जंगल बुक

एकदा एका जंगलात एका सिंहाला एक शेळी दिसली. तिचं बिचारीचं लक्षच नव्हतं सिंहाकडे. अगदी सिंह जवळ येऊन पोहोचला, तरी पण ती आपलं गवत खात होती. सिंह अगदी खूप जवळ आला, इतक्या जवळ की जर त्याने पंजा मारला  असता तर  शेळी  मरणार.

शेळी  घाबरली आणि तिने सिंहाला विचारले, ’तू मला खाणार आहेस का?’

सिंहाने मोठ्या प्रेमाने शेळीच्या डोक्यावर थोपटले आणि म्हणाला, “अगं वेडी की काय तू? मी तूला कशाला खाऊ? ते समोर बघ डोंगराच्या पायथ्याशी खूप छान हिरवं हिरवं गवत आहे बघ – ते दाखवायला थांबलोय मी इथे”

शेळी आश्चर्यचकित झाली, आणि तिने डोंगराकडे पाहिलं आणि मनातल्या  विचार करत बसली की आज  सिंहाने आपल्यावर हल्ला का नाही केला म्हणून.. थोड्या वेळाने  काहीतरी लक्षात आल्या सारखं स्वतःशीच पुटपुटली,   इलेक्शन आलेलं दिसतंय जवळ’
************************

थोडे पुढे गेल्यावर एका तळ्यामधे एक मगर होती. ती पण काठावर येऊन बसली होती, तिने त्या झाडावरच्या माकडाला खाली बोलावले  ’ अरे ए माकडा, जरा खालती येतोस? मी बघ तुझ्यासाठी तलावातल्या शिंगाड्याचा गोड शिरा करून आणलाय बघ”

त्या गोड जांभळाच्या झाडावरच्या माकडाला आश्चर्य वाटले, त्याला आठवले, की पुर्वी  हीच मगर आपलं काळीज खायला तयार झाली होती- पण आज काय झालं तिला?? च्यायला, चक्क ती रहात असलेल्या तलावतल्या शिंगाड्यांचा शिरा? फुकट मिळाले म्हणून  नुसते शिंगाडे दिले असते तर समजलं असतं, पण चक्क शिरा करुन आणला  त्या मगराने? काय झालं असेल बरं?

आयला……..  इलेक्शन आलंय.. टाळक्यात प्रकाश पडला त्या माकडाच्या.

*************************

जंगलातली एक जंगली बोक्या आला आणि समोरच्या सगळ्या उंदरांना त्याने  आपली नखे आत घेऊन पंजा दाखवला  म्हणाली, मी माझी नखं कापलेली आहेत. तुम्हाला आता घाबरायचं काही कारण नाही , तुम्हाला सगळं काही मिळेल.

तुमच्या बिळात तुम्हाला फ्री इलेक्ट्रीसिटी कनेक्शन , फ्री पाणी मिळेल. ज्या कोणा उंदराला रेशन कार्ड मिळाले नसेल त्याने माझ्या कडे या- मी तुम्हाला काढून देईन रेशन कार्ड. एकदा रेशन कार्ड मिळालं की ज्या बिळात तुम्ही रहाता त्याचे खोटे डोमेसिल सर्टीफिकेट करुन घ्या , की मग पहा हे बिळ पण तुमच्या नावावर करून देईन मी.

उंदीर हुरळून गेले आणि आता ते रहात असलेले बिळ आपल्याच मालकीचे झाल्याप्रमाणे नाचत सुटले.तेवढ्यात  एक म्हातारा उंदीर म्हणाला, हुरळून जाऊ नका, हा बोक्या पुन्हा तुम्हाला पुढली पाच वर्ष दिसणार नाही -इलेक्शन आलेले दिसतंय!!!

*******************************

ह्याच बोक्याने उंदरांना सांगितले की तुम्हाला मी  मांजरांपासून संरक्षण देईन, आणि मांजरांना सांगितलं की तुम्हाला उंदरांची कमतरता भासू देणार नाही  .हरणांना सांगितलं की मी तुमच्या साठी आरक्षण करीन, तुम्हाला  स्पेशल जागा देईन , की जिथे तुम्हाला कुठल्याच    वाघापासून किंवा लांडग्यांपासून संरक्ष ण असेल , आणि वाघ आणि लांडग्यांना सांगितले की तुम्हाला हरणाच्या मऊ मऊ मांसाची रोज मेजवानी मिळेल अशी व्यवस्था करीन. हरणांचे प्रॉडक्शन वाढवायला म्हणून एक वेगळा फार्म बनवीन.  इलेक्शनची तयारी जोरात सुरु झालेली दिसत होती.

