वंश वेल

एकदा माझ्या चुलत आजोबांनी एक कागद दाखवला होता, त्यावर समस्त कुलकर्णी वंशवृक्ष इ.स. ११०० पासून  काढलेला होता. आधी तर माझा त्यावर विश्वासच बसला नाही, की इतकी जुनी माहिती  ऑथेंटीक असू शकते म्हणून. पण आजोबा म्हणाले की ही माहिती त्यांनी स्वतः  त्र्यंबकेश्वरला गेले असतांना   लिहून आणलेली आहे.

जूनही नाशिकच्या काही भटजींकडे तुमच्या वंशाची पुर्ण माहिती लिखित स्वरूपात पिढी दर पिढी पुढे चालत आलेली आहे. फक्त एकच आहे, की  तुम्हाला फक्त तुमच्या गुरुजींचे आडनाव माहिती असायला हवे.

आजोबांनी दाखवलेल्या त्या माहिती प्रमाणे, आमचे मूळ पुरुष हे धारवाड हून वाईला आले. तेंव्हा ते थेटे हे आडनाव लावायचे, नंतर जवळपास नऊ  पिढ्या वाईला गेल्या. त्या पूर्वजांचा व्यवसाय वगैरे काय होता हे तर निश्चितच ठाऊक नाही- पण भिक्षुकी, आणि ज्योतिष्य  हाच असावा.

नंतरच्या काळात जेंव्हा शिवाजी महाराजांच्या काळात कुलकर्णी पद मिळाले,   तेंव्हापासून  कुलकर्णी हे उपनाम वापरण्याची प्रथा सुरु झाली ती आजतागायत सुरु आहे. आमच्या पैकी बरेच लोकं अजूनही अगस्ती किंवा थेटे आडनांव लावतात. अजूनही वडील कोणी थेटे नावाचे किंवा अगस्ती आडनावाचे भेटले की आधी तुमचे गोत्र कुठले अशी चौकशी करतात. असो. अजूनही बरंच काही आहे, पण हे पोस्ट माझ्या वंश वृक्षा बद्दल लिहिण्यासाठी सुरु केलेले नाही, हे तर जस्ट लिहिण्याच्या ओघात लिहिल्या गेले.

नाशिकचे भटजी लोकं ! त्यांना पाहिलं की गरीब बिचारा ब्राह्मण हा गोष्टीतून हद्द पार झालाय ह्याची जाणीव होते. १०८ पिंपळ असलेल्या स्मशाना जवळ केला जाणारा  नारायण नागबळी आणि   आणि कालसर्प योगाची पुजा करुन सगळेच भटजी लोकं छान पैसे वाले झालेले आहेत. लहानपणापासून ऐकत आलेला तो गोष्टीतला गरीब बिच्चार ब्राह्मण हद्दपार झालेला पाहून बरं वाटलं.

जेंव्हा पासून काका आजोबांनी तो वंशवृक्षाचा कागद दाखवला होता, तेंव्हापासून माझ्या मनात एकदा तरी नाशिकला जाउन आपल्या डोळ्यांनी स्वतः ती कागद पत्र पहाण्याची इच्छा होती. जेंव्हा माझी धाकटी बहीण नाशिकला स्थाईक झाली तेंव्हा पासून नाशिकला जाणे सुरु झाले.

एकदा त्र्यंबकला गेलो असता, आमचे पुर्वानूपार पिढी दर पिढी डेटा लिहून ठेवणारे श्री शुक्ल गुरुजी यांच्या घर शोधत त्यांच्या घरी गेलो.  अर्थात ही गोष्ट मी लिहितोय ती १२-१५वर्षापूर्वीची  . त्या गुरुजींनी आमच्याकडे थिजलेल्या लुकलुकत्या डोळ्यांनी पाहिलं. समोरच्याच खोलीत ते मांडी घालुन बसलेले होते. त्यांना नमस्कार केला . त्यांनी माझं नांव आणि गोत्र  विचारलं.

मी थोडं जोरातच (त्यांना कमी ऐकू येतं म्हणून)  अगस्ती गोत्र आणि महेंद्र भास्कर कुलकर्णी एवढं नांव  सांगितल्या बरोबर  त्यांनी ताबडतोब,    आजोबा,पणजोबा, खापर पणजोबांची आणि त्याही पूर्वीच्या पूर्वजांची  नावं धाड धाड म्हणून दाखवली. म्हणाले की हे सगळे इथे पूर्वी येऊन पुजा करून गेले आहेत.

