बंबई

मी जरा लोअर परेलला जाउन  नंतर कस्टमर व्हिजीट  आटोपून डिलरकडे जाईन. म्हणजे परत ऑफिसला येणार की नाही याची खात्री नाही- असं म्हणून तो समोरून निघून गेला. आमच्या   हा इंजिनिअर अगदी खास मुंबईकर बरं कां. अगदी जन्मापासून  मध्य मुंबईतच मोठा झाला. लाल बागेच्या चाळीत याचं लहानपण गेलं, मराठी असल्याचा ( मला वाटतं त्या पेक्षा जन्माने मुंबईकर असल्याचा ) खूप अभिमान आहे त्याला. मराठी पण चांगला बोलतो, आणि म्हणूनच त्याचे हे असे  बोलणे खटकले.

मुंबईकरांच्या मधे दोन प्रकार असतात, एक जन्माने मुंबईकर, आणि दुसरे कर्माने  . कर्माने म्हणजे नोकरी निमित्याने इथे बदलून आलेले , सुरुवातीला आपण हे कुठे येउन पडलोय ? असा त्रासिक भाव चेहेऱ्यावर वागवत फिरणारे, पण नंतर थोड्याच दिवसात इथल्या गर्दीमधे सामावून गर्दीचा एक भाग होऊन रहाणारे असे ’मुंबईकर’ 🙂 . कालच एका मित्राने मला मलाड हा शब्द मालाड या ऐवजी लिहिल्याचे निदर्शनास आणून दिले होते, म्हणून त्या जन्माने आणि कर्माने मुंबईकर असलेल्या मित्राचे लोअर परेल हे कानास खटकले.

माझ्याबद्दल म्हणाल, तर एक वेळ   ठीक आहे ,बाहेरून आलोय मी- म्हणजे दुसऱ्या प्रकारचा मुंबईकर आहे. नोकरी निमित्ताने इथे येऊन झालेला मुंबईकर. माझी  व्यवस्थित शब्द वापरण्यात( मुख्यत्वे करून जागांची नावं )चूक होणं शक्य आहे, पण चक्क खास जन्माने/कर्माने  मुंबईकर असलेलेच जेंव्हा जागांची    मराठी नावं विसरून सरळ इतर भाषिकांनी ठेवलेली नावं वापरतात त्याचे आश्चर्यच वाटले.

आपण सगळे मराठी लोक, किती जागांची नावं व्यवस्थित वापरतो? आपल्याला एक विचित्र खोड आहे. आपण जागांची नांव नेहेमीच बदलत असतो. काही गावांची नावं मराठीत करण्याचा विनाकारण प्रयत्न करतो. जसे भोपाल साठी भोपाळ, ग्वालियर साठी ग्वाल्हेर, इंदौर साठी इंदूर , देहराडून साठी डेहराडून , गोलकोंडा साठी गोवळ कोंडा वगैरे. बरं असंही नाही की आपल्याला ती खरी नावं माहिती नाही, तरीही आपण अट्टाहासाने ती नावं वापरत नाही.

हा असाच हट्टीपणा आपण मराठी नांव वापरताना का दाखवू शकत नाही? सर्वप्रथम मुंबई ला मुंबई म्हणताना आपली जीभ का अडखळते? परप्रांतीयंशी बोलताना त्यान मुंबई  ऐवजी  बंबई शब्द वापरला तर आपण का आक्षेप घेत नाही? बरेचदा आपल्यापैकी  काही लोकं बॉंबे शब्द का वापरतात? ( मी पण त्यात आलोच बरं का! अजाणतेपणी पण हा शब्द वापरला जाऊ नये अशी काळजी घ्यायला हवी हे मला आज  प्रकर्षाने जाणवले)

आज एक प्रश्न विचारावासा वाटतो किती मुंबईकर मराठी लोकं  बांद्रा न म्हणता वांद्रे असे संबोधतात ? बरेचदा तर मराठी मंडळी बॅंड्रा असेही म्हणताना दिसतात वांद्रेला. बॅंड्रा म्हणणे स्टायलिश समजले जाते.  खरा शब्द आहे वांद्रे

बहुसंख्य मराठी  लोकसंख्या असलेलं  विले-पार्ले ! तिथे पण खुद्द मराठी माणसंच त्याला विले-पार्ले असे न म्हणता केवळ  पार्ला असे  म्हणताना दिसतात.  सायन या स्टेशनचे खरे मराठी नांव शीव आहे – ते किती वेळा आपण वापरतो? आणि जर ही नावं वापरात  ठेवली नाहीत तर काळाच्या ओघात ती अपभ्रंशी नावं रुळायला वेळ लागणार नाही  आणि ती  ऑफिशिअल नावं होउन   मराठी नावं काळाच्या गर्भात गाडली जातील .

