ब्लॉग वर लोक कसे पोहोचतात?

आपण ब्लॉग वर काही तरी लिहितो, आणि लोकं ते वाचतात आणि कॉमेंट्स पण देतात.    बरेचदा तुम्ही   एखाद्या वर्षा पुर्वी लिहिलेल्या पोस्ट वर   अचानक पणे   पण  कॉमेंट येते, आणि तुम्हाला एकदम ’ ही इतक्या जुन्या लेखावर कॉमेंट कशी काय आली ?’ याचे आश्चर्य वाटते .  लोकं या इतक्या जुन्या लेखापर्यंत कसे पोहोचतात?  हा प्रश्न तर मला कित्तेक दिवस छळत होता.

ब्लॉगची माहिती लोकांच्या पर्यंत कशी काय पोहोचते?   मराठी ब्लॉग  विश्व वरून हे उत्तर बहुतेकांच्या मनात येईल .  ब्लॉग वर लिखाण नविन सुरु केल्यावर लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम हे मराठी ब्लॉग विश्व करते.  तुमच्या नविन पोस्ट्सना  या साईटवरून भेट देणारे लोकं याच साईट वरून येतात! बरेचसे लोकं तुमच्या ब्लॉग ला इमेल मधे सब्स्क्राइब करतात, तुम्ही नविन पोस्ट लिहिली की ते त्यांना मेल मधे समजते .

सर्च इंजीन्स वरून येणारे लोकं पण बरेच असतात. सर्च इंजिन्स   मध्ये एखादा कळीचा शब्द लिहून शोध घेतला जातो, आणि जर तुमच्या ब्लॉग वर पण तो शब्द वापरला गेला असेल तर तुमचा ब्लॉग  सर्च इंजिन शोधते आणि शोधकर्त्याला  तुमच्या ब्लॉग   ची यु आर एल दाखवते.

वर्डप्रेस वर जर तुमचा ब्लॉग असेल तर लोकं    सर्च इंजिन्स  मधे कोणता शब्द शोधून  लोकं तुमच्या ब्लॉग वर  आले आहेत  ते  पण समजू शकते.   माझ्या ब्लॉग वर आजपर्यंत लोकं कुठल्या टर्म्स वापरून सर्च इंजिन्स वरून आले हे  माझ्या ब्लॉग वर चेक  केले तर खूप वेग वेगळ्या टर्म्स वापरलेल्या आढळल्या.

सगळ्यात जास्त शोधला जाणारा शब्द म्हणजे स्त्री पुरुष! आणि त्याच्या खालोखाल येतो तो अश्लिल फोटो,    नंतर एड्स आणि एड्सचा हल्ला ही टर्म पण बरेचदा शोधलेली दिसून येते.ह्या  अशा सर्च सोबतच नेदा इराण, किंवा फारशी लोकांना माहिती नसलेली एक अंदमान निकोबार द्विपसमुहातील ’जुजुब’ नावाची आदिवासी जमात या बद्दल शोध घेतांना पण लोकांनी माझ्या साईटला भेट दिलेली आहे. जवळपास ७५० लोकं ’काय वाटेल ते ’ हे शोधून या ब्लॉग पर्यंत पो्होचले . उखाणे, घर वगैरे शोधून ब्लॉग वर भेट देणाऱ्यांची संख्या पण खूप आहे.

थोडक्यात जर तुम्हाला ब्लॉग वर जास्त लोकांनी भेट द्यावी असे वाटत असेल ,तर हे जास्तीतजास्त सर्च केले जाणारे शब्द    शब्द तुम्ही आपल्या ब्लॉग वर वापरा, म्हणजे  ब्लॉग ची व्हिजीब्लिटी वाढेल..

हे सगळं शोध म्हणून ठिक आहे. पण लोकं जेंव्हा अश्लिल फोटो असे मराठी मधे लिहून शोधतात तेंव्हा काय  उत्तर मिळेल अशी अपेक्षा असेल लोकांची?   अश्लिल  फोटोंना वाहिलेल्या साईट्स असतांना पण मराठी ब्लॉग बर लोकं का बरं असे शोध घेत असावेत?

