तयारी…

मुंबई, पोलीस, तयारी, पावसाची, काय वाट्टॆल ते,kay vatel te, kayvattelte, marathi, mahendrakulkarni

मुंबई पोलीसांची पावसाळ्याला फेस करायची तयारी

परवाच मालाड वेस्ट ला बाटा च्या शेजारी मुंबई पोलिसांची पावसाला तोंड देण्याची   तयारी पुर्ण झालेली दिसली. खरं तर पोलीसांची तयारी म्हणजे काय असायला हवी?   रेनकोट आणि गम बुट – पण तसं नाही .मुंबई पोलीसांनी    तत्परतेने पाऊस येण्यापुर्वीच पुढे दिलेला बोर्ड बनवून ठेवलाय,  पाऊस पडला  आणि झाला सबवे बंद की हे बोर्ड सगळ्या रस्त्यांवर लावायचे झालं.:)

मालाड सबवे ला महापालीकेने लावलेला एक पंप तिथे  लावलेला दिसत होता. या पंपाकडे पाहिल्यावर हा पावसाळ्यात चालेल का? असा विचार सहजच मनात आला. महापालीकेवरच्या विश्वासाची पातळी इतकी कमी झालेली आहे हल्ली, की तिच्या कुठल्याही कामात काळंबेरं दिसत असतं मला.

मालाड सबवेचा पंप

त्या पंपाचे काम काय ? तर  तिथे साचलेले पाणी उचलून मग जवळच्याच अर्धवट बुजलेल्या नाल्यात (कारण तो स्वच्छ केलेला नाही अजूनही) सोडले जाते. नाला अर्थातच पावसाच्या पाण्याने दुथडी भरून वाहात असतो ! तेच पाणी पुन्हा  परत सबवे कडे वाहात येत असतं. काय फायदा त्या पंपाचा? असे कठीण प्रश्न विचारू नका हो..  तर ही अशी तयारी!

असे कचऱ्याचे ढीग अजूनही पडून आहेत.महापालीकेने मुंबईच्या नाल्यांची सफाई करून   त्यातला गाळ, प्लास्टीक कचरा वगैरे काढला आहे , आणि पावसाचा जय्यत सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत असे परवाच मुंबईच्या महापौर म्हणाल्या. त्यांच्या या वाक्यावर काहीच आक्षेप नाही कारण मी स्वतः नाल्यांच्या  काठावर काढून ठेवलेला गाळ गेले महिनाभर  पहातोय. बहुसंख्य प्लास्टीक पिशव्या असलेला हा गाळ नाल्यांच्या शेजारीच पडून आहे  . परवा कचरा नेणाऱ्या ट्रकवाला दिसला, त्याला विचारलं की तू हा गाळ का नेत नाहीस, तर म्हणाला की त्याचं काम हे केवळ घरगुती कचरा नेण्याचं आहे, या साठी वेगळं डीपार्टमेंट आहे, त्यांना सांगा. काय बोलणार?

अजूनही तो कचरा तसाच पडून आहे- फक्त त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याची उंची कमी झालेली आहे- त्या ट्रकवाल्याने उचलून नेल्यामूळे नाही,तर  तो गाळ आणि कचरा पावसाच्या पाण्याने पुन्हा वाहून नाल्यात गेल्यामूळे.  आता पुन्हा महापालीका लोकांना प्लास्टीकचा  कचरा वापरणे कमी करा म्हणून सांगायला मोकळी.जय हो!

मॅन होल कव्हर्स. चक्क प्लास्टीकचे आहेत. बहुतेक सगळेच तुटलेले दिसत होते.

ऐरोलीला  काही काम होतं त्या साठी  इस्टर्नएस्कप्रेस हायवे वरुन ऐरोली पुलावरून उजवा टर्न घेतला आणि ब्रिज पार केला. एका मित्राच्या घरी जायचं होतं. लोखंडी गटारीची झाकणं चोरीला जातात, म्हणुन सिमेंटची झाकणं वापरलेली आजपर्यंत बरेचदा पाहिली होती, पण  ऐरोलीला मात्र मी  फोटोमध्ये दिलेली   प्लास्टीक ची   झाकणं दिसली. एका झाकणावर पाय पडला, तर तुटल्यामुळे ते चक्क आत शिरलं, आणि गटारात पडता पडता वाचलो. इथली ही अशी  अवस्था पाहिली आणि जाणवलं की   पावसाळ्यात जर पाणी साचलं तर  हे मॅन होल एखादा बळी नक्कीच घेईल.