नुकताच एका मित्राने मुंबईतल्या इतरही  काही विभागाची नावं निदर्शनास आणून दिली की ज्यांचा उच्चार नेहेमी मराठी माणसं पण चुकीचा  करतात.  , सी०एस०टी० ऐवजी  व्ही०टी० , विक्रोळी ऐवजी  विखरोली ( ळ चा नेहेमीच ल असा उच्चार केला जातो) तळेगाव ऐवजी तलेगाव, मालाडचा चिंचवली बंदर मार्ग ऐवजी चिंचोली बंदर रोड , पुणे ऐवजी  पूना , नाशिक  ऐवजी नासिक , सोलापूर ऐवजी  शोलापूर , ठाणे ऐवजी  थाना, थाने , डहाणू ऐवजी  दहानू , कुलाबा  ऐवजी  कोलाबा , वसई ऐवजी   बेसिन . महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांवर बर्‍याच  ठिकाणांची नावे इंग्रजी व हिंदीमध्ये लिहून मराठीला रजा दिलेली असते. अशा पाट्यांवरील मराठी नावांचे हिंदीकरण करमणूक करते व चीडही आणते.

प्रत्येकच बाबतीत अती शुद्ध मराठी वापरावे असा मी आग्रह कधीच धरत नाही.  मी स्वतः टेबलला मी टेबलच म्हणतो , मेज नाही, इंटरनेटला इंटरनेटच म्हणतो, ब्लॉग ला ब्लॉगच म्हणतो. त्या साठी पर्यायी शब्द वापरण्याची गरज वाटत नाही मला पण कमीत कमी गावांची नावं तरी व्यवस्थित वापरली गेली पाहिजे, ती बदलली जाऊ नये असे मला वाटते.

मुंबईला एक विचित्र प्रकार दिसतो, रेल्वे प्लॅटफॉर्म वर जे नावाचे बोर्ड असतात ते इंग्रजी हिंदी गुजराथी मधे असतात. प्रत्येक भाषेतला त्याचा उच्चार वेगळा लिहिलेला दिसतो.

जसे  गुजराती मधे  બાંદ્રા, मराठी मधे  वांद्रे, आणि Bandra   इंग्रजी भाषेत लिहिले जाते. पण इंग्रजीत लिहितांना  Vandre   असे का लिहिले जात नाही? उच्चारा प्रमाणेच लिहायचे तर मग मराठी उच्चाराप्रमाणे का नाही??

याचे कारण  म्हणजे मराठीचा टक्का घसरलाय असे मी म्हणून  स्वतःचे  समाधान करून घेणार  नाही, तर  मराठी मतांच्या मलिद्यावर  निवडून येणारे आणि मराठीचा जोर /आग्रह धरणारे पक्ष मात्र  या मुद्द्याकडे,अ का दुर्लक्ष करतात हे समजत नाही.

नुकतीच एक बातमी वाचली, की कौशल इनामदार बाळासाहेबांना भेटले आणि तिथे त्यांनी मराठी गाणी एफ एम वर न लावले जाण्याबद्दल सांगितले, आणि मग त्यावर बाळासाहेबांनी दम दिल्याचे वाचले. आता याच अनुषंगाने आठवले की पुर्वी एकदा राज ठाकरेंनी पण  असाच जाहिर दम दिला होता मटा च्या माध्यमातून – आणि तो पण  याच  गोष्टीसाठी. पण  बहुतेक त्यांच्याही धमकीला हे हिंदी भा्षिक  रेडीऒ वाले  जुमानत नाही असे दिसून येते- कारण अजूनही मराठी गाणी लावणे सुरु झालेले नाही. मराठी पक्ष एकदम ढिले पडलेले  दिसतात या प्रश्नावर.ह्या गोष्टीबद्दल   बऱ्याच लोकांनी शिवसेनेच्या आणि मनसेच्या  साईटवर जाऊन लिहिलं होतं.. पण…… असो.विषयांतर झालंय .

