मेकप

अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे हा स्त्रियांचा. मेकप शिवाय घराबाहेर पडणं म्हणजे नकोसं वाटतं. अर्थात मेकप चा (चे) थर किती ? हे मात्र कुठे जायचंय त्यावर अवलंबून असतं.मेकपला दहा मिनिटे ते दोन तास कितीही वेळ लागू शकतो.

पुर्वी  बरं होतं, मुली घरून पावडर कुंकू करून निघाल्या की झालं. बरं पावडरचा डबा पण एकच असायचा- पॉंड्स-आणि उन्हाळ्यात नायसील. पुरुषांची पावडर वेगळी ,स्त्रियांची वेगळी अशी चैन नसायची. हल्ली  पुरुषांची पावडर तर वेगळी असतेच, पण सोबतच  बॉडी डीओ मधे पण पुरुषांच- स्त्रियांचं असा  वेगवेगळा असतो. कधी दुकानात डिओ किंवा पर्फ्युम विकत  घ्यायला गेलो की नेमका आपल्याला आवडणारा पर्फ्युम  हा नेहेमी स्त्रियांचा पर्फ्युमच का बरं असतो ?  माझ्या बाबतीत तरी हे खरं आहे, मला नेहेमी स्त्रियांसाठी म्हणून असलेलाच पर्फ्युम आवडतो, 🙂 सौ. म्हणते म्हणूनच तो स्त्रियांचा आहे. पण एक गम्मत म्हणजे स्त्रियांसाठी असलेला विशेष पर्फ्युम मात्र स्त्रियांना कधीच आवडत नाही! असो, विषयांतर होतंय..

मेकप करणे किंवा तयार होणे म्हणजे या मधे बरच काही येतं.  अगदी खूप दाट फाउंडेशन – जर सावळा रंग असेल तर चेहेरा जांभळा होई पर्यंत ( खारा दाणा ) चोपडायचं  आणि त्यावर पावडर वगैरे लावून ’तयार’ व्हायचं.  वर बोल्ड लिप्स्टीक लावलं की आपण खूप सुंदर दिसतो असा भ्रम असतो बऱ्याच स्त्रियांचा. सावळा मेकप पण चांगला दिसतो हे काजोलने दाखवून दिले, तरीही भारतीय स्त्रियांचा गोरा होण्याचा हट्ट सोडण्यास तयार नसतात,  हाच रोग हल्ली पुरुषांमध्ये जाणवतो- अहो खास क्रिम निघालंय पुरुषांनी गोरं होण्याचं .

एखादं लग्न वगैरे असेल तर गळ्यात घातलेल्या त्या नेकलेसचा पाठीवर लोंबणारा तो गोंडा  विचित्र दिसतो असं कितीही वेळ कळकळीने स्त्रियांना  सांगितले तरीही त्यांना कधीच पटत नाही.खोटे ्कानातले, गळ्यातले वगैरे हे  पण मेकपचा एक भाग आहे.मला स्वतःला स्त्रियांनी लिप्स्टीक वगैरे तर अजिबात आवडत नाही- जरी लावली तरी अगदी लाइट कलर, मोस्टली नॅचरल ठिक वाटतं पण गोऱ्या स्त्रियांना लाल भडक, डार्क ब्राउन, कॉपर कलर तर अगदी बघवत नाही.असा भडक मेकप केलेल्या स्त्रियांना  पाहिल्यावर त्यांची तुलना कोणाशी केली जाते हे लिहित नाही. जरी बोललं नाही, तरीही मनातल्या मनात तशी तुलना होतेच.

गोरा रंग असेल तर असे डार्क लिपस्टिक्स अगदी वाईट्ट दिसतात , अर्थात हे सांगायचा प्रयत्न कधीच करु नका, कारण ही गोष्ट  स्त्रियांना कधीच पटत नाही, लिपस्टिक्स लावल्याशिवाय आपण चांगले दिसू शकतो हा सेल्फ कॉन्फिडन्स पुर्ण पणे संपलेला असतो आजकाल बऱ्याचशा स्त्रियांचा – असे त्या सर्व्हे मधे लक्षात आले.

