’सकाळ’ मधे ’काय वाटेल ते’

sakal, e sakal, kay vattel te, kay vatel te, mahendra kulkarni

सकाळ आठवा रंग मध्ये

तुम्हाला कधी जाणवलं आहे का ? की काही वर्षा पुर्वी तुम्ही फक्त काही प्रथितयश लेखकांचीच पुस्तकं वाचत होता- आणि आज मात्र अगदी बऱ्याचशा नॉट सो वेल नोन ब्लॉगर्सचे ब्लॉग पण वाचता . तुमच्या आमच्या  आवडी मधे इतका फरक कसा काय पडला असावा बरं ? मला वाटतं की वाचनीय साहित्याची  सहज उपलब्धता. लंच टाइम मधे दोन पानाचा  ब्लॉग वरचा एक लहानसा लेख चटकन वाचून होतो, आणि तो  सहज  उपलब्ध असतो , काम करता करता चटकन वाचता येतो -म्हणून असेल कदाचित.

पूर्वीचा  काळ काही  प्रथितयश लेखकांनी गाजवलेला होता. प्रकाशक   पण काही ठरावीक लेखकांची  पुस्तकं छापत होते- अर्थात “जे विकले जाईल  ते छापले जाईल ” या उक्ती प्रमाणे प्रकाशक ठरावीक लोकांची पुस्तकंच छापायचे-  इतर बरेच ’नॉटस सो वेल नोन’  लेखक मात्र आपली हस्तलिखितं घेऊन प्रकाशकांचे उंबरठे झिजवत बसायचे.

फक्त ठरावीक लोकांनाच लिहिता यायचे  असा याचा अर्थ होत नाही .  इतरही अनेक  चांगले लेखक होते, की ज्यांची पुस्तकं ही हस्तलिखितं म्हणून प्रसवली गेली, आणि त्याच स्थिती मधे नामशेष पण झाली- (कुठल्याही प्रकाशकाने न छापल्या मुळे) . काही पैसेवाले लेखक स्वतःची पुस्तकं स्वतःच छापून प्रसिद्ध करायचे , पण त्यांच्यापैकी बहुतांश लोकांची पुस्तके ही केवळ त्यांच्याच कपाटात नीट रचून ठेवलेल्या  अवस्थेत जूनी व्हायची – किंवा लग्ना मुंजीमध्ये लोकांना प्रेझेंट देण्यासाठी उपयोगी पडायची. अर्थात  या गोष्टीला पण काही  अपवाद हे होतेच……. .काही दिवसापूर्वी ब्लॉगर्स मेळाव्याच्या निमित्याने एक लेख लिहिला होता तो इथे वाचता येईल. आज जे काही लिहायचं आहे, ते  बरंचसं आधी त्याच लेखात  लिहून झालेलं आहे   – पुनरुक्ती नको, म्हणून इथे पुन्हा तेच ते लिहित नाही

परवाच सकाळच्या  आठवा रंग  पुरवणी मधे  ब्लॉगाईट मध्ये ’काय वाटेल ते’ वर  लिहून आलं. अर्थात कुठल्याही वृत्तपत्रात काही छापून आलं की बरं हे वाटतंच. मी पण त्याला काही अपवाद नाही. वृत्तपत्रामधे काही छापून आलं की ब्लॉग ची माहिती बऱ्याच लोकांना मिळते, आणि नविन वाचक पण ब्लॉग ला भेट देतात.आणि सकाळसारख्या ऑन लाइन खूप पॉप्युलर असलेल्या वृत्तपत्रात आपल्याबद्दल छापून आल्यावर निश्चितच आनंद झाला.

