’त्याला’ पर्याय नाही..

बायकोला तो सांगत होता- तुमचे मिस्टर वारले की तुमचा इतका फायदा होईल, तुम्हाला इतके पैसे मिळतील.   नॅचरल डेथ असेल तर इतके आणि जर अ‍ॅक्सिडेंट डेथ झाला तर दुप्पट. आणि बायको  पण एखाद्या पुरोहिताचे किर्तन ऐकावे तसे भक्तीभावाने त्याचे बोलणे ऐकत होती . त्याच्या चेहेऱ्यावर वरचे भाव असे होते की जणू काही तो स्वतःच्या खिशातून   दुप्पट पैसे  काढून देतोय बायकोला .

तेवढ्यातच मी दारातून आत शिरलो आणि पहातो  तर काय ते सगळं समजाऊन सांगणारा होता  माझा एक जवळचा मित्र!माझ्या  बायकोला  मी   मेल्या नंतरचे फायदे समजावून सांगत होता. गेला महिना भर माझ्या मागे लागला होताच की एखादी तरी   पॉलिसी घे म्हणून- आणि मी टाळत होतो. नवीन नवीनच  एजंट झाला होता तो.

त्याने शेवटी हुकुमाचा एक्का काढून, म्हणजे  बायकोला पटवायची स्ट्रॅटेजी वापरायचा प्रयत्न करतांना दिसत होता. आपला नवरा मेला की आपल्याला किती पैसे मिळू शकतात हे एकदा स्त्रियांच्या डोक्यात घुसवला , आणि “इन्सिक्युअर फिलिंग”  तिच्या मनात तयार केले की मग  मात्र नवऱ्याला  पटवून पॉलिसी घ्यायला लावायचे   काम तीच करते. आयुर्विमा  एजंटचा हा   हा हातखंडा डाव असतो असे मला नेहेमीच वाटत आलेले आहे.

एखाद्या स्त्रीला तिच्या नवऱ्याच्या मृत्युनंतर किती आणि कसा फायदा होऊ शकतो , हे तोंडावर सांगण्याचं धारिष्ट्य असणारा या अख्ख्या जगात एकच   असतो. तो म्हणजे आयुर्विमा एजंट.

मला वाटतं की प्रत्येकाचाच या व्यावसायिकाशी संबंध आलेला असतो. बरेचदा तर एकेकाळी मित्र असलेला – अगदी लहानपणापासून  हवाहवासा वाटणारा मित्र जेंव्हा आयुर्विमा एजंट बनतो, तेंव्हा तो नकोसा होतो आणि  समोर दिसला की ’आत्ता कशाला आली ही ब्याद? ’असा विचार मनात येतो. मला तर बरेचदा  रस्ता बदलायची इच्छा होते.

मित्राने हा व्यवसाय सुरु केल्यानंतर ’मित्रा ’कडे पण एक गिऱ्हाईक म्हणून पहाण्याची मानसिकता तयार होते त्याची. मग थोडं फार इतर काही बोलणं झालं की मग तो पुन्हा “हं मग कधी देतोस चेक”? असा प्रश्न विचारतो. पहिल्या वेळेस तर कसला चेक म्हणून विचारलं होतं, आणि त्यावर त्याने मला नवीन एल आय सी चे प्लान्स आणि इतर गोष्ट म्हणजे बोनस वगैरे ची माहीती देऊ लागला.जवळ पास पाउण तास हेच पुराण सुरु होते त्याचे. पंधरा मिनिटानंतर मात्र अरे आता आवरा…. असं सांगावं का? असंही वाटु लागलं होतं. पण शेवटी एकेकाळचा मित्र म्हणून   ते कीर्तन ऐकुन घ्यावं लागलं. भिडे खातर आपण किती गोष्टी करतो नाही मनाविरुद्ध?? त्यातलीच ही पण एक.

असा नेहेमी मागे लागायला लागला, की भिडे खातर एखादी पॉलिसी आपण घेतो. पण एकाने त्याचे समाधान होणार नसते.  भस्मक रोग झालेला पेशंट जसे काही तरी नुसते खात असतो-    आणि कितीही खाल्ले तरीही त्याचे समाधान होत नाही, तसे त्याचे असते. पुढले  फारच  थोडे  दिवस तो शांत रहातो, पण पुन्हा ये रे माझ्या मागल्या…. प्रमाणे नवीन पॉलिसी साठी गळ घालणं सुरु करतो. आणि मग जाणीव होते की अरे हो…-आपला एक मित्र कमी झालाय  !  😦

या आयुर्विमा एजंट्स ची एक स्पेशालिटी असते, लोकांना खूप “टेल अ टेल” पद्धतीने गोष्टी सांगायच्या . उदाहरणार्थ  ” तो अमुक तमूक होता( इथे एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचे नाव, जी तुमच्या परिचयाची नाही ), ना त्याने एक पॉलिसी घेतली पंचविसाव्या लाखाची आणि मग एकच प्रिमियम भरून तो वारला अ‍ॅक्सिडॆंट मधे -त्याच्या बायकोला ५० लाख मिळाले”. पॉलिसी घेतली असेल तर पैसे मिळणारच नां?? मग त्यात नवीन काय?

