मनातलं…

थोड्याच दिवसा पूर्वीची गोष्ट आहे. वय जवळपास ९० च्या आसपास असावे, स्वतः डॉक्टर – म्हणजे रिटायरमेंट पुर्वी सिव्हिल सर्जन असलेले, आपल्या ५२-५३ वर्षाच्या मुलाला म्हणत होते की  डायबिटीस मूळे माझी  किडनी खराब झालेली आहे असे वाटते, तू मला तुझी किडनी देशील का? ही गोष्ट जेंव्हा मला त्याने सांगितली, तेंव्हा मी विचारातच पडलो. पुरेपूर आयुष्य  जगणं झाल्यावर पण आयुष्याचा मोह काही सुटत नाही मानवाचा. अर्थात ९० व्या वर्षी डायबिटीस असलेल्या माणसाला किडनी  ट्रान्सप्लांट केली  किती सक्सेसफुल होई किंवा होईल की नाही याची खात्री नाही, ही गोष्ट  आयुष्यभर लोकांवर उपचार केलेल्या त्यांना समजत नसेल असे नाही. पण  आयुष्याचा मोह काही सुटत नव्हता.

आयुष्याचा मोह हा कुणालाच टळलेला नाही. प्रत्येकालाच अनंत वर्ष जगायची इच्छा असते. मी जेंव्हा लहान होतो, तेंव्हाची गोष्टं. घरासमोरून बरेचदा प्रेतयात्रा जायची.  प्रेतयात्रा आणि ते मागे राम नाम सत्य है.. म्हणत जाणारे लोकं पाहिले की मग मात्र भीती वाटायची. समजायचं नाही काय आहे ते, पण मागे रडत जाणारे लोकं , समोर हातामधे मडकं घेऊन चालणारा तो माणूस   पाहिला की विचित्र फिलिंग यायचं.

माझं वय तेंव्हा असेल ५-६ वर्ष. ती प्रेतयात्रा  घरासमोरून जायला लागली की मी आईच्या कुशीत शिरायचं, आणि मग प्रश्न विचारून भंडावून सोडायचं.मग वारले म्हणजे काय? देवाघरी गेले ते ठीक आहे, पण ते देवाघरी का बरं गेले? देवाने त्यांना का बरं बोलावून नेले? बरं तू पण अशीच देवाघरी जाणार का? मला पण देवाघरी जावंच लागेल का? — नाही नां.. मला नाही जायचं देवाकडे…तू पण जाऊ नकोस नां…. देवाघरी गेल्यावर काय होतं? असे असंख्य प्रश्न असायचे.

इतक्या लहानपणीच्या गोष्टी लक्षात रहात नाही असे म्हणतात, पण ही गोष्ट मात्र अगदी पक्की लक्षात आहे माझ्या. थोडं मोठं झाल्यावर जेंव्हा मृत्यु म्हणजे काय हे समजलं, तेंव्हा तर अजूनच भीती वाटायला लागली. माझी स्वतःची आजी जेंव्हा वारली, तेंव्हा खरी जाणीव झाली होती मृत्युच्या  दाहकतेची- या अशाश्वत जीवनाची. स्मशानात जेंव्हा लाकडांची चिता रचलेली पाहिली, आणि त्या चितेवर आजीला झोपवले ले पाहिले, नंतर मग  नीट जळावं ते शरीर म्हणून त्यावर रॉकेल  शिंपडतांना , आणि मोठ्या बांबूने   चिता सारखी करतांना पाहिलं….तेंव्हा जे काही वाटत होतं, त्या भावना शब्दात व्यक्त करूच शकत नाही. माणसाचं या जगात सगळ्यात   जास्त प्रेम असतं ते  आपल्या शरीरावर, आणि त्या पार्श्वभूमीवर शरीराचे दहन पहाणं  , आणि ते पण तुमच्या प्रीय व्यक्तीचे म्हणजे  पनिशमेंट!..