मला स्वतःला अगदी नअ‍ॅचरल लुक जास्त अपिलिंग वाटतो. बरं हे आता मी या वयात आहे म्हणून नाही, तर अगदी पुर्वीपासूनच मला कोणी अती मेकप केलेला असला की  तिकडे बघणं टाळावंसं वाटायचं. स्पेशली डोळ्याखाली किंवा पापण्यांचा मेकप, गालावरची हाडं ( चिक बोन्स) रंगवणं , आणि डार्क लिप्स्टीक म्हणजे माझ्या दृष्टिने नो नो.ह्या लिपस्टीकचा शोध लावणारा जर सापडला तर सरळ फाशी देईन त्याला मी 🙂 …असो..

स्त्रियांच्या मेकप कडे फक्त दुसऱ्या स्त्रियाच लक्ष देतात- पुरुषांना तर अजिबात इंटरेस्ट नसतो. आत्तापर्यंत मला तर असं वाटायचं  की स्त्रियांनी केलेला   मेकप न आवडणं हा माझ्यातलाच दोष आहे . पण नुकताच एक सर्व्हे वाचनात आला. डेली मेल नावाच्या वृत्तपत्रा तर्फे हा सर्व्हे करण्यात आला होता. तो वाचला आणि जाणवलं की नाही.. बरेच लोकं आहेत की आपल्या सारखे, उलट मेजॉरीटी आहे आपल्यासारख्या पुरुषांची, आणि  एकदम छान वाटलं- म्हणून हे पोस्ट.

सर्व्हे  मध्ये बऱ्याच पुरुषांनी मान्य केले आहे की त्यांच्या मते त्यांच्या रिलेशनशिप मधे मेकप हा एक बाधा आहे – जरी त्यांनी आपल्या पार्टनरला सांगितले नसले तरीही. त्याच सर्व्हे मधे असंही म्हंटलं आहे की, दुसरी फॅक्ट म्हणजे स्त्रियांना आपली स्किन ही चांगली नाही, त्यामधे काहीतरी डिफेक्ट आहे – मग तो कलर असो, वा  टॅनिंग असो.. काही तरी आहेच असे नेहेमीच वाटत असते. बऱ्याच स्त्रियांनी (२३ टक्के) आपण आपली स्किन झाकायला म्हणून मेकप करतो असे म्हटले आहे. तर ३० टक्के स्त्रियांनी आपण स्वतः मेकप मागे लपतो हे मान्य केलंय. १५ टक्के स्त्रियांनी तर आपण मेकप केल्याशिवाय कधीच बाहेर जाऊ शकणार नाही हे पण मान्य केलंय.

काही सायकॉलॉजिस्ट्सचे तर असेही म्हणणे आहे की बऱ्याचशा स्त्रिया केवळ स्वतःबद्दल कॉन्फिडन्स वाढावा म्हणून मेकप करतात. जर त्यांच्यामधे स्वतः बद्दल पुरेसा कॉन्फिडन्स असेल तर ( किरण बेदी वगैरे सारख्या स्त्रिया) त्या  कधीच मेकप  करणार नाहीत. पुरुषांना डोळ्याचा मेकप  म्हणजे पापण्यांचा   ,  खोट्या पापण्या, पेन्सिलने कोरलेल्या भुवया पण अजिबात आवडत नाहीत- अर्थात हे बोलून दाखवण्याची हिम्मत ते करत नाहीत ही गोष्ट निराळी.

मेकप मधे न आवडणाऱ्या गोष्टींच्या मधे सगळ्यात वर असते ती म्हणजे दातांवर लागलेले लिपस्टिक्स. अतिशय वाईट दिसते ते, वाटतं की सरळ पुसून टाकायला सांगावं त्या बद्दल म्हणून. त्याच सोबत खूप थिक फाउंडेशन, पांडा आईज, डार्क लिपस्टीकचा लायनर, मस्करा, वगैरे गोष्टी आहेतच. फक्त चेहेऱ्यावर लागलेली पावडर,  आणि टु टोन स्किन ( गळा वेगळ्या रंगाचा, चेहेरा वेगळा) पण वाईट दिसते.

मी हे जे वर लिहिले आहे, त्याचा अर्थ म्हणजे अजिबात मेकप करू नये असा नाही. मेकप असावा पण खूप गॉडी नको इतकंच..

.हे पोस्ट पुर्ण लिहिलेले नाही, अजून बरंच काही लिहिलं जाऊ शकतं पण एक पान झालं पुर्ण म्हणून थांबवतो इथेच.

हे बाकी बरंय, एखादा असा सर्व्हे झाला की आपल्याला ’काय वाटेल ते’ लिहिता येतं, आणि आपले विचार अगदीच चूक नाही हे बघुन बरंही वाटतं. हा लेख कृपया पर्सनली घेउ नये ही विनंती.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , , , , , , , , , , , , . Bookmark the permalink.

