उत्खननाच्या साईट्वर…१

सरायपाली. साधारण १९०  किमी असेल रायपूर पासून. सकाळी लवकर निघालो, रस्ता पण बरा, त्या मुळे सगळी कामं लवकरच आटोपली आणि आम्ही परत निघालो रायपूरला जायला. रस्त्यावर दोन्ही बाजूला भाताची पेरणी सुरु झालेली दिसत होती. नुकताच पाऊस होऊन गेल्यामुळे वातावरण पण छान होतं.रस्त्यावर एक पाटी दिसली.. शिरपूर- १७ किमी. बरोबर असलेल्या मित्राने सांगितले की इथे खूप सुंदर प्राचीन वस्तू सापडल्या आहेत, बघायच्या का?

उत्खनन झालेल्या वस्तू तर आपण नेहेमीच पहातो, पण उत्खनन सुरु असलेली साईट बघायची?  अशी संधी फारच कमी वेळा येते. म्हणून उत्साहातच तयार झालो  बघायला.

शर्माजी नविनच उत्खनन केलेल चित्र समजाऊन सांगतांना.

अर्थात!! नेकी और पुछ पुछ? म्हणून आम्ही त्या शिरपूरला पोहोचलो. शिरपूरला गेल्यावर सगळ्यात प्रसिद्ध असलेल्या लक्ष्मण मंदीराकडे मोर्चा वळवला. मंदीराकडे जाणारा एक वळण मार्ग दाखवला होता. तिकडे जाउन मंदीराच्या गेट जवळ पोहोचलो, तर त्या चार एकराच्या कंपाउंड्ला कुलूप! सहज दूर लक्ष गेलं, तर एक ठिकाणी एक म्हातारा माणूस आणि काही लोकल लोकं काहीतरी करतांना दिसले.

तुटलेले पार्ट्स जोडतांना..

चिखल तुडवत तिकडे जाउन पोहोचलो. त्या जागे मधे तो माणूस म्हणजे ऑड मॅन आऊट असा दिसत होता. वय असेल ७० च्या वर.आम्ही जाउन त्यांना  नमस्कार केला आणि स्वतःची ओळख करून दिली. त्यांना खूप आनंद झालेला चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होता. ते गृहस्थ म्हणेज छत्तीसगढ सरकारने खास अपॉईंट केलेले श्री एके शर्मा. हे एके शर्माजी पुरातत्त्व विभागातले एक  एक्स्पर्ट म्हणून ओळखले जातात. रिटायर्ड झाल्यावर पण  अंदाजे गेली कित्तेक वर्ष ते  एक्स्कॅव्हेशन चे काम करताहेत.

एरल्डाइट, तारा आणि बस्स.. खूप सारा वेळ तुकडे जागच्या जागी बसवायला. एकदा जोडल्यावर बरेचदा समजत पण नाही कुठे जोड आहे तेबाबरी मस्जिदच्या केस मधे यांचे मत घेण्यासाठी यांना पण सरकारने बोलावले होते. तिथे बाबरी मस्जिद कशी नव्हती हे त्यांनी अतिशय उत्तमरीत्या समजाऊन सांगितले – आता त्याबद्दल लिहित नाही नाहीतर तेच एक पोस्ट व्हायचं. म्हणाले आता परवा पुन्हा लखनऊ ला केस आहे , तेंव्हा जायचंय साक्ष द्यायला.

या वयात पण इतका उत्साह पाहून बाकी एकदम आश्चर्यचकित झालो. जवळपास गेली १३ वर्ष ते ह्या साईटचे उत्खननाचे काम पहात आहेत.  अरूण कुमार शर्मा हे नांव एक अतिशय विख्यात नाव आहे  भारतातलं.  त्या माणसांना शर्माजी सुचना देत होते. एका खांबाचे तुकडे सापडलेले दिसत होते, आणि जिग सॉ पझल प्रमाणे ते तुकडे जोडण्याचे काम सुरु होते. जमिनीवर एका बाजूला भग्नावस्थेत ले पांढऱ्या दगडाचे तुकडे दिसले. ते म्हणजे शिवलिंगाचे तुकडे आहेत , आणि ते पण या  खांबा प्रमाणेच जोडले जातील असे त्यांनी सांगितले.