जंगलामधे काही कुत्रे  मोठमोठ्याने  भुंकत होते, एकमेकांचे लचके तोडत होते.  एकमेकांच्या अंगावर तंगडी वर करत होते. सगळी जनावरं मजा पहात होती – पण त्यांना मात्र त्याचं काहीच सोयर  ्सुतुक नव्हत. ए्क उंदीर म्हणाला की   हे सगळे  बहुतेक असंतुष्ट नेते  आहेत , तिकिट    मिळालं नाही म्हणून ओरडताहेत, लचके तोडताहेत एकमेकांचे. इलेक्शनची तयारी जोरात सुरु झालेली  दिसत होती जंगलात.

***********************
माणसांच्या जंगलात मराठी चित्रपट दाखवला जात नाही म्हणे  मल्टिप्लेक्स मधे -म्हणून एक इशु सुरु झालाय सध्या. कोणी म्हणतो मराठी सिनेमे मल्टीप्लेक्स मधे दाखवलेच पाहिजे- आणि तो पण प्राईम टाईम मधे, तर कोणी म्हणतोय की त्याचे तिकिट दर कमी केले पाहिजे.

आता खरं सांगायचं म्हणजे मराठी सिनेमाची क्वॉलिटी पहाता ( काही सन्माननीय अपवाद वगळून) कुठलाही सिनेमा दोनशे रुपये तिकिट देऊन पहाण्याच्या लायकीचा नसतो , आणि ही गोष्ट बरेच लोकं मान्य करतील.

मी वाट पहातोय त्या  घड्याळवाल्याच्या उदघोषणेची – जो   मराठी चित्रपटांना दिल्याजाणाऱ्या  १५ लाखाच्या अनूदानासोबतच , एंटरटेनमेंट टॅक्स काढून टाका म्हणूनही साकडं घालेल अर्थमंत्र्यांना. खरं तर अर्थ मंत्री  जेंव्हा आयपीएल ला तिन वर्ष सलग करमणूक करापासून मुक्ती देतात, तशीच इथे पण देऊ शकतात-’ त्या’ दोघांच्या पेक्षा आम्ही मराठीचे तारणहार आहोत  हे दाखवायला म्हणून.

अरे एंटरटेनेमेंटच नाही, तर एंटरटेनमेंट टॅक्स कसला घेतात मराठी सिनेमावर?
*************************
’त्यांना’ कोणीतरी सांगितलं, की रिक्षावाले, टॅक्सी वाले कमी अंतरावर जाण्यासाठी तयार नसतात!!!
ते म्हणाले-अरे काय सांगता? कधी पासून?

आता सगळेच नेते जर मोठ्या गाड्यातून  फिरणार,  तेंव्हा त्यांना  रिक्षावाले कमी अंतरावर येत नाहीत ही गोष्ट माहिती असेल अशी अपेक्षा करणे योग्य ठरणार नाही. पण जेंव्हा त्यांच्या कानावर ही गोष्ट गेली, आणि सामान्य लोकांना होणारा त्रास समजला,  तेंव्हा मात्र  लगेच ऍक्शन घेतली गेली.

केवळ एक आवाज केला आणि कार्यकर्त्यांनी  चार दोन रिक्षावाल्यांना मारून आपली सामाजिक बांधिलकी  दाखवून दिली. हे पण दाखवून दिलं की आम्ही सामान्य माणसा सोबतच आहोत- आणि सामान्य माणसाला झालेला त्रास आम्ही सहन करणार नाही. सामान्यांच्या बाजूनेच आम्ही उभे राहू.  हे आंदोलन फक्त पेपर मधे बातमी येण्या पुरते किंवा फक्त टीव्ही वर कव्हरेज येण्या पुरतेच सुरु होते का? असाही संशय येतोय लोकांना- कारण दोनच दिवसात हे आंदोलन इतिहास जमा झाले.

या आंदोलनामुळे काही फरक पडला ? मला तरी वाटत नाही की लोकांसाठी म्हणून काही फरक पडला असेल म्हणून. फक्त राजकीय मायलेज मात्र बरं मिळालं.

परवाच एका रिक्षावाल्याला त्याने आपल्या रीक्षावर लावलेला  एका राजकीय पक्षाचा झेंडा काढतांना पाहिलं. सत्तेच्या खेळात कुणालाच आपलं म्हणू नये..