इथे एक गोष्ट सांगायचं आणि तुमच्या मनावर ठसवायचं असतं, की एक प्रिमियर भरला तरीही पुर्ण पैसे मिळाले.  आता हीच गोष्ट मला निरनिराळ्या आयुर्विमा एजंटसनी सांगितलेली आहे फक्त कधी कधी त्या पन्नास लाखाचे एक करोड किंवा दोन करॊड पण होतात बाकी सगळं सेम. सक्सेस स्टोरी सांगून एखाद्याला फळवायची ही रीत अगदी प्रत्येक आयुर्विमा एजंट वापरतात- आणि बरेच लोकं त्याला बळी पण पडतात.

एखाद्याला मित्राला मुलगा किंवा मुलगी झाली, की त्याच्या घरी शुभेच्छा देणाऱ्यांच्या मधे यांचा पहिला नंबर असतो.  दवाखान्यातच मग तुझ्या मुलीच्या नावे ही पॉलिसी घे,  म्हणून पटवणे सुरु असते . नुकताच जन्मलेलं मुलं पण ह्यांच्या दृष्टीने एक फ्युचर प्रोस्पेक्टिव्ह क्लायंटच असतं. जर मुलाची पॉलिसी काढली आणि तो वारला तर त्याचे पैसे घ्यायला कुठल्या बापाला आवडेल? कुणालाच नाही. म्हणूनच  इथे तिच्या लग्नाच्या वेळेस किंवा शिक्षणाच्या साठी इतके पैसे मिळतील , लग्नाच्या वेळेस पैसे मिळतील वगैरे सांगून  पटवायचा प्रयत्न असतो.

माझा मित्र पण असाच मागे लागला होता. पण त्याला मी एकच सांगितलं की काहीही झालं तरीही मी बायको किंवा मुलींची पॉलिसी करणार नाही, कारण पॉलिसी ही नेहेमी कुटूंब प्रमुखाचीच असावी असे माझे मत आहे. यावर पण खूप वाद विवाद झाले. तो म्हणाला की इथे तुला रिस्क आणि रिटर्न दोन्ही मिळतंय, म्हणून ही इन्व्हेस्टमेंट समज हवं तर.

त्यावर त्याला एकच उत्तर दिलं होतं की मी इन्शुरन्स आणि इव्हेस्टमेंट्स ची कधीच सरमिसळ करत नाही. इन्शुरन्स माझं आहे, आणि इन्व्हेस्टमेंट्स साठी बरेच पर्याय आहेत.

एक पॉलिसी आपण दर वर्षी न चुकता काढतो त्यामधे प्रिमियम तर भरतोच, पण सोबतच त्या प्रिमियमचा उपयोग करण्याची वेळ येऊ नये असेही विचार करत असतो. मी  मेडीक्लेम बद्दल बोलतोय . दर वर्षी मेडीक्लेम मधे पैसे भरल्यावर पण ते पैसे वाया जावे आणि घरचे कोणी आजारी पडु नये अशी प्रार्थना करतो.  कशी मजेशीर मानसिकता असते माणसाची नाही का??

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , , , , , , , , . Bookmark the permalink.

56 Responses to ’त्याला’ पर्याय नाही..

 1. सागर says:

  माझा एक काका नुकताच एजंट झाला आहे.
  त्याची आठवण झाली.अन इथून तिथून सर्व एजंट सारखेच याची जाणीव झाली.एक मराठी सिनेमा आहे उत्तरायण .
  त्यामध्ये विजू खोटे यांनी विमा एजेंट ची भूमिका छान केली आहे.

  • सागर
   अरे अगदीच नसावे असे नाही. पण इन्शुरन्स प्रत्येकाने स्वतःच्या पध्दतीने सिलेक्ट करावे. हा लेख इन्शुरन्सच्या विरोधात लिह्लेला नाही मी 🙂 इन्शुरन्स इज मस्ट!

 2. दिपक says:

  अगदी खरं, महेंद्रजी!
  अगदी जवळचा मित्रही जेंव्हा इनवेस्टमेंट – मुलीच्या शिक्षणासाठी/ लग्नासाठी “उपयोगी” पडतील असं सांगतो त्यावेळी आपण प्रॅक्टीकल विचार न करता इमोशनल विचार करतो.

