इराणी

इराणी म्हणजे चहा आणि ब्रून मस्का खाण्याचे ठिकाण असे समजणारे बरेच आहेत. तर काही लोकांना  इराणी हॉटेल= ऑम्लेट पाव खाण्याचे ठिकाण असे समिकरण वाटते. पण खरंच तसं आहे का? मला वाटतं नाही , अजूनही बरेच चांगले इराणी हॉटेल्स आहेत मुंबईला- अगदी खास इराणी पद्धतीचे खाद्य पदार्थ असलेले.

पुण्याला असतांना नाझ चा मटन समोसा खाण्यासाठी आवर्जून कॅम्पात जायचो.तिथे गेल्यावर मटन समोसा खाऊन नंतर पेस्ट्री आणि खारी चहा सोबत रिचवणं झालं की मग   वेस्टएंड मधे सिनेमा पहायचा- असा कार्यक्रम असायचा.

नाझ मधे गेल्यावर खारी  ऑर्डर केली की तो खारीची मोठी प्लेट आणि पेस्ट्री  ऑर्डर केली की  असॉर्टेड पेस्ट्री आणून ठेवायचा समोर  . त्यातली हवी तेवढी घ्या, उरलेली तो परत घेऊन जायचा आणि नेमकं तुम्ही घ्याल   तेवढंच बिल लावलं जायचं. तिथलं सॅंडविच पण छान असायचं बरं ..

खादाडी आणि सिनेमा झाली की    परत येतांना श्रुस्बेरी ( हे काय असतं हो?) बिस्किटं घेउन  ( कयानी बेकरी) परत यायचो. तिथली ही बिस्किटे अजूनही आपली स्पेशालिटी टिकवून आहेत.कधी कॅंपात गेलो तर ही बिस्किटे अजूनही मी आणतो.

मुंबईचे इराणी  हॉटेल  कल्चर हल्ली बरंच कमी झालेलं आहे. एक तर नवीन पिढीतल्या इराणी मुलांना यात काही इंटरेस्ट नाही, त्यामुळे बरीच नवीन पिढी ही हॉटेल धंद्यांतून बाहेर पडलेली  आहे . पण काही इराणी मात्र अजूनही  आपली जुनी परंपरा आणि सांभाळत तुमच्या टेस्ट बडस ला तृप्त करण्यासाठी कार्यरत आहेत. त्यातलं आवर्जून नांव घेण्यासारखं माझं आवडीचं हॉटॆल म्हणजे ’मिल्ट्री कॅफे’-पण मला मात्र त्याला मिल्ट्री  काफे म्हणायला आवडतं

इराणी हॉटेल मधे जाऊन ब्रुन मस्का आणि चहा ( जर व्हेजेटीरियन असाल तर) किंवा आम्लेट पाव खाल्या शिवाय बाहेर येणं म्हणजे इराण्याचा अपमान करणे आहे असं समजणारा पण एक वर्ग आहे माझ्या सारखा. काही फारशी भुक नसेल तर मस्का पाव आणि चहा, किंवा आम्लेट पाव खाल्ल्याशिवाय इथून पाय बाहेर निघत नाही.

इराण्याकडलं आम्लेट हे एकदम वेगळंच असतं, तसं काही घरी जमत नाही कधीच. मला तर वाटतं की आम्लेट पाव या प्रकाराला प्रतिष्ठा मिळवून दिली ती इराण्यानेच. बरं या शिवाय मोहम्मद अली रोडवरच्या इराण्या कडला कबाब रोटी चा उल्लेख लेखा मधे केला नाही, तर इराणी शाप देईल याची भिती ही आहेच. विनोदाचा भाग सोडा पण मोहम्मद अली रोडची कबाब रोटी एकदम अफलातून असते. रुहानी माझं आवडतं आहे मोहम्मद अली रोडवरचं.

आमचं ऑफिस पुर्वी फोर्ट ला होतं. तिथे असतांना एक इराणी हॉटेल  ’ मिल्ट्री कॅफे’ नावाचं -अप्सरा पेन हाऊसच्या गल्लीत.  मोठ मो्ठया  तिथे जाणं व्हायचं. गेल्या बऱ्याच दिवसात तिकडे गेलो नव्हतो – आज  दूपारी  कामासाठी म्हणून फोर्ट ला गेलो होतो तेंव्हा तिथे एक मित्र भेटला. जनरल गप्पा मारायला   इराण्याच्य हॉटेल सारखी दुसरी जागा नाही. सरळ मिल्ट्री काफे चा  रस्ता धरला.