एड्स बद्दल जेंव्हा मराठी मधे शोध घेतात  ते कां?   त्यांनी काही तरी केलेलं असावं कां की जे करायला नको ते?? आणि मग आपल्याला एड्स झाला तर नाही या शंकेने  नेट वर शोधाशोध..तुम्हाला- मला कधी हिजडा, किंवा एड्स वगैरे शोधावेसे वाटत नाही-  मग लोकांना का वाटावी? या वर जास्त काही लिहित नाही, फक्त लोकं काय शोधतात ते  खाली दिलंय !

बाय द वे, या पोस्टची कल्पना सुचली नॅकोबाच्या ह्या पोस्ट वरून.

Search Terms for सगळे days ending 2010-08-02 (Summarized)Summarize: 7 Days 30 Days Quarter Year All Time

सार्वकालिक

शोधा Views
पुरुष स्त्री 3,714
अश्लिल फोटो 2,210
चावट 1,661
स्त्री 1,252
ऑर्कुट 1,143
अश्लिल 672
kayvatelte 611
एड्स चा हल्ला 568
बातम्या बातम्या 497
कविता 432
उखाणे 421
घर 418
अश्लिल कथा 410
एड्स 392
लोकमत 284
मित्र 281
स्त्री आणि पुरुष 233
कथा 224
हिजडा 213
फोटो 181
मुली 168
मनसे 167
क्रिष्ण 159
साईबाबा 153
काय वाट्टेल ते 143
चावट वहिनी 143
neda iran 139
इंटरनेट इंटरनेट 136
al jaffee 136
इंटरनेट 130
गाणी 130
झी टीव्ही 127
jujube 125
arya ambekar 121
इंटरकोर्स 120
जॉब 118
मराठी चित्रपट 116
आर्मी 110
प्रेमात 110
पत्रकारिता 108
वात्रट 106
बॉडी 101
होळी 100
किरण बेदी 97
नेव्ही 93
दुनियादारी 91
जनगणना 89
साई बाबा 82
फोटो काढले 81
सारेगमप 79

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

51 Responses to ब्लॉग वर लोक कसे पोहोचतात?

 1. Pingback: Tweets that mention ब्लॉग वर लोक कसे पोहोचतात? | काय वाटेल ते…….. -- Topsy.com

 2. अश्लील शब्द वापरायला पाहिजे होता मी कुठेतरी टॅग मध्ये…. 🙂

  • देवेंद्र

   पण मी हा शब्द कुठेच वापरलेला नाही माझ्या टॅग मधे . तरी पण कुठेतरी अश्लिल असा शब्द पोस्ट मधे आल्याने सर्च इंजिनला ब्लॉग सापडत असेल.

 3. ही पोस्ट भारी आहे एकदम हं! मी माझ्या ब्लॉगवर अश्लील हा शब्दतरी वापरला आहे की नाही कुणास ठाऊक? 😉 माझ्या ब्लॉगवर सर्च इंजिनद्वारे आलेले वाचक सर्वाधिक वेळा ’वहिनी’, प्रेमकधा आणि ’प्रणयकथा’ हे शब्द शोधून आले आहेत.

  • मी पण जेंव्हा हे स्टॅ्टस्टीक पाहिलं तेंव्हा गोंधळलोच होतो.
   काही लोकं गुलाबी चड्डी, अंडरवेअर्स वगैरे शोधुन पण आले आहेत. पण त्यांची संख्या १०० पेक्षा कमी असल्याने इथे पोस्ट केले नाही.

   • मीही गोंधळले होते पण तेच शब्द वापरून मी गुगल सर्च केला तेव्हा त्या लोकांना ज्या ज्या साईट्स, गुगलग्रुप्स,याहूग्रुप्स अपेक्षित होते, ते सर्व दिसले.