उत्खननात बाहेर निघालेले मंदीर..

इथे एक लहानसा टीळा होता. त्या टीळ्याखाली दडलेले हे मंदीर . मंदीराचा प्लान पुर्णपणे व्यवस्थित आहे. इ.स. ६५० च्या काळात त्या मंदीरात अंथरलेली फरशी अजूनही उत्कृष्ट अवस्थेत दिसत होती.फरशीची जाडी पण चांगली तिन इंच असेल. गर्भ गृहाचे दार त्यांनी दाखवले बरेचसे तुकडे जोडून पुर्ण केलेल ते दार अप्रतीम कलाकृतीचा नमूना होते. मंदीराचे दार इथे असावे, इथून तुम्ही आत आलात, की इथे नंदी, मग पुढे गर्भगृह.. इथेच म्हणजे याच साईटवर शर्माजींना सापडलेली एक मुर्ती आता संग्रहालयात साफ सफाई करता नेऊन ठेवलेली आहे. तिकडे जाऊन पहा म्हणाले ते.या मंदीराला लागूनच दूसरे शिवाचे मंदीर दिसत होते. आता शिवाचे मंदीर दोन का? आणि ते पण एकाच जागी- एकाला एक लागून? तर त्यावर ते  म्हणाले की हे पुर्वीच्या काळात  जातींची    मंदीरं असावीत.

पण मला पण आश्चर्य वाटलंच. या माणसाचा उत्साह मात्र वाखाणण्यासारखा आहे. अहो इतक्या उन्हातान्हात दिवसभर उभा असतो हा  गृहस्थ खोदकामाच्या ठिकाणी. ते गमतीने  म्हणाले की जर मी नसलो तर एखादी सुंदर कलाकृती पण ही मठ्ठ मंड्ळी कुदळीने खोदून काढतील.

मंदीराची फरशी नुकतीच बाहेर निघालेली.

एखादी मुर्ती आहे असा संशय जरी आला , तरीही कुदळी वगैरे वापरणे बंद केले जाते आणि लहानशा चमच्या एवढ्या अवजारानी , ब्रशनी माती दूर केली जाते .बाहेर काढतांना मुर्तीचे काही नुकसान होऊ नये म्हणून खूप काळजी पूर्वक काम करावे लागते. इथे काम करणारे पण लोकल छत्तीसगढी लोकं . अर्थात इतकी वर्ष आमच्या बरोबर काम करून ते लोकं आता काळजी पूर्वक काम करायला शिकले असल्याने फारसा त्रास होत नाही. ’उनके दिलमे भी इन कलाकृतीयोंके बारेमे दर्द  और प्यार पैदा कर दिया है हमने” असे म्हणणारे शर्माजी…. हॅट्स ऑफ टू हिम

हे पोस्ट तर खूप मोठं होतंय. अजून खूप महत्वाची माहिती लिहायची आहे- बरेच फोटॊ पण आहेत पण .. पुढल्या भागात ..पुर्ण बाहेर निघालेले मंदीर – जगातले एकमेव  विटांचे मंदीर आणि  ते देखील ६व्या शतकातले.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात.... Bookmark the permalink.

25 Responses to उत्खननाच्या साईट्वर…१

 1. vikram says:

  काही मोठे नाही ओ काका
  तुम्ही लिहा सर्व माहिती ज्याला वाचायचेच आहे त्याला काय मोठे न काय असो
  खूपच रोचक माहिती आहे
  शर्माजी त्यांना या जागेची माहिती कधी व कशी मिळाली याबद्दल काही कल्पना ?
  बाकी या वयात शर्माजींचा उत्साह खरच वाखण्याजोगा आहे 🙂
  पुढची पोस्ट लवकर येऊद्यात वाट पाहत आहे 🙂

  • विक्रम
   ती सगळी माहिती पुढल्या भागात येईल. पण हा अनूभव एकदम मस्त होता. खरं म्हणजे वेळ कमी पडला.