काफे मधे शिरल्यावर समोरचा बोर्ड लक्ष वेधून घेत होता. इथे दररोज एक निराळी पार्शी डिश असते. त्याचा एक फळा लावला होता समोर. इतक्या वर्षानंतर पण फळ्यावर खडूने लिहून ते समोर ठेवण्याची पद्धत सुरु आहे इथे या हॉटेल मधे. तो बोर्ड पाहिला, आणि उगाच एखाद्या जुन्या मित्राला भेटल्या सारखे वाटलं.

मिल्ट्री कॅफे. दरवाजासमोर ठेवलेला तो काळा फळा अजूनही असतो तिथे- रोजचे स्पेशल मेन्यु लिहायला.

समोर एल पी ची जाहीरात असलेला टेबल क्लॉथ असलेले टेबल्स आणि रांगेत मांडून ठेवलेल्या खुर्च्या.. एक कोपरा पकडला. दुपारची वेळ ,मुंबईचा उकाडा, आणि खूप दिवसानंतर लंडन पिल्सनर बिअर दिसली समोर आणि मागवल्या शिवाय रहावलं नाही.जुना मित्र, बिअर, आणि मिल्ट्री काफे !! बस्स! क्या बात है.. गप्पा मारत बसलो होतो जवळपास दिड तास. आमच्या बसण्याचा पण त्या इराण्याला काही त्रास नव्हता.

खिमा पाव स्पेशल. इथे खिमा घोटाला पण छान असतो.

मिल्ट्री काफे फेमस आहे ते तिथे मिळणाऱ्या खिमा पावा साठी. इथे येऊन खिमा पाव तर खायलाच हवा. अप्रतीम खिमा असतो इथे. या हॉटेल मधे मिळणारा पाव पण वेगळाच म्हणजे लादी पाव असतो. तो ताजा लुसलुशीत पाव आणि खिमा – आणि सोबतीला बिअर आणि गप्पा मारायला मित्र – अजून काय हवं??

इथली एक इराणी स्पेशलिटी.. सल्लीचिकन.

cafe military, military cafe, fort, mumbai, marathi, मराठी

कॅफे मिल्ट्री.. फोर्ट

धनसाक चिकन अव्हेलेबल नव्हतं म्हणून खिमा पाव आणि सल्ली चिकन मागवलं. इथल्या चिकनची खासियत म्हणजे मसाला इराणी पद्धतीचा आणि अजिबात स्ट्रॉंग नव्हता . नुसता चिकन चा पिस जरी घेतला तरीही त्या व्यवस्थित मॅरिनेट केलेल्या चिकन च्या अगदी आतपर्यंत मसाल्याची चव उतरलेली असते- आणि बिअर सोबत तर चिकनचा तो पिस एकदम अफलातून  कॉंबो. इथे जास्त लिहू शकत नाही त्या बद्दल त्या साठी तिथे भेट द्यायलाच हवी.

इतकं   खाणं झाल्यावर शेवटी एक चिकन पुलाव मागवला. तो तसा ठिक होता, पण तितकासा रिमार्केबल वाटला नाही. चिकन पुलाव खायचा तर  ब्रिटानियाला पर्याय नाही.गप्पा आणि खाणं होई पर्यंत दिड तास गेला.

कार्मेल कस्टर्ड फक्त इराण्यांनीच बनवावे. इतरांचे काम नाही ते. इथलं कार्मेल कस्टर्ड पण  चांगलं असतं ( खूप छान म्हणणार नाही.. कारण तो शब्द फक्त ब्रिटानियाच्या कार्मेल कस्टर्ड साठी राखून ठेवलाय मी)

सकार्मेल कस्टर्ड. अफलातून बॉस.. नक्की ट्राय करा इथे आल्यावर.