या सगळ्या गोष्टी आजकाल मी सहज पणे सहन करायला शिकलो आहे. फारशी चिडचिड होऊ न देता मी शांतपणे त्या तुटक्या मॅनहोलला वळसा घालून मित्राच्या घरात शिरलो.

mumbai slum in rainy season,धारावी, झोपडपट्टी,माहिम

मुंबई झोपडपट्टी- धारावी

परवाचीच गोष्ट  आहे , हैद्राबादहून येतांना विंडॊ सिट वर होतो. विमानातून मुंबईला लॅंड करतांना सहज बाहेर पाहिलं, तर सगळी धारावी  निळी दिसत होती. बऱ्याच घरांवर  निळं प्लास्टीक टाकलेलं दिसत होतं- घरात  पाणी गळू नये म्हणून ही पण एक तयारी पुर्ण झालेली दिसत होती.

घरी आल्यावर प्रत्येकाची छत्री  दुरुस्ती मोहीम, रेनकोट वगैरे किंवा रबर बुट खरेदी करण्याची घाई सुरु  झालेली होती. पण हे सगळं आधीपासून करणं होत नाही, तर चांगला दोन तिनदा पाऊस पडून गेल्यावर  पावसात भिजल्यावरच हे काम करण्याचं  शहाणपण सुचतं.

सगळे जण आपापल्या पद्धती प्रमाणे  तयारी करतात –  एक गोष्ट बाकी नक्की,्साचलेलं पाणी,  रस्त्यावरचे खड्डे, ट्राफिक जाम, लोकल लेट, ्छत्री मधून भिजलेल्या ओल्या अंगाने केलेला प्रवास, आणि अजून बरंच काही.. . मुंबईकरांच्या सहनशीलतेची कमाल आहे यात काही संशय नाही.स

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक, Uncategorized and tagged , , , , , , , . Bookmark the permalink.

18 Responses to तयारी…

 1. vikram says:

  सगळे आपआपल्या परीने तयारी करतात
  परंतु शेवटी तो निसर्ग आहे त्याच्या मनात आले तर कोणतीच तयारी त्याचा मुकाबला करू शकत नाही 😉

 2. Pingback: Tweets that mention तयारी… | काय वाटेल ते…….. -- Topsy.com

 3. मागच्या रविवारी महाराष्ट्र नेचर पार्कला भेट दिली होती आणि तिथे मिठी नदी पहिल्यांदा बघितली..ह्या मिठी नदीत वर पर्यंत गाळच आहे…आणि बाजूला झगमगीत बीकेसी. परत जरी थोडा जास्त पाउस आला तर हा भाग पाण्यात जाणार हे नक्की.
  तुम्हाला डहाणूकर वाडीतला नाला माहीत असेलच नेमक पावसात त्याच्या पुलाच काम हाती घेतल ते अर्धवट रहिलच पाणी अडकून राहतय…काय तयारी केलीय मुंबई महापालिकेने ते दिसली. एकदम दुर्लक्षित आहे सगळा आणि ते एमएमआरडीए बद्दल काही बोलूच नये सगळी काम अर्धवट ठेवली आहेत…

  • डहाणूकर वाडीतला नाला? कधी पाहिलेला नाही.
   आपणही सगळं मान्यच करतो नां सुहास? काहीच करत नाही आपण? सत्तेवर कॉंग्रेस आहे म्हणून त्यांना नांवं ठेवायची, इथे शिवसेना आहे,तरी पण राज्य सरकारचा सपोर्ट नाही म्हणून पुन्हा कॉंग्रेसलाच नांवं ठेवायची. शिवसेना आपली वाटते म्हणून तिने केलेले सगळे गुन्हे माफ…. चलता है.

 4. Bharati says:

  एका इंजीनीयरला साजेसेच निरीक्षण आहे…आणि जागरूक नागरिक ! माज़यामते तुमच्या सारख्या दोन्ही आघाड्यांवर विजय मिळवणारे सत्तेवर हवेत.. नुसते अधिकार हाती असून काही फरक पडत नाही.काहीतरी नवीन करून हे बदलून टाकणारे कोणीतरी यावे …मुंबईकरांची सहानशक्ति वाखाण्याजोगी हे बाकी खरे…छान लेख!

  • धन्यवाद भारती
   कोणाला सत्ता द्यायची? ती मिळाली की सगळेच बिघडतात… काय बोलणार?

   इथल्या लोकांना दूसरा काही उपायच नाही, ठेविले अनंते तैशेची रहावे , चित्ती असू द्यावे समाधान

 5. हे असेच आहे.तुम्ही कुठेही जा तुम्हाला हेच चित्र आढळेल.
  समाजमन बधिर झालय ना,त्यामुळे सर्वांचे फ़ावते.

  • गंगाधरजी
   ह्या सगळ्या गोष्टींमधे काही चुकतंय असंही कोणाला वाटत नाही .समाज मन आणि सामाजिक जाणीव कमी झाली आहे बस्स.. प्रत्येकजण फक्त स्वतः बद्दलच विचार करतो.