अर्थात ,माझा  विश्वास बसला नाही , त्यांना विचारले हे जे तुम्ही सांगताय ते खरं कशावरून??  कदाचित तुम्ही स्वतःच्या  मनाने काही सांगत असाल? त्यांनी एक जुनी जीर्ण झालेली चोपडी काढली आणि त्यामधे माझ्या आजोबांची काळ्या शाईने केलेली सही  आणि तारीख, तसेच पणजोबांची पण सही आणि त्यांनी त्र्यंबकला भेट दिली होती ती तारीख आणि सही  दाखवली. ते पाहिल्यावर त्यांनी लिहून ठेवलेले ्त्यांच्या पुढल्या पिढी मधे माझ्या वडीलांचे लिहून ठेवलेले नांव दाखवले. मी म्हंटलं की हे तर ठीक आहे, हे इतक्यातलेच म्हणजे याच शतकातले  आणि फार तर मागल्या शतकातले आहेत, पण त्यापूर्वीचे काही पुरावे आहेत का?

. . म्हणाले की जुना डेटा हा नवीन वही मधे ट्रान्स्फर केला जातो . जुना कागद काही शतकांच्या नंतर खराब होतो आणि म्हणून जास्त जुने कागद ठेवता येत नाही. फार जुना झाला की कागदाचा तुकडा पडतो . त्यांचं म्हणणं पटलं .अगदी कुठल्याही प्रकारचे कॉम्प्युटराइझ्ड साधनं नसतांना अशा प्रकारे लिखित स्वरुपात डेटा गोळा करून ठेवणे म्हणजे एक प्रकारचे आश्चर्यच आहे

नंतर बराच वेळ त्यांच्याकडे बसून त्यांनी हा जुना  ठेवा कसा काय  जपून ठेवलाय ह्याबद्दल चौकशी केल्याबरोबर ते एकदम भरभरून बोलायला लागले. म्हणाले खूप अवघड आहे हे काम, पण देवाच्या दयेने सगळे निट  चाललंय आज पर्यंत .जुन्या लोकांना हा अशा प्रकारचा डेटा इथे जमा करून ठेवला जातो हे माहिती आहे, पण नवीन पिढीला मात्र याची काहीच कल्पना नाही. थोडं वैशम्य दिसलं त्यांच्या चेहेऱ्यावर.. समोर ती चोपडी केली, म्हणाले की तुमची सगळी पुढली माहिती लिहून ठेवा इथे म्हणजे तुमच्या पुढल्या पिढ्यांसाठी. मी  त्यांनी समोर केलेल्या तशाच चोपडी मधे स्वतःचे , सौ चे, मुलींची  नांवं लिहून सही केली- आणि  त्याच बरोबर आपण आज एका ऐतिहासिक कागदावर सही केल्याची जाणीव झाली की जो पुढ कमीत कमी दोन तिन शतकं तरी नक्कीच जपून ठेवला जाईल. उगीचच खूप नॉस्टेल्जिक वाटायला लागलं, आणि  आमच्या  त्या पिढीजात पुरोहितांना पैसे देऊन आणि पूजा सांगून परत  निघालो.

जाता जाता, त्यांचं एक वाक्य मात्र सारखा पाठलाग करत होतं, तुम्हाला दोन्ही मुली? मग आमच्या पुढल्या पिढ्यांचं कसं व्हायचं??

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , , , . Bookmark the permalink.

56 Responses to वंश वेल

 1. mau says:

  मी पण माहेरुन कुलकर्णीच..योगायोग..
  चांगले लिहीले आहे..तुमच्या लिखाणाबद्दल तर बोलायची सोयच नाही..जे लिहाल ते अप्रतिम..मनाला भावुन जातं.