बरं इथले रेट्स पण खूप कमी आहेत. खिमा पाव मागवला तर फक्त ४९ रुपये . दोन बिअर चिकन सल्ली, खिमा आणि बिर्याणी आणि शेवटी कार्मेल कस्टर्ड  या सगळ्यांच बिल झालं होतं फक्त ३९० रुपये. बिअरचे १८० कमी केले तर जेवणाचे बिल फक्त  २१० रुपये. एक विस्मृती मधे गेलेले पण अतिशय सुंदर नॉन व्हेज मिळण्याचे ठिकाण म्हणून या हॉटेल फोर्ट मधे गेलात की   नक्की भेट द्या. अगदी काही नाही तर कमीत मुंबईतल्या बेस्ट  खिमा पाव साठी तरी नक्कीच!!

इथे दररोज स्पेशल मेन्यु असतो. इथले मेन्यु  कार्ड पहायला इथे खाली दिलेल्या चित्रावर क्लिक करा   म्हणजे तुमच्या आवडीच्या मेन्युच्या दिवशी तिकडे जाता येईल….

मेन्यु कार्ड चित्रावर क्लिक करा

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खाद्ययात्रा and tagged , , , , , , , , , , . Bookmark the permalink.

67 Responses to इराणी

 1. वाह मस्त खादाडी काका…सध्या श्रावण असल्याने फक्त कॅरामल कस्टर्डचाच निषेध 🙂

 2. Rajan Mahajan says:

  Namaskar,

  va kya baat hai…..photo pahun tondala pani sutale. khanyachi chhan chhan thikane shodhanyacha chhand aahe mala. मिल्ट्री काफे madhye janar nakki.

  Irani hotel mhatale ki B. Merwan (Grant Road) che naav ghetlyashivay bolane sampuch shakat nahi ya thaam matacha ahe me. Sadharan 100 varshe june aahe B. Merwan. geli kiman 25 varshe tithala Mawa Cake khatoy me ani ajunahi eka veles 2-3 cake khallyashivay man trupta hot nahi. Tithale Pudding, Omlet, Bun-Maska, custard sare sare kahi lajawaab asate. Maza anubhav aahe ki jar dupari 12 chya nantar gelo ki mawa cake milat nahit. Lok raang lavatat mawa cake sathi. Ajun ek khaas gosht mhanaje sandhyakali 6.30 la band hote B. Merwan. Mumbait Ya veles band honare he bahuda ekach hotel asel.

  Dhobi Talaoche Kyani & Co., New Excelsiorchya samorche Cafe Excelsior ashi mast mast Irani Hotels aahet.

  Majhe puran jara jaastach lambale tyabaddal maafi magato. pan kay karanar evadhya jivhalyacha vishay aahe ki rahavale nahi.

  Ithaparyant vachalyabaddal http://www.iranichaimumbai.com ha Irani Hotels cha encyclopedia tumhala Bhet.

  Rajan Mahajan

  • राजन
   हे मिल्ट्री काफे आमच्या जुन्या ऑफिस जवळचे असल्याने थोडा जास्त राबता होता इथे. तुम्ही दिलेली यादी खूप उपय़ॊगी आहे आता सगळी नांवं नोट करुन ठेवतो.
   इराणी फुड माझं फेवरेट आहे. 🙂
   धोबी तलावचे कयानी गेलो आहे एकदा. मेरवानची मावा केक अप्रतीम असते. थोडी जास्त फॅटी पण खूप टेस्टी.

 3. Nachiket says:

  महेंद्रजी. नेहमी प्रमाणेच आमच्या मनातल्या कुठल्यातरी तारा छेडल्यात. अप्रतिम. धन्यवाद. मुंबई प्रमाणेच पुण्यात इराणी हॉटेल्स खूप टिकून आहेत. अर्थात गेल्या काही वर्षात (लकी जमीनदोस्त झाल्यापासून) ही नॉस्टाल्जिक दुनिया नष्ट व्हायला लागलीय की काय असं वाटतं.

  तासन तास तिथे बसायचो आम्ही दोस्त लोक. फोन नव्हते तेव्हा कोणाकडेच..तरी लकीवर सगळेचजण फेरी टाकायचे आणि त्यामुळे भेट कधीच चुकायची नाही. एक काळ असा होता की सकाळच्या गुबगुबीत ओमलेट पाव पासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळंच लकी किंवा गुडलक मध्ये.

