थेउरची पार्टी

थेउरची पार्टी ही म्हणजे एक मीडियाला मिळालेलं जळतं कोलीत. सकाळच्या साईटवर नेहेमीप्रमाणे उथळ प्रतिक्रिया दिसल्या या आर्टीकल वर. खरं सांगायचं तर  ह्या गोष्टीकडे मी अलिप्तपणे किंवा” आय डोन्ट केअर” अटीट्य़ुडने  पाहूच शकलो  नाही. सकाळ वरच्या प्रतिक्रिया वाचून मनोरंजन झाले यात काही संशय नाही,पण त्याच बरोबर वाईट पण वाटलं, ते त्या मुलींच्या पालकांसाठी. मी स्वतः पण मुक्तपीठ  फॅन क्लब चा मेंबर आहे पण अशा प्रकारचा उथळ प्रतिक्रिया  इतक्या सिरियस विषयावर मात्र मला अजिबात आवडल्या नाहीत.

बऱ्याच प्रतिक्रिया या केवळ गम्मत म्हणून दिलेल्या दिसल्या. काही लोकं सिरियसली मराठी संस्कृतीचे बारा वाजवले या उत्तर भारतीयांनी वगैरे म्हणून राज ठाकरेंची तारीफ करण्याचा चान्स घेत होते, तर काही लोकं,” व्हाय यु शुड केअर? दे आर ऑल ग्रोन अप्स.. लेट देम डू व्हॉटेव्हर दे वॉंट”-  म्हणून कॉमेंट टाकणारे पण होते. जर मुलं दारू पितात तर मुलींनी पिल्याने काय हरकत आहे ?  जेंडर इक्वलिटी -असाही सूर असणारे काही लोकं दिसले.

काही लोकांच्या मते केवळ उत्तर भारतीय लोकंच या साठी कारणीभूत आहेत. पण त्याच सोबत ते विसरतात की ही इव्हेंट ऑर्गनाइझ करणारे मराठी पुणेकर आहेत. काही लोकांच्या मते या लोकांचे फोटो पेपर मध्ये द्यावेत म्हणजे हे लोकं सरळ होतील.

मी तो व्हिडीओ पण पाहिला – सकाळ वरचा.  तो पहाण्यापूर्वी जेंव्हा लेख वाचला तेंव्हा कळले की मुलींसाठी शॉर्ट स्कर्ट हा ड्रेस कोड होता. मुलींना असे सेक्सी कपडे घालून येण्यासाठी कोणी जबरद्स्ती केलेली नव्हती तर त्या मुलीनी   हे स्वतः मान्य केले होते- आणि त्या स्वतः पैसे देऊन ह्या पार्टीला गेल्या होत्या.  फ्रेशर्स पार्टी मध्ये बऱ्याच दारूच्या बाटल्या पण सापडल्या .

आईवडील जेंव्हा – (मला मध्यमवर्गीय आई वडील अभिप्रेत आहेत – अती उच्च वर्गीय नाही) मुलांना कॉलेज मध्ये पाठवतात तेंव्हा येणारा कमीतकमी खर्च अगदी मेरीट वर प्रवेश मिळवला तरीही  – प्रत्येक मुलासाठी जवळपास १ लाख २५ हजारा पर्यंत असतो. ( मी स्पेसिफिकली इंजिनिअरींग चा म्हणतोय, त्या मध्ये फी ६० हजार, क्लासचे २५ हजार आणि उरलेला ईतर खर्च ) जर एखाद्याला दोन मुलं असतील तर मुलांचं इंजिनिअरींगचे ग्रॅज्युएशन होई पर्यंतच जवळपास प्रत्येकी  ५-७ लाख खर्च होतो. नंतर जर एमबीए ला पाठवलं तर पुन्हा अतिरिक्त खर्च हा जवळपास ४ ते ५ लाख येतो ( अर्थात तो अवलंबून आहे कुठली इन्स्टीट्यूट आहे त्यावर)

मध्यमवर्गीय माणसाला  लोकांना पण हा खर्च करणे थोडे अवघडच जाते. मी सहज विचार केला, त्या टीव्हीवरच्या मुलींच्या वडीलांना आपल्या मुलींना अशा अवतारात पाहून काय वाटले असेल? स्वतःचे खर्च कमी करून त्या वडलांनी मुलीला शिकायला पाठवले असेल , या अपेक्षेने की ती चांगल्या संस्थेमध्ये शिकेल तर तिला चांगली नोकरी मिळेल , तिचं आयुष्य सेटल होईल. पण हे सगळं न करता ती मुलगी अशा अर्धनग्न अवस्थेत पार्टी करतांना आढळली, आणि तशी टिव्ही वर आली तर काय वाटेल?  मला वाटतं की काही मुलींना याची जाणीव होती , म्हणून त्या चेहेरा लपवत होत्या टीव्हीवर , तर काही मुली मात्र  पोझ देऊन उभ्या होत्या. काही मुलींचे ड्रेसेस तर अतिशय आक्षेपाहार्य होते.

