“श्वास” हा एक अतिशय वाईट्ट सिनेमा आहे.


श्वास हा एक अतिशय वाईट्ट सिनेमा आहे.
आज पर्यंत जितक्या वेळेस पाहिला असेल तितक्या वेळेस डोळ्यातून पाणी काढलंय त्या सिनेमाने.  इतकं असूनही तो सिनेमा पुन्हा पुन्हा पहाण्याची इच्छा का बरं होते? बरेचदा तर मुद्दाम खूप उदास व्हायचं  म्हणूनही हा सिनेमा लावला जातो. जसे बरेचदा रात्री उशिरा ’ तलत ’ ऐकावासा वाटतो, तसेच  ह्या सिनेमाचे होते माझ्या बाबतीत.

ती सिडी लावली की एक  प्रकारे  स्वतःची मानसिक तयारी केलेली असते, की सिनेमा पहातांना कसंही करून डोळ्यात पाण्याचा टीपूसही येऊ द्यायचा नाही. पण थोड्याच वेळात त्या सिनेमामधे इतका गुंतून जातो की आपण कधी आवंढे गिळणे  आणि डोळ्यात येणार पाणी थोपवणं सुरु करतो ते माझं मलाच   लक्षात येत नाही. डोळे भरून यायला लागले की मग  मुद्दाम  श्वास रोखून धरणं सुरु होतं, डोळ्याच्या कडेवर पोहोचलेले पाणी अगदी निग्रहाने परतवायची कसरत सुरु होते. पापणी लवली, तर कदाचित ते  खालच्या पापणी मधे अडकून राहिलेले ( की ठेवलेले) ते दोन चार थेंब बाहेर येतील, म्हणून पापणी पण लवू द्यायची नाही.

शेजारी बसलेली बायको डोळे पुसत असते,   तेंव्हा हळूच  उठून जायचं – किंवा  मग आजूबाजूला कोणाचे लक्ष नाही असे पाहून थोडं टेन्शन रिलीज करण्यासाठी किचन मधे दौरा करून थोडं पाणी पिऊन, चेहेऱ्यावर पाणी मारून आणि काही तरी खायला डिश मधे काढून बाहेरच्या खोलीत यायचं, आणि जणू काही झालंच नाही अशा तर्हेने सिनेमा पहाणं सुरु ठेवायचं.

आपल्या समाजात, पुरुषांनी बहूतेक भावनाशुन्य राहिलं पाहिजे अशी अपेक्षा असते. मग स्वतःच आप्तेष्ट जरी वारले, तरी तो हुंदक्यांचा कढ मनातल्या मनात ठेवून आवंढे गिळत उभं रहायचं- बस्स!! पुरुषांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले की तो कमकुवत मनाचा  असे   समजले जाते.

पुरुषांना मन नसते – की भावना नसतात? दोन्ही असतं , तरी पण परीक्षेच्या प्रसंगी  डोळ्यातून पाण्याचा थेंब ही बाहेर पडू न देण्याची खबरदारी घ्यावी लागते.  ती एक जाहिरात आहे नां.. ” माय डॅडी स्ट्रॉंगेस्ट” अशी.. तसंच काहीसं.. मग तशीच प्रतिमा (नसलेली ) मेंटेन करायची जबाबदारी त्या गरीब बिचाऱ्या ( स्ट्रॉंगेस्ट) डॅडी वर पडते. आणि तो आपला निकराने डोळ्याच्या कडांपर्यंत पोहोचणारे अश्रू परत पाठवण्यासाठी स्वतःच्याच मनाशी जीवघेणी लढाई लढत असतो.ज्या प्रसंगाला स्त्रियांना मोकळेपणाने रडण्याची मुभा दिलेली आहे आपल्या समाजाने, त्याच प्रसंगात पुरुषाने मात्र खंबीर रहावे अशी अपेक्षा असते.

