हिंदु …

भगवा रंग… झाकोळला गेलाय.

संत तुकाराम, रामदास स्वामींनी खांद्यावर दिलेली भगव्या रंगाची पताका घेउन जेंव्हा  शिवाजी महाराज जिजाऊंच्या समोर उभे राहिले असतील, आणि आपला हिंदूपदपातशाही स्थापन करण्याचा निर्णय सांगितला असेल तेंव्हा जिजाऊंच्या डॊळ्यात पाणी नक्कीच तराळले असेल नाही का?? मग त्या पाणी भरलेल्या डोळ्य़ांनी जेंव्हा आपल्या १६- १७ वर्षाच्या मुलाच्या डोक्यावर त्या माऊलीने आपला हात ठेऊन आशीर्वाद दिला असेल तेंव्हा शिवरायांच्या मनातल्या त्या हिंदूपदपातशाही स्थापन करण्याचे स्वप्न कधी ना कधी तरी पुर्ण होईलच अशी खात्री असेलच, म्हणूनच त्या माऊलीने आपल्या काळजाच्या तुकड्याला हातामधे तलवार घेऊन बाहेर जाऊ दिले असेल .

दुर्दैवाने आज पर्यंत  ते स्वप्न   पुर्ण झाले नाही- आणि कधी होण्याची अपेक्षाही नाही. ’स्वराज्य’ तर मिळाले, पण ’सुराज्य’ मिळायची आम्ही अजूनही वाट पहातोय.   हिंदूपदपातशाही स्थापनेच्या स्वप्नाला तर नेत्यांनी सरळ………असो लिहित नाही जास्त, कारण विनाकारण विषयांतर होईल.

स्वतःला हिंदू  म्हणवून घेण्या पेक्षा निधर्मी म्हणवून घेण्याकडे आपल्या नेत्यांचा  कल वाढतोय. लोकांना अभिमान वाटतोय  हिंदू म्हणवून घेण्यापेक्षा निधर्मी   म्हणवून घेण्याचा.  हिंदुस्थानचा भारत कधी झाला ते समजलेच नाही.

शिवरायांनी आपल्या मावळ्यांच्या खांद्यावर दिलेल्या त्या भगव्या रंगाच्या ध्वजाचे आज काय झाले आहे? प्रत्येक पक्षाने त्यामधे आपले वेगवेगळे स्वार्थाने लडबडलेले  ’बेगडी’ रंग मिसळून भगव्याची  पार  वाताहात करून टाकली आहे.  कोणी त्यामधे हिरवा,  कोणी हिरवा +निळा ,  मिसळतो , तर कुठला तरी एखादा पक्ष आपला निधर्मी स्वरूप एंडॉर्स करायला पांढरा रंग पण  वापरतो.

दुर्दैवाने आज  प्रत्येकच पक्षाला शिवाजी महाराजांची आठवण येते ती फक्त राजकारणासाठी! त्यांचं स्वप्न होतं हिंदवी स्वराज्य  स्थापन करणे.  ज्यांच्या खांद्यावर विश्वासाने धुरा दिली होती , त्यांनी आपली जबाबदारी हे आपल्या  खांद्यावरचं हे भगव्या रंगाचं “ओझं” आहे असे समजून काढून फेकण्यात, आणि निधर्मी रंगीबेरंगी झेंडे घेऊन नाचण्यात  मोठेपण मानतात.

अरे कशासाठी त्या माऊलीने आपल्या लेकराला घोड्यावर बसवून उन्हातान्हात  लढायला पाठवले होते?? कशासाठी शेकडॊ मावळ्यांनी   आपला जीव दिला ??  श्री  शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारी हिंदूपदपातशाही होती ती हीच का?? हा प्रश्न मला कालपासून छळतोय.

कालच एक बातमी वाचली.  फ्रान्स सरकारने बुरखा घालण्याकरता कायद्याने बंदी घातली आहेच. आता अशी बातमी आहे की आता फ्रान्स चे  सरकार बहुपत्नित्वाचा कायदा रद्द करणार आहे. कुठल्याही धर्माच्या लोकांना एका पेक्षा जास्त लग्नं करण्यात येणार नाहीत. बऱ्याच लोकांचे नागरीकत्व रद्द होण्याचे चान्सेस पण आहेत. त्या पार्श्वभूमीवर    आपल्या सरकारचे बोटचेपे धोरण मात्र बरेचदा मनःस्ताप देऊन जाते.

सरकारने तर हिंदू असल्याबद्दल जिझिया कर तर लावलेला नाही, पण  हिंदू असल्याबद्दल तुम्हाला लाज वाटावी असे वागणे  निश्चितच सुरु केले आहे.  कदाचित त्या दिशेने वाटचालही सुरु आहे.

तूम्ही हिंदू आहात?? तुम्हाला शिक्षणाचा अधिकार कशाला हवा?? बुट पॉलीश करा, रामागडी म्हणून कामं करा, गेला बाजार, भाजी विका, मासे विका, .. शिक्षण ?? छे …  ते   तुमच्या साठी   नाही- आणि जर तरीही शिकायची इच्छा असेलच, तर पदरचे पैसे खर्च करून शिका!.

सरकारने इतर सगळ्या धर्मियांना  जास्तीत जास्त फॅसिलिटीज द्यायच्या आणि हिंदूंना मात्र शक्य तितके ताणायचे असे धोरण अवलंबिले आहे. लांगूलचालनाची परंपरा मात्र काही राजकीय पक्ष अगदी इमाने इतबारे  आणि काटॆकोर पणे जोपासताहेत. . असो!!

यावर एक छान लेख वाचला होता आणि त्यावर लिहिण्याचे बरेच दिवसांपासून मनात होते पण नंतर राहून गेले .   त्या लेखा मधे एक पत्र लावलेले दिसले, ते इथे पेस्ट करतोय. त्याबद्दल  जास्त काही लिहिण्याची आवश्यकता नाही. पत्र वाचले की सगळे समजेल.

शेवटी एकच सांगावंसं वाटतं..महाराज, आम्हाला क्षमा करा. आम्ही चुकलो.. आपल्याला अभिप्रेत असलेला हिंदुस्थान आणि हिंदुपदपातशाही   आम्हाला समजलीच नाही.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , , , , , . Bookmark the permalink.

101 Responses to हिंदु …

 1. महाराज, आम्हाला क्षमा करा. आम्ही चुकलो.. आपल्याला अभिप्रेत असलेला हिंदुस्थान आणि हिंदुपदपातशाही आम्हाला समजलीच नाही. +१..

  😦 😦 😦

 2. ngadre says:

  कोणाचीच एका धर्माला वाहिलेली “शाही” नसावी.
  बौध्दशाही, दलितशाही, मुस्लीमशाही वगैरे. तशीच हिंदूशाही सुद्धा.

  सर्वांना एक समान हक्क हवेत.

  पण दुर्दैव हेच की हा साधा समानतेचा सेन्स अनकॉमन ठरला असल्याने एक शाही तयार होते आणि तिला शाह द्यायला किंवा कंट्रोल मध्ये ठेवायला एक विरुद्ध प्रकारची शाही अस्तित्वात येते. आणि ती एक आवश्यक संकट बनते.

  जसे मुस्लिमांच्या लांगूल चालनाला वाचक असावा म्हणून शिवसेना. ब्राह्मणांच्या “संघा” विरुद्ध वेगवेगळ्या दलितसेना..

  एकाने एक्स्ट्रीम वागायला सुरुवात केली की तोल सावरायला दुसरा कोणीतरी दुस-या एक्स्ट्रीमला जातोच.

  व्हीशियस सर्कल..

  • नचिकेत
   इथे असलेला प्रत्येकाच्या मनातला शिवरायांच्या बद्दलचा आदर, आणि आजची परिस्थिती, त्यावरच जे आहे त्या फॅक्ट्स लिहिल्या आहेत.
   तसंच म्हंटलं तर मग नक्षलवादांचे ममता बॅनर्जीने केलेले समर्थन पण योग्यच म्हणावे लागेल!
   असो.

   • Nachiket says:

    हे माझं म्हणणं तुमच्या विचारांच्या विरोधात नाही.

    मी म्हणतोय वेगळंच.

    हे असं “का” होतंय? तर मुस्लिमांच्या एक्स्ट्रीम वागण्याला कुठेतरी चेक, शह हवा म्हणून हिंदू एकता.

    हिंदूंची फार एकी होतेय याची भीती वाटून मुस्लीम संघटना.

    मग एकमेकांना शह काटशह.

    प्रत्येक बाजूचे एक्स्ट्रीमिस्ट हेच म्हणतात की “ते” करतात तर आम्ही गप्प बसायचं का?

    सरकारचे इंटरवेन्शन शून्य. खतपाणी भरपूर.

    म्हणून समानता येताच नाही.

    दुष्ट चक्र.