  ता.क. मी ही असाच “इमोशन इन्वेस्टमेंट” केलेला! 🙂

  • दिपक
   मला पण तोच अनूभव आला होता. पण जेंव्हा मी पॉलिसी नको म्हंटलं तेंव्हा त्याने युनिट्स गळ्यात बांधले होते. आपणही खरं म्हणजे थोडे सेंटी झालेलो असतो, त्याचा फायदा घेतात हे लोकं..

 3. (एक पॉलिसी आपण दर वर्षी न चुकता काढतो त्यामधे प्रिमियम तर भरतोच, पण सोबतच त्या प्रिमियमचा उपयोग करण्याची वेळ येऊ नये असेही विचार करत असतो. मी मेडीक्लेम बद्दल बोलतोय . दर वर्षी मेडीक्लेम मधे पैसे भरल्यावर पण ते पैसे वाया जावे आणि घरचे कोणी आजारी पडु नये अशी प्रार्थना करतो. कशी मजेशीर मानसिकता असते माणसाची नाही का?? )

  ही मजेशीर मानसिकताच आयुर्विमा कंपनीचा पाया असतो. गाडी खरेदी करतानासुद्धा अ‍ॅक्सिडेंटल डेथ पॉलिसी विकत घ्यावी लागते पण आपल्याला गाडीच्या अपघातात मृत्यू यावा अशी कुणाचीच इच्छा नसते.

  हे एजंट लोक पॉलिसीचे फायदे तोटे सांगतानासुद्धा अशा पद्धतीने सांगतात की कुणालाही मोह व्हावा. पेन्शन प्लान समजावून सांगतानासुध्दा हे एजंट लोक हे समजावून सांगत नाहीत की मुळ रक्कम तुला पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर मिळणार नाहीए. तर ती तुझ्या नॉमिनीलाच मिळणार आहे. तुला मात्र पॉलिसी मॅच्युअर झाली की दरवर्षी (दरमहा पण नाही) मिळणा-या हजार बाराशे च्या कूपनवर समाधान मानावं लागणार आहे. जरा विचार करा, मी अशी पॉलिसी आत्ता घेतली आणि वीस वर्षांनी निवृत्त झाले तर त्या दरवर्षाला मिळणा-या हजार बाराशे रुपड्यांचा मला काही फायदा आहे का? एका शंभर रूपयांच्या नोटेची किंमत वीस वर्षांनंतर काय असेल? पण इतका विचार आपण करत नाही. रिटायर्डमेंट प्लान सर्वांना हवाहवासा वाटतो. पण जितकं खोदून खोदून हे विमाएजंट आपल्याकडून पैसे काढतात, तितकंच खोदून खोदून आपण या पॉलिसीची सुद्धा माहिती घेतली पाहिजे. दोन-तीन निरनिराळ्या विभागातील विमा एजंट्सकडून त्याच पॉलिसिबद्दल निरनिराळी मतं ऐकायला मिळतात.

  • यावर मी एक उपाय केलाय. मी हाय रिस्क आणि लो प्रिमियम असलेली पॉलिसी घेतली आहे. ज्यामधे मी दरवर्षी फक्त पैसे भरत असतो, प्रिमियम खूप कमी आहे. २५ लाखासाठी २० हजार आहे प्रिमियम. जर मला काही झालं तर घरी पैसे मिळतील, नाहीतर माझे भरलेले पैसे मेडीक्लेम प्रमाणेच स्वाहा!!!! अजून दहा वर्षात मी दोन लाख रुपये भरणार. माझे रिटर्न्स शुन्य! रिस्क कव्हर मॅक्झिमम. बरेच लोकं मला वेड्यात काढतात. पण जर मला २५ लाखाचं कव्हर फक्त याच पॉलिसीमधे इतक्या कमी प्रिमियम वर मिळालं.
   जर मी याच रकमेची मनी बॅक वगैरे किंवा पैसे मिळणारी पॉलिसी काढली असती, तर प्रिमियम आहे त्याचया दहा पट म्हणजे अडीच लाख वर्षाचं भरावं लागलं असतं. 🙂

   म्हणून जर मी दहा हजाराची एफ्डी किंवा एस आय पी मधे किंवा पी पी एफ मधे जरी इन्व्हेस्ट केले -दहा वर्षासाठी तर मला मिळणारे रिटर्न्स हे नक्कीच जास्त असतील आयुर्विम्यापेक वेळ असेल तर कॅलक्युलेट करा.. 🙂

   रिस्क कव्हर हे फक्त रिस्क साठी असतं, इन्व्हेस्टमेंट्स वरचे रिटर्नस जास्त असायला हवे असे माझे मत आहे.

