एका रेल्वेच्या ट्रॅक शेजारी काही मुलं खेळत होती. दोन ट्रॅक्स होते , त्या पैकी एक वापरात ला होता, तर दुसरा ट्रॅक वापरात नसलेला! काही मुलं (१५-२० तरी असतीलच ) जी त्या वापरात असलेल्या रेल्वे ट्रॅक वर खेळत होती पण फक्त एक मुलगा त्या वापरात नसलेल्या ट्रॅक वर खेळत होता.
तुम्ही अशा जागी उभे आहात की तुम्ही रेल्वे चा ट्रॅक बदलू शकता . तुम्हाला समोरून एक ट्रेन धडाडत येतांना दिसते. तुम्ही काय कराल??तुम्ही त्या एक मुलगा खेळत असलेल्या ट्रॅक वर ट्रेन वळवाल की ….. तशीच त्या १५-२० मुलांच्या अंगावर ट्रेन जाऊ द्याल?
तुम्ही त्या १ मुलगा खेळत असलेल्या वापरात नसलेल्या ट्रॅक वर गाडी वळवून त्या १५-२० मुलांचे प्राण वाचवू शकता , पण ह्याचा अर्थ त्या वापरात नसलेल्या ट्रॅक वरच्या एका मुलाचा मृत्यु.
थोडा विचार करा तुमच्या मनात आलेल्या उत्तराचा!!
बहुतेक सगळेच लोकं त्या एक मुलगा खेळत असलेल्या ट्रॅक वर गाडी वळवून त्या १५-२० मुलांचे प्राण वाचवावे असा विचार करतील. मी स्वतः पण तसाच विचार केला होता सुरुवातीला- कारण एका मुलाच्या प्राणाच्या बदल्यात जर १५-२० मुलांचे प्राण वाचत असतील तर तो एक सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन एका जबाबदार माणसाने घेतलेला योग्य निर्णय वाटतो. पण तसे खरंच आहे का? निर्णय जो घेतलाय तो योग्य आहे ?
थोडा विचार करा, वर दिलेला निर्णय घेतांना तुम्ही त्या दुसऱ्या मुलाचा विचार केलाय का -की ज्याने आधीच स्वतःच्या सुरक्षेचा विचार करून वापरात नसलेल्या ट्रॅक वर खेळणे पसंत केले होते? त्या एका मुलाची काय चूक आहे? काही नाही ना? मग त्याची काहीही चूक नसताना त्या मुलाच्या ट्रॅक वर ट्रेन पाठवायचा निर्णय आपल्याला घ्यावासा वाटला हे कसे काय योग्य ठरू शकते?
त्या मुलाचा बळी दिल्यावर पण इतरांच्या डॊळ्यात त्याच्याबद्दल थेंब पण आला नसता, उलट चला- ते १५-२० मुलं वाचले म्हणून आनंदच झाला असता लोकांना.
असे निर्णय रोजच्या आयुष्यात बरेचदा घ्यावे लागतात. ऑफिस, सोशल लाइफ, राजकारण, समाजकारण या सगळ्यात असे निर्णय घ्यावे लागतात.
बहुसंख्य लोकांच्या चुकीच्या निर्णयामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी किंवा बहुसंख्यांच्या सुरक्षेसाठी अल्पसंख्य ’ योग्य निर्णय’ घेणाऱ्याचा बळी दिल्या जाण्याचे प्रकार नेहेमीच सुरु असतात. इथे बहुसंख्य आणि अल्पसंख्यांक हे शब्द केवळ रेफरन्स म्हणून वापरले आहेत- समाजा सा्ठी नाहीत.
बहुसंख्य लोकं कितीही मूर्खासारखे वागली तरीही अल्पसंख्याकांना बळी दिले जाते. ही गोष्ट युगानुयुगे चालत आलेली आहे.
