नाती

कधी कोणाशी आपण कसे जोडले जाऊ ते समजत नाही. परवाच लोकसत्ता मधल्या एका लहानशा बातमीने लक्ष वेधून घेतलं. त्यात लिहिले होते की   प्राची पाटकर यांचे डेंग्यु च्या आजाराने निधन झाले.  अगदी आत्ता आत्ता पर्यंत हे नांव पुर्णपणे अपरिचित होते. कधीच  न  ऐकलेले हे नाव गेल्या काही दिवसांपासून खूप परिचयाचे वाटणे सुरु झाले होते.

कदाचित ही बातमी ” त्या रक्तदानाच्या” प्रसंगापूर्वी वाचनात आली असती, तर नक्कीच सहज एक नजर टाकुन.. असेल कोणीतरी म्हणून नजरेआड झाली असती- पण  आता मात्र ती बातमी   एकदम उदास करून गेली.

बरेचदा आपण अगदी अनोळखी व्यक्तीशी पण  आपल्याच नकळत  मानसिक दृष्ट्या जोडल्या जातो. ते कधी आणि कसं होतं ते लक्षात पण येत नाही. एकदिवस दुपारी साधारण दिडच्या सुमारास एक बझ पाहिला  . त्यात लिहिले होते

” प्राची पाटकर या तरुण मुलीला लहान वयातच एका दुर्धर आजाराशी लढा द्यावा लागत आहे .आतापर्यंत १७७ बाटल्या रक्त देण्यात आले आहे;पण अजूनही ओ+ या रक्तगटाच्या रक्ताची नितांत गरज आहे.जे कोणी रक्तदान करण्यास इच्छुक असतील ,त्यांनी कृपया xxxxxxxxx या क्रमांकावर स्मृती पाटकर यांच्याशी संपर्क साधावा”

बझ वाचल्यावर त्या बझ मधे दिलेल्या नंबरवर फोन केला. फोन उचलला प्राचीच्या आईने म्हणजे स्मृती पाटकर यांनी, त्यांनी सांगितलं की आतापर्यंत   १८० बाटल्या रक्त दिलं आहे , आणि अजूनही रक्ताची गरज आहे. तुम्ही स्वतः बरोबर जर अजूनही कोणाला आणू शकाल तर मदत होईल.

स्वतःशीच विचार केला   की आपण शेवटलं रक्त दान कधी केलं होतं ते. सहा महिन्यांपेक्षा जास्त वेळ होऊन गेला होता. मी त्यांना म्हंटलं की मी येतो आहे रक्तदानासाठी – साधारण साडेतीन ते चार च्या सुमारास . लिलावतीला  पोहोचलो आणि पुन्हा स्मृती पाटकर रांना फोन केला की मी आलोय, कुठे यायचं ते सांगा.त्या म्हणाल्या की दुसऱ्या मजल्यावर रक्त पेढी आहे तिकडेच या. तिकडे गेल्यावर समोरच त्या उभ्या होत्या.म्हणाल्या डेंग्यु  मुळे तिला लिलावतीला अ‍ॅडमिट केलंय. त्यांचा चिंताग्रस्त चेहेरा बघुन काही जास्त विचारले नाही.तिथेच अनुजा सावे पण भेटली.रक्त देऊन झाल्यावर विचारलं तर  प्राचीला पहाता येणार नाही , कारण ती सध्या आयसीयु मधे आहे असं त्या  म्हणाल्या .

दुसऱ्या दिवशी प्रमोद देवांनी फोन केला आणि काय परिस्थिती आहे याची चौकशी केली.  डेंग्यु मधे रक्तातले पॅलेट्स कमी होतात, त्यासाठी पुन्हा पुन्हा नवीन रक्तातले पॅलेट्स काढून तिला द्यावे लागत आहेत असे त्यांनी प्रमोद देवांना    सांगितले. ते पण जाऊन रक्तदान करून आले.

नंतर त्यांचा मला फोन आला, म्हणाले, की त्या स्मृती पाटकर ओळखीच्या वाटतात- पण कुठे पाहिलंय ते आठवत नाही- शोध  घेतो नेट वर. नंतर त्यांचा मेल आला, की ह्या स्मृती पाटकर म्हणजे टिव्हीवर चार दिवस सासूचे, धुंद, दामिनी, सबक , झूंज , या सुखानो या, अशा अनेक   मालिकेत काम करायच्या, त्यांच्या वर लोकप्रभामधे आलेल्या एका लेखाची लिंक पण त्यांनी पाठवली.   तसंही माझं आणि टिव्ही चं सख्य कमीच- आणि तसंही आमच्या घरी पण मराठी मालिका पहाण्याची आवड नसल्याने- मी त्यांना एकदम ओळखू  शकलो नाही .