   • Nachiket says:

    शाहाण पणाने केलेल्या “गुंतवणुकी”चे रिटर्न्स दहा वर्षांनी भरभरून येतील.. अगदी कोणत्याही पॉलिसीच्या शंभरपट. पण आपत्ती दहा वर्षांनी मुहूर्त साधून येणार नाही. ती उद्याही येऊ शकते. आणि आपत्ती इव्हन दहा वर्षांनी बरोब्बर वाट बघून सोयीच्या वेळी आली आली तरी तुम्ही दहा वर्षांत हजाराचे लाख केलेले सगळे एका फटक्यात घेऊन जाऊ शकते.. कदाचित पूर्ण रोगमुक्त किंवा पार्शल अपंग करून पण अगदी भणंग करून सोडू शकते…

    आपण फार फार तर एक आठवडा हॉस्पिटल इमॅजीन करतो. रोज १५,००० या दराने अनेक महिने आयसीयु,रेग्युलर ब्लड ट्रान्सफुजन, सर्जरीज, वगैरे आपण गृहीत धरत नाही.

    हे सर्व कळलं तरी वळत नाही, तोपर्यंत, जोपर्यंत अशी परिस्थितीच्या जबड्यात सापडल्यासारखी वेळ येत नाही..

    म्हणून म्हटलं इच्छा हीच आहे की कुणालाच हे अनुभवातून न कळो..

    पण हे कोणाच्याही प्रिय व्यक्तीबाबत होऊ शकतं हे अगदी खरंखरं. माझ्यासमोर आयसीयुचा खर्च अशक्य होऊन बसलेले आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये जनरल वॉर्डात क्रिटीकल अवस्थेतलाही पेशंट हलवायला मजबूर झालेले लोक मी खूप पाहिले..अगदी आता किती दिवस असे महागडे उपचार चालू ठेवणार..पैशाचा प्रोब्लेम असेल तर तुम्हीच काय तो डिसिजन घ्या..हे शब्दही..कदाचित वाचू शकणा-या पेशंटबद्दलही ऐकले..जाऊ दे.

    • नचिकेत
     अगदी बरोब्बर. आपण मेडीक्लेम जी काढतो ती फारतर प्रत्येकी ३-४ लाखाची असते. पण तुमच्या या कॉमेंट मुळे आता या पुढे नविन पॉलिसी काढतांना अमाउंट वाढवावी का हा विचार नक्कीच मनात आलाय. धन्यवाद. 🙂

 4. Nachiket says:

  परफेक्ट..लाईट मूडमध्ये मस्त लिहिलं आहेत.

  एकूण एक मुद्द्याशी सहमत.

  “मित्राने हा व्यवसाय सुरु केल्यानंतर ’मित्रा ’कडे पण एक गिऱ्हाईक म्हणून पहाण्याची मानसिकता तयार होते ”
  Agreed ++

  विमा एजंट जसे,तसेच ते एम्वे किंवा चेन मार्केटिंगवाले. मित्र किंवा इव्हन मित्रांचे मित्र भेटले की एम्वे वाल्याना त्या जागी नोटांची गड्डी किंवा चेक दिसायला लागतो. की भाषण चालू.. हळू हळू घोळात घेतात. मग विरोध केला की एकदम अग्रेसिव्ह..

  मला तर घराच्या जिन्यात, लोकल मध्ये, रस्त्यात, बेस्ट बसमध्ये..सर्व ठिकाणी असे विमा किंवा एम्वे एजंट भेटले आहेत. प्रवास खराब होतो. किंवा त्यांना तोडून बोलून दुखवावे लागते. अन्यथा ते हार मानत नाहीत.

  विमा फक्त कुटुंब प्रमुखाचाच असावा. थोड्या प्रमाणात बरोबर (लाईफ इन्शुरन्स बाबत) पण मेडिक्लेम सर्वांचा असावा.

  कधीच त्याचा उपयोग करावा लागू नये हीच इच्छा असते पण आपल्या इच्छेने घटना घडत नाहीत. आणि जीवघेणे प्रश्न उभे राहतात.

  अनपेक्षितरित्या दहा वीस लाख ही उभे करायची वेळ येते..विशेषत: लाँग (महिनो महिने) आय सी यु स्टेमध्ये..कितीही इनवेस्टमेंट करून ठेवली असली तरी ती पूर्ण झोळी खाली करूनही गरज भागत नाही..मनुष्य गेलाच तर नुसतंच दु:ख करून भागतं. पण तो समोर जिवासाठी झगडत असला की आपण निदान पैशात कमी पडू नये ही एकच इच्छा राहते.

  मेडिक्लेमशिवाय काय काय होऊ शकतं ते मी लिहू सुद्धा शकत नाही.

