उत्खननाच्या साईट्वर…२

@

ak sharma, arunkumar sharma

अरूण कुमार शर्मा.

जाण्यापूर्वी बराच वेळ गप्पा मारल्या शर्माजींशी ,त्यांनी पण बऱ्याच टीप्स दिल्या की जुनी  स्थळं कशी काय पहायची ते. प्रत्येक दगड काहीना काही तरी बोलत असतो, प्रत्येकाची आपली एक कहाणी असते , ती तुम्हाला वाचता आली पाहिजे  तरच तुम्ही प्रत्येक वस्तू एंजॉय करू शकता. सध्या आम्ही जिथे गप्पा मारत बसलो होतो तिथे एक मंदीर सापडले होते. मंदीर म्हणण्यापेक्षा मंदीराचे अवशेष. जुन्या मंदीरातल्या मुर्त्या , कोरीव खांब वगैरे लोकांनी चोरून विकल्या आहेत तर काही लोकांनी चक्क घराचा पायवा भरताना हे  दगड, किंवा भग्न झालेल्या मुर्त्यांचे तुकडे वगैरे पण  वापरले आहेत. कित्तेक अनमोल वस्तू अशा तर्हेने इतिहास जमा झालेल्या आहेत. जुन्या वस्तूंची किंमत लोकल लोकांना  न समजल्याने असे होते.

भारत सरकारचा कलेच्या बाबतीतला निरुत्साह तर आहेच.   ह्या जागेचा शोध पण एका ब्रिटीश फॉरेस्ट अधिकाऱ्याने  १८७३ मधे लावला.  बेगलर नावाचे एक ब्रिटीश फॉरेस्ट अधिकारी इकडे ( तेंव्हा असलेल्या घनदाट जंगलात- अजूनही जंगल आहे, पण तोडल्या गेलंय बरंचसं) फिरायला आले असता त्यांना एक  मंदीर  संपुर्ण झाडी झुडपांनी वेढलेले सापडले.त्यांनी ताबडतोब या गोष्टीची कल्पना  कंपनी सरकारला दिली .  नंतर  सर अलेक्झॅंडर कनिंघम या ब्रिटीश इतिहास तज्ञाने १९०९ मधे इथल्या जागेकडे जगाचे  लक्ष वेधले आणि उत्खनन सुरु केले. .

नंतरच्या काळात म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात या भागाकडे पुर्ण दुर्लक्ष केले गेले.  एमपी आणि छत्तिसगढ एकत्र असतांना एमपी सरकारने या  भागाच्या प्रगतीकडे पुर्ण  दुर्लक्ष केले. पण १९५३ साली पुन्हा पुरातत्त्व विभागाला जाग आली आणि पुढली चार वर्ष  थोडं फार काम झालं. ते पण लवकरच  बंद पडलं – सरकारी यंत्रणाचा   निरुत्साह  खरोखरच संतापजनक आहे.

सरकारने हात उभे केल्यावर  ह्या जागेच्या  उत्खननासाठी अर्थ सहाय्य  बोधिसत्व नागार्जुन शोध संस्था मन्सर, नागपुर,  या संस्थे ने केले.   त्या संस्थेने श्री एके मिश्रा यांना   जवळपास पाच वर्ष स्वतःच्या खर्चाने उत्खनन करण्यास सांगितले- कारण ह्या भागात बौध्द धर्माशी संबंधित काहीतरी सापडेल अशी त्यांना खात्री होती.  अर्थ साहाय्य दिले तो काळ म्हणजे १९९९ ते २००४.

काय झालं? खोटं वाटतंय ? की संताप येतोय  इतकी वर्ष या जागेकडे सरकारने दुर्लक्ष केलं म्हणून? इतकी बहुमूल्य धरोहर असलेल्या या विभागाकडे शासनाच्या नाकर्तेपणामुळे केले गेलेले दुर्लक्ष बघून? माझी पण तीच अवस्था झाली होती.

२००५ पासून  छ.ग.शासनानेच या उत्खननाचा भार उचलला आहे. स्वातंत्र्यानंतर साठ वर्ष दुर्लक्षित राहिलेली ही धरोहर… आता पुन्हा सूर्यप्रकाश पहायला बाहेर येते आहे.सरकारने हे उत्खननाचे जे काम आता हाती घेतले आहे ते जर पूर्वी घेतले असते तर बरंच काही वाचलं असतं.

जुन्या विटा, घरांची दारं, वगैरे सगळं  काही चोरून आपली घरं बांधलेली आहेत लोकांनी. कदाचित तुम्हाला खोटं वाटेल, पण त्या काळच्या म्हणजे इस ६५० च्या विटांचा दर्जा हा आजच्या विटा पेक्षाही चांगला होता.  .प्लास्टर जरी केले नाही तरीही त्या विटांचे फिनिशिंग पिओपी केलेल्या भिंती प्रमाणे दिसते.

लक्ष्मण मंदीराच्या दारावरच्या कमानीवर संपूर्ण दशावतार, आणि कृष्णाचे कंस वध हे शिल्प कोरलेले आहे. विटांवरच्या कोरीव कामाचे हे जगातले एकमेव उदाहरण म्हणता येईल.