एक गोष्ट बाकी नक्की, की ब्लॉग हे माध्यम अजूनही बाल्यावस्थेत आहे, याच काळा मधे जर त्याकडे दुर्लक्ष केले गेले तर मात्र  हे माध्यम कधीच बाळसं धरू शकणार नाही.   मराठी ब्लॉगविश्व मधे  त्याला कुपोषित न होऊ देता शैशवावस्थेत- किंवा तारूण्यावस्थेत पोहोचवण्याच्या कामात मनःपूर्वक हातभार लावण्याचे काम करण्यात काही लोकांनी आणि वृत्तपत्रांनी  निःस्वार्थी पणे   केलेले आहे.

या मदत करणाऱ्यांच्या मधे प्रामुख्याने ’सकाळ’  चे नांव घ्यावे लागेल. अगदी सुरुवातीला जेंव्हा ब्लॉग ही संकल्पना अगदी नवीन होती, तेंव्हापासून सकाळ ब्लॉगर्सशी जोडल्या गेलेला आहे. पहिली ब्लॉगर्स मिट जेंव्हा पुण्याला  आणि नंतर मुंबईला झाली, तेंव्हा त्या ब्लॉगर्स मेळाव्याचे व्यवस्थित वृत्तपत्रीय कव्हरेज सकाळने आणि लोकसत्ताने  केले होते.काही वार्ताहार तर स्वतः बातमी कव्हर करण्यासाठी गेले होते.

मेळावा होणार हे   ठरले तेव्हाची  बातमी ते मेळाव्यात काय झालं  त्या सगळ्यांची बातमी छापली होती.  जे लोकं ब्लॉग वाचत नाहीत, त्यांच्यापर्यंत  ही बातमी पोहचल्यायामुळे पण त्यांना पण ब्लॉग या प्रकारा बद्दल बरीच उत्सुकता निर्माण झाली  होती, आणि त्यांनी पण या मेळाव्याला हाजरी लावली होती.   या ब्लॉगर्सच्या मेळाव्याला प्रसिद्धी देण्यात  लोकसत्ता पण मागे नव्हते. लोकसत्ता मधे पण या बद्दल सविस्तर बातमी आलेली होतीच.  तरीही ब्लॉगर्स साठी हक्काचं व्यासपीठ म्हणजे सकाळ हे समीकरण मात्र दृढ झाले आहे.

तुम्ही फोटो काढता? तुम्हाला तुमच्या काही खूप जून्या   रेसिपी वंशपरंपरेने तुमच्या पर्यंत आलेल्या या जगाशी शेअर करायच्या आहेत? तर इ सकाळने नवोदित लेखक, ब्लॉगर्स, आणि फोटोग्राफर्स साठी एक खास विभाग सुरु केलेला आहे. आठवा रंग.  या आठवा रंग मधे  सगळे नवोदित  लेखक, फोटोग्राफर्स चे  फोटो आणि लेख  रेसिपी छापून येतात.  फारशा प्रसिध्द नसलेल्या लोकांसाठी सुरु केलेले हे व्यासपीठ उत्तरोत्तर नवीन लेखकांना संधी देत राहिल  .

मध्यंतरी च्या काळात ब्लॉग विश्व  ब्लॉग वरच्या चोऱ्यांच्या मुळे त्रस्त झालेले होते. तुम्ही एखादा लेख लिहिला, की दूसरा कुणीतरी तो स्वतःच्या ब्लॉग वर लेख डकवायचा. माझ्या आणि कांचन च्या मोगरा फुलला वरचे   बरेचसे लेख एका साईट वर पोस्ट केले गेले होते. कांचनने तो ब्लॉग कोणाचा आहे याचा लावलेला   छडा म्हणजे एक मराठी ब्लॉगिंग मधली एक अविस्मरणीय घटना होईल.

