स्वातंत्र्य ..


सर्वप्रथम आज  स्वातंत्र्य  दिनाच्या शुभेच्छा देतो.

-या माणसाची  बाकी कमाल आहे. नेहेमीच काही ना काहीतरी करत असतो. रिकामा कधी बसुच शकत नाही.  कधी एखाद्या ’इ’ विशेषांकाचे प्रकाशन तर कधी एखाद्या एखाद्या श्राव्य अंकाचे.आजच्या ह्या स्वातंत्र्य दिवसाचे निमित्याने   “आज ब्लॉग वरच्या साहित्याला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न केलाय या माणसाने”.

ब्लॉग वर आजकाल बरंच मराठी लेख  लिहिले जातात  . बरेच  लोकं  ब्लॉग वाचत नाहीत त्यामुळे  हे लेख   त्या  लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही.  जर यातले काही निवडक लेख त्या लेखका कडूनच (शक्यतो) वाचून घेतले आणि मग सगळ्या ऑडीओ फाइल्स एकाच ठिकाणी  प्रसिद्ध केल्या तर?? हा विचार मनात आला आणि  –  या संकल्पनेतून  हा  पहिला एक ऑडीओ  अंक प्रत्यक्षात उतरला .

मी कोणाबद्दल बोलतोय ते  जर तुम्ही मराठी इंटरनेट वर अ‍ॅक्टीव्ह असाल, तर आत्तापर्यंत नक्कीच ओळखले असणार. बऱ्याचशा संकेतस्थळांवर अत्यानंद नावाने प्रसिद्ध असलेले प्रमोद देव !

सगळ्यांच्या मागे लागून ध्वनी मुद्रण मागवणे हे के मोठे काम होते .सारखी आठवण करून दिली जात होती देवांच्या कट्ट्यावर . चार दिवसांवर प्रकाशन आलं तरीही फक्त ५-६ ध्वनी मुद्रण आली होती, पण शेवटाच्या दोन दिवसात चित्र बदललं, आणि अगदी शेवटाच्या क्षणापर्यंत ब्लॉगर्स कडून  ध्वनी मुद्रणांचा ओघ सुरु होता  . सगळ्या ब्लॉगर्सनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे  आज स्वातंत्र्य दिवसाचे औचित्य साधून  हा ऑडीओ अंक प्रसिद्ध करता आला. या अंकाची पूर्तता श्रेया  रत्नपारखी शिवाय झालीच नसती असंही ते आवर्जून लिहितात.

या अंकात असलेल्या कथांची टोरंट वर अप्लोड करुन लवकर लिंक प्रसिद्ध करावी  अशी विनंती मी प्रमोदजींना करतोय, म्हणजे हे लेख डाउनलोड करून तुम्हाला  कार मधे, मोबाइल वर, किंवा इतरत्र  कॉंप्युटर शिवाय पण ऐकता येतील आणि हे लेख खरे खुरे स्वतंत्र होतील कॉम्प्युटर पासून. एकदा मोबाइल  वर पोहोचले की मग यांचा ब्लु टुथ वरून प्रसार   होऊन हे लेख बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचू शकतात.

हा अंक तुम्हाला इथे पहाता  येईल . तर करा क्लिक आणि स्वतंत्रता दिवसाचा आनंद लुटा.

जर तुम्हाला हे आवडले असेल आणि तुम्हाला ह्यातल्या काही कथा डाउनलोड करायच्या असतिल तर त्या प्लेअर च्या बाजूला DivShare  असे लिहिलेले  आढळेल. त्यावर क्लिक केल्यावर डाउनलोडचा ऑप्शन उघडेल आणि डाउन लोड करता येईल.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन. Bookmark the permalink.

27 Responses to स्वातंत्र्य ..

 1. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा …

  उठा राष्ट्र्वीर हो…

  सज्ज व्हा, उठा चला, सशस्त्र व्हा, उठा चला॥धृ॥

  युध्द आज पेटले जवान चालले पुढे
  मिळूनि सर्व शत्रुला क्षणांत चारु या खडे
  एकसंघ होउनि लढू चला लढू चला
  उठा उठा, चला चला ॥१॥

  लाख संकटे जरी उभी समोर ठाकली
  मान ताठ आमुची कुणापुढे न वाकली
  थोर वंश आपुला महान मार्ग आपुला
  उठा उठा, चला चला॥२॥