मी स्वतः आयुष्यात  बरेचदा   मरता मरता वाचलो आहे. एकदा  लहान असतांना ( वय वर्ष ६-७ ) रस्त्यावरच्या ट्रकच्या चार चाकांच्या मधून अंगावरून ट्रक गेल्यावर पण वाचलो. निपचित पडून होतो, अंगावरून  ट्रक निघून गेला आणि मला खरचटलं पण नव्हतं.  दुसरी वेळ म्हणजे वर्धा नदीतून ( पाणी फार नसेल, फार तर ४ फुट असेल आणि माझी उंची पण तेवढीच) मामाचा हात धरून क्रॉस करत असतांना त्याच्या हाताला हिसका देऊन हात सोडवला आणि मग गटांगळ्या खात राहिलो . मामाने पुन्हा जबरदस्तीने हात धरून बाहेर काढले होते ( त्या नदीतून  पलीकडे गेल्यावर एक देवीचे मंदीर होते तिकडे जायचं होतं आम्हाला.तिसरी वेळ  म्हणजे यवतमाळला महादेव मंदीराच्या समोर एक २०-२५ फुटाचा नाला आहे. तो फक्त पावसाळ्यात दुथडी नदी सारखा वहायचा. त्या नाल्यात खेळतांना पडलो होतो आणि जवळपास १०० एक फुट वहात गेलो होतो. पुढे एका वडाच्या झाडाच्या मुळाला धरून बाहेर निघालो . हे सगळं पाहिल्यावर तर माझं आयुष्य हे बोनस आहे असे पण वाटते बरेचदा.

माझे वडील नेहेमी म्हणतात की तुझ्या पत्रिकेत शनी मंगळ प्रतियोग आहे, फक्त मंगळ लग्नेश आणि पराक्रमात आहे म्हणून चांगला, ( या पराक्रमातल्या मंगळाच्या पराक्रमाने मी अनेकदा अडचणीत पण सापडलेलो आहे- नको तितका स्पष्टवक्तेपणा  जो लोकांना उर्मट पणा  वाटतो मला नेहेमीच अडचणीत आणतो) आणि शनीच्या सम सप्तमात असल्याने असे होत असते. पण स्वगृहीचा भाग्येश गुरु आहे म्हणून तू अशा जिवघेण्या प्रसंगातून सहीसलामत बाहेर पडतोस. पत्रिकेचं निघालं म्हणून सांगतो, मंगळ हा पराक्रमात  मिथुनेला , आणि अष्टमेश  . अष्टमेश अष्ट्माच्या अष्टमस्थानात असणे हा म्हणजे पण एक योग आहे, त्याबद्दल विसरलो आता पुन्हा विचारावे लागेल. असो…विषयांतर होतंय..

या अशा धकाधकीच्या जीवनात वयाची पन्नास वर्ष पुर्ण करणं म्हणजे काही फार नाही. आजकाल तर जीवन मर्यादा ही पण बरीच वाढलेली आहे. जो पर्यंत पेनिसिलीन हा वंडर ड्रग निघाला नव्हता , तो पर्यंत तर पन्नाशी पर्यंत बरेच लोकं पोहोचत पण नव्हते. या वयाला पोहोचण्या पुर्वीच कुठल्यातरी इन्फेक्शनने त्यांना परलोकाची वाट धरावी लागायची- पण आज तसे नाही. मेडिकल सपोर्टच्या बाबतीत आपण खरंच खूप नशिबवान आहोत .

या जीवन मृत्युच्या चक्रामधून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करायचे पुर्वीचे लोकं.  मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना  करायची पद्धत गेलेली आहे. जे काही आहे ते याच जन्मात मिळू दे अशी प्रार्थना केली जाते. ऐहिक गोष्टींच्या फार जास्त मागे लागतो आपण असेही वाटते. साधी गोष्ट – माझ्या कडे आधी याशिका फिक्स्ड फोकस कॅमेरा होता, तेंव्हा मला एस एल आर हवा होता.  नंतर पैसे साठवून   एसएलआर घेतला. नंतर नवीन डीजिटल  कॅमेरा निघाल्यावर तो हवा हवासा वाटायला लागला, म्हणुन एक डिजिटल    कॅमेरा घेतला- आणि अजूनही पुन्हा डीजिटल एस एल आर घेण्याची इच्छा होतेच आहे. आपल्याकडे असलेल्या गोष्टींमधे आनंद घेता येणं कधी शिकणार आहे मी??- असं बरेचदा वाटतं. जे आहे त्याचा उपभोग घेण्या ऐवजी जे नाही, त्याचाच जास्त विचार का करतो मी?