कोणीतरी एक मोठा तत्ववेत्ता होऊन गेला त्याची ही गोष्ट आहे- माझी नाही. त्याला स्वतःचा निर्णय काय असेल असे विचारले असता, त्याने दिलेले उत्तर मोठं मार्मिक आहे.
याच गोष्टीला अजून एक डायमेन्शन आहे. तो म्हणतो मी काहीही करणार नाही, त्या १५-२० मुलं असलेल्या ट्रॅक वरून ट्रेन जाउ देईन, कारण ज्या मुलांनी ट्रेन जाणार असलेल्य़ा ट्रॅक वर खेळण्याचा निर्णय घेतला होता, त्यांना पुर्ण कल्पना असेल की इथे ट्रेन येणार, म्हणजे ट्रेन जवळ आली की ट्रेनच्या आवाजाने ती सगळी मुलं बाजूला होतीलच, या उलट जो मुलगा एकटा खेळतोय वापरात नसलेल्या ट्रॅक वर , त्याला पुर्ण खात्री आहे की इथे ट्रेन येणार नाही, त्यामुळे तो तिथुन सरकणार नाही आणि हमखास मृत्युमुखी पडेल.
दुसरी गोष्ट म्हणजे, तो दुसरा ट्रॅक वापरात नाही, म्हणजे पुढे ट्रॅक कसा आहे ते सांगता येत नाही. कदाचित पुढे ट्रॅक खराब असल्याने ट्रेनचा अपघात होण्याची पण शक्यता आहे..
घाई गडबडीत घेतलेले निर्णय जरी वरवर बरोबर दिसत असले तरीही ते चुकीचे असू शकतात. एक लक्षात ठेवा, जो निर्णय लोकप्रिय असतो तो नेहेमीच बरोबर असेल असे नाही, आणि जो निर्णय बरोबर असेल तो लोकप्रिय असेल असे नाही.
नुकतीच एका ट्रेनिंग प्रोग्राम मधे ऐकलेली ही गोष्ट आहे. नुकतेच अभिजितने सांगितले की नेट वर पण उपलब्ध आहे ही . लिओ व्हेलेस्की ज्युलीयन या तत्त्ववेत्याच्या नावे सर्च केले तर शेकडॊ ठिकाणी ही कथा लिहिलेली आढळेल.
sahi post aahe kaka…ekdam wegli. Lateral thinking chya trackwarachi waatali. ha asa khel rojchya sadhya sadhya gosthinche nirnay ghetana khelnyachi saway laawali tar? nirnay kshamata balkat whayala nakki upyog hoil as watat. infact asa shakyatancha wichar karayla shikwal pahije mulanna lahanpanapasun. aapli shikshan paddhatit yacha purn abhaw aahe matr. mhanunach bhattitalya witansarkhe padawidhar tayar hotat aani sachebaddha nirnay ghetat. as nahi watat?
लॅटरल थिंकींग आणि लॉजिकल थिंकींग नेहेमीच कन्फ्युज होतो आपण हा प्रकार लॉजिकल थिंकींग मधे मोडतो. डिसिजन मेकींग ट्रेनिंग मधे ही कथा ऐकवली होती.
शिक्षण पद्धती कधीच निर्णय घ्यायला शिकवत नाही- जी मुलभूत गरज आहे शिक्षणपद्धतीची.
सुरुवातीच्या ओळी वाचताना अगदी पहिला निर्णय – उत्तर – त्या १५-२० मुलांना वाचवण्याचाच होता. मात्र पुर्ण पोस्ट वाचल्यानंतर माझा निर्णय चुकीचा होता – हे अगदी स्पष्ट!
दिपक
ह्या कथे वर त्या फॅकल्टीने चक्क पाउण तास टीपी केला..
प्रत्येकाचे वेगवेगळे व्ह्युज ऐकतांना पण मजा आली होती ट्रेनिंग मधे.
लाखो मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे ……..