*************************
जंगलात पुन्हा थोडी वर्दळ सुरु झालेली आहे. सगळे जण खडबडून जागे झाल्याप्रमाणे एकदम  जागे झाले आहेत.

आता व्हावंच लागेल ना.. लोकं विचारतील, तुम्हाला निवडून दिलं, तेंव्हा तुम्ही काय केलं म्हणून??

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , , , , , , , , , , . Bookmark the permalink.

54 Responses to जंगल बुक

 1. खरे आहे महेंद्रजी. राजकीय नेते आपापल्या भाकर्‍या भाजून घेतात. पण सामान्य जनतेचे काय्..मुकी विचारी कुणीही हाका, कशीही हाका, कितीहीहाका, मुकी ती मुकीच. आणी इलेक्शनला मात्र हे मगर, बोकेच उभे राहतात, सामांन्यांचे मात्र माकड होउन विचारे उंदरांसारखे लांब पळ काढणे नशिबी येते.

 2. Amit says:

  आता खरं सांगायचं म्हणजे मराठी सिनेमाची क्वॉलिटी पहाता ( काही सन्माननीय अपवाद वगळून) कुठलाही सिनेमा दोनशे रुपये तिकिट देऊन पहाण्याच्या लायकीचा नसतो , आणि ही गोष्ट बरेच लोकं मान्य करतील

  @ Kaka : Hindi suddha tya layakiche nastaat 🙂

  • बरोबर आहे. पण हिंदी सिनेमाला महाराश्ट्रात कमीत कमी ३०-४० टक्के तरी ओपनिंग मिळतंच. पण हळद, कुंकु, मंगळसुत्र, पाटिल वगैरे असलेले सिनेमे किती दिवस लोकं मल्टीप्लेक्स मधे पहाण्याचे धाड्स करतिल? १० टक्के ओपनिंग पण मिळणार नाही…
   काही सिनेमे केवळ टुरिंग टॉकिज च्या लायकीचे असतात.. आणि तिकडेच चालतात ते फक्त.

 3. sushma says:

  महेंद्र काका,
  लेख अतिशय उत्तम आहे……राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो………सत्तेच्या खेळात भरडली जाति ती फक्त सामान्य जनता………..

  • सुषमा
   बरोबर.. शेवटलं वाक्य मी जे लिहिलंय, ते मी स्वतः पाहिलं, एक रिक्षावाला रिक्षावर शिवलेला एक झेंडा उसवत बसला होता… कदाचित रिक्षावाल्यांवर केलेल्या हल्ल्याचा परीणाम असावा तो..म्हंटलं, का रे बाबा? का काढतो आहेस झेंडा? तर म्हणाला साहेब, सगळे नेते सारखेच, एखाद्याला आपला म्हणावं, तर तो पण धोका देतो .. आणि बोलणं बंद केलं त्याने.

 4. vikram says:

  काय काका इलेक्शनला उभे राहणार का 😉

  जंगल बुक वरून मला मोगलीची आठवण झाली
  ‘जंगल जंगल बात चली है पता चला है चड्डी पेहंके फुल खिला है फुल खिला है’

  • विक्रम
   सामान्यातल्या असामान्यांनी इलेक्शनला उभं रहायला हवं. एक मजबूत भारत तयार करण्यासाठी.. आणि मी असामान्य नाही ……..!!

 5. राजकारणी लोकांच हेच काम आपला स्वार्थच साधायला कुठल्याही थराला जाउ शकतात…
  म्हणतात ना – “Politicians are the same all over. They promise to build a bridge even where there is no river.” 🙂

  • सुहास
   जबरदस्त डायलॉग आहे. 🙂 पण दुर्दैवाने तसेच असते. आता पुन्हा इलेक्शन आलं आहे, म्हणुन पुन्हा मराठी कार्ड ओपन झालंय. मला वाटतं लोकांना आता समजलं असेल हा प्रकार..

 6. हेमंत आठल्ये says:

  अगदी बरोबर आहे..

 7. निवडणुकांच्या आधी ‘जंगल बुक’ असतं आणि निवडणुकांनंतर त्यातलं ‘बुक’ गळून पडतं आणि नुसतं जंगल उरतं !!

 8. sahajach says:

  महेंद्रजी पोस्ट सुंदर झालीये तुमच्या नेहेमीच्या शैलीपेक्षा वेगळी 🙂 …..