47 Responses to मेकप

 1. Pingback: Tweets that mention मेकप | काय वाटेल ते…….. -- Topsy.com

 2. sagar says:

  मला सुद्धा मेक अप शिवाय असणार्‍या मूली आवडतात.लिपस्टिक लावल असेल तर मात्र खूप राग येतो मला.

 3. mazejag says:

  chala mag apli changli gatti jamel

 4. जेव्हा मेकप स्वत:च्या समाधानासाठी केला जातो तेव्हा तो नक्कीच प्रेक्षणीय असतो 🙂 पण जेव्हा तो जगाला दाखवण्यासाठी केला जातो तेव्हा तो खरोखर प्रेक्षणीय (?) 😉 बनतो… असे माझे तरी मत आहे. कस्सं….? 😀

 5. रमेश म्हात्रे says:

  अगदी माझ्या मनातल लिहिलं. माझे सुद्धा मेक-अप बद्दल हेच विचार आहेत. मला सुद्धा हाच प्रश्न होता कि स्त्रया मेक-अप का करतात. तुमचा लेख वाचून त्या प्रश्नाची उत्तर भेटली.

  गेल्या दोन महिन्या पासून मी इथेच आहे आणि तुम्ही लिहिलेले सर्वच लेख वाचून काढले. माझ लिखाण तुमच्या एवढं चांगल नाही म्हणून मी जास्त कमेंटस टाकत नाही.
  थोडक्यात सांगायचं तर लेख छान झाला.

  • रमेश
   अहो बेझिझक प्रतिक्रिया देत जा, आणि मी तर म्हणेन की इथे ब्लॉग पण सुरु करा लवकर. जे मनात येईल ते लिहायचे. इथे लिहूनच प्रॅक्टिस झाली माझी. सुरुवातीचे लेख बघा माझे, भरपूर इंग्रजी शब्द वापरले जायचे.
   लिहित रहा, कॉमेंट्स देत रहा.. स्वागत ब्लॉग वर..!

   • रमेश म्हात्रे says:

    मी तुमच्या पेक्षा खूप लहान आहे तुम्ही मला अहो जावो करण्या पेक्षा अरे तुरे केलेलं जास्त आवडेल. ब्लोग लिहण जरा कठीण आहे पण तुमचे लेख नियमित वाचेन.
    तुम्ही प्रत्येक प्रतीकीयेला स्वतंत्र उत्तर देता त्यासाठी धन्यवाद.

    • रमेश
     काही हरकत नाही.. येत रहा, आणि जर कधी ब्लॉग सुरु करावासा वाटला तर जरूर सांग.

 6. Pallavi says:

  मस्त! खरचं Natural beauty is real beauty!

  मला आणखी एक सांगावसं वाटतं, प्रत्येक माणूस (स्त्री व पुरुष) सुंदर असतो, तशी दृष्टी हवी. पुस्तकी वाक्य

  नाहीये, खरंच तसं आहे. कॉन्फिडन्स असेल तर/ स्वत:ला ओळखत असेल तर कोणीही छान दिसते, मेक-अप

  लागत नाही.

  मेक-अप केला तरी, त्यामागचा माणूसच शेवटी महत्वाचा 🙂

  • पल्लवी
   आभार. अगदी खरं आहे, कॉन्फिडन्सची कमतरता अशा मेकप ने भरून काढण्याचा प्रयत्न होतो. सोनिया गांधी,किरण बेदी, मनेका, ममतादी, बहेनजी अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि हे माझं मत नाही, तर त्या सर्व्हे मधे मिळालेल्या माहितीवर अवलंबून तर्क आहे.

   तुम्ही दिलेलं वाक्य जरी पुस्तकी असलं,तरीही अगदी खरं आहे ते…. 🙂

 7. ह्या लिप्स्टीकचा शोध लावणारा जर सापडला तर सरळ फाशी देईन त्याला मी 🙂
  जब्बरदस्त….
  आणि काका आपला सर्वे पण खूप जोरात झालेला दिसतोय….. 😉
  नेहमी प्रमाणे लेख छान झालाय..

  • सागर
   सर्व्हे मी नाही, एका पेपरने केलाय. मी फक्त त्यांचे स्टॅटस्टीक वापरलंय. ओरिजनल सर्व्हेची लिंक पण दिलेली आहे पोस्ट मधे, वाचली असेलच.. 🙂

 8. सोनली केळकर says:

  एकदम सही लिहिले आहे तुम्ही.
  मी ही कधिच मेकप करत नाही.
  मला नेहेमी वाटतं कशाला सुंदर दिसण्याचा एवढा अट्टाहास करायचा?