– काय वाटतंय आज ते पण नीटसं शब्दबद्ध करू शकलेलो नाही.अजून बरेच विचार मनात आहेत पण नंतर कधी तरी पोस्ट करीन. वाटतंय की हे पोस्ट थोडं विस्कळीत झालंय तरी पण पोस्ट करतोय-

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , , , , , , , . Bookmark the permalink.

83 Responses to मनातलं…

 1. Samir Deshpande says:

  Mahendraji,

  “Vadhdivasachya Hardik Shubhechha”

  Ajun fakta 50 rahile aahet Century la….. Nakki purn karal…………..

  Samir

 2. ngadre says:

  Kahi viskalit vagaire nahiye.

  Atyant sundar shabd aahet.

  Kharokharache chintan mhanataat te baghayala milale.

  Pannasheechya shubhechchha. Ani tumachaa jagnya kade pahmyaachee khiladu ani rasik vrutti paahoon hee khatri aahe kee pudhale ayushyahee majetach jaaeel tumache.

  • नचिकेत
   सकाळी लवकर जाग आली. एकटाच बसलो होतो ४-३० वाजता. काय मनात येत गेलं ते टाइप करत गेलो. एकटेपणा कधी कधी बरा वाटतो. थोडा विचार तरी करता येतो स्वतःबद्द्ल..
   शुभेच्छांसाठी मनःपुर्वक आभार…

 3. प्रज्ञा says:

  शुभ जन्मदिवस!
  अंतर्मुख झाला आहात. अंतर्मुख केलेत.
  मृत्यूच्या दर्शनानं माणूस अंतर्मुख होतोच.

  • प्रज्ञाताई
   धन्यवाद. काहीतरी आठवलं सकाळी, आणि तेच इथे पोस्ट केलंय.
   “Being with yourself & Living the questions is the most important thing in the life.. ”
   Thanks again.

 4. prajakta211 says:

  Post farch awadli. Agadi khol mulbhoot vichar ahet- ki ek diwas marayche mag apan evdha havyas ka karto?

 5. काका काही गोष्टी कुणालाच चुकल्या नाहीत.. असो 🙂
  असो वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा..

 6. Pratikriya post jhali asel , tar hi pratikriya delet kara.

  दादा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

  वयानुसार व अनुभवांनुसार वाढदिवसाला असं विचारांचं काहूर मनात माजतंच. मला तर असं वाटतं की आयुष्य जगताना आहे त्यात आनंद जरूर मानावा व पण नवीन गोष्टींबद्दल अपेक्षाही ठेवावी.

  माझा पुनर्जन्म इ. गोष्टींवर विश्वास नाही पण मला वारंवार मनुष्यजन्म घेऊन पृथ्वीवर यायला आवडेल. इथे शिकण्यासारखं कितीतरी आहे. दहा आयुष्यसुद्धा कमी पडतील. लहानपणी आपल्याला कळत नाही, पण मोठं झाल्यावर आपले आईवडील आपल्यावर किती प्रेम करतात हे कळतं. इतर कुणाच्या दृष्टीत नाही पण त्यांच्यासाठी आपण स्पेशल असतोच. एखादं सुंदर निसर्गचित्र पाहूनसुद्धा किती आनंद मिळतो, सकाळी लवकर उठल्यावर जो फ्रेश फील येतो तो… खूप… खूप… खूप गोष्टी आहेत या जगात ज्या वारंवार नव्याने अनुभवण्यासाठी मी वारंवार मनुष्यजन्म घ्यायला तयार आहे.

  • कांचन
   आयुष्यावर सतत प्रेम करावे .. हे नक्कीच खरं आहे. पण कधी तरी पुर्णपणे समाधानी व्हायलाच हवे नाही का?जे आहे त्याचा आनंद उपभोगायचे सोडून जे नाही त्याचाच आपण जास्त विचार करत असतो . सकाळी एकटाच बसलो होतो- थोडं नॉस्टेल्जिक वाटत होतं, हा लेख लिहिला तेंव्हा.