नेहेमीच्या सवयी प्रमाणे – आपण रक्त दिलेल्या पेशंटची तब्येत कशी आहे हे विचारायला म्हणून चार दिवसानंतर  स्मृती पाटकरांना   फोन केला आणि प्राचीची चौकशी केली, तेंव्हा त्या म्हणाल्या की आता तशी बरी आहे पण अजूनही पुर्ण बरी झालेली नाही. त्या असंही म्हणाल्या की तिला घेतल्या शिवाय मी पुन्हा घरी न जाण्याचे ठरवले आहे .मी  याचा अर्थ तिची तब्येत सुधारते आहे असा घेतला. एका आईचे ते पुर्ण आत्मविश्वास पुर्ण उद्गार फोन वर ऐकून बरं वाटलं.

पण नंतर केवळ एकाच आठवड्यात प्राचीच्या मृत्य़ुची  बातमी वाचली आणि  एक जवळचा सुह्द गेल्याप्रमाणे वाटले. या  आयुष्यात कशी कुणाशी नाती जोडली जातील ते सांगता येत नाही ह्याचा  पुन्हा ए्कदा अनुभव आला. स्मृती पाटकरांशी  फोनवर पण बोलायची हिम्मत होत नव्हती. लहानशा आयुष्यात म्हणजे वयाच्या २३-२४ व्या वर्षी प्राचीचे जाणे मनाला चटका लावून गेले हे मात्र नक्की.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , , , , , , , . Bookmark the permalink.

19 Responses to नाती

 1. सागर says:

  😦

 2. रोहन says:

  खरच रे दादा… तू तर जाऊन आलास.. मी तर इकडून नुसते बझ वाचून आणि मग तुम्ही दिलेल्या बातम्या ऐकून होतो… आल्यावर मला जायचे होते रक्तदान करायला… पण……………

  खरच वाईट बातमी…. 😦

 3. अरेरे खूप वाईट बातमी… 😦

 4. mau says:

  खुप वाईट झाले… 😦

 5. इतक्या तरूण वयात असे एकाएकी जाणे म्हणजे….कल्पनाही करवत नाही त्या घरावर काय परिस्थिती असेल.
  कधी कधी मनुष्य हतबल होतो. प्रयत्नांशिवाय त्याच्या हातात काही नाही हेच खरे…

 6. ngadre says:

  very sad and shocking. Recently brought my father in law out of dengue after hospitalization. Same complication. Platelet count fell below dangerous level and kept falling.

  23 24 is not the age to give up on dengue. Must be some serious strain of micro organism and should be researched on.

 7. खूप वाईट झालं. त्यादिवशी ती बातमी बझवर आणि पेपरात वाचून कसंतरीचं झालं होतं 😦

 8. मी गेल्याच महिन्यात रक्तदान केलेले असल्याने रक्तदान करु शकलो नाही पण मी माझ्या ब्लॉगवर तिला रक्तदान करण्यासाठी आव्हान केले होते.त्यादिवशी बझवरच ही बातमी कळली,खरच खुप वाईट वाटल…. 😦

 9. ऐकून फ़ार वाईट वाटलं. मी स्वत: नियमीत रक्तदाता आहे आणि न चुकता वर्षांतुन ३ वेळा रक्तदान करतो. ज्या कुणाला नियमीत रक्तदान करण्याची इच्छा असेल ते http://www.indianblooddonors.com या संकेतस्थळावर नोंदणी करु शकतात. तुम्ही केलेल्या प्रयत्नाबद्दल अभिनंदन काका.

 10. sahajach says:

  खूप वाईट वाटते असे काही कानावर पडले की 😦

 11. sonal says:

  kharay Kaka. kharach chataka lawun jatat asha ghatana, wyakti. nitas kalat nahi kaay hotay te pan aatun aatun aswsth hot rahayla hot.
  as eiklay ki papayachya panacha ras ha yawarcha aascharykarak upay aahe.

 12. श्रेयाने मला जेव्हा बातमी सांगितली की प्राची पाटकर गेली…तेव्हा मी देखिल कितीतरी वेळ सुन्न झालो होतो. खरंतर मी तिला पाहिलेलंही नव्हतं किंवा दूरान्वयानेही तिची ओळख नव्हती…पण का कुणास ठाऊक आपलंच जवळचं कुणीतरी गेल्यासारखं वाटतंय. 😦
  तिच्या आईबाबांना हे दु:ख पचवण्याची शक्ती मिळो हीच प्रार्थना.

 13. bhaanasa says:

  गेल्याच महिन्यात तुम्हा सगळ्यांचे बझवर झालेले आवाहन आणि रक्तदान वाचले होते आणि आता ही बातमी. खरेच ओळख नसूनही फार वाईट वाटतय. 😦 तुम्ही तर प्रत्यक्ष जाऊन तिच्या आईला भेटून आलात. श्रध्दांजली.

 14. poojaxyz says:

  malahi vaachun khup waait waatle, mi sudha tumchya bhavnanshi sahamat aahe(:
  maaf kara pan, hya smirti paatkar kon?tumhi ti lokprabha chi link patvaal ka?jar tumchaakade asel tar?
  punha ekdaa sorry and thanx!
  rakshabhandnachyaa haardik shubechaa!!!

 15. vikram says:

  आयुष्यात कशी कुणाशी नाती जोडली जातील ते सांगता येत नाही हे खरय काका
  तुमचे तर तसे ‘रक्ताचच’ नात झाल होत
  😦

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s