साहित्य चोर. बोक्या सातबंडे

” एखादा सिनियर सॉफ्टवेअर इंजिनिअर , जॊ एका प्रथितयश  सॉफ्टवेअर इंडस्ट्री मधे काम करतो, त्याच्यावर जर सायबर क्राइम मधे इन्व्हॉल्व्ह आहे म्हणून केस झाली तर त्याच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरींगच्या करीअर चे काय होईल??ती कंपनी असा बॅकग्राऊंड असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला कामावर  ठेवेल – की काढून टाकेल? ?

लोकांच्या ब्लॉग वरचे लेख स्वतः चोरून आपल्या ब्लॉग वर टाकायचे, आणि मग जाहिराती मधून पैसा मिळवायचा. त्या पैशातून घेतलेल्या  इस्पेस चे भाडे भरायचे अशी मोडस ऑपरेंडी आहे त्याची. स्वतःला एक हॅकर आहे म्हणून अभिमानाने सांगणारा हा माणूस, स्पेशली माझ्या ब्लॉग वरचे लेख चोरून सरळ स्वतःच्या  साईट वर टाकतो.

एका अतिशय मोठ्या आणि चांगल्या सॉफ्ट वेअर कंपनी मधे (पर्सिस्टंट सिस्टीम्स )मधे सिनिअर सॉफ्ट्वेअर इंजिनिअर असलेला  असा एक माणूस आहे की जो असे चाळे करत असतो. त्याला स्वतःला असे वाटते की आपण काहीही केले तरीही आपल्याला कोणीच ओळखू शकत नाही.   त्याला मेल पाठवला आणि विनंती केली की  माझ्या ब्लॉग वरचे लेख डीलिट कर म्हणून.

अजिबात रिस्पॉन्स न देता त्याने अजून काही लेख चोरून आपल्या ब्लॉग वर चढवले. म्हणजे इनडायरेक्टली, काय करायचे ते करा, मी चोऱ्या करणार!”

पण   मला वाटतं की जर  त्या कंपनीच्या  च्या एमडी पर्यंत ही कम्प्लेंट  किंवा त्याच्या  त्यांचा एम्प्लॉई करत असलेल्या  सायबर चोऱ्यांची माहिती     मी  पोहोचवली तर??  फार सोपं आहे ते-कंपनीच्या वेब साईट वर जाऊन जर सगळी माहिती टाकायची. प्रत्येक चोरीच्या लेखाचा स्क्रि्न  शॉट सेव्ह करून ठेवलाय.

सॉफ्टवेअर इंजिनिअर , जो ’”इ क्राइम” मधे इन्व्हॉल्व्ह आहे, आणि ज्याला पोलीसांनी शिक्षा केली – किंवा नुसती अटक जरी केली तरी त्याचं  सॉफ्ट्वेअर इंडस्ट्री मधलं  प्रोफेशनल करीअर शिल्लक  रहाणार नाही.    कुठली  कंपनी काम देईल अशा बॅकग्राऊंड असलेल्या माणसाला??

जाउ द्या, मी हा कशाला विचार करतोय असे तुम्हाला वाटत असेल. पण आजच माझा सायबर क्राइम सेल मधल्या मित्राने फोन केला  आणि  सांगितले मी दिलेल्या माहितीवरून ( अर्थात कांचनने  शोधून मला दिली, जी मी त्याला सांगितली होती )त्या माहिती वरून बोक्या सातबंडे चे खरे नांव आणि पत्ता शोधून काढले आहे.

एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे हाच माणूस पुर्वी मराठी सुपरस्टार नावाने पण वेब साईट्स वर चोरून लेख टाकत होता.  एक मन म्हणतंय हा निर्ढावलेला चोर आहे, स्वतःला ओव्हर स्मार्ट समजणारा…याला दया माया न दाखवता याच्या विरुद्ध कम्प्लेंट लिही .आणि माझ्या मित्राच्या  म्हणण्याचं प्रमाणे त्याच्या विरुद्ध  दिलेले   पुरावे  पुरेसे आहेत आणि उद्या मला बोलावलंय भेटायला   …….असो.. “जसं कराल तसं भराल..”

कांचन च्या मोगर फुलला वरचे हे पोस्ट जरूर वाचा..

बाय द वे, खाली त्या वेब साईटची लिंक देतोय, त्याला प्रसिद्धी हवी आहे ती मिळेल . बहुतेक चोरलेले लेख आहेत, तुमचे पण असू शकतात. जरा चेक करा साईट – थोडे पैसे पण मिळतील  बोक्याला तुम्ही जाहिराती बघाल तर..( बोक्या सातबंडेची साईट)

आता बंद झालेली आहे म्ह्णून हायपर लिं क  काढलेली आहे

आत्ताच् समजलंय की ती साईट बोक्या सातबंडे सस्पेंड करण्यात आलेली आहे.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कम्प्युटर रिलेटेड. Bookmark the permalink.

168 Responses to साहित्य चोर. बोक्या सातबंडे

 1. सागर says:

  बिचारा बोका
  मेला आता

 2. जबरदस्त.. !!!!!! अजिबात दयामाया दाखवायची गरज नाही या चोराला. हवं तर एक साधं मेल करा तक्रार करण्यापूर्वी… बाकी तुम्हाला आणि कांचनला मानलं पाहिजे. सहीच पाळंमुळं खणून काढलीत त्याची.. !!

  • हेरंब
   मेल केली होती. साधी पोहोच पण नाही दिली त्याने. उलट अजून जास्त लेख पोस्ट केलेत त्याने. कांचनने खूप माहिती काढली, त्यामूळेच सायबर सेल वाले फोन नंबर, नाव पत्ता शोधू शकले. त्याने चक्क ऑफिस……जाउ दे.. समजेल नंतर…

   • अनिकेत says:

    त्याच्या निर्ढावल्यापणाला शिक्षा झालीच पाहीजे. एखाद्याने २-३ दा मेल केल्यावर तरी निदान उत्तर द्यायला हवे होते. सोडु नका त्याला, कळु देत मराठी ब्लॉगर्स काय चिज आहे ते 🙂

 3. ह तुम्हाला “क्रेडीट” तरि देतो का? कि आपल्या नावने छापतो सरळ?

