६ जून २००० ! जवळपास ७८० फुट लांबीची आणि एक हजार मेट्रीक टन वजन असलेली रिव्हर प्रिन्सेस नेहेमीप्रमाणेच ऑइल घेउन पोर्ट वर यायला निघाली होती. मदर शिप दूर कुठेतरी इंटरनॅशनल वॉटर्स मधे उभी होती.गेली कित्येक वर्ष हा दिनक्रम सुरू होता. रिव्हर प्रिन्सेसचं कामच ते होतं, मदरशिप मधुन ऑइल पोर्ट वर आणायचं!
समुद्र किनाऱ्याजवळ पोर्ट वर खूप खोल नसल्याने मोठी जहाजं दूर समुद्रात उभी ठेवावी लागतात आणि मग त्यातले ऑइल वगैरे पोर्ट वर आणण्यासाठी रिव्हर प्रिन्सेस सारखे टँकर वापरले जातात. पण त्या दिवशी मात्र नेहेमीप्रमाणे ती त्या परत येतांना पोर्टवर पोहोचण्या ऐवजी अगदी थोड्या वादळाने समुद्रामध्ये भरकटली आणि कंडोलीम ( याचा उच्चार कोंडालिम पण करतात) च्या सुंदर समुद्र किनाऱ्यावर जाउन धडकली. परिस्थिती अशी की ती पुढे पण जाऊ शकत नव्हती आणि मागे पण येऊ शकत नव्हती . आणि मग सुरु झाला रिव्हर प्रि्न्सेसच्या जीवनातला अंतीम प्रवास.
इथे गोव्याला पण त्या ऑइल टॅंकरचा उल्लेख हा जहाज म्हणूनच केला जातो. खरं म्हणजे वेगवेगळ्या कामासाठी वापरली जाणारी जहाजं वेगवेगळ्या नावाने ओळखली जातात. इथे आयर्न ओअर चं खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. आयर्न ओअर जपान, चायना ला एक्स्पोर्ट करणे हा इथला फार मोठा उद्योग . त्यासाठी पण बार्जेस वापरली जातात. बार्जेस म्हणजे चक्क समुद्रात ला ट्रक म्हणा ना. याचं काम पण ऑइल टॅंकर प्रमाणेच असतं, किनाऱ्या वरचा समुद्र फार खोल नसल्याने मदर शिप्स इथे येऊ शकत नाहीत, म्हणून ही बार्जेस आयर्न ओअर मदर शिप पर्यंत नेऊन पोहोचवण्यासाठी साठी वापरायचे .
हे जहाज तिथून काढण्याचा प्रयत्न त्या जहाजाच्या कॅप्टनने निश्चितच केला असेल पण जेंव्हा ते जमले नाही तेंव्हा जहाज तिथेच सोडून देण्यात आले. सुरुवातीला ते जहाज टॊ करून तिथुन हलवावे असा विचार केला गेला. पण ते शक्य झाले नाही. तेंव्हा भाजप सरकार होतं. पोलीटीकली हे जहाज काढण्याचे काम बरेच गाजले आहे आणि अजूनही गाजते आहे.
जहाज रुतलं, आता सरकारने काय करावे? सरकारने साळगावकर माइनिंगला नोटीस दिली की हे जहाज तिन महिन्यात तिथुन हलवावे , अर्थात ते काही सहज शक्य झाले नाही – आणि मग गोवा सरकारने ते जहाज जप्त केले. आणि आपले निरनिराळे प्रयत्न सुरु केलेत जे जहाज बाहेर काढण्या्सठी., त्यातलाच एक म्हणजे टोईंग करून काढणे. मला आठवतं बहुतेक ७ कोटी रुपयांचं टेंडर लागलं होतं..
आता तिथून ते जहाज अजून भरकटू नये म्हणून मग काय करायचे? तर त्या जहाजाच्या बाजूला काही ठिकाणी गोल छिद्र – चांगली दोन फुट व्या्साची पाडुन तिथुन पाणी भरायचे म्हणजे जहाज स्टेबल होईल असा विचार केला गेला, आणि त्या जहाजात पाणी भरून जहाज समुद्र तळावर टेकवून स्टेबल करण्यात आले. आता कमीत कमी एक तरी झालं की हे जहाज इकडे तिकडे भरकटून कुठे जाणार नाही . गोव्याच्या कंडोलिमच्या समुद्रकिनाऱ्या पासून ५०० मिटर अंतरावर दहा वर्षाच्या काळात ते जहाज आता जवळपास ८ मिटर रेती मधे घट्ट रुतुन बसले आहे.