जर त्या लाखोनी त्यांना पूर्णपणे पोशिन्द्याचा हवाली केला असेल तर हि गोष्ट बरोबर आहे ….
माहित असून केलेल्या चुकीचे निर्णय जर हजारो जनाचे भले होत असेल तर तो तर निर्णय नेहमी बरोबरच असतो ………
नागेश
प्रतिक्रियेकरता आभार.
सह्ही ! मस्त नोंद आहे ही दादा, खरेच हा विचार माझ्याही मनात नाही आला.
विशाल ,
९० टक्के लोकं मी ती गाडी डायव्हर्ट करीन असेच उत्तर देतात… फक्त दहा टक्के लोकं हे त्या एका मुलाला वाचविन असे म्हणतात.
महेन्द्रजी खुपच मस्त पोस्ट आहे….. मनात विचार येतो की अश्या पद्धतीने विचार करणे हे मुलांना किंबहुना आपल्याला सगळ्यांनाच जमायला हवेय…..
तन्वी
सहमत आहे 🙂 पण त्या साठी मनाची जडण घडण तशी व्हायला हवी. लॉजिकल विचार करण्याची शक्ती वाढवायला हवी स्वतःमधली, मगच ते शक्य आहे.
A similar, not exactly same situation occurred regarding debt waivers given to farmers. There were few farmers who had repaid their loan and majority of others have waited for waiver, some of them waited even they can pay back. Now debt waiver was declared irrespective of repayment condition. Those who had repaid felt cheated since they didn’t have any incentive or special treatment about repayment they made in difficult situation.
This is different than situation written by Mahendra. But, I am putting as example of dilemma.
किरण
चपखल उदाहरण. 🙂 .
मी सुद्धा सुरवातीला १५ मुलांना वाचवण्याचा निर्णय घेतला पण पुढे वाचल्यावर माझा निर्णय चुकीचा आहे अस वाटल.
कधी कधी एखादा निर्णय घेताना विचार करायला सुद्धा वेळ नसतो. वाचवणारा १ आणि १५ याच सोप गणित सोडवतो आणि १५ मुलांना वाचवायचा निर्णय घेतो. असेच निर्णय आपण आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा घेतो. घेतलेला निर्णय चूक कि बरोबर ते नंतर कळत.
बाकी पोस्ट विचार करायला लावण्यासारखी टाकली. मस्त आहे.
रमेश
निर्णय घेणं महत्वाचे.. तो बरोबर की चूक हे काळच ठरवतो.. अर्थात हे माझे मत आहे !
विचार करायला लावणारी पोस्ट काका
घाई घाईत काही निर्णय घेतले जातात ते त्या क्षणी योग्य वाटत असले तरी नंतर चुकीचे ठरतात
प्रत्येक निर्णय विचारांती घ्यावा हे सांगणारी पोस्ट! निर्णय चूक की बरोबर हे कालच ठरवत असतो . आपल्या हाती काहीच नसते.
बंदूकीतून गोळी सुटली की जशी थांबवता येत नाही तसे आहे हे.
>>जो निर्णय लोकप्रिय असतो तो नेहेमीच बरोबर असेल असे नाही, आणि जो निर्णय बरोबर असेल तो लोकप्रिय असेल असे नाही.
अगदी काका..अगदी असंच…
म्हणूनच निर्णय घेण ही अवघड कला आहे असं म्हणतात ना!
निर्णय घेणं कितीही अवघड असलं तरीही ते प्रत्येकालाच घ्यावे लागतात. आणि हो… निर्णय घेणे अजिबात अवघड नसते, ते तर सगळ्यात सोपं काम. निर्णय घेतल्यावर जर तो चूकीचा असला ,तर तो फार अवघड होता असे म्हणायची पद्धत आहे. नाही तर योग्य !
एकदम पटलं…
🙂 धन्स..