सकाळ, सामना मधे, या संदर्भात एक पुर्ण बातमी आली होती- अगदी त्या चोरट्या च्या नावा सहीत. सकाळ फक्त बातमी छापूनच गप्प बसले नाही, तर असे प्रकार पुन्हा पुढ होऊ नये म्हणून  काही एक्सपर्ट लोकांशी सल्लामसलत करून –  ब्लॉग वरच्या लिखाणाच्या चोरीच्या संदर्भात एक व्हिडीओ कॉन्फरन्स पण अरेंज केली होती. त्या कॉन्फरन्स मधे एसीपी, प्रथितयश वकील पण सहभागी झाले होते.  ब्लॉगर्सनी कुठल्या प्रिकॉशन घेतली पाहिजे ते समजाऊन सांगितले. ही व्हिडओ कॉनफरन्स   एक माइल स्टॊन ठरेल यात काही शंका नाही. या बद्दलचे सविसतर वृत्त मोगरा फुलला वर आलेले आहे .ब्लॉगर्सचे सकाळ बरोबर एक वेगळेच नाते -ऋणानूबंध निर्माण झालेले आहेत   आणि ते उत्तरोत्तर जास्त जवळचे होत जाणार यात काही शंकाच नाही.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in साहित्य... and tagged , , , . Bookmark the permalink.

50 Responses to ’सकाळ’ मधे ’काय वाटेल ते’

 1. ngadre says:

  Great..you are getting the recognition you deserve.

  Congrats..

 2. अभिनंदन काका..लिहते रहा.
  खूप खूप शुभेच्छा

 3. sahajach says:

  महेंद्रजी मनापासून अभिनंदन…. 🙂
  तुम्ही लिहीत रहा आम्ही वाचतोय नव्हे आवडीने वाचतोय……

  सकाळ आठवा रंगचे आभार….

  • तन्वी
   खरंच आठवा रंगचे आभार मानायचे राहूनच गेले वरच्या पोस्ट मधे. 🙂 अगदी वेळेवर लक्षात आणून दिलं. धन्यवाद

 4. लीना चौहान says:

  अभिनन्दन दादा.. असेच लिहित रहा आणि अशीच प्रसिद्धी ही मिळत राहो तुम्हाला.
  तुमची प्रत्येक पोस्ट खूपच मुद्देसुद आणि मस्त लिहिलेली असते.

 5. Vidyadhar says:

  अभिनंदन काका,
  मस्त सविस्तर माहितीपूर्ण पोस्ट झालीय! 🙂

 6. अभिनंदन अभिनंदन

  बाल्यावस्था मान्य..पण बाळसं धरू शकणार नाही हे नाही पटल. मला तर वाटते मराठी ब्लॉग विश्व चागलेच बाळसे धरेल हळू हळू…हल्लीची वं पुढील पिढी ऑनलाईन जेवढे वाचते तेवढे वर्तमानपत्र देखील वाचत नसेल…परदेशात तर वर्तमानपत्र बंद करून ओनलाईन वर्तमानपत्र चालवायचे दिवस आलेत..आपल्याकडे अजून याला वेळ आहे. पण होणार हे निश्चित..नाहीतरी हल्ली वर्तमान पत्रे म्हणजे एक प्रकारचे जाहिरातीचे मशिन्सच झाले आहे. त्यामुळे काही खरोखर वाचायचे असेल वा व्यक्त करायचे असेल तर ब्लॉग हा उत्तम पर्याय उभा राहत आहे..प्रॉब्लेम इतकाच आहे..की अजून याबद्दल मराठी जनतेत हवा तितका अवेरनेस नाहीये…मीदेखील साधारण दीडदोन महिन्यापर्यंत मराठी ब्लॉग्सबद्दल अनभिज्ञ होतो…गेली १० वर्षे दिवसातले १२ तास ऑनलाइन असून देखील..मग इतरांचे काय?