 4. mau says:

  kharch khupach bhaari aahe post !!kaay kaay lok karatat…[:O]hi ek ajun mahiti..

  • लोकं नेट वर असे शब्द शोधतात तेंव्हा त्यांना काय रिझल्ट अपेक्षित असतील? आणि हे शब्द मराठी मध्ये टाइप करून शोधलेले आहेत हे विशेष!

 5. माझ्या ब्लॉगवर जास्तीत जास्त वाचकं…विनोद, प्रेमकविता या शब्दांनी आलेले असतात. पण दुसरं एक मला नेहमी असं वाटतं की आपण जे विषय कींवा टॅग्ज लेखाला देतो..ते जर मराठी पेक्षा इंग्रजीत असतील तर जास्त वाचकवर्ग आपल्याला मिळतो. कारण येणारा वाचक संगणकावर मराठी वाचू शकत असला तरी टंकू शकत असेल असं नाही.

  • टॅग्ज इंग्रजी मधे पण द्यायला हवेत, मी दोन्ही भाषांमध्ये देतो ! पण ब्लॉग वर येणारा ट्रॅफिक फक्त मराठी टॅग्ज वरून मराठी मध्ये टाइप करुनच येतो असे स्टॅटिस्टिक वरुन लक्षात येते.

   • ताई, दादा, इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेतील टॅग्स वापरले तर दोन्ही भाषांमधे आपला सर्च दिसतो. म्हणून मी नेहमीच इंग्रजी व मराठी दोन्ही प्रकारचं टॅगींग करते.

 6. भारीच की…टॅग मध्ये अश्लील शब्द वापरा अन ब्लॉग ची व्हिजीब्लिटी वाढवा.. 😉

  आयडीयाची कल्पना भारी आहे.

  • लोकं जे शोधतात ते लिहिले की व्हिजिब्लिटी वाढायलाच पाहिजे.

   • हो. पण तसा सर्च करून आपल्या ब्लॉगवर आलेले लोक आपलं लेखनही वाचून जातात, हे मी पाहिलं आहे. म्हणजे ही आयडीया वापरायला हरकत नाही 😉

 7. माय गुडनेस..महेंद्रदादा ! हे विषय सुचतात कसे हो तुम्हाला! चायला माझ्या डोक्यात देखील आलं नव्हतं की यावरदेखील कधी कोणी लिहू शकेल, ग्रेट आहात. खरोखर सृजनशील आहात. 🙂

  • विशाल,
   नचिकेतच्या ब्लॉग वरची पोस्ट वाचली आणि हे लिहावंसं वाटलं. काय वाटेल ते लिहायचं ठरवलं की काहीही विषय चालतो. 🙂

 8. That really was strange,never ever thought about this thing.

  • अनिकेत
   ब्लॉग वर स्वागत!
   गमतीचा भाग म्हणजे हे सगळे मी टॅग मध्ये टाकलेले नाहीत तर लिहिण्याच्या ओघात कुठेतरी आले असावेत. मी स्वतः ह्या टर्म्स सर्च करून पाहिल्या तेंव्हा मात्र मला माझा ब्लॉग सापडला नाही कुठेच.. 🙂