महानदीच्या काठावर वसलेले हे श्रीपूर एके काळी दक्षिण कौसल या राज्याची राजधानी असलेले हे दहा वर्ग किलोमीटर मधे प्रस्थापित झालेले शहर. हे अतिशय महत्त्वाचे  होते. व्यापारपेठ म्हणून सुध्दा खूप नावाजलेले होते.कौसल राज्याची राजधानी असलेले शहर  बहूतेक महानदीला आलेल्या महापुराचे नष्ट झाले असावे. आत्तापर्यंत  इथे जवळपास ४८ साईट्स सापडल्या आहेत . त्यामधे काही बौध्द धर्मियांच्या दॄष्टीने खूप महत्वाचा आहेत.

mahendra kulkarni, kayvatelte.kayvattelte.com,kayvatelte.com,marathi

बुध्दविहार- जो मी पाहु शकलो नाही..अतीशय सुंदर अशा मुर्ती सापडल्या आहेत. सगळ्या मुर्त्यांचे फोटो खाली एकत्र स्लाईड शो मधे पोस्ट करतोय

त्याच काळात या भागात बौध्द धर्माने पण चांगलाच जम बसवला होता. बौध्द विहार, आणि गौतम बुद्धाच्या मुर्त्या तर बऱ्याच सापडल्या आहेत. ज्या काळात नागार्जुनाच्या काळात आंध्र प्रदेशात आताचे नांव नागार्जुन सागर येथे एक बौध्द विद्यापीठ स्थापन झाले होते  त्याच काळात इकडे पण बौध्द धर्माचा चांगलाच जम बसलेला होता.  सुंदर मुर्त्या आहेत आणि बुध्द विहार उत्खननात सापडले आहेत.

कॅमेरा हललाय. पण ही सुबक मुर्ती इथे याच ठिकाणी गेली दोन सहस्त्रक आहे. आता फक्त पार नविन बांधलाय असे समजते. जेंव्हा गौतम बुध्द इथे आले होते तेंव्हा बुध्द गये वरुन आणलेले बोधीवृक्षाचे सॅपलींग चा झालेला मोठा वृक्ष अजूनही आहे असे म्हणतात.

एका शिव मंदीरातल्या वडाच्या झाडाखाली एक मुर्ती सापडली , ती त्याच अवस्थेत ठेवलेली दिसली. अतिशय रेखीव मुर्ती आहे ती. गंडेश्वर शिवमंदीर.

त्यातल्या  त्यात उल्लेखनीय म्हणजे ही मंदीरं आणि धान्य साठवायची जमिनीखालची  गोदामं. इथे कित्येक हजार टन धान्य साठवून ठेवण्याची सोय जमिनीखाली केलेली होती. जरी पुर्ण छत्तीसगढ मधे दुष्काळ पडला तरीही दोन वर्ष धान्य पुरेल इतकं धान्य साठवून ठेवण्याची सोय होती केलेली.ती जागा नुकतीच शोधून काढलेली आहे, पण आम्हाला फार वेळ नव्हता अंधारून येत होतं, म्हणून शर्माजी म्हणाले, की लक्ष्मण मंदीर आणि शिव मंदीर पहायला आधी जा, आणि पुढल्या वेळेस थोडा जास्त वेळ घेउन आलात की मग ती इतर ठिकाणं पण दाखवीन तुम्हाला- तशी ती सगळ्या लोकांसाठी अजून उघडलेली नाहीत- पण तुम्ही या पुन्हा !!

मंदीराचा मागच्या बाजूने काढलेला फोटॊ. हे मंदीर पुर्णपणे मातीच्या ढिगाऱ्या खाली दडलेले होते.

त्याच शिवमंदीराचा समोरचा भाग. १५०० वर्ष जुनी वास्तु आपण पहातोय ही कल्पनाच खूप आनंद देऊन जाते. वर जाउन जेंव्हा त्या महादेवाच्य पिंडी शेजारी बसलो, तेंव्हा खरंच भरून आलं होतं. अप्रतीम जागा आहे ही. वर उंच जाणाऱ्या पायऱ्या बघा इतकं सुंदर स्ट्रक्चर कधीच पाहिलेले नाही. खूप मोठा उंचवटा आहे आणि नंतर वर मंदीर आहे. खाली समोर सभामंडप पण होता, तो आताशिल्लक नाही.

उत्खननातून सगळ्यात मोठी उपलब्धी म्हणजे त्यांनी शोधून काढलेलं शिव मंदीर.. पूर्वीच्या काळी म्हणे प्रत्येक ज्ञातीचे लोक वेगवेगळ्या रंगाच्या शिवलिंगाची पूजा करायचे, ब्राह्मण पांढरा, वैश्य पिवळा, आणि लाल व काळं शिवलिंग पण असायचं. जास्त डिटेल्स लक्षात नाहीत . राजाने सगळ्या समाजामधे एकता असावी म्हणून चार रंगांची शिवलिंग एकाच ठिकाणी असलेले हे देखणे मंदीर बांधले. संपुर्ण दगडी मंदीर आहे ते. दगडाचा एक   उंच मोठा चौथरा आहे  जवळपास पाच मजली इमारतीइतका उंच !   आणि त्यावर त्या चार शिवलींगांची स्थापना केल्या गेली आहे.

फोटॊ बिघडलाय पण भुकंपामुळे झालेल्या वाकड्या पायऱ्या ह्यात स्पष्ट दिसतात म्हणून पोस्ट केलाय.