  आणि जंगलातले हे सत्य कटु आहे …….. बरं हे कधीच बदलणार नाही हे ही कळुन चुकलेय…..

  • बरेच दिवसात काही राजकारणावर लिहिलं नव्हतं. 🙂
   बदलणार नाहीच.. कारण “बळी तो कानपिळी ’ ही म्हण अजूनही पुरेपूर लागू होते इथे..

 9. Hats off, dada! Jabardast rupak. Zanzanit anjan aahe he! Dhans.

  Vishal

 10. Mandar Puranik says:

  Mahendraji,

  Ekdam uttam lekh.
  Pan “he asach chalaicha” hi vrutti thevun ata hya pudhe bhagnar nahi.
  Apan middle class lokach hyala jababdar ahot.
  Election chya veli kiti sushikshit loka matadan kartat ?
  50% suddha matadan hot nahi. Ani te maximum zopadpatti madhunach hota.
  Mhanje sushikshit loka mala vatta 10% pan matadan karat nahit.
  Jar ka zadun saglyanni matadan kela tar ka nahi parivartan honar ?

  Ata evdha sagla tya Kalmadi virrudha chalu ahe, tari pan next election madhe tyala Congress cha ticket milnar Punyatun, aani sushikshit loka parat matadan karnar nahit… aani zopadpatti madhe paise vatun to parat nivdun yeil. Mag bolun kai upayog ?
  Tyapeksha saglyanni matadan karaila pahije,
  Manya ahe ki he hoila vel lagel, pan tyashivai paryay nahi aplyala.

  Warm Regards
  Mandar

  • आपल्याकडे द्विधा मनःस्थितीतले नेते दिसतात. त्या शशी थरूरला एका दिवसात हाकललं, पण मात्र कलमाडीला हात लावायला पण कोणी तयार नाही. म्हणे, एकदा ते गेम्स संपू दे.. म्हणजे काय तो पर्यंत व्यवस्थित खाऊन घेउ दे त्याला.. इतका मूर्खपणाचा निर्णय मी अजून पाहिलेला नाही.
   त्याला दिलेला ए़क्स्ट्रा वेळ हा त्याच्या करप्ट इनकमच्या पैसा वसुलीसाठी दिलेला एक्स्ट्रॉ वेळ तर नाही??

   • Smita Ghaisas says:

    in fact within a few week’s time he was seen on TV inaugurating some event . And that was extremely blood-boiling . Tharur may have been sent home but what about others who have been also proven to have major stakes in the dirty game? The guy from baramatee , his daughter are not punished at all!! They denied having anyhting to do with the scam altogether and were later publicly proven to be lying through their teeth!

    • थरूर ला फारसं बॅकिंग नव्हतं मॅडमचं म्हणून तो पण मला थरूर आवडायचा.बारामतीकरांवर एक पोस्ट नाही, तर अख्खा थिसिस लिहावा लागेल 🙂

   • Smita Ghaisas says:

    there’s a news piece in Samna today – Anagha Ghaisas ( mother of Vikrant Ghaisas) was at a felicitation ceremony at ‘Sahyadree’ and she narrated so many details of his corruption and challenged the politicians with respect to this Common wealth games scam so point blank, they were left sweating!!. and predictably, they had no deffense whatsoever…

   • Dattatray Torane says:

    Mahendra ji Ambyachya Petiche Udaharan Tumhala Mahit Aselach. Ek Naska Amba Petitalya Ambyana Nasavato. Ethe Rajakaran Mhanje Naskya Ambyanchi Peti ahe. Tyat Ekhada Changala Amba apan Thevala Tari to nasatoch. Tasach Sarv Rajakaranach Brasht Zhale ahe. Ekhadi mothi krantich Hya Goshtila badalu shakate. Sarvani Sarvani Vote kele tari matadaar tech ubhe asatil tar tya matadanacha kay upyog. Ani Ekha imandar navin dhadadicha karyakarta ala nivadun tarihi Tyache varisht partiche tyala brasht kelyakherij rahat nahit. Ekhadi Anand Dighe Sahebasarakhi vyakti Samajat Badal Ghadvun Ananyachi Himmat asate. Tihi Raj karanat Tarihi Aani Ha badalahi Apan Sahan karu ki nahi he sangne thode kathin ahe. karan hya Dukhapatichi savay lokana zhali ahe.

