फ्लर्टींग

सला विषय घेतलाय लिहायला आज- माझं मलाच कळत नाही. कदाचित गोव्याला येण्याचा परिणाम असावा हा. एका मित्राच्या मुलीचे लग्न आहे आज, आणि त्या साठी गोव्याला आलोय. संध्याकाळी फिरायला चौपाटीवर गेलो होतो, तेंव्हा समुद्र किनाऱ्यावर एक मुलींचा कंपू दिसला. बहुतेक कुठल्यातरी कॉलेजची सहल असावी. काही मुलं पण बरोबर होती. त्या मधला एक मुलगा उगाचच त्या मुलींच्या पुढे पुढे करीत होता. काही खास ’लक्ष्य’ न ठेवता नुसतं पुढे पुढे केल्याने काहीच फायदा होत नसतो हे त्याला समजले नव्हते बहुतेक. मी समोरच रेती वर बसलो होतो, आणि निरीक्षण केलं, तर आता पुढे पुढे म्हणजे – उगाच मोठमोठ्याने काहीतरी बोलत होता, आणि निरर्थक बोलत होता.

गोव्याच्या समुद्रावर दोन प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे सुटी काढून मजा करायला आलेले, आणि दुसरे म्हणजे एकटे काही कामा निमित्त गोव्याला आलेले, आता संध्याकाळी वेळ जात नाही म्हणून समुद्रावर फिरायला आलेले. दुसर्‍या प्रकारचे लोक हे ’बघे’ या प्रकारात मोडतात. काही करायचं नसतं, मग एखाद्या शॅक मधे बिअरचे घोट घेत इकडे तिकडे (???) बघत वेळ घालवायचा झालं!! तर मी इथे गोव्याला बघ्याच्या आणि एकांड्या शिलेदारांच्या भूमिकेत होतो, म्हणून प्रकर्षाने जाणवलं इतकंच.

जगामधे खरं तर दोनच जाती आहेत. एक नर आणि दुसरी मादी. नराने मादीच्या भोवती रुंजी घालायची हे सगळ्या पक्षां मधे पण दिसून येते. त्या साठी देवाने पण नर पक्षाला सौंदर्य दिलेलं असतं. चिमणा बघा कसा ऐटदार दिसतो, गळ्याभोवती छान काळी आयाळ असल्याप्रमाणे काळा ठिपका, थोडासाच मोठा असलेला आकार, त्याच प्रमाणे कोंबडा मस्त पैकी डोक्यावर तुर्रा घेउन कोंबड्यांच्या भोवती कुचकुचत गोल गोल फिरणारा, वर आभाळाकडे बघून पिसारा फुलवत लांडोरीला केकारव करत साद घालणारा… या सगळ्यांकडे बघितलं की देवाने ’नराला’ मादीला आकर्षित करुन घेण्यासाठीच हे सगळं काही दिलंय असं वाटतं. मादीला मात्र काहीच करावे लागत नाही. फक्त नराची निवड करायची असते. फ्लर्टींग इथे पण असतंच! आणि अगदी हेच नियम पुरुष स्त्री ला पण लागू ठरतात.

पुरुष अथवा स्त्री कितीही वयाचे असो, फ्लर्टींग बद्दल कधीच आकस नसतो. ६५-७० वर्षांच्या आजी पण जेंव्हा मॅचिंग ब्लाऊज शिवाय साडी नेसत नाहीत, किंवा बाहेर पडतांना पावडर कुंकू केल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत… तसेच आजोबा पण अजूनही ६५ ला आले तरीही ते जिन्स घालतात आणि सोबतच नायकेचे बूट घालून फिरायला जातात हे सगळं कशाचं लक्षण म्हणायचं? प्रत्येक स्त्रीला पुरुषांनी आणि पुरुषाला स्त्री ने एकदा तरी आपल्याकडे वळून पाहिलंच पाहिजे असं वाटत असतं! या मधे लैंगिक भावना असते असे नाही, पण विरुद्ध लिंगी असे जन्मतःच असलेले नैसर्गिक आकर्षण असते. अर्थात ’गे’लेले काही अपवाद वगळून.