  • सोनाली
   आहेस तरी कुठे? बरेच दिवसांपासून दिसली नाहीस ती? वर पल्लवीची कॉमेंट दिलेली वाचली का? मस्त वाक्य लिहिलंय 🙂

 9. poojaxyz says:

  tyaache kaay aahe ki, purush make up babtit baykaanitke bhagyavaan nastat,tyanchaa make up madhye aamchyasaarkhi vividhtaa naste,mahnun purush aamhaa baykaanvar jaltaat, baki kaahi naahi!
  aho,prtyekaa chaa choice astoch naa,tumhala kay karayche?
  bye the way,lekh thodaasach aavadala.comment aavadli naslayas ,sorry!!!

  • पूजा
   प्रतिक्रियेकरता आभार.
   पण हे जे फाईंडीग्ज आहेत ते एका सर्व्हेचे आहेत. सर्व्हे हा एका ब्रिटीश पेपरने कंडक्ट केला होता. जेंव्हा त्या बद्दल वाचलं, तेंव्हा मला पण आधी आश्चर्यच वाटलं, की बहुतेक ९० टक्के पुरुषांना खूप गॉडी मेकप आवडत नाही, आणि मोस्टली नॅचरल मेकप किंवा शक्यतो अजिबात नसलेला आवडतो हे वाचून.
   त्या लेखाची लिंक पण दिलेली आहे लेखामधे. त्या मधे काही फोटो पण आहेत अती जास्त मेकप केलेल्यांचे. डार्क लिप्स्टीक पुरुषांना अजिबात आवडत नाही, हे पण त्या सर्व्हेच्या रिपोर्टमधेच आहे. ते पोस्ट जरूर वाचा.. :०

 10. Maithili says:

  😀 mastach jhalay lekh…!!! Natural beauty is alwys appreciable…!!!
  Aani kaka he Panda eyes kay aste? Sounds Funny…!!! Never heard abt it…

  • मैथिली
   गुगल कर.. बरीच माहिती मिळेल. डोळ्याखाली निळा, काळा मेकप तसेच पापण्या पण डार्क मेकप करणे. पांडाच्या डोळ्यांसारखा मेकप.

 11. Girish says:

  MBK, does shaving of beard and trimming of moustache count in mens makeup?? just curious..applying aftershave lotion and hair gel i guess is all make up and we all do it!! some people style their hair upstraight some do it in other style.. i guess that is also make up and some men look wierd or we can say “cheap” or “bhadak”. So i guess men should also keep check on their way!!

  • गिरिश
   शेव्हींग वगैरे बेसिक नेसेसीटी आहे. ते मेकप मधे मोडणार नाही . पण जेल , किंवा ते जेल लाऊन उभे केस ठेवणे वगैरे कदाचित मेकप मधे काउंट केलं जाऊ शकतं. पुरुषांनी केलेल्या मेकप कडे स्त्रियांचं लक्ष असतं? मला नाही वाटत.

 12. मेकप, फार sensative विषयाला हात घातलात महेंद्र काका! लिपस्टिकवाल्यांना गाडू नका हो प्लीज! माफ करा त्यांना!

  लेख आवडला. तुम्ही लिहिलेले मुद्दे पटले. ह्या विषयावरच्या काही प्रतिक्रिया एकांगी वाटल्या. ‘नेहमी छान दिसण्याचा अट्टाहास कशाला?’ असं म्हणाणारे आहेत ह्याचं आश्चर्य वाटलं. मला तर वाटतं, नेहमी छान का दिसू नये? छान हि गोष्ट relative आहे. मेकप केल्यावरच सुंदर/छान दिसतं असं नव्हे. काहींना सौंदर्य जन्मजात असतं काहींना ते जागृत करावं लागतं. जागृत करणं मेकपने नव्हे. मनात चांगले विचार असले कि चेहऱ्यावर अपोआप तेज येतं. उदाहरणार्थ एखाद्या मुलीचं लग्न/लग्नाचा दिवस जसं जसं जवळ येऊ लागतं तशीतशी ती छान दिसू लागते. दिसायला साधारण असलेल्या मुलीच्या चेहऱ्यावर तेज येतं. मनातलं चेहऱ्यावर दिसणं हेच!