 2. गेल्या पावसाळ्यात अशाच एका उनाड सहलीसाठी आम्ही तिघेजण चावंड किल्ल्यावर गेलेलो ..हे जुन्नर जवळ आलं तिथे कुकडेश्वर म्हणून एक जुनं मंदिर आहे ……तेही भग्नावस्थेत आहे पण खूप छान होतं ..काही छायाचित्रे …http://bit.ly/dkcWrB …बघा आपला इतिहास कसा दैदिप्यमान होता..आणि ह्या नवीन युगात आपण काही असं बनवलेलं नाही कि जे फक्त निमिषभर जरी पाहिलं तरी मन थक्क होतं

 3. वाह मस्त..मी कल्पना करू शकतो किती छान वाटला असेल तुम्हाला ती साइट बघताना. शर्माजींचा उत्साह मनाला पाहिजे. पुढल्या डीटेल्ड पोस्टची वाट बघतोय 🙂

  • सुहास
   फार मोठे आहेत ते.. नशिबानेच त्यांची भेटघालून दिली.. पुढले पोस्ट लिहितोय..

 4. Nikhil Sheth says:

  त्याच्याशी संबंधित हे आर्टिकल आहे…http://www.outlookindia.com/article.aspx?227844

  • निखिल
   त्या आर्टिकल मधे एके शर्माजींचा फोटो पण दिसतोय. तीच साईट आहे मी व्हिजिट केलेली. शर्माजी खूप मनमिळाऊ वाटले. चांगला तासभर बसलो होतो गप्पा मारत त्यांच्याशी. त्यांच्यामुळेच लक्षमण मंदीर पहाता आले.. लिंक साठी आभार.

 5. Pingback: Tweets that mention उत्खननाच्या साईट्वर… | काय वाटेल ते…….. -- Topsy.com

 6. sumedha says:

  खूप छान पोस्ट वाटले . फोटोन मुळे नीट लक्षात आले , खरेच आणखी सविस्तर पोस्ट करा तुम्ही …
  मागे आशा बगेंची कादंबरी वाचली होती (भूमी) .आत्ता नक्की नाव लक्षात नाही , चुकले असेल तर सुचवावे ..त्यात उत्खननांचे उल्लेख होते , त्यमुळे तेव्हा याबद्दल खूप उत्सुकता होती ….तुम्ही आणखी डीटेल लिहिले तर अजून माहिती मिळेल . शर्माजीन्च्या उत्साहाबद्दल काय बोलावे , आमच्यासारख्या नव्या पिढीला हा मोठा आदर्शच आहे.

 7. थेट उत्खननाच्या ठिकाणी जावून माहिती घेतलीत आणि तीही ह्या क्षेत्रातील गुरु माणसाकडून म्हणजे तुम्ही नशीबवानच!
  मस्त माहिती आहें

  • निरंजन
   ते स्वतः डायरेक्टर होते या विभागाचे. सगळ्या भारतभर त्यांनी काम केलंय.. थोडक्यात माहिती लिहितोय दुसऱ्या भागात.

 8. mau says:

  Vikram ne mhatalay tase kharach hi post kahi mothhi nahi…savaDine ajun maahiti jarur postdvare takal…photos khup chhan….vachayala baghayala nakkich awadel….baki sharma ji gr8 !!!!!
  navya postchi waat baghatoy …

  • ऊमा,
   मला सुरुवातीला वाटले होते की बरेच मोठे होईल पोस्ट म्हणुन दोन भागात बनवले आहे. फार वेळ घालवता आला नाही तिथे पण जितका वेळ होता त्याचं सोनं झालं हे नक्की.. शर्माजी खूप मोठे आहेत. त्यांची बरीच पुस्तकं पण आहेत या विषयावरची. त्यांचे मत हे रेफरन्स मत म्हणुन समजले जाते. आता लखनाऊला हायकोर्टात जाय़चंय म्हणत होते २२ तारखेला साक्ष आहे म्हणाले.
   इतके मोठे आहेत हे नंतर घरीअआल्यावर नेट वर शोधल्यावर समजलं. त्यांनी स्वतः बद्दल फार कमी माहिती दिली होती.