इतर कुठल्याही प्रांतात गावाचे वेगवेगळ्या भाषेत नांव बदलल्याचे माझ्या तरी पहाण्यात नाही. मग फक्त मराठी नावंच का बदललेली दिसतात?जर आपणच आवर्जून मराठी नावं वापरणे सुरू ठेवले तरच ही नावं टिकतील अन्यथा  मुंबईचे बंबई व्हायला वेळ लागणार नाही.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मराठी and tagged , , , , , , , , , , . Bookmark the permalink.

41 Responses to बंबई

 1. ngadre says:

  Bandra ani Vandre he dokyaat ala navhta buva..kharach ki..point aahe..

  • नचिकेत
   बरेच आहेत अशी नांवं. जसे धुळे ह्याचं स्पेलींग धुलीया असे केले जाते. जळगाव ला जलगांव वगैरे…

 2. sumedha says:

  point ahech kahray. kriti imp. ahe. parava hindi fmvar marathi gaani lavnyavaron barach dhurala udala. pan hindi fm var kadhi (eng. sodun) itar pradeshik bhashanchi gaani lagatat ka.? marathi chanels var kadhi hini cinema lagato ka? kiva akkashvaani marathivar kadhi bangla gaani lavatat ka. itak manase/senevalayana marathicha pulaka asel tar swat: marathi fm suru karave. kinva marathi udyojakana tyasathi dam bharava, kinva swat:kadacha daam ani ghamm mojava. kay?
  manasene bakichya patya marathit karayla lavalya tashya hya stationchya patyahi karalyala lavayala havyat. tyababit manasela ful pathimba ahe.

  • सुमेधा
   स्वतः सुरु करणं फार सोपं आहे. ते तर कोणीही सुरु करू शकेल- राज किंवा उद्धव. पण आहे त्यांना वेसण घालणे जास्त महत्वाचे आहे असे वाटत नाही का? सध्या अस्तित्वात असलेले ते रेडीओ स्टेशन्स कोणाचंच ऐकत नाहीत….. ??

 3. अगदी पूर्ण सहमत. मीही जेव्हा हटकून वांद्रे/वांद्रा, (कधीच बॉम्बे न म्हणता) मुंबई असं म्हणतो तेव्हा समोरच्याच्या चेहर्‍यावरचा कधी कन्फ्युज्ड कधी तुच्छ भाव लपून रहात नाही. त्यांना जे वाटायचं ते वाटो, योग्य नाव उच्चारताना आपल्याला लाज वाटता कामा नये. आणि मुख्य म्हणजे विशेषनामं कुठल्याही भाषेत लिहिली/बोलली गेली तरी ती तशीच रहातात, भाषेनुसार/उच्चारानुसार बदलत नाहीत हा अगदी सोपा नियम आहे. त्या नियामाचीच हे लोक वाट लावताहेत. !!

 4. Nikhil Sheth says:

  स्थानिक लोक नाशिक नाही तर नासिक आहे म्हणतात… का ते माहित नाही. बाकी लेख उत्तम.

  • खरा शब्द नाशिक आहे, इंग्रज लोकं श चा उच्चार स करायचे . चुकीचे उच्चार रूळले की मग असे होते, म्हणून अगदी सुरुवाती पासूनच मराठी व्यवस्थित वापरले जायला हवे.

 5. नमस्कार काका,
  छान लेख लिहिला. अगदी मर्मावर बोट ठेवले.
  मागे असाच मुंबईत असतांना, मी बसमध्ये बसलेल्या कांकाना पत्ता विचारत होतो. तेव्हा ते सारखे बांन्द्रे-बांन्द्रे करत होते. मी त्यांना वांन्द्रे नाव असल्याबद्दल विचारल तर ते म्हणाले की आता त्याच बांन्द्रे झालय. तसेच पुण्यात खडकीचे ’kirkee’ नाव केलय. सर्वीकडे तेच सुरु आहे.
  हे आपणच थांबवू शकतो.