  एक चहा मागवून खूप वेळ बसणारे फुकटे..त्यांना नाही म्हणायचं नाही. पुण्यासारख्या ठिकाणीही “कामा शिवाय बसू नये” वगैरे पाटी न लावता हे इराणी सर्व्ह करायचे. अशा सिगारेट ब्रून चहावाल्या टाईमपास टोळक्यांसाठी आणि सिरीयस (लंच, डिनर) वगैरे वाल्या गि-हाईकांसाठी लकी आणि गुडलक दोन्हीमध्ये सरळ दोन वेगवेगळे सेक्शन केले होते.

  खिमा किंवा इराणीच बनवू शकतात अशी थिक चिकन ग्रेव्ही आणि कॅरामेल कस्टर्ड.. श्रूज्बेरी..निवडून निवडून एकेक वीक पॉइन्ट असलेला पदार्थ आणलाय तुम्ही लेखात.

  माय गॉड.. गुडलक शिल्लक आहे तोपर्यंत पुण्याला जायला पाहिजे लवकर आता.

  • मिल्ट्री काफे आमचा अड्डा होता. ऑफिस संपलं की नंतर बसायचा. थोड्या पैशात भरपूर वेळ बसता यायचं.

   पुण्याला असतांना सदाशिवात रहायचो. तिथे लकी मधे बरेचदा जाणे व्हायचे. तसेच अलका समोरच्या इराण्याकडे ५० पैशांची नाणी ज्युक बॉक्स मधे टाकुन गाणी ऐकणं , आणि चहाच्या कपावर भरपूर टीपी करता यायचा. – अनेक जुन्या आठवणी आहेत पुण्याच्या. गुडलक ला मी पण जाणार एकदा… 🙂

 4. mau says:

  श्रावणात असली पोस्ट ????????
  निषेध !!!![:)][:P]
  एकतर मुंबई बाहेर रहाणार्‍यांना विचारा त्यांचे काय हाल होतात..आणि त्यात असल्या भन्नाट पोस्ट पाहिल्या..की..त्याही फोटोसहित…म्हणजे जरा जास्तच होतय….
  श्रावण संपला की आधी मुंबईची ट्रिप काढावी लागणार वाटते..

  • मी श्रावण वगैरे पाळत नाही.. फक्त नवरात्री चे नऊ दिवस काही खात नाही ( जगदंबेचं नवरात्र ( घट ) असतो घरी म्हणून).
   मुंबईला जवळच आहे अहमदाबादहून.. करा मुंबई ट्रिप प्लान.. फक्त मुंबई आणि पुण्यातच शिल्लक आहेत इराणी हॉटेल्स.

 5. कॅफे नाझचे नाव काढलेत. गुडलकचे नाही? आजकाल शनिवारी सकाळी तिकडेच पडीक असतो. स्क्रॅम्बल्ड एग्ज ऑन टोस्ट आणि बन-ऑम्लेट्साठी. दुपारी गेलो तर मग चिकन मसाला बेंगलोर स्टाईल, खिमा नान वगैरे वगैरे. कयानीचे केक्स आणि श्रूसबेरी तर रोजच चालू असते. कारण आई एमजी रोडच्या बँकेत जाते रोज. पण राव ‘लवंगी मिरची’ला कधी जायचे आपण? कधी येताय पुण्यात?

  • तेंव्हा काही वर्ष मी क्विन्स गार्डनला रहायचो. म्हणून ते नाझ जवळ पडायचं .
   मागच्याच आठवड्यात कोल्हापूरला जाऊन आलो. ओपेल मधे गेलो होतो. त्यावर पण पोस्ट लिहायचं होतं , पण दोन खादाडी पोस्ट बॅक टु बॅक फार होतील नाही? म्हणून टाळतोय. थोड्या दिवसानंतर लिहिन.
   पुण्याला बहुतेक दुसऱ्या आठवड्यात असेन मी.. 🙂
   तेंव्हा भेटूच..

 6. अनिकेत वैद्य says:

  काका,
  (नि षे ध !!!) bracket raise to 99999999.

  तुम्हाला कधी वेळ आहे सांगा? मी मुंबईला येतो. आपण ह्या सगळ्या ठिकाणी जाऊ. किंवा तुम्ही पुण्याला या. गुडलक ला जाऊ.
  मी पण बरेच दिवसात गेलो नाहीये गुडलक ला. आता लौकरच जायला हवे.