  • स्वतःच्या नावाने टाकतोय ब्लॉग वर.. खाली त्याच्या ब्लॉगची लिंक दिलेली आहे. चेक करा .. सगळे लेख सापडातिल माझे कांचनचे

   • चाईला याच्या, अजिबात सोडु नका, एकाला दणका बसला कि पुढचे १०० जणे सरळ होतिल, दुसर्याचे नाव हि लिहायची ज्याची ईच्छा नाहि त्याला कसलि दया कसली माया? दे दणका

 4. अभिषेक says:

  दयामाया दाखवण्याचा प्रश्न नाही, चोर हा चोर असतो,
  ही चोरी आणी आर्थिक गैरव्यवहार दोन्हीही आहे….
  ईतर ब्लोगच नव्हे तर “बोक्या सातबंडे ” ही व्यक्तीरेखा ही चोरली आहे,ज्याचे हक्क प्रकाशकांकडे आहेत (राज हंस प्रकाशन )
  ह्या चोराला पकडल्याबद्दल अभिनंदन

 5. बोका बिचारा नाही.. तर डोळे झाकून दुध पिणारा आहे…बोक्याला पिंजऱ्यात बंद केल्यावर सर्वाना बर वाटेल…

  • आपल्या पैकीच एक आहे.. काहीतरी करणार आहेच..फक्त ते उघड करत नाही आत्ताच. नंतर केल्यावर सांगीन काय केले ते.त्याला चान्स दिला होता चोरलेले डीलिट करायचा किंवा त्या लेखाखाली क्रेडीट दे म्हणून सांगायचा.. त्याने ऐकले नाही.

 6. असे वीर चिक्कार आहेत..मी लिहिलेल्या काही ओळी अशाच मला एका orkut प्रोफाईल मध्ये सापडल्या होत्या …तसा मी लिहिलेला code देखील माझ्या सिनियरने आपल्याच नावाने खपवला आणि म्हणून मी केलेल्या तक्रारीचा काहीच फायदा होत नाही हे पाहून मी resign केलं होतं … आता ते आठवलं …..तक्रार करायला हरकत नाही …..तुम्ही धनलाभ व्हावा म्हणून लिहित नाही मग बोक्याला त्याची परवानगी नाही…(GPL licensing सारखं) ….license हा एक मार्ग आहे… http://kalchiron.blogspot.com/ हे पाहावे

 7. ngadre says:

  baghitali link. Aadhi vatale ki collection asel. Pan lekhakaache naav ‘By Bokya Satbande’ ase lihile aahe chakk. Kamaalach ahe.

  • नचिकेत
   चक्क कॉपी पेस्ट काम आहे सगळं.. त्याला प्रसिध्दी हवी.. मी देतोय त्याला. उद्या कांचनचा ब्लॉग पण पहा. त्याच्या पुराव्यासकट नावाचा पर्दाफाश करणारे पोस्ट.

 8. prabhakar says:

  Who is this bokya satbande? I see his widget on Loksatta. this! It’s a really cool website

  • प्रभाकर साहेब
   अहो त्या कुल साईट वरचे सगळे लेख आमचेच चोरलेले आहेत म्हणून तर हे पोस्ट लिहिलंय. तुमच्या लक्षात आलेले दिसत नाही .. 😦

   • They both are different. Logo at Loksataa.com tells about Dilip Prabhavalkar’s Bokya Satabade character. But content thief and owner of bokyasatbande.com is using that logo for his website promotion.

 9. बोक्या असा सहजच पकडला गेलाय. बराच तयार चोर दिसतोय. त्याने तुमचा सुला वाईन्स वरचा लेख तुमच्या फोटोसह तसाच पोस्ट केलाय. आपण सर्व मिळून त्याला धडा शिकवायचाच.
  पण त्याने “थोडे इकडचे, थोडे तिकडचे” म्हणून आपल्या टायटल मध्येच आपण चोर आहोत याचिही कबूली दिलीय हे काय कमी आहे !!!

  दिनेश.

  • दिनेशजी
   मी पैशाकरता लिहित नाही. म्हणून त्याला पण माझ्या लिखाणवर पैसे कमवायचा अधिकार नाही. त्याने मा्झ्या ब्लॉग ची लिंक जरी दिली असती तरी मी इतक्या स्टेजला गेलो नसतो. लेख आवडला, तर ठिक आहे, परवानगी मागून घ्या आणि ्पोस्ट करतांना माझ्या ब्लॉगची लिंक द्या इतकी माफक अपेक्षा असते.
   आणि त्याला पकडायला खूप मेहेनत लागली. कांचन ने बरीच मेहेनत केली .
   एकदा त्याला सोडलं , तर आता हे दुसऱ्या नावाने आलाय इकडे. असो.

   • अरे बापरे, आपण मला दिनेशजी केले. अहो फक्त दिनेशच म्हणा ! मला कुणालाही एकेरी नावाने हाक मारायला आवडते. तसेच मला पण म्हणा. एकेरी नावाने थोडी आपुलकी निर्माण होते असे मला वाटते.

 10. ngadre says:

  mala vatate prashn fakt credit dilyaanehee sutel. Credit na deun tee vyakti kaay milavate aahe?

  • काही नाही. नसलेलं क्रेडीट… 🙂 चांगला इंजिनिअर आहे असे चाळॆ कशाला करायचे? एकदा सांगितल्यावर की माझे पोस्ट आहे,क्रेडीट्स दे, तर त्याची पण तयारी नाही.

 11. विनाश काले विपरीत बुद्धी, आयत्या बिळावर नागोबा, चोरी तो चोरी उपरसे सीनाचोरी अशा कितीतरी म्हणीचे जीवंत उदाहरण आहे हा बोक्या सातबंडे.
  नुसते लेखकाचे नाव टाकले असते तर काय बिघडले असते..पण तेही सौजन्य दाखवायला हा तयार नाही. म्हणजे किती हा निगरगट्टपणा.
  असो तुम्ही व कांचनताई मिळून जे काही केलेत वं करताय ते समस्त ब्लॉगर जमातीसाठी एक आदर्श काम आहे.

  • मेल करूनही अजिबात दाद दिली नाही म्हणून इथपर्यंत जावं लागलं. स्वतःवरचा ओव्हर कॉन्फिडन्स घेउन बुडणार हा माणूस.