 9. नमस्कार महेंद्रजी! काय वाट्टेल ते लिहून तुम्ही मराठी ब्लॉग्सच्या वाचक व लेखक यां दोघांना एक दिशा दाखविली आहे. त्यापेक्षा मार्ग दाखवला असे म्हणणे जास्त संयुक्तिक होईल. रोजचा व्याप सांभाळून अगदी दररोज काहीतरी लिहायचे व तेदेखील वाचकांना पसंद पडेल असे..हे शिवधनुष्य लीलया पेलले आहे तुम्ही.
  कित्येक मराठीजन तुमचा आदर्श ठेवून हे साहस करायला पुढे येताहेत. आणी मराठी भाषेच्या दृष्टीने हे एक लाख मोलाचे कार्य आहे. हे अतिशयोक्ती वाटेल कदाचित तुम्हाला/इतरांना पण अगदी खरे आहे महेंद्रजी,सलील,अनिकेतसारखे इतर अनेक भुंगे,माशा,किडे जे काही करीत आहेत ते म्हणजे क्रिकेटसाठी सचिन, धोनी वगैरे जे करताहेत तसे आहे. तुमच्यामुळे प्रेरणा मिळून ब्लॉगर्स झालेले झम्प्यासारखे बरेच असतील.
  झम्प्यानेदेखील तुमचाच कित्ता गिरवायचे ठरवून ब्लॉगविश्वात उडी मारली आहे बघुया आता ती तोडावर पाडते की पार नेते. पण महेंद्रजी तुमच्याकडून दोन गोष्टीची व एका शब्दाची गरज आहे.

  पहिली गोष्ट आहे मार्गदर्शन व दुसरी प्रोत्साहन.

  आणी आता राहिला एक शब्द….तर तो आहे “करणार” .. बास एवढेच पाठीवर थाप टाकून म्हणा म्हणजे आम्ही लागतो कामाला.

  • अभिनंदन!!! आणि शुभेच्छा!! लिहित रहा..
   तुमच्या इतक्या उत्स्फुर्त प्रतिक्रियेकरता आभार. इतकी तारीफ कोणी केली की संकोचल्यासारखं होतं.
   काहीही गरज वाटली तर अवश्य सांगा. लोकांना काय आवडेल ह्याचा विचार न करता तुम्हाला काय लिहावंसं वाटेल ते लिहा.
   पुढिल लेखनासाठी शुभेच्छा

   • धन्यवाद महेंद्रजी.
    लोकांच्या आवडीपेक्षाही लोकांच्या गरजेवर लिहण्याचा झम्प्याचा विचार आहे.
    कारण आवडी निवडी तर सतत बदलतात पण गरजा शक्यतो त्याच रहातात.
    बघा ना तुमच्या यां टॅग्ज लिस्ट मध्ये गरजेचेच शब्द जास्त आहेत. अश्लील शब्द जरी लोक जास्त शोधात असले तरी सेक्स ही गरजच त्यामागे आहे. तेच स्त्रीपुरुष यां टॅग्ज बद्दल. एकमेकांची माहिती करून घेण्याची गरज कधी नव्हे ती आता जास्त आहे. म्हणूनच लोक हे शब्द जास्त सर्च करतात. त्यातून अर्थ जरी वेगवेगळे निघत असले तरी शेवटी सगळ्यांच्या मागे गरजच उभी आहे.
    असो झम्प्या धन्यवाद देण्यासाठी येथे आला नी येथेच रेंगाळला. चला निघतो. काही पटले नसेल तर कळवा. जरूर चर्चा करू.

    • हे बाकी बरोबर आहे. गरजेच्या प्रमाणे लिहिले की वाचले जातेच. लोकांना त्या स्त्री पुरुष रिलेशनशिप बद्दल वाचायला आवडतं. सगळे टॅग्ज इंटरेस्टींग आहेत आणि प्रत्येक टॅग वर एक पोस्ट लिहिली जाऊ शकते.

 10. Nachiket says:

  रोचक लेख आहे..
  महेंद्रजी.. मी कसलेच टॅग वगैरे काही टाकत नाही. तरीही माझी लिस्ट पहा: धन्यवाद:

  बलात्कारी दवाई
  बलात्कारी इंजेक्शन (भयभीत झालो. हे काय असतं?)
  हडळ
  उघड्या मांड्या
  मराठी चावट कथा (हे राम..मी कधी लिहिल्या माझ्या ब्लॉगवर ?)
  gammatishir kavita (याही कधी लिहिल्याचं आठवत नाही..)
  उघड्या sundar मुली
  गर्दुल्ला
  घट्ट धरून
  वाईट पुरुष असलात
  muli बाथरूम
  डायबेटीस
  निशाणा तुला दिसला शब्द
  ढुंगण
  पोरीचा bra
  उच्च रक्तदाब
  pushp aushadhi

  • यावरून एक स्पष्ट होतं,

   मला वाटतं की गुगल वेडं झालंय. एक गोष्ट शोधायला गेलं की भलतंच काही तरी सापडतं.