  पंकज, शनिवारी सकाळी गुडलक ला असतोस का? भेटू आपण तिकडेच.

  आपला,
  अनिकेत वैद्य.

 7. vikram says:

  पंक्या म्हणतोय ते खर आहे गुडलकचा बन-आम्लेट आपला आवडता 🙂
  आमच्या इकडे इराणी नाहीत त्यामुळे कधी पुण्यात गेलोतर त्याचा आस्वाद घेत असतो
  बाकी इराणी हॉटेल आपल्याला जम आवडते

  • विक्रम
   आम्लेट पाव तर इराणी हॉटॆलमधलाच.. 🙂
   माझा पण फेवरेट. जर कधी भुक नसली, तर सहज म्हणुन खायला बरा असतो 🙂

 8. महेंद्रजी, तुम्ही एकदम मस्त कॅम्पातल्या नाझ ची आठवण जागवलीत. नाझचे सामोसे तर अप्रतिमच. अर्थात शाकाही असल्याने व्हेज सामोसेच खाणे व्हायचे. पण तेही असायचे ते लाजवाबच. एकदम पातळ पारी- त्यात अगदी गच्च भरलेले कोबी, गाजर, घेवडा इ. विविध भाज्यांचे अनोखे सारण बटाटा मात्र जवळजवळ नाहीच.शेजारीच सॉसची बाटली व एका प्लेट्मध्य ६ सामोसे. हवे तितके खा. बिल मात्र जितके खाल तेव्हढेच. मात्र आमच्याकडून कढिही शिल्लक सामोसे गेले नाहीतच. सर्व प्लेता रिकाम्याच जात वर पार्सलही घरी नेले जायचे.

  पण आता मात्र ते दिवस गेले. नाझच्या जागी बरिस्ता उभे राहीले. व महानाझच्या जागीही दुसरे कुठले दुकान सुरु झाले व आम्ही मात्र चवदार सामोश्यांना मुकलो. अर्थात इराणी स्पेशल खारी, चहा अजूनही काही जुन्या इराण्या हाटेलांत मिळतेच पण समोसे मात्र नाहीतच.

  • सागर
   नाझ माझा विक पॉइंट होता. १९८८ च्या सुमारास काय तिथे आमचा संध्याकाळचा अड्डा असायचा. मस्त होती जागा ती. तेंहा वेस्टएंड पण जुनी बिल्डींग होती..
   समोसा तर अप्रतीमच. अजूनही मिस करतो तसा. समोसा.. :)सहज आठवलं लिहिण्याच्या भरात म्हणून लिहिलं नाझ बद्दल.

 9. >इतकं खाणं झाल्यावर शेवटी एक चिकन पुलाव मागवला. < वा, वा!
  फोटो जबरा टेम्प्टींग आहेत. शेवटचा फोटो माझा फेवरिट. मेनू कार्ड दिलंत ते बरं केलंत.

  • कांचन
   पोट भरलं होतं. म्हणून तेवढ्यावरच थांबलो. नाहीतर…. हा हा हा..
   🙂 एकदा हॉटेल मधे गेलो की मात्र मला कंट्रोलच होत नाही .

 10. jyoti ghanawat says:

  hmmm…………adhi pustakanmadhye pan khupada vachale hote irani hotels badal……….yoga yogane maharashtra time madhye june irani cafe chi naave ali hoti…. tyatala fakt kayanich sapadala metrojavalacha………..pan ajun hi janyacha yog julun nahi ala………….ani tumachi post khadivar yenar hoti………. ti pan nemaki iranicafevarachich ali ………yaveles nakki janar…….kahi zhal tari………thnks kaka……

  • हे अगदी सोपं आहे सापडायला. एकदा फाउंटन जवळ गेलो की अप्सरा पेन मार्ट समोरच दिसतं, त्याच्या गल्लीत आहे हे.

 11. श्रावणात अशी पोस्ट…शिव शिव शिव… 🙂

 12. आल्हाद alias Alhad says:

  ओ काका, काय शोभतं का असं?
  श्रावण पाळू द्या हो मला… नसत प्रलोभनं नका देऊ…

  बाकी नक्की कसं जायचं या मिल्ट्री कॅफेत चर्चगेट/सी.एस.टी. हून?