 12. अजुन एक चोर मी आपल्या निदर्शनास आणुन देत आहे. या शहाण्याने माझे “सर्वोत्तम मराठी विनोद” चे विनोद जसेच्या तसे आपल्या ब्लॉगवर टाकले आहेत. मी त्याला तसेच mywebdunia ला मेल पाठवली पण दोघांनीही कोणतेही उत्तर दिले नाही व विनोदही काधले नाहीत.
  आपणही तपासुन बघा आपले काही लिखाण या चोराने पळवले तर नाहीना.
  या चोराची लिंक आहे http://jemsvivek.mywebdunia.com/2008/12/24/1230110460000.html वाचा सर्व माझ्या ब्लॉगवरचे विनोद जसेच्या तसे !!!

 13. एकदा सांगुन ऐकल असत तर त्याला एक संधी देण्यात काही गैर नव्हत पण आता त्याला सहजासहजी सोडु नका…

  • देवेंद्र
   अजूनही त्याने काही लेख काढलेले नाहीत. बेशरम पणाचा कळस आहे. जितके जास्त उध्दटसारखे वागेल, तेवढंच मला निर्णय घेतांना त्रास कमी होईल.

 14. sushma says:

  mahendra kaka,
  sagelech lekh chorlele aahet…….thumche& kanchan tai che lekh tar aahet aankhi “HEMANT AATHLYE” yanchya blog varil “aapsara” ha lekh pan hya bandyane chorun swatahchya blogvar taklay …….navapramanech bokya aahe………..

  chagli jirva thyachi………..dya-maya dakhvaychya laykicha nahi……..chor nahi daku aahe wataty………….

  • त्याचा मुख्य रोख माझ्यावर आणि कांचन वर आहे. आज कांचन लिहिणार आहे ते पोस्ट नक्की वाचा.

 15. आल्हाद alias Alhad says:

  साईट फाल्तू आहे…

  बरंय बाबा मी कुणी चोरावं इतकं चांगलं लिहीत नाही…
  उत्तम ब्लॉगिंगची कला, महेंद्रकाका तुम्हालाच लखलाभ! 🙂

  • आल्हाद
   नको रे बाबा, आता मी पण कंटाळलोय. लवकरच फक्त पिडीएफ लेख लिहून इथे लिंक देण्याचा विचार करतोय. बघु..

 16. Aparna says:

  Kaka,

  saral saral chori aahe ani ha Cybercrime mhanun prove karu shakalo tar mag tyachya office la kalawawe lagale tar wawaga kahich nahi…I mean itar gunhe pan office paryant jatatach na?? mag hyala ka sawlat?? tyatun ha tar ekdam majalela boka distoy….

  Aparna

  • बरोबर आहे, आज कांचन त्याचा बुरखा फाडेल.
   इतका निर्लज्ज पणा – कठीण आहे.
   त्याला सोडण्यात काहीच अर्थ नाही.
   वेट अ‍ॅंड सी…. 🙂

 17. महेंद्रजी,
  हाणा धरून चांगला साल्याला

  • यशवंत
   आभार. बरेच दिवसांपासून त्याची पाळं मुळं खणून काढणं सुरु होतं कांचनचं. अतिशय उत्तम काम केलंय तिने. तिचे तर मनापासून कौतूक करायला हवे.

 18. Kedar says:

  Avaghad aahe ya manasache. Tumchya lakshat ala mhanun he kaltay Mahendraji. Kase kay he lok ashi chori karu shaktat. Aplya kadachya kahi lokanchi vrutti badalli pahije ho. Mi Engineering la astana mi journals lihilya shivay akkhya class chi submissions vhaychi nahit. Pan ata lakshat yeta ki he chukicha hota. Toch prakar jara gambhir swarupat ya ‘hirya’ ni kelay. Tumhi masta kela aahe Mahendraji. Ani snapshots ghetle te tar jabardasta. Asa kahi tari asla pahije ki kunala blog varun copy karta yenar nahi, print karta yenar nahi vagaire vagaire. Phakta vachata yeil. Adobe PDF madhe asta bagha security options cha. Tasach kahisa.

  -Kedar

  • केदार
   जर एखाद्याला चोरीच करायची असेल तर तो कशीही करू शकतो. हे सगळे आयटी मधे काम करणारे लोकं आहेत. एचटीएमएल कसे वापरायचे हे ह्यांना चांगले समजते. त्यामुळे त्याचा काही फायदा होणार नाही असे वाटते.

 19. सर्वात आधी कांचन आणि तुझे अभिनंदन… खूपच मोठे काम होते हे… अर्थात असे नग अजूनही असतीलच… मेळाव्यामध्ये ‘ब्लोग चोरी’ ह्यावर विशेष काही चर्चा झालेली नसली तरी आता ह्या पुढे एक परफेक्ट एग्झाम्पल म्हणून हे गोष्ट पुढे आणता येईल…

  सर्वांना सर्व डीटेल्स जाहीरपणे कळले पाहिजेत दादा… वाट बघतोय.

  • रोहन
   अरे मी काहीच केले नाही. सगळं काही कांचननेच केलं !
   हेरबच्या मित्राचे धुंद रवीचे पण बरेच लेख चोरलेले आहेत, आणि सगळीकडे महाजालावर फॉर्वर्ड होताहेत.
   एकदा यावर फुलस्टॉप बसायलाच हवा.

 20. बोक्याच्या मुसक्या आवळून टाका बस…
  बाकी कांचन आणि तुम्ही जमा केलेल्या माहितीला तोड नाही..

 21. सौरभ says:

  तुम्हा दोघांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. तुम्ही दोघांनी ह्या कोणा बोक्याला पकडून दक्ष राहण्याबाबत आणि त्यासाठी लढण्याचा आदर्श ठेवला आहे. तुम्ही त्यावर कारवाई कराच, जेणेकरुन इतर चोरांवर दहशत बसेल. शिवाय इतर जनताही जास्त सजग राहिल.
  तुम्हांबद्दल खुप अभिमान आहे. 🙂

  • सौरभ
   मनःपुर्वक आभार… या विषयावरची खरी पोस्ट आज दुपारी लिहिण्यात येईल कांचनच्या ब्लॉग वर.. 🙂 जरूर वाचा.

 22. महेंद्र
  मला वाटते त्याच्या एम डी पर्यंत ही बाब पोहोचवावी. कारण चोरी हा त्याच्या प्रवृत्तीचा भाग आहे. अशी प्रवृत्ती असणारा माणुस आपण आपल्या कंपनीत ठेवणार का? अशी पृच्छा करावी.

