हवामानाचा अंदाज

हवामानाचा अंदाज

सकाळी घरून निघतांना छत्रीची आठवण झाली. मुंबईला पावसाळा म्हंटलं की छत्री ही प्रत्येकाच्याच बॅग मधे असते. मुंबईच्या पावसाचा काहीच खात्री देता येत नाही. मालाडहून निघावं की छान निरभ्र आकाश आहे  छत्रीची गरज नाही म्हणून ,तर दादरला पोहोचे पर्यंत अगदी धुवाधार पाऊस सुरुही झालेला असतो.

घरून निघतांना बातम्या तर हमखास पाहून निघतो. आपल्याकडे दूरदर्शनवरच्या बातम्या दाखवतांना शेवटी एक मोठा विनोदी  कार्यक्रम दाखवून बातम्यांची सांगता केली  जाते . बरोबर ओळखलंत तुम्ही तो कार्यक्रम म्हणजे  “आजच्या हवामानाचा अंदाज”. त्या कार्यक्रमामध्ये देशात कुठल्या भागात पाऊस पडेल, कुठे  नाही , किती तापमान राहिल वगैरे  पर्यावरण विषयक माहिती सांगितली जाते. मी दररोज अगदी मनोभावे सिद्धीविनायकाला हात जोडावे, त्या श्रद्धेने तो कार्यक्रम ऐकतो आणि मग घराबाहेर पाउल टाकतो.

बरं  या कार्यक्रमाचा पण एक प्रेक्षक वर्ग आहेच. मुंबईचे लोकं पाऊस पडणार का? किंवा हाय टाईड कधी आहे हे पाहातात तर विदर्भातले लोकं उन्हाळ्यात सगळ्यात जास्त तापमान कुठे आणि किती नोंदवलं गेलं हे  फॉलो करत असतात- अर्थात त्यापासून काही मिळत नाही, पण इमाने इतबारे दररोज किती तापमान रेकॉर्ड केलं गेलं ते पहात रहाणे यांना आवडते.

त्या कार्यक्रमात सांगितले की आज खूप पाऊस पडणार आहे, की मी मस्तपैकी नवीन शर्ट घालून घराबाहेर पडतो. स्टेशनला पोहोचल्याबरोबर बुटांना पॉलिश करून घेतो. कारण याची खात्री असते की जे काही बातम्यांमध्ये सांगितले आहे नेमके त्याच्या विरुद्ध वातावरण राहील आज. म्हणजे पाऊस आहे म्हणून सांगितले तर नक्कीच उघाड राहील किंवा व्हाइस व व्हर्सा…

भारत सरकारने पाळलेल्या अनेक पांढऱ्या हत्तींपैकी हा एक आहे असे मला नेहेमीच वाटत आलेले आहे. या लोकांचा  हवामानाचा अंदाज हा कधीच बरोबर नसतो. कदाचित याचं खापर ते  इन्स्ट्रुमेंट्स वर फोडतील, पण सत्यस्थिती अशी आहे की  कारण काहीही असले तरीही यांचे अंदाज बव्ह्यंशी चूकीचे  असतात.

या विभागाअंतर्गत असलेला एक विभाग  जो सिसमीक व्हायब्रेशनचा अभ्यास करतो तो सुनामी आली तेंव्हा  त्याची येण्यापुर्वी भवीष्यवाणी करू शकला नाही. सिसॅमिक व्हायब्रेशनचा डेटा तर नेहेमीच जमा केला जातो. सारखा रेकॉर्ड होत असतो, पण जर तो डेटा अ‍ॅनलाइझ करता येत नसेल तर त्याचा काय फायदा?  तो डेटा वापरून ह्या भुकंपाच्या बद्दल   जर थोडा आधी सावधगिरीचा इशारा दिला असता तर बरेच लोकं वाचले असते.

२६ जानेवारीचा गुजराथमधला भुकंप त्याबद्दल अगदी साधीशी कल्पना पण त्या लोकांना देता आली नाही. मग अशा विभागाची गरजच काय? जर नुसती माहिती गोळा करणे म्हणजे डेटा इन- डेटा आऊट असेच जर स्वरूप या विभागाचे असेल तर  त्याचा उपयोग मला तरी फारसा दिसत नाही.करोडो रुपयांचे सॅटलाइट्स, लेटेस्ट कॉंप्युटर्स आणि इतर वरीच  इंट्रिकेट सामग्री असुनही काही  बरोबर रिपोर्ट्स मिळत नाही या विभागाकडून.