आई वडीलांनी पोटाला चिमटा घेऊन मुलांना शिकायला पाठवल्यावर ते पैसे अशा प्रकारे दारू, पार्टी मधे खर्च करणे कितपत योग्य आहे? सिगारेट्स , दारू पिण्यासाठी माझी काही हरकत नाही, तो वैय्यक्तीक प्रश्न आहे , पण हे सगळं शिक्षण झाल्यावर स्वतःच्या पैशाने करणे जास्त योग्य ठरतं. परगावी मुलाला शिकायला ठेवायचे तर महिन्याला कमीत कमी दहा एक हजार तरी सहज लागत असावे.  शिक्षणाच्या वेळेस शिक्षण हे मुख्य असावे असे वाटते.

एंजॉय करणे म्हणजे फक्त दारू पिणे असा अर्थ होतो का? दारू शिवाय एंजॉय केले जाऊ शकत नाही का? मुलांनी फक्त दारूच तर प्यायली, त्यांनी काही फार मोठा गुन्हा केलेला नाही असाही विचार बरेच लोकांनी पुढे आणला आहे. मुलं २०-२२ ची असावीत- एमबीए करताहेत म्हणजे. तेंव्हा ते सज्ञान आहेत यात वाद नाही. तरी पण मुलांचे दारू पिणे मला योग्य वाटले नाही. आमच्या ऑफिस समोरच्या टपरीवर  मुली सिगारेट्स ओढायला दुपारी येतात- पण त्या सगळ्या  नोकरी करणाऱ्या असतात, त्यामूळे त्यावर काही आक्षेप नाही माझा. पण विद्यार्थ्यांनी दारू पिणे मला अजिबात योग्य वाटत नाही.

टिव्ही वर पाहिले की काही मुलींचे कपडे हे इतके तोकडे होते की त्याबद्दल काही बोलणे योग्य होणार नाही.मुलांना किंवा मुलींना जेंव्हा आईवडील बाहेर शिकायला पाठवतात तेंव्हा होणारा खर्च करणे इतके सोपे नसते. प्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन किंवा आपल्या उत्तर आयुष्यासाठी ठेवलेल्या गंगाजळी मधून पैसे काढून मुलांना आई वडील  शिकवत   असतात.

लग्नापुर्वी सेक्स असावा की नाही .. हा मुद्दा नाही इथे. पोलीसांनी रात्री बारा वाजता धाड टाकली होती. बऱ्याच मुली पण दारू प्यायलेल्या अवस्थेत सापडल्या. जर अजून थोडा वेळ जाऊ दिला गेला असता, तर कदाचित तिथे अजून भलतंच काहीतरी दिसलं असतं.  मुलं आणि मुलींचा रेशो पण अर्धा- अर्धा होता. मुली जेंव्हा इझी टु रिमुव्ह क्लोथ्स – किंवा द क्लोद्स विच कुड  अलाऊ सेक्स विदाऊट रिमुव्हिंग देम असे कपडे घालून आल्या होत्या  तेंव्हा ……….असो..योनी शुचीता हा मुद्दा नाही. कदाचित मध्यम वर्गांच्या दृष्टीने तो खूप महत्वाचा असेल पण उच्च वर्गांमध्ये मात्र त्याला फारसं महत्व नसावं.

माझ्या मनात खूप विचार आहेत या विषयावर, पण लेख फार मोठा होतोय , म्हणून थांबतो इथेच.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , , , , , . Bookmark the permalink.

66 Responses to थेउरची पार्टी

 1. एकदम खरे आहे तुझे.. मनात विचार खूप आहेत… पुण्याच्या रेव्ह पार्टीनंतर सुद्धा असेच अनेक विचार आले होते. इतका खर्च करून त्यांच्या आई-बाबांना हे असे काही बघावे लागते त्यांना काय वाटत असेल… आणि एंजॉय करणे म्हणजे काय?? ह्याचा अर्थ प्रत्येकासाठी निश्चितच वेगळा!!! पण सिगरेट दारू या गोष्टींची त्यासाठी नक्कीच गरज नसते… 🙂

  • रोहन
   काल लिहायला बसलो, आणि नंतर जाणले दिड पान झालं म्हणून थांबलो. एंजॉय करण्यासाठी दारू लागतेच असे नाही.
   काही मुलींचे कपडे असे होते की जणु त्या अंतर्वस्त्रच घालुन आहेत आणि वरचे कपडे घालायचे विसरल्या आहेत असे वाटत होते.