  • आल्हाद
   अरे कुत्री पाळ, माजर पाळ, पण श्रावण?? तो काय पाळायची गोष्ट आहे का?

   बाय द वे, फाउंटन ;ला पोहोचल्यावर फाउंटनकडे तोंड करुन उभे राहिल्यावर नगिन दास मार्ग समोर दिसतो. एक लहानशी गल्ली आहे, त्याच मार्गावर डावीकडे चार पाच दुकानं सोडून असेल हे हॉटेल. 🙂

 13. Smita Ghaisas says:

  You forgot Blue -Nile biryani- that’s another place in Pune that people get nostaligic about:-) Would be interesting to see what Swami Rajaratnand would have to say about this post.Cafe goodluck on FC road ha sbeen sold out and they serve veg thali now, the one you mention must be some other goodluck then..

  • ngadre says:

   का SSSSSSSS य ??

   गुडलक मध्ये शाकाहारी थाळी? ते विकले गेले?

   हे व्याडेश्वरा.. हा दिवस दाखवण्यासाठी जिवंत ठेवले होतेस?

   “लकी” जमीनदोस्त.. “गुडलक” बंद..?? तारुण्य संपले आमचे एकदम..

   जिस पुणे में गुडलक न हो , उस पुणे में हमे पांव रखना नही..(पाव नव्हे पांव..)

   • Smita Ghaisas says:

    yes. Kamlin on east street famous for authentic chinese food is sold to mayur thali as well.. this one had historical importance as the only place where you went to have chinese for quite some time and used to be a special treat of sorts, before chinese food became taparee food .

  • स्वामी राजरत्नानंद आणि मी आम्ही दोघंच तिकडे मटरगश्ती करत फिरायचो. त्या काळी मी सिगारेट ओढायचो. मग एक कप चहा बरोबर एखादा कोपरा पकडला की दिड दोन तासाची निश्चिती. बंडगार्डन साईडला पण एक इराणी होता. नांव विसरलो आता, तिकडे पण आमचा मुक्काम असायचा बरेचदा. ( २५-३० वर्ष जुनी गोष्ट आहे ती.. बऱ्याच गोष्टी विसरल्या सारख्या झाल्या आहेत… )

   • Smita Ghaisas says:

    OK, since you are so interested in food and particularly in non-vegetarian food, you would probably like to know (and write ) about a book that Late Mrs Lakshmibai Dhurandhar had published 100 years ago. It is a cook book titled ” Gruhinee Mitra” an equivalent of Companion of young women – this one has indianized versions of French and British recipes. Of course the resultant menu items would be a bit bland in comparison to the Iranee ones you have on this page 🙂

    There is an article in Saptaheek SakaL on that and I want that book in my collection just to get a peek into the lifestyle of people in those pre-indepence days.

    • स्मिता
     इतकं जुनं पुस्तक मिळायला हवं.. बहुतेक जुन्या पुस्तकांच्या दुकानात मिळेल असे वाटते. शोधतो..
     साप्ताहिक सकाळमधे कुठल्या अंका मधे आहे? लिंक देता येईल??

     • Smita Ghaisas says:

      last saturday- Aug 28- so current week- you can still get a copy. . I will have to make a trip to Appa BalWant chouk for that book too:-)) it is so old, Popular does not have it , I checked, and Crossword are not really book people, are they?

 14. आय हाय, दुखती रगपें हाथ धर दिया सरजी !
  नाझ…., माझं नाझशी खुप जवळचं नातं आहे. कट्टर ब्राह्मणांसाठी वेज टू नॊनवेज कन्वर्जन हे कौमार्यभंगासारखं असतं 😉
  मी माझं सोवळेपण या नाझमध्येच मटन सामोस्याच्या साक्षीनेच सोडलं होतं आणि कयानीची श्रुबेरी बिस्किटे तर अजुनही पुण्याला गेलो की आणतोच आणतो. कयानीकडुन अरोरा टॊवर्सकडे येताना पहिल्याच चौकात डाव्या हाताला एक पान टपरी होती, आता नाव आठवत नाही पण त्याच्याकडचं मघई पान ही सगळ्या खादाडीनंतर आळवलेली भैरवी असायची, त्याचाशिवाय आमची महफ़िल संपायचीच नाही. नॊस्टॆल्जिक केलंत राव. लै लै हाभार देवा ! 🙂