२६ जून ला जो मुंबईला पाऊस झाला त्याबद्दल पण हवामान खाते  अजिबात  पुर्व सुचना देउ शकले नव्हते.  तेंव्हा जो गोंधळ झाला, त्या नंतर मात्र थोडे जरी ढग असले तरीही मोसम विभाग ’सांभाळून रहा’ हाय टाईड आहे, काहीही होऊ शकते हे सांगू लागला. पण इतक्या वेळा दिलेली वॉर्नींग खोटीच ठरली.  त्यांच्यावर विश्वास ठेउन घरी बसावं तर दिवसभर उघाड राहायची. आता तर अशी परिस्थिती आहे की त्यांनी खरंच काही सांगितलं तरीही त्यांची ’कोल्हा आला रे आला ’ प्रमाणे अवस्था होईल- .

मागल्या वर्षी जेंव्हा विदर्भात पावसाने दडी मारली होती , तेंव्हा  या लोकांनी पाऊस पडेल असे भाकिते वर्तवले होते पण  तेंव्हा नेमका कोरडा दुष्काळ पडला  विदर्भात.

या मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचे बरेचसे ऑफिसेस आहेत भारतामध्ये. सगळ्यात जास्त महत्वाचे सहा ऑफिसेस म्हणजे, चार मेट्रॊ आणि गौहाती, नागपुर , पुणे या ठिकाणी. या व्यतिरिक्त भोपाळ आणि इतर बऱ्याच ठिकाणी पण यांची ऑफिसेस आहेत.या सगळ्या ऑफिसेस मधे उच्च विद्याविभूषित लोकं आहेत. बरेच तर चक्क पिएचडी झालेले सो कॉल्ड सायंटीस्ट पण काम करतात. इतकं सगळं असतांना पण या लोकांचे अंदाज नेहेमीच का चुकिचे ठरतात ? या डिपार्टमेंट्वर सरकार जो इतका खर्च करते त्याचा काही फायदा होतो का?

अंतराळात बरेचसे सॅटलाइट्स सोडलेले आहेत, हे सायंटीस्ट लोकं   केवळ सॅटलाईट इमेजेस बघुन आणि सॅटेलाईट्सच्या कडून मिळणारी माहिती बघुन   हवामानाचा अंदाज वर्तवतात. आता जर केवळ सॅटलाईट इमेजेस वरच सगळा अंदाज असेल तर त्यासाठी इतकी ऑफिसेस ठेवण्याची गरज काय?  एकच ऑफिस ठेवले, आणि तिथे दहा पंधरा लोकं बसवले  संपुर्ण देशभरातल्या सॅटलाइट मॅप्स चेक करुन हवामानाचा अंदाज करणे सुरु केले, तरीही सरकारचा बराच पैसा वाचेल. दुसरा एक गृप सिसमीक व्हायब्रेशन्सचा डेटा अ‍ॅनलाइझ करून भुकंपाची माहिती जमा करेल बस्स झालं..

आणि नाही तर अजून एक उपाय  आहे, जर हवामानाचा फक्त अंदाजच करायचा तर  इतका खर्च, इतकी साधन सामग्री वगैरे कशाला हवी?  एक पोपट, नंदी बैल, पाळावा त्या सरकारी विभागाने भविष्य वर्तनासाठी – नाहीतर ’पॉल द ऑक्टॊपस’ आहेच!

त्या खात्याची वेब साईट बघितली का? खूप छान आहे..   अशा सहा साईट्स आहेत प्रत्येक ठिकाणच्या ऑफिसच्या..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , , , , , . Bookmark the permalink.