माझा संबंध बराच आला त्या जहाजाशी . पुर्वी एका कंपनीला जयसू शिपींगला पण हे जहाज फ्लोट करून बाहेर काढण्याचे कंत्राट देण्यात आले होते. जयसूला आम्ही बरीच मशिन्स सप्लाय केली होती त्यामुळे एकदा त्या शिपवर पण जाऊन आलो होतो. याच शिपवर आमचा एक इंजिनिअर आहे कानिटकर म्हणून त्याचे बोट तुटले होते. असो.
तर जयसू शिपींगने पण बराच प्रयत्न केला आहे त्या स्थिती मधे शिप फ्लोट करण्याचा. साधी स्ट्रटेजी अडॉप्ट केली होती त्यांनी, सगळी पाडलेली भोकं बुजवायची, आणि आत भरलेले पाणी पंपाद्वारे बाहेर काढून जहाज पुन्हा फ्लोट करायचे. पण हा प्रयत्न पण काही यशस्वी झाला नाही. आणि अजूनही जहाज रुतुनच पडलेले आहे.
ह्या ऑइल टॅंकर मधे बरंच ऑइल होतं. त्या पैकी जवळपास चाळिस हजार टन बाहेर काढण्यात आले. तरीही जहाजात वापरलेले अॅसबेस्टॉस आणि इतर टॉक्सिक पदार्थ हे आहेतच. समुद्रामधेच त्याचे डिसेक्शन करून त्याला बाहेर काढले तर मात्र समुद्रकिनाऱ्यावरचा इकोलॉजिकल बॅलन्स बिघडेल. पाण्यात बरंच ऑइल मिक्स होऊन समुद्र किनारा खराब होऊ शकतो. गोव्याची एकॉनॉमी ही अवलंबुन आहे ती टुरिझम वर. जर समुद्राच्या पाण्यात ऑइल मिक्स झालं, तर मग टुरिझम वर याचा नक्कीच परीणाम होईल.
मरा हाथी सवा लाख का , अशी एक म्हण आहे हिंदी मधे..होता होता दहा वर्ष उलटली. आता रिव्हर प्रिन्सेसचा समुद्रात ला भाग सडणे सुरु झाले , तसेच खाऱ्या हवे मुळे डेक आणि वरचा भाग पण गंजलाय. जरी हे जहाज पुर्णपणे आहे त्या ठिकाणीच तोडून नष्ट केले तरीही त्याच्या स्क्रॅपची किम्मतच कित्येक करोड रुपये होईल.
तर आता काय परिस्थिती आहे? ह्या जहाजाचे लोखंडी गंजलेले भाग आता तुटुन पडणे सुरु झाले आहे, बरेचदा हे असे भाग लाटांच्या बरोबर किनाऱ्यावर पण येत आहेत. आता एकच उपाय उरलाय आणि तो म्हणजे आहे त्याच ठिकाणी हे जहाज तोडून समुद्रकिनारा मोकळा करायचा!
हे जहाज आहे अनिल साळगांवकर यांचे. अनिल साळगांवकर हे सध्या अपक्ष एमएलए आहेत. सध्या युध्द सुरु आहे ते साळगावकर माइनिंग व्हर्सेस गोवा सरकार चे मुख्यमंत्री दिगंबर कामत. त्या बद्दल पुढल्या भागात.
गेले ३ दिवस मी गोव्याला आहे आणि हे रोजचे राजकारण वाचतोय , म्हणून तर हे पोस्ट लिहायला घेतलं. दुसरा भाग जास्त मनोरंजक आहे. लिहितो उद्या .
जबरी पोस्ट.. ते पण माझ्या जिव्याळ्याच्या विषयावर… 🙂 समुद्र, बार्ज, शिप, वेसल्स… माझ्यामते ते तिकडेच मोडणे योग्य ठरेल कारण इतक्या रेतीमधून ते बाहेर काढणे शक्य होणार नाही… प्रचंड खर्चिक होईल ते… अर्थात ते मोडण्या अगोदर त्यातील तेल वगैरे काढून टाकायला हवे.. तिथल्या पर्यावर्णनाला किमान धक्का बसेल असे करायला हवे… तो बसणार हे मात्र नक्की… फक्त वेळ ठरायची बाकी आहे… 🙂
अरे पुढला भाग अजून मजेशीर आहे. उद्या लिहितो.
त्यातले बरेचसे तेल काढून टाकले आहे, पण शंभर टक्के तेल काढणे शक्य होणार नाही हे पण नक्की. कित्येक हजार लिटर शेवटचे राहिलेले तेल समुद्रात जाण्याची शक्यता आहे.