 2. पूर्णतः सहमत… !! या पार्टीनंतर अनेक ठिकाणी अशी मतं वाचायाला मिळाली की यात त्या मुलांचा काय दोष, पोलिसांनी हात धुवून घेतले वगैरे वगैरे… पोलिसांनी हात धुवून घेतले असतीलही कदाचित पण त्यामुळे त्या मुलामुलींनी जे केलंय ते योग्य कसं ठरू शकतं? शॉर्टस किंवा शॉर्ट स्कर्ट असल्या प्रकारचा ड्रेसकोड असणाऱ्या पार्ट्या वाहवत वाहवत कुठे जाऊ शकतात हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही..

  • जेंव्हा शॉर्ट स्कर्ट हा ड्रेस कोड ठेवला होता, तेंव्हाच खरं तर मुलींच्या लक्षात यायला हवे होते की पुढे काय मांडून ठेवले आहे ते. पण त्या ड्रेस कोडला मान्य करून पैसे भरणाऱ्या पण मुलीच होत्या. कठीण परिस्थिती आहे.

 3. ngadre says:

  chukechi ghatana hoti. Pan Polisaani ani mediane tiche ase pradarshan karayala nako hote. Mulaanchya maja karnyaachya concepts aai baapaanvarun ghetlelya asataat. Mhanoon daru partya hotaat. Nokari karun mag daru pyavi vagaire itaki maturity nasate.

  • नचिकेत
   प्रत्येकच गोष्ट आईवडलांच्या पासून घेत नाहीत मुलं. बरेचदा सभोवतालची परिस्थिती पण असते विचार परीवर्तन करणारी. एकदा टिन एज मध्ये प्रवेश झाला की आई वडीलांपेक्षा बाहेरचा म्हणजे मित्र मंडळीचा जास्त लवकर परीणाम होत असतो त्यांच्यावर.

  • नचिकेत
   प्रत्येकच गोष्ट आईवडलांच्या पासून घेत नाहीत मुलं. बरेचदा सभोवतालची परिस्थिती पण असते विचार परीवर्तन करणारी. एकदा टिन एज मध्ये प्रवेश झाला की आई वडीलांपेक्षा बाहेरचा म्हणजे मित्र मंडळीचा जास्त लवकर परीणाम होत असतो त्यांच्यावर.

   आणि मध्यमवर्गीय घरांमधे सेलीब्रेशन म्हणजे काय असतं? तर फार तर एखाद्या शेट्टीच्या हॉटेल मधे जेवायला जाणे. दारू वगैरे घरात पिणारे फार कमी असावेत असे वाटते मला तरी.

   • Nachiket says:

    ते ही खरच म्हणा.. पण तरीही असं वाटतं की पोलिसांनी वडीलकीची भूमिका घ्यावी. पोरा पोरीचं चुकलं तर आपण घरी त्यांचे असे वाभाडे/पब्लिक समोर धिंडवडे काढतो का?
    थोडे डिस्क्रीटली हाताळायला हवे होते प्रकरण.
    मुलं जरा बहकतात म्हणून लगेच पोलीस केस, तपासण्या, कोर्ट कचे-या कारवायाच्या का त्यांना?

    आणि अशा ठिकाणी पोरा पोरिंमधलं आकर्षण समजून घ्यायला हवं. त्यांना “कसं पकडलं रंगे हाथ कमी कपड्यांत ” अशा रीतीने प्रश्न हाताळण्या ऐवजी जरा पालकत्वाच्या भूमिकेतून सगळ्यांनीच वागावं. पोलिसांनीही आणि मोठ्या लोकांनी ही.

    • नचिकेत
     २०-२२ ची मुलं म्हणजे मॅच्युअर्ड वाटत नाहीत का? या वयात मी नोकरी करून स्वतः पैसे कमवत होतो.

 4. पूर्णतः सहमत!!

  काका…ही तर सुरुवात आहे यापुढे याहीपेक्षा वाइट गोष्टी पाहव्या लागतील.

  • कदा्चित तू म्हणतोस तसं पण होऊ शकेल. पण ते आपल्या घरात होऊ नये एवढीच माफक अपेक्षा.

 5. नचिकेत पूर्णत: सहमत …..
  ही सर्व मुले काही सरईत गुन्हेगार नाहीत. फक्त थोडीशी भरकटलेली होती. पोलिसांनी मिडियाला आणणे अगदी चुकीचे होते.
  “पोलिसांनी वडीलकीची भूमिका घ्यावी. पोरा पोरीचं चुकलं तर आपण घरी त्यांचे असे वाभाडे/पब्लिक समोर धिंडवडे काढतो का?”

  अतिशय बरोबर.