  असो…मला कंपनीचा लिमिटेड मेडिक्लेम असूनही आईच्या आजारात जे अनुभवावं लागलं तसं अनुभवातून कोणालाच हे शिकावे लागू नये ही तीव्र इच्छा.

  • मेडीक्लेम सगळ्यांचाच असायला हवा. पण मी फार जास्त रकमेचा काढलेला नाही. गेली कित्येक वर्ष मेडीक्लेम काढतोय. आजपर्यंत मिळालेले म्हणजे क्लेम केलेले पैसे त्या प्रिमियम पेक्षा नक्कीच फार कमी आहेत. पण तरीही मेडीक्लेम इज मस्ट!! नाहीतर वाट लागणार ..
   एक वेगळं पोस्ट लिहायचंय या विषयावर. स्वतःच्या अनूभवावर !

 5. sahajach says:

  महेंद्रजी अगदी प्रत्येक मुद्दा पटला……

  या लोकांच्या प्रसंगी लोचटपणाकडे झुकणाऱ्या वागण्याचा राग करावा, कंटाळा की कीव हेच समजत नाही कधी कधी….. आम्हाला भारतात आल्यावर अक्षरश: नको होते ह्यांचे फोन घेणे……. सकाळी वेळ नसेल तर दुपारी येतो, सुट्टीच्या दिवशी येतो वगैरे म्हणतात पण ’नकोय आम्हाला पॉलिसी’ हे दहा वेळा सांगितले तरी जाम पिच्छा सोडत नाहीत…’एकदा बेनिफिट्स ऐकुन घ्या’ या पालूपदावरची गाडी तिथुन सुटत नाही आणि त्यात कोणी आपल्या, आई-बाबांच्या ओळखीतले असले की स्पष्टपणे उडवूनही लावता येत नाही…..

  बाकि मेडिक्लेमच्या बाबत तुमच्या आणि नचिकेतच्याही मुद्द्यांशी सहमत…

  • तन्वी
   जर पॉलिसी घ्यायची असेलच तर रिस्क कव्हरचीच घ्यायला हवी. आणि कुटूंब प्रमुखानेच घ्यायला हवी . इतरांच्या म्हणजे डीपेंडंट्स च्या नावे घेणे म्हणजे निव्वळ पैसे वाया घालवणे आहे असे वाटते.
   एजंट्स ला ३० टक्के मिळतात, पहिल्या प्रिमियम मधले. म्हणून त्यांना इतका इंटरेस्ट असतो वेळ प्रसंगी ते पहिला इन्स्टॉलमेंट भरायला पण तयार असतात.
   अ‍ॅज अ बिझिनेस कोणी करत असेल तर अवश्य करावा, पण एखाद्याच्या किती मागे लागावे ह्याला पण लिमिट असतेच..ती पाळली की झालं.

  • नशीब! ‘भारतात आल्यावर म्हणालीस’. भारतातच रहाणा-या माझ्यासारखीचा नातेवाईक इन्श्युरन्स एजंट असणं म्हणजे ’काय अवघड जागेचं दुखणं’ असतं काय सांगू!

 6. pravin says:

  नचिकेत व कांचन यांच्या मताशी सहमत आणि अर्थात तुमच्या लेखाशीही सहमत 🙂 इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट्स या दोन भिन्न गोष्टी आहेत. माझे ही काही विमा एजंट मित्र होते, शेवटी सरळ सांगितलं की माझे अगोदरच भरपूर विमे काढलेले आहेत आणि विम्याबद्दल बोलायचं असेल तर माझ्याशी यापुढे बोलला नाहीस तरी चालेल. आता दिसला तर हसत सुद्धा नाही. विमे काढताना पुढे पुढे करणारे हे लोक विम्याबद्दल काही प्रश्न वा तक्रारी असतील तर जवळपास फिरकत देखील नाहीत.

  • प्रविण
   म्हणूनच वर लिहिलंय मी एक विमा एजंट तयार झाला , की आपला एक मित्र कमी झाला असे समजावे.

   पण एका केरळी मित्राच्या बाबतीतला माझा अनूभव फार वेगळा आहे. कधीच मला पॉलिसी घे म्हणत नाही, आणि मागे पण लागत नाही म्हणूनच त्याच्याकडूनच सगळ्या पॉलिसीज घेतल्या आहेत मी काढून- अगदी नातेवाईक असलेल्या एजंटस ला टाळून पण त्याच्याकडून घेतल्या आहेत पॉलिसीज. नशिबाने त्याची सर्व्हिस पण चांगली आहे. – अजूनतरी 🙂

 7. भय आणि स्वप्न या दोन गोष्टींवर जगातले अनेक व्यवसाय चालतात.

  • प्रकाश
   सोळा आणे खरं आहे.. आपल्या भय आणि स्वप्न या दोनच गोष्टींवर अनेक व्यवसाय चालतात.