वर चढायला दगडी पायऱ्या आहेत- पण चढतांना फार भिती वाटते . एक ठिकाणी बऱ्याच पायऱ्या वाकड्या झालेल्या दिसल्या. त्या अशा आहेत हे शर्माजींनी  आधिच सांगितले होते. इ.स. १२०० मधे अमरावती इथे एपीसेंटर असलेला एक भुकंप झाला होता. त्या मधे मंदसौर आणि हे ठिकाण त्याच   फॉल्ट लाइनवर येते, त्यामुळे असेच नुकसान  दोन्ही ठिकाणी झालेले  आहे.

पायऱ्या चढून वर गेल्यावर अशा चार रंगाच्या महादेवाच्या पिंडी आहेत.

त्या मंदीराच्या ठिकाणी पूर्वी एक टेकडी होती. त्या टेकडीवर प्रातर्विधी उरकायचे पूर्वीचे लोकं. पण इतक्या सखल जागी अशी टेकडी का? म्हणून उत्खनन केल्यावर ते मंदीर सापडले. ते तुम्ही नंतर पहा, पण त्या आधी इथे बाजूला असलेले ते लक्ष्मण मंदीर तुम्हाला दाखवायला एक माणूस देतो. तो माणूस दाखवेल सगळं. म्हंटलं ते  लक्ष्मण मंदिराचे गेट बंद आहे, तर म्हणाले, उघडू हो तुमच्या साठी.. जा बघून या ते मंदीर- आता माझ्याच्याने फार फिरणे होत नाही, नाहीतर मीच आलो असतो तुमच्या बरोबर दाखवायला. त्यांनी दिलेली सगळी माहिती वर लिहिलेली आहेच म्हणून फोटो पण वर पोस्ट करून टाकले .

कंठीराम आमचा गाईड - खरं तर हा उत्खनन कामगार, पण शर्माजींनी सांगितलं म्हणून आमच्या सोबत आला दाखवायला. ्पार्श्व भुमीवर

शर्माजींनी . कंठीरामाला आमच्या सोबत दिले, आणि सांगितले की आम्हाला सगळं काही दाखव म्हणुन.

लक्ष्मण मंदीर..पुर्ण विटांचे बांधकाम.अतीशय सुंदर कोरीव काम अजूनही दिसून येते . खालची फरशी पण ओरिजिनल होती त्याच अवस्थेत आहे. संपुर्ण मंदिरच छान आहे. फक्त समोरचा सभा मंडप तुटलेला आहे. मंदीरावरच समोरचे छत दगडी फरशी चे आहे

आधी आम्ही लक्ष्मण मंदीरात गेलो. हे मंदीर पुर्णपणे कोरीव आहे, आणि जगातले एकुलते एक विटांचे कोरीव काम केलेले मंदीर आहे. सहाव्या शतकातल्या विटा अजूनही अतिशय उत्तम अवस्थे मधे आहेत. विटा बनवून नंतर त्या विटांच्या वर कोरीव काम करून हे मंदीर बनवलेले आहे. कंठी रामने एक विट दाखवली म्हणाला की ही विट तांदूळाच्या भुशापासून बनवलेली आहे.  वर काही ठिकाणी पांढरा रंग दिलेला दिसत होता. तो रंग पण सहाव्या शतकातला आहे म्हणाला तो.पुर्वीच्या काळी विटांचे मंदीर बनवल्यावर ते टिकावे म्हणून चूना, उडिद डाळ, गूळ आणि अजून काही पदार्थ मिक्स करून बनवलेला तो चुना प्लास्टर साठी वापरलेला आहे. एक ठिकाणी त्याने आम्हाला हे मिक्स करण्यासाठी वापरात येणारी यंत्रणा ( दगडी ) पण दाखवली. या सगळ्या पदार्थांपासून बनवलेला तो चुना अजूनही पक्का दिसला.  अशाच प्रकारचा चुना हा द ग्रेट वॉल ऑफ चायना साठी पण वापरला गेला होता.

विटांचे बांधलेले लक्ष्मण मंदीर. कळसापर्य़ंत जमिनिखाली गाडले गेले होते म्हणुनच ते आज आपल्याला पहायला मिळतंय.

हेच ते मंदीर जे इंग्रज अधिकाऱ्याला सापडले होते. जेंव्हा हे मंदीर सापडले, तेंव्हा फक्त कळस आणि तो पण पुर्णपणे झाडा झाडाझुडपांनी वेढलेला  दिसत होता. जेंव्हा हळू हळू बाजूची माती बाजूला केली  तेंव्हा हे जगातले एकुलते एक अद्वितीय  कलाकुसर असलेले विटांचे मंदीर सापडले.   बाकी मंदीर पुर्णपणे जमिनी खाली होते. सारख्या पाऊस, गारपीट आणि निसर्गाच्या तडाख्यात कळस उघडा होता  म्हणून फक्त कळसच भग्न झालेला आहे. बाकीचे मंदीर हे मातीखाली गेल्याने बरीच कलाकुसर ही  अजूनही शाबुत आहे.

लक्ष्मण मंदीराचे दर्शनी दार. त्यावरच्या दशावताराचे उत्कृष्ट चित्रण केलेल दिसते.