  पोलीस केस, तपासण्या, कोर्ट कचे-या हे सगळे करण्यापेक्षा त्यांच्याकडुन लेखी माफी लिहुन घेणे योग्य ठरले असते…

  • वरूण
   कदाचित् वय कमी म्हणून सोडून देता आलं असतं पण इथे मुलं २०-२२ च्या वयोगटातलीआहेत . या वयात मुलं व्हिएटनाम मध्ये युध्द लढालाय्ला गेली होती. हे वय काही इम्याच्युअर्ड मुलांचे नाही. ती पुर्ण वाढ झालेली वयस्क मुलं आहेत, ज्यांना पुर्ण समजतंय की आप्ण काय करतोय ते.

 6. स्वातंत्र्य, समता, आधुनिकता यांच्या व्याख्या बदलत चालल्या आहेत का आजकाल? दारु पिणं, एखादी गर्लफ़्रेंड किंवा बॊयफ़्रेंड असणं या सुधारणेच्या व्याख्या बनत चालल्या आहेत. १८-२० वर्षाची मुलं – मुली या ” चलता है यार! ” संस्कृतीच्या इतकी अधीन होत चालली आहेत. आपण काहीच करू शकत नाही का हे थांबवण्यासाठी? 😦

  • विशाल
   खरंच काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. आपल्या मुलांवरे संस्कार करायचे झालं. एवढंच आपल्या हातात आहे.

 7. चांगले वाईट यां सापेक्ष गोष्टी आहेत…त्यांची एक ठराविक व्याख्या नाही..
  ह्यातील कितीतरी मुलेमुली कदाचित अशी असतील जी पुढे जाऊन नक्की काहीतरी करतील.(चांगल्या अर्थाने) वर महेंद्रजी बोलल्याप्रमाणे सहवासाचा खूपच परिणाम होतो घरातल्या वातावरणापेक्षाही जास्त..ही सर्व मुले उच्च मध्यमवर्गीय घरातील आहेत बहुतेकांचे भविष्य उज्वलच असावे… त्यामुळेच ही सोंगे त्यांना सुचत असतील तर काही अंशी तेही बरोबरच आहे..पण निन्म मध्यमवर्गीयाची मुलेपण त्यांच्या बजेट व कुवतीनुसार एन्जॉय करतातच की…हे वयच असे आहे..
  इथे प्रॉब्लेम हा झाला असावा की बोलतात न मॉबला डोके,चेहरा नसतो…त्यामुळे होते काय की एकटेपणे जी गोष्ट करायला माणूस घाबरतो ती अशा ठिकाणी बिन्धास करतो. असो..मोठा विषय आहे…
  मला फक्त एवढेच म्हनावेशे वाटते तुम्हाला जशी मजा करायची असेल तशी करा. फक्त काळजी एवढी घ्या की दुसऱ्या कोणालाही वा स्वत:लाही कसलाही त्रास होता कामा नये. नाहीतर मजेचे रुपांतर सजेत होयला वेळ लागत नाही. आशा करुया की ह्यातून ते सगळे काही बोध घेतील…
  ……आणी नाही घेतला तरी कोणाच्या बापाचे काय जाणार आहे.

  • काय बोलावं हेच समजत् नाही. मॉबचा भाग व्हायचा की नाही ते मुलांच्या हातामध्ये होतं. तेवढी काळजी घेतली असती तरीही बरंच काही आटोक्यात आलं असतं.

 8. कृपया नोंद घ्यावी …..झम्प्याला इथे कोणाचाही बाप काढायचा नाही..वरील शेवटचे वाक्य वाक्प्रचार यां अर्थाने वापरले आहे…आणी तरीसुद्धा काही हरकत असेल तर…..

 9. Prasad Tharwal says:

  kaka… pan yawar upay kay……??? Purvi Sanskar he Aaji Ajobanchya Goshtitun… ani Pustakatun hot hote….!! Aajche sanskar he IDIOT BOX dwara hotat..!! Mula 20 – 22 warshachi zali mhanje Ti Sadnyan zali asa kasa mhanu shakto apan..!! Te dnyan tyani kuthun ghetla aahe tyawar te depend aahe..!! Ekhada “Sat”dnyani Mulga kiwa Mulgi asle krutya karel ka….????

  • यावर उपाय एकच – मध्यम वर्गीय मुलांनी उच्च वर्गीयांच्या गृप मध्ये मिक्स होणं टाळणे. इडीय़ट बॉक्स चा रिमोट तर आपल्या हातात आहे नां? मी स्वतः सिरियल्स पहात नाही. – कधीच्व पहात नाही, कितीही चांगलं असल तरीही- 🙂

   कायद्याने २१व्या वर्षी मुलगा लग्न करू शकतो आणि एका मुलीची जबाबदारी पण घेऊ शकतो. म्हणजे कायद्याच्या दृष्टीने तो पुर्ण सज्ञान आहेच. आता त्याने स्वतः जर स्वतःला टीनेजर समजले- आणि असा वागला तर आपण काहीच करू शकत नाही.
   त्यावर अ‍ॅक्शन घ्यायलाच पाहिजे, म्हणजे पुढे आयुष्यात कुठलेही काय्दे तोडतांना तो थोडा विचार करेल.