43 Responses to हवामानाचा अंदाज

 1. Pingback: Tweets that mention हवामानाचा अंदाज | काय वाटेल ते…….. -- Topsy.com

 2. Kedar says:

  Mahendraji, masta mudda ghetla aahe aaj tumhi. Tumchya sarkhech vichar pratyek Bhartiya mansache aahet asa mala vatata. Aho gelya varshi Punyatli goshta (ata mi Punyacha mhanun mi Punya baddal bolato, pan he sarvatra khara aahe he mi ya IMD chi shappath gheun sangto). Tar gelya varshi ya lokanni chhati thokun sangitla ki Punyat sarasari itka paus padel. Olakha bara. Barobar, paus kahi jhala nahi August paryant. Mag he lok mhane, ki te kaay jhala ki Arabian Sea madhe ki kuthe kuthlasa vadal jhala tyani andaj chukala. Yaat amchi kahi chuk nahi. Ata ya lokancha kaam ashi vadala vagaire var hi watch thevaycha asto he te visarle pan aso. Ata he lok asa sangun mokle jhale khare, pan mag 15 August nantar jordar (nako titka) paus suru jhala ani to thambta thambena. Pur yaychi vel aali pan Punyacha nashib changla, pikanchya nasadi varach nibhavala. He sagla jhalyavar majhya olakhi madhala ek Punyachya havaman khatyatla punter mhane amhi bolalo hoto sarasari itka paus hoil. Jhala ki. Ata ya manasa samor mi lotangan ghalna baki thevla hota bas. Adhi chukichi mafi magtat ani mag kuthun tari kuthle tari ardhavat statistics julale mhanun amhi barobar hoto he sangtat. Dhanya aahe.

  US shi barobari karna chikiche aahe ase lok mhantat pan, ata jya US weather chi efficiency mi roj anubhavto, tya baddal bolna prapta aahe. Aho ithe weather.com ya TV channel/website ne pratyek maila maila var sensors lavle aahet, achuk andaj denya sathi. Te aaj cha kaay tar pudhlya 10 divasancha pan (dhobal) andaj deu shaktat. Tulana kelya var jasta chid chid hote ki apan kiti mage. Ani shivay tulana keli tar tumchya saglya comments chi jaga mi ektach khaun takaycho. Mhanun jau deu ya veli.

  Pan tumcha mudda nehmi sarkhach kalpak hota Mahendraji. Kasa suchata ho tumhala roj navin. Dhanyavad ekdam kali cha mudda post kelya baddal ani maj pamarala ithe (itka jasta) lihu dyaychi paravanagi dilya baddal.

  -Kedar

  • केदार
   ब्लॉग वर स्वागत!
   सरासरी इतका पाऊस झाला म्हणून पुन्हा कॉलर ताठ!
   हे लोकं कुणालाच अ‍ॅनसरेबल नाहीत म्हणून सगळं चालतं असं. यांच्या जिवावर आणि रिपोर्टवर विसंबून शेतकी पेरण्या करणे सुरु करतील तर त्यांची पार वाट लागणार हे नक्कीच. इतके सॅटलाइट्स आहेत , मशिन्स आहेत, तरी पण हे लोकं त्याचा योग्य वापर करू शकत नाहीत हे माझं मत आहे.
   प्रतिक्रिये करता आभार.

 3. bhaanasa says:

  छातीठोकून हमखास चुकीचे अंदाज वर्तवण्यात माहीर ते म्हणजे आपले ’ हवामानाचे अंदाज ’. तू म्हणतोस तसे इतके हुशार लोक अहोरात्र यावर काम करत असतांनाही नेहमीच का असे होते? सुनामी, भुकंप, तो भयानक पावसाचा दिवस…. या सार्‍यांचे अचूक अंदाज वर्तवले गेले असते तर किती तरी अनर्थ टळला असता नं… पण…. दुर्दैव.

  बाकी, इथे वर्तवलेले अंदाज चुकताना मी फारच कमी वेळा पाहिलेत. मागे एकदा सात हिमवादळे दोन दिवसात आमच्यावर आदळली होती. तो अंदाज आधी वर्तवलेला होता म्हणून आम्ही वाचलो. नाहितर किती प्रचंड हाल झाले असते.

  पोस्ट मस्तच. 🙂

  • अगदी शंभर टक्के अंदाज योग्य असावे असे म्हणणे नाही. पण कमीत कमी ९० टक्के जरी बरोबर आले तरीही खूप आहे.

 4. Raj Jain says:

  >>छाती ठोकून हमखास चुकीचे अंदाज वर्तवण्यात माहीर ते म्हणजे आपले ’ हवामानाचे अंदाज ’.

  + 1

  100% sahamat aahe.

  • राज,
   हे असे नसते खर्च आहेत सरकारचे, म्हणूनच भारतात सगळ्यात जास्त टॅक्सेस आहेत.
   प्रतिक्रियेसाठी आभार.