अतिशय सुंदर परिस्थितीतले हे मंदीर आहे. प्रत्येक विटेवर ची कलाकुसर पहाण्यासारखी आहे. विष्णूचे दशावतार हे मंदीराच्या दाराच्या चौकटीवर कोरलेले दिसतात. काही ठिकाणी मैथुन चित्र, तर काही ठिकाणी चक्क कृष्णाचे कंस वध आणि कृष्णलीलांचे चित्रण पण केल्या गेलेले आहे. इथे सापडलेल्या शिला लेखावरून हे मंदीर ६२५ -६५० मधे बनवल्या गेल्याचे  समजते

या मंदीरातली मुर्ती पुर्वी एकदा चोरीला गेली होती. मुर्तीची काळ्याबाजारातली किम्मत लाखो रुपये आहे.

मंदीराच्या भिंती कमीत कमी अडीच ते तिन फुट जाडीच्या आहेत.

मंदीर दाखवतांना आमचा गाईड सगळी माहिती देत होता. शर्माजींच्या बरोबर राहिल्याने बरीच माहिती दिसत होती त्याला. अगदी सनावळी पण तोंडपाठ होत्या. ४थ्या शतकात ते ७ व्या शतकात बरीच मंदीरं बांधली गेली, पण विटांचे बांधलेले आणि अजूनही उत्तम स्थितीत असलेले मंदीर हे एकच!

पशूपतीनाथ प्रमाणे चारही दिशेला चेहेरा कोरलेली शिवलिंगाची कोरीव मुर्ती.

हे मंदीर पाहिल्यावर याच्या मागेच एक संग्रहालय आहे. जिथे फक्त उत्खननात सापडलेल्या मुर्त्या ठेवण्यात आलेल्या आहेत. सगळ्यात उत्कृष्ट कलाकृती म्हणजे चार चेहेरे असलेले शिवलिंग. पशूपतीनाथाच्या मंदीरात असलेल्या शिवलिंग प्रमाणे असलेले हे शिवलिंग अतिशय सुंदर कोरीव आहे. या व्यतिरिक्त कित्येक मुर्त्या काही पूर्णावस्थेत तर काही भग्नावस्थेत सापडलं.  ते सांगत होते, एक मुर्ती तर म्हणे खाली तोंड करून एका घरासमोर पायरी म्हणून  कित्तेक वर्ष वापरात होती.  जेंव्हा तो पायरीचा दगड सरळ केला तर ती सरस्वतीची मुर्ती आहे म्हणून लक्षात आले.

अशा प्रकारे  उत्खननात सापडलेल्या मुर्त्या एकत्र करून एका संग्रहालयात ठेवल्या आहेत . अशा मुर्त्या चोरीला जाण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. जितकी जुनी आणि रेखिव  मुर्ती, तितकी जास्त किम्मत! त्या मुर्त्यांचे फोटो   या लेखाच्या शेवटी  पोस्ट करतोय.

हे  सगळं पाहू झाल्यावर महानदीच्या शेजारी असणारे  गंडेश्वर महादेवाचे मंदीर पहायला गेलो. पण तिथे गेल्यावर मात्र पुर्ण निराशा झाली. मंदीराचा जिर्णॊध्दार करण्यात आलेला आहे, आणि तो करतांना सरळ सिमेंट प्लास्टरने सगळा जुना भाग झाकुन टाकण्यात आलेला आहे. हे मंदीर पुरातत्त्व विभागाच्या अंतर्गत येत नाही. या मंदीराशेजारी पण बऱ्याच मुर्त्या पडलेल्या आहेत.

गंडेश्वर महादेव मंदीर - जिर्णोध्धार केलेले

मंदीराच्या मागे महानदी वाहते. अतिशय सुंदर दृष्य दिसते तिथुन. मागचा भाग पुर्णपणे बांधलेला  आहे. खाली  नदीवर जाण्यासाठी पायऱ्यांची सोय केलेली आहे. पण पायऱ्या इतक्या स्टीफ  आणि फक्त चार इंच विड्थ असलेल्या आहेत की तिकडून खाली जाण्यासाठी खूप सराव असायला हवा असे  वाटले म्हणून हिंम्मत केली नाही.

मंदिराचा मागचा भाग आणि खाली पाण्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या. असे म्हणतात की ह्या पायऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्याने बांधून दिल्या आहेत..

्पायऱ्यांचा अ‍ॅंगल हा जवळपास ८० डीग्री आहे. खूप अवघड आहेत पायऱ्या.  मंदीराच्या मागे एक नविनच बांधलेले देवीचे पण मंदीर आहे, पण  माझे लक्ष दुसऱ्या एका दगडी मंदीराकडे गेले. हे दगडी मंदीर पण साधारण त्याच काळातले. खूप दणकट मंदीर आहे. त्या कृष्ण मंदीरात गेलो , तिथे बहूतेक पुजा अर्चा होत नसावी असे वाटते. मंदीर अतीशय उत्तम अवस्थेतआहे. मंदीरामागे गर्भगृहखाली एक गुहा पण आहे. त्या गुहेत पुर्वी वाघ रहायचे असे म्हंट्ले जाते.

कृष्ण्मंदिर.. पुर्ण दगडाचे बांधकाम असलेले.