पक्षी आणि मानव या मधे मुख्य फरक एकच – तो म्हणजे पक्षी खुलेआम मादीला आकर्षित करायला फ्लर्ट करतात, पण मानव मात्र चुपके चुपके हा प्रयत्न करीत असतात. खूप मजेशीर खेळ आहे हा, प्रत्येकालाच खेळायला आवडतो.. खेल खेल मे हा ऋषीकपूरचा सिनेमा मला खूप आवडायचा . डझनभर तरी वेळा पाहिला असेल. त्या सिनेमामधे दाखवलेले फ्लर्टींग इतकं रोमॅंटीक वाटायचं, की आपणही तसंच कुणाला तरी गाठावं असं वाटायचं. 🙂

पुरुषांना काही सुंदर पिसारा दिलेला नसतो मोरा प्रमाणे, किंवा सिंहा प्रमाणे आयाळ पण नसते. त्या मुळे स्त्रीयांना आकर्षित करायला खास प्रयत्न करावे लागतात. हेच खरे कारण आहे की फ्लर्ट करणे हे थोडे अवघड होते पुरुषांना. पण ते खरंच इतकं अवघड असतं कां? मला नाही वाटत!! इथे थोडं लिहितोय त्या बद्दल.

फ्लर्ट करता येण्यासाठी सर्वप्रथम एक मुलगी पाहिजे – ती कुठलीही चालेल, तुमच्या कंपूमधली, ओळखीमधली, मैत्रीण, बहिणीची मैत्रीण कोणीही चालेल, आणि तुम्हाला तिच्या बद्दल काही तरी वाटत असायला पाहिजे. एकदा भेट झाली की तुम्हाला कुठल्याही विषयावर बोलता यायला हवं, एखाद्या विषयावर बोलणं सुरु केलं, आणि लक्षात आलं, की तिला त्या विषयात रस नाही, की ताबडतोब विषय बदलता यायलाच हवा. आणि ज्याला हे व्यवस्थित जमतं तो जिंकला. तिने तुम्हाला पाहिलं, तुम्ही तिला पाहिलं, पहिली छाप ही केवळ बोलण्यावरूनच पडते. तुम्ही काय कपडे घातले आहेत, किंवा तुम्ही कसे दिसता या पेक्षा तुमचे वागणे, आणि तुम्ही कसे बोलता हे जास्त महत्वाचे ठरते. फ्लर्टींगची पहिली शिडी म्हणजे गप्पा गोष्टी . तुम्ही ह्यात जितके तरबेज – तितके फ्लर्टींगमध्ये यशस्वी होण्याची शक्यता जास्त.

कुठल्याही विषयावर बोलणं सुरु केलं, आणि एकदा तिच्या आवडीचा विषय आहे हे लक्षात आलं, की मग त्याच विषयावर चिकटून रहाणं, आणि विषयापासून वहावत न जाता आत्मविश्वासाने बोलत रहाणं ( प्रसंगी अती-आत्मविश्वासाने) हे पण महत्वाचे आहे. नाहीतर तुम्ही तुमच्याच नकळत तिच्या आवडीच्या विषयावरुन तुमच्या आवडीच्या विषयाकडे कसे जाता हे लक्षातही येत नाही, आणि ती कंटाळते. . असं होऊ नये याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. इथे थोडी काळजी घ्यायलाच हवी नाहीतर तिला तुमच्या सहवासाचा पण कंटाळा येऊ शकतो, आणि एकदा ’कंटाळवाणा प्राणी’ हा शिक्का बसला की सगळं संपलंच..आयुष्यभर मैत्रीण मिळणार नाही हे नक्की. इथे पुन्हा फ्लर्टींगचाच एक भाग असतो ही तरूणपणी असलेली मैत्री म्हणजे.

