’खो’

गेले दोन तिन दिवस ब्लॉग वर काही लिहायची इच्छाच होत नव्हती.  परवाच्या हिंदू या पोस्टवरच्या प्रतिक्रियांना उत्तरं द्यायचं पण मी टाळलं, सारखं वाटायचं की पुन्हा इथे मी काहीतरी उत्तर दिले की माझ्या उत्तराला, पुन्हा काहीतरी प्रत्युत्तर आणि इथे  विनाकारण एखाद्या सोशल साईट प्रमाणे समज गैरसमज निर्माण होतील- म्हणूनच उत्तर दिले नाही.. त्या पोस्ट वर कॉमेंट्स दिलेल्या सगळ्यांचेच आभार.

बरेच दिवसांपूर्वी  झाले  ’खो’ दिला होता नचिकेतने. आता ’खो’ म्हणजे काय प्रकरण आहे ते समजून घ्यायला मला थोडा वेळ लागला,  समजल्यावर पण ते वाटतं तितकं सोपं नाही हे पण लक्षात आलं. त्या ’खो’ मधे मला एका हिंदी कवितेचे भाषांतर मराठीत करायला सांगितले होते.  खूप विचार केला पण  काहीच सुचत नव्हतं.

सोपं वाटतंय़? नाही… तितकं सोपं नाही ते. खरं तर त्या दिवसापासूनच स्वतः एक कविता लिहून  दुसऱ्याला खो द्यायच्या ऐवजी मी एकटाच खो खो च्या एका खांबापासून दुसऱ्या खांबा पर्यंत फेऱ्या मारतोय. अहो एकही कविता मराठीमधे योग्य भाषांतर करता येईल अशी  सुचत नव्हती   .परवा पुन्हा मेसेज होता नचिकेतचा खो चं काय झालं म्हणून?

शेवटी आज ठरवलं की कसंही करून आज ’खो’ पुर्ण करायचाच,  आणि दूसऱ्या कोणाला तरी खो द्यायचा. घरी असलेले अशोक चक्रधर यांचे कवितांचे पुस्तक काढलं आणि मधून उघडल्यावर जी कविता आली तिचे भाषांतर  इथे आधी  लिहितोय, आणि मूळ कविता नंतर..

तर आता भाषांतर:-

चेहेरा स्वच्छ करायचा असेल
तर रडून घे,
आणि अश्रूंनी भिजल्यावर त्यावर
हसू पेरून घे.

उलटसुलट विचारांना
मनातून काढून टाक,
विचार काढून  टाकल्या नंतर  झालेले  खड्डे
मोहक स्वप्नांच्या प्रेतांनी भरून टाक

चेहऱ्यावरच्या भावनांचे
स्मशान नक्कीच बनेल,
पण एक फायदा आहे…
की खरा चेहेरा समोर येणार नाही..

अशोक चक्रधर  खरं म्हणजे अतिशय उत्तम कवी , जेंव्हा कधी मी पाडगांवकरांचे उदासबोध हातात घेतो तेंव्हा  मला त्यांच्या कविता या अशोक चक्रधरांच्या हिंदी टाइपच्या कवितांसारख्याच वाटतात. हुल्लड मुरादाबादी, अशोक चक्रधर, काका हाथरसी यांच्या व्यंगात्मक कविता ऐकतच आम्ही मोठं झालो. सुरेंद्र शर्मा ( चार लैना वाले) तर आमचे फेवरेट होते. असो..

तर आता मूळ  कविता:-

चेहरा साफ करना है
तो बेहेतर है,
रो दो!
और
सिंचाईके बाद
उस पर मुस्कान बो दो!

उलजलूल विचारॊं के
झाड झंखाडॊंकी
निराई कर लो,
दर्द के गड्ढोंको
मोहक भंगिमाओंकी
लाशो से भर लो

मुखमंडल  मनोभावोंका
कब्रिस्तान तो जरूर बन जाएगा
लेकिन फायदा ये है की
असली चेहरा सामने नहीं आयेगा

माझ्या आवडत्या कवीची एक सुंदर कविता आहे ही.

