे विदेशी, महन्मधुर ते ते’ असलेली पाली मानसिक गुलामगिरीच याला कारणीभूत असावी.”ही गोष्ट अगदी खरी.

 17. अमेरिकेत मॅकडी‌ आणि टॅको बेल हे ‘चिप फूड’ म्हणून ओळखले जातात, भारतात मात्र त्यांना नकॊ तितकं डोक्यावर चढवलं आहे. अरेरे .. काय हे !

 18. अजय says:

  याला कारण भारतीयांची मानसिक गुलामगिरी आहे. भारत स्वतंत्र झाला असे म्हणतात, मला तर वाटते अजुनही आपण गुलामगिरीतच आहोत. नाहीतर अमेरिकेने जे फेकले तेच वापरण्यात आपल्याला लाज वाटली असती.

  • मानसिक गुलामगीरी- ते करतात ते खूप चांगलं अशी मानसिकता झालेली आहे म्हणुन सगळं अंधानुकरण सुरु आहे सगळं.

 19. चेन रेस्टॉरंट या प्रकारातलं माझं सगळ्यांत नावडतं प्रकरण म्हणजे मॅकडी. एकवेळ मी उपाशी राहीन पण मॅकडीमध्ये खाणार नाही एवढा मला त्याचा तिटकारा आहे. बायकोला पूर्वी खूप आवडायचं म्हणून एकदा तिच्या आग्रहाखातर सीएसटीच्या समोरच्या मॅकमध्ये गेलो होतो. मी बर्गर घेतला. पण इतका बेचव की का घेतला असं झालं आणि पोटही भरलं नाही. मॅकमधून बाहेर येऊन त्याच्यासमोरच्याच पाणीपुरीच्या गाडीवर मॅकच्या बिलाच्या १/१० पैशात पाणीपुरी खाल्ली तेव्हा पोट भरलं 🙂 (अर्थात तेही वाईटच म्हणा. पण असो.)

  पिझ्झा हटचं म्हणाल तर भारतात असताना कळतंय पण वळत नाही असं व्हायचं. अर्थात मी शेवटचा पिझ्झा खाल्ला तेव्हा याची किंमत मीडियम पिझ्झाला १०० रु एवढीच होती. आता ३००+ झालीये???? बाप रे !!!!! खरंच कठीण आहे. घरीच करावा लागणार पिझ्झा आता. आम्ही पूर्वीही बरेचदा घरीच करायचो आणि इथेही करतो. पिझ्झा सोडणं कठीण आहे 🙂

  • हेरंब
   मॅक डी चे रेट्स तसे फार नाहीत. पण पिझा हट वगैरे चे भाव मात्र खूपच अव्वाच्या सव्वा आहेत. घरी करणं कधीही बरं.. आम्ही पण घरी करतोच. डीमांड वाढली तशी किम्मत पण वाढली. लोकांना पण २० रूच्या एका कोक साठी पन्नास रुपये मोजतांना काहीच वाटत नाही!
   क्रय शक्ती वाढलेली आहे आपली म्हणून हे चालतं सगळं.

 20. यात MacD आणि Pizza Hut ची काही चूक नाही. ते कायदेशीर व्यवसाय आहेत. त्यांच्या किमती अवाढव्य असून देखिल लोक तिथे जायला तयार असतील तर त्याला ते किंवा सरकार काय करणार? एक स्वतंत्र आणि प्रजासत्ताक राष्ट्र असल्याने आपल्याला योग्य ते करण्याचे स्वातंत्र्य आणि जबाबदारी ही व्यक्तीवर अवलंबून असते. सरकार प्रत्येक बाबतीत तुम्ही काय करावे आणि काय करू नये हे ठरवायला लागली तर देशाला प्रजासत्ताक का म्हणावे?

  प्रतिक्रिया तिखट वाटल्यास क्षमस्व, पण प्रत्येक बाबतीत सरकारी कायदे, हे मला तरी पटत नाही.

  • सरकार काहीच ठरवू शकत नाही, त्यांचं कामही नाही ते.
   इथे लोकांनीच स्वतः निट समजून निर्णय घ्यावे बस्स… जर शक्य असेल तर खर्च करावे पैसे, पण फक्त आपण कुठल्या वस्तू साठी किती पैसा देतोय याची जाणीव असलेली बरी- म्हणून हे पोस्ट लिहिलं. सर्व्हिस चार्जेस हे टॅक्सेबल असतात, सरळ सरळ टॅक्स चुकवताहेत ते लोकं.. असो..

