आजचे पोस्ट खास लग्न झालेल्या आणि ज्यांच्या बायकांना सारखं ’ तू किती जाड झाला आहेस? जरा तुझ्या खाण्याकडे लक्षं द्यावं लागेल आता ’ म्हणून कम्पलसरी डायट च्या नावाखाली दुधी भोपळा, मटकी, मुग, शेपू, पालक अशा बाबा रामदेव अॅडव्होकेटॆड निरुपद्रवी बेचव भाज्या खायला लागणाऱ्या नवऱ्यांच्या साठी खास लिहिले आहे.
सुटीचा दिवस रविवार! मस्त पाउस पडतोय सध्या सगळीकडे. सकाळी बिछान्यातून उठण्याची इच्छा होत नाही. मुंबईला पण पंख्याखाली थंडी वाजते, आणि जाड चादर अंगावर घ्यावीशी वाटावी असे वातावरण. डोळे किलकिले करून समोर पाहिले, तर उघड्या खिडकी मधून बाल्कनी मधे भिजलेला कावळा आपले ओली पिसं पिंजारून पिसांचा आतला पांढरा रंग दाखवत बसलेला- जणू सांगतोय मी वरून जरी काळा असलो, तरी पण गोरा आहे बरं कां आतून.
हं.. तर असं मस्त वातावरण! अशा वातावरणात भजी , वडा वगैरे खाण्याची इच्छा होणं साहजिकच आहे. इथे आता खास वजन वाढलेल्या विवाहित पुरुषांच्या साठी भजी बनवायची रेसिपी देतोय. अगदी लक्ष देऊन वाचा!
तो बाल्कनितला कावळा पिसं पिंजारून बसलेला, त्याच्या कडे पहात, अंगावरची चादर अनिच्छेनेच का होईना पण दूर करा. चादरीची घडी ( व्यवस्थित) करून पायथ्याशी ठेवा ( जी तुम्ही कधीच करत नाही) . बायको झोपलेली असेल – तिच्या अंगावरची चादर व्यवस्थित करा . स्वतःचा चहाचे आधण चढवून दार उघडून दुधाची पिशवी घेऊन त्यातलं दूध तापत ठेवा. चहाचा मसाला फ्रिझ मधे साईडला असेल, मस्त पैकी मसाल्याचा चहा स्वतः करून घ्या.
नंतर समोरच्या दारात कडी मधे अडकलेला पेपर काढून घ्या, मग आपला चहाचा कप घेउन बाल्कनी मधे उभं राहून चहाचे घोट घेत पावसाचा आनंद घेत पेपर वाचत बसा. थोड्या वेळाने पेपर व्यवस्थित घडी करून टी पॉय वर ठेवा. त्यावर पेपर वेट ठेवायला विसरू नका. चहाचा कप, चहाचं भांडं, विसळून जागेवर ठेवा. चहाचा चोथा हा बेसिन मधे न फेकता डस्टबिन मधे फेका. भांड आणि कप जागेवर ठेवा.दुधाचं भांडं झाकून ठेवायला अजिबात बिसरू नका.
बायको सकाळी बेड टी घेत नसते ( तुम्ही जरी घेत असला तरीही) तेंव्हा तिच्या उठण्याची वेळ झाली की एक कप मस्त पैकी कॉफी करून तिच्या समोर उभे रहा. आणि तिला हळूच उठवा. कसं- ते तुमचं तुम्ही ठरवा. कॉफीचा कप समोर दिसल्यावर ती जरा संशयाने तुमच्याकडे पाहिल, पण तिकडे दुर्लक्ष करुन,’ अगं, तू रोजच करतेस नां, म्हणून मी केली आज कॉफी ’ असं म्हणून कप हातात द्या. ती कप बाजूला टेबलवर ठेउन ब्रश करून येईल तो पर्यंत तिची पण चदर घडी करून ठेवा – आणि पलंगावरील अंथरलेली चादर व्यवस्थित करा.
ती आल्यावर थोडं संशयाने बघेल, दुर्लक्ष करा ! मग पुन्हा मायक्रो वेव्ह मधे कॉफी गरम करून आणून देऊ का? म्हणून विचारा. ती नकॊ, गरमच आहे असं म्हणेल. पेपर आलेला असेल ( जो तुम्ही समोरच्या खोलीत टी पॉय वर ठेवलाय तो) तिच्या हाता पेपर आणून द्या. तिच्या संशयी नजरेकडे पुन्हा दुर्लक्ष करा.