  • nikhil says:

   patatay
   pan ” sangh ” bramhnancha he khatakla
   maze ajoba 55 varsha sanghat hote,
   anibani veli jail madhe pan gele
   pan tyanni sangitla
   ani anek karyashalanmadhe mi svataha anubhavla
   sanghat bramhan he itar sanghatananchya tulanet jasta asle tarihi sanghat ekdahi jaat madhla j pan kadhat nahit
   sarva jan ( mag padadhikari ka asenat ! ) sarva kama ( jevan vadhne sandas saf karne suddha ) karatat
   kuthech bhed nahi
   mag yala tumhi bramhanvadi mhananar ?????
   sanghat anek maratha tasech bahujanahi ahet
   adivasinchya vikasasathi sangha mothe molache kaam karat ahe

  • nikhil says:

   mata patatat
   pan “sangha ” bramhanancha ???
   sanghat sarva jaatichi loka ahet
   sanghache adivasinsathi karya molache aslyane adivasi tarunahi yaat ahet
   sanghat jaat madhla j pan yet nahi
   ha mazach nave tar mazya ajobancha suddha anubhav ahe ( te 55 varsha sanghat hote. anibani madhe jail la gele 2 varsha bhumigat rahile ).
   sarvajan sagli kama kartat ( parisar saaf karne , swacchatagruhe saaf karne ,
   jevan banavne vadhne puja-archa prarthana ) he manya ki itar sanghatananpeksha sanghat bramhan jasta ahet
   pan itar jatinche lokahi ahet
   pan mhanun sanghala “bramhni ” mhanata yenar nahi
   sanghat kontyach jaatiche lok nastat
   astat fakta hindu !!

 3. याला काही पर्याय आहे का? तर निश्चित आहे, आपण एकत्र येवून या यंत्रणेविरुद्ध ठामपणे आवज उठवणे. पण तो आपण वापरायला तयारच नाही आहोत. आपल्याला शिवाजी जन्मायला तर हवाय, पण तो चार घरे सोडून. उगाच त्याच्या नसत्या मला उपद्व्यांपांचा त्रास कशाला? जोपर्यंत ही वृत्ती नाहिशी होत नाही तोवर हे रडगाणं असंच चालू राहणार. याला अंत नाही. 😦

  • विशाल
   इथे म्हणजे कुठल्यातरी एखाद्या धर्माला धारेवर धरले की तुम्ही मग सेक्युलर होता. बस्स!

 4. हिंदुस्थान राज्यघटनेप्रमाणे धर्मनिरपेक्ष देश आहे. पण आपल्या देशात हिंदुंबाबत नेहेमीच सापत्नभाव केला जातो. आणि हे असे करणारे राज्यकर्ते हिंदुच असतात पण मतपेढीसाठी लांगूलचालन करावे लागतेच ना. ही असली बेगडी धर्मनिरपेक्षता काय कामाची…!

  एकप्रकारे आपणही अश्या राज्यकर्त्यांना निवडून देण्यास जबाबदार आहोतच.

 5. >>>>>सरकारने इतर सगळ्या धर्मियांना जास्तीत जास्त फॅसिलिटीज द्यायच्या आणि हिंदूंना मात्र शक्य तितके ताणायचे असे धोरण अवलंबिले आहे. लांगूलचालनाची परंपरा मात्र काही राजकीय पक्ष अगदी इमाने इतबारे आणि काटॆकोर पणे जोपासताहेत. . असो!!>>>>>

  सरकार म्हणजे कोण???
  तर आपणच ना?
  सगळेच नेहमीच संधीसाधू असतात …गरज असते ती स्वतः पेटून उठायची व काहीतरी करायची (विधायक अर्थाने)
  ह्या असल्या भिकेने किती जातींचे भले झाले आहे वा त्यांनी प्रगती केली आहे?
  असल्या भिकेने काही फरक पडत नाही…

  ज्याच्यात दम असतो तो आपली मर्दुमकी गाजविल्याशिवाय राहत नाही. ज्याला खरोखर शिकायचे आहे तो शिकल्याशिवाय राहत नाही….आणी नाही शिकला तरी त्याचे काही अडत नाही. तो प्रगती करतोच…
  इतके हिंदू शिकलेत काय करता आहेत ते? कुठे आहेत ते? काय उपयोग केला त्यांनी शिक्क्षनाचा?

  आणी मुख्य मुद्दा हां की इतर प्रवाहातील लोकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही सध्याची मुख्य गरजच आहे…

  मुस्लीम समाजाचे सर्वात जास्त नुकसान शिक्षणाला महत्व न दिल्यामुळेच झाले आहे व होत आहे…
  जर ते शिक्षित झाले तर जगातल्या अर्ध्याच्या वर समस्या नष्ट होतील…पाश्चात्य समाजाच्या प्रगतीचा पाया शिक्षण हाच आहे…

  त्यामुळे आपल्या इथे जर इतर समाज शिकत असेल तर त्याचा त्रास करून घ्यायचे काहीच कारण नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील हीच भूमिका घेतली होती..मागासलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची….

  माझ्या म्हणण्यात कोणाला CONTRADICTION आढळले तर…मी वरील दोन्ही मुद्दे वेगवेगळया दृष्टीकोनातून मांडले आहेत हे लक्षात घ्यावे…

  हा एक खूप खोलवर जाणारा व लवकर गैसमज पसरविणारा संवेदनशील विषय आहे…ह्या बातमीकडे बघण्याचे अनेकांचे अनेक दृष्टीकोन असतील…त्यामुळे असल्या विषयावर मते मांडताना उगाचच इतर कुठल्याही समाजाबाबत आकस निर्माण होणार नाही याची कृपया काळजी घ्यावी….ही एक कळकळीची विनंती…

  वि.नो.– मी जन्माने एक हिंदू आहे….व योगायोगाने मी या जन्मात जन्माला आलो म्हणून मी याचा वृथा खोटा अभिमान बाळगत नाही. दुसऱ्या हिंदूंनी पराक्रम गाजविले म्हणून मी काही थोर होत नाही.
  व बरेच नालायक निपजले म्हणून मी काही नालायक होत नाही.

  • Nachiket says:

   एक अत्यंत उत्कृष्ट प्रतिक्रिया झंप्या. एकदम सही.

   “हा एक खूप खोलवर जाणारा व लवकर गैसमज पसरविणारा संवेदनशील विषय आहे…ह्या बातमीकडे बघण्याचे अनेकांचे अनेक दृष्टीकोन असतील…त्यामुळे असल्या विषयावर मते मांडताना उगाचच इतर कुठल्याही समाजाबाबत आकस निर्माण होणार नाही याची कृपया काळजी घ्यावी….ही एक कळकळीची विनंती…”

   १००% करेक्ट..

   उगीच नुसतं हिंदू किंवा मुस्लीम असा शब्द जरी काढला तरी “नको नको नको..” अशी अलर्जी येणारे खूपजण असतात. मग चर्चा तर दूरच. एखाद्या प्रश्नाचं अस्तित्वच नाकारून आयडीयोलॉजीच्या हवेतल्या मनो-यात अलूफ राहायचं की प्रश्न नाहीसा होतो अशी केविलवाणी गैरसमजूत असते त्यांची.

   हे सर्वच बाबतीत आहे. मराठी अमराठी..नको नको नको.

   शिवाजीराजे चांगले वाईट ….नको नको नको.

   बाबा बुवांची भोंदूगिरी…..नको नको नको.

   विषयच नको. कुणी दुखवायचं उगीच.

   • नचिकेतजी धन्यवाद!
    आम्ही स्वत:ला अत्रेंचे शिष्य समजतो त्यामुळे जें आवडले ते जाहीररीत्या आवडले म्हणून सांगतो..व जें नाही पटले वा चुकीचे वाटले तेही ओरडून सांगतो…

    उथळपणे कुठल्याही गोष्टीकडे पाहणे व त्यावर मते व्यक्त करणे हे खूप सोपे आहे…

    खाजगी मत काहीही असो त्याचा आम्ही खाजगीत आदर करू पण सार्वजनिकरित्या जर आपण जबाबदारी सोडली तर तिचे भानही आणून देवू.

  • Saurabh says:

   sarkar mhanje apan nivadun dilele nete.

   2) hI ji savalat ahe ti ek paishachi madat ahe, ti hinduchya sathi muddam dileli nahi. itar dharmataly mulana dileli ahe

   3)ithe itar samaj shikato ahe mhanun tras karun ghetalyache mala tari ya post madhe disale nahi. ya post madhe tar mahendrane phakt rajakiya labhasathi kase kay nete vagatat ani ekhadya dharmala vethila dharatat te lihile ahe.

   3)baki sagali comment , lekhala sodun ahe. ithe itar jatinchya shikshanacha mudda mandalela nahi.

   • sarkar mhanje apan nivadun dilele nete.

    अहो सौरभजी हे नेते आपल्यातलेच असतात ना…का कुठून परदेशातून वा परग्रहावरून आलेले असतात…

    2) hI ji savalat ahe ti ek paishachi madat ahe, ti hinduchya sathi muddam dileli nahi. itar dharmataly mulana dileli ahe
    ही मदत का जाहीर करावी लागते माहीत आहे का आपल्याला?
    ह्या समाजातील फार कमी मुले असल्या शिक्षनाकदे वळतात..त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी..हे फक्त एकच सोपे कारण मी येथे देत आहे.. वर सांगितल्या प्रमाणे हा खूप खोलवर जाणारा विषय आहे..उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला असे नको…..

    2)ithe itar samaj shikato ahe mhanun tras karun ghetalyache mala tari ya post madhe disale nahi. ya post madhe tar mahendrane phakt rajakiya labhasathi kase kay nete vagatat ani ekhadya dharmala vethila dharatat te lihile ahe.
    लेखाचे टायटल व टोन बघितला असता कोणाच्याही सहज लक्क्षात येईल की हा हिंदू व इतर अशा angle ने लिहिलेला लेख आहे.
    प्रत्येक गोष्टीत राजकारन्याना चोपणे वा नावे ठेवणे खूप सोपे आहे..व सगळेच तेच करतात…म्हणून तेच योग्य का?