  बाकी राहिलं मेकपचं! तो किती करावा आणि किती केल्यावर आपण चांगले दिसतो हे कळायला हवं. सगळ्या “in” असलेल्या गोष्टी आपल्याला आणि आपल्या वयाला शोभतील का हा विचार फक्त मेकपच नाही तर इतर बाबतीत पुरुष व स्त्रिया दोघांनी तपासून घ्यायला हरकत नाही.

  जाता जाता काही हलकं- तुम्हाला चारेक वर्षापूर्वी मुली डोळ्यांच्या कडेला, पापण्यांवर झगमग टिकल्या लावायच्या ते आठवतं का हो?

  • संपदा
   सुंदर लिहिलं आहेस.नेहेमी छान दिसण्याचा आग्रह नाही. जातीच्या सुंदरीला काहीही शोभतं. त्यासाठी मेकपची गरज नसते.
   लग्नाच्या वेळी आपोआप चेहेऱ्यावर तेज येतं. सौंदर्य ही एक रिलेटिव्ह टर्म आहे. मला जे सुंदर दिसते ते कदाचित द्सऱ्याला दिसणार नाही. पण एका गोष्टीचं नवल वाटलं, त्या सर्व्हे प्रमाणे जगातल्या बहुसंख्य पुरुषांना स्त्रियांनी केलेला मेकप आवडत नाही आणि म्हणूनच हे पोस्ट लिहावंस वाटलं. माझं कन्क्लुडींग स्टेटमेंट पहा, मेकप जरूर असावा, फक्त गॉडी नसावा हीच इच्छा प्रत्येक पुरुषाने व्यक्त केलेली आहे.
   काय होतं, एकदा वय ४० च्या आसपास पोहोचलं की मग काही लोकं तरूण दिसायला केस काळे करणं, गॉडी मेकप करणं वगैरे सुरु करतात. मला स्वतःला अगदी माइल्ड मेकप, म्हणजे पावडर कुंकू करून बाहेर पडलेलया स्त्रियांकडे बघायला प्रसन्न वाटतं.
   त्या डोळ्यांच्या कडेला पापण्यांवर लावायच्या खास टिकल्या मला चांगल्याच आठवतात. एका शाळेतल्या डान्स साठी आणायला रात्री बाहेर जावं लागलं होतं. 🙂

   • On a different note, स्त्रियांचे मेकप करणे पुरुषांना एवढे आवडत नसेल तर, are ladies repelling the opposite sex away by doing make-up? विचार करायला हवा.

    • अजिबात नकॊ असेही नाही, पण फक्त अतीरेक किंवा भडक मेकप मात्र खरंच नकोसा वाटतो.

 13. हेमंत आठल्ये says:

  छान लिहिलीत नोंद. आवडली! पण मुलींनी काय लावाव आणि काय नाही. हा त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे माझ्याही कंपनीतील एक मुलगी जरा जास्तच लिपस्टिक लावून येते हे खरे आहे. पण तिने काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. बाकी तुमच्या प्रत्येक नोंदी दमदार असतात. नेहमी बोधकारक असतात. आणि मला खूप आवडतात 🙂

  • हेमंत
   स्त्रियांशी या बाबतीत कधीच बोलू नये, कारण ते त्यांना कधीच पटत नसते. तुम्ही जे काही बोलाल, त्यातून वेगळाच अर्थ काढतात. 🙂

 14. महेश says:

  खरोखर आपण चांगले लिहिले आहे , मेकप करण हातर कोणाचाहि खाजगी प्रश्न आहे, पण वस्तुतिथी मात्र खरी आहे,शोभेल असाच मेकप असावा,

 15. Bharati says:

  वा, मेकअप हा तर स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय…तो करताना मात्र काळजी घेयला हवी.सणासमारंभाला आणि विशेष पेहेरावावर
  मेकअप छान वाटतो..लक्ष वेधून घेण्यासाठी बहुधा केला जात असावा.आता लग्नात नवरी सर्व बायका मुलीत उठून दिसायला हवी..
  कारण समारंभाचे आकर्षण तीच असते..! नाहीतर तिला विचारावे नि खास दाखावावे लागेल ..आज तशी वेळ येत नाही .कपडे आधुनिक असल्यावर मेकअप ओघाने आलाच.तो आपल्याला सूट होईएल असा हवा काही स्त्रिया कर्तूतत्वांने एतक्या महान आहेत की मेकअपची गरज नाही..सुंदर दिसावे असे स्त्रीयाणा वाटत आले आहे नि एथुन पुढे कायम वाटत राहाणार आहे.. त्यामुळे पुरुषाणा आवडी निवडी बदल्याव्या लागणार…हा हा हा ssss