 11. Smita Ghaisas says:

  Even the animals in your jungle book seem to be the gourmet kind – eating some interesting things like “shingadyacha shira” and “harinacha mans” and so on…:-)

  • स्मिता
   माझं खाण्यावर मनापासून प्रेम आहे. मला प्रत्येक गोष्ट चविने खायला आवडते. आणि त्यातल्या त्यात शिंगाड्याचा , राजगिऱ्याचा शिरा तर खूप आवडतो. म्हणून लिहिण्यात आपोआप येतात असे पदार्थ. हरणाचे मांस तर खाऊन खूप वर्ष झालीत.. सहज लिहिल्या गेलं ते..

 12. ह्या बोक्यांची झालेली पगारवाढ आणि कॉमनवेल्थ प्रकरणं आठवली की नुसता जळजळात होतो. रोज ऑफीसला जाता येता खड्ड्यातून बाईक गेली आपण ह्या खड्ड्यासाठी कर भरतो आहोत हे ध्यानात येऊन स्व:तची लाज वाटते. त्यात काल रात्रीच टिव्हीवर ‘रंग दे बसंती’ पुन्हा पाहिला. कुणीतरी सामन्यातल्या असामान्य व्यक्तीने पुढे यायला हवे हे ठीक आहे पण जो पुढे येईल त्याचं काय होईल हे त्यात स्पष्ट रंग दे बसंती मध्ये दाखवलं आहे. ब्रिटीशांनी केलेला छळ आणि गुलामगिरी इतिहासातून वाचली आहे पण त्यानी बनवलेले पूल अजुन ही सुस्थीत उभे असलेले मी आज देखील पहातो तेंव्हा त्यांचीच गुलामगिरी बर होती असं वाटून जातं. नाहीतरी ह्या हिजडया राजकारण्यांना आणि त्यांच्या अवदसलेल्या अवलादींना पोसण्यात कसलं आलाय स्वातंत्र्य?

 13. या लोकांना खरोखरच पगाराची गरज आहे का? जरी पगार पुर्ण बंद केला तरीही ते लोकं घरून पैसे भरून हे ” समाजसेवेचे” काम करतील अशी परिस्थिती आहे.
  आपण सगळे भाऊ भाऊ- आणि देशाला लुटून खाऊ अशी मनोवृती आहे सत्तारुढ आणि विपक्षाची.

  आज भाजपाचा मुख्य झालाय, माझ्या लहानपणीच्या ओळखीतला. एबिव्हिपी मधे असतांना भेटायचा. एक मध्यमवर्गीय माणूस आज करोडॊ रुपये कमावून बसलाय. कुठुन आला इतका पैसा?? कोणी विचारणार नाही – सगळे जण एकाच माळेचे मणी. आपल्याला एक इंदिरागांधी सारखी आयर्न हॅंड असलेला नेता हवा.. तरच ते शक्य आहे.

  • पगारवाढीसाठी ह्या हिजडयानी किती तळमळीने आंदोलन केले पाहिलेत ना? रिक्षावालेदेखील भाववाढीसाठी इतके करीत नसतील.

 14. छान शैलीत लिहलत हया राजकारणावर….पण हे #`~*/ अश्याच त्यांच्या स्वार्थाच्या पोळ्या गरीब जनतेच्या पाठीवर भाजत राहणार…. 😦

 15. जंगल बुक म्हणल्याव्र मला वाटल मोगली बद्दल काही आहे की काय???

  हे तर “जंगल राज ” आहे…सामान्य लोकांच्या भावना भडकावुन त्याच राजकारण करायच…मेलेल्या च्या टाळु वरचं लोणी खाणारी ही जमात आहे.

  >>बारामतीकरांवर एक पोस्ट नाही, तर अख्खा थिसिस लिहावा लागेल…

  अवो यांचा कोठा लय मोठा हाय….लय पचवल यांनी….अन महत्वाच म्हणजे खाउन साधा तृप्तीचा ढेकर पण देत नाही…दिवसागणीक भुक वाढत चालली आहे.

  यांची पचनसंस्था म्हणजे एक मोठ गुढच आहे.