    3)baki sagali comment , lekhala sodun ahe. ithe itar jatinchya shikshanacha mudda mandalela nahi.
    अहो सौरभजी तुम्हाला न लेख कळला न त्यावरील प्रतिक्रिया…असेच नाईलाजास्तव म्हणावे लागते आता..इथे इतरांच्या जातीचा मुद्दा खूप अन्नुलेखाने मांडला आहे..(जर तुम्हाला समजत असेल तर प्रयत्न करा मी काय म्हणतोय हे समजण्याचा)
    इतरांच्या तुलनेत हिंदूवर खूप अन्याय होतोय हे स्पष्टपणे लिहिले आहे महेंद्रजीने.
    आणी ह्याला प्रमाण काय तर ते पत्र..त्या पत्रामागचा संदर्भ काय आहे हे सौरभजी माहित आहे का तुम्हाला?(पत्रात संदर्भाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. ते काय आहे हे कोणी समजावू शकेल काय?)

    • एकच सांगावसं वाटतं की एकदा तर मला वाटलं होतं की ही कॉमेंट मी न लिहिलेल्या गोष्टीवर दिलेली आहे म्हणून डिलिट करावी .. पण शेवटी राहू दिली

     हिंदूंमधे पण गरीब लोकं आहेतच, पण त्यांना व्यवस्थित डावललं जातंय. आता हा अन्याय आहे की नाही ते ज्याचे त्याने ठरवायचे.

     राजकारण्यांना आपणच निवडून देतो, तेंव्हा त्यांना जाब विचारण्याचा अधिकार आपल्याला आहेच.
     असो.
     प्रतिक्रियेकरता आभार.

  • ही प्रतिक्रिया आणि मुद्दे निश्चितच वेगळे आहेत जे मी या पोस्ट मधे लिहिलेले नाही.

   “इतके हिंदू शिकलेत काय करता आहेत ते? कुठे आहेत ते? काय उपयोग केला त्यांनी शिक्क्षनाचा?” वगैरे.
   इतर जातींचा मुद्दा तर मी कुठेच लिहिलेला नाही.
   बऱ्याचशा वर दिलेल्या कॉमेंट्स या काही न लिहिलेल्या मुद्यांवर आहेत.
   असो
   प्रत्येकाचे विचार वेगळॆ असू शकतात. तुमच्या विचारांचा पण आदरच आहे.

 6. >>>>>>>तूम्ही हिंदू आहात?? तुम्हाला शिक्षणाचा अधिकार कशाला हवा?? बुट पॉलीश करा, रामागडी म्हणून कामं करा, गेला बाजार, भाजी विका, मासे विका, .. शिक्षण ?? छे … ते तुमच्या साठी नाही- आणि जर तरीही शिकायची इच्छा असेलच, तर पदरचे पैसे खर्च करून शिका!.>>>>>>
  ..
  एक तर तुम्ही ह्या कामांचा अपमान करताय असे चित्र उभे राहते.(माहित आहे तुमचा तसा हेतू अजिबात नाही..तरी पण..) व दुसरे तुम्ही जर माणूस शिकला नाही तर त्याला ह्याच्या शिवाय काही पर्यायच नाही असे दर्शविता आहत..जें खूप चुकीचे आहे.

  • Saurabh gedam says:

   agadi yogy lihile ahe ki jar shikale nahi tar ashi kame karavi lagatil. kay chuk ahe tyat? majhi jat kuthali te mahatvace nahi.

   majhya vadilanich mala lahan asatana ek pustak anun dile hote. amacha bap ani mi narendra jadhavanche. tyanchach adarsh theun mi MTech kele ahe.

   shikal tar vachal, nahitar bhaji vikal- agadi khare ahe he. kuthalyahi dharmatalya mulasathi he agadi barobar lagu hote

   • अहो सौरभजी..शिक्षणाचे महत्व कोणीच नाकारत नाहीये इथे…प्रत्येकाने शिकलेच पाहिजे. व तसा कायदाही आहे आपल्याकडे…

    तुमच्या बाबांनी तुम्हाला योग्य तेच पुस्तक आणून दिले..तुम्हीही हा वारसा पुढे चालू ठेवावा…

    पण म्हणून अडाणी माणसे काय फक्त भाजीच विकतात काय हो?
    धीरूभाई/हेन्री फोर्ड हे काही फार शिकले नव्हते …बिल गेट्स /स्टीव्ह जॉब्स आपले शिक्षण अर्धवट सोडूनही आज किती यशस्वी आहेत…
    महाराष्ट्रातच नाही तर जगात कितीतरी अडाणी माणसानी एखाद्या तज्ञाला लाजवतील अशा गोष्टी केल्या आहेत..

  • शिक्षणाला पर्याय नाही हे अगदी सत्य आहे आणि माझे तसे मत आहे. आयुष्यात सगळ्यात जास्त शिक्षणाला मी महत्व देतो. हे माझे मत आहे, शिक्षण न घेता मोठे होणारे लोकं पण आहेत, पण शिक्षण घेणारे जास्त यशस्वी होतात असे मला वाटते.

   माझी विधानं ही फॅक्ट्स ऑफ द लाइफ आहेत, कुठल्याही धर्माची असोत.. मुलं सगळी सारखीच, आणि शिक्षण हे मस्ट आहे.

   तरी पण जर कोणाची शिक्षण न घेता मोठं व्हायची इच्छा असेल तर नक्कीच तसा प्रयत्न करू शकतो. यावर मला काहीच म्हणायचे नाही..

   . आपले विचार थोडे वेगळे आहेत, आणि म्हणूनच आपण दोघं वेगळे आहोत नाही का?
   तुमच्याही विचारांचे स्वागतच आहे. प्रतिक्रियेकरता आभार.

 7. nayanraut says:

  मी झम्प्याच्या विचाराशी सहमत आहे. शेवटी तुम्ही हिंदू आहात हा फक्त एक जीवशात्रीय अपघात आहे. तुम्ही अमेरिकेत जल्मला असता तर ख्रिस्ती असता, पाकिस्तानात जल्मला असता तर मुस्लीम, युरोपात जल्मला असता तर नास्तिक असता…. तुमचे हिंदू असण हे फक्त तुम्ही भारतात हिंदू कुटुंबात जल्माला आल्याचा अपघात आहे…. आणि देव आणि धर्म काय हो …माणसाने माणसावर बंधने घालण्यासाठी बनविलेली एक कल्पनाच आहे…

  हिंदुना न्याय मिळत नाही, ह्यापेक्स्या सगळ्यांना समान न्याय असावा ह्याकडे तुमचा लेख असता तर आवडला असता.

 8. रोहन says:

  पुन्हा एकदा त्याचाच प्रत्यय आला.. कोणी ‘हिंदू हिंदू’ म्हणून ज़रा काही बोलले की तो झाला ‘धर्मांध’ एका फटक्यात महेंद्रदादाला बनवून टाकला की तुम्ही धर्मांध…

  काय चुक आहे ह्या लेखात???

  • अरे बापरे..रामायण वाचून झाले आणी आता हा विचारतो रामाची सीता कोण म्हणून?

   जें काही चुकीचे वाटले ते सर्व वर दिले आहे ते एकदा अवश्य वाच…रोहन मित्रां….
   आणी परत विचारू नकोस काय चूक आहे ते..

   • रोहन says:

    अरे चुकून !!! ऐवजी ??? पडले… मला काहीच चुक नाही ह्या लेखात असे म्हणायचे होते…

    असो…

  • रोहन
   हिंदूंच्या बाजूने कोणी थोडे जरी बोलायचा प्रयत्न केला की त्याला एक वेगळेच स्वरूप दिले जाते. आणि विषय एकदम भलतीकडेच वळवला जातो हे बरेचदा पहाण्यात आले आहे. असो.

 9. सचिन says:

  >>>> ह्या असल्या भिकेने किती जातींचे भले झाले आहे वा त्यांनी प्रगती केली आहे?
  असल्या भिकेने काही फरक पडत नाही…

  त्यांना नसेल फरक पडत…….
  पण या अशामुळे लायक लोकांना केवळ जातीमुळे डावलल जात याच काय ?
  आज ५० वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर सुध्दा निव्वळ मिळणाऱ्या फायद्यामुळे जर लोक परत जातीला चिटकून बसत असतील तर या सवलीतीना काय अर्थ आहे ?
  आजही निव्वळ आपल्या फायद्यासाठी राजकारणी लोकांनी ही जातीची पोळी गरम ठेवली आहे ?

 10. Nachiket says:

  वैयक्तिक पातळीवर झगडा इथे उगीच कशाला..?

  विचार मांडून आपण आपल्याला स्वत:ला एक्स्प्रेस करतोयच ना..?

  महेंद्रजींचा ब्लॉग आहे. त्यांचा हक्क असूनही मी त्यांच्या आधी म्हणतो. वैयक्तिक टीका नको अशी माझी नम्र विनंती.

  • रोहन says:

   मला ह्या लेखात कुठेही वैयक्तिक टीका दिसली नाही… लेखाचा रोख हा फक्त सध्याच्या सरकारी आणि पक्षीय धोरणांकडे आहे… ह्यात इतका वादंग माजायचे काहीच कारण नव्हते …

  • नचिकेत
   आभार.. माझ्या तर्फे सगळ्यांना विनंती केल्या बद्दल . माझ्या तर्फे पण थोडं काही ऍड करतोय खाली.

   मित्रांनो
   ब्लॉग हे फक्त मनातले विचार व्यक्त करण्याचे माध्यम आहे. बरेचदा दुसऱ्याचे विचार पटत नाहीत .