डोळ्यात  पाणी येणं म्हणजे मनाच्या कमकुवतपणाचे लक्षण आहे का? छे! मला तरी तसे वाटत नाही. तो एक सुसंस्कृत मनाचा, भावनांची  अभिव्यक्ती  करण्याचा एक मार्ग आहे. आपण  सेन्सेटिव्ह असतो, म्हणून   डॊळ्यात अश्रू येतात, नाही तर आपल्या मधे आणि दगडामधे काय फरक राहिला असता??

इथे डोळ्यातून पाणी काढणं हा अगदी कृड शब्द वापरलाय, त्याला अश्रू शिवाय दुसरा शब्दच नाही. कुठलाही प्रसंग असो धीरोदात्त पणे त्याला तोंड दिले पाहिजे, असे म्हणतात , अर्थात त्या साठी कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. पण एकदा मनातला कढ  अश्रूंच्या रुपाने बाहेर पडल्यावर जो मनाला मोकळेपणा येतो त्याला कशाची उपमा कुठल्याच गोष्टीला देता येत  नाही. काही गोष्टी शब्दातीत असतात, त्यातलीच ही एक. कदाचित म्हणूनच बरेचदा असं वाटतं की मनसोक्त रडावं.. आणि मन हलकं करावं. ही प्रत्येक सेन्सिटिव्ह माणसाची रिक्वायरमेंट असतेच. कोणी पूर्ण करतो , तर कॊणी………असो..

जितक्यांदा  श्वास पहातो तितक्या वेळेस सिडी लावण्यापूर्वी मनाला बजावून ठेवतो, की बास झालं, आज पर्यंत बरेचदा पाहिलाय  हा सिनेमा, जास्त भावना प्रधान व्हायचं नाही, प्रत्येक फ्रेम च्या पुढे काय होणार आहे हे माहिती आहे, उगाच जास्त टेन्शन येऊ द्यायचं नाही, पण तसं होत नाही.

कदा सिनेमा सुरु झाला की नलावडेंचा अभिनय आणी त्या मुलाचा अभिनय  पाहिला की  डोळ्याच्या कडा ओलावल्याशिवाय रहात नाही. म्हणूनच मी म्हणतो  ” श्वास एक अतिशय वाईट़्ट सिनेमा आहे”

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , , , . Bookmark the permalink.

68 Responses to “श्वास” हा एक अतिशय वाईट्ट सिनेमा आहे.

 1. रेणुका says:

  khara ahe! 🙂
  Mhanun me fakt 2 da pahila.. nantar kadhi himmat nahi jhali.. khup dukhi vatta cinema sampla ki..

 2. mau says:

  शटकार,चौकार ssssssssssssssssss….काय म्हणावे तुम्हाला…सचीनच्या हातात जशी जादु..तशी तुमच्या लेखणीत…माझे बाबा नेहमी म्हणत…पुरुष हा स्त्री पेक्षा जास्त हळवा असतो..लेक सासरी जायला लागली की आई पेक्षा बाबा जास्त हळवा होतो…काही चेह्र्‍यावर दाखवतात तर काहि आतल्या आत…..

  • पुरुषाला आपली एक स्पेसिफिक प्रतिमा जपायची असते. समाजाची नसती बंधनं आहेत ही.. हळवे पणा हा पुरुषांमधे जास्त असतोच, फक्त तो कसंही करून झाकून ठेवायची धडपड करत असतो प्रत्येक पुरुष.

   • समाजाच्या वेगवेगळ्या स्टिरिओटायप्समधे समाजाचा वेगवेगळा भाग जखडला जातो तो असा. बाईने नाजूक असायचं आणि पुरूषाने कणखर(जवळजवळ भावनाशून्यच खरंतर) हे त्यातलंच.
    गंमत अशी आहे की पुरूषाने अमुक तमुक करावे/ करू नये या स्टिरिओटायप्स किंवा संकेतांच्यात पुरूष जमातच इतकी अडकलेली आहे. आणि फार कमी बाप्यांना त्यातून बाहेर यावसं वाटतं. 🙂
    तर तुम्हाला बाहेर यावसं वाटलं याबद्दल अभिनंदन. लेख छान आहे.