 7. अजय says:

  सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा,
  जमेल त्या मार्गाने मी शुभेच्छा देतोय. हो ५० झाले ५० + राहिलेत ना ! ५० + कारण कोणालाच या जगातुन जावेसे वाटत नाही. तो जातो तो फार स्वेच्छेने जातो असे नाही. मी बरेच जणांच मरण जवळून बघितल आहे, प्रत्येकालाच खुप जगावस वाटत.
  ज्यांना मरावस वाटत त्यांना मरण येतेच असे नाही.
  जाऊ दे !
  अजुन आयुष्यात बरच काही करायच आहे !!!
  आजच पोस्ट नेहमी सारखच आवडल.
  अजय.

 8. pratal says:

  happy Birthday kaka !

 9. ngadre says:

  tee 90 years old father vaali story khoopda vichar karunahee kalpane palikadali vatatey.

  90 yrs man wishing for somebody elses kidney and wanting more life is imaginable. But at any age,asking for own sons kidney seems so anti instinct.we wont think for 1 second before dying for our kids at any age.cant imagine causing even a scratch on his/her body..

  And asking for a kidney from them?

  Horrible.

  • नचिकेत,
   मला त्यात काही फार विचित्र वाटलं नाही. ती एक गोष्ट होती बिरबलाची.. माकडीण आणि तिचं पिलू.. आठवते कां?? तसंच काहीसं वाटलं मला. आणि ही घटना अगदी शंभर टक्के खरी आहे !!!

 10. सचिन घायाळ says:

  महेंद्रजी,

  पोष्ट खूप छान आणि विचार करायला लावणारं आहे.
  वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा!

  सचिन

  • सचिन
   बरेचदा आपण एकटं असलो की मनात खूप निरनिराळे विचार येतात. त्यातच गुरफटून जातो आणि हे असं काहीसं मिश्रण तयार होतं विचारांच…
   शुभेच्छांसाठी आभार…

 11. काका वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही उठल्याउठल्या मृत्यूवर विचार सुरु केलेत? नॉर्मली एकटेपणी मृत्यूबद्दल विचारजरी मनात आले तरी मनुष्य घाबराघुबरा होतो…
  असो आय्ष्यातील ते एक अटळ वं आवश्यक सत्य आहे.

  पोस्ट बद्दल बोलायचे तर तुम्ही वासिम अक्रमसारखे एका ओव्हरमध्ये ६ वेगवेगळे बॉल टाकलेत….बऱ्याच वेगवेगळया विषयांना स्पर्श केलात म्हणून कदाचीत तुम्हाला ती विस्कळीत वगैरे वाटली असेल. पण शेवटी ते तुम्ही मनापासून लिहिलेले आहेत ते जास्त महत्वाचे….

  तुम्हाला उदंड वं आरोग्यदायी आयुष्य लाभो……हीच आजच्या दिवशी मनापासून प्रार्थना 🙂

  • विचार करणं ही प्रक्रिया आपोआप सुरु होते. कशाबद्दल विचार मनात यावे यावर काही नियंत्रण नसतं . जशी मानसिक अवस्था असते, तसे विचार मनात येतात. लहान मुलांना वाढदिवस आवडतो, नविन कपडे मित्र, गिफ्ट्स…. या सगळ्या गोष्टींमधे खूप आनंद असतो. बरेचदा तर एक वाढदिवस म्हणजे आयुष्यातले एक वर्ष कमी झाले असे वाटणे सुरु होते थोड्ं वय वाढलं की..
   असो.. ( पुन्हा सुटलो पहा मी… 🙂 )

   शुभेच्छांसाठी मनःपुर्वक आभार…

 12. Rajeev says:

  आपल्याकडे असलेल्या गोष्टींमधे आनंद घेता येणं कधी शिकणार आहे मी??- असं बरेचदा वाटतं. जे आहे त्याचा उपभोग घेण्या ऐवजी जे नाही, त्याचाच जास्त विचार का करतो मी?..

  narayan shranam prapadye…

 13. Rushikesh Tanksale says:

  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेष्या..!!
  बऱ्याच दिवसांनी ब्लॉग्ज वाचत आहे,काही दिवस सुट्टीवर होतो त्यामुळे सगळा backlog भरून काढायचा आहे …

  बाकी नेहमी प्रमाणे छान आणि विचार करायला लावणारी पोस्ट आहे.
  धन्यवाद!

 14. mau says:

  सर्वप्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभे्छा…

  आजच्या दिवशी खरोखर तुम्ही सगळ्यांच्या मनात डोकावुन पाहिलेत…विचार करायला लावणारा लेख !!अप्रतिम मांडणी,उत्कृष्ट लेखनशैली !!