   पर्सनल अटॅक हे सोशल साईट्स वर चालतात. ब्लॉग अजून तरी या पासून अलिप्त आहे. आपण सगळे नोकरी करतो, त्यामुळे आपण ब्लॉग वर दिवसभर नसतो. सकाळचा काही वेळ आणि रात्रीचा काही वेळ. बहुतेक येणारे सगळे ओळखिचेच लोक असल्याने ब्लॉग ला कॉमेंट्सचे मॉडरेशन ठेवलेले नाही.

   कृपया कॉमेंट देतांना याची जाणिव असू द्यावी हीच नम्र विनंती.

   • आणि जर हे असेच सुरु राहिले, तर आयपी स्पॅम मधे टाकण्याचा अधिकार माझ्याकडे आहे , आणि तो मी वापरत असतो.

 11. काका प्रश्न कोण कोणाच्या बाजून बोलतोय असा अजिबात नाही.

  माझे म्हणणे इतक्या वेळा इथे मांडले तरीही परत तुम्हाला सांगावेसे वाटते ते हे की..हा विषय खूप मोठा आहे..त्याची व्याप्ती खूप अवाढव्य आहे..परिस्थितीचा व्यवस्थीत अभ्यास करून असे निर्णय घेतले जातात जें आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या आकलानाबाहेराचे असतात. फक्त एकाच दृष्टीने त्याकडे बघून चालणार नाही..इतक्या मोठ्या विषयावर लिहिताना आपण योग्य तो संदर्भ वा माहिती घेवून लिहावयास हवे होते..उगाच दुसरा कोणी काही लिहितो म्हणून नव्हे… इतकेच मला म्हणायचे होते…पण त्यावर इथे महाभारत झाले…

  असो….

  तुम्ही माझ्या कमेंट्स एडीट केल्यात जें मला नाही आवडले. डिलीट केलेल्यान्बद्दल माझे काही म्हणणे नाही..

  तो जो कोणी सौरभ होता तो एक खोटा होता हे तर आता सिद्ध झालेच आहे..प्रश्न उरला आहे त्याच्या मागच्या बोलवित्या धन्याचा…

  • तुमच्या कॉमेंट्स बरोबर तुमच्यावर अटॅक करणाऱ्या सौरभ च्या आणि अजूनही इतर दोघांच्या कॉमेंट्स डिलिट केल्या आहेत.
   आणि माझ्यावरच अटॅक करणाऱ्या कॉमेंट्स ज्या होत्या त्या तशा व्यवस्थित होत्या फक्त एखादे वाक्य पर्सनल अटॅक करणारे एडीट केले आहे. असो..

  • रोहन says:

   ‘परिस्थितीचा व्यवस्थीत अभ्यास करून’ असे निर्णय घेतले जातात जें आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या आकलानाबाहेराचे असतात. >>> हो काय… 🙂

   सौरभ होता तो एक खोटा होता हे तर आता सिद्ध झालेच आहे — ??? कोणी सिद्ध केले आणि कसे?
   आणि हो तुम्ही स्वतः खोट्या नावाने लिखाण करताय.. इतरांना कशाला दोष लावायचा??

   असो मी इथेच थांबतो… आपल्याकडे बराच मोकळा वेळ दिसतो आहे…

   • रोहन मित्रां..ह्याआधी तुला लिहिलेली माझी प्रतिक्रिया काकांनी एडीट केली.
    व इथे तूला माझी जी प्रतिक्रिया दिसत आहे तो त्यातला फक्त अर्धाच भाग आहे. त्यामुळे तुझी काहीच चूक नाहीये.

    माझ्या ओळखीबद्दल व नावाबद्दल मी स्पष्टीकरण दिलेली प्रतिक्रिया पण काकांनी डिलीट केली आहे…

    असो..तो त्यांचा पूर्ण हक्क आहे…

    मी खोट्या नावाने नाही तर टोपण नावाने लिहितो..व ते का याचे स्पष्टीकरण मी माझ्या ब्लॉगवर दिले आहे. ते तू वाचू शकतोस..
    जर तुला माझे खरे नाव, पत्ता, व्यवसाय, टेलिफोन नंबर पाहिजे असेल तर ते मी सगळे तुला इथल्या इथे देवू शकतो..
    (जें तू मागणार नाहीस याचीही मला पूर्ण खात्री आहे.)

    आपण प्रत्यक्ष बोलू (फोनवर किंवा समक्ष म्हणजे मी माझी मते व प्रतिक्रिया यांचे स्पष्टीकरणपण तुला व्यवस्थीत देवू शकेन.)

 12. Vidyadhar says:

  झंप्याभाऊ…
  एक विनंती आणि एक प्रश्न!
  विनंती – तुम्ही ब्लॉग्जवर कॉमेंट्स करण्यात वेळ वाया घालवता आहात! तुमच्यासारख्यांची देशाला गरज आहे…पुढे व्हा….देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे तुमच्यात!
  प्रश्न – तुमच्या ब्लॉगच्या हिट्स कितीनं वाढल्या?

  • हाहाहा
   अहो देशाला माझीच नव्हे तर आपल्या प्रत्येकाचीच गरज आहे.
   नेतृत्वाची क्षमता …तर तीही निश्चितच आहे…..

   मार खाऊ एकाच ठिकाणी..ते म्हणजे राजकारणात…ते आपल्या आवाक्याबाहेरचे क्षेत्र आहे..तिथे गेंड्याची कातडी असलेली माणसे लागतात…आम्ही किती संवेदनशील ते तुम्ही बघताच…

   राहिला प्रश्न ब्लॉगच्या हिटस् चा…तर जास्त नाहीत अजून..खाली काऊटर लावलाय..बघा अजून हजाराच्या आतच आहेत…

 13. samir deshpande says:

  Dear mahendra ji,

  Ha lekh eakdam eakangi vatala. Hindu dharma peksha Bharatiya pan jast mahatvache aahe. हिंदुस्थानचा भारत कधी झाला ते समजलेच नाही. he vidhan pan vastusthitila dharun nahi.
  Bharatache nav kadhihee hindusthan navate. Hindustan he nav Mughal / Arab loka Sindhu nadicha khoryat aslelya vasahati vishayi mhanyache.
  Ani Jase muslim samajala jast soyi suvidha dene chukiche aahe titkech Dharma nirpeksha savindhan aslelya deshala hindustan mhanun hindu dominance nirman karnyache swapna pahane chukiche aahe. sagalyana saman nyay asla pahije yat vad nahi.

  • मनःपुर्वक आभार..
   कदाचित भारताचा इंडीया म्हंट्लं तर चालेल..
   लिहिण्याच्या ओघात लिहिले गेले.
   महाराजांच्या हिंदूराष्ट्र संकल्पनेत सगळेच धर्म सारखे होते. असा हिंदुपदपातशाही चा अर्थ मला अभिप्रेत होता.

 14. हिंदू म्हणुन जगणे सध्या अवघड केले आहे ते या राजकारण्यांनीच. आपण वेगवेगळ्या समाजाला आजपर्यंत आरक्षणे दिलीत यात सर्वात जास्त भ्रष्टाचार झालेला आहे. महेंद्र यात मला तर एक नविन कुरण तयार करण्यात आल्याचाच वास येतोय.
  आरक्षणावर मला तर वाटते एखाद्याला कधि पर्यंत आरक्षण देणार दोन पिढ्या आरक्षणाचा फायदा घेतल्यावर तिसर्‍या पिढीला पण तो द्यायला नको.
  तसेच अल्पसंख्यांकांचे लाड दिवसेंदिवस वाढत चालले आहेत यात संशय नाही.
  आजचे आपले पोस्ट मलातर फारच आवडले.

  दिनेश.

  • दिनेश
   मला फक्त दोन गोष्टी म्हणायच्या होत्या:-
   १) हिंदूपदपातशाही स्थापन करण्याचे स्वपन शिवाजी महाराजांचे होते. ( ज्या मधे सर्व धर्म समभाव होता अशी )
   २) हे जे काही सुरु आहे ते योग्य नाही. बस्स!

  • sagar says:

   तसेच अल्पसंख्यांकांचे लाड दिवसेंदिवस वाढत चालले आहेत यात संशय नाही. +++ 1

 15. काका, मला लेख पूर्ण पटला..
  कुठल्याही जातीच्या/धर्माच्या आधारावर दिलं जाणारं आरक्षण, सोयी सवलती या एक दिवस देशाला खड्ड्यात घालणार हे नक्की.

  आरक्षणाच्या बाजूने तावातावाने बोलणाऱ्या कित्येकांना आरक्षण हे स्वातंत्र्यानंतर फक्त पहिली वीस वर्षंच असावं असं खुद्द बाबासाहेबांनी लिहून ठेवलं आहे याची माहिती नसते. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.

  बाकी विद्याधर + १

  चालूद्या..

  • हेरंब
   हिंदू म्हणजे शेळ्या, कुणी कसंही हाका.. चालतंय. त्याच मुळे हिंदूना गृहित धरलं जातं. इथे पण ह्या पोस्टला ओपनली सपोर्ट करण्याचे धाडस फारच कमी लोकांनी दाखवलंय.

   • sagar says:

    काका पोस्ट आवडली..ब्लॉग आहेच आपल्या मनातलं लिहिण्या साठी ….