  • नक्कीच काहीतरी अ‍ॅक्शन घेतली जाईल
   त्याला फार वाट पहावी लागणार नाही. सगळ्याच बाजूने अ‍ॅक्शन घेण्याचा प्लान आहे.त्या बद्दल जास्त लिहित नाही. पण एकदा केल्यावर नक्कीलिहिन. इथेच !

 23. तुका म्हणे ऎशा नरा । मोजुनी माराव्या पैजारा।
  न मोजता मारल्या तरी चालतील

  • हेमंत
   तुझी अप्सरा पण त्याने चोरून प्रसिध्द केली आहे.अजूनही काहीतरी सापडेल बघ.

   • महेन्द्र्जी,
    मी हेंमंत आठ्ल्ये नाही हेमंत दाभोलकर.कळविण्यास कारण कि वाला. तुम्ही मला वीसरलात वाटत.आणि हो माझी अप्सरा २४ तास माझ्या सोबत असते.असा कोणि येरागबाळा चोरुन नेईल. येवढ सोप नाही ते. 😀

    • हेमंतजी
     अहो माफ करा…मला वाटलं होतं की हेमंत आठल्ये आहे म्हणून तसं लिहिलं. 🙂
     तुम्हाला कसा काय विसरू शकेन??

 24. sahajach says:

  महेंद्रजी तुमचे आणि कांचनचे कौतूक…

  अजिबात सोडू नका हा मुद्दा…. बाकि काही मदत करणे शक्य होत नसले तरी ईतकेच म्हणेन की आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत!!!

  • तन्वी
   कांचनने खूप मोठं काम केलंय. त्याशिवाय सायबर सेल वाल्यांना इतक्या लवकर त्याचा शोध लावता आला असता का ? हा पण एक प्रश्नच आहे.
   आभार.

 25. बोक्याचा तंबोरा वाजणार तर!!! ते झंकार बीट्स ऐकायला आतुर झालोय…
  साइबर डीटेक्टिव कांचन आणि महेंद्रकाका की जय हो!!!

 26. Rajeev says:

  त्याचा net पत्ता दे….

 27. आपण नेटवर करू ते सगळं उठसूट खपून जाईल असं वाटणाऱ्या या चोराला चांगला हिसका बसेल. ही पोस्ट एव्हाना वाचलीच असेल त्यानं. हादरला असेल चांगलाच !

  • हादरला नसावा, त्याने ती बोक्या सातबंडे नावाची साईट डीलिट केली नाही अजून. त्याला स्वतःबद्दलचा ओव्हरकॉन्फिडन्स जो आहे, त्यानेच त्याची वाट लागणार.

 28. Nachiket says:

  ही एक माय लव्हर्स विश नावाची साईट आहे. ती तसे म्हणायला अगदी खाली एका ठिकाणी आपल्या मूळ ब्लॉगची लिंक देते (नाव नव्हे फक्त “पुढे वाचा” अशी लिंक)

  पण Top ला आणि टायटल मध्ये ऑथर म्हणून स्वत:चे किंवा मराठीब्लॉग्स असे काहीतरी नाव देते. म्हणजे मूळ लेखक शोधल्याशिवाय सापडत नाहीच आणि खाली “पुढे वाचा” च्या लिंक मध्ये मूळ ब्लॉगला लिंक दिल्याने चोरीचा आरोप तांत्रिक दृष्ट्या होत नाही.
  शक्यतो मूळ लेखकाला लपवण्याचा हा अट्टाहास का?

  या साईटवर माझा जवळ जवळ प्रत्येक लेख आहे.

  http://marathi.myloverswish.com/marathiblogsnet/%e0%a4%98%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%a8%e0%a4%b3.aspx

  • अरे हो.. खरंच की.. बरेच लेखाहेत. कोणाची आहे ही साईट??

  • नचिकेत, जर ते पुढे वाचाच्या जागी तुमच्या ब्लॉगची लिंक देत असले, तर याचा अर्थ ते तुम्हाला श्रेय देत आहेत असा होतो. शिवाय ते तुमचा पूर्ण लेख छापत नाहीत त्यामुळे त्यांच्या साईटवर असलेल्या तुमच्या लेखांवरून वाचक आपोआपच तुमच्या ब्लॉगवर असलेल्या मूळ लिंकवर वळते होतात. उलट ही चांगली गोष्ट आहे. फुकटात लिंक एक्सचेंज होतेय.

 29. सागर says:

  अभिनंदन कांचन ताई आणि काका तुमच पण..
  माघील आठवड्या पासून बझ्झ वर कांचन ताई च्या ह्या बोक्या विषयी च्या पोस्ट वाचत होतो… ह्या बोक्या विषयी ची मिळेल ती माहिती त्या पोस्ट करत होत्या शेवटी तुमच्या प्रयत्नांना यश आलच … पुन्हा एकदा अभिनंदन… हाना आता बोक्याला……

 30. खरेच वाजवा त्याला …

  • नक्कीच. आता इतकं केलंय, तेंव्हा इथेच थांबणार नाही हे नक्की. नेहेमीकरताच ह्याची ही सवय मोडली पाहिजे.

 31. shreevardhan says:

  महेंन्द्र, त्या बोक्याला चांगली अद्दल घडली पाहिजे.

  • अर्थात, आपल्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं करणारच! चार पाच इमेल पाठवायला काय लागतं?

 32. लीना चौहान says:

  या बोक्याला पकडायला तुम्हीच बोक्या सातबन्डे सारखे काम केलेत. त्याच्या साईट वरच त्याने ‘थोडे इकडचे थोडे तिकडचे’ असे टाइटल दिले आहे… 🙂 सकाळ मधे आलेले काही लेख सुद्धा दिसले त्याच्या वेब साईट वर. याला नक्कीच शिक्षा व्हायला पाहिजे आणि या प्रकरणाला प्रसिद्धी सुद्धा दिली पाहिजे, तरच बाकिच्या चोरांना सुद्धा आळा बसेल.

  • त्याला अजूनही वाटत असेलकी आपण ओळखल्या गेलेलो नाही म्हणून. त्याने काहीच अ‍ॅक्शन घेतलेली दिसत नाही. बघा पुढे काय होतं ते. कांचनची पोस्ट वाचल्यावर सगळं क्लिअर होईल- बोक्या कोण आहे ते..