इतकं सगळं पाही पर्यंत अंधार पडलेला होता, आम्ही परत  निघालो. हे शहर महानदीच्या का्ठावर वसलेले आहे. अजूनही नदी फार सुंदर दिसते संध्याकाळी. काढलेला एक फोटो पोस्ट करतोय खाली. शर्माजी म्हणाले की जर इथे पुर्ण उत्खनन केलं तर कदाचित मोहंजोदडॊ प्रमाणे  एखादी पुर्ण संस्कृती सापडेल आ्णि ही साईट जागतिक हेरीटेज साईट होण्याच्या क्षमतेची आहे.

महानदी....

This slideshow requires JavaScript.

निघतांना  पुन्हा मनःपुर्वक आभार मानले शर्माजींचे . अरूण कुमार शर्मा यांच्या बद्दल पण थोडक्यात माहिती देतो.  नेटवरून घेतलेली माहिती आहे  ही..

Sh. AK SHARMA is an archaeologist of repute. He is internationally known for his original contributions in the field of archaeology and anthropology. During thirty three years of his hectic career, in different capacities in the Archaeological Survey of India he explored and excavated a number of sites throughout the length and breadth of the country, particularly in remote and inaccessible areas of North-East India, Jammu-Kashmir and Lakshadweep. For the First time, through his field works he brought Sikkim and Lakshadweep Islands in the Archaeological map of the country. To his credit goes the discovery and excavation of the biggest Stone age site Anangpur (near Delhi), the biggest prehistoric cave of kachagad in Maharashtra, the sprawling nucleus megalithic site in chhattisgarh, unique Neolithic site of Gufkral in Kashmir valley, early historic sites of Sekta in Manipur and Vadagokugiri in Garo Hills of Meghalaya. He is also known for the discovery of horse bones of domesticated horse bones of domesticated horse in Harappan context which have been internationally acknowledged and has changed the whole theory about Aryan Migrations. He has to his credit more than 50 published research papers on anthropology, archaeology, prehistory and other aspects of archaeology. Presently he is working as senior fellow of Indian council of Historical Research on his project “Megaliths of Chhattisgarh including Bastar”. His recent book on History of Tansa valley is being published by ‘Gurudeva Siddha Peeth Ganeshpuri’, Mumbai. Presently he is the Director of Excavation Art Mansar in Maharashtra.

उत्खननाच्या साईटवर पहिला भाग … १ इथे क्लिक करा.


About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात... and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

47 Responses to उत्खननाच्या साईट्वर…२

 1. vikram says:

  अतिशय सुदर माहिती काका
  खूप दुख होते अशी आपली प्राचीन धरोहर फक्त लक्ष नसल्याने वाया जात आहे त्याचे
  शर्माजीनी खूप चांगले काम केले आहे त्यांना सलाम केल्याशिवाय राहवत नाही
  मला एकाच गोष्टीचे दुख आहे कि मी काही महिन्यापूर्वीच रायपुर ला जाऊन आलो आहे आणि मला या गोष्टीची अजिबात कल्पना नह्वती
  तुमची पोस्ट अगोदर आली असती तर नक्कीच मी हे स्वत पाहू शकलो असतो 😦
  असो तुम्ही खरच लकी आहात काका 🙂

  • विक्रम
   मला पण अगदी काहीही माहिती नव्हते. आणि लोकल लोकांना पण अजिबात कौतुक नाही या साईटचे. मला पण अगदी अ‍ॅक्सिडेंटली सापडली ही साईट> अजिबात काही प्लान नव्हता. पण पुढ्ल्या वेळेस जर रायपूरला जाणे झाले, तर अवश्य भेट द्या या साईटला. लोकल रायपूरच्या लोकांना काही माहिती पण नाही या बद्दल. शर्माजी तिथेच असतात, फक्त अधुन मधुन बाबरीच्या केस साठी जावे लागते यांना.

 2. sumedha says:

  धन्यवाद महेंद्र ,
  लगेच दुसरी सविस्तर आणि जबरदस्त पोस्ट लिहिल्याबद्दल .
  खूप छान् .
  सरकारच्या उदासीनतेचा खरेच प्रचंड संताप आला . ही विटा वरील कलाकुसर असते हे तर माहीतच नव्हते .

  • सुमेधा
   आज सुटी.. काहीच काम नव्हतं, म्हणुन लिहिता आलं. अशाच एका अजून साईटला भेट दिली होती. तिथे पुर्ण बौध्द कालीन शहर सापडलं. नागार्जुन सागर बद्दल बोलतोय मी आंध्रातल्या. त्यावर पण एक पोस्ट लिहीन कधीतरी. बरेच फोटॊ आहेत काढलेले तिकडले पण.

 3. सागर says:

  काका
  मला लक्ष्मण मंदिर खूप आवडले.
  त्या ब्रिटिश आधिकारीचे सुद्धा आभार.
  मला ब्रिटिश लोक आवडतात ते ह्याच कारणासाठी.

  • सागर
   अजींठा – वेरूळ पण त्यांनीच म्हणजे ब्रिटीश लोकांनीच शोधुन काढलंय. जागरूकता फार कमी आहे या वास्तूंच्या संरक्षणाबद्दल. इथे पाट्या लिहिलेल्या दिसतात- बांधकाम विटांचे आहे, त्यावर काही खरडू नका म्हणून. अशा पाट्या लावायची वेळ का यावी??