  गरज आहे ती तुमच्यासारख्या ब्लोगिंगला सिरीअसली घेणाऱ्या लोकांची. तुमच्यासारख्या कन्सिस्टंट ब्लॉगर्समुळे ब्लॉगर्सबद्दल इतरांचा एक सकारात्मक दृष्टीकोन तयार होतो. एक आदर आपोआप मिळतो. वाढतो. लोकांना सवय लागते…रोज फिरून फिरून परत तुमच्या ब्लॉगवर यायची..माझ्यासारख्यांना अनेकांना ब्लॉग लिहायची…

  एक व्यासपीठ मिळते चर्चा करण्यासाठी..आपल्या मनातील असंख्य विषयांवर इतरांची मते वाचण्यासाठी समजण्यासाठी लिहिण्यासाठी ..वर्तमानपत्र वा इतर अनेक मिडीयांसारखे हे फक्त एकांगी माध्यम नाहीये…इथे वाचक ताबडतोब आपली मते व्यक्त करू शकतो..लेखाकापर्यंत इतर वाचकापर्यंत पोहचवू शकतो. इथे विचारांची/मतांची/ माहितीची देवाणघेवाण जितक्या सहज होऊ शकते तितकी कुठेच नाही. म्हणून मला मराठी ब्लॉगिंगचे भविष्य उज्वल वाटते.

  भरपूर आहे लिहिण्यासारखे…इतरांनीही ह्या विषयावर त्यांची मते इथे मांडावीत अशी अपेक्षा करून…झम्प्याला आवरतो.. 🙂

  • मी म्हंट्लं आहे की जर ’दुर्लक्ष झालं तर” बाळसं धरणार नाही.
   अर्थात हे कुठल्याही गोष्टीसाठी लागू ठरतं.
   बाकी कॉमेंट एकदम मुद्देसूद.. 🙂

 7. महेंद्र,

  हार्दिक अभिनंदन!

  • निरंजन
   धन्यवाद.. तुमच्या सदिच्छांची गरज आहेच, त्याशिवाय लिहिण सुरु ठेऊ शकणारच नाही.

 8. pravin says:

  Congratulations…:) Halli mac ghetlyaapasoon marathit lihine band jhaale aahe… lavkarach suruwat karen 🙂

  • प्रविण
   धन्यवाद!!
   मॅक वर बरहा चालत नाही का? मी अजूनही मॅक वापरलेला नाही म्हणून काहीच माहिती नाही त्या बद्दल फारशी.

   • pravin says:

    Unfortunately no 😦 I asked them if they have a copy. I was ready to pay but they did not have it 😦 The other unicode softwares are not that good.

 9. Sudhanwa says:

  Sakal is not so clean about giving credits. If you notice carefully, they give credits to photographers who are from Sakal group only. All other photos are not given credits anytime. Not very sure if they have rights to publish them but I am assuming they have purchased those photos or the rights to publish.

  It is nice to know that they are doing some good work about copyrights (IPRs in general) Hopefully they improve themselves first.

  Can not write this on Sakal site as it will be rejected. Please convey this to them.

  Regards

  • सुधन्वा
   तसं नाही, तुम्ही आठवा रंग वाचलेला दिसत नाही. कृपया वरच्या लिंक वर क्लिक करा म्हणजे नविन स्वरूप लक्षात येईल.

 10. सागर says:

  पुनश्च अभिनंदन.
  सकाळ चे योगदान नक्कीच इतर पेपर पेक्षा जास्त आहे

 11. Shardul says:

  Hardik Abhinanden…

 12. bhaanasa says:

  सकाळ मध्ये छापून आल्या आल्याच वाचले होतेच. पुन्हा एकवार अभिनंदन! खूपच छान. 🙂 अशीच घोडदौड जोरात चालू राहू दे. आम्ही आहोतच वाचायला आणि कौतुक करायला.

 13. अभिनंदन काका! जोपर्यंत तुमच्या सारखे ब्लॉगर्स, सकाळ सारखे वृत्तपत्र [(आणि आमच्यासारखे वाचक:)] आहेत, तोपर्यंत ब्लॉग्सला मरण नाही!