 33. vikram says:

  Tumha doghana cyber crimewale kam ka det nahit asa prashn mala padatoy aata 😛

  baki tyache pudhe kay jhale he nakki sanga 🙂

 34. Nachiket says:

  महेंद्रजी.. आणि त्या व्यक्तीने कॉपी तरी कशी मिक्स आणि एडिटेड मारली आहे पहा..:

  तुमच्या “ब्लॉग वर लोक कसे पोहोचतात” ची कोपी मारून त्यातच माझ्या कॉमेंट मधले माझ्या ब्लॉगवर येणारे सर्व सर्च वर्ड ही टाकले आहेत.

  सर्वात कमाल म्हणजे या ब्लॉगवर तुम्ही टेक्स्ट सिलेक्ट केलेत किंवा राईट क्लिक केलेत तर मात्र एकदम वॉर्निंग येते “कॉपी करू नका..तुमचा आय पी रेकोर्ड करण्यात आला आहे” .. वगैरे..!!!

 35. Sarika says:

  काका,

  त्याची चोरी उघड झाली आहे, तुम्ही सायबर सेल ला कम्प्लेंट करणार असं म्हणताय, तरीहि हा माणुस इतका बेफ़िकिर कसा? शांत आहे आणि तुमच्याशी संपर्क साधत नाहिये. इतका नि्र्ढावलेला आहे? याला भिती किंवा लाज नाहि? कि अजुन काहि प्लान असेल त्याचा?

  • त्याला अजूनही वाटत असेल की आपण ओळखल्या गेलेलो नाही म्हणून तो पुढे येत नाही. त्याने स्वतःच्या कुवती प्रमाणे सगळॆ ट्रॅक्स कव्हर केले आहेत, पण कुठे तरी तर चूक होतच असते चोराची- तसं झालंय त्याचं. असो.

 36. कोणाशी पंगा घेतलाय हे त्येला ठाव नाय. . . . .कांचन ताय आता त्या बोक्याचं श्राद्धचं घालणार हाय वाटत….चला इथुन पुढे कोणाची हिम्मत होणार नाही चोरी करायची. 🙂

 37. अनघा says:

  किती भीतीदायक आहे हे!!

  • अनघा
   खरंय.. पण भिती कसली वाटायची? लांडग्याने वाघाचं कातडं जरी पांघरलं, तरी तो वाघ होत नाही. 🙂

 38. Mandar Puranik says:

  पण मी म्हणतो कशाला चोरया करायच्या ?
  जे काय लिहायचे आहे ते तू स्वत: लिही की. म्हणावं त्याला.
  महेंद्रजी, सोलेट धुआ त्याला.

  मंदार पुराणिक

 39. महेंद्रजी,
  हा बोक्या तर निर्ढावलेला चोर दिसतोय …. कुठेही लेख दुसऱ्या ब्लॉग वरून घेतला आहे ह्याचा नामोल्लेख नाही ………. ह्याला धरून आपटा ……………
  आपला
  विनोद

  • विनोदजी
   नक्की! या वरून इतरांनी तरी बोध घ्यावा अशी अपेक्षा. असे चोर ब्लॉगर्स खूप आहेत. कमीत कमी लिंक तरी द्यावी अशी अपेक्षा ठेवणॆ म्हणजे काही फार नाही. पण तेवढंही करण्याचे सौजन्य हे लोकं दाखवत नाहीत.
   पुर्वी पण एक मुलगा होता, पण त्याला सांगितलं आणि त्याने लेख काढून टाकले. पण हा मात्र खूपच उद्दाम पणे वागत होता, म्हणून जास्त चीड येत होती.

 40. मस्त.. अभिनंदन काका.
  कांचन आणि तुमच्या प्रयत्नांना यश येवो.

 41. ViShWaSs says:

  Chhan kaam kele Kanchan taai aani tumhi…Marathi Bogger kaay chij ahe he asya coranna kalala pahije…. shrey tari dyala pahije hota na dada…
  Asi chori karnyapeksha mi maza blog band karun taken…

  • विश्वास
   धन्यवाद… तुम्हा सगळ्यांच्या पाठिंब्यानेच हे असे प्रकार रोखता येतील.

 42. fanfare says:

  are wa blog chalu ahe ajun. naveen lil champs suru zalay, kahee lihila nahee ajun?

  • नमस्कार,
   ब्लॉग सुरु केला तेंव्हा सुरुवातीला प्रोत्साहन देणारे तुम्हीच होते.
   धन्यवाद..
   अजूनही ब्लॉग सुरु आहेच. शक्यतो रेग्युलर अप्डेट्स असतातच! सारेगमप साठी एक खास ब्लॉग सुरु केलाय नारायणी बर्वेने , आणि ती खूप सुंदर लिहिते, म्हणून मी तो विषय लिहायला घेत नाही.
   येत रहा..

 43. Rajeev says:

  kaanchan ji kadhee aanee kuthe patta kalwat aahet ?

 44. सचिन says:

  काका. काहीतरी घडामोडी घड्तायेत असं वाटतंय.. http://www.bokyasatbande.com/ site आता open होत नाहीये. Account has been suspended असं येतंय.
  बाकी तुमच आणि कांचन दिं च मनापासून अभिनंदन 🙂

  • सचिन

   संपला तो बोक्या!! आता ५०% संपला, बाकीचा….. (????)

   • सचिन says:

    पुढे ह्या चोराच काय काय होतंय हे please नक्की update करा ह्या post मध्ये.
    जिंकले तुम्ही.. अभिनंदन 🙂

    • सचिन
     नक्की अपडेट करीन.. थोडं थांबा जरा. त्या पोलिस कम्प्लेंट……..असो.. थोडं थांबा, करीनच अपडेट!

 45. हेमंत आठल्ये says:

  अगदी योग्य केलंत.

 46. Prabhas Gupte says:

  kaka,

  ata tyala ek email jau dya.. hi post pan copy kar mhanav.. 😉

  • प्रभास,
   तो सगळं पहातोय . कदाचित या कॉमेंट्सची फिड घेऊन ठेवली असेल..मला फॉ्लो करत होता बझ वर.. काल त्याच्या कंपनीचे नांव लिहिले पोस्ट मधे तरी पण त्याला काही समजलं नाही वाटते. बऱ्याच साईट्स आहेत त्याच्या. भरपूर वेब स्पेस घेऊन ठेवली आहे विकत. मध्यंतरी बझ वर विकायला पण तयार होता वेब स्पेस.