    • नीरजा
     गेली कित्येक शतकं आपण ह्याच बेड्या सांभाळत आलोय. भावनाशुन्य असणं हे एक मोठेपणाचं लक्षण समजलं जातं. अजूनही पुरुषांनी आणि स्त्रियांनी कसे असावे याचे निकष हे पाच शतकं जुने आहेत.
     प्रतिक्रि्येसाठी आभार..

     • बरोबर. पण बायांनी सगळा विरोध पत्करून हे निकष तोडायचा प्रयत्न केला आणि पुरूषांना आत्ता त्या बेड्या जाणवायला लागल्यायत असं आपलं माझं अनुमान.

      अवांतर: प्रत्युत्तर वर क्लिकल्यावरही माझा प्रतिसाद वेगळ्या प्रतिसादात का जातोय?

      • नाही, वेगळ्या प्रतिसादात नाही , त्याच थ्रेड मधे येतोय ना प्रतिसाद..
       🙂

      • Smita Ghaisas says:

       That’s because orhodoxy and the criteria therein in general favored men, so they saw no reason to break any bonds. It suited them fine. Women had no choice but to break free from ( at least some of )the criteria laid down for them , because so many of those were not conducive to their growth. It’s only now that men have been revisiting some of those that seem , well…
       inconvenient to keep up with, which is a good thing to do.

       • स्मिता
        सुंदर कॉमेंट. अतिशय सुंदर.. मनापासून आवडलं अनॅलिसिस.. 🙂 प्रतिक्रियेसाठी आभार.

 3. सचिन says:

  महेंद्रजी
  खूपच छान वर्णन केलंय तुम्ही पुरुषांच्या भावनांविषयी. शब्दांची मांडणी अप्रतिम झालीये. 🙂
  मस्त वाटल लेख वाचून. मी श्वास पहिला नाहीये, पण आता शोधावा लागेल.
  धन्यवाद.

  सचिन घायाळ

 4. रोहन says:

  शहरातली मनोरंजनाची ठिकाणे कोणती??? …… “आपण कधी जायचे बघायला???”

  आणि मग तो आजोबा घेऊन जातो नातवाला… ती ठिकाणे बघायला. पहिल्यांदाच… आणि शेवटचे … 😦

  • अरे तो सिन तर अतिशय वाईट्ट आहे. पहिल्यांदा पहिला होता, तेंव्हा एक भाबडी अपेक्षा होती, की आता इतर सिनेमा प्रमाणे त्या मुलाचे डोळे दुरुस्त होतील म्हणून.. 😦

 5. संपुर्णपणे मान्य….

 6. उत्तम! यातून एक फार छान मुद्दा मांडला आहे तुम्ही. “डोळ्यात पाणी येणं म्हणजे मनाच्या कमकुवत पणाचे लक्षण आहे का “- खरं तर कुठलीही भावना व्यक्त होऊ न देणं ही चूकच आहे. त्यामुळे स्त्रियांना रडण्याची मुभा असली तरी त्या रडल्या तरी मनाच्या कमकुवत पणाचे लक्षणच मानले जाते.
  मुळात, रडणे, हसणे ही भावना व्यक्त करण्याची माध्यमे आहेत. रडण्यातून कमकुवतपणा हा निष्कर्ष कसा निघाला हे कोडंच आणि त्यातून पुरूषांना बंदी का हेही कोडंच! राग मान्य पण अश्रू नाहीत.. हा विनोदच आहे.
  (मात्र सिनेमातला नायक रडलेला चालतो, बरं का 🙂 , प्रत्यक्षात मात्र नाही.)

  • पल्लवी
   खरं आहे अगदी.. भावनांचा कोंडमारा असह्य होतो बरेचदा, पण काहीच करू शकत नाही. राग येणं पुरुषी लक्षण< पण डॊळ्यात अश्रू आले तर मात्र ते चालत नाही .
   खरंच कोडं आहे.

 7. जेव्हा ते पोरगं भिरीभिरी नजरेनं सगळे रंग पहात असतं तेव्हा आजोबांचं सगळं लक्ष नातवाच्या नजरेकडे असतं. काहीतरी दिलंय पण काहीतरी गमावणार आहे या संमिश्र भावना लपवत पोरासोबत गंमत पहाणारे आजोबा बघताना देवसुद्धा वाईट वाटायला लागतो.