 8. हे हे खरय..
  आपल्याला तुम्ही कधी ही मरु शकता अचानक आणि मग तुमच्या परिवाराच काय होईल, त्यांच्या वेदना आपल्यालाच समजावून त्याच्या कंपनीची पॉलिसी टेकवायची हातात …. 😉

 9. shreevardhan says:

  महेंद्र,
  अगदी वास्तवता लिहिलेली आहे. लेख छान वाटला. असे खुप मित्र आणि जवळचे नातेवाईक भेटतात. मी त्यांना घराचे लोन आहे असे काही कारणे सांगुन मला कोणतीही पॉलिसी घ्यायची नाही असे सांगतो.

  • श्रीवर्धन,
   प्रत्येकाला काय गरजा आहेत ते स्वतःच ठरवायचे असते. एजंट जेंव्हा माझ्या गरजा काय आहेत हे सांगायला लागतो तेंव्हा तर जाम चिड येते मला.

 10. Nachiket says:

  हा विषय इतका क्लासिक आहे की चिं.वी. जोशींनीसुद्धा “विमा एजंटास चकवणे” ही गोष्ट गेल्या शतकाच्या पूर्वार्धात लिहिली होती..अजूनही ती वाचताना हसू येते.

  त्यात त्यांनी सुचवलेली विम्याच्या फॉर्मला दिलेली उत्तरे हसून ठसका आणतात..

 11. bhaanasa says:

  अगदी अगदी. विमा एजंटाच्या चिकाटीची दाद द्यायला हवी मात्र. आपण मेल्यानंतर कुटुंबाचे काय होणार ही भीती आपल्या व घरातल्यांच्या मनात घुसवल्याशिवाय मुळी दम घेतच नाहीत. शेवटी शेवटी तर मरणपुराण बंद कर आणि चेक घेऊन काळे कर असे म्हणायची वेळ येते. 🙂
  लेख मस्त झालाय. आणि हा कशाचा परिणाम आहे हेही कळतेय. 😀

  • अगं हो ना , कालच मेडीक्लेम ची पॉलिसी शोधत बसलो होतो.. आणि नेमकी ती सापडत नव्हती.. म्ह्णून लिहिलं हे ..

 12. Smita Ghaisas says:

  nice one. bang on target.

  A travel insurance agent once tried to sell his fares to my husband when I was to travel a long distance back in late eighties and told him how he had gone to the deceased person’s ( Pan Am accident) husband with chocolates and a cheque:-)) immediately after the disaster.. as if….

  my husband just stopped short of pushing him out the door!! :-))

  • स्मिता
   मला अगदी हेच सांगायचं होतं.. 🙂 प्रत्येकालाच असं वागणं जमत नाही, आणि याचाच हे लोकं फायदा घेतात.

   एवढ्यात ऑन लाइन तिकिट काढलंय का ? जेट चं ऑन लाइन तिकिट काढतांना त्यामधे एक इनशुरन्सचा कॉलम आहे दिलेला.एवढ्यातच अ‍ॅड केलेला दिसलाय तो. तुम्ही तिकिट काढतानाच तुमचं इन्शुरन्स आपोआप काढले जाते. म्हणजे इथे पण जबरदस्ती. लोकं निट पहात नाही आणि तो बॉक्स अनचेक करत नाहीत..

   • Smita Ghaisas says:

    yes, that column is a tricky one!:-) each time I remember to remember and uncheck that

    • Shantanu Oak says:

     जेटचे टिकीट नंतर पाहताना लक्षात आलं, आपला विमा (प्रवासापुरता) काढला गेला आहे. एक क्षण फसवल्यासारखं वाटलं, पण म्हटलं ठीक आहे, चूक आपलीच होती, लक्ष देऊन फॉर्म भरला नाही की असं होतं.

 13. आपल्या इमोशन्सचा हे फ़ायदा घेतात.सांगतांना फ़ायदे मोठ्यामोठ्याने सांगतात पण रिस्क आणि अटींच्या नावाने बोंब…असो चिकाटीसाठी तर शाळेत हयांचच उदाहरण द्यायला हव, कसले मागे लागतात….

  • मेडीक्लेम मधे पहिल्या वर्षी बरेच आजार कव्हर नसतात.
   “चिकाटीसाठी तर शाळेत हयांचच उदाहरण द्यायला हव, कसले मागे लागतात…” 😀

 14. girish says:

  MBK, agent tumcha regular auditor tar nahi na???