  • अक्षय
   अरे काल एका मित्राने दिलेल्या कॉमेंट मुळे विचार श्रुंखला ट्रीगर झाली म्हणून हे पोस्ट लिहिले. यातला बराचसा भाग त्याच मित्राने दिलाय – नाहीतर मला कसे इतके समजणार मुंबई बद्दल? आपण व्यवस्थित नावं घ्यायची आणि इतरांनाही दुरुस्त करायचे म्हणजे आपोआपच योग्य शब्द रूळतील.

 6. हेमंत आठल्ये says:

  अगदी योग्य मुद्दा आहे. मराठी टक्का महाराष्ट्रात देखील घसरतो आहे. नावात खूप काही आहे. मुंबईत मला मराठी माणूस भेटला की जणू नातेवाईक भेटल्याप्रमाणे वाटायचा. आपण मराठी लोक मराठीतच बोलायला हवं. मला फक्त ते शीर्षक बघून थोडा पारा चढला होता. असो, पण नोंद खुपंच छान आहे. मुळात आपण तो शीर्षकातील शब्दच गाडून टाकला तर???

  • हेमंत
   कोणी बंबई म्हंटलं की माझी पण कवटी सरकते. जर कोणी बॉंबे म्हणत असेल तर दुरुस्ती करून मुंबई म्हणायला लावणे ( तशी जाणीव करून देऊन) हा एक उपाय आहे.

 7. मुंबईला Bombay / बंबई म्हणणाऱ्या मराठी माणसांची कीव येते. मला आठवतं, जेव्हा मुंबईचे नाव सरकारात अधिकृत झाले, तेव्हा मी अमेरिकेत होतो. मुंबईच्या नामकरणाची बातमी प्रसिद्ध झाल्यावर माझे अमेरिकन स्नेही सुद्द्धा कटाक्षाने “Bombay.. sorry Mumbai” असा उल्लेख करायला शिकले होते.

  • निरंजन
   बाहेरच्या लोकांना एक वेळ माफ करता येईल, पण जर आपलेच लोकं अशी नावं वापरायला लागले तर काय करणार? फक्त जागृती करत रहाणे, किंवा त्यांना खरं नाव सांगणं एवढेच आपल्या हाती आहे.

 8. रमेश म्हात्रे says:

  काका, तुम्हाला मुंबईच्या विमानतळावर २ पावटे भेटले होते जे मराठीला डाउनमार्केट म्हणत होते. इथेही काहीतरी असच असेल म्हणून गावांची नावे बदलतात. जे अ मराठी असतात त्यांना मराठी नावाचं उच्चार होत नाही. पनवेलच्या अलीकडे खांदेश्वर नावच गाव आहे पण इतर भाषिक त्याला खांडेश्वर बोलतात. मी सुद्धा असेच बरेच लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला पण पालथ्या घड्यावर पाणी. कमीतकमी मराठी माणसाने तरी ती नाव कधी बदलू नये असं वाटत. काल रात्रीच एक मित्राला विचारलं कि कुठे आहे तर तो सुद्धा बॅंड्रा बोलला आणि मग याच गोष्टीवरून आमचा वाद झाला. शेवटी त्याला बॅंड्राला वांद्रे बोलायला लावला आणि आज तुम्ही याच विषयावर लिहल.धन्यवाद……. बाकी लेख छान झाला.

  • रमेश
   आपण आपले काम करत रहायचे. मराठी माणसंच जर आपले पाय खेचायला लागले तर काय करणार?

 9. Ajay Sonawane says:

  sundar lekh, sagle mudde patla karan te pahilypasunch dokyat hote , pratyekachya manat yavishay chid aahe pan pratyek rajkiya paksha aapalya soyipramane rajkaran karatat

  • अजय
   आभार.. 🙂 मराठीचा उपयोग राजकारणासाठी करणारया नेत्यांना लवकरच त्यांची जाणीव करून द्यायला हवी.

 10. लीना says:

  मला तर वाटते की मराठी माणसांनीच पुढाकार घेउन ही नामांतरची गाडी रुळावर आणली पाहीजे.
  मी अश्या लोकांच्या पाच तरी दुरुस्त्या दररोज करीन असे काहीसे ठरवावे.बाकी लेख नेहमीप्रमाणे मनातले सांगणारा

  • लीना
   सहमत आहे .. दररोज पाच लोकांच्या चुका दुरुस्त करण्याची कल्पना पण छान आहे. 🙂

 11. नमस्कार काका,
  मनातलं बोललात. आम्ही शाळेतले मित्र बोलताना नेहमी हटकून मराठी उच्चार करतो. माझा एक मित्र तर ‘मुलुंड’ ला नेहमी आग्रहाने ‘मुळुंद’ म्हणतो.