 14. ग्रेट ! अभिनंदन ! खरोखर ब्लॊग हे खुप चांगले साधन बनत चाललेय नवोदितांसाठी ! 🙂

 15. अभिनंदन काका… 🙂 🙂

 16. Mahendrakaka,
  Congraulations! You deserve it!

 17. poojashree says:

  punhaa ekdaa tumche haardik abhinandan:)
  keep it up, sir:)

 18. sachin says:

  सर तुमचे चार पोस्ट वाचले. आवडले. मला वाटते तुम्हि पुस्तक लिहा. नाव इंजिनिअर एक्स्पिरिअन्स. आकार छोट्या डायरी

 19. जयंत says:

  //एक गोष्ट बाकी नक्की, की ब्लॉग हे माध्यम अजूनही बाल्यावस्थेत आहे, याच काळा मधे जर त्याकडे दुर्लक्ष केले गेले तर मात्र हे माध्यम कधीच बाळसं धरू शकणार नाही. मराठी ब्लॉगविश्व मधे त्याला कुपोषित न होऊ देता शैशवावस्थेत- किंवा तारूण्यावस्थेत पोहोचवण्याच्या कामात मनःपूर्वक हातभार लावण्याचे काम करण्यात काही लोकांनी आणि वृत्तपत्रांनी निःस्वार्थी पणे केलेले आहे.//

  एकदम सहमत !
  जयंत कुलकर्णी.

  • जयंत
   मनःपुर्वक आभार. प्रतिक्रिया जुन्या लेखावर असल्याने उत्तर देणे लक्षात राहिले नव्हते..

 20. काका, सॉरी उशीर झाला प्रतिक्रिया टाकायला. मनःपूर्वक खूप खूप अभिनंदन.. !!!
  तुम्ही असेच सतत लिहीत रहा आणि आम्हाला छान छान वाचायला मिळो.

 21. हेमंत आठल्ये says:

  अभिनंदन!!!
  आपले लेख नेहमीच उत्तम आणि दर्जेदार असतात. त्यामुळे वृत्तपत्रांना त्यांची दाखल घ्यावी लागणारच! उशिरा प्रतिक्रिया देतो आहे म्हणून क्षमस्व.

 22. Pingback: ’सकाळ’ मधे ’काय वाटेल ते’ | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA.

 23. अभिनंदन काका

 24. पाहूनी आपला लेख “सकाळी”
  वाजवीली आम्ही टाळी
  अशीच येवो इतरां पाळी
  भले,दिसेना तो “संध्याकाळी”

  अभिनंदन,
  आपलं कौतूक करावं तेव्हडं थोडंच.

  • काका,
   मनःपुर्वक आभार.. तुमच्या सगळ्यांच्या कौतूकामुळेच इतर अजूनही ब्लॉगिंग सुरु आहे.

  • poonam says:

   kaka namskar, tumchi kavita vachli khup chan vatli.Aashich ek kavita navya pidisathi punha navi suruvat karnyasathi liha na please.Tumchya anubhavatun kadachit ek disha milel aanadi rahnychi.

   • पुनम
    कविता करणे मला काही जमत नाही फारसं, आणि खरं म्हणजे आवडही नाही. त्यापेक्षा मला लिहायला जास्त आवडतं.

 25. ravindra says:

  मनःपूर्वक अभिनंदन महेंद्रजी!

 26. poonam says:

  Me itke divas vat baghat hote Sakal paperla maze lekh kase pohachvu yachi aata agdi sope vatate.Pan ek adchan aahe mala maze nav lekha sobat prasidh hou naye aase vatate.Tar me tumhala maze lekh pathavin.Tumche navin “Saptrang” madhil lekhak kay lihitat great.

  • जर लेखाबरोबर नाव नको असेल तर तशी विनंती केली जाऊ शकते. आणि तुमचे लेख माझ्या नावाने छापणे योग्य वाटत नाही. 🙂 मेल पाठवला आहेच.

 27. poonam says:

  Namskar kaka, Hardik abhinandan.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s