 6. thanthanpal says:

  तयारी…
  या सर्व तय्यारीला आपणच जबाबदार आहोत. आपणाला नशिबाने दर ५ वर्षाने ही तय्यारी करणारी सत्ताधारी बदलण्याची संधी मिळते, पण आपण ही संधी जात, धर्म, पैसा, दारू यात घालवून बसतो. आणि शिकलेले मतदार माझ्या एक मताने काय होणार म्हणत विक एंड साजरा करत घरात रामायण महाभारत पाहत बसतो,जणू कांही समाजात चालू असलेल्या महाभारताशी याचा कांही संबंध नाही, किंवा शिर्डीच्या दर्शनाला निघून जातो . जसे कांही हे बाबा यांच्या सर्व समस्या दूर करणार आहेत. यामुळे जशी जनता तसे राज्यकर्ते ही म्हण आठवते.

  • महापालीकेत शिवसेना आहे. नगरसेवक फक्त हातात सोन्याच्या चेन्स घालून मिरवण्यात मग्न आहेत. मुंबईकरांना गेले कित्येक वर्ष या सगळ्यांची सवय झालेली आहे, म्हणुन त्यांचं फावतंय. बाळासाहेबांचा/ उध्दवचा पण फारसा कंट्रोल नाही महापालीकेवर. त्या नगरसेवकांच्या पार्श्व भागावर फटके मारून कामं करून घ्यायला हवी.
   पुर्वी ९१ मधे जेंव्हा छगनरावांनी शिवसेना सोडली, तेंव्हाचा काळ आणि आजचा काळ खूप फरक आहे.तेंव्हा बाळासाहेबांचा कंट्रोल होता आता कमी झालाय .उध्दव हेलीकॉप्टर मधुन पहाणी करून गेलाय मिठी नदी ची ( हसावं की रडावं हेच कळत नाही अशा बातम्या वाचल्यावर)

 7. Vidyadhar says:

  काका,
  मी पण आहेच, मालाड सबवे पावसाळा फॅन क्लबचा मेंबर. एकदम जोरदार!
  हे नेहमीचं आहे. तो पंप मी पूर्वीही पाहिलाय तिथे. आपली तयारी म्हणजे काढदिवसाची असते. आपण पर्मनंट सोल्युशन काढत नाही. नाहीतर दर वर्षी कॉन्ट्रॅक्ट्स वरती पैसे कसे मिळणार.
  >>महापालीकेवरच्या विश्वासाची पातळी इतकी कमी झालेली आहे हल्ली, की तिच्या कुठल्याही कामात काळंबेरं दिसत असतं मला.
  अहो काका, दिसतं कसलं..असतंच काळबेरं प्रत्येक कामात. 😦

  • अगदी खरं आहे. मला हे खटकलं की या वर्षी पण पाणी साचणार, रस्ते बंद होणारच हे समजून मुद्दाम आधिपासूनच अशा पाटा बनवण्यापेक्षा पाणी न साचेल असे काहीतरी काम करायला हवे. तो पंप कधीच चालत नाही. हा पंप चालतांना कधीच दिसत नाही, एकदा मी पाहिलं होतं की पंपाने पाणी बाहेर फेकत होते, आणि तेच पाणी परत सबवे कडे वाहात येत होते..

 8. bhaanasa says:

  नेहमीच तहान लागल्यावर विहीर खणणारे आपण सारेच. शिवाय कितीही तयारी केली तरी ऐनवेळी ती किती तारेल हा प्रश्नही आहेच. बाकी कुठल्याही कामात काळबेरं दिसतं आणि असतचं…… शी १००% सहमत. 🙂

 9. <<>>> यात एक शब्द राहीला दादा… आपण होवून लादुन घेतलेल्या जबरदस्तीच्या सहनशिलतेची….!
  आपलेच दात आणि आपलेच ओठ. जोपर्यंत आपण स्वत: कृतीशील विरोध करत नाही तो पर्यंत हे असंच चालु राहणार 😦

  • एका वाक्यात सांगू? थोडं अश्लिल वाटेल, पण .. मुंबईकरांनी ती इंग्रजी म्हण पुर्ण आत्मसाथ केलेली आहे – इफ रेप इज अनव्हॉयडेबल, बेटर लाय डाउन ऍंड इंजॉय इट’
   जास्त काय लिहायचं?? एकाच वाक्यात पुर्ण पोस्टचं सार आलं बघ.

 10. Nachiket says:

  काम करण्याचीच तर साली बोंब आहे ना सगळी. मनापासून सगळे काम करत असते तर आपण कुठे असतो..महासत्ता असतो आपणच..

  पैसा खाणं हा मोठा कर्करोग आहे..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s