ट्रॅक बदलण्याचा निर्णय आपल्यावर सोपविला तरी आपल्या निर्णयाला जीवन-मरणाच्या निर्णयाची उपमा देणे मला तरी जादा वाटते.
हा फक्त एक लॉजिकल थिंकींगचा प्रश्न आहे. तुम्ही किती लॉजिकली विचार करू शकता हे एक्स्ट्रीम घटनेशिवाय लक्षात येऊ शकत नाही म्हणून हे असे उदाहरण घेतले असावे.
१ नंबर! Good read!!
धन्यवाद!!
महेन्द्रजी,तुमची ह्या पोस्ट नी आणखी एकदा विचार करायला भाग पाडलय. अशीच एक पोस्ट होती कॉस्ट ऑफ अपॉर्चुनिटी म्हणुन. माज़्या सारख्या अनेकानसाथी जे अगदी frustrate झालेत त्यानी कोणताहि निर्णय घेण्यापुर्वि कसा पड्ताळुन पाहावा यासाथी उत्तम उदाहरण आहे. मनापासुन आभार.
मी यापुर्वी ही गोष्ट वाचली होती आणि काय निर्णय घ्यावा हेच उमगत नव्हतं! पण आज तुझी पोस्ट वाचली आणि मला पटलं की कुठलाही कठीण निर्णय घ्यायची वेळ आली की सर्व बाजुंनी विचार केला की योग्य ते ऊत्तर समोर येतं!
आज खुप दिवसांनी तुझ्या ब्लॉगवर आले,छान वाटलं!
रेवा
Pingback: कठिण निर्णय | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA.
जीवदान मिळालेले खुश होतील ,ज्यांचा जीव वाचला त्यांचे सगेसोय्रे खुश होतील…पण गाडी चालवणारा मोतर्मन कधीच खुश होणार नाही.कारण गाडी चालवायचे नियम कोणता,ट्रॅक खराब होता..हे फक्त त्यालाच ठाऊक असते..आणि गेलेला निरपराध जीवाचे
फक्त त्यालाच दुक्ख होणार
जीवदान मिळालेले खुश होतील ,ज्यांचा जीव वाचला त्यांचे सगेसोय्रे खुश होतील…पण गाडी ट्रॅक बदलणारे आपण कधीच खुश होणार नाही.कारण गाडी चालवायचे नियम कोणता,ट्रॅक खराब होता..हे फक्त आपल्यालाच ठाऊक असते..आणि गेलेला निरपराध
जीवाचे फक्त आपणच दुक्ख करणार..खरच सुरवातीला पटकन अनेकांचा जीव वाक्चवायचे आपण पहातो..
भारती
ही पोस्ट निर्णय प्रक्रिये बद्दल आहे. अर्थातच एक जरी जीव गेला तरीही त्याचे दुःख हे असेलच..
तुम्ही जे म्हणताय , त्याला इन्स्टंट रिफ्लेक्स म्हणतात. नेहेमीच तो बरोबर असेल असे नाही. पण बरेच लोकं इन्स्टंट रिफ्लेक्सवरच काम करतात.
Khoop Chan post aahe…
Aayushta bhutek vela sagle nirnay Fayda n totyacha vichar karun ghetle jatat…
गणेश
आभार. 🙂
Panakajacha ” Mi bhatakanti ka karto?” ani tumcha ha lekh. he donhi lekh mi ataparyant vaachalele sarvottam 2 blogposts ahet. aprateem ani avarnaniya.
सलिल
प्रतिक्रियेकरता आभार. 🙂
छानच ! कमदम मस्त….!!!
नरेंद्रजी
बरेच दिवसांनी प्रतिक्रिया दिलीत..धन्यवाद.
Our programme “Indireche Ariels” will be performed on 31st July 2010 in Gogte Ranga Mandir, Belgaum. Famous Marathi poetess Indira Sant’s life, her Poems, her study of folklore and many more strong points are there in this.