 16. Mrunal says:

  ज्याच्यात दम असतो तो आपली मर्दुमकी गाजविल्याशिवाय राहत नाही. ज्याला खरोखर शिकायचे आहे तो शिकल्याशिवाय राहत नाही….आणी नाही शिकला तरी त्याचे काही अडत नाही. तो प्रगती करतोच

  हेच हिंदू सोडून इतर लोकांनाहि लागू झाले पाहिजे असे नाही वाटत?
  आणि पैसे/आरक्षण न देता…..जर समाजसुधारणेला उत्तेजन दिले तर बरे होईल. हे समाज सुधारले तर भारत नक्कीच प्रगत आणि शांत होईल ह्यात काहीच शंका नाही.

  एक छोटेसे उदाहरण आहे बघा पटते का. जेंव्हा महात्मा फुल्यांनी मुलींसाठी शाळा काढली तेंव्हा सुधारक पालकांनी (ज्यांना समाजाविरुद्ध जाऊन आपल्या मुलींना शिकवायची इच्छा होती) पैसे आणि आरक्षण न मागता मुलींना शाळेत शिकावयास पाठवले. हळहळू समाजाचे मत पालटले. असे महात्मा फुले आणि समाजाला विरोध करून मुलीना शाळेत पाठविणारे पालक जोपर्यंत तयार होत नाहीत तोपर्यंत कितीही पैसे वाटा आणि आरक्षणे द्या……………….परिस्थिती बदलणार नाही.

  • मृणाल,
   केवळ या गोष्टीबद्दल अवेअरनेस तयार व्हावा एवढीच इच्छा होती. ती पुर्ण झाली.. आभार.

 17. pratal says:

  kaka sachhar samiticha ahwal saglyat khatarnak yachmule he jhaley.
  mage ek lekh lihila hota yavar
  http://pratal.wordpress.com/2010/02/02/सच्चर-समितीचा-अहवाल/
  ekdumach bhayanak aahe he sagale

 18. हेमंत आठल्ये says:

  भारत म्हणा, हिंदुस्तान म्हणा किंवा इंडिया. हा हिंदूंचा देश आहे. इथे हिंदू संस्कृती आहे. जर खोटे वाटत असेल तर मला या देशातील एका नदीचे नाव असे सांगा की जे हिंदू नाही. दुसरी गोष्ट अशी की, महेंद्रजींची मते अगदी योग्य आहे. हिंदू शब्द उच्चारला तर इतर धर्माच्या विरोधात समजायचे काहीच कारण नाही. देश हिंदूंचा यावर राजकारण्यांना आकस आहेत. पण राजकारणी म्हणजे सर्वच नाहीत. आणि राजकारणावर मुळात चर्चा करून काय फायदा? आज ते असे आहेत उद्या बदलतीलही. बघा, हिंदू लोकांवर अन्याय होतो आहे, हे जरी मान्य करीत नसाल तरी वस्तुस्थिती आहे. राजकारण सोडा. हिंदू आपला धर्म आहे. हा देश हिंदूंचा आहे. आता कोणी चिडायचे त्यांनी चिडा! पण सत्य हेच आहे..

  • samir deshpande says:

   Dear hemantji,

   Tumhi mhatalyane Desh Hinduncha hot nahi. Apala desh DHARMA NIRAPEKSH aahe. Nadynachee nave hindunchee aslyane kay farak padato?
   देश हिंदूंचा आहे. आता कोणी चिडायचे त्यांनी चिडा! पण सत्य हेच आहे .. Eakach gostha varnvar sangitalyane tee satya hot nahi.
   Aani mala kharach manya aahe kee aatta sadhya Rajkarnat Muslimanchee sarbarai chalu aahe te. pan tyacha uttar HE HINDU RASHTRA aahe he hou shkat nahi. Rajkaran khup ghanerade aahe. kiman samajkaran tari fakta eaka community sathi asu naye. na hindu na musalman

  • हा देश हिंदूंचा होता, आहे व राहिल पण हिंदूनी आपली पद्धत बदलली तरच. आज बरेच हिंदू स्वत:ला हिंदू म्हणायला घाबरतात व त्या भिती मूळेच धर्मनिरपेक्ष म्हणवून घेतात, ज्यामूळे हिंदूच कमजोर होत आहेत.
   आपण सर्वांनीच हिंदू व्होट बॅंक तयार करायला हवी तरच हे राजकारणी आपल्या भावना पायदळी तुडवणार नाहीत. अन्यथा काही खर नाही.
   आज महेंद्रने या विषयाला वाचा फोडून एक चांगले काम केले आहे.

   • दिनेश
    आभार.. एकता नसल्याने असे होते. सरकारला माहिती आहे की आपण काहीही केले तरी चालतं, म्हणून असे निर्णय घेतले जातात. हा निर्णय फक्त एक झलक आहे, असे अनेक निर्णय असातिल जे आपल्याला माहिती नाहीत.

   • samir deshpande says:

    Dinesh,
    hindu ahe sangayala ghabartat mhanun Dharmanirapeksha aahe asa mhantat? who told you this? ani tumhi Hindu mhanyala ghabrat nahi tya mule deshachee ghatana badalnar aahe ka? if you want this country to be Hindu country why dont you challange it in court? unless and untill its not legally Hindu country as per Constitution of India koni kitihi aakash patal eak kela tari tyane kahi farak padnar nahi.

    • Yes I am PROUD Hindu. I dont care what others will conclude from this statement. At the same time I wish to tell you the so called SECULARISM has spoiled this country. Today due to such a policy no one is happy in HINDUSTHAN.
     Please note that you can’t pray your GOD in Muslim country you have to attend the namaj sessions during Ramzan etc.
     All communities are safe in HINDUSTHAN because Hindus are tolerating all such activities of others.
     I doubt you are really DESHPANDE and a Hindu.

     • samir deshpande says:

      First of all sorry to Mahendraji for posting so many comments on 1 post.

      Ani Diensh,
      Please note that you can’t pray your GOD in Muslim country …… You are really confused here.if it is Muslim country by Constitution then its their problem what they will allow in that country.and i cant and i wont advocate for any othere country… like how they treat othere relegions in their country.and if you doubt my being Deshpande or Hindu plz give me your contact details i will mail my janmakundali to you. you can check my gotra ,nadi etc in that. if you wish i can tell you my 2nd name which brahmins take while Maunja ceromany.only because i dont share any views it dont make me less hindu than you……

  • sagar says:

   “हिंदू आपला धर्म आहे. हा देश हिंदूंचा आहे. आता कोणी चिडायचे त्यांनी चिडा! पण सत्य हेच आहे..” हेमंत दा अगदी पटले….+1

 19. pratal says:

  झंप्या ,मुस्लिमांमध्ये सरासरी शिक्षण हे हिंदू दलितांपेक्षा जास्त आहे .
  व मुस्लिमांचे नुकसान अति शिक्षण घेवूनही झालेले आहे .
  संसदेवर हल्ला करणारा अफजल गुरु हा इन्जीनीअर आहे
  ओसामा बिन लादेन हाही इन्जीनीअरच आहे त्यामुळे शिक्षणामुळे मुस्लिमांचा दर्जा सुधारेल हा प्रचंड गैरसमज आहे .
  मुस्लीम धर्मांधपणा सोडून विज्ञान्वादाच्या जितके जवळ जातील तितका त्यांचा विकास होईल .व ते स्वतः स्वतःचा विकास करत नाहीत तर हि जवाबदारी सरकारची नाही .तरी त्यांना इतक्या सुविधा पुरविल्या जातात .मुस्लिमांचे जेवढे लाड भारतात होतात तेवढे इतर कोठेही होत नाहीत .बाबासाहेब आंबेडकर जिनांना खडसावून म्हणाले होते “मुस्लीम अल्पसंख्यांक आहे असा भारत एकमेव देश नाही हे जिनांना माहित नाही कि काय .स्वतंत्र हक्क कदापि मिळणार नाहीत “.
  सर्वात महत्वाचे म्हणजे भारतात हिंदू बहुसंख्य आहे हा काही हिंदूंचा दोष नाही !

 20. महेश says:

  जातीच आरक्षण नसावे ,आपले प्रक्ष्न फार आहे, जातीय तेढा निर्माण होऊ शाकोतो हिंदुना गृहीत धरूनच असे कार्यक्रम राबिवले जातात,तसे होता काम नये काही राजकाराण्य्नी स्वताच्या स्वार्थासाठी पाउल उचलेले आहे,भेदभाव करून देशाचे मोठे नुकसान होईल , परिस्थिती सुधारणा ऐवजी बिकट प्रश्न निर्माण होतील ,

  • महेश
   हा अतिशय संवेदनशिल मुद्दा होता, म्हणुन लिहिला नाही. इथे फक्त हिंदू धर्माला दिलेल्या सपत्न वागणूकीबद्दलच लिहिलं तर इतका गदारोळ झाला , जातिवर तर …. नकोच.. ते.

   • samir deshpande says:

    Dear Mahendraji,

    Aarakshan mag te jaativarun aso kinva Dharma varun, te kiti divas chalu thevayacha tyala limit havi.
    Nahi tar Hinduna Muslimani aapala hakka hirawun ghetala asa vatnar ani Savarna hinduna tyach nyayane Dalitani Apalya Hakkawar gada aanali ase vatnar.
    you cant use to diffrent alltogether to look at reservation system.it gonna benifit few and will be at loss for most.

    • samir deshpande says:

     last line ***you cant use two diffrent views alltogether to look at reservation system.it gonna benifit few and will be at loss for most.

 21. Amolkumar says:

  आजकाल धर्मनिरपेक्ष पक्षच जातीचे राजकारण करतात.
  लाज वाटते ह्या बेगडी धर्मनिरपेक्ष राजकर्त्यांची.