 4. गौरी says:

  प्रसिद्ध तत्त्वज्ञ आणि गणिती लाईबनिझ सतराव्या शतकात जिथे राहत होता, तसाच दर्शनी भाग असाणारं ’लाईबनिझचं घर’ पुन्हा उभं केलंय हानोवरमध्ये. कालच ते बघितलं, आणि वाटलं, लाईबनिझ नशीबवान होता … त्याचं घर पुन्हा उभं करावं इतकी त्याची आठवण ठेवणारे लोक गावात आहेत.
  आपल्याकडे या ऐतिहासिक ठेव्यांच्या माथी अजूनही उपेक्षाच आहे. तुम्ही ब्लॉगवर लिहिलंत, म्हणून ही माहिती लोकांपर्यंत पोहोचली. खूप माहितीपूर्ण पोस्ट.

  • गौरी
   आपल्या देशात आपल्याकडे काय आहे हे आपल्यालाच माहिती नसतं. बऱ्याचशा पुरातन साईट्स या पुर्णपणे दुर्लक्षित असतात. एका घरामधे एक जूनी मुर्ती पालथी बसवून कपडे धुण्याचा दगड म्हणून वापरात होती असेही समजले. लोकल लोकांना या गोष्टीचे महत्व तितकेसे वाटत नाही. लक्ष्मण मंदीरासमोरच एक विटांचे राम मंदीर पण आहे. त्याच्या फक्त भिंती उभ्या आहेत, कळ्स कोसळला ( की चोरीला गेला?) असावा.

 5. वाह काका! उत्तम पोस्ट. इतक्या detailed माहितीबद्दल धन्यवाद. असलं काही जर पाश्चात्य देशात सापडलं असतं तर आतापर्यंत ते ठिकाणी “international tourist spot” म्हणून प्रसिद्ध झालं असतं. इथे आपल्या देशातल्या देशातही कोणाला पत्ता नाही. पोस्ट बद्दल पुन्हश्च धन्यवाद!

  • अभिलाष,
   स्वातंत्र्यानंतर जरी ताबडतोब या जागेवर ताबा घेऊन उत्खनन सुरु केलं असतं तरीही अजून बरंच काही सापडलं असतं पण, सरकारने पुर्णपणे दुर्लक्ष केलं थोडे थोडके नाही तर ६० वर्ष. ही एक जागतीक धरोहर म्हणून महत्वाचे ठिकाण होऊ शकते.
   पुर्वी एकदा अहमदाबादला गेलो असतांना त्या स्टेप वेल बद्दल पण अशीच उदासिनता दिसली होती..

 6. mau says:

  faar sundar aaNi savistar maahiti dilyaabaddal kharach manpurvak dhanyvaad…..tumachi lekhan shaili uttam aahech…pratyek gosht chhan samjavun sangayachi kala pan aaj kalali….blogvar hi sagle mahiti upalbdh karun dilit mhanun Abhaar…..vachun pratykshch darshan ghadavalet…
  fakt mala chaar rangachyaa mahadevachya pidicha fotu kaahi disat nahi ahe…kaa te???
  punha ekada dhanywad !!!!![:)]

  • उमा

   चार रंगांच्या चार वेगवेगळ्या पिंडी आहेत. पांढरी पिंड ही ब्राह्मण पुजा करायचे, लाल, काळी आणि पिवळ्या दगडाची इतर क्षत्रिय, वैश्य आणि इतर लोकं पुजा करायचे. चारही पिंडी वेगळ्या आहेत. शेवटी कॅमेरा बॅटरी संपल्याने ते फोटो काढता आले नाहीत.
   अजूनही बरंच आहे तिकडे पहाण्या सारखं पण अंधार पडला म्हणून आम्ही परत आलो.

 7. केवळ अप्रतिम, महेंद्रदादा ! अतिशय सुंदर आणि माहितीपुर्ण लेख. बादवे तुम्ही करता काय? कुठे कुठे फ़िरत असता. खुप छान माहीती मिळते तुमच्या लेखनातुन. पुलेशु.

  विशाल

 8. रमेश म्हात्रे says:

  खूपच छान!!!!! सविस्तर माहितीसाठी धन्यवाद.

 9. काका संपुर्ण माहितीबद्दल धन्यवाद….आपल सरकार खरोखर खुप उदासीन आहे यासारख्या अजुन पण काही जागा असतील. शर्मांजी व त्यांच्या सहकार्यांना सलाम…

  • नक्कीच.. एखादी चांगली जागा सापडली तर नक्कीच इथे लिहीन.
   शर्माजींची बरीच पुस्तकं पण आहेत या विषयावरची. डायरेक्टर होते.

 10. खरं तर मला आता तुमचा हेवा वाटू लागला आहे. एवढी चांगली साईट बघायला मिळाली. फोटो काढायला मिळाले. सगळं थ्रिलिंग आहे! तुमची स्मरणशक्तीसुद्धा चांगली आहे. अगदी तपशीलवार लिहिलं आहे सगळं.

  >> जेंव्हा तो पायरीचा दगड सरळ केला तर ती सरस्वतीची मुर्ती आहे म्हणून लक्षात आले.
  😦 कपाळावर हात मारला मी!