 9. ajay says:

  mahitipurna post ahe, kaka babri masjid chi kahani aikachiy ahe, tithe masjid navti he sharmajine kasa patvun sangitala te please eka postdvare sangan kaa, aikayachi phar icha ahee..

  ajay

 10. काका…खूप माहितीपुर्ण लेख आहे. बाबरी संदर्भात लिहल तर वाचायला नक्कीच आवडेल पुढील पोस्टची वाट पाहतो आहे.

 11. प्रसाद says:

  अतिशय सुंदर माहिती आहे..
  पुढच्या पोस्टची वाट बघतोय….
  बाबरी मस्जिदच्या पोस्ट पण अवश्य लिहा..

 12. ही पोस्ट खूप छोटी आहे. मोठी पोस्ट लिहा. तुम्ही खूप छान आणि महत्त्वाची माहिती दिलीत. उत्खननाविषयी वाचायला मला आवडतं.

  ठाण्याला सिद्धेश्वर तलावाजवळ सार्वजनिक शौचालयाच्या पुनर्बांधणीसाठी जेव्हा खोदकाम सुरू होतं, तेव्हा तिथे ब्रह्मदेवाची मूर्ती मिळाली होती. ब्रह्मदेवाची चार तोंडं असलेली मूर्ती खूप दुर्मिळ असते. या गोष्टीला आता किमान ८ वर्षे झाली असतील. वाईट या गोष्टीचं वाटतं की ती मूर्ती अजूनही कुठल्याच संग्रहालयात हलविलेली नाही. तिथल्याच राममंदिराच्या आवारात उभी करून ठेवलेली आहे. तिथे आणखीही छोट्या मोठ्या मूर्ती मिळाल्या होत्या; त्यांचं काय झालं माहित नाही. हे पुरातन वैभव व्यवस्थित जतन करून ठेवता आलं, तर येणा-या पिढीला आपण आपल्या संस्कृतीचा इतिहास सांगू शकतो.

  बाबरी मस्जिदबद्द्ल सुद्धा लिहा. तुम्हाला ते उत्खननाचं काम स्वत: पहायला मिळालं. लकी आहात. शर्माजींसारख्या माणसांना आपल्या पुरातन वास्तूंबद्दल प्रेम आहे म्हणून त्या आपल्याला कळतात तरी. त्यांच्याबद्दल पण काही जास्त लिहिता आलं तर लिहा.

  • कांचन
   अरूण कुमार शर्मा , आर्किओलॉजिस्ट सर्च मारला तर सगळी माहिती मिळते. दुर्दैवाने ते इतके मोठे आहेत हे नेट वर शोधल्यावर समजलं. तो पर्यंत ते सर्वसाधारण वाटले. पण त्यांचे ज्ञान मात्र सगळं काही फिंगर टिप्सवर.. उद्याच्या पोस्ट मधे थोडक्यात लिहितो त्यांच्या बद्दल पण.
   आपल्या सरकारचं या गोष्टीकडे दुर्लक्ष खरच चिड आणतं.

 13. Pingback: उत्खननाच्या साईट्वर…२ | काय वाटेल ते……..

 14. Pingback: उत्खननाच्या साईट्वर…१ | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA.

 15. वाचतोय. खुप छान लेख. शर्माजींसारखी ग्रेट माणसे आहेत हे खरोखर आपले भाग्यच आहे. पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत.

  विशाल

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s