 22. काही गोष्टी इथे आलेल्या सगळ्या पाहुण्यांना मी एकत्र व एकदम सांगतो..

  १. मी आरक्षणाचे समर्थन कधीही केलेले नाही व करीत नाही.
  २. माझा विरोध हिंदू इतर कोणत्याही जाती धर्माला नाही.
  ३. येथे मला सरकारची बाजूही मांडायची नव्हती व नाही.(मला त्याची काही फी मिळणार नाही)
  ४. मला जें काही पटले नाही ते मी येथे मांडले.
  ५. तुम्हाला जें काही माझे मुद्दे पटले नसतील तर त्यावर माझ्याशी चर्चा व्हावी..
  ६. जर खरोखर उपयुक्त चर्चा करावयाची असेल तर आधी कृपया या विषयाचा थोडा अभ्यास करावा( हे माझ्यासाठीही आहे.)
  ७. भावनांनी नव्हे तर विचारपूर्वक प्रतिक्रिया द्याव्यात
  ७. येथे मी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्याने जर कोणी दुखावले असेल तर मला त्याचा खेद वाटतो..तसा हेतू ठेवून मी काहीही लिहिलेले नाही.

  ८. सर्वात महत्वाचे ज्यांना माझ्या मोकळ्या वेळेची काळजी वाटते त्यांच्यासाठी….त्यांनी उगाच माझ्या मोकळ्या वेळेची काळजी करण्यात आपला मौल्यवान वेळ वाया घालवू नये.

 23. ngadre says:

  Rohan,

  Vyaktigat / vaiyaktik teeka nako ashee vinanti comments denaryaana hoti. Mahendrajina arthaatach navhati.

  Mala vatate Mahendrajina te lakshaat alay.

 24. तर ही तेव्हाची गोष्ट आहे, जेव्हा हिंदु व मुस्लिम धर्मात वैर नव्हते. हिंदुंच्या राज्यात मुस्लिम व मुस्लिमांच्या राज्यात हिंदु राहत होते. असाच एक हिंदु मनुष्य मुस्लिम राजवटीच्या प्रदेशात राहत होता. कष्ट करून पोट भरणारा तो एक अतिसामान्य तरूण होता.
  तो त्याच्या कामानिमित्त राजवाड्यासमोरील रस्त्यावरून जात असताना राजकन्या त्याला सज्जातून पाहत असे. असे पाहणे अनेकदा झाल्यावर तिला असे जाणवले की तिला तो आवडू लागला आहे. तिने आपल्या वडिलांना म्हणजेच त्या प्रदेशाच्या राजाला आपण त्या तरूणाशी विवाह करण्याची इच्छा बाळगून असल्याचे सांगितले.
  राजाने अर्थातच या गोष्टीला संमती दिली नाही कारण हा तरूण एक सामान्य नागरीक होता. (धर्माचा मुद्दा राजाने मांडला नाही कारण राजाला त्याचा धर्मच माहित नव्हता. परंतू रस्त्यावरून पायी चालत जाणारा म्हणजे सामान्य व आपल्या तोलामोलाचा नक्कीच नाही हे त्याला सहज कळले)

  परंतू काही दिवसातच राजाच्या लक्षात आले की राजकन्येने त्या तरूणाचा ध्यास घेतला आहे व तिचे सदर तरूणाशी लग्न लावले नाही तर ती सदैव दु:ख करीत राहील. शेवटी राजा एकदाचा तयार झाला. नाहीतरी त्याला ती एकुलती एक कन्या होती. तिच्या सुखाकरिता एवढी तडजोड करायला तो तयार झाला. त्याने सेवकांना सांगून त्या तरूणास बोलावून घेतले.
  त्या तरूणाला राजाने राजकन्येची इच्छा बोलून दाखविली व तिच्या इच्छेप्रमाणे तिच्याशी विवाह करण्यास सांगितले.
  त्या तरूणाला एवढे ठाऊक होते की या राजाचा आणि आपला धर्म एक नाही. त्याने या प्रस्तावास स्पष्ट नकार दिला. राजाला हा सरळ सरळ स्वत:चा अपमान वाटला. त्याचप्रमाणे राजकन्या कष्टी होईल याचीही कल्पना आली.
  राजाने त्या तरूणाला ’राजकन्येशी विवाह कर’ असा हुकूम दिला अन्यथा सेवकांकरवी त्याचे प्राण घेण्याची धमकी दिली.
  ही धमकी ऐकताच इतका वेळ आतल्या दालनात असलेली राजकन्या धावत दरबारात आली व तिने राजाला सांगितले की या तरूणावर कोणतीही जबरद्स्ती करू नये तो स्वेच्छेने तयार असेल तरच हा विवाह आयोजित करावा.

  राजकन्येने दरबारात प्रवेश केला तसे एकदम चित्रच पालटले. मुख्य म्हणजे त्या तरूणाने तोपर्यंत कधी राजकन्येला पाहिलेच नव्हते. त्यामुळे राजकन्येचे प्रेम तसे पाहता एकतर्फीच होते. परंतु राजकन्येला त्याने दरबारात त्यावेळी पाहिले आणि तिचे अप्रतिम सौंदर्य पाहून तो ही तिच्या प्रेमातच पडला. आता काहीही करून हिच्याशी आपले लग्न झालेच पाहिजे असे त्यालाही वाटून गेले.
  मग त्याने आपला लग्नासाठी आधी व्यक्त केलेला ठाम नकार रद्द करीत ’राजकन्या जर हिंदु धर्मात यायला तयार असेल तर मी लग्न करीन’ असा सशर्त होकार दिला.
  राजाने ह्या अटीला संमती दिली. मग तो तरूण त्या राजकन्येला घेऊन स्थानिक हिंदु पंडिताकडे गेला. त्या पंडिताने राजकन्या म्लेंच्छ असल्याने तिला शुद्ध करून घ्यावे लागेल असे सांगितले. सदर शुद्धीकरण करण्यासाठी यज्ञाचे आयोजन व त्याकरिता आहुती / दक्षिणा आदींची मोठी मागणी केली. ती अर्थातच पुरविण्यात आली. त्यानंतर अनेक धार्मिक विधी / पुजा अर्चा करण्यात आल्या. या सगळ्या नंतर ही पुन्हा मोठे ग्रंथ / पोथ्या चाळून संदर्भ शोधण्यात आले आणि स्थानिक पातळीवर त्या राजकन्येचे शुद्धीकरण शक्य नसून तिला यापेक्षा मोठ्या धर्मपीठा समोर जाण्यास सांगण्यात आले.

  पुन्हा एक पातळी वर च्या धर्मपीठात ही याच गोष्टींची पुनरावृत्ती घडली. फक्त यावेळी आहुती / दक्षिणा यांच्या मागणीत वाढ झाली. शिवाय धर्मग्रंथ / पोथ्या यांच्या वाचनाकरिता पंडितांची संख्या जास्त होती त्यामुळे अर्थातच वेळही जास्त खर्च झाला. पण निष्कर्ष शेवटी तोच. राजकन्या शुद्ध होऊ शकत नाही
  (जरा आठवून पाहिल्यास आपल्या असे लक्षात ज्ञानेश्वरादी भावंडे – संन्याशाची मुले म्हणून अशुद्ध घोषित करण्यात आली व पुढे त्यांना शुद्ध करण्याच्या प्रक्रियेत अशाच काही गोष्टी घडल्या होत्या. असो.)
  असे करता करता शेवटी सर्वोच्च अशा काशीक्षेत्री तो तरूण त्या राजकन्येला घेऊन पोचला. सदर वाटचाली दरम्यान ती राजकन्या त्या तरूणाची मनोभावे सेवा करीत होती या सर्व काळात त्याला तिच्यातील सौंदर्याशिवाय असण्यार्‍या इतर गुणांमुळेही ती अतिशय आवडू लागली. तिच्याशिवायआपण जगू शकणार नाही याची ही त्याला खात्री झालीच. काशीक्षेत्री काय फैसला होणार याचा अंदाज त्या तरूणाला आलाच होता. अर्थात अपेक्षेप्रमाणे तिथे देखील नकार घंटाच वाजली.
  त्यानंतर ती राजकन्या व तो तरूण पुन्हा राज्यात आले व राजाला सर्व वृत्तांत कथन केला. राजा व राजकन्या या दोघांनी ही परिस्थिती पुढे नमते घेत विवाहाचा नाद सोडून दिला व त्या तरूणास निरोप देण्याची तयारी केली.