  • 🙂 अरे नाही. सुशिल नाही. तो मागे लागत नाही फारसा. त्याला सांगितलं की माझं वय हे पॉलिसी घेण्याचे राहिलेले नाही म्हणून. अरे पण तू त्याला कटवलं होतंस.. 🙂 तो अजूनही तूझी आठवण काढतो.
   मी हा लेख लिहितांना फार जूनी घटना रेफरन्स ला घेतली आहे. माझा शाळू मित्र होता तो, ज्याच्याबद्दल लिह्लंय तो.

 15. काका…अगदी खर लिहल आहे…माझा मित्र पण अविवा चा एजंट झाला होता लय डोक्याला शॉट दिला शेवटी वैतागुन एक पॉलीसी घेतली…शॉलीड लटकलो आहे त्यात….अन पठठ्याने आता हात वर केलेत. का तर अविवा सोडून आता दुसरीकडे जॉईन झालाय…

  >>“मित्राने हा व्यवसाय सुरु केल्यानंतर ’मित्रा ’कडे पण एक गिऱ्हाईक म्हणून पहाण्याची मानसिकता तयार होते ”

  याचाच अनुभव घेतला आहे.

  • योगेश
   सांभाळून.. या पुढे पॉलिसी घे म्हणून कोणी मागे लागलं, तर दोन महिन्या नंतर काढणार असे सांगायचे, आणि मग नंतर पुन्हा आता पुढल्या सहा महिन्यानंतर काढिन असे सांगायचे.त्याचा फोन आला की त्यालाच २० हजार उसने मागायचे. आणि सारखे फोन करून कसंही करून पैसे दे उधार म्हणून मागे लागायचे, की तो तुमचा पिच्छा सोडतो.
   करून पहा.. ट्राईड अ‍ॅंड टेस्टेड युक्ती आहे.

 16. Vidyadhar says:

  खरोखर आवरा लोक असतात हे…

 17. महेश says:

  आपण खरतर तेच लिहिलेआहे, सर्व एजंटच आपणाविषयीसमोरच्या व्यक्ती ला भर भरून माहिती देत असतो एजंटची हि तर खरी खासियत असते ,एजंटसमोरची व्यक्ती भावनेच्या भरात विचार करत बसतात ,

  • भावनाप्रधान बनवून तुमच्याकडुन त्यांना हव्या त्या ( म्हणजे ज्यात जास्त कमिशन आहे अशा ) पॉलिसी विकतात ते.

 18. लहान मुलांचा इन्शुरन्स, ठराविक मर्यादेनंतर परतावा देणारा इन्शुरन्स ह्या गोष्टी म्हणजे नुसती लूट आहे. इन्शुरन्स त्याचा असावा ज्याच्या जाण्याने घरातील मिळकत बंद होईल. मुलांचा इन्शुरन्स म्हणजे विनोद आहे. त्यापेक्षा मुलाच्या नावाने म्युचल फंड किंवा पोस्टातील ठेवी काढल्या तर जास्त परतावा मिळेल जो मुलांच्या शिक्षणात कामी येईल. आणि लाईफ इन्सुरन्समध्ये टर्म इन्शुरन्स हाच जास्त फायदेशीर आहे.

  लेख मस्त!

  • निरंजन
   अगदी हेच मला पण वाटतं, पण त्या एजंट्सची मात्र कमाल आहे , त्यांना इतकं छान ट्रेनिंग दिलेलं असतं की ते अजिबात राग येऊ देत नाहीत अपमान केला तरीही…
   मुलांच्या शिक्षणासाठी आरडी /ए्फ डी/म्युचुअल फंड हे उपाय उत्कृष्ट!

 19. Mrunal says:

  kupch chan. Pl. Send all previous on my mail.ID.

 20. हे विमावाले तर वैताग आणतातच पण त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे ते अँम्वेचे चेन मार्केटिंग वाले.. इथे त्यांचा भयंकर सुळसुळाट आहे !!!

 21. Namaskar,

  Lekh uttam. Asa anubhav nehami yeto. Vima agent, amway, swadeshi ani nana prakarchya chains.

  Pu la ni dekhil vima agentna Hitshatru mhatale aahe. Me anubhavatun ek goshta shikalo ti mhanaje konahi mitrakadun kiva natevaikakadun vima policy gheu naye. Tyatle sarva me vima agent zaloy, mazhyasathi mhanun hi policy ghe ase bhavanik avhan karat asatat. tya policycha aplyala kay fayda aahe, kharokhar tyacha kahi upayog aahe ka ? investmentchi policy bari ki risk cover karnari ki tax exemption denari…ya sarvanbaddal tyanchya kade kahi mahiti nasate. Ugach 20/25 varshansathi aplyala latkavun taktat. parat te pudhil hapte bharanyasathi reminders / cheque deposits asha konatyahi soyi det nahit. Me ata tar chakka tondavar sangun mokala hoto ki hi policy me ghetali tar tula je commission milel tevadhe paise me tula deto pan policy ghenar nahi.