मी खो देतोय कांचन, आणि    अनिकेतला,

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in साहित्य... and tagged , , , . Bookmark the permalink.

26 Responses to ’खो’

 1. कविताही सुंदर आणि भाषांतरही. बापरे! उलजलूल या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित होता?! कसला डेंजर वाटतो ऐकायला.

  • माझ लहानपण विदर्भात गेलं नां, त्यामुळे हिंदी तसं बरं आहे.. 🙂 आणि वाचायला पण आवडतं. खो दिलाय , तयारीला लागा ..

 2. सचिन says:

  “विचार काढून टाकल्या नंतर झालेले खड्डे,
  मोहक स्वप्नांच्या प्रेतांनी भरून टाक”
  🙂

  • सचिन
   पुस्तकाचे पान उघडलं आणि समोर आली ती कविता घेतली सरळ भाषांतरासाठी. खूप सुंदर शब्द आहेत कवितेचे..

 3. अनिकेत says:

  अरे देवा!!! आधी हिंदी कविता शोधणे दिव्य.. आणि त्याहुन त्याचे भाषांतर महादिव्य… हिंदी गाणी नाही चालणार का???

 4. ngadre says:

  Mahendraji. Attach outing varun parat aalo aani vachali post.

  Zakas…firstclass..

  Proves again that you are all rounder..

  • नचिकेत
   आभार. खूप कठीण काम होतं, परवा रात्री पण बराच विचार केला पण जमलं नाही. आज मात्र ठरवलं की कसंही करून आपण आज काहीतरी लिहायचंच.

 5. sahajach says:

  मस्त महेंद्रजी…. पेललाय तुम्ही हा खो भन्नाट एकदम…. 🙂

  • तन्वी
   आभार. बाकी हा प्रकार आहे मोठा इंटरेस्टींग. 🙂 आज ठरवून टाकलं की पुस्तक उघडायचं आणि समोर येईल ती कविता लिहायची इथे.

 6. काका..खो ला खो दिलात तुम्ही.

  असो.. पण हे हिंदी कविता/गाण्यांचे जे मराठीत रूपांतर वगैरे हा जो अवघड भयंकर प्रकार आहे.
  तो आपल्या एका मराठी ब्लॉगर मित्राने चांगलाच पेलून धरलाय(त्याला हा खो मिळालेला की नाही ते माहीत नाही अजून मला)
  कदाचित तुम्ही त्याला खरेतर त्यांना ओळखत असालच पण इतरांना त्यांची ओळख व्हावी म्हणून लिंक देतो खाली.
  त्यांच्या अनुवादित या categoryत जवळ जवळ १६५ हिंदी गाणी की कविता त्यांनी त्याच चालीसहीत बनवून ठेवलीत.मी फक्त १०च चाळल्या..पण खरोखरच अफलातून गृहस्थ व काम आहे हे …
  एकदा येथे अवश्य भेट देऊन पहा.
  http://shrikrishnasamant.wordpress.com/category/%E0%A4%85 A4%A8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A4/

  • हो.. त्यांचा ब्लॉग वाचलाय. सगळ्यात जूने ब्लॉगर आहेत ते. मला पण सिनिअर आहेत दोन -तिन वर्ष.
   हा प्रकार सुरु का झाला असावा? तर बरेचदा लोकांना ब्लॉग वर काय लिहावं ते सुचत नाही, मग काहीतरी विषय मिळतो लिहायला. कन्सेप्ट चांगला आहे.

   • नमस्कार महेंद्रजी,
    आपली बोलाचाली होऊन युगं पार पडली.
    स्वतः झपाटून झाल्यावर माझ्या सारख्याला झपाटणार्‍या झंप्याने माझ्या एका लेखाच्या संदर्भाने आपला उल्लेख केला.