  • उमा
   शुभेच्छांसाठी आभार. तुमच्या सगळ्यांच्याच शुभेच्छांची गरज पडणार आहे या पुढे.. ५०+ 🙂

 15. महेंद्रजी वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा………….
  बोनस म्हणुन मिळालेल्या हया आयुष्याचा तुम्हीही पुरेपुर उपभोग घेत आहात.(तुमच्या विविध पोस्टवरुन) नाहीतर नुसत जगण्याला काय अर्थ आहे.तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जावो हीच शुभेच्छा….

  • देवेंद्र
   धन्यवाद.. 🙂 आता एक हलकं फुलकं खादाडी पोस्ट टाकतो उद्या. 🙂 हे फारच सिरियस झालंय नाही का??

 16. महेंद्र,

  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! वस्तू हव्या हव्या वाटण्याबद्दल योग्य लिहीलेत.

  -निरंजन

  • निरंजन
   संतुष्टी ही कधीच नसते. आयुष्य हे आइस्क्रिम सारखं असतं कधी संपूच नये असं वाटतं, पण आपल्या हातातलं ते आपण कधी संपवता ते आपल्यालाच समजत नाही… 🙂 धन्यवाद.. 🙂

 17. mynac says:

  महेंद्रजी’
  नमस्कार.मनातल कागदावर जसंच्या तसं लिहिल्या मुळे उलट लिखाणात एक प्रवाहीपणा आलाय.हार्दिक शुभेच्छांसह.

 18. सागर says:

  काका
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!
  🙂

 19. नेहमीप्रमाणे सुरेखच लेखन. बाकी महेंद्र तुमच्या आमच्या पत्रिकेत एक साम्य आहे ते म्हणजे भाग्येश भाग्यात. फक्त आमचा तुळेचा शुक्र नेपच्चुन आहे. आमचे १९९२ साली तीन अपघात झाले लग्न. सिंहगडाच्या घाटात मोटरसायकल घसरुन डोळा वाचला व हार्ट अटॆक. एकाच वर्षी समद.डॊक्टरांना लवकर डिटेक्ट झाला नाही तिथ बाकीच्यांच काय? असो आमच्या पत्रिकेत अष्टमेश अष्टमात आहे.तुमच्या लेखावरुन आम्हाला खालील लेख आठवले
  परमसखा मृत्यू : किती आळवावा.- http://mr.upakram.org/node/1386
  सुखांत – http://mr.upakram.org/node/2168

  • प्रकाश
   दोन्ही लिंक वाचल्या. छान आहेत.
   भाग्येश भाग्यात, हे चांगलं आहे पत्रिकेत. आणि जर तो गुरु असेल तर बराच फायदा करून देतो. सध्या माझी शनीची महादशा सुरु आहे. साडेसाती संपली. मस्त गेले ते साडेसातीचे दिवस. प्रमोशन, इन्क्रिमेंट्स खूप फायदा झाला. असो..
   नंतर बोलू या कधी तरी भेटल्यावर….
   शुभेच्छांसाठी आभार..

 20. swapna says:

  ushira ka hoina… pan happy bday!!!
  aani aaj kai zalay kai.. aadhich monday blues.. tyat he asa post.. aai var bhise pan kahi tari aslyach mood madhye aahet.. vacha he http://dhost.info/vnb/blog/
  kahi tari mast liha na… aanandi…

  • स्वप्ना
   उशिरा जरी कोणी विश केलं तरी खूप छान वाटतं पहा.. लिहिन लवकरच.. एक दोन दिवसात एक लाइट मुड मधली पोस्ट.. किंवा मे बी खादाडी स्पेशल..

   • swapna says:

    chalel..palel.. tumachya khadadichya post vachlya ki dupari tamm jevan zalela asla tari kadkadun bhuk lagate mala.. mag aapoaap cafe kade java lagata… pan kahi tari punyatalya addyan baddal liha na.. aamhala vait vatat nustach vachun..