  • बरेच इराणी आपले हॉटेल्स बंद करताहेत हल्ली. खूप वाईट वाटतं नाझ बंद झालं म्हणून. कित्त्येक संध्याकाळी तिकडेच काढलेल्या आहेत . 🙂

  • आल्हाद alias Alhad says:

   “कट्टर ब्राह्मणांसाठी वेज टू नॊनवेज कन्वर्जन हे कौमार्यभंगासारखं असतं”

   खरं की काय? म्हणजे शैशवातून कुमारवस्थेत येण्याआधी कौमार्यभंग झाला म्हणायचा माझा! 😀

 15. Mandar Puranik says:

  Mahendra ji,
  Mala ek shanka ahe.
  Brun maska mhanjech bun maska ka ?
  Mi Volga chowkatlya Volga hotel madhe bun maska khallyacha athavtai.
  He Volga hotel, Laxminarayan Theatre chya samor ahe. (Te pan bahutek Iranyacha ahe).
  Pan mala ajun difference kalala nahiye.
  Please sanga…

  Thanks
  Mandar

  • हो तोच. पण फरक कसा सांगु?? तो पावच वेगळ्या चविचा असतो. कसं सांगणार काय वेगळं असतं ते.. ते अनुभवावेच लागेल. 🙂

   • Mandar Puranik says:

    Ok Mahendraji,
    Mag ata jato aani Brun Maska try karto.
    Kinva tumi Punyala alyavar jau ya Brun Maska khaila.
    Yetai ka ?

    Thanks
    Mandar

 16. Nachiket says:

  ब्रून आणि बनमधला फरक महेंद्रजी सांगतीलच.

  मी माझ्या एंगल मधून सांगतो.

  लुसलुशीत बनपाव तुम्ही खाल्लाच आहे.

  समजा तोच लुसलुशीत बन पाव उन्हात वाळवत ठेवला आणि बेकरीत मिळणा-या टोस्ट / बटर (कडक)च्या जवळ येण्याइतका कडकडीत होण्यापूर्वी मधल्या स्टेजला काढून घेतला आणि खाल्ला तर जे लागेल ते “ब्रून”.

  “बन” पातळ सुरीने हलकेच कापला जातो.
  “ब्रून” करवती सारख्या दातेरी सुरीने खराखरा आवाज करत कापला जातो.

  मस्का-बन किंवा ओमलेट-बन नुसताही खाता येतो.

  ब्रून-मस्का सोबत चहा मस्ट.

  आवड प्रत्येकाची..

  • नचिकेत
   अगदी बरोबर सांगितलं.. ब्रून म्हणजे मधला भाग नरम असतो आणि बाहेरून कडकसर असलेला.. 🙂 धन्यवाद.

   • Smita Ghaisas says:

    Actually wasn’t Brun a company that made canned butter? I think canned foodstuff was rare in those days and therefore this branded butter in iranee restaurants became synonymous with butter&bun hence the term ‘brun maska’, the accompanyment( bun pav) was taken for granted so we did not have BrunMaska pav -just Brun maska . Just guessing, not an expert.

    • माझ्या माहिती प्रमाणे बटर फक्त पोल्सन नावाची कंपनी बनवायची- ब्रून नाही. ती पण एका इराणी मालकाचीच होती. बटर म्हणजे पोल्सन हे सरळ समिकरण होतं . नंतर बऱ्याच वर्षांनी पोल्सनला कॉंपीटीशन म्हणून अमूल सुरु झाले होते. पण अजूनही पोल्सन माझ्या आठवणीत आहे . लहानपणी खाल्ल्याचं आठवतं.

   • Nachiket says:

    आणि एक.. ब्रून गोड नसतो बनसारखा ब्रूनच्या आत मस्का भरून तो चहात बुडवायचा. मग झटकन चहावर एक मस्क्याचा तवंग येतो.

    असो..प्रोसिजर इथे नको..