 10. mazejag says:

  I totally agreed with you Mahendra…I am sorry there is some problem in Marathi fonts today. According to me boozing is something should be totally prohibited atleast in this age. But if you notice all non Mumbai or Punekars are always fascinated with the movies, and big city’s fame so they always get themselves in such things. They just wanted to enjoy there freedom but they not really wanted to accept that they are all alone here and they should be very careful in every regards. Thodkyat aajchya tarun piddhine Prem mhanje sharir and Enjoy karna mhanje daru pine asa samaj karun ghetla aahe…Poor souls whey they will understand that will be too late…..

  • इथे मुंबईकर पुणेकर हा प्रश्न नाही. काय होतं की या मोठ्या शहरात मुलांवर आईवडीलांना विश्वास ठेवावाच लागतो. मुलांनी काही केलं तरी घरी समजूच शकत नाही. लहान गावात तसं नसतं, इव्हन मुलगी नुसती कॉफी प्यायला जरी एखाद्या हॉटेल वर गेली तरीही ्घरी बातमी पोहचू शकते.

   जर बोरीवलीला रहाणारी मुलगी ठाण्याला एखाद्या हॉटेल मधे एखाद्या मुला सोबत राहिली तर ते घरी कळणार नाहीच.शेवटी मुलांवरच्या घरच्या संस्कारांच्या व्हॅल्युज स्ट्रॉंग हव्या… एवढंच मला म्हणायचंय.

   • mazejag says:

    I agree…a long debate can happen on this

    • mazejag says:

     Jar hya partimule evdha jag gajvala..tar 16 Juen la aamchya office partimadhla kapdyancha “Shrinkege Rate” pahila asta tar tyach polisani samorchya Powai Talawat udya marlya astya…aso

     • आतापर्यंत ह्या नको त्या विषयावर (झम्प्यासाठी) सगळ्याच ब्लॉग/साईटवर….प्रतिक्रियांचा नुसता धो धो पाऊस कोसळला…
      “”Jar hya partimule evdha jag gajvala..tar 16 Juen la aamchya office partimadhla kapdyancha “Shrinkege Rate” pahila asta tar tyach polisani samorchya Powai Talawat udya marlya astya…aso”” पण ह्या इतकी बोलकी आणी रियलीस्टीक प्रतिक्रिया दुसरी कोणतीही नाही..(अगेन झम्प्यासाठी) हाहाहाहां.. जाम आवडली बाबा आपल्याला..हाहाहाहाहा

 11. Kiran says:

  About part of post which deals about middle class parents and their children in colleges, Symbiosis or any such ‘premier’ institutes have very lesser percentage of middle class parents’ children. I do not know exact chain of causes, but there is elite class in metro cities whole kids are flooding these institutes. I am currently in one such institute and in my first few months I was totally amazed or puzzled by kind of lifestyle I was seeing. Yet, I am observing lower end since mine is not MBA institute.
  The peculiar thing is these set of students is completely out of value judgments. They want high paying job, aggressive, assertive and know how to use there contacts. It is just not about drinking or smoking, either when you earn or you are learning. The way they perceive what they are doing is different than how we see.
  Nice post and it kick starts my day with thinking.

  • YES KIRAN… precisely what you said is well-said
   …it’s the attitude…that’s the main culprit or whatever word u can use…
   Higher class thinking is totally different than lower class or middle class…
   For this class (mostly this generation) life’s main फंडा is “It’s my life and I can do whatever I want to do…I got money, power so who cares…”
   And in each era this kinds of things happened and will happen…
   So need not worry for our culture…culture always evolves…
   Whatever good or use-full for community stays else vanishes…
   Remember law of Darwin “Fittest of the survival”

  • किरणजी तुमचा ब्लॉग वाचला,आवडला..वैचारिक लेख खूप विष्लेषण करून लिहिता तुम्ही..वाचताना मेंदूला चांगलाच खुराक मिळतो व व्यायामपण होतो..हे सगळे म्हणणे झम्प्याला तुमच्या ब्लॉगवर मांडायचे होते पण तिथे मला प्रतिक्रियेसाठी ऑप्शनच मिळाले नाही…म्हणून नाईलाजास्तव इथे बोलत आहे.