  • मोगली बद्दल सगळ्यांनाच माहिती आहे. पंचतंत्राबद्दल लिहायचं होतं पण जमलं नाही.
   यांची पचनसंस्था म्हणजे एक मोठ गुढच आहे. – खरंय, अगदी…

 16. bhaanasa says:

  कलियुग आहे बाबा कलियुग. जंगलातले प्राणी तरी काही नियम, धरबंद पाळतात रे. भूक लागल्याशिवाय उगाच झडप घालत नाहीत आणि त्यांचे पोटही भरते. बाकी माणसांच्या जंगलात कुठलाच नियम नाही आणि पोटही कधीच भरत नाही. काय मरताना काखोटीला मारून नेता येईल अशी समजूत झालीये की काय यांची…..??? का लाच तिथेही देता येईलची खात्री…. 😀

  सहीच पोस्ट रे. एकदम मार्मिक. लगे हाथो थिसिस पण लिहून टाक की….. 🙂

  • थिसीस लिहायला सुरुवात करतो, पण या जन्मात तरी पुर्ण लिहू शकेल की नाही ते सांगता येत नाही. 🙂

 17. Arvind ganorkar says:

  Marathi cinema ka kadhatat, karan 30lakh rupayacha anudan milata, kahi cineme eka divasat purna kelya sarkhe vatthat

  • अरे मला वाटलं होतं की १५ लाखाचं अनूदान आहे म्हणून. आता समजलं इतके मराठी सिनेमे का निघतात ते!

 18. अतिशय सुंदर आणि वेगळी पोस्ट… कटू सत्य 😦

 19. santosh Deshmukh says:

  अरे बाबा तो ही ,एक धंदा आहे आपण रोज कुठे न कुठे फसत असतोच पण त्याचे काही वाटत नाही शेवटी आपलीच एक अडचण आहे की, आपल्या पेक्षा जर कोणी लवकर मोठा झाला की आपली भाजते

  • मोठं व्हायचा प्रश्न नाही. तुमच्या कडून मत घेऊन मोठं होऊन, मग निवडून आलं की विसरतात हे नेते…

 20. santosh Deshmukh says:

  ठीक आहे, मग जे ते करतात ते आपल्याला जमते का ? तुम्ही या निवडून नी मग सांगा !! निवडून येन्हे सोप्पे नाही नी जनसेवा करणे ही ………….

 21. santosh Deshmukh says:

  साहेब, आपला गैर समाज झाला, मी सुर्वातिलाच बोललो की हा एक धंदा आहे ,त्यात आपण बुडालेले कधी पाहत नाही खूप जण आहेत ज्याचे घरावरचे पत्रे ही गेले आहेत या राजकारणाचा नाद करून भिकेला ही लागले आहेत.

  • Santosh Kudtarkar says:

   Santosh Dada…

   Rajakaran ha dandha jyanni banawla ahe ti murkha mansa ahet… kinwa asawit ani tyanna support karnare tumhi ani amhi he did-shahane ahot.

   Rajkaranacha dhanda kartana je bhikela lagale… tyanni haat gadya odhun pota bharawi… Desha cha karyakaranit ludbud karun bhikela lagu naye… Hi namra winanti 🙂

   Rajkaran he nirapeksha wruttine hona jaam garajecha ahe asa nahi ka watat apnaas???

   Aplya deshala tyachi nakkich garaj ahe!!!

   Personally gheu naka… Patla nahi mhanun uttar detoy… Shamaswa!!! 😉

 22. रोहन says:

  खऱ्या जंगलातले कायदे सरळ आणि स्पष्ट असतात… इकडे मात्र सर्व गोलमाल… 🙂

 23. Santosh Kudtarkar says:

  लोकं माझं / तुझं सोडून “आपलं आणि आपल्या साठी” वर येतील… “तोची सोनियाचा दिनू…” (“सोनियाचा” हे वैयक्तिक घेऊ नये इथे!!!) 😛

  काका उत्तम!!!
  पण आता Common Man च्या प्रतिमेतून बाहेर पडायची नितांत गरज आहे हो!!!

 24. खर आहे काका सगळ…
  आमच्या इथे एकाच पुलाच उद्घाटन दोन वेळा झाल आणि ते पण दोन वेगवेगळ्या पक्षांकडून …
  सारा खेळ फक्त शक्ती प्रदर्शनासाठी ….

  ह्या वेळी ठरवलं आहे जे येतील मत मागायाला त्यांना ठामपणे विचारायचं कि तुम्ही काय काम केल आहे…

  • यशवंत
   हे असे प्रकार नेहेमीचेच झाले आहेत. एखादी बरी गोष्ट झाली की ताबडतोब सगळीकडे नेत्यांचे फोटो असलेले बोर्ड लागतात- श्रेय घेण्यासाठी- आणि खरं म्हणजे ते काम करण्यासाठी कोणीच प्रयत्न केलेला नसतो.

 25. kavita says:

  this books r nice

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s