    • इतके ब्लॉगर्स आहेत, पण पुण्यातल्या खादाडी बद्दल कोणीच लिहित नाही.. हे माझ्या पण लक्षात आलंय . हल्ली मी पुण्याला आलोकी अगदी ठरलेल्या जागीच जेवायला जातो. नविन शोधकार्य करावे लागेल आता.. 🙂

 21. Mandar Puranik says:

  Mahendraji,
  Post khupach changli zali ahe.. Karan tyat krutrimta nahiye. Je ahe te natural ahe… Mhanun khup chaan vatte ahe..
  Vadhdivsachya haardik shubheccha !!!
  Ghari ganpati chi gadbad aslyamule 2 divas net pahila nahi.
  Aaj office madhe alyavar pahile tumcha blog baghitla.. tenva kalala ki tumcha vadhdivas 12th la hota mhanun..
  Tumhi evdha deep thinking karta ahat ayushya baddal he khupach changla ahe….
  Atal Bihari Vajpayee yanni tyanchya vadhdivshi lihilelya 2 kavita khupach sundar ahet.
  Tyachi link milali ki forward karto tumhala..

  Warm Regards
  Mandar

 22. काका, वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. हा लेख आणि विस्कळीत? मला तरी कुठेही तसं वाटलं नाही, आणि सर्वच पटलं हे सांगणे नकोच…

 23. Prasad Tharwal says:

  kaka, pahilatar vadhdiwasachya manapurvak shubbhechha…!!

  Kaka blog AS USUAL khup chan zalay.. pahilyanda smashanat jevha samor kaalparva paryanta amchyat asnarya vyaktila jaltana pahilela na…. kahi vel kharach shunyat gelelo…!! Kharya arthane man tevha NIRWIKARI asta asa mala watta.. karan jivanacha shevat samor disat asto…!!

  • प्रसाद
   तो प्रसंग मी आयु्ष्य भर विसरू शकणार नाही. अजूनही बरेचदा नजरेसमोर येतो तो प्रसंग.

 24. Vidyadhar says:

  महेंद्रकाका,
  वाढदिवसाच्या उशीराने पुन्हा एकदा शुभेच्छा! 😀
  एकदम स्वतःशी साधलेला संवाद लिहिलायत… अंतर्मुख करणारा!

  • विद्याधर
   अरे वात्रट पणा तर आहेच माझ्यात, पण कधी तरी चुकुन सिरियस पण होतो मी.. 🙂
   शुभेच्छांसाठी आभार..

 25. bhaanasa says:

  वाढदिवसाच्या पुन्हा एकवार शुभेच्छा!

  या जन्म मृत्यूच्या खेळाचे आकर्षण आणि भय न संपणारेच आहे. कधी कधी वाटतं, उद्या आपल्यासाठी नसेलच तेव्हा आज मध्येच जगावं पण धड नं ते करू शकत आणि धड ना आयुष्याला गृहित धरू शकत. सगळी विस्कळीत अवस्था होऊन जाते. अर्थात रोज मर्राच्या घाईगर्दित बरेचदा हे विचार मागेच पडतात. आणि मग असे अवचित एक वर्षाने मोठे होताना भल्या पहाटे अंतर्मुख करतात. 🙂

  • श्री
   अगदी खरं आहे तूझं.. “रोज मर्राच्या घाईगर्दित बरेचदा हे विचार मागेच पडतात. आणि मग असे अवचित एक वर्षाने मोठे होताना भल्या पहाटे अंतर्मुख करतात.”
   शुभेच्छांसाठी आभार..

 26. काका, वादिहाहाशु… !!

  >> आपल्याकडे असलेल्या गोष्टींमधे आनंद घेता येणं कधी शिकणार आहे मी??- असं बरेचदा वाटतं. जे आहे त्याचा उपभोग घेण्या ऐवजी जे नाही, त्याचाच जास्त विचार का करतो मी?

  या प्रत्येक ‘मी’ च्या जागी ‘आपण’ लावा… फार मोठा युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे आहे हा .. आपल्या सगळ्यांचाच !!