   • काका,

    सायबर क्राईम ब्रांचची कारवाई झाली असेल तर एक ई-मेल ’पर्सिस्टंट’ला सुद्धा पाठवुन द्यावी… त्यांच्या (आणि त्याच्या) माहिती साठी. आज ब्लॉग-लेख चोरी झाल्यात.. उद्या त्या कंपनीची कसली तरी अंतर्गत तांत्रिक माहिती चोरेल..

 47. Ganesh says:

  Mahendra Kaka N Kanchan tai Abhinandan

 48. Rohit Desai says:

  Bokyachi site tar suspended disat ahe.

  • हो, आ्त्ताच त्याने सस्पेंड केली आहे. थोड्या वेळापुर्वी.

   • काका,

    त्याने नाही, बहुतेक ती सर्विस प्रोव्हायडर कडुन सस्पेंड झाली आहे. ते दिसणारे पान हे सर्विस देणाऱ्यांमार्फत दिसत आहे.

    • ओह.. असं आहे कां? मला वाटलं की त्यानेच बंद केले की काय. सर्व्हिस प्रोव्हायडरला पण कम्प्लेंट दिली होतीच.. 🙂

 49. काका,
  मी आत्ता घरी आल्यावर दोन्ही ब्लॉग वाचले. छ्या….. ’बोक्या’ची साईट सस्पेंड झालीये, त्यामुळे काही पहायलाच मिळाले नाही 😦 माझे पण चोरून टाकले होते का हो तिकडे?
  तुम्हा दोघांचेही अभिनंदन. मराठी ब्लॉगिंगमध्ये शिरू पाहणार्‍या अपप्रवृत्तींना तुम्ही वेळीच आळा घालत आहात हे खुप छान !!!

  • बऱ्याच लोकांचे होते. पण माझे तर जवळपास सगळेच लेख होते तिथे. तुमचे पण असावेत. 🙂
   ईंटरनेट वर कोणीच अदृष्य़ राहू शकत नाही – हे पुन्हा एकदा सिध्द झालं.

 50. laxmi says:

  great work!!! and congrats to both of u 🙂

 51. ngadre says:

  Great Kanchan and Mahendraji..

  Great initiative…and success too..

 52. Shame!

  Now its time to book that guy for his offences! dont leave this guy scott free…even if the site is down, you can recover the screenshots using cache.

  and yeah, report his orkut account as bogus 😉

  • हर्षद,
   त्याने बरीच जागा ( इस्पेस) विकत घेऊन ठेवलेली आहे, कदाचित त्याचं वार्षीक भाडं रिकव्हर करायला हे असे उद्योग करत असावा. पुढे काय होतं ते समेजेलंच. मुद्दाम मी आधी पोस्ट टाकलं कांचन च्या, की त्याने सजग पणे माफी मागून प्रकरण मिटवावे,पण त्याने चक्क्क दुर्लक्ष केलं.

   • be unforgiving. dont hesistate to press the charges against that maggot.

    • हर्षद
     🙂 मला तर आता असं वाटतंय की सगळं काही आपोआपच होणार आहे. मला जास्त काही करायची गरज नाही आता. नंतर सविस्तर लिहिनच..

 53. ngadre says:

  He Media madhe aalay ka? Seems first prominent case of blog content theft. This should come in media as it will change the casual attitude towards content on blogs..

 54. Nachiket says:

  ही कॉमेंट कांचनसाठी आहे. तिच्या ब्लॉगवर कॉमेंट सबमिट करण्याचे बटन लोड होत नसल्याने कॉमेंट मला पोस्ट करता येत नाहीये. म्हणून तुमचा ब्लॉग हक्काने वापरतोय महेंद्रजी..:

  >>>>>>>

  कांचन, तुझी मोगरा फुलला वरची पोस्ट डीटेल मध्ये वाचली.

  खूप मोठं काम केलं आहेस. नाहीतर ब्लॉगवरचं लिखाण म्हणजे रस्त्यात पडलेला माल असल्या सारखा casually घेतला जात असतो.

  हा अवेअरनेस खूप द्रष्टेपणाचा आहे. आज लोकांना वाटू शकेल की इंटरनेट वरच्या चोरीला इतके काय महत्व. पण उद्या (नक्कीच) जेव्हा ब्लॉग हाच मेनस्ट्रीम रीडिंग / रायटिंग मिडीया होईल तेव्हा हे खूप महत्वाचं ठरेल.

  तू सुनीताबाईंचं आहे मनोहर तरी नक्कीच वाचलं असशील. त्यात विना रोयल्टी पु.लं.च्या नाटकांचे प्रयोग करणा-यांवर त्यांनी असाच आसूड उगारला होता. कायद्याने. आणि त्यांच्यावर “पैशासाठी हपापलेल्या”, “भांडकुदळ”, “पु.ल. च्या दारातलं कुत्रं” वगैरे या दर्जाला जाऊन टीका झाली. ती ही साहित्य नाटक वगैरे मधल्या प्रस्थापित लोकांकडून..

  तेव्हा रोयल्टी वगैरेला,विशेषत: लेखकाच्या, लोक (इन्क्लुडिंग पु.ल.) अजिबात महत्व देत नव्हते. आता कोणी करेल का डेअरिंग स्टेजवर कथा चोरून नाटक आणण्याचं ? सुनीताबाईंनी द्रष्टेपणाने सुरुवात केली म्हणून आज हे होतंय.

  सुनीताबाईंच्या त्या लढयानंतर खूप इतर साध्या, आक्रमक नसलेल्या किंवा गरीब लेखकांनाही रोयल्टी मिळायला लागली आणि सन्मानाने त्यांची परवानगी घेऊन आणि श्रेय देऊन नाटके व्हायला लागली.

  तुझी ही फ़ाईट आणि एक्शन मला सुनीताबाईंशी कम्पेअर करण्यासारखीच वाटते.

  खूप कौतुक आणि आदर…!!

  एक प्रश्न मात्र पडतो. तू त्या सुपरस्टार आणि मग कुडाळच्या मेल्सना पेशन्स ठेवून इतके रिप्लाय देऊच कसे शकलीस..?