ती कॉ्फी घेत पेपर वाचत बसेल तेंव्हा तुम्ही हार्पिकचा कॅन उचलून एका टॉयलेट मधे जाऊन टॉयलेट, बेसिन, आणि बाथरूमच्या भिंतीवरच्या टाइल्स स्वच्छ करा. सगळं स्वच्छ झालं की थोडं सुवासिक फिनाइल शिंपडून बाथरूमच्या बाहेर या. कपाटातल्या धुवायच्या चादरी असतील, त्यातल्या चार पाच काढून वॉशिंग मशिन मधे लावा.( हे सगळं काम ती करते रवीवारी दर वेळी)
तो पर्यंत बायकोची कॉफी घेऊन झालेली असेल, ती नेहेमी प्रमाणे किचन मधे गेली की तुम्ही पण तिच्या मागे मागे किचन मधे जा. तिथे फ्रिज मधे डायट बटर चे पाकिट असेल, ते कुठेतरी लपवून ठेवा. आजच्या दिवसासाठी . ब्राउन ब्रेडचे पाकिट बाहेर काढा.. आणि छेः.. बुरशी आलेली दिसते आहे, म्हणुन फेकुन द्या डस्ट बिन मधे. बायको विचारेल काय बनवू ब्रेकफास्टला आता ? पोहे की उपमा? की फोडणीची पोळी??
याचे उत्तर न देता ,कांदे बटाटे बाजूच्या शिंक्यात असतील त्या कडे स्नेहार्द नजरेने पहा आणि त्यातले काही कांदे काढून चिरायला घ्या आणि म्हणा, की विकतच्या त्या खेकडा भजी खाण्यापेक्षा घरची नरम भजी मस्त होतात तुझ्या हातची. आज सकाळपासून तुम्ही केलेल्या कामाचे सार्थक व्हायची वेळ आली असते. ती एकदा तुमच्या सुटलेल्या पोटाकडे पाहिल, पण नंतर , ’तूम्ही राहू द्या- मी करते भजी असे म्हणून तुमच्या हातातून चॉपिंग बोर्ड घ्यायचा प्रयत्न करेल. पण तुम्ही अजिबात बोर्ड देऊ नका, आणि हट्टाने कांदा चिरुन घ्या.
तुमचे कांदा चिरणे होई पर्यंत बायको बेसन वगैरे काढेल, आणि इतर तयारी पण सुरु करेल. गॅस वर कढई ठेवली की तुम्ही तिच्या समोर तुम्ही चिरलेला कांदा ठेवा, आणि स्वतःचा मोर्चा फ्रिझ कडे वळवा. फ्रिझ मधे कुठल्या भाज्या आहेत ते बघा, त्यामधे असलेली घोसाळी ( गिलकी) किंवा पालक वगैरे निरुपद्रवी रामदेव रेकमंडेड भाज्या असतील. आज त्याच भाज्या आज तुम्हाला एकदम सेक्सी दिसतील. घोसाळी, एक बटाटा, मिरची , वांगं वगैरे चे काप करून ते पण बायको समोर ठेवा. कांदा भज्यांसोबत – बटाटा किंवा गिलक्यांची (घोसाळी) भजी खाण्याची मजा काही औरच असते.
तर अशा तर्हेने भजी बनवून भरपूर खाउन झाली, की तूझ्या हातात बाकी जादू आहे, तूझ्या सारखी भजी या जगात कोणीच करू शकत नाही वगैरे डायलॉग बोलून मल्लीनाथी करा- म्हणजे पुढल्या वेळेस ( ती वेळ पण कमीत कमी एक महिन्या नंतर येईल याची काळजी घ्या) पण अशाच प्रोसिजरने बटाटे वडे बनवुन खाता येतील.
रच्याक…नाद्खुळा…च्यामारी एकदम धरुन फ़ट्याक….एक नंबर पोस्ट आहे…..
धन्यवाद…. योगेशे. 🙂 सुरुवातीला मोठ्या प्रेमाने करून आग्रहाने खूप खाऊ घालतात, नंतर मग वजन वाढलं की डायटींग कर म्हणून मागे लागतात 🙂
जोरदार टाळ्या या भन्नाट प्रकारासाठी..
तुमच्या सौ. वाचत नसाव्यात आणि पुढेही कधी त्यांनी वाचू नये अशा शुभेच्छा..(नाहीतर विसरा भजीबिजी मग..)