  स्त्रिच्या प्रेमात मूलत:च एक त्यागाची भावना असते. त्यामुळे आपणाला आपले प्रेम मिळत नसल्यास त्या ते वास्तव चटकन स्वीकारतात. याउलट पुरूषांची लालसा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यांचे प्रेम हे ’हक्कप्रधान’ असते. ते मागणी करीत राहते.
  इथे ही असेच घडले. तो तरूण च आता राजकन्येच्या प्रेमात पडला होता. रिकाम्या हातांनी परतणे त्याला शक्यच नव्हते. त्याने सरळ राजाला विचारले, ” ही हिंदु होऊ शकत नसली तरी काय झाले? मी मुसलमान व्हायला तयार आहे. तुम्ही मला तुमच्या धर्मात घेऊ शकाल काय?”
  राजाने ह्या गोष्टीला अत्यंत आनंदाने होकार दिला. मुस्लीम धर्मात प्रवेश करणे अतिशय सुलभ असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे मग तो तरूण मुस्लीम बनला आणि त्याने राजकन्येशी विवाह केला. त्यांचा संसार अतिशय सुखाचा झाला.
  कालांतराने राजाने त्याचे राज्य आपल्या जावयाच्या सुपूर्त केले. आता हा नवीन राजा म्हणजे आपला कथानायक पुर्वाश्रमीचा हिंदु तरूण.. आणि याच्या प्रेमकहाणीतील त्यावेळचे खलनायक कोण तर हिंदुच्या धर्मपीठातील धर्म मार्तंड व तथाकथित आधिकारी व्यक्ति … ज्यांनी आहुती / दक्षिणा वसूल करण्याखेरीज कुठलीही सश्रध्द क्रिया न करता आपल्या अधिकारात एका परधर्मीय निष्पाप तरूणीला हिंदू धर्मात येण्यास विनाकारण रोखून धरले होते.
  तेव्हा या नवीन राजाने राज्यावर येताच आपल्या सैनिकांना हुकुम सोडला ….
  “हिंदूंची देवळे तोडा.. लुटा… तेथील धर्मरक्षकांची कत्तल करा…”

  त्यांनतर त्याने त्याच्या वारसांनाही हीच शिकवण दिली. आणि यानंतरच हिंद आणि मुसलमान या दोन धर्मात वैर सुरू झाले.

  बाटगा जास्त कडवा असतो ही म्हण ही या घटनेनंतरच उदयास आली.
  (कथा समाप्त)

  विशेष सूचना :- सदर कथा मी रचलेली / लिहिलेली नाही. कोणाच्या भावना यामुळे दुखावल्यास मी जबाबदार नाही. त्याचप्रमाणे ही कथा कुठल्याही मुसलमान अथवा अन्य धर्मीय व्यक्तिने सांगितली नसून स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर यांनीच त्यांच्या एका भाषणात सांगितली होती.
  सदर भाषणाचा वृत्तांत व ही कथा “शतपैलू सावरकर’ या पुस्तकात वाचण्यास मिळेल. ही कथा ज्या काळात घडली त्या काळात मी जन्मलो नसल्याने तिच्या सत्य / असत्यते विषयी मी काहीच भाष्य करू शकत नाही परंतू ती कथा त्या पुस्तकात असल्याचे व मी शाळेत असताना ती वाचल्याचे मला आठवते. तरी याबाबत मला कुठल्याही प्रकारच्या वादात ओढू नये ही नम्र विनंती.

  CHETAN SUBHASH GUGALE
  Plot # 86, Sector # 25, Nigdi,
  Pimpri – Chinchwad New Town,
  PUNE – 411 044. MAHARASHTRA, INDIA
  Telephone (Res.) +912027650728 / +919921337197
  Mobile (Direct) +919552077615
  Read:- http://www.blogger.com/profile/11964142182953111712

 25. pratal says:

  या सगळ्या चर्चेचे तात्पर्य महेंद्र काकांनी पहिल्याच वाक्यात लिहिले आहे .
  “भगवा रंग… झाकोळला गेलाय”
  काका एखादे छानसे व या लेखाची समाप्ती करणारे व सकारात्मक दिशा देणारे वाक्य लिहून लेख व पुढील उत्तरे थांबवा .
  सावरकर सगळ्या भांडणार्या हिंदुना म्हणतात
  आहो “तुम्ही आम्ही सकल हिंदू |बंधुबंधु
  तो महादेवजी पिता आपुला चला त्या वंदू ||

  उभायांनी दोष उभयांचे |खोडावे
  द्वेशासी दृष्ट रूढासी|सोडावे
  सख्यास आईच्यासाठी |जोडावे
  या झेंड्याखाली पुर्वाजान्चीया एकाची नांदू||

 26. thanthanpal says:

  हिंदू धर्मियांना सुद्धा सवलती आहेत . विविध जातींना असलेले ४०%-५०%आरक्षण हे हिंदुधार्मियानच आहे.हे लक्षात घ्या. अनेक जातींचा राहणीमानाचा दर्जा शिक्षणा मुळे उंचावला आहे.हे नाकारता येत नाही. हळूहळू शासनाने आर्थिक मापदंडावर सवलती सुरु केल्यास आजच्या असंतोषावर तोडगा निघेल. त्याच बरोबर ज्यांच्यावर २०००-२५०० वर्षा पासून अन्याय केला त्यांना सवलती दिल्या तर कांही बिघडत नाही. शिक्षण सवलतीचा दूरगामी चांगलाच परिणाम होणार आहे. शिक्षणा मुळे मुस्लीम समाजात सुद्धा कुटुंब लहान ठेवण्यास सुरुवात झाली आहे. पण लक्षात कोन घेतो . आपल्यावरील अन्याय दिसतो पण २५०० वर्षा पासून आपण केलेला अन्याय दिसत नाही हीच शोकांतीका आहे.

 27. poojaxyz says:

  frankly sangayche zale tar, ha blog mala avadala naahi. tumchya kadun hi apeksha navti!
  hindustancha bharat zala ya vidhanala arth kay?ya deshat phqt hidnunich raahave ka?itar dharmiyanna sthaan naahi? deshacha zenda nusta bhagavaach asava ka ,tiranga asla mahnun kay zale?
  comment avadli naslyas sorry!vaatlyaas delete kara:)

 28. Rajeev says:

  बाकी, विवीध मतमतांतरे वाचून मजा आली,
  भारतीय लोक आपआप सात लढून (वैचारीक) ईगो साठी भांडणार …आणी उद्या हा मुद्दा वीसरणार ही
  दगडा वरची रेघ…
  त्या मुळ मुद्याची तड लावाय पर्यंत आमच्यात चीकाटी आणी मानसीकता नाही….हेच अंतीम सत्य…
  …स्वामी रत्नानंद
  कोणाला राग आला तर आधी ” आयडीयाज आर डेंजरस ” हे राजू परुळेकरांचे पुस्तक वाचून आत्मप रीक्शण करावे

 29. ngadre says:

  Mahendraji. Majhya Kho che kaay? Nusate basala ahat vatate tyavar.

  • नचिकेत
   ते फार अवघड आहे.. लिहितो लवकरच. खरं सांगायचं तर बराच प्रयत्न केला पण काय लिहावं हेच सुचत नाही 😦

 30. ngadre says:

  Aho..tumachya bhannat vidamban shailit charoli vagaire madhe kara ki..tumchya kavita mee vachlya ahet.

  • आज करतो रात्री . तसाही अहमदाबादला एक्टाच बसलोय रुमवर – जमवायचा प्रयत्न करतो आज काहीतरी.

 31. महेंद्रजी (काका) दोन दिवस इथे झालेल्या गदारोळावर व माझ्या ब्लॉगविश्वाच्या छोट्याशा प्रवासावर मी एक पोस्ट लिहिली आहे.. ती वाचून कदाचित मी तुम्हाला उद्देशून काही बोलत आहे असा तुमचा ग्रह होवू शकतो…तर तशी चुकीची समजूत तुम्ही करून घेणार नाही ही एक रास्त अपेक्षा करतो.

  तुम्ही तेथे जर तुमची प्रतिक्रिया दिलीत तर मला खूपच आनंद होईल हे ही आधीच कबूल करतो.

  पोस्टची लिंक खाली देत आहे.
  http://wp.me/p10n1c-5h

 32. काका तुमचा मेल वाचला.

  एकच गोष्ट सांगतो खूप आतून……

  आपला दोघांचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन भिन्न असू शकतो, आहे व राहीलही…

  पण एक मात्र नक्की तुम्ही माझे मन जिंकले…..
  एखाद्याचे मन जिंकणे ही खूप सोपी असलेली गोष्टच आपल्याला प्रत्यक्ष करायला मात्र फार अवघड जाते.
  ती तुम्ही मोठ्या संयमाने व मनाने अगदी सहज केलीत.

  आजपासून तुम्ही माझ्यासाठी खरोखरचे काका झालात.
  खूप खूप खूप धन्यवाद…

 33. lekhasah sagale abhipray vachale.valavalkaranacha lekhapan vachala.
  mati khuntali.
  phar characha jhadaliya ithe.
  aso,
  maunam sarvartha sadhanam.

 34. dhammavir says:

  mala ase vatate , ki tumhi hindu -hindu kartat,he swarakshanarth thik aahe , pan tyanchahi kahi vichar kara…….ithe lokshahi aahe ……ithe sagalyanna sobat gheunach aaplyala pudhe jayache aahe , kahi tharavik communty ,cast,lokanna facility dili jate yacha arth asa nahi ki te aabhalatun tapakale nahit, ithe tyanchi quatity,condition aani tyancha vikas lakshat gheta ,tyanna asha suvidha dyayalach havyat.

  tumhi chatrapati shivaji maharaj yanche udaharan detat, tumhi jara sangta ka tyanchya sainya madhe kon konte lok kon kontya huddyavar kam karat hote ? tyamadhe sreeya hi aalyach….

  ankhi ek vishesh gosht, saddhyachya rajkarnyanvishayi bolaychech tar te aapla swarth baghanarach…..kaay ? baki kahi jast lihit nahi ,
  chuk bhul ksamaswa……

  • इथे भारतातल्या सगळ्या धर्मांना स्कॉलरशप देण्याचे सुरु आहे – फक्त हिंदूंना नाही.. का बरं? हिंदूंच्या मधे दरिद्र रेषेखाली लोकं नाहीत का? सगळेच हिंदू खूप श्रिमंत आहेत का?