  • धन्यवाद ..
   खरं तर हे पोस्ट लिहिण्याचे कारण म्हणजे ज्यांना अशा प्रकारची माहिती त्र्यंबकेश्वरला जमा करून ठेवण्याची पध्दत आहे ही गोष्ट माहिती व्हावी एवढाच आहे. थोडे फार लोकं तरी आपली मुळं शोधायचा प्रयत्न करतीलच हे पोस्ट वाचून.. 🙂

 2. खूप इंटरेस्टींग माहिती…तुमचे पूर्वज वाईचे म्हणजे आमच्याच गावचे..खूप बरे वाटले वाचून…म्हणजे आपण दोघे गावकरीच…..(ये दुनियाSSSSSS गोल है)
  ही पद्धत खूप चांगली आहे…माहिती स्टोअर करून ठेवायची..पण तिचा उपयोग असा काही लक्षात येत नाही…त्या भटजींना किंवा अजूनही कोणालाच ह्या इतक्या माहितीचा काहीतरी उपयोग करता आला तर ह्या पद्धतीचा काही फायदा आहे असे म्हणता येईल…कदाचित individually फायदा असेलही..माहित नाही..
  आहे त्या व होऊन गेलेल्या पिढ्यांनी काय केले ते पुढच्या पिढ्यांचे टेन्शन घ्यायचे. असे माझे तरी मत आहे…त्यामुळे…….

  • फायदा ?? अर्थात आहे -माझ्या मते – कारण मला वाटतं की प्रत्येकालाच माझ्या प्रमाणेच आपले पुर्वज कोण आणि काय करायचे हे जाणून घेण्याची इच्छा होत असेलच. अशी माहिती इंडीव्हिज्युअली महत्वाची असतेच-प्रत्येकाच्या दृष्टीने. .

 3. mau says:

  तेही खरच आहे..आपल्या पुर्वजांबद्दल माहिती असणे जरुरी आहे.ह्या लेखामुळे पुन्हा एकदा माझ्या सासर आणि माहेरची मुळं कुठपर्यंत आहेत… हे शोधकार्य आज पासुनच सुरु करते..

 4. काका असाच प्रसंग हल्ली घडला, माझ्या मित्राचे वडील गेले आजारपणात मग त्यांच्या खाजगी कागदपत्रात त्यांच्या मागच्या ५ आणि पुढल्या २ पिढीचा उल्लेख होता आणि तो कागद जवळपास ७०-८० वर्ष जुना होता आणि माहिती एकदम अचूक होती..
  खरच आश्चर्याची गोष्ट आहे ही

  • सुहास
   पूर्वी पध्दत होती अशी माहिती गोळा करून ठेवायची. आणि खरं सांगतो तिथे जेंव्हा माझ्या पणजोबांचे हस्ताक्षर पाहिले, तेंव्हा तर खूप छान वाटले होते. हल्ली लोकांना माहिती पण नाही या बद्दल म्हणुनच हे पोस्ट लिहायला घेतलं.

 5. सागर says:

  काका
  मागे एकदा मी घरच्यांसोबत फिरायला गेलो होतो तेव्हा एके ठिकाणी आम्हाला असाच अनुभव आला.
  मला गावाचे नाव आठवत नाहीये पण आमच्या घराण्याची पूर्ण माहिती त्यांच्याकडे होती.
  अन आम्ही सुद्धा कुलकर्णीच 🙂

  • अशा प्रकारे हरीद्वारला पण बरीच माहिती मिळू शकते. असे म्हणतात. हे सगळं आश्चर्यकारकच वाटलं मला.

 6. vidya patil says:

  dhanyvad khupach chhan mahiti milali

 7. >>तुम्हाला दोन्ही मुली? मग आमच्या पुढल्या पिढ्यांचं कसं व्हायचं??

  • शिरीष
   खरंच थोडं हसू आलं तेंव्हा..

   • smita says:

    kharokar tumhala donhi mulich aahet ka???? aani maze gav kolhapur aahe….. tar mala pan ashich mahiti milel ka…. malapan tumcha sarkhe mmazya purvjachi mahiti kadhayala aavdhel…… kharokhar

    • स्मिता
     होय. मला वाटतं की तुम्ही जर त्र्यंबकेश्वरला जाऊन तपास केला तर नक्की माहिती मिळेल .:) ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार.