जयसू पुर्वी पण एक दोन शिपिंग कंपन्यांना हे कंत्राट दिल्या गेलं होतं.ते पण फेल्युअर गेलं.या व्ह्सल मुळे समुद्रातला त्या भागातला करंट पण बदललाय . सारखी भरती ओहोटी मुळे त्या जहाजा शेजारची वाळू खचून जहाज अजून जास्त रुतुन बसलंय. जहाजाचा खालचा आकार प्लेन नसतो ( हा हा हा.. अरे हे काय , मी तुला काय सांगतो हे?? बरं राहू दे, इतरांसाठी लिहिलंय समज)
जहाज ह्या एकदम अनोळखी विषयाबद्दल थोडक्यात पण जहाजाशी संबंधीत वेगवेगळया बाबींवर उत्तम माहिती मिळाली….थोडीशी ज्ञानात भर पडली व या विषयाबद्दल कुतूहलपण जागे झाले…. thanks…
well मुंबईत बांद्रा व खारच्या मध्येपण एक जहाज उभे आहे गेली कित्येक वर्षे…त्याबद्दल काही आयडिया?
शिपिंग बद्दल मला पण सुरुवातीच्या काळात खूप अट्रॅक्श्न होतं. आता संपलंय!
ते बांद्रयाचं शिप , त्याबद्दल मला तरी माहिती नाही.
माझ्या मते.. ते जहाज कधीच काढून टाकले की…. लहानपणी पहिले होते १-२ वेळा..
हो. नुकताच मी ही तिथे जाऊन आलो. वाईट वाटले. अग्वाड्याच्या किल्ल्यावरून आणि सिंकेरी बीचवरूनही ही बोट खूप वर्षांपासून सर्वांना दिसत राहिली आहे. भुताळी जहाज म्हणतात तशी.
मी असे ऐकले आहे की या आगोदरच बरेच विषारी पदार्थ, तेल वगैरे तिच्यातून समुद्रात गेले आहे आणि हानी झालेलीच आहे ऑलरेडी..
त्याच्याखाली साठलेली वाळू हाच मुख्य अडथळा आहे. आणि बरीच टेंडर्स अनेक कोटींची निघाली आहेत ती बोट हलवण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी. पण कोणालाच यश आलेले नाही.
अग्वाड्यावरून काढलेला फोटो खाली अपलोड केला आहे.
http://gnachiket.wordpress.com/river-princess/
ती वाळू आता काढता येणे शक्यच नाही.
नाहीतर जयसूचा प्लान सक्सेसफुल झाला असता .
शेवटलं टेंडर आहे पास झालेलं…….. त्याबद्दल उद्या लिहितोय. आता अर्धवट काहीतरी लिहिलं जाईल.
Pingback: Tweets that mention रिव्हर प्रिन्सेस गोवा | काय वाटेल ते…….. -- Topsy.com
जबर्या पोस्ट…खुप दिवसांपुर्वी यासंदर्भात थोडस वाचनात आल होत….एवढ विस्तृत माहिती आजच समजली.
पर्यावरणाच्या दृष्टीने भारताची ही पहिली परिक्षा म्हणावे लागेल. आणि दुर्दैवाने त्यात आपण पुर्ण पणे नापास झालोय असे मला वाटते.
माहितीपुर्ण पोस्ट… धन्यवाद !
कसं वाटत असेल ना ही बोट अशी हळु हळू नष्ट होताना पाहून तिच्या मालकांना, तिच्यावर वर्षानुवर्षे काम केलेल्या कर्मचारी वर्गाला. नाही…, आर्थिक नुकसान हा खुप वेगळा आणि मोठा मुद्दा आहे. पण त्या बोटीवर वर्षानुवर्षे काम केलेल्या लोकांचे त्या बोटीबरोबर जे भावनिक संबंध जुळले असतील त्याबद्दल बोलतोय मी. माझी शाळा-कॊलेजच्या दिवसात सहा वर्षे वापरलेली सायकल अजुन जपुन ठेवलीय मी, आता खरेतर ती अजिबात वापरात नाहीये, पण मी अजुनही नियमीत तेलपाणी करुन जपतोय तिला. साळगावकरांना काय वाटत असेल?
हाच भावनिक मुद्दा ती बोट बघताना माझ्या डोक्यात आला होता.
बोटींशी खलाशांची भावनिक गुंतवणूक असते. माझे बाबा शिप बिल्डींग कंपनीत होते म्हणून मी हे पहिले आहे.