  Mahatprayasane mala 1 professional vima agent milala. jo mala majhe premium bharayachya adhi reminder mhanun na chukata phone karato ani swat: yeun cheques collect karato, receipt anun deto. Me swat: mala ajun policies kadhayachya ahet ase mhanalyashivay bhetayala yet nahi.

  Tumhi je karatay…tasa salla tyane mala dila ki insurance kade investment mhanun pahu naka. tyane mazhe family income kiti, amchi loans kiti, 1 jan gachakala ani tyache income yene band zale tar sarva loans cha bhar dusaryachya angavar padu naye ya sathi kiti insurance hava…..hi sagali calculations karun 6/7 policies mix karun amchya garaje pramane policies dilya.

  Vima agent zalela mitra, aplya mitranchya yaditun kami hoto pan ha vima agent mazhya mitranchya yadimadhe shamil zala.

  • माझ्या ऑफिस मधला मित्र पण माझे सगळे विम्याचे कामं पहातो. खरं तर मी एकच मोठी पॉलिसी घेतली आहे. पैसे परत न मिळणारी. अनमोल जीवन नावाची पॉलिसी आहे ती. त्याबद्दल काही माहिती मिळेल तर पहा,कमी पैशात जास्त रिस्क कव्हर होतं.. तुमच्या मित्रालाच विचारून पहा. आपण जशी मेडीक्लेम काढतो तशीच ही पॉलिसी समजली तर खूप छान आहे. :

 22. poojashree says:

  maaf karaa pan, policy phakta kutumbprumukhaanchich kaa?baayko-mulaanchii kaa nako?

 23. मस्त लेख. फार awkward position होऊन जाते हो अश्या वेळी… मित्र, नातेवाईक वगैरे एजंट झाले की मग माझ्या अंगभूत भिडस्तपणामुळे फारच गोची होते. काही वर्षांपुर्वी माझ्या सख्ख्या भावानेच एजन्सी घेतली. मी आधी principles वगैरे सांगून त्याला टाळला. पण एक policy ’उतरवलीच’ त्याने माझी !! सख्ख्या भावाला ठीक आहे हो, जरा दरडावून पिटाळू शकलो. पण जवळचे नातेवाईक, खास मित्र एजंट बनतात आणि हक्काचे गिर्‍हाईक असल्यासारखे खोट्या अधिकारवाणीने फॉर्म वगैरे घेउन येतात, तो प्रकार आताशा मला फार किळसवाणा वाटू लागलाय !!!!!!!

 24. smita says:

  Kaka, Tumchya an nachiketcya matashi 100% sahamat ahe. Insurance Policy nehami jast coverage with minimum Premium hyach ghyavyat karan vimawale asha policies kadhich suchvat nahit karan asha policy madhe commission jast milat nahi. An medical policies mhanal tar hya pudhil kalat medical expenses pharach mahag hot chalalya ahet tar awashyak ahet an te pan mothya coverage chya karan heart diseases, cancer sarkhe rog pharach kharchik ahet. Samanya lokanna hyache upachar parvadnar nahit so Saglyannich medical insurance gyava he uttam. Dhanyawad…….

  • स्मिता
   इन्शूरन्स = रिस्क कव्हरेज
   सेव्हिंग= इतर इन्व्हेस्टमेंट्स..
   माझा हा मंत्र मी नेहेमी फॉलॊ करतो.

 25. रोहन says:

  मेडिक्लेम वयस्कर माणसांसाठी असावे असे वाटते. आपल्या मनात नसले तरी कधी ना कधी तिचा उपयोग होतोच. बाकी एजंट लोक म्हणजे जिंदाबाद… 🙂 ह्यांना खरच आवरा !!!

 26. VIJAY SHEDGE says:

  i agree with u but all agents r not same….!
  PAN LEKH MAST LIHALA AAHE KARAN ASE ANUBHAV SAGLECH GHETAT
  thank u

 27. tejas says:

  मी देखील एक विमा एजंट आहे … पण माझी पद्धत वर दिल्याप्रमाणे नाही … अत्यंत व्यावसायिकरित्या मी हे काम करतो … पोलीसितले खरे मुद्दे त्याचे फायदे सांगणे हे आमचे काम असते … विमा जर उपयोगाचा नसता तर ह्या कंपन्या कधीच बंद पडल्या असत्या … फायदा हा आहेच … फक्त हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे … त्यामुळे योग माहिती लोकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या गरजांनुसार त्यांना प्लान्स सुचविणे ह्यात काहीच वाईट नाही… हा… खूप मागे लागणे त्रास होईसतोपर्यंत हे मात्र नक्कीच चुकीचे आहे…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s