सुरुवातीला तिचा क्वॉंटम फिजिक्स मधला रस किंवा एचटीएमएल मधले प्राविण्य तुम्हाला माहिती असेल तरीही सुरुवात ही विनोदी गोष्टींपासून केली तर कधीही चांगले .कितीही गंभीर स्वभावाची स्त्री असली तरीही हा विषय सदाबहार असतो. तिला हसवत ठेवणे, आनंदी ठेवणे हा मुख्य उद्देश आहे. जरी ती क्वॉंटम फिजिक्स मधे पिएचडी /पोस्ट ग्रॅज्युएशन करित असेल तरीही तिचा आवडीचा विषय तो नसतो – बरेचदा ती एक गरज म्हणून अंगीकारली  असते हे लक्षात घ्या. नुसते विनोदावर ची पु्स्तकं वाचून विनोद सांगू नका. एसएमएस वर आलेले विनोद कदाचित तिला पण आलेले असतात त्या मुळे ते शक्यतो टाळा, किंवा सांगण्यापूर्वी विचारा, हा एसएमएस आलाय का तूला म्हणून?

प्रत्येकच मुलीला आपण सगळ्या कंपूमधे जास्त आकर्षक आहोत असे वाटत असते. ( ते खरे आहे की नाही हे महत्वाचे नाही) स्वतः जगत सुंदरी असल्याचा त्यांचा अघोषित दावा असतो. अर्थातच तिच्या कडे जास्तीत जास्त लक्ष दिले जावे अशी तिची सुप्त इच्छा असते. आपल्याला एखाद्या राजकन्येसारखी वागणूक मिळावी अशी तिची अपेक्षा असते, आणि जो कोणी हे करेल तो जिंकला-ही गोष्ट कदाचित कोणतीच मुलगी मान्य करणार नाही, पण प्रत्येक पुरुषाने हीच गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी. मुली या तर्कापेक्षा भावनेला जास्त महत्व देतात. त्यांच्यातल्या भावनेला तुम्ही कशी फुंकर घालू शकता हे महत्वाचे . फ्लर्टींग पुरुषाचा जन्मसिध्द अधिकार आहे, पुरुषाने फ्लर्ट करावे अशी प्रत्येकच स्त्री ची इच्छा असते.

पुर्वी पण लिहिलंय कधीतरी.. की लठ्ठपणाच्या बाबतीत आणि केसांच्या बाबतीत प्रत्येकच मुलगी अतिशय संवेदनशील असते. तेंव्हा कितीही रोड असली तरीही , तिला आपण लठ्ठंच आहोत असे वाटत असते.थोडे सांभाळून आणि नाजूकपणे हा विषय हाताळा. फ्लर्टींग करतांना, हॉटेल मधे खाताना शक्यतो या विषयावर बोलणे टाळले पाहिजे. नाही तर एखादा पिज्जा वगैरे मागवून डायटींगच्या गप्पा मारणॆ म्हणजे.. .. ती दूर गेलीच समजा तुमच्या पासून. तिला जर तुम्ही तुमच्या बोलण्याने खुलवू शकणार नसाल तर तिच्याबरोबर फ्लर्टींग विसराच!!

मादीला नराबद्दल आकर्षण आहे की नाही हे समजणं पक्षांच्या बाबतीत खूप सोपं असतं . मोर पण जेंव्हा लांडोरीसमोर पिसारा पसरवून नाच करतो तेंव्हा तो तिच्याकडे पुर्ण पणे दुर्लक्ष करतो- पण त्याला बरोबर समजतं की ती त्याच्याकडे आकर्षित होतेय ते. पण पुरुषांना हे समजायला कित्येक दिवस जाऊ द्यावे लागतात. कधी तर वर्षानुवर्ष समजत नाही !!

स्त्रियांना एक सहावं इंद्रिय असतं. कुणी त्यांच्या कडे तसे पहायला लागले की त्यांच्या लगेच लक्षात येते. एखाद्या मुलीकडे पाहाताय, आणि तिला ताबडतोब तशी जाणीव होत असते. तिचा तुम्हाला पकडण्याचा प्रयत्न सुरु होतो. मग ह्या खेळामधे एखाद्या वेळेस नजरेला नजर मिळाली तर अपराधीपणाची भावना येऊ देता कामा नये. ही सुरुवात समजायची- फ्लर्टींग बद्दल अजून तर बरंच काही लिहिलं जाउ शकतं पण … कितीही लिहिलं तरीही ते कमीच आहे. फ्लर्टींग ही एक सामाजिक गरज आहे. आता सामाजिक गरज हे लिहिलेलं काही लोकांना पटणार नाही. पण माझ्या ब्लॉग वर एक लेख लिहीलाय खूप दिवसा पुर्वी- ’स्त्री पुरुष इंट्रेस्टींग सर्व्हे’ म्हणून. एका प्रथितयश वृत्तपत्राने एक सर्वे केला होता. त्याचे जे निष्कर्ष मिळाले, ते खूपच मजेशीर होते. पुर्वी लिहिलं होतं ब्लॉग वर इथेच..