  >> इथे पुर्ण उत्खनन केलं तर कदाचित मोहंजोदडॊ प्रमाणे एखादी पुर्ण संस्कृती सापडेल आ्णि ही साईट जागतिक हेरीटेज साईट होण्याच्या क्षमतेची आहे.
  😐 आमचं सरकार याची दखल घेणार का?

  • नशिबानेच बघायला मिळाली. जेंव्हा तिथे गेलो तेंव्हा अजिबात माहिती नव्हते या साईटचे इम्पॉर्टन्स.
   तिथल्या लोकांना सगळे दगडच आहेत त्या मुर्त्या वगैरे.
   दहा किमी एरीयात हे शहर पसरलेले होते. आता त्यापैकी बऱ्याच जागेवर आता नविन घरं बांधली गेली आहेत. काय झालं असेल जमिनिखालच्या घरांचे कोण जाणे.

 11. Pingback: Tweets that mention उत्खननाच्या साईट्वर…२ | काय वाटेल ते…….. -- Topsy.com

 12. ngadre says:

  Mahendraji. Sorry. Ya kho khochya khelaat tumhala kho dilaay.

  Adhik mahiti karita YD, Sonal ani nantar majhi latest entry bagha.

 13. Rajan Mahajan says:

  Namaskar,

  Atishay mahitipurna lekh aahe. Hya lekhatil mahiti vachun ani photographs pahun pratyekjan he thikan pahanyas udyukta hoeil.

  Evadhya anamol thevyachi sarvana mahiti dilyabaddal ….shatash: abhar !!

  Mazhya mate ha lekh tumhi ekhadya vrutta patrakade kimva saptahika kade pathavayala hava.

  – Rajan Mahajan

  • राजन
   मी पण तिथे ऍक्सिडॆंटलीच पोहोचलो. जर काम लवकर झालं नसतं तर कदाचित तिथे गेलो पण नसतो. पण तिथे गेल्यावर मात्र खूप इम्प्रेस झालो होतो. एखादी जागा मेस्मराइझ करून टाकते नां, तशी ही जागा वाटली मला.
   तिथून पुढे एक अभयारण्य पण आहे. अर्थात त्यातले वाघ संपले , पण हरीण अस्वल, वगैरे पहायला मिळतात. ते पावसाळ्यात बंद असते. जर पहायचे असेल तर हिवाळा हा बेस्ट सिझन आहे. त्याच जंगलात एक तुरतुर महादेव म्हणुन खूप जुना महादेव आहे. तिथुन तुर तुर पाणी येतं असतं म्हणून तुरतुर महादेव नाव पडलंय त्याचे.. तो पण पहाचाहोता, राहून गेला.मे बी नेक्स्ट टाइम..

 14. नमस्कार काका,
  फ़ारच छान माहीती दिलीत.धन्यवाद.
  खरच सरकारने याबाबत काही तरी करायला हवं.

  • अक्षय
   सरकार आत्ताच जागं झालंय. वर्ड हेरीटॆज साठी याचे नांव सजेस्ट केलेले आहे. ते जर वर्ड हेरीटेज म्हणून डिक्लीअर झाले तरच शक्य आहे काही तरी होणं. पण आता सरकारने जेंव्हा इनिशिएटीव्ह घेतलाय तेंव्हा या ठिकाणाला टुरीझम च्या नकाशावर प्रॉमिनंट बनवण्याचे प्रयत्न पण होऊ शकतात.

 15. काका,
  विकांतात गडबडीत असल्याने दोन्ही पोस्ट्स आत्ता वाचल्या.. अतिशय उत्तम माहिती आहे.. आणि आम्हाला जे वाचूनच अंगावर रोमांच उभं राहिलं ते तुम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळालं ते पाहून कांचन म्हणते तसा हेवा वाटला तुमचा 🙂

  मला ते लक्ष्मण मंदिर आणि चार चेहेरे असलेलं शिवलिंग खूप म्हणजे खूपच आवडलं. बाबरी मशिदीसंबंधीच्या पोस्टची वाट बघतोय.

  • हेरंब
   खरंच बरेचदा जाणवतं की नशिब साथ देतं म्हणून. नाहीतर तिथे फिरायला म्हणून मुद्दाम कोण जाणार?

 16. ज्योति घनवट says:

  मस्तच काका त्यादिवशी तुमचा ईमेल आल्यापासून पोस्टबद्दल उस्तुकता लागली होती …..पोस्ट खुपच छान अणि सविस्तर झालीये …. रायपुरला कधी जाने होईल माहीत नाही पण…..इथे फोटो आणि सविस्तर माहिती वाचून प्रत्यक्षात जावून आल्यासारखे वाटले …..

  “उनके दिलमे भी इन कलाकृतीयोंके बारेमे दर्द और प्यार पैदा कर दिया है हमने” – शर्माजी ….
  असा बदल आपल्या सरकारी यंत्रणा आणि लोकांमध्ये कधी होइल माहीत नाही……कधी कधी वाटते की अशा सुंदर जागेबद्दल आपल्या लोकांना माहीती नसलेलीच बरी….. त्यातल्या बरयाच लोकांना ऐतिहासिक वास्तु म्हणजे त्यांची नावे अजरामर करण्याचे फळे वाटतात….. आपुलकी नसतेच त्यांच्यात ऐतिहासिक वारास्यबदल ….. म्हणून त्यावर काही खरडू नका अशा पाट्या लावायची वेळ येते…….