 8. रोहन says:

  मस्त पोस्ट…. आणि तो पण माझा आवडता विषय… इतिहास.. 🙂
  असे वंशवेल तयार केले गेले पाहिजेत… मी स्वतः काही जुन्या पुस्तकांवरून माझी माहिती मिळवायचा प्रयत्न काही वर्षे करतोय पण अजून यश नाही.. नाशिकप्रमाणे कार्ला येथे सुद्धा बरेच भटजी राहतात.. मुंबई आणि परिसरातील बऱ्याच सोमवंशी क्षत्रिय लोकांची कुलदेवता एकविरा आई. तिकडे सुद्धा अशी बरीच माहिती मिळू शकते. मी माझ्या आधीच्या २ आणि त्यांच्याकडून त्यांच्या आधीच्या २ अश्या एकूण ५ पिढ्यांची माहिती एकत्र केलेली देखील आहे..

  आमचे मुळ आडनाव शिंदे होते बहुदा.. राजा बिंब याने आमच्या पूर्वजांपैकी कोणालातरी ‘चौधरी’पणा इनाम दिल्यापासून चौधरी हे आडनाव लागले. आता अजून माहिती मिळवायचा प्रयत्न करणार.. आभार… 🙂

  • रोहन
   आपल्या पुर्वजांबद्दल काही तरी माहिती असावी असे नेहेमीच वाटत असते. शोधायचा प्रयत्न कर , नक्कीच कुठेतरी माहिती मिळेल. मंदिरात मिळण्याचा मला चान्स जास्त वाटतो.

 9. sushma says:

  kaka,
  khup interesting aahe he sarv….itkya varshachi mahiti guruji kade aste aasharya watal…..aaplya magchya pidhyanch yekayla chan watat asel…………post ekdum bhari………..

  • सुषमा
   त्यांची मेमरी एकदम ग्रेट होती. एकही पोथी न उघडता, घडा घडा माझ्या आधिच्या दहा पिढ्यांची माहिती मुखोद्गत होती त्यांना. मी तर आश्चर्यचकितच झालो होतो.

 10. Rajeev says:

  अगस्ती ….. बापरे समुद्रा आणी तुमची सांगड आहे….मीठाचा वीचार करावा लागेल ….
  आपणा समस्त लोकां चे पुर्वज झाडावर राहायचे म्हणून त्या आक्रूतीला वंशवृक्ष म्हणत असावेतलीच….काहींचा वंश माकडेच( ब्लोग वरचे लेख चोरणारे -ते हुप्पे) पुढे चालवतात असे ही दीसून येते……………..
  मुळ अमीबा आहेच….

  • राजिव
   वंशवृक्ष, अरे हो, पण हे नांव काही मला आठवलं नाही म्हणुन वंश वेल लिहिलंय.
   मिठाचा विचार… हा हा हा…. 🙂

 11. MAdhuri says:

  good information. ethe Americat tar ajun complicated prakar asto karan anek lagne ani tyanchi mule..pun tari baryapaiki mahiti thevleli aste.

  generally aply panjobancha paryantach nave mahit astat

  • पणजोबांपर्यंत माहिती असतं. मी सहज मुलींना विचारलं की आजोबांच्या वडिलांचे नांव काय होते? तर त्यांना सांगता आले नाही. आता सगळं पाठ करून घेतलंय. 🙂

 12. bhaanasa says:

  रंजक विषय आणि तितकीच रोचक माहिती. 🙂 आमच्याकडे दोन्ही बाजूंनी खापरपणजोबां पर्यंत माहिती आहे. परंतु त्यापुढचे शोधायला गेलो तर चक्क सातबारामध्ये नावे सापडली. सातबारा प्रकार कधी सुरू झाला कोण जाणे पण खापरपणजोबांनी नावे नोंदवली असतील त्यात. दरबारी मिळणा~र्‍या पदांवरून तर अनेक आडनावे निर्माण झाली. सरदेसाईही त्यातलेच. 🙂

  बाकी गुरुजी व्यवसायाला एकदम पक्के आणि धोरणीही. 😀 जाता जाता मुद्द्याचे बोलून गेले.
  पोस्ट झकास.

  • दरबारी काम सुरु झालेली आडनांवं अजूनही वापरात आहेतच. पण आपलं जुनं आडनांव काहीतरी वेगळं होतं हे वाचून मजा वाटली. आमच्यातलेच काही लोकं अगस्ती आडनांव लावतात- तर काही थेटे.
   गुरुजींनी बाकी खरंच सिक्सरच मारला होता जातांना. 🙂

 13. आल्हाद alias Alhad says:

  “त्या पिढीजात पुरोहितांना पैसे देऊन आणि पूजा सांगून परत निघालो.”