गिलक्यांची गरमागरम भजी.. अहा.. ओहो..काय आठवण काढलीत हो..
..आता नाही धीर निघत..आणि मिळणारही नाहीयेत लवकर ती आता..
वाईट आहे तुमचा ब्लॉग..
नचिकेत
वाचत नाही म्हणून तर लिहितो इथे. नायतर माझी काय हिम्मत झाली असती का? आयुष्यभरासाठी हातखंडा उपाय वाया गेला असता..
आणि मिळणार नाही असं का ?? नक्की मिळतील. हा प्रकार ट्राय करून पहा एकदा. ोव्हर अ टाइम टेस्टॆड अॅंड ट्राइड आहे ही स्किम .. 🙂
काका,
लय भारी! 😀
शिकून ठेव आता पासून. [पुढे मागे उपयोगी पडेल]
वांगी ट्राय केलीच असतील.
बाय द वे माझी वांग्ङमयीन कृती करून पाहिलीत का? भाज्यांना आल्टरनेट म्हणून..
…
बेडेकर लोणच्याचा तयार मसाला + तेल = मिश्रण
मिश्रण + वांग्याचे पातळ काप = कोटेड काप
कोटेड काप + १५ मिनिटे फ्रीज = थोडेसे फ्रोझन कोटेड काप
फ्रोझन कोटेड काप + (कोरेडे बेसनपीठ +मीठ+जिरे) = कोरड्या बेसनात बुडवलेले फ्रोझन कोटेड काप
तवा + तेल + कोरड्या बेसनात बुडवलेले फ्रोझन कोटेड काप + परतणे = सुरमई कापासारखे खमंग “वांग्ङमयीन” काप
सोबत वाचायला रहस्यकथा किंवा थ्रिलर पुस्तक.. बाहेर पाऊस..
याद करोगे..
पुढल्या वेळेस नक्की ट्राय करतो. पुन्हा शॅलो फ्राय करायचे की मग तेवढंच आपण पण हेल्थ कॉन्शस असल्याचा आव आणता येतो.
हे हे हे..सहिच…..काय पण गुरुमंत्र देत आहात…ग्रेट हं….बरय वहिनी वाचत नाहीत ते..नाहितर भजीबिजी स्वप्नातच मिळेल…
माझा तो एक अॅडव्हान्टेज पॉइंट आहे.. :).
बेश्ट रेसिपी आहे तुमची.
माझा नवरोबा मराठी ब्लॉग वाचत नाही म्हणून वाईट वाटतंय 😉 … सुट्टीच्या दिवसाची इतकी भारी सुरुवात झाली, तर त्याला दर आठवड्याला सुद्धा भजी मिळतील गरमागरम 😀
गौरी
सगळं काही समजत असतं.. लग्नाला २२+व र्ष झाल्यावर बऱ्याच गोष्टी न सांगता पण समजतात 🙂
LOL!!:-):-):-) you forgot a critical step: AFter chopping the onions/ vegetables DO NOT leave the onion skins, and the rest of the clutter around for her to clean up!
स्मिता
ते लिहायचं विसरलोच होतॊ 🙂 धन्स…
Ekdam Jhakas menu ahe
अव्या,
अरे तू काही अजून फार जाड झालेला नाहीस, तेंव्हा तूला काही आवश्यकता पडणार नाही या रेसिपीची.. 🙂
वा वा काका! मस्त आयडिया आहे बायकोला गंडवून काम करून घेण्याची! लग्न झाल्यावर करतोच implement!
No, it’s not an idea to trick your wife:-) you will NEVER really be able to do that!:-) what he has given you is literally a recipe to EARN kanda bhajee by making a compelling case for yourself- especially when she thinks you really shd not be eating such things:-)
धन्यवाद स्मिता
व्यवस्थित आणि बरोबर उत्तर.. अगदी माझ्या मनातलं. 🙂 .
वाह काका..मस्तच..तस सगळा जेवण बनवता येत असल्याने हा प्रकार उलट झाला तरी आवडेल..
भन्नाट पोस्ट…
सुहास
🙂
Sir .. Awessome article .. me nakki laxaat thevin ..
regards
Ameya Gokhale
हा हा धम्माल.. अजून तरी असं जबरदस्तीने डायट करायला लावत नाहीये बायको. पण तशी वेळ लवकरच येणार आहे… तेव्हा ही क्लृप्ती नक्की वापरून बघायला हवी..
>> अशाच प्रोसिजरने बटाटे वडे बनवुन खाता येतील.