  शर्माजी, त्यांचे इतर सहकारी…. आणि आमच्यापर्यंत इतकी सुंदर माहिती पोहचविनारे तुम्ही ग्रेट आहात…. 🙂
  तुम्हा सर्वाना सलाम……. 🙂 🙂
  काका oye Lucky Lucky oye आठवतय ….. 😥 😥
  धन्यवाद काका…..

  • ज्योती
   जितकं आठवलं तितकं लिहिलंय. शर्माजींची भेट हे एक मोठ्ठं अचिव्हमेंट या पोस्टमधलं. 🙂

 17. bhaanasa says:

  महेंद्र, अरे तुझ्यामुळे हे सारे निदान फोटोतून तरी पाहायला मिळाले व इतकी सविस्तर माहिती वाचता आली. धन्यू रे. विटांवरचे कोरीवकाम अप्रतिमच आहे. मी याआधी कधीच ऐकलेही नव्हते याबद्दल. काय काय अजून दडले असेल खाली. खरोखरच एक आख्खे गावच सापडेल की.

  एका घरामधे एक जूनी मुर्ती पालथी बसवून कपडे धुण्याचा दगड म्हणून वापरात होती असेही समजले. लोकल लोकांना या गोष्टीचे महत्व तितकेसे वाटत नाही. खरेच की. असा शोध घेतला घराघरातून तर अनेक मुर्ती सापडतील. महानदी व बुध्दविहारचा फोटो फारच आवडला.

  पुन्हा एकदा धन्यवाद. 🙂

  • श्री
   पुर्ण गावभर ठिकठिकाणी अशा काही मुर्त्या पडलेल्या आहेत . अगदी रस्त्याच्या कडेवर पण काही ठिकाणी मुर्त्या दिसल्या पडलेल्या. दहा स्क्वेअर किमी चं गाव आहे, म्हणजे खूप काही सापडू शकतं इथे उत्खनन केलं तर.

 18. ऋषिकेश says:

  पोस्टबद्दल धन्यवाद!! मजा आली पोस्ट वाचून.
  प्रत्यक्ष जाऊन आल्या सारखेच वाटले. शर्माजी सारखी माणसे आहेत म्हणून तरी उत्खननाच काम चालू आहे नाही तर कोणीहि चोरून नेले असते ती मंदिर आणि त्यासाठी वापरलेल्या विटा किवा दगड. Hats off to Mr.शर्माजी!!

 19. madhuri mate says:

  छान माहिती. अशा साईटस लोकांपर्यंत सरकार ने पोचवल्या पाहिजेत.

  फोटो ही छान .

  • माधुरी
   झोपी गेलेल्या जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही.

   सगळं काही माहिती आहे सरकारला.आत्ता जाग आली आहे आणि त्यांनी खर्च करणे सुरु केले आहे.

 20. जबरदस्त … अशी अनेक स्थळे आहेत भारतात.. जी अजून उजेडात यायची आहेत… आलेली आहेत त्यांच्या दुर्दैवाचे फेरे अजून संपलेले नाहीत तेंव्हा …. लोकांना जाण होईल तेंव्हाच काय ते होईल.. असो… उत्तम माहितीपूर्ण पोस्ट साठी आभार !!!

  • रोहन
   अरे ही जागा सरकारला माहिती होती. पण सरकारला अजिबात काही इंटरेस्ट नाही या मधे . गेल्या साठ वरषात किती ठिकाणी अनऍथोराइझड उतखनन झाले असेल आणि किती मुर्त्या चोरीला गेल्या असतइल तेच सांगता येत नाही.

 21. Aparna says:

  अतिशय सुदर माहिती काका
  itkyat World heritage site baddal aaplya deshachi ekandarit udasinata hya wishaywar kuthe tari (moslty loksatta) wachala hota….tumhi pan kadachit wachala asel….

  • अपर्णा
   साठ वर्ष पुर्ण दुर्लक्ष केलंय सरकारनेपण. तिथे रस्त्यच्या कडेने पण अशा मुर्त्या पडून आहेत बऱ्याच ठिकाणी. तिथे गेलो आणि त्या विटेला स्पर्श केला तेंव्हा मन खूप भरून आलं. एका एकहजार पाचशे वर्षापुर्वीच्या विटेला आपण स्पर्श करतोय ही भावनाच खूप काही सांगून गेली.
   माझ्या समोरच खोदून काढलेल्या फरशीवर पाय ठेवला तेंव्हा या फरशीवर दिडहजार वर्षानंतर पाउल ठेवणारा मी पहिला…. ही भावना होती.
   खूप मस्त साईट आहे. पुन्हा शक्य झाल्यास नक्की जाईन.

 22. amit bidkar says:

  mala suhda join karayce tumhce maitre.

  • अमीत
   मी ऑर्कुटवर हल्ली ऍक्टीव्ह नाही, त्यामुळे इथेच भेटू शकतो आपण. तुम्हाला इ मेल पण पाठवलाय.

 23. Gurunath says:

  आपल्या कडे विदर्भात वाशीम ला बालाजी चे मंदिर आहे, वाशीम चा बालाजी म्हणुन फ़ेमस आहे तो…

  the idol in tht temple is said to have found 450 years back…. no one knows the real chronological base of tht statue

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s