पूर्वप्रसिध्दी:- ऋतू हिरवा

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , , , , . Bookmark the permalink.

54 Responses to फ्लर्टींग

 1. तू च्यायला बादशाह माणूस आहेस… कुठला पण विषय दे … इतक्या सहजपणे ‘काय वाट्टेल ते’ लिहितोस आणि ते तंतोतंत पटते… तू ऋतू हिरवा मध्ये हे आधी लिहिलेले असलेस तरी मी वाचले नव्हते…. मस्तच…. अजून दुसरा भाग लिही ना… 🙂

  • रोहन
   अरे अजून काय लिहिणार? वाढवायचं म्हंटलं तर तेच सगळं पुन्हा रिपिटेशन होईल. थोडसंच लिहायचं होत तरीही दिड पानाच पोस्ट झालंच..

 2. “लवगुरु” महेंद्र काकांचा विजय असो…..च्यामारी एकदम धरुन फ़ट्याक….कोणताही विषय द्या…”काय वाटेल ते…..”लय भारी.

  • हे आधीवाचलं नव्हतं कां? ऋतु हिरवा वर टाकला होता हा लेख. आता फक्त आपल्याजवळ संग्रही असावा म्हणून ब्लॉग वर पोस्ट केलाय.

 3. ngadre says:

  King of marathi blog asa nehmi mee Mahendrajina mhanato te ugeechach nahi..

  • नचिकेत
   नाही तसं काही नाही, जे काही मनात येईल ते लिहित असतो.. पण खो खो चं
   ते भाषांतर काही अजून जमलेलं नाही.. प्रयत्न सुरु आहे. 🙂

 4. प्रसाद पाटील says:

  नमस्कार श्री.महेंद्रजी,

  मी आपल्या “काय वाट्टेल ते ” चा रेगुलर वाचक आहे,रोज संध्याकाळी कामावरून घरी आलो की “ई-सकाळ” आणि “काय वाट्टेल ते” न चुकता वाचतो.आपल्या ब्लॉगची मी आतुरतेने वाट पाहत असतो.कधी-कधी खूप आश्चर्य वाटते की आपण एवढ्या सहजतेने,नियमितपणे कसे लिहू शकता? आपल्या कल्पक बुद्धीला “त्रिवार अभिवादन”!आणि हे कार्य असेच जोमाने,नियमितपणे(दुधवाल्या भैय्याप्रमाणे) चालू राहावे,ह्यासाठी शुभेच्छा!

  आपल्या ब्लॉग येणाची चातका प्रमाणे वाट पाहणारा वाचक ,

  प्रसाद पाटील,मेलबर्न

  • प्रसाद
   ब्लॉग वर स्वागत आणि मनःपुर्वक आभार.
   इ सकाळ मधे मुक्तपिठचा उत्स्फुर्त चाहता मी पण आहे. तिथल्या कॉमेंट्स वाचायला जास्त मजा येते.
   महिन्याभरात १२-१३ पोस्ट तरी टाकायचा मानस आहेच. तुमच्या प्रतिक्रियामुळे उत्साह वाढतोच आणि नक्कीच जमेल लिहित रहाणे..
   पुन्हा एकदा आभार.

 5. रमेश म्हात्रे says:

  ओ काका, लईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई…………………..भारी!!!!!!!!!!!
  प्रत्येक लेखात चौकार आणि षटकार मारायच्या विचारातच लिहिता वाटत.

  • रमेश
   बरेच दिवसापुर्वी हा लेख प्रसिध्द केला होता, पण ब्लॉग वर आजच टाकलाय. धन्यवाद.