 21. लीना चौहान says:

  मॅक डी जेव्हा सुरु झाले तेव्हा मी कॉलेज मधे होते. त्यामुळे मॅक डी च भयंकर आकर्षण होते. पण मग ३-४ वेळेस गेल्यावर जरा नव्याची नवलाई संपली आणि एकेक त्रुटी लक्षात यायला लागल्या. मॅक डी, कॅफे कॉफी डे, बरिस्ता, पिझा हट इथे इतक्या मोठ्या आवाजात गाणी लावलेली असतात की शेजारी शेजारी बसुन सुद्धा बोललेल नीट ऎकू येत नाही. बर तिथल्या लोकांना सांगूनही काही फरक पडत नाही. अजिबात आवाज कमी करत नाहीत. शिवाय पदार्थांच्या किमती आणि आमचा पॉकेट मनी यांचे गणित जमेना. त्यामुळे परत आमचा अड्डा मॅक डी मधुन हलला आणि बाहेर भेळवाल्यापाशी स्थिरावला. तेव्हा भेळ ७ रुपयात मिळायची.
  नंतर मी जेव्हा कुवेत ला राहायला आले तेव्हा नवर्याने आवर्जून मॅक डी मधे नेले आणि तिथला व्हेज बर्गर हा भारतात मिळणार्या बर्गर पेक्षा दिडपट मोठा होता आणि चव ही उत्क्रुष्ट होती. शिवाय कोक पेप्सी इ. सर्व कोल्ड्रिंक्स ची चव ही वेगळी होती. शिवाय इथे कुठेही कर्णकर्कश्श गाणी नव्हती. भारता बाहेर जर याच ब्रॅण्ड्स चे पदार्थ खाल्ले तर खरच आपण भारतात कशाचे एवढे पैसे देतो असा प्रश्न पडतो.

  • लीना चौहान says:

   आणि हो पुण्यातल्या मॅक डी मधे दुपारी शाळा सुटल्या नंतर डायरेक्ट तिथेच जेवायला घेऊन येणार्या उच्चभ्रू आया ही पाहिल्यात. हे पाहिल्या नंतर आम्ही मैत्रिणी बराच वेळ पहिल्यांदा हॉटेल मधे केव्हा जेवलो ह्यावर चर्चा करत होतो. मला स्वतः ला मी आठवीत असताना हॉटेल मधे जेवलॊ होतो एवढे आठवत आहे. त्या आधी बागेतली भॆळ कधी वडा पाव कच्छी दाबेली इ पलिकडे बाहेर काही खाल्ल्याचे आठवत नाही.

  • लीना चौहान says:

   आणि हो पुण्यातल्या मॅक डी मधे दुपारी शाळा सुटल्या नंतर मुलांना डायरेक्ट तिथेच जेवायला घेऊन येणार्या उच्चभ्रू आया ही पाहिल्यात. हे पाहिल्या नंतर आम्ही मैत्रिणी बराच वेळ पहिल्यांदा हॉटेल मधे केव्हा जेवलो ह्यावर चर्चा करत होतो. मला स्वतः ला मी आठवीत असताना हॉटेल मधे जेवलॊ होतो एवढे आठवत आहे. त्या आधी बागेतली भॆळ कधी वडा पाव कच्छी दाबेली इ पलिकडे बाहेर काही खाल्ल्याचे आठवत नाही.

   • इझी मनी असला की असं होतं. मुलांना अशा सवयी लावणारे पालकच असतात…:) नंतर मग मुलाने जास्त पॉकेट मनी मागितला की ओरडा करण्यात काय अर्थ आहे?

 22. Nachiket says:

  मला वाटतं आपण इथे दोन मुद्दे मिसळत आहोत.

  एक. क्वालिटी. ती माझ्या मते आणि इथल्या इतर काहींच्या मते चांगली असते. टेस्ट हा पर्सेप्शनचा मुद्दा झाला. बटाटेवडा, भेळ, मिसळ असे मसालेदार पदार्थ आणि तुलनेत फिक्या चवीचे परदेशी पदार्थ यांच्या टेस्टची तुलना होऊ शकत नाही.

  ते पदार्थ वेगळ्या जीनर चे आहेत. जसे रॉक, पॉप, शास्त्रीय असं संगीत वेगवेगळं असतं. आपल्याला जो प्रकार आवडतो तिथे आपण जातो.

  आरोग्याला अपायकारक तर ते आहेच. पण ते काही स्पेसिफिक टू माक डी, डॉमिनोज नाही.