हे बेष्ट होतं !!
मला वाटत नाही तूझ्यावर इतक्या लवकर ही वेळ येईल म्हणून.. 🙂
सही चापलुसी आहे ही. 🙂 पण तू हरतालिकेच्या उपवासाच्या दिवशी ही भज्यांची आठवण का म्हणून काढलीस…. टू बॅड. आता मला करून खाताही येणार नाहीत. ( त्यामुळे बिचार्या नचिकेतला ही मिळणार नाहीत. पाप तुझ्या माथी. 😀 ) मी आले की तुझे बिंग फोडणार आहेच आता. हा हा…
श्री
अगं उपास आहे तर काय झालं. माझी आई काय मस्त बनवायची उपासाचं, राजगिऱ्याच्या पुर्या, श्रिखंड , बटाट्याची भाजी, आणि, शिंगाड्याच्या पिठात बुडवून केलेले बटाटा भजी , भगरी चा दोसा ..वगैरे,. उपासाच्या दिवशी तर क्रिएटीव्हीटी ला भरपूर वाव असतो.
तुमच्या दोघांचा पण नि षे ढ…….अरे एका पोस्टमध्ये (including replies ) किती पदार्थांची नाव यायला हवीत हबद्दल्ची एक आचार(हा पदार्थ नव्हे)संहिता लाग केली पाहिजे…सेनापती कुठे आहे??
काका तुम्ही पण मस्त अनुभव लिहिला आहे…फक्त आमच्या कडे भजांच्या बाबतीत तो किचेनमध्ये आणि मी खायला मदतीला असते….मात्र काल बटाटा वडा फर्माईश मात्र आगळ्या रुपात झाली…नेमकी जुनं तेल संपायच्या आधी नवीन तेलाची बरणी उघडली तर नवरा म्हणे ओह आता आपल्याला उगीच बटाटे वडे करून ते तेल संपवावा लागेल….ही ही ही….
हा हा हा…
मजा आहे. मला आठवते पूर्वी एक पोस्ट वाचलेली माझियामनावर .. 🙂 वडे खातांना आमची आठवण जरूर काढा..
वा महेंद्र,
अरे मी पण असे (अयशस्वी !) प्रयोग करुन बघितलेत 😉 !!! मला पोट वाढल्या मुळे हल्ली बरिच कसरत करायला लागते कांदा भजी वगैरे खायची असल्यास. आणि हो आता आईच्या मदतीला मुली पण मोठ्या झाल्यात ना !:-) त्यांचेही माझ्या ढेरी कडे लक्ष असतेच ! जरा वाढलेली दिसली तर तिघींकडून हल्लाबोल होत असतो.
सगळीकडे सारखीच परिस्थिती असते 🙂 आमच्याही घरी तेच असतं.
मस्त ट्रिक आहे ।. तुम्ही ट्राय केलेली दिसतेय. बरं भजी मस्त झाली होती न ?
छेः.. नाही हो.. उगिच लिहिलंय काहीतरी … 🙂
काल्पनीक आहे .
Ekdam Romantic 🙂
सोनाक्षी
ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार.
Pingback: रेसिपी- कांदा,बटाटे भजी, वडा- कटलेट्स किंवा ’काय वाटेल ते’ | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA.
hahaha…….. kaka mast astat tumchya ekek idea….. 🙂
ज्योती
वेळ पडली की सगळं काही सुचतं!
हे हे हे… जबराट.. आवडली रेसिपी ;P
आनंद
लग्न झालं की बायका आग्रह करुन करून खायला घालतात, आणि नंतर मग वजन कमी कर म्हणून मागे लागतात… तुझ्यावर लवकरच ही रेसिपी ट्राय करायची वेळ येईल बघ लग्नानंतर..
Zabardast!!!
सुदिप
धन्यवाद.
वा वा काका, रेसिपी कशी भजीसारखी कुरकुरीत.
बाकी गरमा गरम भजीसाठी चादर घडी करणे आणि कांद्याच्या साली व्यवस्थित केराच्या टोपलीत टाकणे कबूल है.
सिध्दार्थ
हे सगळं बेसिक दिलंय इथे.. अजून काही जास्त माहिती हवी असेल तर प्रायव्हेट शिकवणी वर्ग सुरु करणार आहे मी .. 🙂
Mahendraji,
Mazya blogla link dilyabdaal dhanyawad! ani ho, post pan chan!