 6. स्त्रियांना एक सहावं इंद्रिय असतं. कुणी त्यांच्या कडे तसे पहायला लागले की त्यांच्या लगेच लक्षात येते. एखाद्या मुलीकडे पाहाताय, आणि तिला ताबडतोब तशी जाणीव होत असते. तिचा तुम्हाला पकडण्याचा प्रयत्न सुरु होतो. मग ह्या खेळामधे एखाद्या वेळेस नजरेला नजर मिळाली तर अपराधीपणाची भावना येऊ देता कामा नये.

  हे मात्र पटलं !!!!!!!!!!!!!!!! हेच जमत नाही राव 😦

 7. तुम्हाला काय कुठलाही विषय द्या. तो चालतो कसला पळायलाच लागतो. 😉

  स्त्री म्हणून प्रतिक्रिया देणारी मी पहिलीच का? अगंबाई! फ्लर्टींगपेक्षाही ते कसं केलं जातं हे महत्त्वाचं असतं. मुलगी दिसायला सुंदर असू दे वा सामान्य. अमूक एक प्रयत्न खास आपल्यासाठीच चालला आहे, ही भावना तिला सुखवायाला पुरेशी असते पण तिला चारचौघात लज्जास्पद वाटेल, असं काही केलं की संपलंच. त्यापेक्षा तिचा आदर किंवा प्रशंसा होईल असं काही केलं की ९०% गड सर झालाच. बाकी १०% नुसते पाहून सुद्धा काम होतं.

  >> कॉलेजमधे माझ्या मैत्रीणींना पटवण्यासाठी मित्रांना दिलेल्या टीप्स आता आठवायला लागल्यात. (कुणा मैत्रीणीने ही प्रतिक्रिया वाचू नये म्हणजे मिळवलं. काय काय आरोप लागतील – गद्दार, ढालगज…)

  • कांचन
   एक्झॅक्टली तेच म्हणायचंय. कसा दिसतो, आणि काय करतो हे फार महत्वाचं नसतं. एखादी तरी मैत्रिण असेलच वाचणारी,आणि आता वाचली तरी काय फरक पडतो ? 🙂

 8. Vidyadhar says:

  काका होमपीचवर आहेत…षटकार चौकारांची बरसात आहे….
  आमच्यासारख्यांसाठी चांगलं गाईड लिहू शकतात काका!! 😉

  • विद्याधर
   पुन्हा जुने दिवस आठवतात, असे काही लिहायला घेतले की. 🙂 म्हणुनच अधून मधून एखादीपोस्ट टाकत असतो. एच आर वर.

 9. mau says:

  महेन्द्रजी,खर म्हणजे तुम्ही ब्लोग विश्वातले सचिन तेंडुलकर अहात.. तुमचा रोज एक षटकार चौकार असतोच … ..कुठलाही विषय सहजपणे हाताळण्याची कसब तुमच्यात आहे..खरच hats off to u…….हा ही विषय काही सोप्पा नाही….पण मस्त रंगवुन आणि खुबीने लिहिलात……..gr8 man !!!!
  असेच लिहीत रहा आणि वाचकांना आनंद देत रहा !!

 10. Rajan Mahajan says:

  Avdhut Guptechya bhashet sangayache tar – sollid, chabuk, fete udale, lai bhari, tanga palti – Ghode Farar !!!!!!

  kuthe tari vachalela athavale ki sarva pranyat nar ha umada ani rubabdar asato…..Manus sodun.

  Rajan Mahajan

 11. bhaanasa says:

  ’ ऋतू हिरवा ’त वाचलं होतच. 🙂 सहीच रे. आत्मविश्वासाने ( प्रसंगी अती आत्मविश्वासाने म्हणायला हवे ) वेळेवर शाईन मारू शकणारे फ्लर्टिंग मस्त जमवू शकतात. नस पकडता आली पाहीजे. 😀

  उमाशी सहमत. 🙂

  • ऋतु हिरवा मधे लिहिलं होतं, पण आपल्याही संग्रही असावं म्हणून इथे पण पोस्ट केलंय. 🙂 उगिच जुने दिवस आठवतात नां..