  • अगदी खरं.. तो सिनेमा म्हणजे माझा एक विक पॉइंट आहे. त्याला सिनेमा पेक्षा एक कलाकृती म्हणणेच योग्य ठरेल.

   “देव सुध्दा वाईट वाटायला लागतो” ………………!!!!!

 8. >>डोळ्यात पाणी येणं म्हणजे मनाच्या कमकुवत पणाचे लक्षण आहे का? छे! मला तरी तसे वाटत नाही. तो एक सुसंस्कृत मनाचा, भावनांची अभिव्यक्ती व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे

  काका…अगदी मनातलं बोललात…

  >> रोहन +१

 9. एकदम बरोबर महेंद्रकाका! पुरुषांनी इमोशनल होणं म्हणजे काहीतरी चुकीचं आहे असा आपल्या समाजात समज आहे. प्रत्येक वेळी डोळ्यात अश्रू येतीलच असं नाही पण अस्वस्थपणा शब्दातून व्यक्त करायला काय हरकत आहे? भरलेलं आभाळ एकतर वाहून तरी गेलं पाहिजे किंवा कोसळलं तरी पाहिजे.

  • “भरलेलं आभाळ एकतर वाहून तरी गेलं पाहिजे किंवा कोसळलं तरी पाहिजे.”
   अगदी बरोबर.. शब्द अपूरे पडतात , मनात काय आहे ते लिहायला..

 10. Ganesh says:

  Mahendra ji Khoop chan aahe lekh…
  Asech eak Sandip Khare ni Salil Kulkarni che gane aahe…
  Damlelya babachi kahani…….. te gane pan dolya madhe tachkan pani aante

 11. vikram says:

  मी पाहिला आहे २ वेळा खरच पाहताना भावनिक होऊन जातो माणूस
  मी पाहिलेल्या आतापर्यंतच्या उत्कृष्ट मराठी चित्रपटांमधील एक आहे श्वास

  पुरुषांच्या भावनांबद्दल आपण जे भाष्य केले आहे त्या आपल्या मताशी पूर्णपणे सहमत
  बाकी हे अप्रतिम आहे –
  “डोळ्यात पाणी येणं म्हणजे मनाच्या कमकुवत पणाचे लक्षण आहे का? छे! मला तरी तसे वाटत नाही. तो एक सुसंस्कृत मनाचा, भावनांची अभिव्यक्ती व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. आपण सेन्सेटिव्ह असतो, म्हणून डॊळ्यात अश्रू येतात, नाही तर आपल्या मधे आणि दगडामधे काय फरक राहिला असता??”

 12. Vidyadhar says:

  काका,
  अगदी खरंय.. पुरूष प्रचंड हळवे असतात, पण त्यांच्यात तो इन्हेरंट मेकॅनिझम असतो, ज्यामुळे ते सगळं दडवून ठेवतात!

  • विद्याधर
   तो इनहरंट मेकॅनिझम जे म्हणतोय ते म्हणजे समाजाने थोपलेले असते , इन बिल्ट नसतं , समाज तुमच्यात ते डेव्हलप करतो..

 13. poojaxyz says:

  khar aahe he. baaki aapan kay karto ki, aaplyaa javalchi maanse yaa jagaatun geli ki aaplyaala tevdhe waait waatat naahi.,pan tv var ekaade emotinal gaane kimvaa emotinal film laagli ki aapan chatkan radu laagto,.
  kaay, agdi barobar naa?