  पैसे देऊन हा उल्लेख खटकला… तिथे ’दक्षिणा’ असं हवं होतं नाही का?

  • आल्हाद
   बरोबर आहे तुझं. दक्षिणा हा शब्द जास्त योग्य झाला असता. दुरुस्त करतोय . धन्यवाद.

 14. sahajach says:

  मस्त माहिती आहे महेंद्रजी…. मला लहानपणी आमच्या गेल्या सात पिढ्या माहित होत्या… आजोबांनी नावं वगैरे पाठ करून घेतले होते…. मजा यायची त्या आठवणी ऐकताना…..

  हल्ली जेव्हा मुलांना आपली आते-मामे-मावस भावंडही पटापट आठवत नाहीत तेव्हा तुमच्या या पोस्टचे महत्व जास्त वाटतेय…. 🙂

  • अगदी बरोबर. आपल्या आजोबांच्या वडिलांचे नांव पण माहिती नसते. हे पोस्ट लिहिलंय कारण लोकांना कमित कमी अशी माहिती मिळू शकते हे समजावे इतकेच आहे. थोडे फार लोकं तरी नक्कीच शोध घे्तील.

 15. Vidyadhar says:

  काका, मी पण एकदा माझ्या आईकडूनचा कुलवृत्तांत पाहिला होता. अगदी छान छापील पुस्तक होतं. त्यात माझं आणि माझ्या भावाचंही नाव होतं. पण आमच्या पुढे काहीच नसणार… कारण आई तिकडची मुलगी आहे ना! 😦
  तेव्हा वडलांच्या बाजूनंचा कुलवृत्तांत शोधायचं तेव्हा ठरवलं होतं, मग राहून गेलं आता बाबांना विचारतो.. 🙂

  • विद्याधर
   नाशिकला गेल्यावर चौकशी करून पहा , काहीतरी माहिती मिळेलच. 🙂

   • sahajach says:

    विद्याधरा नासिकला येण्याचे आणि एक कारण मिळाले बघ…. आता तरी नक्की येशील 🙂

 16. आमच्याकडे ‘ओक कुलवृत्तांता’चं मोठं पुस्तक आहे. बाबा नेहमी बघतात ते .. पितृपंधरवड्यात पक्ष वगैरे करताना.. त्याची आठवण झाली.

  • ही पध्दत होती मध्यंतरी , बरेच लोकं कुलवृत्तांत लिहून ठेवायचे, खुप चांगलीपध्दत आहे ती.

 17. Rajeev says:

  सर्व लोकांच्या बायकांना नवर्याच्या साठ पीढ्या माहीत अस्तात…..
  भांडून बघ…
  कसा उद्द्दार होतो

 18. ajit rangnekar says:

  Mahendraji,
  Baryach divasani me blog var aloy. ase asale tari jevha vel milel tevha tumcha blog avashya vachato. khup chan lihita tumhi! shivay vishay suddha kiti vegale and vedhak nivadata. hats off to you! ha vishay pan ranjak ahe, khas karun pratyekachya manat aple mool va kool shodhun pahave asa vichar kevha na kevha yetoch. mala swatahla pan ya baddal ek vegale akarshan ahe… tyala chalana dilyabaddal dhanyawad! keep blogging! asech lihit raha ani amachya sarakhyana vegvegalya vishayanchi ranjak mahiti milu dya.

  • अजित
   मनःपुर्वक धन्यवाद. तुमच्या कौतुका मुळेच लिहिण्याचा उत्साह टीकुन आहे . नाहीतर कधीच या ब्लॉग ने मान टाकली असती.

 19. तुषार कुलकर्णी says:

  आस्खेड (तालुका : बागलाण/सटाणा, जिल्हा : नाशिक ) ह्या आमच्या मूळ गावी, तेथील ब्राम्हण परिवाराकड़े आमची वंशावळ बघायला मिळाली. परंतु Documentation म्हणावे तेवढे नीट नव्हते. माझ्या वडिलांनासुद्धा (जन्म: १९५०) त्या वंशावळीतील काही नावे ओळखता आली नाहीत. मी त्या जुन्या document मधला आवश्यक तेवढा भाग घेऊन स्वताची Computerised वंशावळ तयार केली आहे. http://www.geni.com या website वर आपण ती बनवू शकता. अन्य हि काही websites आहेत.