    “खो” ह्या आपल्या लेखातली आपली भाषांतरीत कविता मला खूप आवडली.आणि ती वाचून झाल्यावर तुमचा खो मी घेतला.
    आज (अमेरिकन कॅलेंडरानुसार) माझा जन्म दिवस.(वाढ दिवस) १४ ऑगस्ट.

    माझीच आजची कविता.
    (“काय वाटेल ते…” मनात आल्याने लिहित आहे.)

    काढ दिवस

    वय झाले आता सत्याहत्तर
    कसे म्हणू आता
    झाले तरी बेहत्तर
    आता कसले वाढदिवस
    राहीले ते फक्त काढदिवस

    पर्वताच्या उतरणीवर
    दिसू लागले आभाळ
    चढणीच्या वाटेवर
    स्वैर पक्षांचा थवा हेरण्याचा
    गेला तो काळ

    अपेक्षा लोपून गेली
    उमेदीने पाठ फिरविली
    नैराशाने गांठ बांधली

    भुतकाळातील यातनां
    भविष्यकाळातील स्वप्नें
    मिसळती एकच वेळी
    चेहऱ्यावरी दिसती
    दुःख अन कष्ट
    राहूं कसा मी संतुष्ट?

    म्हणावे त्याला जाणकार जो
    कल्पनेने जाणतो भविष्यकाळ
    झाले आता वय फार
    आता कसले वाढदिवस
    राहिले ते आता काढदिवस

    श्रीकृष्ण सामंत.(सॅन होझे कॅलिफोरनीया)
    shrikrishnas@gmail.com

    • काका,
     वाढदिवसाच्या शुभेच्छा….
     खूप खूप सुंदर कविता आहे . आवडली. पण इतकं नैराश्य का ते समजलं नाही..
     माझे वडील पण ८३-चे आहेत. अजूनही पुर्णपणे अ‍ॅक्टीव्ह . मला पण खात्री आहे की तुम्हाला पण १०० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मी देऊ शकेन याची.
     पुन्हा एकदा शुभेच्छा..

 7. mazejag says:

  सौलिड…..आणि interesting.

 8. sushma says:

  lai bhari kaka…………aal rounder aahat thumi………….

 9. अप्रतिम … खूप सुंदर आहे कविताही आणि अनुवादही.

  “विचार काढून टाकल्या नंतर झालेले खड्डे
  मोहक स्वप्नांच्या प्रेतांनी भरून टाक”

  हे मात्र फार भयानक होतं 😦

  • बरेचदा दाहक सत्य ऐकलं किंवा वाचलं की वास्तवाच्या जमीनिवर पाय टेकलेले रहातात. म्हणून ही कविता आवडते मला.

 10. mau says:

  महेंद्रजी,
  मध्यंतरी दोन चार दिवस काही कारणाने ब्लोग पासुन दुरावले होते…आज खुप दिवसांनी ब्लोग वर आले आहे.’खो’ वर दृष्टी गेली..आणि पटापट वाचुन घेतले…दोन तीन दिवस केवळ ह्या कवितेच्या दाहक सत्यातुन जात होते….कवितेचा खरा अर्थ आज अत्ता मी अनुभवत आहे….खरच मनःपुर्वक आभार…

  • उमा
   धन्यवाद..
   मी पण थोडा बिझी होतो म्हणून लिहिणे राहून गेले होते. आता बहुतेक चार पाच दिवस पोस्ट नसेल .. 🙂

 11. bhaanasa says:

  अरे वा! सहीच झालाय अनुवाद. मूळ कवितेतली दाहकता व विषण्णता तू नेमकी पोचवलीस. छानच.

 12. महेंद्रकाका,
  तुम्ही मूळ कवितेचे काय सुरेख भाषांतर केले आहे.
  कविता खरच खूप अर्थपूर्ण आहे.
  घरातल्या कविचा गुण लागला म्हणायचा तुम्हाला 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s