 5. अगदी, अगदी मनातले बोललात दादा ! मागे त्सुनामी आली होती तेव्हाही मला वाटतं हैदराबादच्या एन.जी.आर.आय. या सरकारी संस्थेने या विषयावर जवळपास सहा महिने रिसर्च करुन एक अहवाल सादर केलेला होता. पण त्याला पद्धतशीरपणे लाल फ़ितीत गुंडाळले गेले.

  छान लेख, आवडला !

  • विशाल
   हा विषय मनात गेले खूप दिवस रेंगाळत होता. आज लिहून टाकला.
   तो अहवाल जर प्रसिध्द झाला असता तर बरंच काही बाहेर पडलं असतं. सिसमीक व्हायब्रेशन्स चा डेटा २४ तास ७ दिवस रेकॉर्ड होत असतो. जमिनीखालचं थोडं जरी स्थित्यंतर झालं तरीही ते इथे रेकॉर्ड केलं जातं. त्या रेकॉर्डेड डेटा अनॅलिसीस करणारे एक्स्पर्ट्स नसल्याने अशी पंचाईतझाली असेल का?

   नॅशनल जिओग्राफिक रिसर्च इन्स्टीट्य़ुट आता चार भागात विभाजित झालेली आहे असे ऐकतो. आयबीएम, एमईसीएल , सिएम्पीडीआय वगैरे. खरं खोटं देव जाणे.

 6. Nachiket says:

  मी एअरलाईन मध्ये असताना आणि उड्डाण प्रशिक्षणात हवामानशास्त्र विषयाशी खोलवर संबंध आला.

  रोज सगळे काही हवामानशास्त्र विभागाशी संबंधित असायचे. परीक्षाही मी पास केली.

  पण एवढे होऊनही मला तुमचा मुद्दा खोडून काढता येत नाही. तुम्ही म्हणता ते अगदी खरे आहे.

  खरं तर ही त्यांची चूक नाही. हवामानशास्त्र फार गुंतागुंतीचे आहे. उपग्रह चित्रात दिसले म्हणजे ते घडेलच असे नाही. त्यासाठी लोकल लेव्हलच्या खूप गोष्टी (Saturation, seed for water formation) आणि इतर बरंच काही.

  त्यामुळे तुमच्या एका मुद्द्याशी मी एकदम सहमत की इतक्या ठिकाणी ऑफिसेस ठेवून आणि खूप सरकारी बाबूंना लठ्ठ पगार देऊन हे चालू ठेवण्याची गरज नाही. इतक्या स्टाफची मुळात गरजच नाही.

  पांढरा हत्ती हा शब्द एकदम योग्य.

  पांढरा हत्ती आणि पाठीवर अंबारी सुद्धा न ठेवण्याच्या लायकीचा.

  • नचिकेत
   डॆटा तर खूप जमा होतो. फक्त तो फायलीत जातो सरळ!
   हे डीपार्टमेंट इंग्रजांनी सुरु केलं होतं. बहुतेक १८६०च्या सुमारास, शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून. पण त्याचं आजचं स्वरूप पहाता काही फायदा होत नाही असे दिसते.

 7. sushma says:

  je havaman khate sagt thacya exact ult havaman aapn samzaych………….ek wel aaple aandaz barobar nightil……….. aaplya BHARAT sarkarne nivad kelelya scientist che aandaz barobar nighn shakych nahi he mi chatithok pane sagte…jar chukun aandz barobar nighla tar tho nivvl yogayog samzava………………..

  kaka lekh chan aahe………………aavdla………………

  • हा हा हा. मला पण तसंच वाटतं. चुकुन बरोबर निघतात त्यांचे अंदाज. अंदाज बांधतांना वर नचिकेतने सांगितल्या प्रमाणे बरेच इशु कन्सिडर करावे लागतात. या सगळ्यांची गोळा बेरीज करून येणारे उत्तर म्हणजे अंदाज.. अ‍ॅनॅलिसिस योग्य असावे , आणि जर ते नसेल तर तसा एखादा प्रोग्राम बनवून घ्यावा.

 8. >>छाती ठोकून हमखास चुकीचे अंदाज वर्तवण्यात माहीर ते म्हणजे आपले ’ हवामानाचे अंदाज ’.