 14. काका, अतिशय योग्य वर्णन केलत..पुरुषांनी एमोशनल होण्याबद्दल जे लिहलेत १०० टक्के खर…
  त्या आजोबांची नातवाच्या काही इच्छा पूर्ण करण्याचा अट्टहास, मग त्यासाठी लोकांकडून खाल्लेली बोलणी, नातू खुश झाला की खांदे उडवत, डोळे मीचकवणारे ते आजोबा…हा सिनेमा मराठी चित्रपट सृष्टीतला मैलाचा दगड तो उगाच नाही..मस्त पोस्ट 🙂

 15. पुरुषांच्या भावना व्यक्त केलात त्याला पूर्ण अनुमोदन. रडूबाई हा ठपका बसू नये म्हणून अनेकजण आपल्या भावना लपवतात.
  मी श्वास हा चित्रपट एकदाच पाहिला आहे. तुमच्याप्रमाणे त्यावेळी जो पर्यंत शेवट गोड होत नाही तो पर्यंत ‘पिक्चर अभी बाकी है’ ह्या भावनेने त्या मुलाला गेलेले डोळे परत मिळतील ही आशा मलादेखील होती. पण नेहमीच्या चित्रपटात अभावाने दिसणारा तो शेवट पाहिल्यानंतर पुन्हा श्वास पाहायची हिंमत नाही झाली अजुन. अरुण नलावडे, तो लहान मुलगा ह्यांच्या बरोबर डॉक्टरचे काम देखील अप्रतिम.
  श्वास प्रमाणे “दमलेल्या बाबाची कहाणी” हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी शेवटच्या दोन ओळी ऐकल्यानंतर गदगदून येतं.

  • सिद्धार्थ
   दमलेल्या बाबाची कहाणी अप्रतीम आहेच.
   पण नलावडेंनी मात्र सगळ्या फ्रेम्स मधे खूप छान ठसा उमटवलाय असे वाटते.

 16. mayur berde says:

  masta varnan aehi purshi bhownanchi !!!!!!!

 17. खरंच ‘श्वास’ ला तोड नाही.. कधी कधी तर त्याचं नाव ‘श्वास’ च्या ऐवजी ‘गुदमरलेला श्वास’ असावं असं वाटतं इतकी वाईट अवस्था होते चित्रपट बघताना..

  ऑन अ लायटर नोट : श्वास चं एवढं कौतुक बघून ‘एकजण’ जाम खुश होणार आहे काकांच्या ब्लॉगवर. 😉

 18. मनोहर says:

  इमोशनल होणे म्हणजे परिस्थितीला योग्य प्रतिसाद देण्याची (किवा त्यात बदल घडवून आणण्याची) आपली कुवत मर्यादित करणे हे लक्षात घेतल्यास पुरुषाने इमोशनल का होऊ नये याचे कारण सापडेल.

 19. girish says:

  mbk, i had same feelings when i saw marley and me!! i couldnt control my tears!! fantastic movie it is..

 20. bhaanasa says:

  संपूर्णपणे सहमत. प्रत्येकवेळी श्वास कोंडतोनो, रडून रडून डोळे लाल होतात. इतक्या वेळा पाहूनही उगाच वाटते काहीतरी जादू व्हावी अन त्याचे डोळे बरे व्हावेत…. पण…
  तू म्हणतोस तसे बरेचदा मलाही वाटते, ” पुरुषांमध्येही तितकाच हळवेपणा असतो. काही प्रसंगी जरा जास्तच असतो. परंतु उगाचच दडवण्याची पूर्वापार प्रथा आजही त्याने चालूच ठेवली आहे. का कोण जाणे. 😦 ”

  आता पुन्हा एकवार श्वास कोंडावा लागणार.

  • पहिल्यावेळेस जेंव्हा पाहिला होता, तेंव्हा तर बाहेर पडल्यावर आपण् हे काय पाहिलंय़?? असा विचार डोक्यात घेऊनच त्या दिग्दर्शकाला जे सांगायचंय ते समजून घ्यायचा प्रयत्न करून घेत होतो बराच वेळ…

 21. खरच खुप वाईट सिनेमा आहे हा…
  घरातले सगळे टीवी बघत असले आणि अस काही सेंटी असल कि माझ्या डोळ्यात पण पाणी येत ,घसा कोरडा पडतो , मग मी ही तुमच्यासारखाच किचनमध्ये जाउन येतो…

 22. mazejag says:

  Mahendraji….Ha cinema mhanke greatch aahe….pan purushanch radan he kahi chuk nahi “ghartala “baba” jevha rudu lagto na ek dam tol gelya sarkh watu lagt” Mala athavt aaji gelyawar tichi mau sadi mi chaughadi mhanun ghet ase karan tichya kushit mich zopayche ekda maza papa ti sadi angawar gheun radtana mi pahila ani payakhalchi jamin aaplyala gilte ki kai as zala….Hemuchi aai geli tevha tar aamh lana sudhha zala navat pan control kele ashru jeva mokle zale to kshan…. baap re ….Purushch radan wait nast pan bichare te dakhwat nahit as please kunihi karu naye….