I have composed music and my son Shantanu is busy in doing backgroud music as well as singing.
Earlier you had told me about your love of literature as well as about Indira Sant’s literary work.
Please come and see how we Marathi people of Belgaum present standard programms. Please come and encourage us!
नरेंद्र
निमंत्रणाबद्दल मनःपुर्वक आभार. कृपया यु ट्युब वर व्हिडीओ पोस्ट कराल तर पहाता येतील.. 🙂 शुभेच्छा..
इंदीराबाईं तर अजूनही माझ्या आवडत्या कावियत्री आहेत.. 🙂 गाणी ऐकायला नक्कीच आवडतील!
एकदम मस्त! प्रश्न अगदी बरोबर आहे. विषय अगदी गहन आहे आणि दोन्हीही पर्यायही धोक्याचे आहेत. पण हा प्रश्न मुलांच्या संदर्भातच होता ना?? की राजकीय? म्हणजे वाचून मी थोडा गोंधळलो होतो. निर्णय कोणता असावा यावर त्या निर्णय घेणाऱ्या व्यक्तीची योग्यता ठरते. आता हेच उदहारण घ्या ना. म्हणजे थोडा विषय बदलतो आहे. दोनशे लोक मेले आणि मारणारा जीवंत आहे. आता जर आपण त्या मारणाऱ्याला मृत्यूची शिक्षा दिली तर एकुण संख्या दोनशे एक होईल. आपण त्याला सोडून दिले तर.. हा झाला नोंदितला दुसरा ‘ट्रॅक’ आणि त्या शिक्षा देणे हा झाला पहिला ‘ट्रॅक’. आता तुम्ही कोणता निवडाल? मी तरी पहिला निवडेल.
हेमंत
हे पोस्ट निर्णयक्षमतेवर होते. आपण जॊ निर्णय भावनेच्या भरात घेतो तो बरोबर असेलच असे नाही. तेंव्हा प्रत्येक निर्णय विचार पुर्वक घ्यायला हवा इतकंच..
मृत्युची शिक्षा मला वाटतं नचिकेतच्या पोस्टच्या संदर्भात आहे.जर पुर्ण पुरावे असतील तर दूसरा ट्रॅक.. नाहीतर पहिला.
तुझे हे उत्तर बघुन मला एक नविन पोस्ट सुचलंय ते आज पोस्ट केलंय.
आम्हालाही एका ट्रेनिंगमध्ये हे उदा. दिलं होतं….खरंच खूप काही शिकवतात अशी उदा…शेवटी योग्य वेळी योग्य निर्णय घेता येणं महत्वाचं….कारण संधी परत परत येत नसतात….(अर्थात याचा या उदा.शी तसा संबंध नाही म्हणा…)
हा विरोप काही वर्षांपूर्वी मलाही आला होता. खरेच आहे. असे निर्णय घेणे अवघड असते. परंतु जर भावनेला थारा न देता अतिशय व्यावहारिक राहून व अचूक गणित मांडून आपण विचार करू शकलो ( जो बहुतांशी आपण करू शकतच नाही ) तर तो निर्णय चुकीचा ठरत नाही. त्या १५-२० मुलांनी जाणूनबुजून मूर्खपणा केलेला आहे पण केवळ त्यांचे संख्याबळ जास्त म्हणून त्या एकमेव शहाण्या मुलावर घोर अन्याय करणे म्हणजे उनाड व क्या फरक पडता हैं सारख्या प्रवृत्तीला खतपाणी घालणे व नियमाचे पालन करणा~या शहाण्या-समजुतदार लोकांचा सतत बळी देणेच.
well,mala vicharaal tar, mala ase watate ki, TISRAA NAVIN TRACK NIRMAAN KARAWAA kivaa TISRAA TRACK TIKDE NAWHTAA KAA?
aso, tumhi majyaa yaa nirnyaavar hasal.bye the way, blog chan hota.