  हे एकदम पटेश…

  अहो अश्या पांढर्‍या हत्तींमुळे तर सरकारला खाबुगिरीला अजुन एक कुरण मिळतय.
  हवामान खात्याला लागणारी उपकरण,इतक्या उच्च शिक्षित लोकांवर होणार खर्च…हे सार काही एक संशोधनाचा विषय आहे. इथे सुद्धा भ्रष्टाचार असेलच.

  तस पाहिल तर या खात्याचा आपल्या शेती प्रधान देशाला फ़ायदा काय आहे???

  • मूळ उद्देश हा शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे असाच होता.

   इतके लोकं पोसण्याची गरजच नाही , थोड्या लोकात काम होऊ शकते.

 9. त्याच साईटवरुन तर cloud motion vector image पाहून आम्ही फोटो काढायला सुटतो.

 10. चला सगळेच म्हणतात त्याप्रमाणे जर हवामान खात्याचे अंदाज चुकत असतील तर एका अर्थाने त्यांचा खूप उपयोग आहे…कारण एका बाबतीत तरी ते बरोबर आहेत ती म्हणजे चुकीचा अंदाज वर्तविणे. मग ते जो काही अंदाज व्यक्त करतात त्याच्या विरुद्ध उपाययोजना करायला तरी हरकत नाही. आणी अशा प्रकारे ह्या अतिहुशार व खर्चिक लोकांचा उपयोग करता येवू शकतो. असे झम्प्याला वाटते.

  बर खरी गोम तर नंतरच आहे. की ह्या सर्वावर सरकार किती उपाययोजना करते आता उदा. २६ जुलै २००५ नंतर अशा किती योजना प्रत्याक्षात आल्या की ज्यांचा खरंच काही उपयोग झाला..आणी ह्या योजनांवर करोडोने रुपये खर्च होतात त्याचे काय?

  एकूणच फक्त हवामानाच नव्हे तर शेतीपासून शिक्षणखात्यांपर्यंत सगळीकडेच बोंबाबोंब आहे. आणी हे सगळेच पांढरे हिरवे निळे हत्ती आहेत.

  आशा एवढीच करा की ही इतर खातीही हवामान खात्यासाराखी विनोदी होवू नयेत.

 11. Kiran says:

  Last year I contacted weather department’s Nagpur Office. I was in need of rainfall data in Wardha District. In the list of phone numbers, many numbers were not working. So I called up main office. They do not keep this data in public domain. One has to buy it. Now, if this data is not reliable, how they expect to sell it? Even when I was ready to buy, I was told that there is no soft copy. I skipped the idea.
  Similar experiences of inefficient government expenditure are at NABARD.
  Recently, Kamal Nath, in the presence of Montek Singh, commented that planning commission should be curtailed in size or should be scrapped altogether. His point was similar to what was expressed in article. in the age of information revolution, why should we engage so many ‘qualified researchers’ in such inefficient manner, planning something which never really works.
  i hope I have not diverted much in my comment.
  Liked the post.

  • २१व्या शतकात जर सॉफ्ट कॉपी नाही म्हणत असतील तर ते पुर्णपणे क्रिमिनल आहे. इतके सगळे हाय फाय इंट्रिकेट इक्विप्मेंट्स वापरतात, मग सॉफ्ट कॉपी का नसावी?
   पहिली गोष्ट म्हणजे हा डेटा ते जमा कोणासाठी करतात? तर शेतकऱ्यांसाठी. मग तो डेटा सरळ वेब साईट वर का अपलोड केला जाऊ शकत नाही? खरं म्हणजे हा डेटा काही सेलेबल कम्युडीटी म्हणता येत नाही.
   हा डेटा विकणं म्हणजे ब्युरोक्रसीची हाईट आहे ही!
   नाबार्ड रुरल डेव्हलपमेंट्साठी सुरु केलं गेलं . पण त्याच्या कामाबद्दलपण संशयच आहे. कमलनाथ त्यातल्या त्यात थोडे जास्त सेन्सिबल नेता म्हणता येईल. प्लानिंग कमिशनची गरज आहे का? शेवटी अगदी बरोबर म्हटलंय, Planning Commission बद्दल की planning which never works.