 35. महेंद्रजी तुमच्या हया लेखाशी पुर्ण सहमत.धर्म काय किंवा जात काय त्यामुळे कोणाला फ़ायदे देणे खरच पटण्यासारखे नाही याउलट आर्थिक परिस्थीती बघुनच हे फ़ायदे दिले जावेत….

 36. हे तर निर्विवाद सत्य आहे की हे ‘हिंदुराष्ट्र’ च आहे. कोणीही कितीही नाकारलं तरी येथली मूल्य, परंपरा, संस्कृती हे सर्व हिंदुत्वाशिवाय अकल्पनीय आहे. हिंदुत्व हा मूलाधार आहे. लोकशाही आहे आणि ती टिकून आहे कारण हिंदू बहुसंख्य आहेत. हिंदू जर अल्पसंख्य झाले तर त्या लोकशाहीचं काय होईल हे सांगायला भविष्यवेत्त्याची गरज नाही.
  त्यामुळे जगाला शांती आणि मनुष्यत्व यांचा अनुभव घ्यायचा असेल तर हिंदुत्वाशिवाय पर्याय नाही.
  तुम्ही यावर लेख लिहून पुन्हा चर्चेला वाव करून दिलात त्याबद्दल धन्यवाद.
  असाच हिंदुत्वाचा उद्घोष आपण करायला हवा.
  सत्य सांगण्यात कसली आलीये भीती.
  —विक्रम नरेंद्र वालावलकर. (www.vikramwalawalkar.blogspot.com)

 37. महाराज कोणाला कळलेच कुठे !!!
  त्यांच्या राज्यात त्यांनी नाही भेदभाव केले कुठल्या धर्मात मग आपण का करतो ???
  हिंदवी राज्य म्हणजे रामराज्य, सर्व धर्मियांना सुखासमाधानाने राहता यावे अशे राज्य ….. एखाद्या धर्म व्यतिरिक्त असणारे राज्य नव्हे किवा एखाद्या धर्माने दुसऱ्यावर कुरघोडी करून मिळवलेले राज्य नव्हे. महाराजांनी कधी असं भेदभाव केलेलाच नाही ……. त्यांनी परतवून लावले पर प्रान्तियांचे आपल्या भूमीवर होणारे आक्रमण (मग ती मोगलाई असो, आदिलशाही असो, कुतुबशाही असो कि इंग्रज असो).
  आम्हाला देखील अभिप्रेत आहे सर्व धर्माने सुखसमाधानाने राहता येण्यासारखा महाराष्ट्र !!!

  • अहो राजांनी ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन केले. हिंदवी म्हणजे हिंदूंचे!

   • विक्रम साहेब,
    तुमच्या ह्या हिंदू राज्यात, इतर धर्मियांनी काय करायचे? तुम्ही त्यांचे शिरकाण करणार / हाकलून लावणार कि त्यांनी तुमचे दास म्हणून रहायचे?? एकदा कळू द्या आम्हाला देखील ….. राजांनी हिंदू पद पातशाही निर्माण केल्यावर ह्यातील कुठलाही मार्ग अवलंबला नव्हता, आपल्याला काय करायचय?
    आणि कोण म्हणत कि हिंदुंच राज्य नाही? भारतात अजूनही बहुसंख्येने हिंदू राहतात आणि राहणार आणि तेच राज्य करणार. आता देखील बहुसंख्येने हिंदूच राज्यावर आहेत. आता आर एस एस म्हणजे हिंदू नव्हे आणि बी जे पी म्हणजे हिंदू नव्हे, नाहीतर तुम्ही म्हणाल आम्हीच फक्त हिंदू आणि जेव्हा आमच राज्य येईल तेव्हा खऱ्या अर्थाने हिंदुंच राज्य येईल.
    आपला

    विनोद शिरसाठ
    http://mi-maharashtracha-maharashtra-maza.blogspot.com/

 38. swapna says:

  asa nahi ka karta yenar…
  pratyekacha dharma tyala priy asto.. aani aaplyvar anyay zalay asa saglyanach vatat asta. pan jar me maza dharm badalala tar mazya sharirat, manat, vagnyat kai badal honar? me tashich vagnar jasa mala mazya gharat shikvalay. aani me kontya gharat janmale he mazya hatat navatch.
  jaganyasathi dharmachi aavshykata aste ka? ann, vastra, nivara hya garaja dharm purvto ka? pan manasani asha anek goshti nirman kelyat jyanchi aadimanvala jagtana kadhi garaj bhasalich nasel. pan arthat duniya badalate.
  dharma asava dharmachya jagi, shradhhechya jagi. man shant karnya sathich tar shevati aapan dev- dharma yancha aadhar gheto na.
  mag shikshan, nokari asha JEEVANAVASHYAK goshtit dharmala aanu naye. karan hya goshti paisa milvayla lagtat aani paisa ha shevati mulbhut garja purna karto.
  tyamule mala asa vatat, paisa milvanyachya sandhi sathi dharma hi hatat nasleli goshta praman manu naye tar arthik sthiti grahya dharavi.
  karan shevati GARIB HINDU BRAHMIN sudhha aahetch aani SHRIMANT ALPASANKHYAK aahetch.
  aapn jar hya saglyala fata deun, keval aarthik sthiti aani gunvatta hyana pradhanya dila tar?
  mag ha aaplya var anyay hotoy ha complex mage padnar nahi ka?
  karan baki kahihi mhana ho, potachi bhuk hi dharmani bhagat nahi.
  dev devachya jagi aahe… aani bhuk bhukechya…
  bharlya poti he sagla bolna soppa asta nahi ka?
  mag je upashi aahet tyana sandhi deu naye ka; tyancha dharma, jat vichrat n gheta?

 39. vishwavijay says:

  mahendra
  tumhi hindu ha lekh lihun tumchyatil maansikta ajunhi junich aahe . Ti badalnyas vel lagel karan hajaro varshache sansskar itakya lavakar dur honar nahit kiva tumhala tya dur karaychya naahit ase vatat aahe.
  Aaj tumhi baudha , khrishan aani musalman yanchya lanulchalanbaddal je chukiche lekh Chhatrapati Shivaj Maharajyachya navavar lihala aahe tyatun tumchi pravrutti disat aahe .Bahujan samajala nako tya goshti sangun tumhi swathachi bhikshukshahi chalvali aahe . Britishanchya rajyat tumhi baudha , shikh , musalman yaana daavlun swatha engrajanchya karabharat aapli jat sangun tyacha rajyakarbhar karat hotat tevha Shivaji Maharajanchya Bhagvya zendyala britishanchya union jack khali tumchyach purvajaani lolvala hota he tumhi ka visarta.
  Shivrayanchya bhagvya zendyala peshvaiche grahan lagle naste tar bharat (Hindustan) kadhihi partantryat gela nasta he laksht theva. Aani bahujanana shivrayanchya naavane bhadkavne sodun dya.
  Jai HInd Jai Bharat Jai Hindustan
  VishwaVijay

 40. sanjay more says:

  we all always point out to others,you all white caller and self oriented persons only can give lecture .Can you doing any work for your comunity?what are thier problems?persons who got facilities by rules he also do not want to give chance to others after gaining good financial level.we all people are selfish and only pointing to others.would we have daring to join with abhay bang ,prakash amte? no never we only give lecture on religion,caste.because we take pill of afu.

 41. janardhan gaikwad says:

  mi mhantoy ki yevdya vichavantani ekach tharvalach ki aapan abhipray deto pan
  te amalat yete ka ? kahi velet aase hote ki he coments vachun aangawar sahaare yetat
  pan nashib real hot nahi?
  ya sathi kay karaave lagel kay nahi ki je karun he samaj rude hoil ?

 42. Mahesh says:

  Apalyala He Mahit ahe ka? Government ne jya suttya cancel kelelya ahet tya sagalya hindu dharmatalya mahatwachya sananchya kelelya ahet. Udaharnarth Rakhi Pournima, Padwa, Bhaubij, Anant Chadurdashi.
  Ye san itake mahatyache ahe ki sagalya lokanchi gochi houn jate. Tyach weles Patita vagere anek iter dharmiyanchya suttyacha aplyala kahi upyog hot nahi.

 43. Girish says:

  दुर्दैव हेच कोणाला कळलेच कुठे

 44. lekh आवडला …………. कोणी काहीही म्हणो , आयला आम्ही लैच सहिष्णू , शेवटी गोची आहेच ..
  ‎//आरक्षण//

  आरक्षणाचा मार असा
  या देशावरचा हा भार
  एक आज तर उद्या दुसरे
  सांगती अमुचा हा अधिकार

  मागतात तर मागू द्या
  ना उपाय यावर काही
  तोडा फोडा, लाठ्या मोडा
  अडविण्या अमुची हिम्मत नाही

  अंध तरुण मित्र शक्ती
  नेते झालेत गल्ली बोळी
  वाट चुकवून युवा शक्तीची
  भाजती ही अपुली पोळी

  जागा सृजनहो जागा
  ही नाहीत शुभ लक्षण
  मागायचे तर सुविधा मागा
  नका मागू ते आरक्षण

  …जयवंत (६.६.२०१२)

 45. maze vichar says:

  mhanun tar mhantat ki raje punha janmala ya ,
  pun
  ya veles rajech mhantil ,
  ki,
  are mee ka mhanun janma ghetala
  karan tevha rajanna perprantiyanshi yudha zunj dyavi lagli
  pun aaj tar tyanna
  apaplya lokanshich samore jave lagnar aahe .

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s