  • तेच म्हणायचंय मला . सगळे मनस्ताप डॊक्यात घेउन जगावं लागतं. कुठल्याही भावना न दर्शवता.

 23. Mandar Puranik says:

  Mahendraji,
  Pharach sundar lihila ahe tumhi.
  Mi ajun shwas baghitla nahi, pan tumcha lekh aani saglya pratikriya vachun , jenva baghin tenva ekta astanna baghin asa tharavla ahe.
  Mala tar kityekvela sensetive subjects varche blog kinva articles vachtanna office madhe suddha dolyat pani yeta.
  Koni vicharla tar mag sangava lagta ki dolyavar taan alyamule dolyatun pani ala.
  Atta tumcha ha lekh vachtanna suddha dole ole zale.

  Dhanyawad
  Mandar Puranik

  • मंदार
   जर नसेल पाहिला तर अवश्य पहा. आणि शक्यतो कुठलाही सीन फॉर्वर्ड न करता. प्रत्येक फ्रेम बोलते या सिनेमाची.
   जसा क्लिंट इस्टवूडचा गुड बॅड अ‍ॅंड अग्ली होता ना , त्याच ताकतीने डायरेक्ट केलेला आहे. प्रत्येक फ्रेम अप्रतीम आहे अगदी.. मस्ट सी…..

 24. काका,

  खरंच एकदम ग्रेट आहे हा सिनेमा! मीसुद्धा कधी तुमच्याप्रमाणेच ’मुद्दाम’ उदास व्हायचं असेल तर हा सिनेमा बघत बसतो. लॅपटॉपमध्ये कॉपी करुन ठेवलेला आहे! मित्र म्हणतात काय बाबा आदमच्या काळातला पिक्चर ठेवलायेस, काढुन टाक तो! पण घरात सिडि असुनसुद्धा तो तसाच ठेवला आहे! एकदातर अक्षरश: पुण्याला जाताना ट्रेनमध्ये पाहिलाय मी! आजोबा परश्याला फिरायला नेतात तो सीन मी अजुनही स्किप करतो! नाही बघवत!

  आणि खरोखर हा भावनांचा कल्लोळ दाबण्याचा मेकॅनिझम पुरुषांवर समाजाने थोपलेला असतो! एक आठवण सांगतो! माझ्या बहिणीच्या लग्नावेळी ती निघताना, माझे बाबा एकटे आतल्या खोलीत जाऊन रडुन आलेले आम्ही पाहिले आहेत!

 25. sahajach says:

  महेंद्रजी अगदी खरयं ’श्वास ’ हा वाईट्ट सिनेमा आहे… तसाच जुना राजेश खन्नाचा ’आनंद’ … किती वेळा पाहिला तरी शेवटी श्वास गुदमरणे, डॊळे नकळत वहाणे होणारच….

  बरं पाहू नये म्हणावं तर ईतक्या अप्रतिम कलाकृती की मन नकळत धाव घेते तिकडे….. सिनेमा तर संपतो पण मनात रेंगाळत रहातो कुठेतरी…

  बाकि पुरूषांचा हळवेपणा 🙂 …. माझ्यामते पुरूष जास्त हळवे असतात बरेचदा…. दाखवता येत नाही हा भाग वेगळा…..