  वायुपुत्र होउनी धरु मुठीत भास्करा
  होउनी अगस्तिही पिऊनि टाकु सागरा
  मन्युबाळ होउनी रणात जिंकू मृत्युला
  उठा उठा, चला चला ॥३॥

  चंद्रगुप्त वीर तो फिरुनि आज आठवू
  शूरता शिवाजिची नसानसात साठवू
  दिव्य ही परंपरा अखंड चालवू चला
  उठा उठा, चला चला ॥४॥

  यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती
  दुष्ट शत्रू मारुनी तयास देउ आहुती
  देवभूमि ही अजिंक्य दाखवू जगा चला
  उठा उठा, चला चला ॥५॥

  • रोहन
   स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

   यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती
   दुष्ट शत्रू मारुनी तयास देउ आहुती
   देवभूमि ही अजिंक्य दाखवू जगा चला
   उठा उठा, चला चला !

 2. काका आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

  मी या ब्लॉग विश्वात थोडा नवखा असल्याने मला हे प्रमोद देव माहित नव्हते.
  आप्ल्यामुळे समजले..खूप धन्यवाद.
  ते जे काही हे डोकयुमेटेशन करताहेत ते खूप मोठे काम आहे.
  सध्याचे माहीत नाही पण भविष्यात ह्या कामाची खूप दखल घेतली जाईल.

  जालावाणीवर जाऊन सर्वात प्रथम तुमचाच ऑडीओ ऐकला….कांचन कराईच्या आवाजातील ऑडीओ खूप म्हणजे खूपच उत्कृष्ट झालाय. विद्याधर भिसेच्या आवाजातील्ही ऑडीओ चांगला झालाय पण ते एक पुरुष असल्याने व पुरुषांना सतत कसलीतरी घाई असल्याने थोडासा स्पीड जास्त वाटला.(कदाचीत का.क. चे आधी ऐकल्यानेही असे झाले असू शकते) बाकी एकदम मस्त.
  तुमचा हा लेख याआधी मी वाचला नव्हता.
  त्यामुळे खूप मन लावून वाचला सॉरी ऐकला. खूप मजेशीर व उपयोगी माहिती आहे…खूप छान!!!
  पुन्हा एकदा धन्यवाद….
  व पुन्हा एकदा…
  स्वातंत्र्यदिन चिरायू होवो.

  • प्रमोद देव बरेच जूने ब्लॉगर आहेत. मिपा वर आणि इतर साईट्स जसे उपक्रम , मायबोली वर पण असायचे.
   ही पहिलीच वेळ आहे, तरीपण अंक खूप सुंदर झालाय. तुम्हाला पण स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.

 3. हा एक सांगायचे राहिलेच….

  हे ऐकत असताना मला मी एखाद्या नाट्यगृहात बसून नाटक वगैरे बघतोय की असा सारखा भास होत होता…
  एक सूचना…फार जणांना हे शक्य नाही..पण ज्याला ज्याला शक्य असेल त्याने त्याने आपल्या आपल्या परीने असे डॉक्युमेंटेशन करून ठेवावे…उद्या भविष्यात ह्या ऑडीओ वाचनाला खूप म्हणजे खूपच महत्व येणार आहे. व असे करणे हे काळाच्या बरोबरीने चालल्यासारखेच आहे. ज्यात आपले मराठी प्रकाशक बांधव निदान १०० वर्षे तरी मागे आहेत.

  • नक्कीच.. हा असा उपक्रम फार काळ दुर्लक्षित राहू शकत नाही. पुढिल काळात हा एक नविन प्रयोग म्हणून निश्चितच लक्षात ठेवला जाईल.

   • स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

    देवकाका प्रचंड उत्साही आहेत आणि त्यांच्या डोक्यातून सुपिक कल्पना निघत असतात. मला स्वत:ला त्यांच्या उपक्रमात सहभागी व्हायला खूप आवडतं. अंकातील तीन अभिवाचने ऐकून झाली आहेत. अंक मस्त झालाय असं दिसतंय. झम्प्या म्हणतोय तसं अभिवाचनाचं महत्त्व लवकरच ब्लॉगर्सच्या लक्षात येईल. हल्ली साहित्यचोरांचा वाढलेला सुळसुळाट पहाता अभिवाचन शैलीचा उपयोग स्वत:च्या लेखांसाठी करावा की काय, असा मीही विचार करू लागले आहे.