 12. महेंद्रजी,

  जरा काही वर्षे आधी भेटले असतात, तर मला मनासारखी बायको मिळाली असती !!! 😉

  आपला,

  (वाचून सुखावलेला) विशुभाऊ

 13. Prasad Tharwal says:

  Kaka…!! yarr..! kay solid aahat tumhi……….!! Nakkiee Engineerach aahat na….?? Kadhi kadhi doubt yeto… Engg. la Psychology waigare subject ghetlelat ka..?? Tumhi atta evdhe jabardasta aahat tar Teenage tar kay gajawale asel tumhi…!! Heartiest Hatts off…!! Keep Going… Regards………………………………

 14. sahajach says:

  >>>>>>स्त्रियांना एक सहावं इंद्रिय असतं. कुणी त्यांच्या कडे तसे पहायला लागले की त्यांच्या लगेच लक्षात येते. एखाद्या मुलीकडे पाहाताय, आणि तिला ताबडतोब तशी जाणीव होत असते. 🙂

  महेंद्रजी षटकार मारलात पुन्हा एकदा…. भन्नाट!!!

 15. जबरी.. होमपीच बहारदार फलंदाजी.. एकदम मस्त झालाय लेख

 16. Rajeev says:

  कसला(?) विषय घेतलाय लिहायला आज- तूझं तूला कळत नाही(????) कदाचित गोव्याला घेण्याचा परिणाम असावा हा. . ………मुलींच्या पुढे पुढे करीत होता. काही खास ’लक्ष्य’ न ठेवता नुसतं मागे मागे हिंडण्याने काहीच फायदा होत असतो.
  गोव्याच्या समुद्रावर तीन प्रकारचे लोक असतात. —————-म्हणजे एकटे काही कामा(??) निमित्त तीसरे लग्नाच्या सबबीनेआलेले. तीसर्या प्रकारचे लोक हे “वासू” या प्रकारात मोडतात. काही करायचं नसतं, (बीर घ्याय्ची अस्ते)मी बघ्याच्या आणि एकांड्या बीर( शि)लेदारांच्या भूमिकेत अस्तात.
  काका पण अजूनही ५० ला आले तरीही ते गोव्याला बीच वर जिन्स घालतात आणि सोबतच नायकेचे बूट घालून फिरायला जातात हे सगळं कशाचं लक्षण म्हणायचं?
  बाकी जाउ दे…. मान वळवून वळवून वळवून …स्पोंडिलोयसिस झाला असे एकतो आहे…तब्येत कशी आहे ? ह्या रोगाचा बायकोला फ़ायदा होतो, ती काहीही म्ह्णणाली तरी आप्ल्याला मान होकारार्थी डोलवावी लागते !!

  • ह्या रोगाचा बायकोला फ़ायदा होतो, ती काहीही म्ह्णणाली तरी आप्ल्याला मान होकारार्थी डोलवावी लागते !!
   म्हणजे तू मला काय वासूगीरी करायला गेलो होतो असे म्हणतोस काय?
   स्वामी राजरत्नानंदकी जय!!

 17. ‘प्रत्येकच मुलीला आपण सगळ्या कंपूमधे जास्त आकर्षक आहोत असे वाटत असते. ( ते खरे आहे की नाही हे महत्वाचे नाही) स्वतः जगत सुंदरी असल्याचा त्यांचा अघोषित दावा असतो. अर्थातच तिच्या कडे जास्तीत जास्त लक्ष दिले जावे अशी तिची सुप्त इच्छा असते. आपल्याला एखाद्या राजकन्येसारखी वागणूक मिळावी अशी तिची अपेक्षा असते, आणि जो कोणी हे करेल तो जिंकला-ही गोष्ट कदाचित कोणतीच मुलगी मान्य करणार नाही, पण प्रत्येक पुरुषाने हिच गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी.’

  बरोबर असेलही
  पण तू इतरांसारखीच सामान्य आहेस, आणि तुझ्याशी भेटण्याबोलण्यात माझे काही दडलेले हेतू नाहीत, असं तिला भासवून एक कॉम्फर्ट लेव्हल तयार झाली, की फ्लर्ट करणं सोप्पं होतं.