  • बाबू मोशाय…. आठवतं अजूनही त्या सिनेमाचे नांव निघाले की . पण आनंद मधे इतका उत्कटपणे प्रसंग रंगवलेला नव्हता, श्वास हा त्यापेक्षा अधिक चांगला वाटला. अर्थात ही तुलना मी करायला नको- कारण ती अनाठाई आहे, तरी पण ………….
   . मला आवडलेल्या बेस्ट पहिल्या पाचात हा सिनेमा आहे. दूसरा- अर्थात अलबेला- मास्टर भगवानचा 🙂

 26. गौरी says:

  श्वास खरोखरच सुंदर वाईट्ट सिनेमा आहे. एकदा बघितल्यावर पुन्हा बघायची हिंमत नाही झाली माझी. आणि पुरुषांनी हळवेपणा दाखवायचा नाही, डोळ्यातून पाणी तर नाहीच नाही या साच्यातून बाहेर पडणारे खूप कमी लोक दिसतात. पोस्ट अतिशय मस्त झालीय तुमची. अगदी ‘काय वाट्टेल ते’ च्या बेस्ट फाईव्हमध्ये ठेवण्यासारखी.

  • गौरी
   धन्यवाद. अवध्या पंधरा मिनिटात लिहिलेली आहे ही पोस्ट. काय वाटेल ते लिहित गेलो, अगदी स्टार्ट टू फिनिश…
   पुरुषांनी डोळ्यातून अश्रू येऊ द्यायचे नाहीत, या साच्यातून बाहेर निघणं म्हणजे अगदी लहानपणापासूनचे संस्कार धुडकावून लावणे. एखादा १०-१२ वर्षाचा मुलगा पडला आणि रडू लागला, तर आई म्हणते, असा रडतोस काय मुलीसारखा????? इथूनच ते संस्कार कळत नकळत सुरु होतात.

 27. सागर says:

  श्वास हा एक अतिशय वाईट्ट वाईट्ट वाईट्ट सिनेमा आहे.

 28. महेंद्रकाका,
  मस्त झालाय लेख.
  ’श्वास’ सिनेमा मी अजुनही पाहिला नाहीये म्हणजे मुद्दाम पाहिला नाहीये कारण स्टोरी माहिती आहे आणि त्यानुसार त्या लहान मुलाचा त्रास पाहवणारच नाही माझ्याच्याने. माझा मामा तर थेटरमधुन मध्यंतरात निघुन आला घरी, त्यावरुन मी मी लक्षात घेतले, ये मेरे बस की बात नही.
  मामालाही रडणे कठीण आणि पहाणे त्याहुनही कठीण असे काहीसे झाले असावे.

  • सोनाली
   त्यात पण एक मजा आहे, नसेल पाहिला तर नक्की पहा. एका सुंदर चित्रपटाला मुकली आहेस् तू.. नक्की पहा. थोडं रडू येईल,फार तर… पण मस्ट वॉच धिस मुव्ही…

 29. Aparna says:

  सगळ्यांनी जवळजवळ सगळंच लिहिलंय पण तरी राहावत नाही…श्वासचं उदा. चांगलं आहे पण मूळ मुद्दा आहे तो पुरुषांच्या भावनाप्रधानतेचा..माझा अनुभव असा आहे की पुरुष आपले अश्रु कुणासमोर दाखवावेत ते पाहून बाहेर काढतो (आणि खरं तर स्त्रीही)..माझ्या पिढीतले माझे खूप चांगले मित्र/भावंडं माझ्यासमोर मनमोकळं करुन रडली आहेत आणि मला त्यात काहीही वावगं वाटलं नाही….अगदी माझे बाबापण जेव्हा एकदा माझ्यासमोर काही कारणांमुळे भावविवश झाले होते तेव्हा मी त्यांना ते अश्रुरुपीच बाहेर येऊ दिलं….
  ही पोस्ट खूपच अभ्यासू झाली आहे…म्हणजे उदा. आधी व्यवस्थित मांडून मग जे सांगायचंय तेही मुद्देसुद….

  ता.क. हेरंबची लायटर नोट एकदम पर्फ़ेक्ट आहे….

 30. Sucheta says:

  aajoba aani natvache prem sunder dakhawla aahe movie madhye

  • सुचेता

   माझा फेवरेट. अतिशय उत्कृष्ट सिनेमा. मला वाटतं की असा सिनेमा पुन्हा निघूच शकणार नाही.

 31. Sharda Morya says:

  2222222222222222222 GOOD

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s