अर्थात मी जे ऐकले आहे त्या प्रमाणे साळगावकरच ती बोट आता भंगारात विकता यावी म्हणून तिला हलवण्याच्या सरकारच्या इतर प्रयत्नांत विरोध करत आहेत.
अर्थात साळगावकरांची ही इच्छा समजण्यासारखी आहे. नुकसान तर त्यांचेही प्रचंड झाले आहेच.
सध्या इथे चक्क साठमारी सुरु आहे- साळगावकर आणि दिगंबर कामतां मधे..
नचिकेत
नाही तसे नाही. साळगावर विरोध वेगळ्या कारणासाठी करताहेत. खुप मोठी खेळी आहे ती. आयपीएल.. म्हणजे इंडीयन पोलिटीकल लिचस..
जुन्या गोष्टीबद्दलचं अफेक्शन तर खूप असतं . एका नेव्हीच्या जहाजामध्ये सी चेस्ट मधुन पाण्याचं कनेक्शन घेतलेलं असतं इनडायरेक्ट कुलींगसाठी . त्यासाठी एक सी वॉटर पंप असतो. तो बदलायचं काम पडलं तर त्या व्हेसलवरचे लोकं अजिबात तयार नव्हते बदलायला. म्हणाले कीतीही खर्च आला तरीही हे आहे तेच रिपेअर करुन द्या. अफेक्शन असतं जुन्या गोष्टीबद्दलचं. शेवटी इम्पेलर इम्पोर्ट केला त्यासाठी. जवळपास ५ पट खर्च केला असेल जूनी सिस्टीम कायम ठेवण्यासाठी.
साळगांवकरांचे विचार उद्याच्या पोस्ट मध्ये.. 🙂 वाट पहा उद्यापर्यंत.
महेंद्रजी माहितीपुर्ण पोस्ट आहे….. जगात किती घटना घडत असतात आपल्याला काहीच (ईथे आपण म्हणजे ’मी स्वत:बद्दल ’ बोलतेय 🙂 ) माहित नसते…..
उद्याच्या भागाची वाट पहातेय….
मी यात एक्स्पर्ट वगैरे नाही बरं कां, फक्त अनुभव आणि स्वतः पाहिलेले असल्यामुळे -त्याच्या जोरावर लिहितोय. पुर्वी जेंव्हा या शिपवर गेलो होतो तर जवळपास १५० फुट दोरीच्या शिडीवरून चढून जावं लागलं होतं. भरपूर वारा आणि हलणारी दोराची शिडी. आयुष्यातला एक भयंकर अनूभव होता तो- कधीच न विसरता येणारा.
खुपच इंटरेस्टिंग पोस्ट आहे, पुढच्या भागाची ऊत्सुकता आहे.
अशाप्रकारच्या पोस्ट, माहिती वाचायला मजा येते. नेहेमीपेक्षा वेगळे, हटके.
सोनाली,
बरेच दिवसानंतर दिसलीस.. काय सुरु आहे?
उद्या संपवतो. कन्क्लुडींग भाग टाकतो .
हे क्काय मस्त नवीनच वाचायला मिळाले ….
धन्यवाद महेंद्र .
उद्याची उत्सुकता आहे.
सुमेधा
मी पण तिन दिवस हेच सगळं वाचत होतो. इंटरेस्टींग आहे. आणि स्वतः च्या जहाजावर जाऊन आल्याने थोडी जास्त उत्सुकता होती.
वा.. मस्तच.. खूप वेगळा विषय आहे. काहीच माहित नव्हतं याबद्दल. मस्त माहिती दिली आहेत.
पुढच्या भागाची वाट पाहतोय.
हेरंब
टाकला पुढला भाग.
Pingback: रिव्हर प्रिन्सेस-२ | काय वाटेल ते……..
मरा हाथी सवा लाख का म्हण अगदी सार्थ केलीये या जहाजाने. बर झालं तू यावर लिहीलस… म्हणून कळाले तरी नाहीतर….
सध्या सगळ्या मिडीय़ाला वेड लावलंय कलमाडींनी. त्यामुळे ह्या लहानशा (??) १९० कोटीच्या घोटाळ्याकडे पुर्ण दुर्लक्ष झालंय. 🙂
Pingback: रिव्हर प्रिन्सेस-३- अनिल साळगावकरांनी दिलेली जाहिरात. | काय वाटेल ते……..
krupaya candolim mhanu naka ho , tyaa beach che nav can_Do_lee Aahe yatil la ha kamalatala
Thanks.. 🙂