  • शेवटी हाय्यर क्लास म्हणजे काय? वर्षाला १०-१२ लाख कमावणारा हल्ली मिडलक्लास क्लास मधेच मोडतो.
   नुकतीच म्हणजे पाच सहा वर्षापुर्वी माझ्या बहिणीने एका ्खूप मोठ्या इन्स्टीट्य़ुट मधुन एमबीए केले. ती अशी वहावत गेली नाही. शेवटी घरचे संस्कार जास्त महत्वाचे असतात असे मला वाटते. जर बाहेरची सोबत घरच्या संस्कारांवर हावी झाली तर संस्कार कमी पडले असे होईल.

 12. Ravindra Jadhav says:

  महेंदाराजी अगदी मनापासून लिहिलेत.मी आपल्या मताशी सहमत आहे. आपण आपले मत व्यक्त करू शकतो. परंतु आपण आपल्या पुढील पिढीवर संस्कार करण्यात कमी पडलो याची खंत वाटते

 13. Girish says:

  MBK, i am alumini of symbi and i have experienced that symbi has no one from middleclass or even upper middleclass..it has students from all over country with precriteria of being stinking rich!! Forget these parties outside, i have experienced and tried much more than alochol in symbi canteen.. jast bolat nahi!! 🙂

  • गिरिश
   तू स्वतः विद्यार्थी होतास तिथला- म्हणजे आता काही न बोलणेच योग्य!
   तू जे काही लिहिल्ं आहेस ते निश्चितच धक्कादायक आहे. जर सगळेच फिल्दी रिच असतील तर मग असे वागणे सहाजिक आहे.

 14. Mandar Puranik says:

  महेन्द्र जी,
  जनसन्घाचे संस्थापक व थोर तत्ववेत्ते, प. दीनदयाळ उपाध्याय एकदा अर्थकारणावर बोलताना म्हणाले होते
  “अर्थ का अभाव और अर्थ का प्रभाव दोनो हानिकारक है”.
  सध्या ह्या वाक्याचा दुसरा भाग आपण बघत आहोत.

  ता.क.: कुपया मला ईमेल कराल का? मला तुम्च्याशी वैयक्तिक बोलायचे आहे.

 15. लीना चौहान says:

  ही पोस्ट वाचून मी इसकाळ वरचा व्हिडीयो पाहिला. एखाद्या सी ग्रेड सिनेमाच्या कॅमेरामन ने व्हिडीयो बनविळा आहे असे वाटते. जी पार्टी झाली ति नक्किच मध्यमवर्गीय कल्पनांमधे बसणारी नव्हती पण अश्या प्रकारे व्हिडीयो बनवून सकाळने सवंगपणा आणला आहे बातम्य़ांमधे. आजकाल कोणीही कुठेहि व्हिडीयो बनवून नेटवर टाकतात. एमबीए करणार्या मुलीना एवढे तरि समजायला हवे. नंतर चेहरे लपवून काय होणार? उद्या यातले फोटो वाफारुन कोणी अश्लिल फोटो बनविले आणि एखाद्या मुलीची बदनामी केली तर घरच्यांना जो मनस्ताप होईल आणि त्या मुलिचेही भविष्य धोक्यत येइल

  • लीना’

   वरची गिरीश ची कॉमेंट वाचली का? तो माझा जुना कलीग होता. त्याने जे लिहिलंय ते तर जे काहीझालं त्यापेक्षापण धक्कादायक आहे.
   जर अती उच्चवर्गीय लोकं असतील हे, तर या गोष्टींना ते फारसे महत्व देणारच नाहीत.

 16. nagesh says:

  Blog aani Vishay doni changal aahe pan … Porani enjoy tari kasa karava???
  aajachy pidhi madhye Enjoy mahnje Daru aasch rahilay. Kadachit jast nahi pan aai vadalanchya vartunikicha thoda tari parinam nahi ka mhanava?

  • नागेश
   अरे ट्रेकींग ला जाणे, कुठेतरी आउटींगला जाणे,. शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत इतके पुण्याशेजारी तिकडे जाऊन येणे, एखाद्या सोशल कॉज साठी वेळ देणे, अशा अनेक गोष्टी करता येतात दारू न पिता.
   कोणाला कशामधे रस आहे यावर सगळे अवलंबुन आहे.

 17. महेश says:

  ट्रीपला जाने गुह्ना नाही, पण आपल्या आई=वडलांनी आपल्याला कॉलेजमध्ये कशासाठी टाकले आहे याची जाणीव अजिबात मुलांना व मुलीना नाही हे स्पष्ट दिसते आई वडलांनी आपल्या गरजा कमी करून त्यांना शिक्षणासाठी पाठवलेले असते ह्याचे भान त्यांनी ठेवला पाहिजे होते ,शिक्षणाचा खर्च किती आणि आपण काय करतो ह्याचा विचार त्यांनी केला पाहिजे होता, बरोबर मुल आहे आणि ते काय करणार आहे याची जाणीव एकाहि मुलीला येऊ नये म्हणजे आश्चर्य वाटते काळ फार कठीण आहे .कदाचित पुढे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
  ,

  • महेश
   नेमकं हेच मला पण वाटत होतं आणि म्हणूनच हे पोस्ट लिहिलंय.
   आता जर ही मुलं वर गिरिशने सांगितल्याप्रमाणे खूप श्रीमंत असतील तर त्यांना या गोष्टीची काळजी करण्याचे काहीच कारण नाही. त्यांच्या दृष्टिने या गोष्टी साधारण असाव्यात.