 27. मनोहर says:

  वेगवेगळ्या प्रकारच्या भविष्यकाळांतील भीतीमुळे मनुष्य वर्तमानात स्वस्थपणाने जगू शकत नाही. हिंदूधर्माच्या मते मृत्युभय हे मूळचे भय असून इतर सर्व प्रकारची भीती-भये ही परिस्थितीच्या वेगळेपणामुळे वेगवेगळे स्वरूप मिळालेली मृत्युभयाचीच परिस्थितीत पडलेली प्रतिबिंबे होत. हे भय दूर करण्याचे प्रयत्न म्हणजेच तत्त्वज्ञाने होत. ज्यायोगे मृत्यूचे भय (प्रत्यक्ष मृत्यू नव्हे) दूर होईल असे एकमेव तत्त्वज्ञान प्रत्येक माणसाचा आवाका वेगवेळा असल्याने अस्तित्वात असणे शक्य नाही. परिणामी हिंदू धर्मात पंथोपपंथांची रेलचेल दिसते.

 28. pavankumar says:

  Sir
  Itz an effort to have a great impact on a thinking mind………..i personally don’t want you to stop writting.
  Come on keep it up
  tumhaala aanakhi nave vishay sucho heech sadichchya!
  pavan.

 29. Aparna says:

  वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा….thoda ushiir jhalay mhana…

  baki Heramb + 100

  ani tumchya tya 90 madhlya story chya exact opp story pan mahit aahe….mulala parent ni kidney na dilyachi….aaso….jaude….wadhadiwas kasa sajara kelat tehi kalawa….

  • अपर्णा
   वाढदिवसाला दिवसभर घरीच होतो. सुपर्णा नुकतीच आजारपणातून उठली म्हणून.. संध्याकाळी बाहेर जेवायला गेलो होतो बस्स.. तेवढंच..

 30. arvindganorkar says:

  Dear Rajubhaiya
  Many Happy Returns Of the Day

 31. ajit rangnekar says:

  Mahendraji,
  Sarvapratham vadhdivasachya hardik shubheccha!! (Jara(?) ushirch zala ya shubhecchana! But any way wish u many many happy returns of the day… asech khoop khoop lihit raha. jata jata “bhay ethale sampat nahi…” mrutu mhanaje ek antim satya he mahit asunahi, tyachya nusatya vicharane apan ghabarato!! ek gambhir vishay asunahi vachaneey post lihilit tya baddal thanks!!

  • अजित
   वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी आभार. या पुढे उरलेले आयुष्य मनसोक्त जगायचं हे ठरवलं आहे. सगळी जुनी दूश्मनी वगैरे विसरून मजेत रहायचंय. आहे त्या वस्तूंचा पूर्ण उपभोग घ्यायचा.. बस्स!!

 32. Rajan Mahajan says:

  Namaskar,

  Vadhdivasachya laksha shubhechha……..tumhi ajun 100 varshe (kiman) lihit raha, amhi vachat rahu.

  vadhadivasachya divashi tumhala eka padavichi bhet deto.

  “BIG B” of Bloggers.

  B stands for Brilliant, Beautiful, Bindhas.

  • राजन
   शुभेच्छांसाठी आभार. दोन दिवस नेट वर लॉग इन करूच शकलो नाही, म्हणून उत्तराला वेळ लागला.
   पुन्हा एकदा आभार.

 33. sumedha says:

  महेंद्रजी ,
  पन्नाशीच्या उबंरठ्यावरून विस्तारीत , समृद्ध अनुभवविश्वाला आंनदाने , अधिक उत्साहाने सामोरे जाण्यासाठी लक्ष लक्ष शुभेच्छा !!!
  तुमचे हे ‘जमिनीवरचे’ विचार नेहमीच मला विचार करायला लावतात .जेवढी तुमची पोस्ट छान आहे , तितक्याच त्यावरच्या प्रतिक्रियाही , आणि त्या प्रत्येक प्रतीक्रीयेवरील तुमचे उत्तरदेखील .

 34. sushma says:

  mahendra kaka,
  MANY MANY HAPPY RETURNS OF THE DAY(sorry for let)

 35. लीना चौहान says:

  फार म्हणजे फारच उशिरा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! वाढदिवसाच्या दिवशी उठल्या उठल्या फारच गंभीर विचार मनात आलेत… मृत्यू बद्दल कधी मनात काही विचार आले असतिलही परंतु हा असा विषय आहे की यावर कधी कोणी चर्चा नक्किच करत नाहित. यावर एक अख्खा ब्लॉग पोस्ट… बाप रे

  • लीना
   धन्यवाद..शुभेच्छा या एक दिवसासाठी नसतात तर नेहेमीसाठी असतात.. मनःपुर्वक आभार.