  आपले गुलाब जाम, मटन मसाला, वगैरे बरोबरीचे कोलेस्टेरोल चॅम्पियन आहेत.

  आता किंमतीचा मुद्दा.

  तो थोडा योग्य आहे. पण ओव्हरऑल पटण्यासारखा नाही.

  नुसता उत्पादन खर्च मोजून आणि मार्जिन त्यात add करून जी किंमत येईल तीच एम.आर.पी. असावी हे लॉजिक भावनेच्या दृष्टीने ठीक पण अर्थशास्त्रीय दृष्टीनं चूक.

  त्यात डॉमिनोजची ब्रांड इक्विटी आहे. आज पिझ्झा हट, डॉमिनोज मध्ये वीक एंड ला वेटिंग असते तासभर.
  कोणी तुम्हाला हात पाय बांधून जबरदस्तीनं तिथे नेलेलं नसतं.

  ते काही तुम्हाला फसवत नाहीयेत. आमचा पिझ्झा खाउन अमुक आजार बरा होतो. किंवा उंची वाढते असे खोटे दावे करून जास्त किंमतीला विकत असते तर ते कायदेशीर कारवाईला पात्र झाले असते.

  एका गोष्टीसाठी आत जायचं आणि मोहात पडून दुसरंही काही उगीच घ्यायचा ही “लालच आहा लप लपा” वृत्ती ग्राहकाची आहे.

  कंपनी फक्त ती टॅप करतेय.

  पिणारे उच्चभ्रू दहा रुपये उत्पादन खर्च आणि पंचवीस रुपये विक्री अशी किंमत असलेली “संत्रा” सोडून तेवढ्याच मि.ली ची तीनशे ची रॉयल चालेंज घेतात ना?

  पाच रुपयांची वस्तू पाचशेला विकणं हे एक स्किल आहे. आपण भारतीय हे स्किल शिकून घेऊ आणि बाहेरून कमवू तेव्हा ते खरं हित असेल आपलं.

  आपण टार्गेट करूया…. पण नक्की कशाबद्दल ते ठरवून.

  • नचिकेत
   प्रॉफिट मार्जिन ही डिमांडवरच अवलंबून असते. डिमांड कमी झाली हे लोकं मग बाय वन गेट वन फ्री अशा स्किम्स लावतात. बिल हातात आलं की आपण सरळ भरतो खालची किमत बघून , पण बरेचदा किती जास्त पैसे देतोय आपण हे आपण दुरलक्षित करतो. तिकडे लक्ष वेधायचे होते मला.
   डीमांड कमी झाली तरच किमती कमी होतील, हे बाकी पटण्यासारखे आहे. ब्रांड इक्विटी तयार करायला ते लाखो रुपये खर्च करतात… जाहिराती वगैरे मधे.

   पाच रुपयांची वस्तू पाचशेला विकणं हे एक स्किल आहे. आपण भारतीय हे स्किल शिकून घेऊ आणि बाहेरून कमवू तेव्हा ते खरं हित असेल आपलं हे बाकी अगदी खरं.

   • Nachiket says:

    बरोबर.
    मी तुम्हाला पूरक असंच लिहिलंय. घाला बहिष्कार. मग येतील ना किमती खाली.

    आणि हो. “पाच ची वस्तू पाचशेला” साठी कोणीतरी उठून कोकम सरबत “कोकम कोला” नावाखाली २ डॉलरला कॅन अशा दरानं एक्स्पोर्ट केला तर ? बहार येईल.

 23. Raj says:

  मी जॉर्डन ला असताना तेथे पीझझा हट च्या पाशी एअक बेकारी होती
  त्यात पीझझा २५% किम्तिल
  लांब क्यू ऑर्डर करायला पैसे देलि की विदिन १५ मिनिट्स डेलिवरी
  टयशा बेकारी आपल्या देशायात पाहिजेत

  • आपल्या देशात पण शेट्टी कडे मिळणारा पिझा पण चांगला असतो. ( ईंडीयन टेस्ट) किम्मत पण कमीच असते. तरीही पिझा हट ची क्रेझ आहेच.

 24. sanjay says:

  आपला मराठी पीझझा (थालपीठ) वाईट आहे काय?
  एकधा करेन पहा कांदा चे थालपीठ

 25. संजय बरोबर म्हणतात . थालीपिथाचे कितीतरी प्रकार पिझ्झाला हरवतील हल्ली आई वडीलच मुलांना बिघडवतात.

