इंदूबेननूं खाकरा ..

इंदुबेननूं खाकरा

अहमदाबादला गेलो की कितीही घाई असली तरीही इंदूबेनच्या दुकानात गेल्याशिवाय रहात नाही. अहमदाबादला गेलो की  नेहेमी हॉटेल चेम्बर्स मधे उतरतो  ( लॉ गार्डन जवळचं) . तिथुन आश्रमरोडला असलेल्या आमच्या ऑफिसकडे जातांना चार पाच दुकानं लक्ष वेधून घेतात- एक हांडवो, दुसरं खींचू आणि दोन तीन खाकऱ्याची दुकानं, त्यामधले एक म्हणजे ’इंदूबेननुं  खाकरा’. गेली विस पेक्षा जास्त वर्ष झालीत पण ह्या दुकानातून खाकरा आणल्याशिवाय परत मुंबईला कधीच  जात नाही. इंदूबेननू खाकरा, डबल डायमंडनूं सिंग हे मस्ट आहे अहमदाबादला.

परवा अहमदाबादला असतांना या दुकानात नेहेमीप्रमाणे गेलो होतो, आणि तिथे जाउन  रांगेत उभा राहिलो. हो, जसे पुण्याचे चितळे बंधु होते (काही वर्षापूर्वी )की जिथे लोकं रांगा लावून सामान विकत घ्यायचे, तशीच परिस्थिती इथली पण असते. इथे जवळपास पन्नास प्रकारचे खाकरे मिळतात. त्यातल्या त्यात मुलांना सगळ्यात जास्त आवडणारे पाणीपुरी, पावभाजी, आणि जिरा हे प्रकार मी नेहेमी घेउन जातो घरी. इथे मिळणारा बाजरीचा खाकरा मला विशेष आवडतो.

सहज भिंतीकडे नजर गेली तर तिथे एक अवॉर्ड लावलेलं दिसलं. टाइम फुड अवार्ड! दुकानदाराला विचारलं, तर म्हणाला, की नुकतंच म्हणजे १५-२०  दिवसा पूर्वीच मिळालंय हे अवार्ड. अहमदाबादी लोकं म्हणजे ’चवाण ’प्रीय, आणि त्यामुळे २०१० चं बेस्ट फरसाण अवॉर्ड जे या दुकानाला मिळालेले आहे ते नक्कीच क्रेडीटेबल आहे.

टाइम्स अवॉर्डत्या काउंटरवच्या माणसाशी गप्पा मारायच्या होत्या, पण त्याला गर्दी मधे फक्त हिशेब करणे आणि माल देणे या शिवाय काही करायला वेळच नव्हता. तरी पण थोड्या गप्पा मारल्या, तर म्हणे की खूप वर्षा पुर्वी एक घरगुती व्यवसाय म्हणून इंदूबेन यांनी सुरु केलेला हा व्यवसाय सचोटी, आणि स्वच्छता या जोरावर इतका मोठा झालाय.  आज त्यांची  मुलं  हाच व्यवसाय सांभाळत आहेत. म्हणाला, जुनीच  रेसिपी, आणि स्वच्छता ह्या गोष्टी अजुन ही पालन केल्या जातात ( अर्थात, टाइम्स ने अवॉर्ड दिलं, तेंव्हा ते ओघा ओघाने आलेच) .आणि म्हणूनच कुठलाही अहमदाबादी माणूस बाहेर जातांना इथे आल्याशिवाय जात नाही.

जुन्या दुकाना शेजारी एक नवीनच दुकान पण आता सुरु केलंय.खाकऱ्या व्यतिरिक्त इथे अजून बरंच काही फरसाण वगैरे पण मिळतं, ते मात्र कधीच घेउन पाहिलेले नाही. एक दिड किलो खाकरा मात्र आवर्जून नेतो मुंबईला परत जातांना.वाजवी दर, आणि उत्कृष्ट क्वॉलीटी यांची खात्री म्हणजे हे दुकान.अहमदाबादला गेलात तर अवश्य भेट द्या..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खाद्ययात्रा and tagged , , , . Bookmark the permalink.

18 Responses to इंदूबेननूं खाकरा ..

 1. मस्त! आता माझा मामेभाऊ जेव्हा अहमदाबादला जाईल तेव्हा मागवायला हवा. मलाही बाजरीचा खाकरा खूप आवडतो.

  • निरंजन
   चुकवू नये असे काही.. हे दुकान मस्त आहे . नक्की मागवा.
   इथे भरपूर व्हेरायटीज असतात.

 2. mau says:

  अरे वाह !!!ही पोस्ट मी केवळ आमच्या शहराची म्हणुन वाचतेय बरं !! खाकऱ्या करता नाही…कारण मी दिवस रात्र इथे खाकरेच बघते सो…आता तेच ते नको…[ःp]anyways…jokes apart….इथे इंदुबेनचे नाव खुप आहे..दुरुन दुरुन लोक येउन घेउन जातात…आणि गुज्जुज खाण्यात मुलखाचे gr8…पुढल्या वेळेस जमले तर …गाठिया रथ चे भजीये खाउन या…..आश्रम रोड आणि नेहरु सर्कल ला आहे..पावसाळ्यात तिथे झुंबड….पोस्ट मस्त !!