  • तुषार
   माहिती साठी आभार. पण तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल तर त्र्यंबकेश्वरला गेल्यावर चौकशी करू शकता. पुर्वीच्या काळी अशी प्ध्दत होती, की तिर्थ क्षेत्रीगेल्यावर आपलं नोंव नोंदवून ठेवायचे.
   प्रयत्न करायला हरकत नाही.. 🙂
   त्या साईट साठी आभार.. 🙂 छान साईट आहे.

 20. akhil joshi says:

  apratim…
  maza madhech vishay zala hota mitrakade… ki
  kashi la vanshaval milate… ti javun kadhitari ghevun yayacha….

  asha nondi vagaire apan kahich karat nahi.. nidan te mahit karun ghevun kahitari nischitpane karata yeil.. nidan apalya parighapurate tari pratyekala…. nahi ka?

 21. रेणुका says:

  dada.. itki interesting mahiti vachun khupch maja vatli.. mala pan nahi mahit aplya ajobanche naav :p .. Mumbai la ali tar mala nakki dakhavshil..

 22. रेणुका says:

  sorry.. ajobanchya vadlanche..

 23. poojaxyz says:

  blog aavadalaa, pan mala te gurujinche shevatche waakya aavdale naahi):
  vansh-vel hi striyanmule chalte, purushanmule naahi.
  muli aaplya saasar kadhe hi tyaanchi vansh-vel waadvu shaktaat naa?
  aso, comment na aavadlyaas sorry!:)

  • जुन्या लोकांचे तसेच व्ह्युज होते. हल्ली बदलले आहेत. लोकं पण शहाणे झाले आहेतच.. 🙂

 24. ओमकार बिन मालोजीराव says:

  झकास माहिती दिलीत काका !
  यावरून आठवलं कि आमच्याकडे एक जुना पुस्तक होता , ‘जगदाळे कैफियत नामा’ या नावाचा त्यामध्ये पण गेली १५० वर्षे सोडता घराण्याची वंश वेल होती , पण त्याकाळी सरदार (म्हणजे संता-बंता वाला सरदार नाही हं) घराणं असल्याने जास्तकरून शिवकालीन युद्धाचीच पत्रे जास्त होती, त्यामुळे संदर्भ तुटक आहेत ! पूर्वी म्हणजे, म्हणजे अगदी आतासुद्धा गावाकडे काही लोक येतात आणि वंशवेल सांगतात …काहीतरी स्पेसिफिक लोक असतात बहुतेक ब्रम्हभट म्हणतात त्यांना …तुम्हाला काही माहिती आहे का यांच्या बद्दल !

  • ओमकार,
   ब्लॉग वर स्वागत..
   ब्रह्मभट .. नाही कधी ऐकलं नाही त्या बद्दल. तुमच्या जगदाले घाराण्याची अजूनही पुर्वीची वशवेल सापडू शकेल . बहूतेक बऱ्याच धार्मिक ठिकाणी अशी माहिती गोळा करून ठेवलेली असते.. कधी गेलात तर चेक करा नाशिकला, वगैरे..

 25. Gurunath says:

  ayla wai mhanje satari pani…. javali chya paythyashich agadi……. amhi pan satarchech mul gav karad talukyat Shamgao…… arvachin kali saambgaav(vipul shivamandiranmule) madhyayugat… sataryachya gadi khalache ek thikan, pudhe sansthan aundh……

  majhya purvajanchi mahiti mala 1100 AD pasunchi nahi…… pan 8 -10 pidhya mahit aahet
  amache kulapurush mhanje shivbhakt narayanswami kshirsagar he ahet…. vitya javal eka gavat tyanchi samadhi aahe…. typical sant…. samadhivar ek juicha vel ahe v adesh aahe “jovar vel hirava tovar mi ahe”

 26. Piyu says:

  काका लेख एकदम मस्त… शेवटचे वाक्य एकदम भारी … 🙂

  आम्ही पण सातारचे.. खटाव तालुक्यातल्या ललगुण गावचे… 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s