 55. mau says:

  chapter माणुस आहे नं….आता बोक्या मेला..वाट लागली त्याची…good job done by both of u..

 56. जोडे हाणा त्याला.

 57. swapna says:

  namaskar, mala mahit nahi he BOKYA SATBANDE prakaran. pan vachun changla vatla ki tumhi thos paul uchalalat. pan vait vatla karan PERSISTENT SYSTEM cha nav ugach kharab kela hya mansani.
  ek request aahe.
  tumhi he MR. ANAND DESHPANDE. (PERSISTENT SYSTEMS LTD.) hyana kalval ka?
  maza honara navra hya companit aahe, so me pahli aahe company. aani tumhi pan paha ekda, RASIK MARATHI MANASAchi compani aahe.
  tumhi tyana he kalvala tar te nakkich kahi tari kartil. aani mazya mate he tyana mahiti asayla hava.
  dhanyavad.

  • स्वप्ना
   प्रतिक्रियेसाठी मनःपुर्वक आभार.
   अजूनपर्यंत ठरवलेलं नाही कळवायचे की नाही ते.
   बघू या काय करायचे ते. 🙂

  • स्वप्ना
   खरं तर जे काही करायचंय ते कांचननेच केलेलं आहे. तिच्या ब्लॉग वर त्याचे इमेल्स पण तिने पोस्ट केलेले आहेत. खूप मानसिक त्रास दिलाय कांचनला त्याने.

 58. जबरदस्त पडदाफार्श झाला आहे. नेट वर काहीही खपून जाऊ शकते असा जो साहित्यचोरांचा समज आहे तो दूर व्हावा ही अपेक्षा.
  कांचन ताईंचे अभिनंदन

  • निरंजन
   खूप सेन्सेशनल न्युज आहे ही. मला वाटतं की आपण नेट वर अदृष्य राहू शकतो असा जर कोणाचा समज असेल तर तो दूर होईल. कांचनने खूप मोठं काम केलंय.

 59. sureshpethe says:

  महेंद्रजी आणि कांचन ताई,

  बरेच दिवसाने साहित्य चोर बोक्या वरील लेख वाचण्यात आला. हा माणूस मला खूप आधी पासून भेटलेला होता. माझ्या एका चित्रांच्या प्रदर्शनात त्याने माझी ओळख करून घेतली होती.
  हा मला त्याच्या साईट वर माझ्या कवितांसाठी स्वतंत्र पेज देणार होता. मला फ्री मध्ये साईट करून देणार होता. त्यावर माझी चित्रे विकायला ठेवावित असे त्याने मला सुचवलेले होते. विक्री आदिची व्यवस्था तो पहाणार होता.
  का कोण जाणे हा माणूस त्याच्या एकूण वागण्यावरून तेव्हाच मला हा फ्रॉड वाटला होता. व मी त्याला थोडा लांबच ठेवला. आपण दोघांनी त्याला उघडे पाडले हे एक फारच उत्तम काम झाले.
  मराठी ब्लॉगर्सच्या वारंवार व ठिकठिकाणी भेटी मेळावे व्हावेत व त्यांची प्रत्यक्ष ओळख रहावी ह्याच हेतूने पहिला मेळावा भरवला होता नंतर तो तुम्ही मुंबईतही भरवलात, माझ्या मते असे मेळावे नित्य नेमाने भरवले जावेत व तिथे असे मुद्दे चर्चिले जायला हवेत व अश्या बोक्यांचा शोध जारी ठेवला जावा.

  सुरेश पेठे

 60. swapna says:

  to kanchan tai,
  tumachya blog var reply deta yet nahiye mhanun ithe…
  mala far chan vatla tumacha ha blog vachun. muli sahasa evadhya fandat padat nahit aani khar tar evadhi mahiti asanarya muli kamich astat. tumhala tantrik mahiti aahe mhanun tumhi he karu shaklat. anyatha chori disat asunhi kahi karta yet nahi.
  aaplya kamasathi shubhechha!

 61. swapna joshi says:

  आपल्या ह्या प्रयत्ना बद्दल कौतुक. बोक्या बद्दल माहित नव्हता. पण इथे कळाल. पण ह्या सगळ्या गोंधळात persistent चे नाव खराब झाले ह्याचे वाईट वाटले. कारण ही एक रसिक मराठी माणसाची company आहे. आपण आनंद देशपांडे ह्यांना कळवा. ते नक्कीच काही तरी करतील.

  • या माणसाला आधी मेल पण पाठवला होता. याच्या ब्लॉग वर क~ऒमेंट्स पण टाकल्या होत्या, तरीही याने काही ऐकले नाही, म्हणुन प्रकरण इतके वाढले. नाही तर कधीच संपुन गेले असते.
   हे पोस्ट मुद्दाम एक दिवस आधी लिहिले होते, कांचनच्या, कारण आम्ही वाट पहात होतो, की इतकी हिंट दिल्यावर ( त्याला ओळखलंय अशी) तरी तो ब्लॉग बंद करून माफी मागेल. पण त्याने तसे पण केले नाही. मला कोण काय करू शकतो असा कन्सेप्ट होता त्याचा.

  • नमस्कार,
   आमची persistent बद्दल काहीही तक्रार नाही, आणी बोक्याच्या तिथे काम करण्याने ह्या कंपनीचे नाव खराब होणार नाही,
   आपण सांगितल्याप्रमाणे जर ही कंपनी कला संस्कृतीचा आदर करते तर आपली ही जबाबदारी आहे की त्यांच्या कानावर हा प्रकार घालावा, जेणेकरू ते जागरूक राहतील, नाहीतर उद्या त्यांच्या कागदपत्रांची चोरी व्हायची..
   जर बोक्याने ऑफिस मधून ही वेब साईट बनवली असेल तर त्याच्यावर कंपनी नक्की कारवाई करील.
   धन्यवाद

   • swapna says:

    kalpana chan aahe.. pan me swatah tithe kam karat nahi, maza honarr navara karto. tarihi me nakkich prayatna karin he tyana kalvanyacha.
    arthat, jar he kanchan tai aani mahendra kakni sangitla tar ajun parinamkarak hoil.
    aapanhi praytna kara, me sudhha karate.
    karan aapan mandalela mudda barobar aahe. he kam to companitun karat asu shakto..ani vrutti jar ashi asel tar ha manus dhokadayak aahech.