 18. ravindra says:

  माझ्या मते कोलेजला आई वडिलांनी का पाठविले हा मुद्दा नाही. पण मुलांनी आपल्या भविष्याचा तरी विचार करायला हवा. एम. बी. ए. चे विध्यार्थी मेचुअर्ड असतातच.

  • रविंद्रजी
   बरेच दिवसांनी दिसलात.. 🙂
   तुमचे म्हणणे अगदी योग्य आहे. या वयातली मुलं पुर्ण मॅच्युअर्ड असतात/असायला हवी.

 19. Kiran says:

  Mahendraji,
  your point of passing on values from parents to children is perfect. And I agree there are exceptions. but there being exceptions point out what is the trend.
  Most of people whom I will reckon similar to those found at Theur, have parents who drink along with them. I am not saying this is the reason, but somehow the environment in which they grow is entirely different. I remember one girl from such group once asked in class, ‘Does anyone die by Malaria?’. They do not see traditions or people distant from them matter them anyway. If you talk like that, they respond ‘Paka mat’.
  About high middle class, there is interesting statistics by NCAER. It says that India is having similar number of high income people and low income people. At the same time, poverty estimate for India are same to what they were before 5 years. It means there is thinning out of ‘low middle income class’. And, if we all think, it is the class which somehow preserved value structures in major manner. I am not saying that others throw away values, but somehow attachment with values is inversely proportional to attachment with wealth!!

  • आपल्या सरकारच्या म्हणण्याप्रमाणे अडीच लाख वार्षिक उत्पन्न असलेला पण एच आय जी मधे मोडतो. गेली कित्येक वर्षापासुन जी लेव्हल निष्चित केली आहे – म्हणजे किती इनकम म्हणजे एल आय जी, किती म्हणजे एच आय जी. ती मात्र बदललेली नाही. महागाई कित्येक पटीने वाढली. पगार वाढले, तेंव्हा ही लिमिट पण वाढायला हवी होती.
   नॅशनल काउन्सिल अप्लाइड रिसर्च चा डेटा पण याच गृहितकावर अवलंबून असावा. मी फिनान्स बद्दल फारसं काही जाणत नाही.. पण उगिच आपलं काहीतरी लिहिलंय.
   लो मिडल क्लास आता अप्पर मिडल क्लास झालाय.. सगळीच लेव्हल एकाने वर चढली .

   मुलांबरोबर दारू पिणे वगैरे चा क्लास थोडा वेगळा असावा. आपल्याकडे मध्यमवर्गीयात ( मी स्वतःला अजूनही मध्यमवर्गीयच समजतो 🙂 ) व्हॅल्युज बऱ्यापैकी टिकून आहेत. पण वर गिरिश जे लिहितो की बहुतेक मुलं फिल्दी रिच असतात सिम्बी चे… तेंव्हा त्यांचे असे वागणे अपेक्षित आहे.

   दुसरी गोष्ट ही सगळी मुलं उद्या कुठल्यातरी चांगल्या पगारावर नोकरीवर लागतील, तेंव्हा त्यांना जबाबदारीची जाणिव जास्त असायला हवी.पण तसे नाही.

 20. सागर says:

  शेवटी कोणी कसे वागावे ज्याचा त्याचा प्रश्न आहे मी स्वत: सध्या कॉलेज मध्ये शिकत आहे.आपली मर्यादा आपण ओळखावी अन जे असे प्रकार करतायत त्यांना बिनदास्त करू द्यावं .
  एक किस्सा सांगतो माझ्या कॉलेज समोर सिंबी आहे अन रात्री तिथल्या मूली व मुले दारू पीवून
  येतात अन रस्त्यावर रिंगण करून बसतात गाणी म्हणत ,आपण जावून काय त्यांना थोडीच थांबवू शकतो ती त्यांची पाधात असेल न्जोय कराची करू देत.बाहेर गाड्यावर नाश्ता करताना मुलीसुद्धा
  एवढ्या अश्लील बोलू शकतात यावर विश्वास बसतो.करू देत.