  • अगदी बरोबर.. आई वडीलच मुलांना बिघडवण्यास कारणीभूत असतात. सुरुवातीला एक गम्मत म्हणुन ्त्या ठिकाणी नेलं असतं, पण लवकरच त्याची सवय पण लागते. आणि मग केस पुर्णपणे हाताबाहेर गेलेली असते.

 26. Pingback: मॅक डी-पिझा हट वगैरे… | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA.

 27. poojaxyz says:

  chaan lihile aahe.

 28. sonalw says:

  uttam post aani uttam post-post charcha dekhil.
  मुलांना अशा सवयी लावणारे पालकच असतात…:) he 100% patal.
  aani ‘maansik’ gulamgiri cha mudda tar aaplya ekun wyawsthecha mool problem aahe.
  Mag te MacD aso ki marathi bhashecha mudda aso. ti jar sodali tar nachiket mhanato tasa kokam kola khapayla wel laagnar nahi.

 29. Aparna says:

  सोमेश आणि निखिल यांना अनुमोदन…मी इथे जीवावर आलं तरी मॅक-डि मध्ये जायचं टाळते..पण मजा म्हणजे मुंबईत असताना अंधेरीतलं आमचं भेटायचं ठिकाण ते असल्यामुळे जाणं व्हायचं..तेव्हाही महाग वाटायचं पण तरी ती हॅपी मिल्सची खेळणी माझ्या डेस्कवर होती…आता हसायला येतं..
  बाकी ही परदेशी साखळी दुकानं बरोबर डॉ.चं रु.मध्ये रुपांतर करुन महाग वस्तू आपल्या गळ्यात मारतात आता त्या भावाने आपणच त्या घेऊ नये….एक ग्राहक म्हणून आपण इतकं करु शकतो…मग त्यांचे दर सुधरतील अशी भाबडी आशा ठेऊया आणखी काय??/

 30. Nachiket says:

  अमेरिकेत म्हणे एक बर्गर निघाला आहे. त्यात ८००० (अक्षरी आठ हजार ) कॅलरीज असतात. एका बर्गर मध्ये.
  त्याचं नाव म्हणे हार्ट अटॅक बर्गर.
  त्या थीम रेस्टोरंट मध्ये म्हणे वेट्रेस नर्स च्या ड्रेस मध्ये असतात आणि बर्गर खाऊन झाल्यावर व्हीलचेअर कि स्ट्रेचर कशानेतरी कस्टमरला बाहेर नेतात. (अर्थात थीम म्हणून)

  अमेरिकनांच्या फॅड ला माझा सलाम.

  • कसली भन्नाट कल्पना आहे. पण निगेटिव्ह पब्लिसिटी पण उपयोगी होऊ शकते . नाहीतर कोण जाईल मुद्दाल आठ हजार कॅलरीचा बर्गर खायला?

 31. sonalw says:

  @nachiket: ‘waichrik diwalkhori’ kinwa ‘Bhikeche dohale’ theme as naw thewuya ka aapan tya themech? 😀

 32. Nachiket says:

  @ Sonal. Correct.

  Apan Mahendrajinchya blog la chat katta banavoon takale kaay ?

  Mahendraji bhadaktil aaplyavar ani block karun taktil..

 33. Sneha says:

  Kaka, Lekh ekdum mast ch aahe, sagale mudde agadi kharach patnya sarkhe aahet. Aaj kal chi pidhi krutrim goshtina far ch aakarshit hot aahe. Lekha madhe fakt ek shabd khatakala – “GHATI”. Me Shivajiraje Bhosale boltoy pahilya pasun mala vatla hota hya shabdachi pratima aata badalali asel. Apan badal aanala tar ghadel. “Abhiman aahe amhala ghati asnyacha”

 34. shreevardhan says:

  लेख वास्तववादी वाटला. तुम्ही वर सांगितल्याप्रमाणे माझापण अनुभव आहे. त्यामुळे मी मॅक-डी-पिझा-हट मध्ये जाणे बंद केले आहे. मला वाटत तुम्ही हा लेख ‘सकाळ’ अथवा कोणत्याही वृत्तपत्रामध्ये दिल्यास त्याचा लाभ खुप वाचकांना घेता येईल.

  –श्रीवर्धन

  • श्रीवर्धनजी
   ब्लॉग वर स्वागत.. अहो मीस्वतः कु्ठल्याही पेपरकडे लेख पाठवत नाही.पण जर त्यांनी विचारले तर नकार पण देत नाही. या लेखाबद्दल कोणीच विचारले नाही.म्हणुन दिला नाही.
   प्रतिक्रियेसाठी आभार.