 62. संजीव नाईक says:

  नमस्कार महेंद्र जी………………….
  समयाबरोबर प्रवास करणे अद्भुत असते. जेव्हा तुम्ही काळाच्या ओघाबरोबर वाहत, तेव्हा तुम्ही घाईगडबडीने पुढच्या घटनेकडे धाव घेत नाही. तुम्ही सतत असा विचार करत नाही, की अगदी पुढच्याच वळणावर कुठलीतरी आणखी चांगली गोष्ट तुमची वाट पाहात आहे. तसेच, तुम्ही सुखद गत्काळाच्या स्मृतींना बिलगून राहण्याच्या प्रयत्नात फ़रफ़टत चालतही नाही. जेव्हा काळाच्या तालासुरात चालता, तेव्हा तुम्हाला ठाऊक असते, की तुम्ही अगदी योग्य वेळेला, योग्य स्थानी आणि योग्य लोकांबरोवर आहात. जेव्हा तुम्ही काळाच्याबरोबर पावले उचलता, तेव्हा तुमचे द्न्यन प्रचंड प्रमाणात वृध्दिगंत होते.

  महेंद्रजी मी आपल्या पेक्षा लाहान आहे. पण….
  जेव्हा हितकारक आणि सुखकारक असे दोन्ही मार्ग मनुष्यासमोर येतात. द्न्यानी मनुष्य त्यांचे मूल्यमापन करतो, त्यांमधील फ़रक लक्षात घेतो आणि सुखकारक मार्ग सोडून हितकारक मार्ग निवडतो. परंतु अद्न्यानी मनुष्य सुखकारक मार्ग निवडतो, हितकारक नाही.
  आपण जो मार्ग निवडला तो योग्य आहे.

  ह्याकाचा स्वर्णिय मन, स्वर्णिय जीवन म्हणतात..
  आपला
  संजीव

 63. Nachiket says:

  Vijay,

  Appreciable that you have come ahead to present your side. If you have not received any notices/requests then this whole thing needs to be revised.

  Your point of not declaring name before error is proved, becomes valid only provided that you never received any comment/warning/notice from Mahendra and Kanchan. There seems to be some communication gap.

  They both have put comment on the very website which is in question. And if you mean to say that the said website doesn’t belong to you then there shouldn’t be question of protest against you. However, then whom does it belong to and who did it ? is what remains.

 64. samir deshpande says:

  Mahendraji,

  Tumhi ani Kanchan yani je kahi kele te atishay kautaspad aahe.
  tumhi tumacha Blog che lekhan itke seriously gheta mhanunach itka mast lihu shakata…
  katha/ kadmabari lekhakanitakech blog writers che hakka pan sambhalayala pahijet. konihi uthun te chori karu nayet. tumhi je kelat tyani bloggers na longterm madhye nakki fayda hoil.
  P.s. He tumhi aani Kanchan doghansathi aahe( kanchan yanchya blog var comment karata yet nahi aahe sadhya)

 65. Smit says:

  Kaka,
  Navin vlog suru kelay tyane coverup karanyasathi..jara bagha..

  • मला कॉमेंट टाकली होती. पण ठिक आहे.. सध्या जरा बिझी आहे कामात , नंतर सावकाश पाहिन.

 66. sushamey says:

  thanks….. lok chorate aahet

 67. sushamey says:

  thanks….. lok chorate aahet aani tumhi tyana shodhunhi kadhalet te bara zala…

 68. bhaanasa says:

  महेंद्र तुझे आणि कांचनचे कौतूक… इतके कष्ट घेऊन सारी पाळेमुळे खणून काढलीत.

  अजिबात सोडू नका हा मुद्दा…. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत!!!

  ” माय लव्हर्स विश ” चीही गंमत सुरू आहेच फक्त कांचन म्हणते तसे काहीसे श्रेय दिले जातेय. 🙂 चला निदान हेही नसे थोडके.
  पुन्हा एकदा ….. जय हो! 🙂

 69. Great achievement… Congrats you both, Kanchan taai and you… By the way, we all bloggers need to be united against this type of thieves, that’s our real power!

  • विशाल
   खरंअआहे ते.. माझा लेख नाही चोरला, तर मी कशाला भांडायला जाऊ असे विचार असतात लोकांचे.

 70. Namaskar,

  Kiti nalayakpana karava yachi hadda zali. Are…swat:la kahi suchat nahi tar dusare je chhan lihitat tyacha aswad ghyava, manmokali daad dyavi….tar he kasale avalakshan.

  Addal ghadava hya bokyala.

  Sodu Naka…

  Rajan Mahajan

  • राजन
   प्रतिक्रियेसाठी आभार. तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच तर हे सगळं शक्य झालं, नाहीतर एकट्याला अशक्य झाले असते.

 71. Pingback: साहित्य चोर. बोक्या सातबंडे | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA.

 72. नमस्कार काका, हे तर मी नवीनच वाचतोय.
  तुम्ही चांगली कारवाई केलीत. त्याबाद्दल आपले व कांचन ताईंचे अभिनंदन. अश्या कारवाईंनीच या प्रव्रुतीला आळा बसेल.

 73. मराठी साहित्यविश्‍वाला लागलेली किड नष्ट करण्यासाठी चाललेले आपले प्रयत्न स्तुत्य आहेत.
  ब्लॉगवर केलेल्या लिखाणाचे कॉपीराईट नोंदवता येत नाहीत का?
  वर्तमानपत्रात ही चर्चा च्ापून येण्यास काहीही हरकत नसावी.
  निदान चोर खर्या व टोपण नावाने सार्वजनिकरीत्या उघडकीस आणला पाहिजे.

  • विक्रांत
   ऑन लाइन कॉपीराईट नोंदवता येतं. वर्तमानपत्रातही ही बातमी छापून आलेली आहे.सकाळ तर्फे लवकरच म्हणजे चार तारखेला एक सेमीनार आहे या विषयावर . एक्स्पर्ट लोकं गाईड करणार आहेत .

 74. saurabh gaikwad says:

  ya sagalya choryanmulech aaple marathipan mage padat aahe tya mansala maf kara janawarala shiksha hoyalach pahije hoti awadha motha manus asun swatachya akalecha gair waper karto mahnje kai khupach ghanerada manus ahe

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s