 12. nayanraut says:

  shakespeare ने म्हटले होते कि नावात काही नसत, आशय कळला कि झाले … सायन ला जर शिव म्हटले तर कुणाला कळणार नाही कि कुठे जायचे ते …

  • सायन ला जर शिव म्हटले तर कुणाला कळणार नाही कि कुठे जायचे ते …>>>>

   कारण आपण प्रथमपासुन त्याला सायनच म्हणत आलोय. त्याला शिव म्हणायची सवय आपणच आधी स्वत:ला आणि मग इतरांना लावायला हवी. बॆंगलोरचे जर बंगळूरू होवू शकते, रुजू शकते, कलकत्याचे कोलकात होवू शकते तर बंबईचे “मुंबई” किंवा सायनचे “शिव” का नाही होणार?
   दादा, खुप महत्वाचा विचार मांडलात तुम्ही. धन्स.

  • वापरात नसले की नांव विसरले जातेच. म्हणून ते मराठी नावं वापरात ठेवायला हवी. बॉंबे चं मुंबई कसं रुळलं? तसंच हे पण नाव रूळेल वापरात ठेवले तर.

 13. Bharati says:

  महेंद्र्जी ,
  मला वाटते भाषेचा विकास हा, ती भाषा ज्यांची आहे, ज्याना तिचा आदर आहे आणि जिथे एकसंघता आहेतिथेच होऊ
  शकतो.कुठेतरी वाचलेले आठवते -ईंग्लिश भाषा खरी जर्मनीची शुद्ध समजली जायची ती ईग्रजाना आवडली त्यानी
  त्यात आपल्या भाषेचे मिश्रण करून स्वता:ची अशी एक वेगळीच भाषा निर्माण केली आणि ती आता जगभर शुद्ध नंबर
  एक भाषा समजली जाते.आपण मराठी जगात कुठे- कुठे जाउन पोहोचलो पण भाषेचा प्रचार नाही करू शकलो.ती
  आपली आहे,आदर केला पाहिजे..हे सारे विसरून जातो.जातो तिथालेच होतो.आमचा एक ईंग्लिश मित्र
  टिपिकल ईंग्लिश आहे पण तो मराठी शिकतो आहे.तो आगगाडीत वही घेऊन मराठी नावे लिहीत असतो सर्वाना
  विचारतो हे बरोबर लिहिले आहे का? कलकट्तयात तो गेला तेव्हा एका इंग्रज अधिकार्‍याचे थडगे पाहिले त्यावरची
  धूळ साचून खराब ज़ालेली अक्षरे पाहून त्याने ,त्याच्या बायकोने,मुलाने तिघानी ती जागा पाण्याने धुवून घासून
  पुसून मग त्याचे फोटो काढले .असा आदर असावा लागतो ,तो कुठे शिकवला जात नाही.आपले संस्कार कुठे गेले?

  • आपल्या भाषेबद्दल आदर, किंवा प्रेम असल्याशिवाय काहीच केले जाऊ शकत नाही. त्या इंग्रजाने थडगे धुवुन स्व्च्छ केले, आपले लोकं तर आपल्या भाषेचेच थडगे उभे करायला लागले आहेत. जिवंत पणी भाषेला गाडून टाकताहेत. नेमकं हेच टाळायला हवं.. ही प्रतीक्रियेला उत्तर नजरचुकीने राहून गेले होते .

 14. आल्हाद alias Alhad says:

  चिंचवली बंदर …

  मला वाटायचं चिंचोली असंच नाव आहे! रस्त्यावरची पाटी बघून कळलं चिंचवली म्हणून… तरी सवयीनं चिंचोलीच तोंडात येतं. बाकी हे मुळुंद माहीत नव्हतं!!

  • आल्हाद
   मला पण बऱ्याच जागांची नावं माहिती नव्हती.. आताच समजली. चिंचवली हे तर मी वापरणं सुरु पण केलंय.