 12. रोहन says:

  खरच गंमत आहे… पण मला माहित नव्हते कि हे लोक सुद्धा ‘सिसमीक व्हायब्रेशन्सचा डेटा अ‍ॅनलासीस’ करतात… कारण माझे काम तेच आहे… फक्त आम्ही पाण्याखाली तेल आणि नैसर्गिक वायू शोधायला त्याचा वापर करतो… अर्थात भूकंपाचे झटके सुद्धा आम्हाला रेकोर्ड वर सहज दिसतात… साईट बघतो… नेमके काय काय करतात ते.. 🙂

  • सिसमिक व्हायब्रेशन्सचा अभ्यास तर करतातच.

   काही दिवसापुर्वी एक वादळ कुठलंतरी अरेबियन सी मधे आलेलं होतं, ते गुजरातला , गोव्याला, कोंकणाला स्पर्शून जाईल म्हणून सांगितलं, पण वाचण्यात आलंय की ते गेलं जवळपास १४० किमी दुरुन. :हे म्हणजे इंग्लंडला बर्फ पडला, भारतात कोट घाला.”. असे आहे

 13. Aparna says:

  kaka normally we compare our weather team with other countries but what I once read is that we do not have the doppler radars that is in other countries..Later they had plans to install one near airport not sure if it went thru but probably they are not well equipped too….just my 2 cents…:)

  • अपर्णा
   जेंव्हा सरकार सॅटलाईट करता खर्च करू शकते तेंव्हा सरकार या रडार साठी खर्च करणार नाही हे मला तरी पटत नाही.
   काहीतरी कारणं सांगुन स्वतःची इनएफिशिअन्सी लपवतात हे लोकं

 14. मनोहर says:

  माहिती मिळविण्याची तंत्रे सुधारली असली तरी अंदाजांचे बेसिक मॉडेल इंग्रजांच्या जमान्यातीलच आहे हे याचे कारण. त्यात हवामानाचे अंदाज बरोबर वर्तविता येणार नाहीत हा संबंधितांचा समज आहे.

  • अंदाज हे स्टटस्टिकल डेटावरून बेतलेले असतात. ते मोड्य़ुल आता बदलायला पाहिजे. पण लालफितशाही कदाचित आडवी येत असेल.

 15. aaja mi NY-USa madhye aahe. ithe tasatasache havamaan andaj dile jaatat aani tyat ajibat chuk hot naahi. mag aapalayakadecha ase kaa vhaave?

  • एक्झॅक्टली हेच असायला हवे. जर लोकं कॅपेबल नसतील तर सरळ सॉफट वेअर बनवावे अ‍ॅनॅलिसिस साठी.

 16. काका, २६ जुलैच्या प्रकारच्या वेळी मला अगदी सेम हाच प्रश्न पडला होता. यांच्या साध्या वाटणाऱ्या चुकांमुळे करोडो रुपयांचं नुकसान झालं..

 17. Pingback: कात्रणे « वातकुक्कुट Vatkukkut

 18. हे हवामान चा आंदज बरोबर असून माला यावर माला विश्वास आहे तरी याचे माहिती ईमेल वर पटवावी ही विनंती

 19. हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी रोज बातम्या पाहतो पण कोणताच चैनल काही सागत नाही फक्त पुर्थीराज चव्हाण राणे शरद पवार इतर नेते यांच्या बातम्या बाकी काही नाही कांदे ५०. पैसे किलो गेले तेव्हा मिडिया वाले काहीच बोलले नाही पण २० रुपये कांदे झाले लगेच बातम्या जेव्हा शेतकरी तोटा खाऊन माल विकतो मिडिया कोटे जाते

 20. Maregoan tahsil yethe paus(baris)kadhi padel hi mahiti dyavi,
  Ya natar chi sarv mahiti email dwara pathawave,

  Thanks,,
  pradip s umare

 21. dnyaneshwar lamture says:

  Only info about rain and atmosphear tail me.

 22. Pavasachi mahiti milne baabat

 23. दादाजी नामदेव शेवाळे says:

  अंदाजाने वरतवलेला अंदाज म्हणजेच हवामानाचा अंदाज

 24. प्रताप राजाराम चव्हाण says:

  अरे भावा नो हे आपल्या सारखे सामान्य माणूस आहेत देव नाहीत.जे सांगतील ते खरे होईल,जे त्यांना दिसते ते तसे अंदाज लावतात, आपण त्यांना असे वाईट बोलून दुखूऊ नये
  माझे काही चुकले असतील तर ,माफ करावे ………

 25. damu khaladkar says:

  नाशिक च्यापुर्वभागात अजुन पाऊसकमी प्रेमाणात आहे

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s