  आई भाज्या करते तसंच असतं, प्रत्येक भाजीचं वेगळं तंत्र काही वाफवून, काही तव्यावर परतून, काहींची रस्साभाजी

  लेख जबरी, अशी गुपितं फोडू नका हो, वांधे होतील आमचे 🙂

  • प्रसाद
   काळजी नकॊ. त्यांना सगळं कळत असतं, पण वळत नाही…
   पुर्ण कल्पना असते की समोरचा माणुस कुठल्या उद्देशाने बोलत आहे ते.
   प्रयत्न करून पहा. हमखास यशाची खात्री !

 18. Prathamesh says:

  lekh mastach nahamisarkha…

  uttam tips ahet…thodya agodar kalayala havya hotya…harakat nahi ajunahi vel geleli nahi…

 19. विक्रांत +1

  क्या बात है काका!!! पटेश् आणि जमेश नॉट 😦

  • सिध्दार्थ
   आता तर जमलं नां? बरेच दिवसात नेट वर दिसत नाही, म्हणुन संशय आला होता. 🙂

   • अहो फ्लर्टिंग कसलं घेऊन बसलात? इंटरनेट दुर्लभ झाले होते गेला दीड महिना. आत्ता पुन्हा ‘ई’हलोकात आलोय. अजुन काही दिवसात पुन्हा ब्लॉगिंग नाही तरी निदान वाचन आणि प्रतिक्रिया देणे तरी सुरू व्हावे अशी अपेक्षा आहे.

 20. mazejag says:

  महेन्द्रजी, काही मुली सुद्धा फ्लर्टिंग करतात बर का.

  • हो.. ते तर आहेच . त्यावर पण एक पोस्ट लिहिलंय ना पुर्वी. स्त्री पुरुष ईंटरेस्टींग सर्व्हे नावाचा. 🙂

 21. Vaibhavi says:

  Faarachhhhhhhhhh Channnnnnnnn! Apratim Lekh

 22. Dhundiraj says:

  एकदम मस्त लिहिलंय……….!!

 23. roshan says:

  me atta navinach join zaloy tumacha fan club madhe………post baki 1 no…….

 24. siddhesh says:

  mahendraji, rao aamcha gupit phodlatki ho tumhi. flirt madhle purshanche vishva chan mandle tumhi. ha lekh male oriented hota.tumhi purushanach messeg kartay.
  atta ladiescha vishva ani vicharaver pan liha ki ho.mulini kasa mulana patvaycha tya tips sudha dya tyana.ata female orianted lekh milude.
  mhanje aamhala pan tyancha gupit kalel(flirting babtitla)

 25. siddhesh says:

  e-sakal blog jo tumhala pan avedeto tyachi link melel ka please?

 26. Gurunath says:

  तुम्ही एवढे उलगडुन सांगता राव….. आता आताश्या वाटायला लागलंय…. पुरे झाले सिंगल आयुष्यातले मनसोक्त किंग-फ़िशर चे घोट….

  सरळ एखादी पकडावी… अन प्रेमात पडावे, बट डर लगता है…. मे बी ड्यु टू माय ओव्हर केरींग अ‍ॅंड पझेसिव्ह नेचर

  • आधी अभ्यास वगैरे करा.. मग प्रेमात पडणं किंवा कोणाला पेमात पाडणं काही फार अवघड नाही:)

 27. Gurunath says:

  मैत्रिणीं सोबत फ़्लर्टींग मी पण एंजॉय करतो, पण लिमिट्स मधे आवडते मला

  अगदी एखादी मैत्रीण जाडी असली म्हणुन उठ्सुठ लेग पुलिंग पण नाही…

  अन एखादी फ़ार क्युट आहे म्हणुन “डोरे डालना” पण नाही…

  मजा मस्ती……, काही आवडेल असं बोलली की लगेच म्हणतो….

  चल आत्ताच रजिस्टर करु!!!!, नालायक पणा केला की सरळ म्हणायचे… माझ्या शिंगांना पोत बांधुन पळवु नको….
  मैत्रिणी पण स्पोर्ट असाव्या लागतात बुआ नाहीतर आपण कॅजुअली काही बोला अन परिणाम भलतेच व्हा!!

  शक्यतो, पोरींना “मी तुझ्या बाबाला खुप घाबरतो” टाईप बोललो की लै मौज वाटते का काय माहीत…
  मे बी त्या बाबाचा प्रोलॉंग्ड माचोईझम एंजॉय करत असाव्यात!!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s