 15. Vidyadhar says:

  अहो काका,
  मुंबईवर इंग्रजांचा खासा प्रभाव होता. त्यामुळे मुंबईतल्या बहुतेक ठिकाणांची नावं इंग्रजी उच्चाराने रुळली.
  बाकी ग्वाल्हेर, इंदूर ही मराठा सरदारांच्या काळातली नावं आपण तशीच वापरतो…
  पण मुळुंद ऐकलं होतं एकदा…फॉलो करायचा मात्र कधी विचार आला नाही….आता करतो! 🙂

  • इंग्रजांना उच्चार जमले नाहीत म्हणूनच तर सगळी नांवं बदलली गेली. पण हिंदी मधे वेगळं नांव का? धुळे चं धुलिया? किती विचित्र वाटते ते नांव..

 16. महेश says:

  लेख चांगला वाटला,आपल्याकडे राजकारण जास्त आहे, ,लोकांनीच बद्दल करावे असे वाटते म्हणजे अशी नावे दिसणार नाही, आपल्याकडील राजकारण फार वाईट आहे, हे नुकत्याच सीमा(बेळ्गाव प्रश्नावरून ) दिह्लीवारी वरून समजले आहे

 17. prashavhad says:

  Ajacha bombay ya vishyavarun maza eka parprantiya mitrashi vad zala,
  mi ani to bas madhun jat astana to sarkha aj muze bombay jana hai…..asa ulekha karat hota….mi rahto goregoavat pachim upnagar mumbai, tycha mahnan hot bombay mahnje dakshin mumbai…mag mi tyala bolalo ata kay apan mumbai chya baher ahot….va spashtpane mahnalo pahile tar bombay navacha kuthal shahar nahi……..next time pasun mumbai hyach navacha vapar kar…………

  • खूप मोठं काम केलंत.. एका मराठी माणसाला जाणिव करून दिलीत मराठी असल्याची. असेच जर आपण जागरूक राहिलो, तर आपली नावं नक्कीच रहातील वापरात. धन्यवाद.

 18. Aparna says:

  बाकी छोटी नावं सोडा पण बॉंम्बेच अद्याप किती जणांच्या तोंडात आहे…पण मला कामानिमित्त भेटणार्‍या सगळ्या गोर्‍यांनी एकजात मुम्बाय म्हटल्याचं स्मरतंय….आणि इथेच भेटणारे मुंबईकर/मराठी इ. मात्र ओ बॉम्बेला जाऊन आलीस?? असंच विचारतात…मी तर नेहमी भारत म्हणते पण इंडियाच जास्त प्रचलित आहे…मग आपण आपल्या देशाचं नाव इंडिया म्हणायचं की भारत???

 19. bhaanasa says:

  महेंद्र, अरे मायदेशी येण्यासाठी मुंबई मारले असता एकुण एक विमानकंपन्या चटदिशी तिकीट दाखवतात. चुकूनही ?? येत नाही. 🙂 नाशिकचे नासिक लोक कशासाठी करतात कोण जाणे.

  बरेचदा आपण नको तिथे नको त्या नावांचे उगाचच मराठीकरण करत राहतो आणि इतर लोक म्हणतात म्हणून जे मूळचे मराठीत आहे त्याचा अपभ्रंश करून नकळत ( खरे तर कळत असूनही केवळ सवयीने ) त्यांना साथ देतो. 😦
  पोस्ट सहीच.

  • अगदी खरं. मी स्वतः आवर्जून मराठी नावं वापरणं सुरु केलंय. शीव, वांद्रे, वगैरे तर मुद्दाम वापरतो आणि इतर मराठी लोकांना पण याची जाणिव करून देतो .

 20. “महाराष्ट्र देशा” ह्या उद्धव ठाकरेंच्या पुस्तकात बरीच मोगलांच्या अंमलात असलेल्या शहरांची मराठी प्रतिनावे आली आहेत ..उदा. औरंगाबाद –> संभाजीनगर जिल्हा …आणि उस्मानाबाद म्हणजे धाराशिव असा उल्लेख आढळतो..हे तर मला माहीतही नव्हतं

  • ही नविन नावं केवळ सरकार दरबारीच आहेत. सर्वसामान्यांच्या वापरात नाहीत. धाराशिव हे नांव तर मलाही माहिती नव्हतं; ते पुस्तक घ्यायचं आहे विकत.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s