 35. swapna says:

  ghari pizza karun paha.. 10-15 la padto.. aani atishay sundar chav yete..fakt microwave hava. aani me aakurdi madhye ek burger point aahe tithech nehami burger khate. aaj sudhha to rs. 12 la cheeze burger asto aani 4 varshat rs.2 chi vadh fakt. pan ajun kuni te khaun aajri padlyach aikla nahi. to manus he sagla aaplya samor banvato. kuthehi ghan nahi. matra he pizza hut aani mac-d vale aat kai kartat te aaplyala kai mahiti?
  hya var upay mhanje ghari banavun kha. clean, hygenic, chavishta….swasta… variations sudhha karta yetat tyat..

 36. Ashwini Khadilkar says:

  Mahendra,

  What you have written is absolutely right. I have stopped ordering pizza from pizza hut It is also extremely oily and bad for health. I am based in Hyderabad. I could have invited your family for a proper Marathi dinner. varanbhat etc 🙂

  • अश्विनी
   मनःपुर्वक आभार… आणि ब्लॉग वर स्वागत. तो एक एपिसोड सोडला तर हैद्राबादची ट्रिप मस्त झाली.
   हैद्राबाद वर बरंच काही लिहायचं होतं.. पण राहून गेलं. स्पेशली नागार्जुन सागर वर.. आणि तारामती हॉटेल वर.. लिहिन लवकरच.. 🙂

 37. Gurunath says:

  मी पुणे पिझ्झा हट मधे, मराठीत सर्व्हिस दे, म्हणाल्यावर तो वेटर इतक्या खराब आवाजात मराठी नहीं आती है म्हणाला होता, की पिझ्झा गेला @#$%^& ,पण ह्याला धडा शिकवायचाच ह्या लिटरली खुन्नस नेच अर्धा तास दंगा केला होता….. त्याला घाल घाल शिव्या घातल्या अन वरतुन मॅनेजर ची पण बीन पाण्याची केली….. शेवटी मराठी स्पिकींग वेटर अटेंड करायला आला, अन आमच्या शौर्याचे पुरस्कार म्हणुन फ़ुकट मॉकटेल मिळाले!!!

 38. Gurunath says:

  अमेरिकन कंपन्या खरेच लै लुटतात राव, अरे साले २० रुपड्यात बालाजी किंवा हल्दीराम भुजियावाला, ४ माणसांना चकना म्हणुन पुरेल किंवा एक माणुस खाईल इतके चिप्स देतो…. अन २० रुपयात लेज!!! १/४ असते फ़क्त बालाजी वेफ़र्स च्या….. निव्वळ फ़ालतु आहे सारे…..

 39. Vaibhav says:

  जाम आवडली ही post मला, काका. एकदम सत्यवचनी…!!! आता माझाच अनुभव बघा ना. आमच्या मित्रमैत्रिणींच्या group सोबत आयुष्यात प्रथमच मी Mc D मध्ये गेलो होतो, पुण्यातल्या J M रोड शेजारी..!! आता थोडे खाणे झाल्यावर मला पाणी कुठे दिसेना म्हणून पाण्याची विचारणा केली तर मला counter वर जायला सांगितले. तिथे गेल्यावर प्यायला पाणी मागितले तर त्या महाभागाने मला दुसऱ्या worker कडे पाठवले. खरे तर पाणी अगदी त्याच्या हाताशी होते. त्यांचे वागणे सुद्धा इतके तुसडे होते की कुठून इथे आलो असे झाले. तिथे सुद्धा बराचवेळ वाट पाहिल्यावर आणि खुपदा विचारणा केल्यावर कुठे मला पाणी मिळाले. आणि ते पण किती तर एक छोटासा ग्लास…!!! एवढा मनस्ताप झाला तुम्हाला सांगतो की पुन्हा पाणी मागण्याची सुद्धा इच्छा झाली नाही. तेव्हाच ठरवले की या पुढे Mc D मध्ये चुकुनही जायचे नाही….!!!!!

  • वैभव
   परवा पुन्हा काही मित्रांसोबत गेलो होतो, तर चक्क ४३ टक्के टॅक्स लावलेला दिसला. 😦
   असो.

   • बापरे….!!! ‘गोड बोला आणि पैसे काढा’ असाच प्रकार दिसतोय हा….

    • इतके टॅक्स जे लावतात, ते कसा काय़? माझं मत आहे, की इतका टॅक्स कुठेच नसतो, हा सगळा आपल्याला उल्लू बनवण्याचा प्रकार आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s