  • दोन नंबरचा सर्च अचंबित करणारा आहे. असं पण असतं की काय?? नि लोकं असलंही काही शोधत असतात की काय??!

   • मला पण तेच वाटलं , इतक्या साईट्स आहे त्या विषयावर वाहिलेल्या, तेंव्हा लोकांना ब्लॉग वर वेगळं काय वाचायला मिळेल किंवा पहायला मिळेल असे वाटते?

    • साईट व ब्लॉग वरचा मुलभूत फरक म्हणजे ब्लॉगला असणारा पर्सनल टच. साइट पेक्षा ब्लॉग जास्त जवळचा व विश्वासू पर्याय वाटतो. ब्लॉग हे माध्यम वेबसाईट यां मध्यमापेक्षा जास्त जिवंत आहे. म्हणून कदाचीत लोक ब्लॉग्स वर हे विषय वाचायला येत असतील

     • त्यांना बहुतेक पर्सनल फोटो कोणीतरी पोस्ट करेल असे वाटत असेल. ब्लॉग हा पर्सनलाइझ्ड असल्याने थोडा जवळचा वाटतो हे खरं.

    • Nachiket says:

     महेन्द्रजी. ते लोक अर्थातच आपला ब्लॉग शोधायला आलेले नसतात. ते काही इतर मिळतंय का ते शोधात असतात. सर्च रिझल्ट मध्ये आपला ब्लॉग समोर आला की सहज क्लिक करत असतील.

     बलात्कारी हा शब्द बहुधा माझ्या हिंदी सिनेमा विषयीच्या लेखात आला असावा किंवा अमानुष लोकांच्या वृत्तीवर कॉमेंट म्हणून कोण्या वाचकाने लिहिला असेल. आणि इंजेक्शन हा इतरच कुठल्यातरी लेखात रोगांविषयी अवास्तव भीतीच्या संदर्भात आलाय..

     गुगल असे आउट ऑफ कॉन्ट॓क्सट शब्द सर्च करत असल्यानं आपला ब्लॉग सर्च मध्ये येत असावा.

 11. हे म्हणजे एकदम मेच फिक्सिंग्सारखे वाटायला लागले आता.

  • हा हा हा.. आत्ता पर्यंत जे नकळत झालं, ते जाणून बुजून करायचं . अर्थात मी जे वर लिहिलंय की हे असे शब्द टॅग मध्ये वापरा ते उपहासाने लिहिले आहे. 🙂

 12. Nachiket says:

  हो ना. अश्या tags मुळे येणारे वाचक न वाढलेलेच बरे.

  बलात्कारी दवाई असे शब्द एकत्र शोधणा-या व्यक्तीच्या डोक्यात नक्की काय चालले असावे ? डेंजर ना एकदम ?

 13. Pingback: ब्लॉग वर लोक कसे पोहोचतात? | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA.

 14. bhaanasa says:

  गुगल आजकाल खरेच गंडलय की काय कोण जाणे. माझ्याही ब्लॉगवर अनेकदा स्त्री पुरूष, सेक्स, बलात्कार, अश्या सर्चमधून लोक आलेले दिसतात. अजूनपर्यंत मी सेक्स किंवा बलात्कारावर काहिही लिहिलेले नाही. दुसरे मी नोटीस केलेयं, टिपण्यांमध्ये जरी एखादा शब्द असेल किंवा पुरक शब्द असेल ना तरीही आपला ब्लॉग सर्च मध्ये ओपन होतो. बाकी हे स्टॅटस मधून मधून चेक करते मी… मस्त करमणूक होतेच शिवाय कळतेही सध्या कुठले शब्द फारच फॉर्मात आहेत ते. 😀