    • एक नविन कन्सेप्ट म्हणुन चांगले आहे, पण लिखीत स्वरूपात जास्त वाचले जाते, म्हणून लिखीत स्वरूपात तर लेख असायला हवेच असे मला वाटते. मी चार ऐकली आत्तापर्यंत . मिनल गद्रेंचं पण सुंदर आहे वाचन- तुमचे तर प्रश्नच् नाही.इतर अजून ऐकायचे आहेत. सेल फोन वर डाउनलोड करुन मी सर्क्युलेट करणार आहे ब्ल्यु टूथ वरून. 🙂

 4. sahajach says:

  महेंद्रजी स्वातंत्र्यदिनाच्या अनेक शुभेच्छा…..
  अंक आत्ताच पाहिला… सुंदर झाला आहे!!!

  देवकाकांचे आभार आणि कौतूक आहेच….

  • प्रमोदजींचा उत्साह खरंच वाखाणण्यासारखा आहे. त्यांचं आणि श्रेया ने पण खूप मदत केली बरं का हा ब्लॉग बनवायला.
   फक्त त्या ब्लॉग चं विझेट बनवलेले नाही, ते बनवायला हवे, म्हणजे ब्लॉग ची पब्लिसिटी पण चांगली होईल.

 5. vikram says:

  Are vah mastach chan idea aahe 🙂

  • विक्रम
   खरंच सुंदर आहे उपक्रम. 🙂 पुढल्या वेळेस बरेच लोकं सहभागी होतील असे वाटते.

 6. सचिन says:

  स्वातंत्र्यदिन चिरायु होवो …!
  जय हिंद – जय महाराष्ट्र …!!

  देवकाकांचे आभार आणि कौतूक आहेच…. +१

 7. स्वातंत्र्यदिन चिरायू होवो..
  देवकाकांच्या कल्पना नेहमी भन्नाट असतात….

  • धन्यवाद.. खरंच एक वेगळा कन्सेप्ट आहे. मला मेल आला की डाउनलोड कसे करायचे म्हणून तळटीप घातली या लेखात.

 8. sushma says:

  mahendra kaka,
  thumchya supik dokyatun yenarya supik kalpanana maza salam………….
  aata jasatit jasat wachta yeyel sorry yekta yeyel………
  wel wachel,dolyanana tras kami hoyel,ekach jagi basnyane kantalvane watnar nahi
  (weight kami hoyel chalta phirta yekta yeyel aata sarv)……..khup benifit aahet……………
  yekayla khup maza yete……….

  • सुषमा
   धन्यवाद. पण ही कल्पना मात्र प्रमोद देवांची! आम्ही सगळ्यांनी फक्त सहभागी झालो.

 9. काका स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

 10. देवकाकांनी जेव्हा सांगितले की विशाल तुझ्याकडूनही काहीतरी पाहीजे, तेव्हा प्रचंड टेन्शन आले होते. कविता लिहिणे नवीन नसले तरी ती वाचणे (लोकांना ऐकवेल अशी वाचणे) फ़ार कठीण असते याचा अनुभव मला माझीच “पाऊस माझा सखा” वाचताना आली. पण निदान त्यामुळे आपल्याला कविता वाचता येते (अडखळत का होइना) हे कळले त्याबद्दल देवबाप्पांचे खुप खुप आभार.

  • विशाल
   मला लिहिणं जमतं पण वाचन वगैरे अजिबात नाही. म्हणून मी वाचनाचे काम एक्स्पर्ट लोकांकडे सोपवलं.
   तुझी कविता छान वाचल्या गेली आहे. 🙂

 11. आल्हाद alias Alhad says:

  जालवाणी ब्लॉगचं आरेसेस फीड माझ्या ब्लॉगवर लावतोय…
  उपक्रमास शुभेच्छा…

  मराठीब्लॉगविश्व इंडिब्लॉगर वगैरेचं विजेट दिसलं नाही. त्यानेसुद्धा उपक्रमाची व्याप्ती वाढण्यास मदत होईल!

  कळावे.

 12. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

  देव काकांची ऑडीओ अंकाची कल्पना तर फारच अभिनव होती. एकदम वेगळं काहीतरी.. जाम आवडलं.

  • हेरंब
   आता किती लोकं ऐकतात ते बघायचं.. 🙂 सक्सेस्फुल झाली तर पुन्हा एखादा अंक काढता येईल.

 13. bhaanasa says:

  स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

  यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती
  दुष्ट शत्रू मारुनी तयास देउ आहुती
  देवभूमि ही अजिंक्य दाखवू जगा चला
  उठा उठा, चला चला !

  ही जालवाणी अंकाची कल्पना मला खूपच भावली. मस्तच.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s