 17. Smita Ghaisas says:

  Ok another good read would be: Vikram Doctor’s column in Eco Times each Friday in the CD ( Corporate Dossier) – title Little Luxuries. He writes so many details about a single food item. I noticed your “khadyayatra” and felt you might like reading his articles

 18. महेश says:

  दादरची आठवण झाली खरी आम्ही दादरला चहा पिण्य्साठी नेहमीच इराणी हॉटेलमध्ये जायचो आठवण केल्याबद्दल धन्यवाद

 19. आत्ता जेंव्हा मुंबई मध्ये पाय ठेवेन तेंव्हा तुमच्या पोस्टवर बनवलेला मुंबईचा खादडी नकाशा घेऊनच.

 20. santosh Deshmukh says:

  मंगळवारी मी आहे मुंबईत !!!! संद्याकाळी खाईन अन मग लिहितो बर का ?????

  • संतोष
   अवश्य… फोर्ट मधल्या मिल्ट्री काफे किंवा बेलार्ड पिअर चे ब्रिटानिया दोन पैकी एक ठिकाणि जा.

 21. santosh Deshmukh says:

  होय , गेलो होतो परवा सैन्यात ( मिलिटरी रेस्तरा ) खरच चागला अनुभव होता खास करून खिमा आणी एल पी ख्हेमा भवतेक ते तुपात बनवतात जेवणासाठी चिकन दोलांदू सांगितले तेही चागले होते नी नंतर कास्तार्द जसे फोटोत आहे तसे.पण मला तो प्रकार नी चव कळली नाही असो तिथले वातावरण प्रस्सन्न आहे .आपल्या लेखात breetaneeyacha उल्लेख झालाय त्या बद्धल काही तरी सांगा

  • संतोष
   त्यावर पण एक पोस्ट लिहिले आहेच. खाद्ययात्रा मधे पहा. ब्रिटानिया. किंवा सर्च करा ब्लॉग वर “ब्रिटानिया लिहून

 22. रोहन says:

  माझे आवडते इराणी म्हणजे ‘आर्मी कॅफे’ दिवाणी कोर्टाच्या बाजूचा. बाकी तिकडे गेल्यावर आम्लेट पाव काय खिमा पाव खुनाच बाहेर पडायला पाहिजे… आणि ब्रिटानिया कडे जायचे अजून बाकी आहे… आपली पुढची मीट एखाद्या ‘इराणी’ कडे ठेवूया का??? 😀

 23. amitagadre says:

  कुठल्या हि इराणी कॅफे प्रेम्याल्या आवडेल असा लेख. मस्तच! इराणी कॅफे मधले दुसरे वैशिष्ठ्य म्हणजे जोरात ओरडणारा कॅश counter वर बसलेला बावाजी. पण तो कधीच कस्टमर वर ओरडत नसतो किती हि तासान तास तिथे बसला तरी! 🙂 आणि ज्युक बॉक्स इस अ मस्ट मेन्शन ! आवड्या !

  • ब्लॉग वर स्वागत.. ज्युक बॉक्स कधिच इतीहास जमा झालाय . जेंव्हा रफी वारला होता, तेंव्हा एका रेकॉर्ड्सच्या रुम मधे बसून खूप गाणी ऐकली होती चांगले तिन तास बसून. गेले ते दिवस.. 🙂

 24. Gurunath says:

  पुण्यात, गुडलक कॅफ़े किंवा वहुमन्स…. बेस्ट इराणी आहेत…..

  गुडलक ला मिंट सोडा मॉकटेल बढीयाच आहे (त्याला तो कॉकटेल म्हणतो!!)

  तंदुरी चिकन पण बेस्टच आहे, इराणी बिर्याण्या पण बेस्ट… शिवाय चॉकलेट सुफ़ले…. एक्दम स्मुथ….

  नाश्त्यात तर काय वाटेल ते, ब्रुन पावा पासुन चिज ऑम्लेट सगळॆ बेस्ट आहेत

 25. काका,

  कालच जाऊन आलो इथे. खिमा सल्ल्ली, चिकन मसाला आणि ते फ्रेश लादी पाव. अफलातून जेवण.

  धन्स अ टन 🙂 🙂

 26. Anagha says:

  कधीतरी आमच्या कॉलेजसमोरच्या पुलिस कॅन्टीनला पण जा. गेलायत का कधी ? आणि आयडियल कॉर्नर ? आणि ब्रिटानिया ?? 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s