तिसरा मार्ग
पण तेवढा वेळ नाही नां, ट्रेन येते आहे समोरून… दोनच उपाय आहेत फक्त….
mhanje tase aadhich niyojan kele aste tar bare zale aste,ase mala mhanayche hote.barobar na?
बरोबर आहे… 🙂
प्रथमदर्शी वाचताना माझ्याकडून काय चूक झाली काय माहित पण मला वाटले कि तो १ मुलगा चालू ट्रेक वर खेळतोय आणि १५-२० मुले बंद ट्रेक वर खेळतायेत ..त्या त्या क्षणी माझा निर्णय झाला होता ..पण थोड्या वेळाने मला माझी चूक कळाली ..मुळात मी वाचलेच चुकीचे होते …जरा वाक्ये परत पुढे पाठी चाळली …निर्णय तर घेतला होता मनात पण पुन्हा मनाशी एकनिष्ठ राहून जो निर्णय त्या एका मुलासाठी घेतला होता तोच त्या १५-२० मुलांसाठी ठेवला …ट्रेन चालू ट्रेक वरूनच जाने योग्य होते आणि ते १ मुलासाठी असो व १५-२० मुलांसाठी !!!
निर्णय हा केव्हाही अडचण निर्माण करणाराच ठरतो माणसाच्या आयुष्यात ……!! कारण आपल्या सभोवताली असलेल्या खूप जणाच्या भावना त्याच्याशी जुडालेल्या असतात
परंतु ह्या post मध्ये निर्णय घ्याचा आहे ते म्हणजे चूक आणि बरोबर मध्ये .केवळ संख्याबळ जास्त असला म्हणून चुकीचा निर्णय घेणे मुळातच चूक आहे . (जे माझ्यासोबत हि झाले निर्णय घेताना ) शेवटी काय जीवनात प्रत्येकाला त्या त्या क्षणी निर्णय घ्यावे लागतात क्षणी घेतलेला निर्णय नेहमी बरोबर वाटतो खरा आहे …पण नंतर कळते तो निर्णय खरच चूक होता कि बरोबर
विराज
ब्लॉग वर स्वागत…
ट्रेनिंग मधे जेंव्हा ही गोष्ट त्या फॅकल्टीने सांगितली तेंव्हा ३० पैकी फक्त एकाने योग्य निर्णय घेतला होता. जवळपास सगळेच लोक तशी चूक करतात. हे उदाहरण देण्याचे कारणच हे होते की तुम्ही जास्त जागरूक राहून थोडा वेळ विचार करून मग नंतरच निर्णय घ्यावा. घाईगर्दीत घेतलेला निर्णय हा कधिही वाईटच असतो.
कितीही झालं तरीही शेवटी आपण संस्काशिल मानव प्राणी आहोत. आपल्यावरचे जे मूळ संस्कार आहेत (वडिलधाऱ्या मंडळींनी केलेले) त्या नूसारच आपण वागणार. इथे पण एकाच्या बदल्यात जर १५-२० आयुष्य वाचत असतिल तर काय हरकत आहे असा विचारच जिंकणार हे नक्की.
तुमचे शेवटचे वाक्य खूप भावले. “शेवटी काय जीवनात प्रत्येकाला त्या त्या क्षणी निर्णय घ्यावे लागतात क्षणी घेतलेला निर्णय नेहमी बरोबर वाटतो खरा आहे …पण नंतर कळते तो निर्णय खरच चूक होता कि बरोबर”
संकुचित वृत्ती व लोक काय म्हणतील हा समाजाचा दृष्टीकोन असल्यामुळे,(घाबरणे) माणसाला कठीण निर्णय घेणे क्रमप्राप्त होते,वस्तुतिथी प्रमाणे तो निर्णय घेतो.
very good thinking roj kash jagyah he sodun aapan alag kash jagacha he serch karto
Prakash
Thanks for the comments.