टाटा व्हर्सेस टर्टल- नविन गेम..

ग्रिन पीस नावाची एक एनजीओ  ऑलिव्ह रिडले टर्टल या कासवांना  ( जे एक एंडेंजर्ड स्पेसीज आहेत )  वाचवण्यासाठी गेले दीड वर्ष काम करते आहे. ग्रीनपिस ऑर्ग.. त्यावर पुर्वी पण दोन पोस्ट लिहिली आहेत.

पहिले पोस्ट  वाचण्यासाठी इथे टिचकी मारा . आणि दुसरे  पोस्ट  वाचायला इथे .

या लोकांचा एकगी लढा सुरु आहे ऑलिव्ह रिडले टर्टल वाचवण्यासाठी. काही एनजीओ इतक्या कमिटेड असतात आपल्या कामासाठी की त्यांचं करावं तितकं कौतुक कमीच असे वाटते.

काही महिन्यापुर्वी एक जाहिरात पेपरमधे देण्याकरता ही एनजीओ पैसे गोळा करीत होती. पण पुरेसे पैसे गोळा न झाल्यामुळे यांनी पैसे परत पाठवले होते माझे.ही घटना तर मी विसरून पण गेलो होतो, पण नेमकं आज सकाळी  एक बातमी वाचली  की या एनजीओ ने एक गेम सुरु केलेला आहे –

लोकांमध्ये  या विषयाबद्दल जागृती वाढवण्यासाठी या एनजीओ ने  एक  ऑन लाइन गेम सुरु केलाय तो गेम इथे खेळता येईल. गेम काही खास नाही, पण फक्त एक नविन कल्पना – मला आवडलेली  म्हणून हे एक लहानसे पोस्ट टाकतोय.   त्या गेमच्या साईटवर लोकांनी दिलेल्या कॉमेंट्स कडे पण एक नजर जरूर टाका..

नविन  सिनेमा  रिलिझ होण्यापुर्वी   फ्री गेम डाउनलोड दिला ( शक्यतो फ्लश गेम) तर सिनेमाची जाहिरात होण्यास खूप मदत मिळेल. एक नविन कल्पना 🙂

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कार्पोरेट वर्ल्ड and tagged , , , , , . Bookmark the permalink.

7 Responses to टाटा व्हर्सेस टर्टल- नविन गेम..

 1. Pingback: Tweets that mention टाटा व्हर्सेस टर्टल- नविन गेम.. | काय वाटेल ते…….. -- Topsy.com

 2. मनोहर says:

  या प्रयत्नात मूळ विषय आपले महत्त्व गमावून बसेल.

  • मनोहर
   या साठी त्या लोकांनी खूप कामं केलीत. अर्थातच काही होणार नाही हे ठाऊक असून सुद्धा! टाटांच्या कारच्या मागे लाउडस्पिकर घेउन जाणे ही म्हणजे पराकाष्टा म्हणावी लागेल प्रयत्नांची.
   मूळ विषय महत्त्व गमावून बसेल किंवा थोडं जास्त प्रसिद्धी मिळेल… दोन्ही शक्य आहे. मला ती संकल्पना आवडली. अर्थात गेम थोडा जास्त चांगला असायला हवा होता असे वाटते.

 3. bhaanasa says:

  या लोकांचे खरेच कौतुक आहे. परंतु कदाचित जसे मनोहर यांनी म्हटलेय तसेच होईल की काय…..

 4. Pingback: टाटा व्हर्सेस टर्टल- नविन गेम.. | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA.

 5. काही एन.जी.ओ. फारसा गवगवा न करता आपले काम करत असतात. अशा प्रकारे लोकांचं लक्ष वेधून घेता येईल हे ठिक आहे पण मनोहर म्हणतात त्याप्रमाणे त्याचा उद्देशपूर्तीसाठी फायदा होईल का हेही महत्वाचं. गेम पॅकमॅन सारखाच आहे.

Leave a Reply to Kanchan Karai Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s