  • नक्की.. आता तुम्ही सांगितलं, तेंव्हा नक्कीभेट देइन तिथे.बहुतेक पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात असेन मी अहमदाबादला( जर डायरेक्ट जामनगरला गेलो नाही तर)

 3. सही रे… मला वाटतंय अख्या भारतात खाण्याच्या जितक्या हटके जागा तुला माहित असतील तितक्या कोणाला माहित नसतील… आमच्या साठी सुद्धा घेऊन ये आता पुढच्या वेळी… 🙂

 4. Aparna says:

  wow…..tarich mi mhanate khau gallit kasa nahi bhatakalt itke diwas….kahi tari yogayog aahe kaalach mala khakare wikat ghyache hote ani aaj ha lekh wachala…aata weekend la ithech milnare Deep che ghyawe lagtil…Pudhchya trip la tumchyakade order deun thewin Induben chya khakryasathi…
  BTW hya lekhawarun ugach Daman la gelo hoto tevha tithla khas Jalaramno khaman chi aathwan aali…asach ek famous khaman wala aahe wapi la i think…

 5. Tushar Kulkarni says:

  महेंद्र ,
  जुन्या आठवणी ताज्या झाल्या !!
  अहमदाबाद हून घरी मुंबई ला जाताना मी नेहमी हा खाखरा घेउन जात असे !!
  तुम्ही दास नु खमण ट्राय केलात का ? (इन्कम tax circle समोर , राजीव गांधी under bridge)
  विशाला बद्दल वेगळे लिहायला नको !! तुमचा काही special अनुभव असेल तर जरूर लिहा !!
  अहमदाबाद मध्ये अजून अनेक चांगले फूड joints आहेत, कि जे अजून फारसे famous नाहीत.
  माझ्या माहिती मधले आणखी काही :
  1. मेहता फरसाण हाउस, उस्मानपुरा , आश्रम रोड (गरम फाफडा आणि ढोकळा )
  2. साबरमती जेल, मेथी ना गोटा, सुभाष ब्रिज सर्कॅल
  3. अंबिका/जय आंबे , काठेवाडी , वस्त्रापूर तलाव चा कॉर्नर ( standard काठेवाडी फूड )
  4. रसरंजन, विजय चार रस्ता , मिठाई
  5. law garden ची वाफेली आणि शेकेली मकई

  Thanks for the wonderful post !!

  • तुषार,
   मेहेता फरसण, आणि अंबिका काठेवाडी मधे गेलेलो नाही. रसरंजन ची मिठाई एअरपोर्टलाच घेतो विकत परत जातांना. पण एकदा नक्की दुकानात जायला आवडेल. राहिलेली ठिकाणं, पुढल्यावेळेस नक्की. लॉगार्डनला हल्ली शेकेली मकई विथ अमुल बटर मिळते. खूप मस्त प्रकार आहे तो पण.
   पुढल्या वेळेस मेहेता फरसाण आणि साबरमती जेल ला भेट नक्की.
   इतक्या चविष्ट माहितीसाठी आभार.

 6. Mandar Puranik says:

  Mahendra Ji,
  Mi nehemich tumcha blog vachto, pan aalshi pana mule comment takat nahi.
  Ata prathamach comment taktoi.
  Punya madhe ajun suddha Chitalenchya dukanat rang lavavi lagte.
  Even Karve nagar madhe tyanchi franchisee ahe Devesh mhanun.
  Tithe suddha ata raangetunach java lagta…
  Kai samajlat ?
  😉

  Warm Regard
  Mandar Puranik

  • मंदार
   ब्लॉग वर स्वागत. चितळ्यांची आंबावडी आणि बाकरवडी नेहेमी आणतो पुण्याहून.
   आता तर चक्क मुंबईला पण फ्रॅंचाइझी उघडले आहेत. आमच्या घराजवळच असल्याने बाकरवडी ची सोय चांगली झाली आहे.

 7. रेणुका says:

  वाह!! वाचूनच तोंडाला पाणी सुटलं!! 😛

 8. Sadya Mi USA madhye aahe. Punyat Mi Chitale Mithaiwaale yaanchyashivaay Dusarikade jaat naahi. Pan khakare matra gujarathi kampaniche baghun Gheoto. Chhan !

  • चितळ्यांनी अजूनही आपली क्वॉलीटी मेंटेन केलेली आहे. बाकर वडीची चव जशी दहा वर्षापुर्वी होती, तशीच अजूनही असते.

 9. गौरी says:

  बाजरीचा खाकरा मला पण आवडतो … पण दीड किलो खाकरा? 😉

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s