धन्यवाद.. प्रतिक्रियेसाठी आभार.
आरेरे, काही उपयोग नाही राव, तुमचा ब्लॉग माझी बायको आवडीने वाचते.
सुहास
तरीही काही हरक्त नाही. त्यांना सगळं काही समजत असतं, पण तरीही काम निभतं…
Kaka..Mast jhakas ekdam…Tumhala kas kay suchat baba kay mahit? Mhanje ikade tar bayko khush an dusarikade dheri kade durlaksh karun hmm mast vada, bhaji yavar tav maraycha. Pan idea baki zakkas…
आता २३ वर्ष पूर्ण झालीत, तेंव्हा इतकं तर यायलाच हवं.. नाही का??:) आणि गरज सगळं शिकवते माणसाला..
KHADUS,,,
मी नाय बॉ! मी काय केलं? मी तर आपला चांगल्या सदगूणी नवऱ्याप्रमाणे वागायचा सल्ला देतोय इतरांना! 🙂
काका बायकांना पण चान्स द्या कि असा
बायकांना नेहेमीच चान्स असतो स्नेहल. त्यांना ती कला उपजतच येत असते, पुरुषांना शिकावी लागते.. 🙂
bhari aagdi bhari.
धन्यवाद..
are wa khuch chan ahe….. mala pan khup watat.. ki.. ase vhave mhanun……………
गीता
मनःपूर्वक आभार. आणि ब्लॉग वर स्वागत. होईल हो, नक्की होईल बघा.. एकदा ” त्यांचं” वजन वाढलं की सगळं काही होईल . 🙂
hello sir.. halli mahe he tasech jhale aahe 1 month jhalet lagnala aani hya mahinyat khup olie bhaji kande chekan fry,, ababababba kai sangu aani aata aamcya sahebanche vajan wadhle aata kai jey..sir man aahe na khup ved aahe hya aashya padnarya pawsat konala nahi bhaji khaushi watnar tumhich sanga…dieat ha funa nako pahije hota life madhe.. pan karnar kai aati saar ha karab asto mahntata na? toch upay
लग्न मानवणे हा वाक्प्रचार म्हणूनच आलाय बहूतेक.
पावसा मधे कांदा भजी हवीतच . आज मी गोव्याला आहे. मार्टीन्स मधे जाऊन मस्त पैकी पाच प्लेट मासे हादडले आहेत 🙂 काय करणार? कंट्रोलही नही होता………. 🙂
hahahah kaka tumchi tar majay aahe kauna nak sangu nahitar tya ragvtilllllllllllllllllllllllllllllll,,,,ha aha ha hiiiii
मजा करायची असेल तर आधी हे सगळं करावंच लागतं! 🙂 आता २३ वर्षाचा अनुभव आहे म्हणून सांगतो. 🙂
farach chhan mi pan karun baghato
भन्नाट कल्पना आहे !!!!
पण काका तुम्ही स्वतः किती दा या कल्पनेचा आस्वाद घेतला आहे 🙂
प्रियंका
नेहेमीच… हा हातखंडा अगदी नेहेमीच चालतो. 🙂
एकदम मस्त रेसिपी … लग्न झालेल्या तमाम पुरुष वर्गाला याची खूपच मदत होईल. आणि हा लेख वाचणार्या लग्न झालेल्या स्त्रिया पण जरा सावध होतील (अर्थात म्हणून भाजी करण्यावर त्याचअ परिणाम होईल अस वाटत नाही )
एकदम मस्त रेसिपी … लग्न झालेल्या तमाम पुरुष वर्गाला याची खूपच मदत होईल. आणि हा लेख वाचणार्या लग्न झालेल्या स्त्रिया पण जरा सावध होतील (अर्थात म्हणून भजी करण्यावर त्याचा परिणाम होईल अस वाटत नाही )
khupch sundar mahendra sir…. me tumchi fan zale ahe….. maz lagn tar ajun zalel nahi pan zalyavar jar mazya husband ne asa prayatn kela tar me tumcha ha blogg nakki lakshat theven……
khup sundar mahendra sir………. me tar tumchi fan zale…. maz tar lagn ajun zalel nahi pan jevha hoel tevha mazya navaryane jar as karaycha prayatn kela tar mala tumcha ha blogg nakki ch athavel….
नक्की आठवेल.. पण या स्टेजला नवरा यायला चांगली दहा एक वर्ष व्हावी लागतात 🙂
hahaha, masta post !
रोहीणी
आभार 🙂