 15. pharacha chhan vishay heralat bara kaa? avadala he post. mala aataa baghava lagel majhaya Dinikevar lok kase dhadakatat te?
  mi kaahi yaavishayatil tadnya naahi, tyaamule malaa yatala pharasa samajat naahi. tari prayatna karun baghen.
  maajhi ek paddhat aahe ti mhanaje lekh vachala ki tyavar pratikriyaa dene. tyaanuasar mi sagale lihit aahe.
  NY-USa

  • पुरुषो्त्तमजी
   प्रतीक्रियेकरता मनःपुर्वक आभार. मी स्वतःपण लेख वाचला की प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करतोच.

 16. हे भयानक आहे… मी सुद्धा परवा माझ्या ब्लोग्सवरच्या नोंदी बघत होतो… खरच कुठून कुठून शोधत येतात ही लोकं… 🙂

 17. prabhakar says:

  मला मराठी ब्लॉगीन्ग चा शोध लागला ते गूगल सर्च ईन्जीन मधे “मराठी लिटरेचर टू रीड” टाईप केल्यावर. मग मी ही एक ब्लॉग सु्रु केला स्वतः चे नाव देवून. मला काही लिहिता येत नाही. काहीही लिहितो पुसून टाकतो. पन आता मनोरंजनाचे हेच एक साधन आहे म्हनुन मराठी ब्लॉग्स सर्च करत रहातो. वाचावं वाटलं तर वाचतो.कुठे कमेंट्स देतो. एका ठिकाणी ऑन लाईन पुस्तकं वाचायला मिळतील असं पाहिलं आहे. ते जमलं तर बरं होईल.

  • ऑन लाइन मराठी पुस्तकं नेट भेट डॉट कॉम वर आहेत. तिथे वाचू शकता.

   • prabhakar says:

    महेंद्र, नेट भेटचा खजिना मिळवून दिल्या बदाल अनेक आभार. आता करमणूकीला काही कमी रहाणार नाही.

 18. Dhundiraj says:

  मी हि असाच एक भटक्या आहे,…..या blog वरून त्या ब्लॉगवर ….. काही चांगले वाटले कि लगेच comment टाकतो…….. एका मित्राने (suhas zele ) तुमच्या blog ची link दिली.

 19. govind Bembde says:

  mi nehamich aasha prakare sarch karnyacha prayatna karto. mala je hawe te miltech pan baryach weles khup kahi wa nako tehi milte. internet means a shugar. use limited & right. agar ye jyada ho gai to jehar hai.

  bembde govind 08806976888

 20. काका, मी (मनातले काहीतरी) असं काहीसं शोधत होतो नेटवर, तेव्हा चुकुन तुमच्या ब्लॉग वर आलो…….
  वाचायला सुरुवात केली आणि तुमचा पंखाच ( Fan) झालो. ….. प्रसंशक असं काहीसं म्हणायचयं मला पण मराठी काही फार चांगली नाही माझी.
  मी आता तुमचे सगळे लेख वाचतोय….. उलट्या क्रमाने….. म्हणजे 2013 पासुन सुरु करुन आता जुलै 2010 पर्यंत पोचलो आहे.

  फारच आवडले हो.

 21. nitinbhusari says:

  काका, मी (मनातले काहीतरी) असं काहीसं शोधत होतो नेटवर, तेव्हा चुकुन तुमच्या ब्लॉग वर आलो…….
  वाचायला सुरुवात केली आणि तुमचा पंखाच ( Fan) झालो. ….. प्रसंशक असं काहीसं म्हणायचयं मला पण मराठी काही फार चांगली नाही माझी.
  मी आता तुमचे सगळे लेख वाचतोय….. उलट्या क्रमाने….. म्हणजे 2013 पासुन सुरु करुन आता जुलै 2010 पर्यंत पोचलो आहे.

  फारच आवडले हो.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s