  शेवटी आपल्या आई बाबा नि आपल्याला बाहेर शिकायला का ठेवले आहे याचा विचार ज्याने त्याने करावा.
  अनिकेत दादाने यावर छान लिहिलं आहे
  http://manatale.wordpress.com/2010/08/05/%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9A-%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%82-%E0%A4%95/

  • सागर
   जी गोष्ट मला माझ्या घरच्या लोकांनी केलेली आवडणार नाही तिला मी वाईटच म्हणेन आणि तिचे समर्थन करणार नाही.

   अनिकेतचे विचार वेगळे आहेत . तो लेख वाचला आत्ताच!

   तुझे म्हणणे योग्य आहे, जे लोकं असे प्रकार करतात त्यांना करू द्यावे,पण मग जेंव्हा ते पकडले जाऊन त्यांच्यावर कारवाई केली जाते तेंव्हा त्याचे समर्थन होऊ नये असे मला वाटते-

 21. Rajeev says:

  ?????????????

 22. Pingback: थेउरची पार्टी | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA.

 23. मनोहर says:

  माझ्यामते एक साहसी थरार अनुभवणे हा पार्टीत सामील होण्याचा उद्देश असावा. या आवश्यकतेकडे संस्कार करणाऱ्यानी दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम.

 24. हेमंत आठल्ये says:

  बापरे, किती चर्चा! पोरांनी चूक केली. आणि त्याची त्यांना शिक्षाही मिळाली. चांगल झालं. आता पुन्हा चर्चा करून काय उपयोग नाही. तुमचे म्हणणे अगदी शंभर टक्के मला पटले.

  • हेमंत
   थोडे जुनाट विचार आहेत माझे , पण मी स्वतःच्या विचारांशी प्रामाणीक आहे हे नक्की. धन्यवाद.

   • हेमंत आठल्ये says:

    जुनाट वगैरे काही नाही. अगदी बरोबर विचार आहेत. आणि योग्य आहेत विचार. ही असली थेर योग्य म्हणणे मुळात चुकीचे आहे. ‘दारू पिणे’ हे योग्य होऊच शकत नाही. आणि उरला पार्टीचा प्रश्न, तर दारू न पिता करा. कोण अडवत आहे? कपडे घाला नाही तर तसेच फिरा, पण गोंधळ कशाला घालता. अजूनही अनेक पार्ट्या चालतात की लोकांच्या घरात, तसे काही करा. तिकडे यूपी बिहार मध्ये त्यांना पाणी देखील महाग. इथं येऊन ही थेर सुचतात. आपले देखील तसेच. असो, बाकी तुमचे विचार अगदी योग्य आहेत. कोणी काहीही म्हणो, मला मात्र पटतात.

 25. bhaanasa says:

  संपूर्णपणे सहमत. मुळात दारू पिणे.. मग ती मुलांनी का मुलींनी हा मुद्दा नाही… म्हणजे एंजॉयमेंट हे समीकरण इतके खोलवर रुजलेय ह्यालाच छेद द्यायला हवा. सारा ताळतंत्रच पुढे सुटत जातो यामुळे.

  मात्र पोलिसांनी असे जाहिर धिंडवडे काढून काय मिळवले? ह्यातली कदाचित दोन मुले ( मुलगे/मुलगी ) तरी यामुळे धडा घेतील अशी आशा करावी का? असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. मग, नक्की धिंडवडे कोणाचे निघाले? आईबापाचे का? यातल्या अनेक आईबापांना आपले मूल काय करते याची काही अंशी जाणीव असेलही… समजावणे प्रकार सुरूही असतील. पण आता सारेच चव्हाट्यावर आले.

  बाकी, शेवटी मुले जर हा विचार करू शकतात तर असे करावे का? हाही विचार करू शकतातच. तेव्हां, परिणामांनाही ते तयार असणारच…

  • भाग्यश्री

   पोलिसांनी कदाचित थोडी एक्स्ट्रींम स्टेप घेतली. शेवटी बरेचदा आपण अलिप्त रहायचं.. आणि माझ्या घरात हो नाही ना? ह्याचं समाधान मानायचं!
   बाकी जे काही झालं, त्यामुळे आईवडीलांना जाणिव तरी झाली की आपण मुलांकडे दुर्लक्ष करतोय याचे परीणाम असेही होऊ शकतात याची. तोच काय तो फायदा म्हणायचा.

 26. Aparna says:

  काका मलाही हा cultural shock का काय आहे…काळ फ़ारच वेगाने पुढे जातोय…मी engg ला गेले तेव्हा Mech च्या मुलांनी सिगरेट पिणे हा एक प्रकारचा कोडच होता त्यामुळे कधी कुठल्याही मेकच्या मुलाला भाव द्यायच्या भानगडीत मी नव्हते beleive it or not…पण आता हे प्रकरण तर म्हणजे आवराच्या पुढच्याच्या पुढची भानगड आहे…..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s