  • भारती
   मेकप किती आणि कसा असावा? मेकप छान वाटतो, पण पुरुषांना आवडत नाही , ही एक फॅक्ट आहे. स्त्रियांनी ती समजून घेतली तर बरेच प्रॉब्लेम्स कमी होतील. स्त्रियांचा मेकप हा इतर स्त्रियाच बघतात. प
   तुमचे हे वाक्य अगदी शंभर नंबरी, आता पुरुषांना आवडी बदलाव्या लागतील! 🙂

 16. pratibha says:

  sunder lihile aahe

 17. Vidyadhar says:

  सगळे मुद्दे मान्य! अगदी मनातलं बोललात काका.
  सादगी में जो मज़ा है…और किसी चीज़ में नही!

  • विद्याधर
   जगातल्या ९० टक्क्यांच्या वर पुरुषांचे हे मत आहे. 🙂 पण स्त्रियांना सांगतांना घाबरतात सगळे.

 18. bhaanasa says:

  मनातले भाव चेह~यावर दिसून येतात. म्हणूनच कदाचित…… :D.
  बाकी मलाही बिलकुल पचनी न पडणारा प्रकार आहे हा.

 19. poojaxyz says:

  kharetar mala hi bhadak make up avadat naahi.ha sarvey vaachala tehva majhe 100% takke shikka mortab jhale tyachavar.baki magchya comments badal punha ekada sorry,chan blog lihila aahe:)

  • पुजा
   अजिबात काही वाईट वाटुन घेऊ नका. अहो प्रत्येकाचे विचार वेळोवेळी बदलत असतात. तुमच्या ह्या कॉमेंट मुळेच आजची पोस्ट कठीण निर्णय सुचली. धन्यवाद.. 🙂

 20. रोहन says:

  दादा… ही कमेंट शमिकाकडून आहे…

  “आर्टिकल मस्त आहे. मेक-अप मध्ये असणारे केमिकल्स ख़ास करून लिपस्टिकमध्ये असणारे ‘लेड’ आपल्या आरोग्यसाठी किती हानिकारक असते हे किते जणांना ठावुक असते???”

  — शमिका…

  • शमिका
   त्या लेड बद्दल आणि या प्रसाधनांच्या प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांबद्दल एकदा पुर्वी वाचलं होतं. त्यावर पण लिहिण्याची इच्छा होती, पण राहून गेलं. नुकताच एक सर्व्हे रिपोर्ट आला , त्यात असंही दिलंय की प्रतिथयश कंपन्यांच्या लिप्स्टीक्स मधे लेड चे प्रमाण जास्त असते. लेड मुळे चमक येते असे दिले होते त्यात.

 21. dinesh says:

  Mahendraji,
  As usual nice post! ya varun ek kissa (swanubhav) athavala. Mazya pahlya naukarit mi Mgt. Trainee mhanun join zalo v 7-8 mahinya nantar, companeet baryach female employee aslyamule ek mulgi mala support sathi denyat aali. Amhala tyaveli first shift madhye yave lagayache. Sakali 5.50 la companichi bus gharajaval stop var yayachi v 6.50 la companit pohachayachi. Ti mulgi evdhya sakali dekhil khup make up karun yayachi v General shift che emloyee yei paryant table varach pengat rahayachi. Tyamule Time office, personnel, HR sagla load mazya varach yaycha. Ek divashi tila vaitagun mi mhanalo ki tu make up madhye jo vel ghalavati tya aivaji ghari zop ghet ja, mhanaje ethe zop yenar nahee.
  Tyanantar tya muline mazyashi bolnech sodun dile v nantar comapnihi.
  Thanks! tumchya lekha mule junya aathawanee tajya zalya..

  • दिनेश,
   काही मुलींना खूप आवड असते . घराबाहेर निघतांना मेकप केला नाही तर कॉन्फिडन्स वाटत नाही – हे उत्तर बहुसंख्य मुलींनी सर्व्हे मधे दिलंय.
   काम न करता चेहेरा रंगवून बसलं की आपण छान दिसतो असं उगिच वाटत असतं त्यांना. आपण काही बोलण्यात अर्थच नसतो खरं म्हणजे..

 22. Sharda Morya says:

  As usual nice article….

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s