 36. Smita says:

  kaka…Vadhdivasahchya divashi as he manat yen mhanje tumhi phar gambhir zhala ahat.Khar ahe tumhi baryach vishayanna touch kelay hya post madhe. Mhanje as mrutyu baddal suchana an te lihina sarvanach jamat as nahi. PAn he baki khar ahe ki moh, maya hyatun manus baherach yet nahi. Tyala satat he hav, te hav as vatat an te milavnyacha prayatna karto. Mhanun tar aple sant mahant mhantat ki moksh pahije asel tar hya mohat adku naka. Nahitar parat apan Janma an mrutyuchya kachatyat sapaduch. pan hi post vachakanna nakkich swa tapasayana lavel. dhanyawad…

 37. रोहन says:

  पोस्ट थोडं विस्कळीत झालंय खरे पण सर्व सार एका वाक्यात आहेच.. >>> आपल्याकडे असलेल्या गोष्टींमधे आनंद घेता येणं कधी शिकणार आपण??? हे सर्वांना लागू होतेच की… 🙂

 38. Prachi says:

  Mrutyuch khar rup aapal manus gelyavarch kalat… maze ajoba gelyavar as watal ki aayushyacha sagala aadhar sampala… tya dhakkatun sawaraayala barech divas gele….
  pan tumacha lekh aadavalaa.. vichar karayalaa lavlaaat ani junya aathavani hi jagya zalya…

 39. Darshana Darekar says:

  Mala Nahi mahit aaplya javlchich manse ka jatat aaplyla sodun….Kity vaet niyam aahe na ha. Me hi asech kahitari anubhavle aahe…

 40. Shweta Nare says:

  माणूस मरणाला घाबरतो किंवा आजून आयुष्य जगायचंय हा हव्यास प्रत्येकालाच असतो ..
  असे आपण कितीही म्हटले तरीही काहीशी उदाहरणे प्रत्यक्ष जीवनात समोर येतात तेव्हा काही वेगळ्याच विचारांचे द्वंद्व आपल्या आत चालू होते..

  हा लेख मी फार पूर्वी इथेच वाचला होता.. पण प्रतिक्रिया आज द्यावीशी वाटली; त्याचे कारण कालच्या मिड डे मध्ये एक news वाचली कि ……

  “Erika Fani ” ( Graduate in Travel & Tourisom ) नावाची युवती , “Costa Concordia ” नावाच्या cruise वर as a waitress गेली ३ वर्षे कार्यरत होती . “Costa Concordia ” cruise बुडत असताना तिथल्या 6th डेक्क वर होती, अपघाताच्या १५व्या दिवशी तिचे प्रेत ६व्या डेक्क वर सापडले तेव्हा त्या युवतीच्या अंगावर फक्त युनिफोर्म होता ; लाईफ सेविंग जाकेट नव्हते . प्रत्यक्षदर्शी प्रवाश्यांनी सांगितले कि ह्या युवतीने १२-१३ प्रवाश्यांना वाचवले, तिने आपले जाकेट ८५ वर्षाच्या वृद्ध प्रवाश्याला दिले होते नि तो प्रवासी सुखरूप वाचला होता”

  अशा काहीशा गोष्टी आस पास घडतात तेव्हा आपण अनायासे का होईना… पण कुणाचे जगणे अति महत्वाचे होते ह्याचे मूल्यमापन करू लागतो… अर्थात इथे माणुसकीचा अथवा त्या युवतीच्या कर्तव्यादाक्ष्तेचा पगडा भारी ठरला असेल.. तरीही आयुष्याची ८५ वर्ष जगलेल्या माणसाला का असावा तो हव्यास ..? अजूनही आयुष्य जगण्याचा…??? आणि अर्धे आयुष्य जगलेल्या “Erika Fani ” ला नसेल का त्या
  नश्वर जगाचा हव्यास…??? फारच कठीण होऊन बसतं सगळ…!! 😦

  लेख छान आहे.. 🙂 मी जेव्हा बातमी वाचली तेव्हा ; ५-६ महिन्यांपूर्वी वाचलेला तुमचा हा लेख मला आठवला.. 🙂 🙂

 41. Hanumant says:

  http://mazibahin.blogspot.in/ …..आवडला तर कळवा

Leave a Reply to Mandar Puranik Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s